आरोग्य वार्षिकी 2020 / प्रश्‍नमंजुषा (74)

  • आरोग्य वार्षिकी 2020 / प्रश्‍नमंजुषा (74)

    आरोग्य वार्षिकी 2020 / प्रश्‍नमंजुषा (74)

    • 01 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 1011 Views
    • 0 Shares

    आरोग्य वार्षिकी 2020 

            2020 या सालाची ’कोरोनाचे साल’ म्हणून इतिहासात नोंद झाली. त्यांने सर्व जग व्यापून टाकले. मानवाच्या शरीरात एका विषाणूनं प्रवेश केला आणि त्यानंतर आधुनिक जगानं मृत्यूचं थैमान पाहिलं. मध्ययुगातला संघर्ष, गत शतकातली महायुद्धं ही जगाच्या निवडक भूभागांवर घडून आली होती. जीवघेण्या विषाणूंच्या साथीही भयानक ठरल्या, पण तरीही काही भूभाग त्यांच्यापासून दूर राहू शकले. पण कोरोनाचा सार्स कोव्ह 2 हा विषाणू 2020 वर्षाच्या शेवटी  अंटार्क्टिकापर्यंत पोहोचला. दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनांनी त्याचा प्रवास सुकर केला.• कोरोनाचा संसर्ग, त्यामुळे दिवसागणिक झालेले मृत्यू, त्यावर कमी पडलेले आधुनिक वैद्यकीय उपचार, त्यामुळे जगभरात झालेलं लॉकडाऊन आणि परिणामी पदरात आलेलं प्रचंड आर्थिक नुकसान आणि या सगळ्याचं मानवजातीवर अचानक झालेलं आक्रमण पाहता या संकटाचा परिणाम अभूतपूर्व आणि मोठा आहे.

    2020 : आरोग्य क्षेत्रातील सकारात्मक बाबी
    1) सार्वजनिक आरोग्य सेवा - 2020 मध्ये कोरोनामुळे देशातील सर्व रुग्णालयांमधली बेड्सची संख्या 1.74 लाखावरून 15 लाखांवर पोहोचली.
    2) विक्रमी वेळेत लस निर्मिती - 1918 मध्ये फ्लूची साथ आली होती, पण त्याची लस 1945 मध्ये तयार झाली. जग 1935 पासून पोलिओग्रस्त, पण लस 20 वर्षांनी 1955 मध्ये आली. मात्र कोविडची लस विक्रमी 8 महिन्यांत तयार केली गेली.
    3) टेलिमेडिसीनच्या प्रमाणात वाढ -  आयपीएसओएस सर्वेक्षणातील 95 टक्के डॉक्टरांनी दूरध्वनी किंवा व्हिडिओ कॉलद्वारे सल्ला दिला. मॅकेन्झीच्या अहवालान्वये टेलिमेडिसीनचे प्रमाण 21 वरून 43% झाले.
    4) आरोग्य सेतू अ‍ॅप - हे लाँच होताच 13 दिवसांत 50 दशलक्षाहून अधिक डाऊनलोड होणारे पहिले अ‍ॅप ठरले.
    5) योग व आयुर्वेद - योग-आयुर्वेदाचे आकर्षण वाढले. त्याची बाजारवृद्धी 9 टक्के राहिली. 2027 पर्यंत या क्षेत्राची उलाढाल 4.8 हजार कोटी रुपयांची असेल.
    6) वैद्यकीय शास्त्र - देशात पहिल्यांदाच हैदराबादच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या दोन्ही फुप्फुसांचे पुनर्रोपण केले. तो कोरोनाग्रस्तही होता. दुसरीकडे, तीन डॉक्टरांच्या पथकाने लडाखमध्ये 16 हजार फूट उंचीवर जवानाची आतड्यांची शस्त्रक्रिया केली.
    7) स्टार्ट अप - 2020 मध्ये एकूण नवसंकल्पनांपैकी 10% पेक्षा जास्त आरोग्य क्षेत्रात अस्तित्त्वात आल्या. वोशेरो स्मार्ट बॅजला टाइमने सर्वोत्कृष्ट मानले. त्यात सदस्यांना व्हाइस कमांडद्वारे संवाद साधता येतो.
    8) आरोग्य उपकरणे - मे 2020 मध्ये सर्वाधिक पीपीई किट बनवणारा भारत दुसरा देश ठरला. दररोज 2 लाख पीपीई किट बनवल्या जात आहेत.
    9) डरहॅम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी व्हॅक्यूम मशीनचे व्हेंटिलेटर बनवले. मर्सिडीझच्या फॉर्म्युला -1 अभियंत्यांनी श्‍वसन यंत्र तयार केले जे नळ्यांद्वारे ऑक्सिजन पुरवठा करते.

    2020 : आरोग्य क्षेत्रातील नकारात्मक बाबी
    1) जगभर कोरोनाची लागण व मृत्यूची दहशत - 31 डिसेंबर 2019 रोजी चीनने कोरोेनाबाबत माहिती दिली. तेव्हापासून जगभर 7.50 कोटी बाधित झाले. 16 लाखापेक्षा जास्त मरण पावले. त्यात सर्वाधिक 3.08 लाख मृत्यू अमेरिकेत झाले.
    2) सार्वजनिक आरोग्य यंर्त्रणेवरील ताण व त्रुटी - भारतात पहिला रुग्ण 30 जानेवारी 2020 रोजी वुहानहून केरळला परतलेला विद्यार्थी. त्यानंतर 1 कोटीपेक्षा जास्त रुग्ण. 1.48 लाख मृत्यू. भारत सर्वाधिक संक्रमितांचा दुसरा देश ठरला. कोरोनावर मात करणार्‍या 50 टक्के लोकांना दम लागणे, वेदना, कमजोरीचा त्रास. औषधांचे साइड इफेक्टही समोर. अपुर्‍या आरोग्यसुविधामुळे हे सर्व घदले.
    3) आरोग्य व फ्रंटलाइन वॉरियर्सना जास्त धोका - डिसेंबर 20202 च्या शेवटी जगभरात  3 लाखांपेक्षा जास्त आरोग्यसेवक कोरोनाने संक्रमित झाले होते. सप्टेंबरपर्यंत 7 हजारपेक्षा जास्त जणांचे मृत्यू झाले होते. लॉकडाऊनची अंलबजावणी करणार्‍या सुरक्षा यंत्रणेतील जीवीतहानी वाढली.
    4) गैर कोरोना रुग्णांकडे दुर्लक्ष - कोरोनाच्या दहशतीमुळे दवाखान्यात येणार्‍या गैरकोरोना रुग्णांची संख्या 80 टक्के घटली. जगभरात 2.72 कोटी शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. श्रीमंत देशांमधील मृत्युदर चांगलाच वाढला. दिल्लीतील एम्ससारख्या देशातील मुख्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये रोज 12 हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचारांसाठी येत होते. त्यांची संख्या 80 टक्के घटली. रोज 250 शस्त्रक्रिया होत होत्या, मात्र 9 महिन्यांत डॉक्टरांनी फक्त तातडीच्या शस्त्रक्रियाच केल्या. जगभरातील लसीकरण कार्यक्रम थंडावले. जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ व गोवरची साथ येण्याचा इशारा दिला.
    5) मानसिक ताणात वाढ - जागतिक बँकेच्या अहवालानुसार 26.5 कोटी लोक तणावग्रस्त आहेत. दर 40 सेकंदाला एक आत्महत्या झाली. जगभरात 74 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
    6) बेकारी - कोरोना मुळे 330 कोटी लोकांनी उपजीविकेचे साधन गमावले. 13.2 कोटी गरिबीच्या खाईत ढकलले गेले.

    कोरोना केसेस
           19 डिसेंबर 2020 रोजी  भारतातील कोविड-19 रुग्णसंख्येने 1 कोटीचा टप्पा ओलांडला. मार्च ते डिसेंबर 2020 दरम्यान 1.48 लाख जणांचे जीव गेले, तर 98 लाख लोकांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला. अन्य देशांच्या तुलनेत भारताने महामारीचा सामना यशस्वीपणे केला असला तरी, सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची स्थिती काही अपवाद वगळता चांगली नाही. रुग्णसंख्या अधिक असली तरी महाराष्ट्र, केरळ आदी प्रगत राज्ये आणि अन्य गरीब राज्ये यांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. भारतातील लॉकडाऊनमुळे पोटापाण्याचा गाडा थांबला तेव्हा महाभयंकर पायपीट व उपासमार आणि ‘विषाणू परवडला; पण स्थलांतरित मजूर म्हणून या हालअपेष्टा नकोत’, असे म्हणायची वेळ कष्टकरी वर्गावर आली होती.
    •• भारतात कष्टकर्‍यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या काटक शरीरांनी विषाणूला जुमानले नाही. भारतातील बहुतेक मृत्यू चाळिशी- पन्नाशीच्या पुढच्या वयोगटातील आहेत. 
     1) अ‍ॅक्टीव्ह रुग्णांमध्ये भारत जगात नवव्या क्रमांकावर 
    2) कोरोना संक्रमणाच्या बाबतीत जगात दुसर्‍या स्थानावर 
    3) बरे होण्याच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत जगात दुसर्‍या क्रमांकावर 
    4) मृत्यूच्या आकड्यांविषयी भारताचा अमेरिका आणि ब्राझीलनंतर नंबर लागतो. 

    भारतातील कोविड-19 प्रादुर्भावाची स्थिती झपाट्याने सुधारली -
    ••  पहिल्या 10 लाख रुग्णांची नोंद 168 दिवसांमध्ये झाली होती.
     ••  सप्टेंबरमध्ये 40 ते 50 लाख हा टप्पा 11 दिवसात  गाठला गेला. त्यावेळी रोज 90 हजारांहून अधिक रुग्ण बाधित.
     ••  80 ते 90 लाख हा टप्पा 22 दिवसात गाठला गेला. 
     ••  90 लाखांवरून 1 कोटीसाठी 29 दिवस लागले. 
     ••  रुग्णसंख्येबाबत बंगळुरू, पुणे, मुंबई, ठाणे व चेन्नई ही शहरे देशात पहिल्या पाच क्रमांकावर होती. दिल्लीने तीन लाटांचा सामना केला.
     
    ••  31 डिसेंबर 2020 ची स्थिती -
    देश -
    1) एकूण रुग्ण - 1.05 कोटी 
    2) बरे झालेले रुग्ण - 98.35 लाख 
    3) मृत्यू  1.48 लाख 

    महाराष्ट्र-
    1) एकूण रुग्ण -19.25 लाख 
    2) बरे झालेले रुग्ण - 18.20 लाख 
    3) मृत्यू  - 49,373

    जागतिक स्थिती -
    ••  महामारीच्या पहिल्या टप्प्यात जगाचा थरकाप उडविणार्‍या इटलीमध्ये 5 महिने मृत्युदर 14 टक्क्यांहून अधिक राहिला. 
     ••  अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जगातील सर्वाधिक 1.75 कोटींहून अधिक रुग्ण व 3 लाखांवर बळी नोंदविले गेले. 
     ••  ब्राझीलमध्ये भयंकर उद्रेक अनुभवायला मिळाला. 
     ••  अमेरिका, युरोपमध्ये आधुनिकतेसोबत जंकफूड व अन्य कारणांनी रोगप्रतिकारकशक्ती प्रचंड खालावल्याचे उघड झाले. परिणामी जगाची रुग्णसंख्या 7.50 कोटींच्या पुढे गेली.  
     ••  जिथून कोरोना विषाणू जगभर गेला, त्या चीनमधील वुहान शहराने कर्फ्यू किंवा काही आठवड्यांचे लॉकडाऊन या मार्गाने त्यावर नियंत्रण मिळवले. 
     ••  देशादेशांमधील माणसांचा आहार, आरोग्याची स्थिती आणि रोगप्रतिकारकशक्ती, सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचा दर्जा, वैयक्तिक व सार्वजनिक शिस्त अशा अनेक बाबतीत वेगळेपणामुळे देशादेशांमधील प्रादुर्भावामध्ये फरक पडलेला दिसला. 
     
    जागतिक आरोग्य संघटना व अमेरिकेतील वाद-
    ••  जागतिक आरोग्य संघटनेवर कोरोनाची माहिती लपवणे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवण्याचा आरोप झाला. त्यामुळे अमेरिकेने फंडिंग थांबवली. एकूण फंडिंगच्या 40 टक्के भाग अमेरिका देत होते.
     ••  ट्रम्प यांचा आरोप : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले, ’जागतिक आरोग्य संघटना ’आणि चीनने मिलीभगत केली. दोघेही कोरोना पसरण्याची माहिती लपवून ठेवली. लोकांमध्ये भ्रम पसरवला.’ 
     ••  जागतिक आरोग्य संघटनेचे स्पष्टीकरण : जागतिक आरोग्य संघटनेने आरोप फेटाळून लावले आणि अमेरिकेस फंडिंग चालू ठेवण्यास सांगितले. फंडिंग थांबवल्याने संपूर्ण जगाचे नुकसान होईल.
     ••  तणाव कमी होण्याची अपेक्षा नाही : अमेरिकेत जो बायडेन यांची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड होऊनही हा तणाव कमी होण्याची अपेक्षा नाही. बायडेन या प्रकरणात चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या विरोधात आहेत.
     

    साथ नियंत्रणात आणण्याचे जगभरचे प्रयत्न 
    1) कमी उत्पन्न असलेल्या, गरीब देशात कोविड-19 अधिक घातक ठरण्याची शक्यता होती, पण  ते अनुमान खोटे ठरले. बहुतेक आफ्रिकन देशातील संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण युरोप-अमेरिकेच्या तुलनेत कमी होते.
    2) सर्वाधिक संसर्ग अनुभवणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील संसर्गाचे प्रमाण अमेरिकेशी तुलना करता 40 टक्के इतके, तर मृत्यूचे प्रमाण अमेरिकेहून अर्धे  होते.
    3) काही देशांनी आधीच लॉकडाऊन केल्याचा लाभ त्यांना झाला. आफ्रिकेच्या लोकसंख्येत युवकांचे प्रमाण बरेच मोठे आहे आणि तरुणांना विषाणूची विशेष बाधा होत नाही. ग्रामीण भागातील जनता बहुतेक वेळ खुल्या वातावरणात घालवत असते ज्यात विषाणू फार काळ तग धरू शकत नाहीत.
    4) कोविडच्या निरंतर पाठपुराव्यामुळे अन्य रोगांचे निदान-उपचारावर परिणाम झाला. जीवघेण्या रोगांच्या यादीत कोविडचे स्थान आफ्रिकेत 31 वे आहे.
    5) अमेरिकेत  कोविड हा सर्वाधिक बळी घेणारा रोग ठरला, तर जगभरात या रोगाचे हे स्थान पहिल्या चारांत आहे.
    6) अन्य रोगांच्या फैलावावर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या मनुष्यबळाचा वापर कोविडच्या पाठपुराव्यासाठी झाल्याने त्याचा परिणाम अन्य रोगांच्या माहिती- संकलनावर, उपचारांवर झाल्यामुळे मलेरिया, क्षय व अन्य रोगांनी मान वर काढली.भारतात क्षय झालेल्या रुग्णांच्या निदानाचे प्रमाण एकतृतीयांशाने कमी झाले.

    कोरोनाचे संकट आणि मानवी मृत्यू 
            2020 साली कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने झाला. अगोदर इटली, त्यानंतर अमेरिका-ब्राझिल इथल्या आकड्यांनी आघाडी घेतली. भारताचे आकडेही दडपण वाढवणारे होते. तरीही जगभरातल्या सर्वाधिक मानवी मृत्यूचे कारण हृदयरोग (89 लाख मृत्यू) हेच (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते) आहे. कोरोनामुळे झालेल्या मानवी मृत्यूंची संख्या त्यापेक्षाही कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये जगभरात 17.53 लाख मृत्यू कोविड-19 मुळे झाले.
    •  ’वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ ने ’ऑक्सफर्ड विद्यापीठा’च्या ’मार्टीन’ स्कूल’च्या ’अवर वर्ल्ड इन डेटा’ प्रकल्पातल्या 2017 साली झालेल्या एकूण मानवी मृत्यूंची आणि त्याच्या विविध कारणांची आकडेवारी संदर्भासाठी घेतली होती. त्या आकडेवारीनुसार 2017 साली झालेले मृत्यू -

    •  •जगभरातील प्रतिदिन मृत्यूची कारणे -
    1) प्रतिदिन झालेले मृत्यू - 1.47 लाख 
    2) हृदयरोगामुळे झालेले मृत्यू - 48, 742
    3) कॅन्सरमुळे झालेले मृत्यू - 26,181 
    4) श्‍वसनसंस्थेच्या विकारांमुळे  झालेले मृत्यू - 10, 724 
    5) फुफ्फुसांना झालेल्या संसर्गामुळे झालेले मृत्यू - 7,010
    6) एचआयव्ही एड्समुळे झालेले मृत्यू - 2615 
    7) हे आकडे जगभरातले सरासरी आहेत आणि प्रत्येक देशासाठी ते वेगवेगळे आहेत.
    8) 2017 साली जगभरात झालेले एकूण मृत्यू - 5.60 कोटी 

    ••   जागतिक आरोग्य संघटनेने 9 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित केलेल्या लेखात 2019 सालच्या मृत्यूंची आकडेवारी दिली असून त्यात मृत्यूची 10 महत्त्वाची कारणं दिली आहेत. 
     1) पहिल्या 10 कारणांतील 7 कारणं ही असंसर्गजन्य रोगांची आहेत.
    2) एकूण मृत्यूंपैकी 74 टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांनी झाले. 
    3) हृदयरोग व श्‍वसनसंस्थेचे विकार ही मृत्यूची पहिली दोन महत्त्वाची कारणं आहेत. 
    4) हृदययरोग हे आजही सर्वांत जास्त मानवी मृत्यूंचं कारण आहे. 2000 ते 2019 मध्ये अशा मृत्यूंची संख्या 20 लाखांवरुन 89 लाखांपर्यंत पोहोचली.
    5) 2019 साली जगभरात झालेले मृत्यू - 5.54 कोटी  
     
    •  1918  इन्फ्ल्यूएंझा किंवा ’स्पॅनिश फ्लूची साथ - 
     •  या साथीची तुलना 2020 च्या कोरोना साथीशी होते, कारण त्यावर्षी जगानं पूर्वी न अनुभवलेलं वैद्यकीय आव्हान समोर उभं होतं.  पहिल्या महायुद्धाच्या हानीतून जग सावरत होतं आणि ’स्पॅनिश फ्लू’ची साथ सर्वत्र पसरली. त्यावेळचा संहार कोरोनाकाळापेक्षा कैक पटीनं अधिक होता. जगभरात 5 ते 10 कोटी लोकांचे जीव या साथीनं घेतले होते.
    •  भारतातही या साथीनं  जवळपास 1.80 कोटी लोकांचे जीव गेले. भारताच्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या ते 6 टक्के एवढे होते. ब्रिटिश इंडियातील मृत्यूचे हे प्रमाण जगात सर्वाधिक होते. सार्वजनिक आरोग्य सुविधा जणू नावालादेखील नव्हती. पुढे विज्ञानाची प्रगती लाखो लोकांचे जीव वाचविण्यासाठी सहाय्यभूत ठरली. 
    •  पहिल्या व दुसर्‍या महायुद्धानं जेवढा संहार केला नाही तेवढा या स्पॅनिश फ्लूनं केला होता. जवळपास 5 ते 6 कोटी सैनिक आणि नागरिक यांचे दुसर्‍या महायुद्धात बळी गेले होते. त्यावेळी जर्मन छळछावण्यांमध्ये 60 लाख ज्यूंचे जीव गेले होते.
     
    ••  1943  बंगालचा दुष्काळ  - 
     बंगाल प्रांतात 3 कोटी लोकांचे भूकेनं बळी गेले होते. तत्कालिन ब्रिटिश साम्राज्यात दुसर्‍या महायुद्धात गेलेल्या बळींपेक्षा हा आकडा सहापटीनं अधिक होता.  दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असतेच, पण त्यासोबतच तत्कालिन ब्रिटिश सरकारची धोरणंही या मृत्यूंना कारणीभूत होती. दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळे सैनिकांना अन्नाची कमतरता भासेल म्हणून बंगालमधल्या भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचलं नाही अशी टीका झाली. पण या आपत्तीनं कोट्यावधींचे प्राण घेतले.
     
    कोरोना साथीसंबंधी महत्त्वाच्या संज्ञा
     
     
    ••  कोरोना व्हायरस -
      2020 चं संपूर्ण वर्षं या एका शब्दाने आणि अतिसूक्ष्म आकाराच्या विषाणूने व्यापून टाकलं. 31 डिसेंबर 2019 ला चीनने पहिल्यांदा जगाला वुहानमध्ये आढळलेल्या या व्हायरस आणि त्यापासून पसरणार्‍या संसर्गजन्य आजाराविषयी सांगितलं. कोरोना व्हायरस (सार्स कोव्ह 2) आणि त्यामुळे होणारा कोव्हिड-19 आजार - यांचे जगातल्या सर्व लोकांवर वैयक्तिक, सामाजिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम झाले.

    • • पँडेमिक -
    पँडेमिक म्हणजे जगभर पसरलेली साथ. कोरोनाची ही जगभर पसरलेली साथ पूर्णपणे आटोक्यात यायला बराच मोठा कालावधी लागतो. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी लस हे महत्त्वाचं माध्यम  आहे. डिसेंबर 2020 मध्ये युके, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली, तर भारतामध्येही जानेवारी 2021पासून लसीकरण मोहीम सुरू करण्याची तयारी करण्यात येतेय. डिक्शनरी डॉट कॉमने ’पेंडेमिक’ शब्दाची 2020 मधील वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषणा केली. चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने ’पेंडेमिक’ अर्थात महामारी म्हणून घोषित केलं होतं. मार्चमध्ये या शब्दाचा शोध कितीतरी पटीने वाढला. त्यानंतर दर महिन्याला या शब्दाचा शोध वाढत गेला. हा शोध 100 टक्क्यांहून अधिक आहे.

    • • हर्ड इम्युनिटी -
    हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची वा गटाची रोग प्रतिकारशक्ती. जितक्या जास्त लोकांच्या शरीरात कोव्हिड-19साठीची रोग प्रतिकार शक्ती निर्माण होईल, तितका त्याचा फायदा त्यांच्यासोबत कमकुवत रोग प्रतिकार शक्ती असणार्‍यांनाही होईल, आणि साथ आटोक्यात येईल असं हर्ड इम्युनिटी ही संकल्पना सांगते. हर्ड इम्युनिटी दोन प्रकारे तयार होते - जास्तीत जास्त लोकांना लस देऊन किंवा मग लोकसंख्येतल्या बहुतेक लोकांना तो आजार होऊन गेला तर मग त्या रोगासाठीची हर्ड इम्युनिटी तयार होते.

    ••  अँटीबॉडीज, इम्युनिटी व सिरो सर्व्हे -
      मानवी शरीरातली रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी) ही शरीरामध्ये शिरणार्‍या विषाणूशी प्रतिकार करते. एखाद्या रोगाशी लढण्यासाठी शरीरात तयार झालेली  जैवरसायने म्हणजे अँटीबॉडीज. कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊन गेलेल्या लोकांच्या शरीरात त्यासाठीच्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आढळतात. अशा अँटीबॉडीज किती लोकांच्या शरीरात आहेत याच पाहणी सिरो सर्व्हेमध्ये करण्यात येते आणि त्यावरून लोकसंख्येतल्या किती लोकांना संसर्ग होऊन गेला आहे, याचा अंदाज बांधण्यात येतो.

    ••  कोमॉर्बिडिटी -
      एखाद्या व्यक्तीला इतर कोणते दीर्घकालीन आजार वा व्याधी असतील, त्यासाठीचे उपचार सुरू असतील तर त्याला को-मॉर्बिडिटी म्हटलं जातं. अशा सहव्याधी असणार्‍यांसाठी कोरोना व्हायरसचा संसर्ग  धोकादायक ठरू शकत असल्याने हा शब्द चर्चेत आला.

    ••  क्वारंटाईन-आयसोलेशन / विलगीकरण व अलगीकरण -
      कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांमुळे इतरांना ही लागण होऊ नये म्हणून त्यांना इतरांपासून वेगळं ठेवणं गरजेचं असते.  आयसोलेशन म्हणजे अलगीकरण -ज्या व्यक्तीला संसर्ग झालेला आहे, त्याला इतरांपासून वेगळं करणं. आणि क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण - कोव्हिड झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना किंवा कोव्हिड झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना, परदेश प्रवास करून आलेल्यांना क्वारंटाईन केलं गेलं. यासाठी अनेक क्वारंटाईन सेंटर्स उभारली जातात.

    ••  लॉकडाऊन-अनलॉक -
      22 मार्च 2020 ला एक दिवसाचा ’जनता कर्फ्यू’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आणि मग 24 मार्चला मध्यरात्रीपासून देशभरात कडक लॉकडाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद ठेवण्यात आले. 31 मे 2020 पर्यंत भारतात लॉकडाऊन होता. त्यानंतर एकेक सेवा सुरू झाली. या टप्प्याला - अनलॉक म्हटलं गेलं. अनलॉकच्या प्रत्येक टप्प्यामध्ये नियम जाहीर करत, विशिष्ट सेवा सुरू केल्या गेल्या.

    ••  असिम्प्टमॅटिक - 
      कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाटयाने पसरण्यामागचं एक कारण होतं कोणतीही लक्षणं न आढळणारे रुग्णं. या रुग्णांना एसिम्प्टमॅटिक म्हटलं गेलं. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याने हे रुग्ण इतरांमध्ये मिसळून त्यांना संसर्ग होण्याचा धोका होता. पण सोबतच या रुग्णांना कोणताही त्रास होत नसल्याने त्यांचं बरं होण्याचं प्रमाणही जास्त होतं.

    ••  पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह -
      कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोव्हिड पॉझिटिव्ह म्हणण्यात येतंय. कोव्हिड पॉझिटिव्ह असणार्‍या व्यक्तीवर त्याला जाणवणार्‍या लक्षणांनुसार उपचार करण्यात येतात. पण पॉझिटिव्ह वा निगेटिव्ह या शब्दांचे रूढ अर्थ या 2020 वर्षात बदलले. कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवण्यात येतं.

    ••  मास्क आणि सॅनिटायझर -
      2020 मध्ये प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात रोजच्या रोज वापरण्याच्या गोष्टींमध्ये मास्क आणि सॅनिटायझर या दोन बाबींची भर पडली. नव्या लाईफस्टाईलचा या दोन गोष्टी भाग बनल्या.

    ••  सोशल डिस्टन्सिंग-
      कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एकमेकांपासून अंतर ठेवणे अनिवार्य असते. गर्दी करू नका आणि एकमेकांपासून किमान 5 ते 6 फूट अंतर ठेऊन उभे राहा, हे सांगण्यासाठी ’सोशल डिस्टन्सिंग’ हा शब्द प्रचलित झाला. काहीजणांनी सोशल डिस्टन्सिंगऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरावा, अशा सूचना केल्या होत्या. 

    ••  सॅनिटायझर -
      एखाद्या सार्वजनिक, खाजगी किंवा निवासी इमारतीत किंवा परिसरात प्रवेश करताना सॅनिटायझर्सचा वापर अनिवार्य केला गेला. हाती सॅनिटायझरची बाटली किंवा त्याचे थेंब ओतणे, या गोष्टी आयुष्याचा भाग झाल्या आहेत. अनेक ठिकाणी सॅनिटायझरचे स्टँड अवतरले. पायाने प्रेस केलं की सॅनिटायझर हाती येतं.

    ••  लस -
      2020 च्या सुरुवातीला सार्स कोव्ह 2 अवतरला आणि 2020 संपता संपता कोव्हिड 19 आजारावरची लस लोकांपर्यंत पोहोचली. कोरोना व्हायरसवरची लस ही जगाच्या वैद्यकीय इतिहासातली सर्वात कमी वेळा विकसित करण्यात आलेली लस आहे. पूर्वी लसीकरण हा शब्द प्रचलित होता, पण तो बहुतेकदा लहान वा तान्ह्या मुलांच्या लसीकरणाशी जोडला जाई. लस कशी विकसित केली जाते, त्यासाठी किती काळ लागतो, त्याची चाचणी कशी होते, यासोबतच  लस विकसित करणार्‍या अ‍ॅस्ट्राझेनका, मॉर्डना, फायझर - बायोएनटेक यासारख्या कंपन्यांची नावे चर्चेत आली. जगातली सर्वात मोठी लस उत्पादक असणारी पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट या 2020 वर्षात अनेकांना माहीत झाली.

    ••  हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिविर, फ्लाविपॅरिव्हीर -
      कोरोना व्हायरसवर थेट, प्रभावी औषध  उपलब्ध नाही. पण कोणतं औषध परिणामकारक ठरू शकतं, याविषयी जगभरात संशोधन करण्यात आलं. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, रेमडेसिविर आणि फ्लाविपॅरिव्हीर ही औषधांची नावं लोकांना माहीत झााली. 

    कोविड चाचण्या 
     
    ••  कोविड निदान चाचण्यांच्या बाबतीतील विलंब टाळण्यासाठी जलदगती चाचण्या आणि त्वरित निकालांची यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न झाले.
     ••  नाकातून खोलवर काडी घुसवून नमुने घेण्याबरोबरच, नाकाच्या शेंड्यानजीकचे नमुने घेऊन कोविडचे निदान करण्याची पद्धत विकसित झाली.
     ••  सेलफोनच्या आकाराचे साधन - लुमिर डिएक्स या ब्रिटिश कंपनीने सेलफोनच्या आकाराचे साधन तयार केले. त्याच्या एका टोकाला कार्ड रीडर आहे. आरोग्यकर्मीने रुग्णाचा नमुना घेऊन तो त्या यंत्रात घालायचा, 15 मिनिटांत निकाल हाती येतो. या उपकरणांचा लाभ केवळ कोविडच नव्हे, तर एचआयव्ही, क्षयरोग आणि अन्य रोगांचा प्रसार पडताळण्यातही होऊ शकतोे.
     ••  बायोसेन्सरद्वारे 5 मिनिटांत कोरोनाची चाचणी - भारतीय वंशाचे प्रा. दिपांजन पान यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेतील इलिनॉईस विदयापीठातील संशोधकांनी 5 मिनिटांत कोरोनाचे निदान करणारी चाचणी विकसित केली.  पेपरवर आधारित इलेक्ट्रोकेमिकल सेन्सर वापरून या अल्ट्रासेन्सिटिव्ह चाचणीतून कोरोनाचे निदान केले जाते. 
     ••  कोठेही सहज नेता येण्यासारखा हा स्वस्त बायोसेन्सर एलईडी स्क्रीन किंवा स्मार्टफोनलाही ब्लूटुथच्या माध्यमातून जोडता येतो. तो घरातही वापरता येतो.
     • • संशोधकांनी ग्रॅफेनवर आधारित इलेक्ट्रोकेमिकल बायोसेन्सर तयार केला. त्यात कोरोना विषाणू ओळखण्यासाठी इलेक्ट्रिकल रचनाही तयार केली. संशोधकांनी प्रवाही पट्टी बनविण्यासाठी प्रथम ग्रॅफेन नॅनोप्लेटलेट्सच्या थराच्या मदतीने लेपन केलेला फिल्टर पेपर तयार केला. त्यात सोन्याचे इलेक्ट्रोड्स तसेच विदुयतीय मापनासाठी ग्रॅफेनच्यावर एक पॅड बसविले. सोने व ग्रॅफेन अतिशय संवेदनशील असतात. तसेच त्यांची वाहकताही चांगली असते. त्यामुळे, या अल्ट्रासेन्सिटिव्ह चाचणीतून विद्युत संकेतातील बदल ओळखता येतात. 
    ••  संशोधकांनी कोरोनाच्या पॉझिटिव्ह व निगेटिव्ह नमुन्यांवर या चाचणीची कार्यक्षमता तपासली. त्यावेळी, निगेटिव्ह नमुन्यांच्या तुलनेत  पॉझिटिव्ह नमुन्यांमधील व्होल्टेजमध्ये वाढ झाली. त्यातून 5 मिनिटांत विषाणुच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यात आली. बायोसेन्सर या नमुन्यांतील विषाणुजन्य आरएनएच्या दाबामधील फरक ओळखण्यास सक्षम असल्याचे आढळले. संसर्गाची प्रगती ओळखण्यासाठी आरएनएचा हा दाब महत्वाचा ठरतो. 
     ••  एएसओ प्रोब  - आरएनएवर आधारित कोरोना चाचण्यांतून कोरोना विषाणुवरील एन जनुकाचे अस्तित्व नोंदवले जाते. संशोधकांनी एन जनुकाच्या दोन भागांना लक्ष्य करण्यासाठी एएसओ प्रोब हे उपकरण तयार केले. त्यामुळे, चाचणीतून एन जनुकाच्या दोन भागांचे निरीक्षण केले जात असल्याने ही चाचणी अधिक विश्वासार्ह मानली जाते.
     
    औषधोपचार 
    1) रेमडिसिव्हर -
    1 मे 2020 रोजी रेमडिसिव्हर या अँटी व्हायरल ड्रगला अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाकडून या औषधाला मंजूरी देण्यात आली होती, त्यानंतर हे औषध विविध देशांमधील कोरोनाबाधितांवर वापरण्यात आले. हे औषध अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्यावर देण्यात आले होते. 
    जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रेमडिसिव्हरमुळे रुग्ण बरे होण्याचा कालावधी किंवा मृत्यूची शक्यता कमी होत नाही. त्यामुळे अनेक देशत कोरोना रुग्णांसाठी नवीन अँटी व्हायरल ड्रग्स आणि मोनोक्लोनल अँटीबॉडीजवर अधिक भर दिला गेला. 

    2) मोलनुपिरावीर -
    जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी (रिचर्ड प्लेम्पर) मोलनुपिरावीर (एमके-4482/ईआयडीडी-2801) नावाचे नवे अँटिव्हायरल औषध शोधले. ते कोरोनाला 24 तासांमध्ये रोखू शकते. हे औषध पूर्वी  इन्फ्लुएन्झाच्या विषाणूंवर प्रभावी असल्याचे आधी दिसून आले होते.  ते ‘सार्स-कोव्ह-2’ हा कोरोना विषाणू व त्यापासून होणार्या ‘कोव्हिड-19’ या आजारावरही प्रभावी आहे.  तोंडावाटे घेतले जाणारे एखादे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे हे पहिलेच संशोधन होते.

    3) थेराप्युटिक अ‍ॅक्सिलरेटर -
    मायक्रोसॉफ्टने मार्च 2020 मध्ये मास्टरकार्ड आणि वेलकम समूहासोबत एक ‘थेराप्युटिक अ‍ॅक्सिलरेटर’ निर्माण केला. त्याद्वारे औषधनिर्मिती उद्योगाने विकसित केलेल्या यंत्रमानवाच्या साहाय्याने सध्या वापरात असलेल्या हजारो रासायनिक संयुगांचे पृथक्करण करून त्यातील एखादे संयुग कोविड-19 वर प्रभावी ठरते का, हे मायक्रोसॉफ्टने शोधले, पण असे कोणतेही औषध सापडले नाही. मात्र या प्रयत्नांमुळे जगभरातील औषधनिर्मात्यांच्या औषधांची कोविडविषयक छाननी करण्याचे वैद्यकीय क्षेत्राचे त्रास वाचले. तसेच उपलब्ध औषधांच्या मर्यादांचा अंदाज शास्त्रज्ञांना आला व त्यांना वेगळी दिशा धरता आली.

    4) डेक्सामिथासॉन  व ‘रिकव्हरी’ चिकित्सा यंत्रणा 
    कोविडवरील उपचारांकरता गतिमान चाचण्या घेण्यासाठी ‘रिकव्हरी’ नामक  चिकित्सा यंत्रणा उभारली गेली होती. त्याद्वारे डेक्सामिथासॉन या स्टेरॉइडच्या वापरामुळे गंभीर प्रकरणांत मृत्यू येण्याची शक्यता 30 टक्क्यांनी कमी होत असल्याचे दिसून आले.

    कोरोना लसीकरण
            2020 वर्षाअखेर जगभर विविध कंपन्यांच्या लशी उपलब्ध झाल्या. जगभरातील अनेक औषधनिर्मिती कंपन्या एकत्र येऊन एका वेळी अनेक लसींचे उत्पादन करत आहेत. औषध व लसनिर्मिती उद्योगात गुंतवणूक प्रचंड आणि अपयशाच्या मोठ्या शक्यतेमुळे नुकसानीची धास्ती मोठी असते. जगभरातील संशोधकांनी एकमेकांशी समन्वय साधत ही आव्हाने पेलली असून आर्थिक तोटा झालाच तर तो सोसण्यासाठी काही देशांची सरकारे आणि बिल अँड मेलिंडा ग़ेटस फाउंडेशनसारख्या संस्था पुढे आल्या.
    ••  संशोधनाच्या नियम आणि प्रणालीनुसार प्रत्येक औषधाचा किंवा लसीचा प्रथम प्राण्यांवर प्रयोग केला जातो. निर्धोकपणाचे दाखले मिळाल्यावर प्रायोगिक तत्त्वावर माणसांमध्ये 4 टप्प्यांमध्ये चाचण्या होतात. या सर्व संशोधनासाठी कमीत कमी पाच ते सात वर्षे लागतात.
     ••  करोना लसीचा मूलभूत हेतू रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणे असला तरीही लस म्हणजे करोनावरचा उपाय नव्हे. त्या औषधांवर स्वतंत्र संशोधन सुरू आहे.
     ••  सार्स कोव्ह 2 या करोना विषाणूवरच्या पहिल्या लसीच्या माणसांवरील संशोधनाला मार्च 2020 मध्ये प्रारंभ झाला.  डिसेंबर 2020 मध्ये जगभर या विषाणूवरच्या 145 लसींवर संशोधन सुरू होते. यापैकी 58 लसींची माणसांवर तर 87 लसींची प्राण्यांवर चाचणी झाली होती. 
     ••  या सर्व लसींचा मूलभूत हेतू प्रतिकारशक्ती निर्माण करणे हा असला तरी प्रत्येक लसीची रचना, निर्मिती, गुणधर्म वेगवेगळे असल्याने त्यानुसार त्याची मात्रा, शारीरिक परिणाम आणि दुष्परिणाम वेगवेगळे असू शकतात. म्हणूनच कोणत्याही लसीला मान्यता मिळण्यापूर्वी त्या लसीचा विविध वंशाच्या, विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांवर होणार्‍या परिणामांचा तसेच तातडीच्या व दूरगामी दुष्परिणामांचा अभ्यास करावा लागतो. यामुळेच, आजवर कुठल्याही लसीला  अमेरिकेच्या एफडीए सारख्या औषध नियमन संस्थांची मान्यता मिळालेली नाही.
     

    ••  प्रथम लस -
      इंग्लंडमधली 90 वर्षीय मार्गारेट कीनन ही कोरोना लस घेणारी जगातील पहिली व्यक्ती ठरली. तिला कोरोनाची पूर्ण विकसित झालेली लस 8 डिसेंबरला देण्यात आली. ती फायझर/बायोएनटेकद्वारा तयार करण्यात आली होती.

    ••  लसीची मात्रा -
      लसीची मात्रा किती असावी याबाबतीत संशोधन झाले.  काही लशींचा 0.5 ग्रॅम चा डोस पुरेसा आहे,  तर काहींमध्ये तो 8 ग्रॅम इतका जास्त होता.

    लस निर्मिती व चाचण्या 
    1) मॉडर्ना (अमेरिका) मेसेंजर आरएनए प्रकारची मार्च 2020 मध्ये माणसांमध्ये चाचणी सुरू झालेली पहिली लस होती. 
    2) फायजर (अमेरिका) आणि बायोनटेक (जर्मनी) यांची एमआरएनए प्रकारची पाश्रि्चमात्य देशात आपत्कालीन मान्यता मिळालेली पहिली लस ठरली. 2 डिसेंबर 2020 ला ब्रिटनने फायजरच्या लसीला आपत्कालीन मान्यता दिली. 
    3) एस्ट्राझेनेका (इंग्लंड), ऑक्सफर्ड (इंग्लंड) यांनी सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या साह्याने लस बनवली. 
    4) क्युअरवएक (जर्मनी) यांनी तयारकेलेली एमआरएनए  प्रकारची लस फ्रीझमध्ये 5 डिग्री सेल्सियस तापमानात तीन महिने सुरक्षित राहते. 
    5) आयनोवियो (अमेरिका) यांची  डीएनए प्रकारची लस विद्युत लहरीमार्फत त्वचेतून दिली जाणारी लस असणार आहे. झायडस कॅलिडा या भारतीय कंपनीची लस डीएनए स्कीन पॅच मार्फत दिली जाणार आहे.
    6) रशियाच्या गॅमॅलेया रिसर्च  - या संस्थेच्या अ‍ॅडिनोव्हायरस लसीने मास इम्म्युनायझेशन करणारा रशिया हा पहिला देश आहे. या लसीचे रशिया, भारत, बेलारूस अशा विविध देशात सध्या संशोधन सुरु आहे. 
    7) सायनोव्हॅक्स या चिनी सैन्यासाठीच्या मर्यादित लसीकरणाला जूनमध्ये मान्यता देण्यात आली. ही लस चीनमध्येच विकसित झाली.
    8) जॉन्सन अँड जॉन्सन (अमेरिका) च्या लसीला काही दुष्परिणामांमुळे ऑक्टोबरमध्ये तात्पुरता विराम देण्यात आला. 
    9) कोव्हॅक्सीन ही भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी बनविलेली लस ही भारतात बनलेली पहिली लस आहे. तर कॅनडात निकोतियाना बेनथामीयाना या झाडापासून लस बनविण्यात आली आहे.
    • • एमआरएनए तंत्राद्वारे लस निर्मिणार्‍या कारखान्यांची संख्या बरीच कमी आहे. या लसींना -70 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावे लागत असल्याने विकसनशील देशात त्यांचे वितरण करताना अडचणी येतात. मॉडर्ना आणि फायजरच्या लसी उणे 70 सेल्सियस इतक्या कमी तापमानात साठवाव्या लागतात. भारतात हे तापमान राखणे आव्हानात्मक आहे.
    ••  ‘मोडेर्ना’ आणि फायझर/बायोएनटेक यांनी विकसित केलेल्या लसींना अमेरिका आणि इंग्लंड धरून अनेक देशांत आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली. या लसींचे उत्पादन, साठा आणि त्यांची सुरक्षित वाहतूक हे मोठे आव्हान आहे.
     ••  ‘अ‍ॅस्ट्रा झेनेका’ने  एमआरएनएऐवजी वेगळ्या तंत्राने तयार झालेल्या या लसीची परिणामकारकता 70% असल्याचे सिद्ध झाले आहे. एवढी परिणामकारकता कोविडचा फैलाव रोखण्यास पुरेशी आहे. फायझर आणि मॉडेर्नाच्या लसींची परिणामकारकता अनुक्रमे 94 व 95% आहे. 
     ••  करोनाच्या म्युटेशनमुळेही लसीकरणाला आव्हान निर्माण होऊ शकते. सध्याच्या लसीला प्रतिसाद देणारा विषाणू भविष्यात गुणधर्म बदलून प्रतिसाद देणे कमी करेल किंवा बंद करेल. त्यावेळी विषाणूप्रमाणे लसीमध्येही बदल घडवावे लागतील. आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे या आव्हानांवर मात करणे शक्य होईल.

    •  जगासाठी  10 अब्ज डोसची गरज -
    1) लसीच्या 1 डोसने काम होत असेल, तर जगाला सुरक्षित करण्यासाठी 5 अब्ज डोस लागतील. 2 डोस आवश्यक झाल्यास 10 अब्ज डोसची गरज असेल.
    2) सध्या जगभरातील औषधनिर्माते सामायिकपणे विविध प्रकारच्या लसींच्या 6 अब्ज डोसांचे उत्पादन वर्षाकाठी करत असतात. अत्यावश्यक अशा या लसींच्या निर्मितीला धक्का न लावता कोविड-19 विरोधी डोस तयार करायचे असतील, तर या क्षमतेत दुपटीने किंवा तिपटीने वाढ करावी लागेल.
    3) बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने उत्पादन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘सेकंड सोर्स अ‍ॅग्रीमेंट’ नावाची प्रक्रिया राबवली. श्रीमंत देशातील लसनिर्मात्या कंपन्यांसाठी विकसनशील देशांतील लस-उत्पादक जोडीदार शोधले आहेत, याच प्रक्रियेंतर्गत जगातील सर्वांत मोठी लसनिर्माती कंपनी असलेली भारतातील सीरम इन्स्टिट्यूट अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीचे उत्पादन करत आहे.
     
    •  शीतसाखळी व लस वाहतूक -
    1) कोविड-19 लसीच्या उत्पादनाबरोबर तिचे समतोल वितरण करण्याचे आव्हान आहे. हे उत्पादन विवक्षित तापमानातून जगभर पोहोचते करणे आव्हानात्मक आहे.
    2) देशांतर्गत वितरणाची जबाबदारी त्या-त्या देशांच्या सरकारांची असल्याने श्रीमंत देशांना यासाठी गरीब राष्ट्रांची मदत करावी लागेल.
    3) एकदा लस सर्वत्र उपलब्ध झाल्यावर ती घेण्यास तयार नसलेल्यांचे मतपरिवर्तन करावे लागेल. लस टोचणीसाठी लोक बहुसंख्येने पुढे आले, तर मग शंका घेणार्‍यांना धीर येईल.
    4) कोविड-19 लस अत्यंत सुरक्षित असल्याचे पटवून देण्याचे काम राजकीय नेते, विचारवंत, वैज्ञानिक आणि डॉक्टरांना करावे लागेल.

    •  इम्युनिटीमुळे  कोरोनापासून 8 महिन्यांपर्यंत बचाव -
    1) कोरोनातून बरे झाल्यानंतर संबंधित रुग्णाला किमान 8 महिने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती या व्हायरसविरोधात लढण्याची क्षमता प्रदान करते. 
    2) ऑस्ट्रेलियातील मोनाश युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, प्रतिरक्षणा प्रणालीत विशिष्ट प्रकारच्या कोशिका असतात, त्यांना ‘मेमरी बी’ म्हटले जाते. या कोशिका व्हायरसचे हल्ले स्मरणात ठेवतात. जर एखाद्या व्हायरसने पुन्हा हल्ला केल्यास या कोशिका प्रचंड वेगाने उत्पादनाच्या माध्यमातून प्रतिरक्षा प्रतिक्रिया देत एकप्रकारे सुरक्षा कवच तयार करतात. यामुळे शरीराचा बचाव होण्यास मदत मिळते.

    •  प्रतिपिंडांच्या प्रतिसादात बदल -
    1) कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आपले शरीर प्रतिपिंडे (अँटिबॉडिज) तयार करते.
    2) फ्रान्समधील सोरबॉन विद्यापीठातील वैज्ञानिक - कोरोनाग्रस्त रुग्णांच्या म्युकस मेंब्रेनमध्ये आढळणारी ‘आयजीए’ प्रतिपिंडे इतर प्रकारच्या प्रतिपिंडांपेक्षा सक्रिय. म्युकस मेंब्रेन म्हणजे शरीरातील विविध पोकळ्यांत आढळणारा, अंतर्गत अवयव झाकणारा श्लेमल पडदा होय. 
    3) कोरोना रुग्णांच्या म्युकस मेंब्रेनमधील ‘आयजीए’ प्रकारच्या प्रतिपिंडांनी ‘आयजीएम’ व ‘आयजीजी’ या प्रतिपिंडांनी इतर प्रतिपिंडांपेक्षा ‘सार्स कोव-2’ विषाणुला लवकर प्रतिसाद दिला. एरवी ‘आयजीएम’ प्रकारची प्रतिपिंडे प्रतिकारशक्तीला सर्वांत पहिला प्रतिसाद देतात्.
    4) रुग्णांना कोरोनाची लक्षणे सर्वप्रथम जाणवू लागल्यानंतरच्या सुरवातीच्या तीन ते चार आठवड्यानंतर प्रतिपिंडात हा बदल होत असल्याचे निरीक्षण 
    5) ‘आयजीए’ स्त्रवणार्‍या प्लाझमाब्लॅस्टस या पेशींमुळे आयजीएच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते. कोरोना विषाणु हल्ला करत असलेल्या श्वसनमार्गाच्या पृष्ठभागावरील श्लेष्मल त्वचेवर त्या केंद्रित होतात.
    6) ‘आयजीजी’ पेक्षा ‘आयजीए’ प्रतिपिंडे विषाणुला नामोहरम करण्यास अधिक सक्षम असल्याचेही आढळले. 

    •  जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर -
    1) कोरोना प्रतिबंधक लसींमध्ये सर्वांत आघाडीवर असलेली फायझर कंपनीची लस बनवण्यासाठी जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ही एमआरएनए लस आहे. याद्वारे शरीरात प्रोटिन निर्माण केले जाते आणि त्यातून प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडी तयार होते. 
    2) त्यामुळे या लसीच्या साठवणुकीसाठी आणि वितरणासाठी डीप फ्रीज उत्पादन, स्टोअरेज आणि ट्रान्स्पोर्टेशन नेटवर्कची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते.

    शीतसाखळी व लसीची कार्यक्षमता
    1) जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील देशांमध्ये दरवर्षी पाठवल्या जाणार्‍या लसींपैकी अर्ध्याहून अधिक लसीं योग्य पद्धतीने न हाताळल्याने खराब होतात. अशी लस दिली गेल्यास ती परिणामकारक ठरत नाही. 
    2) भारतात सध्या सुमारे 37 हजार कोल्ड चेन स्टोअर्स आहेत. एमआरएनए  लसीकरणाची मोहीम पूर्णपणे पार पाडण्यासाठी आणखी 16 हजारहून अधिक कोल्ड चेन स्टोअरेजची आवश्यक ता आहे. या गोदामांमध्ये लस अत्यंत कमी तापमानात साठवली जाऊ शकते. तसेच फायझर कंपनीने ही लस स्टोअर करण्यासाठी सुटकेसच्या आकाराचे कंटेनर तयार केले आहेत. या कंटेनरमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवण्यात आले आहेत. या ट्रॅकरच्या सहाय्याने तापमानाचे निरीक्षण केले जाऊ शकते. ड्राय आईसमध्ये लसीचा डोस उणे 70 सेंटिग्रेड तापमानात 10 दिवसांपर्यंत साठवला जाऊ शकतो. वाहतुकीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर लस फ्रीजमध्ये 2 ते 8 सेंटिग्रेड तापमानात पाच दिवसांपर्यंत सुरक्षित राहू शकते. 
    3) मॉडर्ना कंपनीच्या लसीसाठी उणे 20 अंश सेल्सिअस तापमान आवश्यक आहे.  त्यामुळे भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट आणि कॅडिला या तीन लसींची वाहतूक, साठवणूक आणि अर्थकारणाच्या दृष्टीने उपयुक्त आहे. 
    4) लस देण्यासाठीच्या सिरिंजची निर्मिती, काचेच्या कुप्या यांचीही मोठ्या प्रमाणावर गरज असल्याने त्याबाबतचे आव्हानही मोठे आहे. हा सर्व महाकाय लसीकरण प्रकल्प पार पाडल्यानंतर त्यातून निर्माण होणार्या वैद्यकीय कचर्याचीही विल्हेवाट सुयोग्य पद्धतीने लावली गेली पाहिजे. 

    कोरोनाच्या लसीमधील ’पोर्क जिलेटीन’
            कोरोना लस तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पोर्क जिलेटीनमुळे काही मुस्लीम धर्मिक संस्थांनी विशिष्ट कोरोना लशी या ’हराम’ ठरवल्या. तर काही मुस्लीम देशांनी समाजाला वाचवणे ही प्राथमिकता असल्याने या लशीच्या वापराला परवानगी दिली. मुस्लीम धर्माप्रमाणेच पारंपरिक ज्यू लोकही डुक्कर खाणे निषिद्ध मानतात. त्यामुळे कोरोना लसीबाबत ज्यू लोकांमध्येही अशी चिंता आहे. ज्यू धर्माच्या नियमांप्रमाणे नैसर्गिक रित्या तोंडावाटे खाण्यात येणार्‍या पदार्थात डुक्कराचा वापर करणे निशिद्ध आहे. जर डुक्कराचा अंश इंजक्शन वाटे शरिरात जाणार असेल तो तोंडावाटे जाणार नसेल तर तो ज्यू धर्मिक नियमानुसार निषिद्ध नाही. 

    • लशीमध्ये पोर्क जिलेटीनचे  महत्व -
    1) पोर्क जिलेटीनचा हा वापर लशीची साठवणूक आणि वाहतूक करताना ती लस सुरक्षित रहावी म्हणून केला जातो.  लसीची मोठ्या प्रमाणावरील मागणी, पुरवठा करणारी व्यवस्था आणि त्याचा खर्च, लसीचे अल्प आयुष्य यामुळे लस सुरक्षित ठेवण्यासाठी डुक्कराच्या त्वचेपासून तयार करण्यात येणार्‍या जिलेटीनला सध्या पर्याय नाही. 
    2) फायझर, मॉडर्ना आणि अ‍ॅस्ट्राझेनका यांच्या कोरोनावरील लसीमध्ये डुक्कराच्या त्वचेचा वापर करण्यात आलेला नाही. पण, या लसींचा मर्यादित पुरवठा आणि अनेक देशांनी आधीच केलेल्या लाखो डॉलरच्या करार केलेल्या कंपन्यांना जिलेटीन फ्री लसीचे प्रमाणपत्र मिळालेले नाही. 
    3) अनेक  कंपन्या पोर्क फ्री लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. स्विस फार्मासिटीकल कंपनी नोव्हार्टिस यांनी मेंदूज्वरावर पोर्क फ्री लस तयार केली आहे. सौदी अरेबिया आणि मलेशियातील एजे फार्मा कंपनी अशाच पोर्क फ्री लसीवर काम करत आहेत. 

    लसीकरणाची जागतिक तयारी 
            22 डिसेंबर 2020- विविध देशामधील संशोधन संस्था, शास्त्रज्ञ आणि लस उत्पादित करणार्‍या कंपन्या यांच्या सहकार्यानं एप्रिल 2020 महिन्याच्या सुरुवातीपासून जे काम सुरू झालं त्याचा परिणाम म्हणून 10 पेक्षा जास्त लसी विकसित झाल्या असून, फायझर कंपनीची लस ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि काही देशात मान्यता मिळवून त्याचे लसीकरण डिसेंबरमध्ये सुरू झाले. 
     
    ग्रेट ब्रिटन
    •• ब्रिटनमध्ये आरोग्य सेवा पूर्णतः सरकारी असून ती नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS) म्हणून ओळखली जाते. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असून  ही लस सर्वांना मोफत दिली जात आहे. 
     •• ब्रिटन सरकारने 250 मिलियन पाउंडाची गुंतवणूक करून5 कंपन्यांबरोबर करार करून लसीचे 35 कोटी डोस राखीव करून ठेवले. 
     •• ब्रिटनची लोकसंख्या 6.5 कोटी असून ब्रिटनला लसीचे 12 ते 13 कोटी डोस लागतील. ही लस ब्रिटिश सरकारच्या औषधे आणि हेल्थकेअर उत्पादने नियामक एजन्सी (एमएचआरए) ने ठरवलेल्या सुरक्षा, गुणवत्ता आणि प्रभावीपणाची कडक मानांकन नियमांना अनुसरून प्रमाणित केली आहे.
     
    • ब्रिटिश सरकार आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिस यांनी ठरवलेला लसीकरणाचा प्राधान्यक्रम-
    1) केअर होममध्ये राहणारे 80 वर्षावरील वयोवृद्ध लोक 
    2) 80 वर्षावरील वयोवृद्ध लोक आणि फ्रंटलाईन आरोग्य सेवा कर्मचारी आणि केअर होम कर्मचारी 
    3) 75 वर्षावरील वयोवृद्ध लोक 
    4) 75 वर्षावरील वयोवृद्ध लोक आणि वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत असुरक्षित व्यक्ती 
    5) 65 वर्षावरील वयोवृद्ध लोक आणि मूलभूत आरोग्याची परिस्थिती बिकट असणारे, कर्करोग, मधुमेह असणारे 65 वर्षावरील वयोवृद्ध लोक 
    6) 50 वर्षावरील वयोवृद्ध लोक
    7) 50 वर्षांखालील लोक, तरुण मुले आणि लहान मुले, गरोदर माता, किंवा स्तनपान करणार्‍या माता यांचा प्राधान्यक्रम ठरलेला नाही. 
    8) मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यासाठी ब्रिटन सरकारने विविध फुटबाँल स्टेडियम्स राखीव ठेवून, तिथे लसीकरण कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. 
    9) 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनमध्ये 1.50 लाख लोकांना फायझर कंपनीची लस दिली गेली.
    अमेरिका 
    1) ब्रिटननंतर अमेरिकेत सार्वजनिक लसीकरण मोहीम सुरू झाली. अमेरिकेतही फायझर कंपनीच्या लसीला सर्वांत प्रथम मान्यता मिळाली. कमीत कमी वेळेत सर्वांना लस उपलब्ध व्हावी यासाठी अमेरिकेने ‘ऑपरेशन वार्प स्पीड’ नावाचं मिशन सुरू केले असून यासाठी सरकारी निधीतून कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली.
    2) या मिशन अंतर्गत डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत 2 कोटी, तर जानेवारीमध्ये अजून 3  कोटी लोकांसाठी लसीकरण कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न.
    3) ब्रिटनसारखे अमेरिकेनेसुद्धा केअर होममध्ये राहणारे 70 वर्षावरील वयोवृद्ध लोक, आरोग्य सेवा कर्मचारी याना प्राधान्य दिले आहे. अमेरिकत जवळपास 2 कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आहेत. 
    4) लसीकरणासाठी अमेरिकेच्या लष्कराचीसुद्धा मदत घेतली गेली आहे. 
    5) अमेरिकेच्या संसर्गजन्य रोग नियंत्रण व प्रतिबंध संस्थेने, लस ठेवण्यासाठी तसेच त्याची वाहतूक करण्यासाठी, कोल्ड स्टोरेज, अल्ट्राकोल्ड रेफ्रिजरेटर अशा सुविधा तयार केल्या आहेत.
    6) अमेरिकन नागरिकांच्यात लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण व्हावी म्हणून, बराक ओबामा, बिल क्लिटंन, जॉर्ज बुश या अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष्यांसह अन्य नामवंत व्यक्तींना कॅमेराच्यासमोर लस दिली जाईल. 2021 च्या मध्यपर्यंत जेव्हा अनेक कंपनीच्या लसी उपलब्ध होतील तेव्हा नागरिकांना त्यांना कोणती लस पाहिजे याची निवड करण्याचे स्वातंत्र दिले जाईल, तोपर्यँत जी उपलब्ध असेल तीच लस दिली जाईल. 
    युरोपियन युनियन व इतर देश
    1) युरोपियन युनियन या 27 देशांच्या समुहाने एकत्रितपणे लसीकरण कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. सर्व नागरिकांना योग्य वेळेत लस मिळावी म्हणून इलेक्ट्रॉनिक लसीकरण नोंदणी कार्यक्रम तय्यार केला आहे. 
    2) जर्मनी, फ्रान्स आणि इटली मधील विमानतळ आणि रेल्वेस्टेशन्स वर लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली जाईल. 
    3) वृद्ध व्यक्ती, आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. युरोपमध्ये दरवर्षी वृद्ध लोकांना फ्लूची लस दिली जाते, त्याच यंत्रणेचा वापर करून हे लसीकरण केले जाईल. 
    4) यूरोपमधील 3 कोटीच्या आसपास असणार्‍या आरोग्य कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, सामान्य चिकित्सक याना लसीकरण कसे करायचे याबद्दलचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. 
    5) यूरोपमध्ये सर्वच देशातील नागरिकांना लस मोफत मिळेल. 
    6) सर्वच देशांमध्ये जी. पी. एस. आधारित लसीकरण देखरेख प्रणाली तय्यार करण्याचे काम चालू आहे. 
    •• कॅनडा,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, दक्षिण कोरिया आफ्रिकन देश यांनीसुद्धा युद्धपातळीवर लसीकरणासाठी यंत्रणा उभी करण्याचे काम सुरु केले आहे.
    •• 47 आफ्रिकन देशांनी  10 कोटी लसीचे डोस आरक्षित केले.

    भारतातील लसीकरण
     
     
            जानेवारी 2021 महिन्यात सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहीम नियोजित. भारताने लसीकरणासाठी नियमावली जाहीर केली. कोव्हिड व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क सिस्टीम (को-विन) प्रणालीद्वारे, लस घेणार्‍या लोकांना तसंच कोरोना व्हायरस लशीला ट्रॅक करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. लसीकरण केंद्रांमध्ये फक्त नोंदणीकृत लोकांनाच लस दिली जाईल. त्यासाठीची प्राथमिकता ठरवण्यात येईल.
    • भारतात 30 कोटीचे लक्ष्य  -
    1) भारतामध्ये 8 वेगवेगळ्या कंपनीच्या लसी ‘फेज 3’च्या टप्प्यातील चाचणी केली गेली.
    2) भारत सरकारने लसीकरणासाठी नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन COVID -19 (NEGV-C) ची स्थापना केली असून, सर्व लसीकरण मोहीम ही यंत्रणा राबवेल किंवा राज्य सरकारला मार्गदर्शन करेल. 
    3) भारत सरकारने पहिल्या टप्प्यामध्ये 30 कोटी नागरिकांना लस देण्याचे नियोजन युद्धपातळीवर केले आहे. 
    4) यामध्ये सर्वात प्रथम आरोग्यसेवक आणि डॉक्टर्स (जवळपास 3 कोटी ) आणि 50 वर्षावरील वयोवृद्ध लोक (जवळपास 26 कोटी ) यांचा समावेश आहे. 
    5) भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने EVIN (Electronic Vaccine Intelligence Network) ही ऑनलाईन देखरेख यंत्रणा तय्यार केली असून, लसीचा साठा, शेवटच्या मैलापर्यंत स्टोरेज तापमान याबद्दलचे वास्तविक वेळ देखरेख (real time monitoring) केली जाईल. 
    6) कोणत्या लोकांना लस दिली आहे याची सुद्धा नोंद असेल. 
    7) भारत सरकार लसीचे स्टोरेज आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी 28 हजार 500 कोल्ड चेन पॉईंट्स आणि 23 हजार तापमान लॉकर्स तयार करायचे काम करतेय. 
    8) लसीकरणासाठी आधार कार्ड आणि UHID (Unique Health Identification) या यंत्रणेचा वापर केला जाईल. 
     
    भारतातील लस उत्पादन 
     
     
    • डिसेंबर 2021 पर्यंत लस उत्पादित करणार्‍या कंपन्या त्यांच्या उप्तादन क्षमतेचा पुरेपूर वापर केल्यास पुढीलप्रमाणे डोस तय्यार करू शकतील -
     1) ऑक्सफर्ड/अ‍ॅस्ट्रा झेनेका/सिरम-300 कोटी
    2) फायझर (अमेरिकन/युरोपियन)-100 कोटी
    3) मॉडर्ना (अमेरिकन)-25 कोटी
    4) नोवावाक्स (अमेरिकन/युरोपियन)-100 कोटी
    5) गॅमेलिया (रशियन स्पुटनिक 5) -30 कोटी
    6) जॉन्सन अँड जॉन्सन (अमेरिकन)- 30 कोटी
    7) भारत बायोटेक (भारतीय कोवॅक्सिन) - 20 कोटी
    8) क्युरव्हॅक (जर्मन)-25 कोटी
    9) सॅनोफी /जीएसके (युरोपियन)-50 कोटी 
    10) सिनोव्हॅक (चायनीज)-12 कोटी
     
    भारतात 9 लसींची निर्मिती
    1) कोव्हिशील्ड लस - ही लस चिंपांझीच्या अ‍ॅडिनोव्हायरसवर आधारित आहे. ती पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने, अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या सहकार्याने विकसित केली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लशीचं जगभर अ‍ॅस्ट्राझेनेका मोठ्या प्रमाणावर उत्पादन करते.
    2) कोव्हॅक्सिन -  ही  लस कोरोना व्हायरसच्या इनएक्टिवेटेड व्हायरसवर आधारित आहे. हैदराबादमध्ये स्थित ‘भारत बायोटेक’ ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने तयार करत आहे. 
    3) जायकोव्ह-डी - ही लस डीएनए आधारित कोरोना व्हायरस लस आहे. ती लस अहमदाबादमधील कॅडिला हेल्थकेअर, बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटसोबत तयार करत आहे. 
    4) रशियाची स्पुटनिक-5 लस-  ही लस  ह्यूमन एडेनोव्हायरसवर आधारित  लस आहे. रशियाच्या गमालेया नॅशनल सेंटरच्या सहकार्याने हैदराबाद येथील रेड्डीज लॅब भारतात विकसित करत आहे. 
    5) एनव्हिइएक्स -कोव्हे 2373 लस -NVX-CoV2373  कोरोना व्हायरसच्या प्रोटीनपासून बनलेल्या भागातून ही लस विकसित करण्यात आली. ही लस प्रोटीन सब-युनिटवर आधारित आहे आणि नोव्हावॅक्सच्या संयुक्त विद्यमाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केली आहे. 
    6) प्रोटीन अँटीजेनवर आधारित (रिकॉबिनंट प्रोटिन) लस - अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने विकसित केलेली ही लस प्रोटीन अँटिजेनवर आधारित आहे. ही लस हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनीने एमआयटी यूएसएच्या सहकार्याने तयार केली जात आहे. प्राण्यांवरील या लसीची चाचणी पूर्ण झाली आहे. 
    7) एचजी को19बीजी एमआरएनए लस - अमेरिकेतील एचडीटी फार्मा कंपनीने एमआरएनए तंत्रज्ञानावर आधारित ही लस विकसित केली आहे. HGCO 19 bg mRNA.
    8) भारत बायोटेकची (इनअ‍ॅक्टिव्हेटेड रेबीज व्हेक्टर प्लॅटफोर्म) लस - अमेरिकेतील थॉमस जेफरसन विद्यापीठासोबतच्या भागीदारीत हैदराबादमधल्या भारत बायोटेक इंटरनेशनल कंपनीत या लशीची निर्मिती सुरू आहे. मृत रॅबिज व्हेक्टरवर आधारित ही लस आहे.
    9) ऑरोव्हॅक्सिन - भारतातील ऑरोबिन्दो फार्मा ही कंपनी अमेरिकेतील ऑरो व्हॅक्सिन्स या उपकंपनीद्वारे एक लस विकसित करते आहे. ही लस सध्या प्रीडेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे.
    • यूनिसेफसाठी लस - अरविंदो फार्मा आणि अमेरिकेतील कोव्हॅक्सने भारत व यूनाइटेड नेशंस चिल्ड्रंस फंड एजेंसीसाठी कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यासाठी करार केला. तत्पूर्वी अरविंदो फार्माने पहिले सिंथेटिक पेप्टाइड-बेस्ड व्हॅक्सीन विकसित करण्यात कोव्हॅक्ससोबत करार केला होता. अरविंदो फार्माकडे मल्टी-डोज प्रेजेंटेशनमध्ये 220 मिलियन डोज मॅन्युफेक्चर करण्याची क्षमता आहे. 
     
    लसीकरणाचे नियोजन
    • डिसेंबर 2020 मध्ये पंजाब, गुजरात, आसाम व आंध्र प्रदेशातील 2-2 जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाची ड्राय रन घेण्यात आली होती.
     1) एका दिवसात एका बूथवर 100 जणांना लस देण्याचे नियोजन.
    2) निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या पोलिंग बूथच्या माहितीच्या आधारे लसीकरण बूथ.
    3) व्हॅक्सीन बूथवरील हेल्थ स्टाफ - एक वैद्यकीय अधिकारी, व्हॅक्सिन हँडलर, व्हॅक्सिनेटर, पर्यायी व्हॅक्सिनेटर, पर्यवेक्षक, डेटा मॅनेजर, आशा कार्यकर्ती, एक को- ऑर्डिनेटर 
    4) लसीकरण बूथवर आवश्यक सुविधा - प्रतीक्षालय, व्हॅक्सिन रूम, निरीक्षण कक्ष
    5) लस कोल्ड चेन पॉइंटवरून लसीकरण बूथपर्यंत बूथपर्यंत रेफ्रिजरेटरयुक्त मोबाइल व्हॅनद्वारे पोहोचवली जाईल. 
    6) बूथवर गर्दी नियंत्रणासाठी व फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कर्मचारी 
    7) कोणत्या व्हॅक्सिनेटरने कुणाला लस दिली, ती कोणत्या बॅच आणि कंपनीची होती, याची सर्व माहिती नोंद होईल.
    8) केंद्रावर प्रवेश ते लसीकरणापर्यंत प्रक्रियेस 6 मिनिटे
    • स्टेप-1 : संदेश दाखवला, नाव पडताळणीने प्रवेश
      लाभार्थीने एसएमएस दाखवला, नावाच्या पडताळणीनंतर प्रवेश. वेळ-1 मिनिट. लाभार्थीला मिळालेला एसएमएस  प्रवेशद्वारावर दाखवला. गार्डने यादीत त्याची खात्री केली. तापमान बघितले आणि लाभार्थीला प्रतीक्षालयात बसण्याची सूचना केली.
    • स्टेप-2: नोंदणीवेळच्या ओळखपत्राची केली मागणी
      वेटिंग रूममधून आशा वर्करने लाभार्थीला नोंदणी कक्षात नेले. हातांचे सॅनिटायझेशन केले. नोंदणी कक्षातील आयटी इन्चार्जद्वारे कोविन पोर्टल सुरू करण्यात आले. नावाची विचारणा झाली. पोर्टलवर नाव टाइप केल्यानंतर सर्व माहिती पोर्टलवर दिसली. त्यानंतर ओळखपत्राची विचारणा झाली. नोंदणीवेळी दिलेले ओळखपत्रच तेथे दाखवावे लागेल. आयटी प्रमुखांनी त्याची माहिती पोर्टलवर नोंदवली.
    • स्टेप-3: व्हॅस्किनेटरने सांगितले लसीचे नाव
      आयडी कार्ड दाखवल्यानंतर इन्चार्जद्वारे लाभार्थीला लसीकरणाच्या ठिकाणी पाठवले. येथे व्हॅक्सिनेटरने कोविड-19 ची कोणती लस देण्यात येत आहे, याची माहिती दिली. ही लस उजव्या हाताला दिली. त्यानंतर रुग्णाला डोकेदुखी, ताप, चक्कर जाणवल्यास अधिकारी किंवा व्हॅक्सिनेटरशी किंवा मोबाइलवर संपर्क साधता येईल. तरीही समस्या राहिल्यास 104 किंवा 1075 वर संपर्क साधून रुग्णालयात दाखल होता येेते.
    • स्टेप-4: देखरेखीखाली 30 मिनिटे बसणे गरजेचे
      लसीकरण केल्यानंतर रुग्णाला देखरेख कक्षात आशा वर्करने नेले. तेथे लाभार्थीच्या हातांना सॅनिटाइझ करण्यात आले. त्याशिवाय लाभार्थीच्या नावासमोर नोंद करण्यात आली. कक्षात आल्याची वेळही नोंदवण्यात आली. त्यानंतर पल्स, हार्ट रेट, ऑक्सिजनची पातळीही मोजण्यात आली. प्रत्येक आसनावर वृत्तपत्र होते. अर्ध्या तासानंतर कर्मचार्‍यांनी लाभार्थीस बाहेर जाऊ दिले.

    देशात लसीकरणासाठी उपलब्ध यंत्रणा -
    1) देशात 2.23 लाख परिचारिका व दाई आहेत. 1.54 लाख जणांना लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी केले जाईल. त्यात नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थीही असतील. 
    2) लसीच्या साठवणुकीसाठी 29 हजार कोल्ड स्टोअरेज फॅसिलिटी आहेत. हरियाणा, कर्नाटक, पश्रि्चम बंगालच्या कृषी संशोधन केंद्राकडे सुविधा आहे.
    3) पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी भारताला 60 कोटी डोस हवे आहेत. 
    4) लसीवर राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समूहाच्या (एनईजीव्हीएसी) सल्ल्यानुसार पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांचे लसीकरण केले जाईल. त्यापैकी 1 कोटी आरोग्य कर्मचारी असतील. सोबत 2 कोटी फ्रंटलाइन व इतर कामगारांना लस दिली जाईल. त्याव्यतिरिक्त 50 वर्षांहून जास्त वयाचे 27 कोटी लोक असतील.

    लस वाहतूक यंत्रणा -
    • स्पाइसजेटने जीएमआर हैदराबाद एअर कार्गोसोबत करार केला आहे. सर्व व्हॅक्सीन मॅन्युफैक्चरर्सला कार्गो सर्विस देईल. या पार्टनरशिपमध्ये स्पाइसजेटची कार्गो शाखा स्पाइस एक्सप्रेस व्हॅक्सीन डिलीव्हरीमध्ये गती आणण्यासोबतच मजबुत कोल्ड चेन नेटवर्कदेखील तयार करेल.
    • स्पाइस एक्सप्रेसचे लक्ष्य व्हॅक्सीन पिक-अपसह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये टेम्परेचर कंट्रोल्ड एनवायर्नमेंटमध्ये डिलीव्हर करण्याचे आहे. 54 डोमेस्टिक आणि 45 इंटरनॅशनल डेस्टिनेशंस आणि 17 कार्गो प्लेनसोबत स्पाइस एक्सप्रेस 500 टन कार्गो दररोज डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल डेस्टिनेशंसवर डिलीव्हर करण्यास सक्षम आहे. एअरलाइनने कोल्ड चेन सॉल्यूशंसमध्येही ग्लोबल लीडर्ससोबत टायअप केला आहे.
    • मुदिता एक्सप्रेस कार्गोने  बजट कॅरियर स्पाइसजेटसोबत देशभरात कोरोना व्हॅक्सीन डिलीव्हर करण्यासाठी करार केला. मुदिता एक्सप्रेस  सीरम इंस्टिट्यूट, सनोफी इंडिया, सन फार्मा, वोकडार्ट, ग्लेनमार्कसह इतर कंपन्यांचे व्हॅक्सीन डिलीव्ह करणार आहे.
     
    लसनिर्मिती
     
     
            ‘कोरोना’ची साथ आटोक्यात यावी म्हणून अनेक देशांमधील संशोधक लस तयार करत आहेत. लशीमार्फत आपल्या प्रतिकारशक्तीला कोविड-19 विषाणूचा ‘परिचय’ करून दिला जातो. यामुळे त्या विषाणूचा संसर्ग एखाद्याला झाला तर त्याला जखडून टाकणारी यंत्रणा सज्ज असेल. लशीमुळे सक्षम प्रतिप्रथिने (अँटिबॉडीज्) आपल्या शरीरात तयार असतील. परिणामी, साथ शरीरात किंवा अन्यत्रही पसरणार नाही.
    ‘एम-आरएनए’ (मेसेंजर आरएनए) लस -
    • परदेशी कंपन्यांनी कोविड-19 विषाणूपासून 90 ते 94.5 टक्के बचाव होईल अशा लशी तयार केल्या आहेत. त्यासाठी 21 दिवसांच्या अंतराने दोन वेळा लस टोचून घ्यावी लागेल. लस तयार होऊन एखाद्या व्यक्तीला टोचून घेईपर्यंत ती उणे 68 ते उणे 70 अंश सेल्सिअस इतक्या अतिशीत तापमानात सुरक्षित ठेवावी लागेल. कारण, ही लस ‘एम-आरएनए’ (मेसेंजर आरएनए)वर आधारलेली आहे. 
    • कोविड-19 विषाणूवरील बोथट काटेरी आवरण ज्या प्रथिनाचे बनलेले असते, ते एकमेकांशी जोडलेल्या 1300 अमिनो आम्लांच्या ‘माळे’ने तयार झालेले असते. त्या प्रथिनाच्या 250 अमिनो आम्लांची छोटीशी त्रिमितीयुक्त माळ घडविण्याची माहिती ‘एम-आरएनए’कडे असते. हा भाग शरीरातील विशिष्ट पेशींना विशिष्ट जागीच तंतोतंत संलग्न होतो. याला ‘रिसिप्टर बायडिंग डोमेन’ म्हणतात. संशोधकांनी पेशींवरील ही जागा शोधलेली आहे. त्याला ‘रिसिप्टर साइट’ म्हणतात. (ही रिसिप्टर साइट म्हणजे ‘अँजिओटेन्सिन कन्व्हर्टिंग एन्झाइम’; एक महत्त्वाचे प्रथिन). कोविड-19चा विषाणू पेशीवरील ‘रिसिप्टर साइट’लाच संलग्न होऊन झपाट्याने वाढतो आणि त्यांची संख्या बेसुमार वाढते.
    • लशीमधील मुख्य घटक म्हणजे विषाणूचा वैशिष्ट्यपूर्ण (बोथट) काटे बनवणारा ‘एम-आरएनए’. त्याने घडवलेल्या प्रथिनांच्या विरुद्ध आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती जोरदार लढा देणार असते. त्यामुळे विषाणूंचा शरीरभर होणारा संभाव्य फैलाव रोखला जातो. या ‘एमआरएनए’ची रासायनिक जडणघडण (त्रिमितीयुक्त संरचना, आकृतिबंध) आजूबाजूच्या तापमानाला अत्यंत संवेदनक्षम असते. ती रचना बिघडू नये म्हणून उणे 70 अंश तापमानाला लशींचा साठा राखून ठेवावा लागतो. लस तयार झाल्यावर एखाद्या व्यक्तीला टोचेपर्यंत तिचा प्रवास आणि हाताळणी अतिशीत अवस्थेत होते. याला शीत साखळी म्हणतात. काही कारणांमुळे लशीचे तापमान पुरेसे थंड राहिले नाही, तर ‘एम-आरएनए’ची रचना बिघडून लशीची परिणामकारकता कमी होते. 
     
    भारतीय लसी -
    • ‘कोविड-19’साठीच्या काही भारतीय लशींना अतिशीत तापमानाची गरज नसते. त्यांची कार्यक्षमता 2 ते 8 अंश तापमानाला पुरेशी राहते. 
    • उबदार हवेतही लस टिकण्यासाठी ‘एम-आरएनए’ऐवजी त्याच्या योगे बनणार्‍या 200 अमिनो आम्लांची साखळी तयार करण्याची योजना संशोधकांनी आखली. ही साखळी अतिशीत स्थितीत हवा काढून टाकलेल्या पेटीत ठेवली, तर ती कोरडी होऊन तिचा त्रिमितीयुक्त आकार उबदार हवेतही दीर्घकाळ जसाच्या तसा राहतो. याला ‘फ्रीझ-ड्राइंग’ म्हणतात. संशोधकांनी ही लस 100 अंश सेल्सिअस तापमानातही 1 सेकंद स्थिर राहते, असे निरीक्षण केले. 
     
    • देशातील पुढील संस्थांतील संशोधकांनी ‘उबदार लस’ हा प्रकल्प सुरू केला आहे -
    1) आयआयएस (बंगळूर)
    2) आयसर (तिरुअनंतपूरम)
    3) टीएचएसटी (ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, फरिदाबाद) 
    4) आयआयएससी इन्क्युबेटेड स्टार्ट-अप मायनव्हॅक्स

    लस निर्मिती व भारतीय कंपन्या
            28 नोव्हेंबर 2020 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील 3 लस निर्मिती संस्थांना भेट दिली. अहमदाबादमधली झायडस कॅडिला हेल्थकेअर, हैदराबादमधली भारत बायोटेक पार्क आणि आपल्या पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट या तीनही संस्थांमध्ये पंतप्रधान मोदी एकाच दिवसात जाऊन आले.
     
    सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 
     
     
    1) 1966 मध्ये  ‘व्हॅक्सिन किंग ऑफ इंडिया’ अशी ओळख असणार्‍या सायरस पूनावाला यांनी या कंपनीची स्थापना केली. ते भारतातले चौथ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पुण्यातल्या बिशप्स स्कूल आणि बीएमसीसी कॉलेजमधून शिक्षण घेतलेले पूनावाला घोड्यांचा व्यापार करत होते. हडपसरमध्ये त्यांचं स्टड फार्म आहे. स्टड फार्म म्हणजे म्हणजे घोडे पाळण्यासाठी, त्यांचं प्रजनन करण्यासाठीचा आलिशान तबेला. 1960 मध्ये फार्ममधले थकलेले घोडे सरकारच्या हाफकिन इन्स्टिट्यूटला दान केले जात होते. मुंबईतल्या या संस्थेकडून घोड्यांच्या रक्तापासून सिरम बनवलं जायचं. घोड्याचं सिरम हे अत्यंत पोषक द्रव्य असतं. या सिरममुळे आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात आणि धनुर्वातासारख्या रोगांपासून लढण्याची ताकद मिळते. याविषयी एका प्राण्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करताना हे असं सिरम आपण आपल्याच स्टड फार्ममध्ये मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो, हे पूनावाला यांच्या लक्षात आलं. त्यातून 1966 मध्ये सिरम इन्स्टिट्यूटचा जन्म झाला.
    2) सध्या सिरम इन्स्टिट्यूट ही लसीचं उत्पादन करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. 
    3) दरवर्षी साधारण वेगवेगळ्या लसीचे 150 कोटी डोस बनवले जातात. यात पोलिओ, धनुर्वात, देवी, रुबेला, गोवर, बीसीजी अशा अनेक लसींचा समावेश होतो. 
    4) जगातल्या 65 टक्के मुलांना निदान एकदा तरी सिरमने बनवलेली लस टोचली जाते.
    5) कोरोना व्हायरसविरोधातली लस शोधण्यासाठी कंपनीने मोठी आर्थिक जोखीम उचललीय. लसीच्या संशोधन आणि उत्पादनासाठी सिरम 80 कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याआधी त्यांनी 30 कोटी डॉलरचा खर्च केलाय. 
    6) कोविशिल्ड लस फक्त भारतच नाही तर इतर अविकसित आणि विकसनशील देशांना पुरवली जाईल. 10 कोटींमधले निम्मे डोस भारतासाठी राखीव आहेत. तर उरलेले इतर देशांना पुरवले जातील. 
    8) पुण्याच्या हडपसरमधल्या मांजरी गावात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्यालय आहे.
    9) सिरम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत कोविशिल्ड ही कोरोनाची लस बनवतंय. याशिवाय नोवावॅक्स आणि कोडाजेनिक्स या दोन कंपन्यांच्या लसीच्या संशोधनात सिरमचा सहभाग आहे.
     
    झायडस कॅडिला 
     
     
    1) गुजरातमधल्या अहमदाबादजवळ चांगोदर औद्योगिक क्षेत्रात झायडस कॅडिला म्हणजेच कॅडिला हेल्थकेअर ही कंपनी आहे. भारतातली चौथ्या क्रमांकावरची फार्मास्युटिकल कंपनी आहे. झायकोव-डी या कोरोनाच्या लसीचं संशोधन आणि उत्पादन.  मार्च 2021 पर्यंत कोरोना लसीचे 10 कोटी डोसचे उत्पादन.
    2) 1952 मध्ये या फार्मास्युटिकल कंपनीची स्थापना रमणभाई पटेल आणि इंद्रवदन मोदी या दोन बिझनेस पार्टनरनी  केली. नंतर दोघांत वाद झाला. 
    3) 1995 मध्ये मोदी यांनी कॅडिला फार्मास्युटिकल प्रायव्हेट लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी काढली. तर झायडस ग्रुपच्या अंतर्गत पटेल यांची कंपनी कॅडिला हेल्थकेअर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांचा मुलगा पंकज पटेल ही कंपनी सांभाळतात. फोर्ब्स मासिकाच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचं नाव झळकलंय.
    4) 1995 मध्ये कंपनीचा टर्नओव्हर 250 कोटींचा होता,  2020-21 च्या आर्थिक तो 14,253 कोटींचा होता.
    5) 2015 पासून कंपनीने दरवर्षी वेगवेगळ्या औषधांची पेटंट आपल्या नावे करून घेतली. त्यांनी अमेरिकेच्या सरकारकडून कॅन्सरवरच्या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मिळवली.
    6) गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश या पाच राज्यांत आणि अमेरिका आणि ब्राझीलमध्येही कंपनीचे प्लांट आहेत. अहमदाबाद प्लांटमधून फक्त आशियाबरोबरच नाही तर अमेरिकेबरोबर युरोप, आफ्रिका या खंडामध्येही ते औषधं पोचवतात.
     
    भारत बायोटेक पार्क 
     
     
    1) हैदराबादमधल्या जिनोम व्हॅलीमध्ये भारत बायोटेक पार्क कंपनी आहे. 
    2) 1996 ला  डॉ. कृष्णा ईला आणि सुचित्रा ईला यांनी भारत बायोटेकची स्थापना केली.  डॉ. कृष्णा ईला हे तामिळनाडूमधल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मले. शेतीवर अपार प्रेम असणारा हा माणूस शिष्यवृत्तीवर अमेरिकेत गेला. तिथं पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली. जगाला स्वस्तात दर्जेदार लसी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी भारत बायोटेक या कंपनीची स्थापना केली.
    3) 2020 च्या आकडेवारीनुसार या कंपनीत जवळपास 700 कर्मचारी काम करतात. 
    4) जगभरात या कंपनीचे प्लांट आणि शाखा आहेत. 
    5) कंपनीचा टर्नओव्हर 500 कोटींपेक्षा जास्त आहे. 
    6) भारत बायोटेककडे 160 पेटंट आहेत.
    7) भारत बायोटेकने रोटावॅक ही रोटा व्हायरसविरोधातली पहिली लस शोधून काढली. त्यासाठी त्यांना बिल आणि मिलेंडा गेट्स फाऊंडेशनकडून ग्रँट मिळाली होती. या लसीचं काम पूर्ण झाल्यावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या कंपनीला भेट देऊन गेले होते. 
    8) चिकुनगुनिया, टायफॉईड, झिका आणि स्वाईन फ्लू व्हायरसच्या स्वस्तातल्या लसी कंपनीनं जगाला उपलब्ध करून दिल्या. 
    9) रेबिज या रोगाविरोधात लसीचं उत्पादन करणारी जगातली पहिल्या क्रमांकाची कंपनी म्हणून भारत बायोटेकला मान्यता. 
    10) जॅपनिज इन्सेफॅलिटिस या आजारावरच्या लसीचं उत्पादन भारत बायोटेकमध्ये केलं जातं.
    11) कोरोनाची लस काढण्यासाठी भारत बायोटेक कंपनीने अमेरिकेतल्या फ्लूजेन आणि युनिव्हर्सिटी ऑफ विस्कोन्सिन-मॅडिसोनशी करार केला. कृष्णा ईला यांचं शिक्षण याच युनिव्हर्सिटीतून झालं होतं. कोव्हॅक्सिन असं या लसीचं नाव आहे. या लसीचे 2 थेंब नाकातून दिले जातात.

     कोरोनाने दिलेली शिकवण 
    1) पहिले सुख-निरोगी शरीर : आर्थिक संकटामुळे लोकांना पुन्हा एकदा बचतीचे महत्त्व कळाले आहे. बचतीची सवय असलेल्यांना फारशी अडचण आली नाही. मात्र इतरांना यातून बचतीचा धडा मिळाला.
    2) जसा आहार तसे तन-मन : कोरोनाकाळात लोकांनी आहाराला कदाचित पहिल्यांदाच एवढे महत्त्व दिले. चवीऐवजी प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या पदार्थांना प्राधान्य दिले.
    3) एकजुटीने अडचणीवर मात शक्य : यापूर्वी कुठल्याही आजारावर एवढ्या लवकर लस तयार झाली नव्हती. मात्र यंदा संशोधनकार्यातील देशांनी-संस्थांनी वेळोवेळी जगासमोर माहिती ठेवली. संकटावर एकजुटीने मात करणे शक्य आहे.
    4) स्वच्छतेत ईश्‍वराचा वास आहे : स्वच्छतेत ईश्‍वराचा वास आहे हे कोरोनामुळेच कळाले. स्वच्छता आता सवयीचा भाग झाली आहे.
    5) मन भक्कम तर संकटावर मात शक्य : कुठलाही आजार शरीराच्या आधी मनाला पराभूत करतो. मात्र कोरोनाला पराभूत करणार्‍या वृद्धांमध्ये अनेकांना आधीपासूनच गंभीर आजार होते. मात्र आपल्या साहसाने त्यांनी कोरोनावर मात केली.

    करोना विषाणू व  म्युटेशन 
    • 2020 हे वर्ष संपता संपता कोरोना या संक्रमणावर बर्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात यश मिळालेले असताना ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन समोर आला. या विषाणूला व्हीयूआय 202012/01 असे नाव देण्यात आले. विषाणूचा नवीन स्ट्रेन येणे किंवा जनुकीय बदल होणे ही बाब आश्चर्यकारक नाही. इन्फ्ल्युएंजाची लस दरवर्षी बदलावी लागते. कारण, हा विषाणू सातत्याने स्वरुप बदलत असतो. ब्रिटनमधीलच काही संशोधकांच्या अभ्यासातून कोरोना विषाणूमध्ये 2020 मध्ये 12 हजारांहून अधिक वेळा बदल झाले आहेत.  या स्ट्रेनचा प्रसार वेगाने होतो आहे; पण तो पूर्वीच्या विषाणूपेक्षा अधिक घातक नाही.  त्याचा प्रसार 70 टक्के अधिक होतो.
    • दक्षिण आफ्रिकेतील कोव्हिड 19 च्या बाह्य आवरणातील बायडिंग साईटसची संख्या वाढल्याने  त्याला ’एन 501 वाय’ हे नाव देण्यात आले. या नव्या विसाणूची शरीराला चिकटण्याची क्षमता जास्त असल्यामुळेच त्याचा प्रसार झपाट्याने होतो. तसेच, तो काही काही चाचण्यांमध्ये सापडत नाही. मात्र हा विषाणू पूर्वीपेक्षा घातक बनलेला नसल्यामुळे या नव्या विषाणूला लशी थोपवू शकतात. 
    • कोरोनाचा नवा अवतार झाला असताना जागतिक आरोग्य संस्थेला समजावत बसण्यापेक्षा इंग्लंडने तत्काळ आपल्या देशात उपाययोजना सुरू केली आणि जगालाही सावध केले. संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसह अनेक ठिकाणी चौथा लॉकडाऊन लागू केला. 
    • ब्रिटनमधील या कोरोनाच्या केसेसचा संबंध दक्षिण आफ्रिकेशी असल्याने जगभरातील अनेक देशांनी ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेवरुन येणार्‍यांवर बंदी घातली, युरोप व इंग्लंडमधून येणारी वा त्या देशात जाणारी विमान वाहतूक थांबवली, विमानमार्गे येणारे संकट यावेळी टाळले गेले. 
    • वर्षभरापूर्वी चीनमध्ये कोरोनाचा उद्भव झाला होता आणि त्या देशाने ते सत्य जगाला सांगून सावधान करण्यापेक्षा लपवाछपवी केलेली होती. जागतिक आरोग्य संघटनेनेही चीनशी संगनमत करून सगळ्या देशांना अंधारात ठेवलेले होते. म्हणून अतिशय वेगाने व अनवधानाने हजारो विमान प्रवाशांमार्फत हा विषाणू अनेक देशांत जाऊन पोहोचला होता. त्यामुळे चीनने त्याची जाहीर कबुली देण्यापूर्वीच अवघे जग कोरोनाच्या जाळ्यात फसलेले होते. चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्यातले गांभीर्य वेळीच ओळखून सर्व देशांना सावध केले असते तर 2020 हे वर्ष मानवजातीला सुखाने जगता आले असते.
    • करोनाची साथ सुरू झाल्यापासून डिसेंबरपर्यंत जगभरात 12 हजारपेक्षा जास्त म्युटेशन आढळून आले.  म्युटेशन किंवा जनुकीय बदल हा सर्व सजीवांचा स्थायी भाव आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीही मूळात एकपेशीय जीवांपासून, म्युटेशनमुळेच तयार झाली आहे. 
    • 20 सप्टेंबर रोजी ब्रिटनमधील केंट येथे, करोना विषाणूच्या यूव्हीआय 202012/01 या नव्या स्ट्रेनचा सर्वात पहिला रुग्ण आढळून आला होता. 
    • 9 डिसेंबर 2020 ला ब्रिटनमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. 
     
    असे होण्यामागचे कारण  -
    • विषाणूच्या बाह्य आवरणामध्ये काही प्रथिने असतात. यातील अ‍ॅटॅचमेंट साईटस् किंवा बायडिंग साईटस मानवी शरीराला चिकटत असतात. नव्या कोव्हिडच्या बाह्य आवरणातील बायडिंग साईटस्ची संख्या वाढल्याने शरीराला चिकटण्याची क्षमता वाढली. विषाणूमध्ये बाहेरून जरी थोडे फार बदल झालेले असून तो पूर्णतः बदललेला नाही. त्यामुळे या विषाणूवर लस तितकीच प्रभावी असणार आहे. 
    • त्याच्यात झालेल्या जनुकीय बदलांमुळे काही चाचण्यांमध्ये तो सापडत नाही. या जनुकीय बदलांमुळेच बाहेरच्या प्रथिनांमध्ये बदल झाले असून, त्याचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रसार वाढल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू शकते. कारण, या विषाणूशी सामना करणारी प्रतिकारकशक्ती ज्यांच्या शरीरात कमकुवत असेल त्यांच्यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर मृत्यू ओढावण्याची भीती असते. 
    • भारत, श्रीलंका, बांगला देश, मालदीव, नेपाळ, भूतान या देशांनी कोरोना विषाणूबाबत भयभीत होण्याची गरज नाही. येथे पाश्रि्चमात्य राष्ट्रांसारखी अतिस्वच्छता आणि ऐशोआरामाची जीवनशैली नाही. उन्हातून व्हिटॅमिन डी मिळत असते. जीवाणू-विषाणूंशी लढण्यासाठीची रोगप्रतिकारक शक्ती येथील लोकांच्या शरीरामध्ये तुलनेने अधिक आहे. म्हणूनच भारतात किंबहुना आशिया खंडात कोरोनाने मरण पावणार्यांची  संख्या कमी दिसून येते.  
    • कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन लक्षात घेता लसीकरणाच्या दिशेने अधिक गतिमानतेने पावले टाकण्याची गरज आहे.  60 ते 70 टक्के लोकांना लसीकरण झाल्यास या विषाणूचे संक्रमण जवळपास थांबते. कारण, उर्वरितांपैकी एखाद्याला कोरोनाची लागण झाली आणि त्याच्या शरीरातून विषाणू बाहेर पडला तरी सभोवताली लसीकरण झालेल्या, इम्युन व्यक्ती असल्याने तो विषाणू नष्ट होतो. त्यामुळे केवळ वयोवृद्ध लोक आणि कोमॉर्बिडीटी असणारे (हृदयविकार, किडनीविकार, मधुमेह, रक्तदाब, हायपरटेन्शन यांसारखे आजार असणारे) लोक यांना जरी लसीकरण केले तरी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल. तरुणांना लस देण्याची गरज नाही, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कणखर असते. तसेच, एकदा कोरोना होऊन गेलेल्यांना लसीची गरज नाही. त्यांचे एक प्रकारे लसीकरण झालेलेच आहे.
     

    म्युटेशन म्हणजे काय ?
            विषाणू म्हणजे अत्यंत सूक्ष्म असा निर्जीव घटक असतो; पण इतर सजीव पेशींना तो संसर्ग करतो. माणसाच्या पेशीत करोनाचा विषाणू शिरल्यानंतर जेव्हा वाढतो, तेव्हा एका पेशीत असंख्य विषाणू तयार होतात, नंतर पेशी फोडून बाहेर पडतात आणि पुन्हा नव्या पेशीवर हल्ला करतात. बाधित व्यक्तीच्या शरीरात अशा तर्‍हेने लक्षावधी विषाणू तयार होतात. हे होताना विषाणूच्या ’जीनोम’च्याही तितक्याच प्रतिकृती तयार होतात. पण, करोना विषाणूतील यंत्रणा चुका करीत असल्याने त्याच्या ’जीनोम’मध्ये खूप जास्त म्युटेशन दिसून येतात.  तुलनेने मानवी शरीरात पेशीतील ’डीएनए’च्या प्रतिकृती तयार करणारी यंत्रणा चुका कमी करते आणि त्या झाल्याच, तर लगेच त्या दुरुस्त करणारी यंत्रणाही असते. 
    • बाहेरून संरक्षक असं प्रथिनांचं कवच (कॅप्सिड) आणि आतमध्ये आरएनए आणि डीएनए हे जनुकीय घटक अशी सर्वसाधारण विषाणूची मूलभूत रचना असते. कॅप्सिडच्या आधारावर विषाणूंसारख्या कणांचे प्रायॉन्स आणि व्हायरॉइड्स असे प्रकार पडतात. विषाणूंची पुनरुत्पत्ती विभाजनानं होते. यामध्ये गुणांचं संक्रमण एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे करण्यासाठी आरएनएच्या एका प्रतीच्या दोन प्रती केल्या जातात. विषाणूचं विभाजन होऊन जे नवीन दोन विषाणू तयार होतात, त्या प्रत्येकामध्ये आरएनएची एक-एक प्रत निर्माण होते. सर्व सजीव आणि मानवाच्याही पुनरुत्पादनात याच पद्धतीचं पालन होतं. आरएनए आणि डीएनए या जनुकीय घटकांच्या प्रती पुढच्या पिढीमध्ये वर्गीकृत होतात; परंतु डीएनए आणि आरएनएच्या प्रती करण्याच्या यंत्रणा वेगळ्या असतात. माणसासारख्या उत्क्रांत झालेल्या सजीवांमध्ये किंवा अनेक जीवाणूंमध्येही एका डीएनएच्या दोन प्रती तयार करण्याची यंत्रणा खूप विकसित झालेली असते. या दोन प्रती तयार होताना कमीत कमी चुका होतील, अशी व्यवस्था उत्क्रांत सजीवांमध्ये असते. एवढेच नव्हे, तर त्यातून चूक झालीच, तर ती दुरुस्त करण्याची यंत्रणाही यांच्यामध्ये अस्तित्त्वात असते, त्याला ’डीएनए रिपेअर’ म्हणतात.
    • कुठल्याही सजीवांमध्ये डीएनए किंवा आरएनए यात बदल घडणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि निसर्गामध्ये ही कायम होतच असते. हे बदल सजीवाच्या वाढीला मारक नसतील, तर ते बदल पुढं संक्रमित होत राहतात. यातले काही बदल संक्रमित होतात, काही होत नाहीत. ते त्या विषाणूला फायदेकारक असतील, तर झपाट्यानं त्याचा प्रसार होतो. यामध्ये काही बदल असे असतात, की ज्यामुळे त्या विषाणूची आक्रमकता कमी होते. असे बदल कदाचित जास्त वेगाने प्रसार पावतात, कारण तो विषाणू जास्त वेगानं पसरतो. काही महत्त्वाचे मुद्दे इंग्लंडमध्ये जो विषाणू सर्वत्र वेगानं पसरत आहे, तो ’म्युटेशन’ झालेला घातक विषाणू आहे का त्याची प्रसारशक्ती जास्त असली, तरी मारकशक्ती कमी आहे याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
    • म्युटेशन होताना ’जीनोम’मधील न्यूक्लिक अ‍ॅसिडच्या क्रमात बदल होतो. हा बदल त्यामधील बेसेसच्या क्रमाच्या बदलाच्या स्वरूपात असतो. बदल म्हणजे मूळ ’बेस’च्या जागी दुसरा येणे किंवा एक व अधिक बेस गाळले जाणे. जीनोममधील माहीती प्रथिनात रुपांतरित होत असल्याने ’जीनोम’ऐवजी प्रथिनातील अ‍ॅमिनो आम्लांच्या क्रमांकावरून म्युटेशन ओळखली जातात. उदा. ’डी-614 जी’ म्हणजे 614 व्या जागीचे अस्पार्टिक अ‍ॅमिनो आम्ल बदलून त्या जागी ग्लायसिन झाले.
    • सगळ्यात पहिला डी-614 जी हा बदल सर्वप्रथम युरोपमध्ये फेब्रुवारी महिन्यात दिसला आणि नंतर जगभर पसरला. सध्या जगातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांमध्ये तो दिसतो. भारतातही हा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो. 
    • त्यानंतरचा बहुचर्चित प्रकार डेन्मार्कमध्ये ’मिंक’ या प्राण्यातून आला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात याचे रुग्ण सापडले. त्यामधील काही विशिष्ट बदलांमुळे लशीची परिणामकारकता कमी होईल, अशी भीती व्यक्त केली गेली. डेन्मार्कने ताबडतोब हालचाल करून सुमारे 1.7 कोटी मिंकची कत्तल केली आणि ते जाळुन टाकले.
    • त्यानंतर डिसेंबरमध्ये ब्रिटनपाठोपाठ दक्षिण आफ्रिकेत '501.V2'  हा प्रकार सापडला. 
    • ब्रिटनमध्ये करोनाच्या निदानासाठी वापरलेल्या नमुन्यांपैकी पाच ते दहा टक्के नमुन्यांमधून विषाणूच्या ’जीनोम’चा क्रम नियमितपणे तपासला जातो. त्यातून त्यांना यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त नमुन्यांत विषाणूचा एक नवा प्रकार असल्याचे आढळले. त्याला 'VUI 202012/01' असे नाव दिले गेले. मग त्यांनी आधीचेही सर्व ’जीनोम’चे क्रम तपासले तेव्हा त्यांना हा प्रकार 20 सप्टेंबर 2020 रोजी प्रथम दिसला आणि त्यानंतर त्याची झपाट्याने वाढ झाली. सध्या तो 60 टक्क्यांहून जास्त रुग्णांमध्ये सापडतो. त्यापाठोपाठ डेन्मार्क, नेदरलँड व ऑस्ट्रेलियामध्येदेखील या प्रकाराची नोंद झाली. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे या प्रकारात विषाणूच्या स्पाइक प्रथिनात अनेक बदल झालेले आहेत. विषाणू संसर्ग झाल्यानंतर विषाणूचा मानवी पेशीमध्ये शिरकाव करण्यात या प्रथिनाची महत्त्वाची भूमिका असते आणि म्हणूनच बहुसंख्य लशींमध्ये या प्रथिनाला लक्ष्य करण्यात आले आहे. 
    कोरोनाच्या स्पाइक प्रथिनामध्ये आढळलेले बदल -
    1) 417 व्या जागी ’लायसिन’ऐवजी ’अ‍ॅलानिन’
    2) 484 व्या जागी ’ग्लुटामिक अ‍ॅसिड’ऐवजी ’लायसिन’ 
    3) 501 व्या जागी ’अ‍ॅस्पारजिन’ऐवजी ’टायरोसिन’,
    4) 570 व्या जागी ’अ‍ॅलानिन’ऐवजी ’अ‍ॅस्पार्टिक अ‍ॅसिड, 
    5) 614 व्या जागी ’अस्पार्टिक’ऐवजी ’ग्लायसिन’
    6) 681 व्या जागी ’प्रोलिन’ऐवजी ’हिस्टिडीन’, 
    7) 716 व्या जागी ’थ्रिओनिन ऐवजी ’आयसो लुसिन’, 
    8) 982 व्या जागी ’सीरीन’ऐवजी ’अ‍ॅलानिन’, 
    9) 1118 व्या जागी ’अस्पार्टिक अ‍ॅसिड’ऐवजी हिस्टिडीन; 
    10) 144 आणि 69-70 या ठिकाणी असलेली अमिनो आम्ले नाहीशी झाली 

    कोरोना  एन 501 वाय 
    1) कोरोनाचे बदललेले स्वरूप ’एन501व्हाय’ तुलनात्मत रूपात वेगाने पसरतो. 
    2) भारतात कोरोना संसर्गाचे 4 हजारांहून अधिक जीनोमचा अनुक्रमण तयार केले आहे. 
    3) ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग आफ इनफ्लुएझा डेटा ला (जीआयएसएडी) ते उपलब्ध आहे. 
    4) सीएसआयआरचे जिनोमिकी तसेच  जीव विज्ञान संस्था (आयजीआयबी), सेंटर फॉर सेल्युलर अँड मोलेक्युलर बायोलॉजी (सीसीएमबी), हैद्राबादने भारतात कोरोना संसर्गाचे 2200 हून जास्त जीनोमचे अनुक्रमण केले आहे. 
    5) आरटी-पीसीआर तपासणीत नवीन स्वरूपाचा शोध लागू शकतो. पंरतु रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये याचे निदान होत नाही.
     
    बी 117
    • सप्टेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान येथून एक अदृश्य विषाणू जन्माला आला आणि त्याने सर्व जगाला आपल्या कवेत घेतले. कोविड-19 या विषाणूने 12 हजार वेळा स्वतःमध्ये जनुकीय बदल केले आहेत. तज्ज्ञांकडून केवळ 185 पर्यंत जनुकीय बदल झालेल्या विषाणूवर अभ्यास केला गेला आहे.
    • सप्टेंबर 2020 मध्ये कोरोना विषाणूचा  बी 117 हा नवा स्ट्रेन ग्रेट ब्रिटनच्या लंडन या शहरात सापडला. 70 टक्के वेगाने संक्रमित होणार्या या ब्रिटिश कोरोनाने सर्वत्र दहशत माजवली. जनुकीय बदलाद्वारे स्पाईक प्रोटीनमध्ये बदल होऊन नव्याने अवतार घेतलेल्या या ब्रिटिश कोरोनाला  बी 117 असे नाव देण्यात आलेे. 
    • भारतासह जगभरात अनेक देशात मोठा गाजावाजा करत लस आणण्यासाठी मोठी घिसाडघाई सुरू आहे. ही लस कोरोनाच्या नेमक्या कोणत्या जनुकीय बदलावर अभ्यास करून केली आहे याचे ठोस उत्तर कोणाकडे नाही. त्यामुळे आता या तयार होत असलेल्या लस किती प्रभावी ठरणार याबाबत साशंकता आहे. जर तांत्रिकदृष्ट्या विचार केला तर 
    • नवीन वर्ष 2021च्या पूर्व संध्येला बी वन वन सेव्हन या नवीन अवतारातल्या या अज्ञात कोरोना विषाणूने एन्ट्री करत 2020 प्रमाणे 2021 कसे असेल याची झलक दाखविली आहे. लस सध्या तरी लवकर येणे शक्य नाही आणि ती जर आली तर त्याचा प्रभाव किती असेल हे अगदी लस निर्मिती करणार्‍या औषध कंपन्या सुद्धा सांगू शकणार नाहीत.
    • 2020 च्या मार्चपासून  मास्क , सोशल डिस्टन्स आणि 2 मीटरची दुरी, हे जगण्याचा अविभाज्य भाग बनला आहे. 2021 मध्ये सुद्धा पूर्ण वर्षभर हेच कटाक्षाने पाळावे लागेल.
     
     
    भारतात कोरोना विषाणूच्या जनुकांमध्ये 19 प्रकारचे बदल
    • कोरोना संसर्गाच्या नवीन ‘स्ट्रेन’ च्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणुच्या स्वरुपात होणारे नवनवीन बदलांचा शोध घेण्यासाठी देशात ’जीनोम सिक्वेंसिंग’ केले गेले. त्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यात कोरोना विषाणूचे 19 नवे प्रकार सापडले.
    • आंध्र प्रदेशात सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूला एन 440 के असे नाव देण्यात आले. या विषाणूमुळे त्या राज्यात संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढले. दिल्ली, नोएडा, गाझियाबादमध्ये कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये हा जीनोम आढळला.
    • सीएसआयआरने नवा विषाणू शोधण्यासाठी विषाणू तज्ज्ञांच्या एका पथकाने देशभरात 6,370 रुग्णांतील कोरोना विषाणूची गुणसूत्रे तपासली. त्यातील 20 टक्के रुग्णांमध्ये नव्या विषाणूचे अस्तित्व आढळून आले. 
    • हा नवा विषाणू आशियातून जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये पसरला आहे. देशभरातील सर्व कोरोना रुग्णांपैकी 5 टक्के रुग्णांच्या शरीरातील कोरोना विषाणूंचे जिनोम सिक्वेन्सिग करण्यात यावे अशी सूचना कोरोना साथ रोखण्यासंदर्भातील कृती दलाने केली आहे. ब्रिटनच्या तुलनेत भारताने फारसे जीन मॅपिंग केलेले नाही.  
    • भारतात उपलब्ध असलेल्या ’जीनोम’च्या क्रमामध्ये हा प्रकार किंवा त्यात असलेल्या ’डी-614 जी’ वगळता इतर कुठलाही बदल दिसत नाही. 
    • विषाणूत होणारे बदल व त्याचा प्रवास समजून घेण्यासाठी ’जीनोम’चा क्रम तपासणे हाच एकमेव मार्ग आहे. आज देशातल्या अनेक संस्थांकडे हे करण्याची क्षमता आहे; पण ते नियजोनबद्ध रीतीने साथ संपल्यानंतरही करणे गरजेचे आहे. तसेच नियमितपणे संसर्ग असलेल्या नमुन्यांतून ’जीनोम’चा क्रम तपासत राहण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही
     
    भारतातील पुढील संस्थांनी देशभरातून 4 हजारांच्या आसपास विषाणू नमुन्यांचा क्रम तपासला -
    1) पुण्याची एनसीसीएस, 
    2) हैदराबादच्या सीसीएमबी व सीडीएफडी, 
    3) बेंगळुरूची इनस्टेम, 
    4) दिल्लीची आयजीआयबी, 
    5) ’कल्याणी’ची एनआयबीएमजी, 
    6) भुवनेश्वरची ’आयएलएस’ 
    • ’म्युटेशन’ ची शक्यता कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विषाणूला वाढू न देणे. तो जितका वाढेल, तितकी त्याची म्युटेशन होण्याची शक्यता जास्त. येथे विषाणूची वाढ रोखणे म्हणजे त्याचा प्रसार रोखणे आणि प्रसार रोखणे म्हणजे सुरक्षित वावर, मास्कचा वापर, गर्दी न करणे यांसारखी सर्व बंधने पाळणे. 
     
    प्रश्‍नमंजुषा (74)
     
    1) डिसेंबर 2020 मध्ये कोरोना लस घेणारी जगातील पहिली व्यक्ती कोण?
    1) ज्यो बिडेन
    2) चार्ल्स बोल्सनारो
    3) बोरीस जॉन्सन 
    4)  मार्गारेट कीनन 
     
    2) कोरोनाच्या नवीन स्ट्रेनबाबत खालील विधाने विचारात घ्या:
    a) रॅपिड अँटीजेन टेस्ट तपासणीत नवीन स्वरूपाचा शोध लागू शकतो.
    b)  आरटी-पीसीआर चाचणीमध्ये त्याचे निदान होत नाही.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    3) कोणत्या कंपनीने युनााइटेड नेशंस चिल्ड्रंस फंड एजेंसीसाठी (युनिसेफ) कोरोना व्हॅक्सीन तयार करण्यासाठी करार केला ?
    1) अरविंदो फार्मा 
    2) भारत बायोटेक
    3) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
    4) जॉन्सन अँड जॉन्सन 
     
    4) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) सध्या भारतात दररोज 5 लाख पीपीई किटचे उत्पादन होते.
    ब) मे 2020 मध्ये सर्वाधिक पीपीई किट बनवणारा भारत दुसरा देश ठरला. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    5) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?
    a) अ‍ॅस्ट्राझेनेका ही कंपनी जगभर ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशील्ड लशीचे उत्पादन करते.
    b) हैदराबाद येथील रेड्डीज लॅब भारतात स्पुटनिक-5 लस विकसित करत आहे. 
    c) हैदराबादमध्ये स्थित ‘भारत बायोटेक’  कोव्हॅक्सिन  लस तयार करत आहे. 
    d) अहमदाबादमधील कॅडिला हेल्थकेअर जायकोव्ह-डी लस तयार करत आहे. 
    e) हैदराबादस्थित बायोलॉजिकल ई लिमिटेड कंपनी रिकॉबिनंट प्रोटिन लस तयार करत आहे.
    f) पुण्यातील जिनोव्हा कंपनी ऑरोव्हॅक्सिन या लसीचे उत्पादन करीत आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c), (d), (e)
    2) (b), (c), (e)
    3) (a), (d), (e),  (f)
    4)(a), (c), (e)
     
    6) कोणती कोरोना लस चिंपांझीच्या अ‍ॅडिनोव्हायरसवर आधारित आहे ?
    1) कोव्हॅक्सिन 
    2) जायकोव्ह-डी 
    3) कोव्हिशील्ड 
    4) ऑरोव्हॅक्सिन
     
    7) खालील जोड्या अचूक जुळवा :
                स्तंभ अ (कोरोना स्ट्रेन) स्तंभ ब (प्रथम अस्तित्त्वाचा देश)
    अ. कोरोना एन 501 वाय                 I. दक्षिण आफ्रिका
    ब. कोरोना बी 117                         II. ग्रेट ब्रिटन
    क. सार्स कोव्ह 2                         III. वुहान, चीन
    ड. मर्स कोव्ह 2                         IV. सौदी अरेबिया
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III IV I
    (2) I II III IV
    (3) III II IV I
    (4) I II IV III
     
    8) खालीलपैकी कोणत्या देशाने कोरोनाचा नवा विषाणू प्रकार ’मिंक’ या प्राण्यातून आल्याने सुमारे 1.7 कोटी मिंकची कत्तल केली ?
    1) चीन
    2) डेन्मार्क
    3) दक्षिण आफ्रिका
    4) नेदरलँडस
     
    9) खालील विधाने विचारात घ्या:
    a) भारत बायोटेक: रेबिज या रोगाविरोधात लसीचं उत्पादन करणारी जगातली पहिल्या क्रमांकाची कंपनी.
    b)  पंकज पटेल : फोर्ब्स मासिकाच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    10) सिरम इन्स्टिट्यूट सध्या कोणत्या कोरोना लसीचं उत्पादन करत आहे ?
    1)  नोवावॅक्स
    2)  कोडाजेनिक्स
    3)  कोविशिल्ड 
    4)   वरील सर्व
     
    11) खालील जोड्या अचूक जुळवा :
            स्तंभ अ (ठिकाण) स्तंभ ब (कंपनी)
    अ. मांजरी, पुणे                              I.  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
    ब. चांगोदर, अहमदाबाद II.  कॅडिला हेल्थकेअर
    क. जिनोम व्हॅली, हैद्राबाद III. मध्ये भारत बायोटेक पार्क 
    ड. होसूर, बंगळुरु                            IV. बायोकॉन
    पर्यायी उत्तरे :
    (1) I II IV III
    (2) I IV III II
    (3) I II III IV
    (4) IV III I II
     
    12) कोरोनावरील उपयुक्त मोलनुपिरावीर नावाचे अँटिव्हायरल औषध कोणी शोधले ?
    1) इलिनॉईस विदयापीठ
    2) जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटी
    3) मायक्रोसॉफ्ट
    4) लुमिर डिएक्स 
     
    13) सायरस पूनावाला यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ते भारतातले चौथ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
    ब) त्यांनी इक्वेस्ट्रेईन खेळात प्राविण्य मिळविलेले आहे.
    क) महाराष्ट्र सरकारच्या हाफकिन इन्स्टिट्यूटचे ते एक सम्चालक आहेत.
    ड) त्यांना ’व्हॅक्सिन किंग ऑफ इंडिया’म्ह्णून ओळखले जाते.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    14) 2020 साली देशात पहिल्यांदाच कोणत्या शहरात  डॉक्टरांनी रुग्णाच्या दोन्ही फुप्फुसांचे पुनर्रोपण केले ?
    1) दिल्ली
    2) चेन्नई
    3) वेल्लोर
    4) हैदराबाद
     
    15) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) : फायझरची कोरोना लसउणे 68 ते उणे 70 अंश सेल्सिअस इतक्या अतिशीत तापमानात सुरक्षित ठेवावी लागते.
    कारण (र) :  ही लस ‘एम-आरएनए’ (मेसेंजर आरएनए)वर आधारलेली आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    (1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    (2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    (3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    (4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    16) चिकुनगुनिया, टायफॉईड, झिका आणि स्वाईन फ्लू अशा अनेक लसींची निर्मिती भारतात प्रामुख्याने या कंपनीद्वारे केली जाते ?
    1) बायोकोन 
    2) कॅडिला हेल्थकेअर 
    3) सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
    4)  भारत बायोटेक पार्क
     
    17) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (कंपनी)                                        स्तंभ ब (संस्थापक )
    अ.   झायडस कॅडिला                                 I. किरण मुजुमदार शॉ 
    ब. भारत बायोटेक पार्क                             II.  सायरस पूनावाला 
    क. बायोकोन                                         III. रमणभाई पटेल आणि इंद्रवदन मोदी
    ड. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया                IV. डॉ. कृष्णा ईला आणि सुचित्रा ईला 
    पर्यायी उत्तरे ः
    (1) III IV II I
    (2) II I III IV
    (3) III IV I II
    (4) IV III I II
     
    18) ‘फ्रीझ-ड्राइंग’ तंत्राद्वारे लसनिर्मिती प्रकल्पात भारतातील कोनती संस्था सभागी नाही ?
    1) आयआयएस (बंगळूर)
    2) आयसर (तिरुअनंतपूरम)
    3) टीएचएसटी ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (फरिदाबाद) 
    4) एनआयव्ही (पुणे)
     
    19) 5 मिनिटांत कोरोनाची चाचणी करण्यास उपयुक्त बायोसेन्सर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) भारतीय वंशाचे प्रा. दिपांजन पान यांनी तो विकसित केला.
    ब) त्यात ग्रॅफेनचे इलेक्ट्रोड्स सोन्याच्यापॅडवर बसविले आहेत.
    क) तो ग्रॅफेनवर आधारित इलेक्ट्रोकेमिकल बायोसेन्सर आहे.
    ड) तो एलईडी स्क्रीन किंवा स्मार्टफोनला ब्लूटुथच्या माध्यमातून जोडता येतो. 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    20) भारत बायोटेकने रोटावॅक ही रोटा व्हायरसविरोधातली पहिली लस शोधून काढली. त्यासाठी त्यांना कोणी अर्थसहाय्य केले होते ?
    1) बिल आणि मिलेंडा गेट्स फाऊंडेशन
    2) जागतिक बँक
    3) सीएसआयआर
    4) गुगल अँड अल्फाबेट फाऊंडेशन
     
    21) लुमिर डिएक्स या ब्रिटिश कंपनीच्या सेलफोनच्या आकाराचे साधनाच्या सहाय्याने कोणत्या रोगाचे निदान 15 मिनिटात करता येते ?
    1) कोव्हिड 19
    2) क्षय रोग 
    3) एचआयव्ही
    4) वरील सर्व
     
    22) लस निर्मिती कंपनी व देश याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ) आयनोवियो : अमेरिका
    ब) गॅमॅलेया रिसर्च : रशिया
    क) बायोनटेक : जर्मनी
    ड) एस्ट्राझेनेका : इंग्लंड
    इ)  झायडस कॅडिला : नेदरलँडस
    फ) मॉडर्ना : फ्रान्स
    ग) नोवावाक्स : फिनलंड
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) अ आणि ब वगळता सर्व
    4) इ, फ आणि ग वगळता सर्व
     
    23) डिक्शनरी डॉट कॉमने कोणत्या शब्दाची 2020 मधील ’वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषणा केली ?
    1) क्वारंटाईन
    2) सार्स कोव्ह 2
    3) पँडेमिक
    4) सॅनिटायझर 
     
    24) भारतातील लॉकडाऊन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 22 मार्च 2020 ला एक दिवसाचा ’जनता कर्फ्यू’ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला
    ब) 24 मार्चला मध्यरात्रीपासून देशभरात कडक लॉकडाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली. 
    क) 31 मे 2020 पर्यंत भारतात लॉकडाऊन होता.  
    ड) लॉकडाऊन दरम्यानचे व्यवहार नियंत्रण करण्यासाठी नैसर्गिक आपत्ती कायदा 2005 च्या तरतुदी अंमलात  आणल्या गेल्या. 
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3)  विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    25) पोलिओ, धनुर्वात, देवी, रुबेला, गोवर, बीसीजी अशा अनेक लसींची निर्मिती भारतात प्रामुख्याने या कंपनीद्वारे केली जाते ?
    1) बायोकोन 
    2) कॅडिला हेल्थकेअर 
    3)  सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
    4)  भारत बायोटेक पार्क
     
    26) विविध लसीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय शोधा:
    अ) जग 1935 पासून पोलिओग्रस्त झाले व त्याची लस 1955 मध्ये आली. 
    ब) 1918 मध्ये फ्लूची साथ आली व त्याची लस 1945 मध्ये तयार झाली.
    क) 1898 मध्ये मलेरियाचा आदिजीव सापडला व त्याची लस 1998 मध्ये तयार झाली.
    ड)  जग 1900 पासून क्षयग्रस्त झाले व त्याची लस 1960 मध्ये आली. 
    पर्यायी उत्तरे ः
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ आणि ब बरोबर
     
    27) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
    1) 21 डिसेंबर 2019 रोजी चीनने कोरोेनाबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला दिली.
    2) 30 जानेवारी 2020 रोजी  भारतात पहिला कोरोना रुग्ण आढळला.
    3) 20 डिसेंबर 2020 रोजी  भारतातील कोविड-19 रुग्णसंख्येने 1 कोटीचा टप्पा ओलांडला. 
    4) 10 डिसेंबर2020 रोजी इंग्लंडमधली 90 वर्षीय मार्गारेट कीनन ही कोरोना लस घेणारी जगातील पहिली व्यक्ती ठरली.
     
    28) भारतातील कोरोना साथीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या (जानेवारी 2021) :
    अ) कोरोना रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारत जगात दुसर्या क्रमांकावर 
    ब) कोरोनामुळे मृत्यूच्या आकड्यांविषयी भारताचा अमेरिका आणि ब्राझीलनंतर नंबर लागतो. 
    क) कोरोनाच्या अ‍ॅक्टीव्ह रुग्णांमध्ये भारत जगात नवव्या क्रमांकावर 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    29) 2020 मध्ये कोणत्या संशोधकांनी कोरोना रुग्णासाठी उपयुक्त ठरणारे व्हॅक्यूम मशीनचे व्हेंटिलेटर बनवले होते?
    1) मर्सिडीझ
    2) टाटा मोटर्स
    3) डरहॅम युनिव्हर्सिटी
    4) ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी
     
    उत्तरे - प्रश्‍नमंजुषा (74)
    1-4
     
    2-4
     
    3-1
     
    4-2
     
    5-1
     
    6-3
     
    7-2
     
    8-2
     
    9-3
     
    10-4
     
    11-3
     
    12-2
     
    13-3
     
    14-4
     
    15-1
     
    16-4
     
    17-3
     
    18-4
     
    19-4
     
    20-1
     
    21-4
     
    22-4
     
    23-3
     
    24-1
     
    25-3
     
    26-4
     
    27-2
     
    28-4
     
    29-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1011