GS-1 पेपरची तयारी

  • GS-1 पेपरची तयारी

    GS-1 पेपरची तयारी

    • 23 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 310 Views
    • 0 Shares
    GS-1 पेपरची तयारी 
     
          सामान्य अध्ययन हा विषय 1979 पासून पूर्व व मुख्य परीक्षेसाठी आहे. 2013 पासून या विषयाच्या स्वरुपात व अभ्यासक्रमात व्यापक बदल केल गेला. 
          सामान्य अध्ययन पेपरमध्ये कशाचा समावेश असावा याबाबत कोठारी समितीच्या शिफारशींचा 1979 मध्ये सुरुवातीस युपीएससीने व त्यानम्तर एमपीएससीने विचार केला होता. 
          त्या अहवालातील नोंदीनुसार - 
          “ज्या विद्यार्थ्याला नागरी सेवेत प्रवेश करावयाचा आहे त्याच्याकडे पुढीलप्रकारचे कौशल्य असावे यावर भर होता -
    1) विविध क्षेत्रातील घटनांची त्याला आवड असावी
    2) त्याच्यासभोवती घडणार्‍या घटनांबाबत तो जागरूक असावा
    3) त्याच्याकडे  देश आणि देशातील जनता याबाबत पुरेशी माहिती असावी.“ 

          या समितीने सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये पुढील अभ्यासक्रम असावा अशी शिफारस केली होती -
    1) Current events of national and international importance -
    2) History & Indian national movement - In history, emphasis should be on broad general understanding of the subject in its social, economic and political aspects. 
    Questions on Indian national movement should relate to the nature and character of the 19th century resurgence, growth of nationalism and attainment of independence.” 
    3) Geography of India - Questions on the geography of India should relate to physical, social and economic geography of the country, including the main features of Indian agriculture and natural resources. 
    4) Indian polity - Questions on Indian polity and economy should test knowledge about the country’s political system, Panchayati raj. 
    5) Economy - Questions on Indian polity and economy should test knowledge about the country’s community development and planning in India. 
    6) General science - Questions on general science should cover general appreciation and understanding of science, including matters of everyday observation and experience, as may be expected of a well educated person who has not made a special study of any scientific discipline. 
    7) General Mental Aility -  Candidates will be tested on reasoning and analytical abilities.

          वरील अभ्यासक्रमावर आधारीत जे प्रश्न विचारले जातील त्याद्वारे उमेदवाराच्या पुढील क्षमतेची तपासणी होईल, अशी आयोगाची धारणा होती -
    1) उमेदवाराची आकलनक्षमता, विश्लेषणक्षमता, तर्क क्षमता व एखाद्या विषयाबाबतचे वस्तुनिष्ठ ज्ञान.
    2) उमेदवाराची स्मरणशक्ती तपासण्यावर कमी भर असेल.
          नवीन अभ्यासक्रमानुसार उमेदवाराकडे एखाद्या मुद्याबाबत पर्याप्त माहितीचा साठा असणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर त्या माहितीचा विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात वापर करण्याचे कौशल्य, त्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. म्हणूनच पूर्व आणि मुख्य परीक्षांचा सामान्य अध्ययन अभ्यासक्रमाचा वेगळा अभ्यास करण्यापेक्षा एकत्रित अभ्यास केल्यास पूर्वपरीक्षेसाठी त्याचा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. परिणामी सामान्य अध्ययन विषयाचा अभ्यास हा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्हींसाठी उपयुक्त आहे. 

    अभ्यासाची दिशा
          आयोगाने अभ्यासक्रमाच्या सुरुवातीस नमूद केलेल्या खालील शिफारशी पूर्वपरीक्षेसाठीही महत्त्वाच्या आहेत. या सूचना -
    1) पेपरमधील प्रश्नांचे स्वरूप आणि दर्जा हा, एखाद्या पदवीधर उमेदवाराला त्याने संबंधित विषयाचा विशेष अभ्यास केला नसतानाही उत्तर देता येऊ शकेल,अशा प्रकारचा असेल. प्रश्नांचा मुख्य उद्देश म्हणजे विविध विषयासंबंधी एखाद्या उमेदवाराची असलेली जागरूकता तपासणे.
    2) उमेदवारांना संबंधित विषयातील घटक व उपघटकाबाबत अलीकडच्या घडामोडी तसेच प्रगतीविषयी ज्ञान असणे आवश्यक आहे.

          या सूचना लक्षात घेऊनच प्रत्येक घटकातील अभ्यासक्रमाची व्याप्ती ठरवून अभ्यासाचे धोरण आखावे. प्रत्येक विषयाला द्यावा लागणारा वेळ निर्धारित करावा. संदर्भ पुस्तकाचा नियमित वापर करून अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना, उपयोजित बाबी, विविध समस्यांवर मात करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना व अभ्यासक्रमातील घटकासंबंधी भोवताली घडणार्‍या चालू घडामोडी अशा विविध आयामांना लक्षात घेऊन समावेशक अभ्यास केल्यास अधिकाधिक गुण प्राप्त करता येतात.
     
          पूर्वपरीक्षेची तयारी करताना उमेदवारांनी खालील बाबीकडे लक्ष द्यावे -
    अभ्यासक्रमाचा आवाका विस्तृत असून पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असल्यामुळे त्यातील प्रत्येक घटक व उपघटकाचे आकलन करून अत्यंत नेमकेपणाने तयारी करावी.
    पूर्वपरीक्षेच्या दोन्ही पेपरमध्ये 3ः1 अशी नकारात्मक गुणप्रणाली आहे. परिणामी अभ्यासाची योग्य व्यूहरचना करताना योग्य संदर्भाची निवड, संकल्पनांचे अचूक आकलन, लक्षात ठेवायची महत्त्वाची आकडेवारी व सद्य:स्थितीतील संदर्भाचा परिणामकारक वापर करावा.
    नकारात्मक गुणपद्धतीमुळे स्कोअरिंग, अचूकता व वेग या बाबी पेपरमध्ये महत्त्वाच्या ठरतात. 
    अभ्यासक्रमातील सर्व मूलभूत संकल्पनांचे आकलन, त्यांचे विश्लेषण व उपयोजन (त्यांचा सद्य घडामोडींशी असलेला सहसंबंध) आणि दैनंदिन जीवनातील त्याचे महत्त्व यावर अधिक लक्ष केंद्रित करावे
    संकल्पनांच्या आकलनासाठी योग्य संदर्भसाहित्य वापरावे व परीक्षाभिमुख दृष्टिकोन विसरू नये. अनावश्यक वाचनाकडे दुर्लक्ष करावे.
    आकडेवारी संकलित करताना ती अद्ययावत व अधिकृत संदर्भातून घ्यावी. उदा. भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्र सांख्यिकी (स्टडी सर्कल), स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ व जनरल नॉलेज ही स्टडी सर्कलची मासिके, भारत व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या वेबसाइटवरील अधिकृत माहिती, इंडिया इयर बुक, शासकीय प्रकाशने, योजना, लोकराज्य, स्टडी सर्कलचे नोकरी मार्गदर्शक साप्ताहिक, इ. 
    विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नोटस तयार कराव्यात. त्यामुळे अभ्यास नेमका व जलद करणे शक्य होते. कमी कालावधीत उजळणी करण्याच्या दृष्टीने त्या उपयुक्त ठरतात. नोटस तयार करण्याअगोदर अभ्यासक्रमाचे काळजीपूर्वक आकलन करावे. मुद्याचे स्वरूप लक्षात घेऊन नोटस तयार केल्यास या नोटस अधिक उपयुक्त ठरतात. बहुपर्यायी परीक्षेत प्रश्नांचा अचूक पर्याय निवडण्यासाठी तुलनात्मक माहिती संकलित करावी. 
    शासकीय कार्यक्रम, यंत्रणा व सद्य:स्थितीतील आकडेवारी लक्षात ठेवावी. त्याबाबतच्या नोंदी छोट्या डायरीमध्ये करून सदर माहितीची कायम उजळणी केल्यास ती अचूकपणे व कायमस्वरूपी लक्षात ठेवणे सोपे जाते. वर्तमानपत्रे व नियतकालिकांचे नियमित वाचन, माहितीचा व आकलनाचा आवाका विस्तृत करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. 

    पेपर-1 ची तयारी
          पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर-1 चा अभ्यासक्रम हा राज्यसेवा मुख्य परीक्षेतील 600 गुणांच्या 4 सामान्य अध्ययन पेपरची छोटी आवृत्ती आहे. सदर विषयाची तयारी ही राज्यसेवा परीक्षेच्या सर्व पातळ्यांवर उपयुक्त ठरते. 
          त्याची तयारी करताना पुढील बाबी लक्षात घ्या -

    1) चालू घडामोडी -
          कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा चालू घडामोडी घटक महत्त्वाचा गाभा असतो. स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होणार्‍या परीक्षार्थींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहेत याचे ज्ञान आवश्यक आहे. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात चालू घडामोडीच्या अभ्यासाला महत्त्वाचे स्थान आहे. विद्यार्थ्यांनी रोज कमीतकमी एक तास याचा योजनाबद्ध अभ्यास करावा. परीक्षेला अवघे काही दिवस राहिले असताना या विषयाची तयारी करण्याचा प्रयत्न केल्यास गोंधळ उडण्याची जास्त शक्यता असते.
    चालू घडामोडींसाठी एक स्वतंत्र नोटबुक तयार करून रोजच्या रोज टिपणे काढल्यास सर्वात जास्त फायदा होतो. त्या वहीचे खालीलप्रमाणे भाग करून नियमित वृत्तपत्रातून टिपणे काढावीत-
    1) आंतरराष्ट्रीय घडामोडी
    2) राष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी
    3) राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी
    4) आर्थिक क्षेत्रातील घडामोडी
    5) पर्यावरण क्षेत्रातील घडामोडी
    6) वैज्ञानिक क्षेत्रातील घडामोडी
    7) कृषी क्षेत्रातील घडामोडी
    8) क्रीडा क्षेत्रातील घडामोडी
    9) करार, पुरस्कार, समित्या, नेमणुका, दिनविशेष इ.
    10) सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील घडामोडी.
          संदर्भ ग्रंथ : स्टडी सर्कलची ‘स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ’ व ‘जनरल नॉलेज’ ही दोन्ही मासिके, ‘नोकरी मार्गदर्शक व्यवसाय’ हे साप्ताहिक.

    2) इतिहास  व भारतीय स्वातंत्र्याची चळवळ -
          पूर्व परीक्षेच्या संदर्भात इतिहासाचे पुढील भाग पडतात - (1) प्राचीन भारताचा इतिहास, (2) मध्ययुगीन भारताचा इतिहास, (3) आधुनिक भारताचा इतिहास, (4) भारतीय स्वातंत्र्याची चळवळ. आधुनिक भारताचा इतिहास हा कोणत्याही परीक्षेला विचारला जाणारा महत्त्वाचा विभाग आहे. इतिहासासाठी स्वतंत्र वही तयार करून त्यात संक्षिप्त स्वरूपात माहिती, सनावळ्या इत्यादी लिहून ही वही परत परत वाचल्यास निश्चितच फायदा होतो.
          संदर्भ ग्रंथ : बी. एन. ग्रोव्हर व एन.सी.ई.आर.टी.ची इतिहासाची पुस्तके.

    3) महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल -
          जगाच्या भूगोलाचा अभ्यास करताना सर्वप्रथम जगातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, जगातील वाळवंटे यांची स्वतंत्र सूची तयार करावी व नंतर खंडनिहाय अभ्यास करावा. MPSC च्या परीक्षेत भूगोलावर बरेच प्रश्न नकाशावर विचारले जात असल्याने परीक्षार्थींनी महाराष्ट्र, भारत व जग याचा अ‍ॅटलास समोर ठेवून अभ्यास करावा. 
          संदर्भ ग्रंथ : महाराष्ट्र व भारताचा भूगोल - एच. के. डोईफोडे, स्टडी सर्कल प्रकाशन, एनसीईआरटीची पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके, जिओग्राफी थ्रू मॅप्स - के. सिद्धार्थ.

    4) पर्यावरण -
          या घटकावर कमाल 20 प्रश्न विचारले गेले आहेत. हा अभ्यासासाठी सर्वात सोपा व मनोरंजक असा विभाग आहे. विशेषत: जैविक बहुविधता, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, प्रदूषण व वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेल्या विविध परिषदा यांचा अभ्यास करावा. याची तयारी करताना खालील प्रकरणांवर भर द्यावा -
    1) वातावरणातील बदल
    2) जैवविविधता
    3) परिस्थितिकी
    4) ग्लोबल वॉर्मिंग
    5) कार्बन क्रेडिट
    6) बायोस्फिअर रिझर्व्ह
    7) नॅशनल पार्क
    8) ओझोन थराचा क्षय
    9) बायोडायव्हर्सिटी हॉट स्पॉट
    10) प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संदर्भासंबंधी कायदे, योजना व उपक्रम, परिषदा, जागतिक प्रयत्न.

    5) भारतीय राज्यपद्धती व प्रशासन -
          15 ते 20 प्रश्न या घटकावर विचारले जातात. या घटकावर मुख्य परीक्षेत स्वतंत्र पेपर असल्याने विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी चांगली करावी. दैनंदिन जीवनात ज्या घडामोडी घडत आहेत त्यांचा संदर्भ अभ्यासासाठी घ्यावा. सर्वप्रथम भारतीय राज्यघटना व्यवस्थित वाचून ती समजून घ्यावी, महत्त्वाची कलमे लिहून ती परत परत वाचावीत, निरनिराळ्या घटना दुरुस्त्या, भारतीय राज्यप्रणाली, पंचायतराज, 73 वी घटना दुरुस्ती, 74 वी घटना दुरुस्ती, नागरी प्रशासन, मानवी हक्क, न्यायिक प्रणाली, निरनिराळे आयोग व त्यांची कार्ये, उदा. संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महिला आयोग, निवडणूक आयोग इत्यादी, केंद्रीय व राज्यस्तरावर नियुक्त केलेल्या निरनिराळ्या समित्या यांचा अभ्यास करावा. 
          संदर्भ ग्रंथ : के. लक्ष्मीकांत, सुभाष कश्यप, भा. ल. भोळे, घांगरेकर यांची पुस्तके, स्टडी सर्कलचे राज्यशास्त्राचे पुस्तक.

    6) आर्थिक व सामाजिक विकास -
          अभ्यासक्रमात भारतीय अर्थव्यवस्थेऐवजी आर्थिक व सामाजिक विकास हा शब्द वापरला गेला आहे. या घटकावर 15 ते 20 प्रश्न विचारलेले जातात. अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या काही संकल्पना समजावून घ्याव्यात. त्यानंतर - (1) शाश्वत विकास, (2) लोकसंख्या, (3) सर्वसमावेशकता, (4) भारत व महाराष्ट्राची कृषी व्यवस्था व सहकार, (5) सामाजिक क्षेत्रातील पुढाकार व दारिद्य्र यांचा अभ्यास करताना त्याची सांगड पंचवार्षिक योजना, बँकप्रणाली, आयात-निर्यात धोरण, करप्रणाली, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, दारिद्य्र निर्मूलन, रोजगारनिर्मिती इत्यादी मुद्यांशी घातल्यास तयारी परिपूर्ण होते.
          संदर्भ ग्रंथ : इंडिया इयर बुक, दत्त आणि सुंदरम, स्टडी सर्कलचे अर्थशास्त्राचे पुस्तक.

    7) सामान्य विज्ञान -
          सामान्य विज्ञानासंबंधी पुढील विषयांच्या मुलभूत संकल्पना, त्यांचे उपयोजन, शास्त्रज्ञ, उपकरणे, तंत्रज्ञान, संशोधन संस्था, शासकीय उपक्रम यावर भर द्यावा - (1) जीवशास्त्र, (2) भौतिकशास्त्र, (3) रसायनशास्त्र, (4) आरोग्य व आहारविज्ञान, (5) प्रगत तंत्रज्ञान. येथे  दैनंदिन जीवनात घडणार्‍या विविध घटनांशी संबंधित असलेल्या सामान्य विज्ञानावर जास्त प्रश्न विचारले जातात.
          शरीरशास्त्राशी संबंधित निरनिराळे आजार, त्यासाठी वापरात असलेली औषधे, व्हिटामिन्स, व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे होणारे आजार इत्यादींचा अभ्यास व्यवस्थित करावा. याशिवाय ऊर्जा, ऊर्जा समस्या, भारताची संरक्षण व्यवस्था इत्यादींचा अभ्यास करावा.
          संदर्भ ग्रंथ : यासाठी विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावीपर्यंतच्या एन.सी.ई.आर.टी.ची पुस्तकांचा अभ्यास करावा.  स्टडी सर्कल प्रकाशनाची ”सामान्य विज्ञान” आणि ”विज्ञान तंत्रज्ञान ” ही दोन्ही पुस्तके परीक्षाभिमुख आहेत, त्यांचा वापर करावा.
     
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 310