GS-1 पेपर : पर्यावरणविषयक मुद्दे

  •  GS-1 पेपर : पर्यावरणविषयक मुद्दे

    GS-1 पेपर : पर्यावरणविषयक मुद्दे

    • 30 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 1982 Views
    • 3 Shares

    GS-1 पेपर : पर्यावरणविषयक मुद्दे

          राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या घटकांवर 15-20 प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न मूलभूत संकल्पना, चालू घडामोडी, पर्यावरण संरक्षण कायदे, परिषदा, पर्यावरण चळवळी व व्यक्ती यावर भर देणारे होते. एमपीएससीच्या परीक्षेत परिस्थितिकी, जैविक बहुविधता व वातावरणातील तापमान वृद्धी यावरील  प्रश्न हे त्या विषयातील विविध संकल्पना, त्यांचा वापर व त्यातील बदल यावर भर देणारे असतात.

    1) विषयाची व्याप्ती व स्वरूप 
          लोकसेवा आयोगाने या विषयासंदर्भात अभ्यासावयाचे मुद्दे सविस्तर दिलेले नसले तरी यापूर्वी झालेल्या परीक्षांत विचारलेल्या प्रश्नांवरून, तसेच दिलेल्या अभ्यासक्रमाशी संबंधित मुद्द्यांची सांगड घातल्यास या विषयाची परिपूर्ण तयारी होऊ शकते. येथे पर्यावरणविषयक समस्या, पर्यावरणाशी निगडित महत्त्वाचे कायदे व यंत्रणा, पर्यावरणविषयक  महत्त्वाचे कार्यक्रम व आंतरराष्ट्रीय करार या बाबींची तयारी महत्त्वाची आहे.
          गेल्या काही वर्षांत प्रकाशझोतात आलेल्या जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम, वनांची तोड, प्रदूषण, त्सुनामी या अनिष्ट बदलांमुळे जी जीवितहानी व वित्तहानी झाली, त्यामुळे पर्यावरणासंबंधी अभ्यासाचे महत्त्व वाढले आहे. रिओ-दि-जानेरो (ब्राझील) येथे 1992 साली झालेल्या पहिल्या जागतिक वसुंधरा परिषदेत तसेच जोहान्सबर्ग (द. आफ्रिका) येथे शाश्वत विकासासाठी 2002 साली झालेल्या जागतिक परिषदेने  पर्यावरणातील होणार्‍या अनिष्ट बदलांकडे जगाचे लक्ष वेधून घेतले. जागतिक पातळीवर युनायटेड नेशन्स पॅनल ऑन क्लायमॅटिक चेंज (IPCC) मार्फत जगभर विविध प्रकारच्या परिषदा आयोजित करून विकास आणि इतर काही घटकामुळे पर्यावरणाची जी हानी झाली आहे ती थांबावी यासाठी विविध देशाच्या धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.  2012 मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या  रिओ-21 परिषदेत आणि नंतर दोहा 2012 परिषदेत असाच प्रयत्न झाला. त्यामुळे  जागतिक पातळीवर होणार्‍या पर्यावरणाच्या र्‍हासाला अटकाव करायचा असेल, तसेच पर्यावरण संवर्धन करायचे असेल तर विविध देशांनी पर्यावरणासंबंधी केलेले कायदे व करार यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच शाश्वत विकासासाठी देशातील जनतेचा सहभाग मिळविताना अविकसित देश मागे राहणार नाहीत याची काळजी घ्यावयाची आहे. पर्यायाने एक प्रशासकीय अधिकारी म्हणून पर्यावरणासंबंधीच्या सर्व संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे. 
          UPSC-MPSC च्या अभ्यासक्रमात 3 घटकांचा जरी उल्लेख केला गेला असला तरी (अ) पारिस्थितिकी व पर्यावरण, ब) जैविक बहुविविधता, क) वातावरणातील बदल).
          या विषयाची व्याप्ती पुढील प्रकारची आहे -
    1) परिस्थिती विज्ञान व पारिस्थितिक व्यवस्था - ऊर्जा प्रवाह, वस्तू-चक्र, अन्न शृंखला व अन्न जाळे.
    2) पर्यावरण अवनती व संवर्धन - जागतिक पारिस्थितिक असमतोल प्रदूषण व हरितगृह परिणाम.
    3) हरितगृह परिणामातील कार्बन-डाय ऑक्साइड व मिथेनची भूमिका.
    4) जागतिक तापमानातील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा र्‍हास. 
    5) पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व पर्यावरणीय प्रभावाचे परीक्षण क्योटो प्रोटोकॉल व कार्बन क्रेडिट्स.
    6) शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र-1 व सागरी संरक्षित क्षेत्र-2.
    7) मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरण-पूरकविकास (शाश्वत-विकास).
    8) नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरण आपत्ती. 
    9) पर्यावरणात संवर्धनात कार्यरत असलेल्या जागतिक पातळीवरील राज्य-राष्ट्र संघटना.
    10) जैविक बहुविविधता व वातावरणातील बदल.
    11) एनर्जी पिरॅमिड, मिल्लेनियम युको स्टिस्टीम असेसमेंट, फायटोप्लँक्टॉन, मँग्रूव्ह अरण्ये, अभयारण्ये, मरीन अपवेलिंग, बायोस्फिअर रिझर्व्ह, राष्ट्रीय अभयारण्ये, टर्मिनेटर सीड्स, ओझोन थराची झीज इ.

    2) विषयासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे 
    अ) परिस्थितिकी व पर्यावरण -
    1) परिस्थितिकी विज्ञान व पारिस्थितिक व्यवस्था -
     परिस्थितिकी, परिसंस्था, ऊर्जाप्रवाह, वस्तूचक्र, अन्न शृंखला व जाळे, मिल्लेनियम इकोस्टिस्टीम असेसमेंट
     मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास (शाश्वत-विकास)
     पर्यावरण संवर्धनामुळे कार्यरत असलेल्या जागतिक पातळीवरील संघटना.
    2) नैसर्गिक साधनसंपत्ती व पर्यावरणाचा र्‍हास -
     नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण
     पर्यावरण अवनती व संवर्धन-जागतिक पारिस्थितिक असमतोल प्रदूषण व हरितगृह परिणाम.
     मासेमारी - ब्लास्ट फिशिंग, डायनामाइट फिशिंग, बॉटम ट्रॉलिंग, सायनाईड फिशिंग, बेकायदेशीर, अनरिपोर्टेड व अनियंत्रित फिशिंग, ओव्हर फिशिंग, शार्क फिनिंग, व्हेलींग
     वृक्षतोड - वनांचा र्‍हास, बेकायदेशीर वनतोड
     खाण उद्योग व प्रदूषण
     हवा, पाणी व जमिनीचे प्रदूषण, किरणोत्सार प्रदूषण, ध्वनी प्रदूषण
     वन्यजीव क्षेत्र, युट्रॉफिकेशन, अधिवासाचा नाश
     ऑक्सिजन कमतरता/न्यूनता(अ‍ॅनॉक्झिक) - कारणे व परिणाम, ऑक्सिजनचे प्रमाण कमी करणार्‍या प्रक्रिया, हायपॉक्झिया, मृत पाणी.

    3) घन आणि धोकादायक कचरा -
     बेसल कन्व्हेन्शन, नागरी भागातील घनकचरा समस्या, घनकचर्‍याचे संकलन, प्रक्रिया व वाहतूक, घनकचर्‍याचा पुनर्वापर, कंपोस्टींग, लँड फिलिंग, इन्सिनरेशन, पायरोलॉसिस, गॅसिफिकेशन, वेस्ट कनव्हर्जन,औद्योगिक कचर्‍याची समस्या, वैद्यकीय कचर्‍याची समस्या
     धोकादायक कचरा व्यवस्थापन व त्याबाबतचे कायदे.
     शहरी कचरा व्यवस्थापन, सागरी संरक्षित क्षेत्र-1 व सागरी संरक्षित क्षेत्र-2.

    4) लोकसमुदाय व पर्यावरण संवर्धन -
     ब्लॅक डेथनंतरची लोकसंख्येतील वाढ, मृतदेहांची विल्हेवाट
     पाण्याचे दुर्भिक्ष, पशुसंगोपन व चारा टंचाई.

    5) ऊर्जा संसाधने व संबंधित जैववस्तुमान -
     पारंपरिक ऊर्जा साधने - कोळसा, नैसर्गिक वायू व खनिज तेल, आण्विक ऊर्जा.
     पुनर्नवीकरण ऊर्जा साधने - सौरऊर्जा, पवनऊर्जा, जल विद्युत, भूऔष्णिक ऊर्जा, जैववस्तुमान ऊर्जा.
     ऊर्जा संवर्धनाच्या पद्धती

    ब) जैविक बहुविविधता - 
          पृथ्वीवरील पर्यावरणाच्या संतुलनाचा एक महत्त्वाचा निर्देशांक म्हणून जैविक बहुविविधतेकडे पाहिले जाते. वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम म्हणजे प्रदूषण व त्यामुळे झालेले पर्यावरण असंतुलन अनेक आपत्तींना कारणीभूत ठरते. पूर, भूकंप, त्सुनामी, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे स्वरूप आणि या नैसर्गिक आपत्तींसाठीच्या महत्त्वाच्या कारणांचे आकलन करावे. 

    1) जैविक बहुविविधता -
     व्याख्या, वैशिष्ट्ये, स्वरूप, वितरण, उत्क्रांती आणि जैविक बहुविविधता
     प्रकार - 1) आनुवंशिक, 2) प्रजातीय, 3) परिसंस्था
     जैविक बहुविविधता व आरोग्य, औषध पद्धती, वातावरण बदलास जुळवून घेण्यासाठी जैविक बहुविविधता.
     जैविक बहुविविधता व उद्योग व्यापार व्यवसाय, सांस्कृतिक आणि कलात्मक बाजू, इतर सेवा.
     स्पेसिज एक्सटिंक्शन - प्रजाती नामशेष होण्याची प्रक्रिया, पोलीनेटर डिक्लाइन, कोरल ब्लिचिंग, होलोसीन एक्सटिंक्शन, इनव्हेजिव्ह स्पेसिज, पोचिंग - अवैध शिकार, धोक्यात असलेल्या प्रजाती

    2) जैविक बहुविविधतेची रासायनिक बाजू  -
     जैविक बहुविविधतेचे रासायनिक घटक, रासायनिकदृष्ट्या सक्रिय, फ्लेव्हर्स, फ्रॅग्रन्स, फेरोमन्स, पॉरफिरिन्स
     महत्त्वाची जीवरसायने - पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कोलेस्टेरॉल, मेदाम्ले, तेलजन्य पदार्थ, विकरे, इम्युनोग्लोब्यूलीन्स, फार्मास्यूटिकल्स औषधे, जीवनसत्त्व, हार्मोन्स
     जैविक विविधतेला रासायनिक धोका - केमिकल टॉक्सिकॉलॉजी, घन विषांचा जैविक बहुविविधतेवरील परिणाम - आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डाय ऑक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, ओझोन, पॅन, सायनाईड, कीटकनाशके, कार्सिनोजेन, प्रदूषित घटक. 
     जैविक बहुविविधता संतुलित राखणारे घटक- ग्रीन केमिस्ट्री, अल्टरनेटिव्ह फिड स्टॉक, सुपर क्रिटिकल फ्लुइड, ग्रीन अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्री, पॉली सॅकेराईड पॉलिमर, बायोकॅटॅलिसिस, बायो मटेरियल्स, बायो पॉलिमर, इंटरनॅशनल इयर ऑफ बायो डायव्हर्सिटी 2010. 

    3) जैविक बहुविविधतेचे संवर्धन -
     फायटोप्लँक्टॉन, मँग्रूव्ह अरण्ये, अभयारण्ये, मरीन अपवेलिंग, टर्मिनेटर सीडस
     अधिवासाचा नाश, त्याचा सजीवावरील परिणाम, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट
     नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतिशोषण - मासेमारी, जलसंपत्ती, वनसंपत्ती, धोक्यातील प्रजाती.
     बायोस्फिअर रिझर्व्ह, नॅशनल पार्क

    क) हवामानातील बदल - 
          गेल्या दशकात ग्लोबल वॉर्मिंग हा मुद्दा जागतिक पातळीवर महत्त्वाचा ठरला आहे. त्यावर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा झालेल्या आहेत. काही जागतिक करारांवर सह्या झालेल्या आहेत. अनेक देशांमध्ये याबाबत मतभेद आहेत. गेल्या काही परीक्षेत याबाबत काही प्रश्नही आलेले आहेत. 
          या विषयाबाबतची भूगोल व विज्ञान-तंत्रज्ञान विषयांतील माहिती महत्त्वाची आहे. यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे - ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, ओझोन थराची झीज, कार्बन क्रेडिट,  क्योटो प्रोटोकॉल, ग्रीन हाऊस परिणाम, कोप परिषदा, माँट्रियल प्रोटोकॉल, आयपीसीसी, कार्बन फूटप्रिंट, कार्बन एक्स्चेंज, आईस मेल्टिंग, कार्बन क्रेडिट व ट्रेडिंग इत्यादी.

    1) हवामानातील बदल -
     हवामान बदल - कारणे, परिणाम हवामान बदलाचे सिद्धांत - सोलर व्हेरिएशन सिद्धांत, अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल हायपोथेसिस, अ‍ॅटमॉस्फेरिक हायपोथेसिस, टेरेस्ट्रिअल हायपोथेसिस

    2) वातावरण व ग्लोबल वॉर्मिंग -
     हरितगृह परिणामातील कार्बन-डाय ऑक्साइड व मिथेनची भूमिका.
     जागतिक तापमानातील वाढ, जैवविविधतेतील घट आणि वनांचा र्‍हास. 
     मिटीगेशन, वेगवेगळे द़ृष्टिकोन, भारताची भूमिका
     ओझोन थराची झीज आणि त्याचे संरक्षण
     कार्बन क्रेडिट व क्लीन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट

    3) प्रदूषण, कारणे, परिणाम व  नियंत्रणाचे उपाय -
     पर्यावरण आपत्ती व प्रदूषणाचे प्रकार - हवा, पाणी, जमीन, किरणोत्सार, ध्वनी, औष्णिक, जनुकीय.
     प्रदूषणाचे परिणाम - आरोग्य व पर्यावरणावरील - आम्लपर्जन्य, ओशियन अ‍ॅसिडीफिकेशन, ग्लोबल वॉर्मिंग, जमीन व पाण्याचे विषीकरण, दलांबरातील ओझोन निर्मिती, बायोमॅग्निफिकेशन, जीनपूलचा र्‍हास. 
     पर्यावरण संरक्षणाबाबत कायदे व उपाय 

    3) प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व परीक्षाभिमुख तयारी 
          गेल्या काही वर्षापासून शालेय अभ्यासक्रमामध्ये तसेच विद्यापीठीय स्तरावर या विषयाचा समावेश करण्यात आला असल्याने स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनी त्याचे वाचन कधी ना कधी केलेले असते. संबंधित विषयाच्या तयारीसाठी वरील अभ्यासक्रमाचे मुद्दे अभ्यासताना विद्यार्थ्यांनी संकल्पना स्पष्ट करण्यावर भर द्यावा. तसेच महाराष्ट्र वनसेवा पूर्वपरीक्षा, राज्यसेवा मुख्य  परीक्षा सामान्य अध्ययन-पेपर-1 व सरळसेवा भरती परीक्षा तसेच युपीएससीच्या खऋड पूर्वपरीक्षेतील संबंधित विषयावरील प्रश्न अभ्यासले तर नक्कीच फायदा होतो.
          जैविक बहुविविधता या घटकाचा अभ्यास करताना जैविक बहुविविधतेच्या संकल्पनेचा अर्थ, व्याप्ती, तिचा र्‍हास होण्याची कारणे, त्याबाबतचे उपाय, विविध करार, बायोलॉजिकल हॉटस्पॉट, त्याबाबतचे युनेस्कोचे धोरण,भारतातील अशी स्थळे - यावर भर द्यावा. हरितक्रांती, जनुकीय पीके, वनांचा र्‍हास, ग्लोबल वॉर्मिंग, नैसर्गिक आपत्ती व नागरीकरण यामुळे जैविक बहुविविधता कशी वेगाने नष्ट होत आहे याचे आकलन करावे. भारतातील प्राणी संपत्ती व वन संपत्तीचा अभ्यास करताना महाराष्ट्रातील अभयारण्ये, व्याघ्रप्रकल्प याविषयी वस्तुनिष्ठ माहिती लक्षात घ्यावी. अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, किल्ले यांची जिल्हानिहाय माहिती संकलित करून अद्यावत ठेवावी.
          पर्यावरणीय र्‍हासासंबंधी सर्व पैलूंचा चालू घटनांसह अभ्यास करताना भारतातील वाढते नागरीकरण, त्यातून उद्भवणारा सांडपाणी, घन कचरा विल्हेवाटीचा प्रश्न, वाहतुकीची समस्या व प्रदूषण यावर भर द्यावा. सागर किनारपट्टी प्रदेशांचा विकास घडत असताना किनारी प्रदेशातील जैव विविधतेचा होणारा र्‍हास व सागरी प्रदूषण पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत. या प्रदेशातील मानवी हस्तक्षेप नियंत्रित करण्यासाठी योजलेल्या सीआरझेड 1 व 2 धोरणाचा अभ्यास करावा.
          हवामानातील बदल या घटकाचा अभ्यास करताना संकल्पना, उपयोजन व चालू घटना यांचा सुरेख मेळ घालावा. पर्यावरणाशी संबंधित विविध संकल्पनांची (राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत) माहिती संकलित करावी. सद्यःस्थितीतील पर्यावरणाचा र्‍हास व त्याच्याशी संबंधित घटक - हरितगृह परिणाम, जागतिक तापमानवाढ, ओझोनच्या थराचा र्‍हास, आम्लवर्षा, प्रदूषण, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा र्‍हास, दुष्परिणामावर मात करण्यासाठी जागतिक पातळीवर हाती घेतलेल्या उपाययोजना वाचाव्यात. जागतिक पातळीवर हवामानाच्या बदलाची तीव्रता वाढल्याने जागतिक पातळीवर  विविध परिषदा पार पडल्या. विशेषतः माँट्रियल करार, क्योटो करार, वसुंधरा, कोपनहेगन, जोहान्सबर्ग परिषद इ. चा सखोल अभ्यास करावा. पर्यावरणासंबंधी विविध करार, त्यातील तरतुदी, त्याबाबतचे जागतिक पातळीवरील विवाद, त्यामधील संभाव्य बदल, कार्बन क्रेडिटची संकल्पना, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम, बास्केट अ‍ॅप्रोच, हवामान बदलासंबंधी आयपीसीसी यांचा अभ्यास करावा.

    4) संदर्भ साहित्य 
    1) स्टडी सर्कल प्रकाशन : सामान्य क्षमता चाचणी पेपर-1 (नवीन अभ्यासक्रमानुसार)
    2) पर्यावरणीय भूगोल - ए. बी. सवदी
    3) पर्यावरणशास्त्र (मराठी अनुवाद कॉ. सिद्धिविनायक बर्वे) 
        Textbook of Environmental - U.G.C. publication-studies By Erach Bharucha)
    4) ’केंद्रीय पर्यावरण व वनमंत्रालय’च्या वेबसाइट सतत अवलोकावी.

Share this story

Total Shares : 3 Total Views : 1982