लसीकरणाचा दुसरा टप्पा

  • लसीकरणाचा दुसरा टप्पा

    लसीकरणाचा दुसरा टप्पा

    • 25 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 39 Views
    • 0 Shares

     लसीकरणाचा दुसरा टप्पा

     

     

    ठळक नोंदी-
    1 मार्चपासून देशामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु.
    • लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्यात 10 हजार सरकारी रुग्णालये आणि 20 हजार खासगी रुग्णालये सहब हागी.
    • दुसर्‍या टप्प्यामध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 10 कोटी लोकांसह 27 कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित. 
    • 60 वर्षांवरील तसेच सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांचे सरकारी रुग्णालयांत मोफत लसीकरण.
    • केंद्र सरकारने 20 हजार खासगी रुग्णालयांमध्ये करोना लसीकरणास मुभा दिली आहे. तिथे सशुल्क लसीकरण होईल. 
    • या लसींचा काळाबाजार होऊन त्या अधिक किंमतीला विकल्या जाऊ नयेत म्हणून विशेष खबरदारी.

    सहव्याधींचे निकष -
    • दुसर्‍या टप्प्यात सहव्याधी असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. मात्र, सहव्याधींचे निकष केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेले नाहीत. त्यात कर्करोग, मुत्रपिंडाचे आजार, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी सहव्याधींचा समावेश केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील आजार असणारे, स्थूलपणामुळे आरोग्यविषय समस्या असणारे तसेच बोन मॅरो किंवा अवयवांसंदर्भातील गंभीर व्याधी असणार्‍यांनाही प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे.

    ‘को-विन’ अ‍ॅपची मदत -
    • ‘को-विन’ अ‍ॅपच्या माध्यमातून लसीकरणासाठी नागरिकांना मार्गदर्शन आणि मदत.  ‘को-विन’ अ‍ॅपवरुन जवळचे लसीकरण केंद्र कोणते आणि इतर महत्वाची माहिती नागरिकांना देण्याची योजना आहे. मात्र सध्या ती हे ‘को-विन’ अ‍ॅप मर्यादित लोकांसाठी सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी आणि सरकारी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. नव्या टप्प्यामध्ये‘को-विन’ अ‍ॅपवर नागरिकांना नोंदणी करावी लागेल आणि आधार कार्ड वा निवडणूक ओळखपत्र क्रमांक देणे गरजेचे असेल.
    • या अ‍ॅपवर आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सर्व माहिती भरुन, मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करुन नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येईल. शक्य असेल त्या वेळेस जाऊन लस घेण्यासाठी नोंदणी करण्याची मूभाही या अ‍ॅपमध्ये असेल. त्याचप्रमाणे कोणत्या केंद्रावर लस उपलब्ध आहे, केंद्र किती ते किती वाजेपर्यं सुरु राहणार आणि लसीकरणासंदर्भातील इतर माहितीही या अ‍ॅपवरुन मिळणार आहे. तसेच वॉक इन म्हणजेच थेट जाऊन नोंदणी करुन लस घेण्याची सोयही उपलब्ध असेल. फक्त यासाठी मेडिकल सर्टीफिकेट आणि केंद्रामध्ये लसी उपलब्ध असणे या दोनच अटी असतील.
    • कोणत्याही गटामध्ये बसणार्‍या नागरिकांना त्यांच्या आरोग्यासंदर्भातील एक पानांचा फॉर्म भरावा लागणार आहे. यामध्ये त्यांच्या आरोग्यासंदर्भातील होय, नाही प्रकारातील प्रश्र्न विचारण्यात आलेले असतील. ही माहिती भरुन स्थानिक डॉक्टरांची सही घेऊन हा फॉर्म लसीकरण केंद्रामध्ये जाताना घेऊन जायचा. 
     

     
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 39