प्रश्‍नमंजुषा 89 : मोहनदास करमचंद गांधी

  •   प्रश्‍नमंजुषा 89 : मोहनदास करमचंद गांधी

    प्रश्‍नमंजुषा 89 : मोहनदास करमचंद गांधी

    • 04 Feb 2021
    • Posted By : Study circle
    • 8512 Views
    • 10 Shares

    1) बालपण व पोरबंदरमधील वास्तव्य

     
    1) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) महात्मा गांधीजींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. 
    ब) महात्मा गांधीजींचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    2) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1920 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम महात्मा गांधीजींना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. 
    ब) 1944 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा महात्मा गांधीजींना  भारताचे ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले.
    क) भारतातील लोक महात्मा गांधीजींना  प्रेमाने बापू म्हणतात.
    ड) असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी सर्व प्रथम भारतामध्ये केला. होता. 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4) अ, क आणि ड बरोबर
     
    3) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
    1) गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती.
    2) गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. 
    3) 1883 मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा माखनजी यांच्या बरोबर बालविवाह झाला. 
    4) गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पोरबंदरमधील शामलदास कॉलेजमधून थोड्या कष्टानेच पास झाले.
     
    4) महात्मा गांधीजींच्या मुलाबाबत खालीलपैकी कोणती जोडी असत्य आहे?
    1) 1888 मध्ये हरीलाल
    2) 1892 मध्ये मणिलाल
    3) 1896 मध्ये रामदास 
    4) 1900 मध्ये देवदास
     
    5) प्राचीन वाङ्मयातील या कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता.
    अ) भक्त प्रल्हाद
    ब) श्रावणबाळ व ध्रुवबाळ
    क) हरिश्चंद्र
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
    2) इंग्लंड -बॅरिस्टर
     
    1) लंडन येथे कायद्याचा अभ्यास करून महात्मा गांधी कोणत्या वर्षी बॅरिस्टर झाले होते ?
    1) 10 मे 1888
    2) 1 जून 1888
    3) 1 एप्रिल 1898
    4) 10 जून 1891 
     
    2) महात्मा गांधीनी येथे  राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. 
    1) लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेज कँपस
    2) लंडन येथील ऑक्स्फोर्ड युनिव्हर्सिटी कँपस
    3) इनर टेंपल 
    4) वरील सर्व
     
    3) गांधीजीनी कोणत्या ठिकाणी कायद्याची प्रॅक्टिस केली होती ?
    1) पोरबंदर 
    2) राजकोट
    3) मुंबई 
    4) 2 आणि 3
     
    4) महात्मा गांधीजी कोणत्या ठिकाणी थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्यांच्या सर्वप्रथम संपर्कात आले होते ?
    1) गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले असताना
    2) दक्षिण आफ्रिकेत असताना
    3) बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले असताना
    4)1917 साली अ‍ॅनी बेझंट यांच्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या कार्यक्रमात 
    3) दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य व सत्माग्रह
    1) महात्मा गांधीजीबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
          स्तंभ अ (स्थळ)                 स्तंभ ब (घटना)
    अ. पीटरमारित्झबर्ग            I.  टॉलस्टाय फार्म स्थापन 
    ब. जोहान्सबर्ग                  II.  फिनिक्स आश्रम स्थापन
    क. दरबान                       III.  आगगाडीमधून ढकलून देण्यात आले. 
    पर्यायी उत्तरे :
      क
    (1) II III I
    (2) II I III
    (3) III I II
    (4) I III II
     
    2) महात्मा गांधीजीनी पहिल्यांदा सत्याग्रह आंदोलन कधी व कोठे केले होते ?
    1) 11 सप्टेंबर 1906 व दक्षिण आफ्रिका
    2) 6 जून 1911 व कोलकाता
    3) 20 जानेवारी 1917 व खेडा
    4) 15 ऑक्टोबर 1917 व चंपारण्य
     
    3) जनरल जॉन क्रिस्तिआन स्मट्सने काळा कायदा रद्द करावा, म्हणून खालीलपैकी कोण दक्षिण आफ्रिकेत गेले  होते ?
    अ)  लक्षाधीश व्यापारी दादा अब्दुल्ला 
    ब)  प्रिटोरिया येथील व्यापारी तय्यबजी 
    क)  गोपाळकृष्ण गोखले
    ड)  महात्मा गांधीजी
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) फक्त क बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4) फक्त क आणि ड बरोबर
     
    4) महात्मा गांधीजीनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोठून सुरू केले होत ?
    1) केपटाऊन 
    2) दर्बान
    3) जोहान्सबर्ग
    4) ईस्ट लंडन
     
    5) महात्मा गांधीजींच्या द, आफ्रिकेतील वास्तव्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) टॉलस्टायचे किंग्डम ऑफ गॉड पुस्तकाचे वाचन
    ब) रस्किनच्या पुस्तकाचे सर्वोदय म्हणून गुजरातीत भाषांतर 
    क) थोरोचे निबंध या पुस्तकाचे वाचन
    ड) रस्किनचे अनटू धिस लास्ट पुस्तकाचे वाचन

    पर्यायी उत्तरे :

    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
     
    6) महात्मा गांधीजीनी नाताळ भारतीय काँग्रेसची स्थापना कधी केली ? 
    1) 1893
    2) 1903
    3) 1906
    4) 1894
     
    7) महात्मा गांधीजीनी लंडनहून दक्षिण आफ्रिकेस परत जात असताना 1908 साली  कोणते पुस्तक प्रश्नोत्तररूपाने लिहून प्रसिद्ध करुन त्या पुस्तकात यांत्रिक उद्योगाने मानवाचा र्‍हास होत आहे, हा विचार त्यांनी मांडला होता ?
    1)  सर्वोदय
    2)  माझे सत्याचे प्रयोग 
    3)  हिंद स्वराज्य 
    4)  माझ्या स्वप्नांचा भारत
     
    8) महात्मा गांधीजींची हरद्वार येथे कांगडी गुरुकुलाचे आचार्य श्रद्धानंद यांच्याशी गाठ पडली. त्यांनीच प्रथम गांधींजींचा  ......... म्हणून निर्देश करून गौरव केला. 
    1) बापूजी
    2) राष्ट्रपिता
    3) महात्मा 
    4) यापैकी नाही

    4) भारतातील सार्वजनिक जीवन
     
    1) ‘उगवती पिढी केवळ निवेदने इत्यादींनी समाधानी होणार नाही..... दहशतवाद संपविण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे व तो म्हणजे सत्याग्रह‘ असे 25 फेब्रुवारी 1919 रोजी गांधीजींनी पत्राद्वारे कोणाला कळविले?
    1) जवाहरलाल नेहरूंना
    2) मोतीलाल नेहरूंना
    3) दिनशा वाच्छांना
    4) स्वाती श्रद्धानंदांना 
     
    2) साबरमती आश्रम पूर्वी अहमदाबाद जवळील ...... येथे होता. तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे हालविण्यात आला.
    1) कोचार्ब
    2) आनंदपुरा
    3) जालीसाना
    4) दलोद
     
    3) 25 मे 1915 रोजी  अहमदाबाद येथे साबरमती तीरावर सत्याग्रहाश्रम स्थापन केला होता, तेथील महत्त्वाचे अनुयायी कोण होते ? 
    अ) गोपाळराव काळे
    ब) संगीतज्ञ खरे गुरूजी
    क) काकासाहेब कालेलकर
    ड)  किशोरलाल मश्नुवाला
    इ)  जवाहरलाल नेहरु
    फ)  गोपाळराव काळे
    ग)  विनोबा भावे

    पर्यायी उत्तरे :

    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) इ वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व

    5) पहिल्या महायुुद्धातील गांधीजींची भूमिका 
     
    1) 1917 साली पहिल्या जागतिक युद्धात भारतीयांनी मित्र राष्ट्रांना मदत करावी, म्हणून  व्हाइसरॉय लॉर्ड चेल्म्सफर्ड याने भारतीयांची परिषद बोलाविली. त्या परिषदेत कोणी सैन्यभरतीला बिनशर्त पाठिंबा दिला ?
    1) लोकमान्य टिळक 
    2) अ‍ॅनी बेझंट
    3) महात्मा गांधी
    4) वरील सर्व 
     
    2) दक्षिण आफ्रिकेतील चळवळीपासून कोणती व्यक्ती, ब्रिटिश सरकारचे भारतातील प्रतिनिधी आणि गांधीजी यांच्यामधला महत्त्वाचा दुवा बनले होते ?
    1) गोपाळ कृष्ण गोखले
    2) न्यायाधीश ब्रुमफील्ड
    3) दीनबंधू सी. एफ. अँड्रूज 
    4) विन्स्टन चर्चिल 
    6) 1920 पर्यंतचे सत्याग्रह
     
    1) 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यावर ‘गांधी म्हणजे स्थानिक प्रश्‍न हाती घेऊन त्याबद्दल ठोस पाऊले उचलणारा‘ अशी त्यांची ख्याती पसरली होती. पुढीलपैकी कोणते प्रश्‍न त्यांनी यशस्वीपणे हाताळले?
    a) फक्त चंपारण निळीच्या शेतकर्‍यांचे प्रश्‍न 
    b) फक्त अहमदाबाद मधील कापड गिरण्यांच्या कामगारांचे प्रश्‍न.
    c) फक्त बार्डोली शेतकर्‍यांचे प्रश्‍न

    पर्यायी उत्तरे :

    1) (a) आणि (b) 
    2) (b) आणि (c) 
    3) (a)  आणि (c) 
    4)  सर्व (a),(b),(c)
     
    2) महात्मा गांधींच्या भारतातील प्रारंभीच्या आंदोलनांचा कालक्रम लावा.
    1) अहमदाबाद, चंपारण, खेडा
    2) खेडा, अहमदाबाद, चंपारण
    3) चंपारण, अहमदाबाद, खेडा
    4) चंपारण, खेडा, अहमदाबाद
     
    3) इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?
    1) उदारमतवादी पक्ष
    2) स्वराज्य पक्ष
    3) काँग्रेस पक्ष
    4) मुस्लीम लीग
     
    4) भारतमंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आली ?
    1) 1992 चा कायदा  
    2) 1909 चा कायदा
    3) 1919 चा कायदा
    4) 1935 चा कायदा
     
    5) 1918 मध्ये गांधीजींनी कोणत्या लेबर असोसिएशनची स्थापना केली ?
    1) अहमदाबाद टेक्सटाईल
    2) ऑल इंडिया ट्रेड युनियन
      3) बॉम्बे ट्रेड युनियन
    4) कोलकाता ट्रेड युनियन  
     
    6) कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली ?
    1) इंग्लंड
    2) जर्मनी
    3) ब्रह्मदेश
    4) तुर्कस्थान
     
    7) बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता?
    1) भात
    2) ज्यूट
    3) नीळ
    4) ऊस
     
    8) गांधीजींनी ”सत्याग्रह सभा” कशाच्या विरोधात सुरू केली?
    1) मीठ कायदा
    2) रौलेट कायदा
    3) भारत सरकारचा 1919 चा कायदा
    4) जालियनवाला बाग हत्याकांड
     
    9) स्वराज्य पार्टीचे प्रमुख उद्दिष्ट काय होते ?
    a) कायदे मंडळात प्रवेश
    b) इंग्रजांनी स्थापन केलेल्या संस्थांचा बहिष्कार
    c) वैधानिक विशेष
    1) (a)
    2) (a), (b)
    3) (b), (c)
    4) (c)
     
    10) महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी 1918 मध्ये ’सारा बंदी’ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
    1) गोरखपूर
    2) सोलापूर
    3) खेडा
    4) पुणे
     
    11) चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
      1) महात्मा फुले
    2) महात्मा गांधी
    3) लोकमान्य टिळक
    4) वि.दा. सावरकर
     
    12) अमृतसर येथे झालेल्या अखिल भारतीय खिलाफत परिषदेत व्हाईसरायकडे एक प्रतिनिधीमंडळ पाठविण्याचे ठरले. त्यांनी 19 जानेवारी 1920 रोजी व्हॉईसरॉयना देण्याच्या पत्रावर सुप्रसिद्ध हिंदू राजकारणी पुढार्‍यांनी सह्या केल्या होत्या. पुढीलपैकी ते पुढारी कोण होते?
    a) गांधीजी
    b) स्वामी श्रद्धानंद
    c) पंडित मोतीलाल नेहरू
    d) पंडित मदनमोहन मालवीय
    e) पंडित जवाहरलाल नेहरू

    पर्यायी उत्तरे :

    1) (a), (c), (d), (e) फक्त
    2) (b), (c), (d), (e) फक्त
    3) (a), (b), (c), (d) आणि (e)
    4) (a), (b), (c) आणि (d) फक्त
     
    13) घटनांचा कालानुक्रमाने क्रम लावा.
    a) स्वदेशी चळवळ
    b) खिलाफत चळवळ
    c) सविनय कायदेभंग चळवळ 
    d) चलेजाव चळवळ
    1) (b), (a), (d), (c)
    2) (b), (c), (d), (a)
    3) (d), (b), (a), (c)
    4) (a), (b), (c), (d)
     
    14) राष्ट्रीय सभेच्या सन 1920 मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष ........ हे होते.
    1) डॉ. अ‍ॅनी बेझंट
    2) पं. मदनमोहन मालवीय
    3) लाला लजपतराय
    4) बद्रुद्दीन तय्यबजी
     
    15) 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते ?
    1) कराची
    2) दिल्ली
    3) लाहोर
    4) सिंध
     
    16) महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीस पाठिंबा दिला, कारण ..........
    a) त्यांना या चळवळीतून हिंदू-मुस्लीम ऐक्य साधायचे होते म्हणून
    b) त्यांना या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेता येईल असे वाटले म्हणून
    c) त्यांना इस्लाम धर्माचा प्रचार करायचा होता म्हणून

    पर्यायी उत्तरे :

    1) (a), (b) फक्त
    2) ((a), (b), (c)
    3) (a), (c) फक्त
    4) (b), (c) फक्त
     
    17) पुढीलपैकी स्वराज्य पक्षाच्या अपयशाची कारणे कोणती होती ?
    a) ब्रिटिशांची ’फोडा आणि झोडा’ नीती
    b) पक्ष शिस्तीचा अभाव
    c) जनतेच्या पाठिंब्याचा अभाव
    d) स्वराज्य पक्षात फूट

    पर्यायी उत्तरे :

    1) (a) आणि (b) फक्त
    2) (b) आणि (d) फक्त
    3) (c) आणि (d) फक्त
    4) (a), (b), (c) आणि (d) 
     
    18) ...... ला विरोध दर्शवण्यासाठी गांधीजीनी कैसर ए हिंद / ’नाइटहुड’ किताब परत केला.
    1) कम्युनल अवॉर्ड
    2) जालियनवाला बाग दुर्घटना
    3) सविनय कायदेभंग आंदोलन
    4) चौरीचौरा घटना
     
    19) खालीलपैकी 1857 च्या उठावानंतर बंगालमधील एक महत्त्वाची ‘शेतकरी चळवळ‘ कोणती? 
    1) निळीचा उठाव
    2) दख्खन दंगे
    3) फराजी चळवळ
    4) कापसाचा उठाव 
     
    20) गुजरातमधील शेतकर्‍यांनी ..... यांच्या नेतृत्वाखाली ‘कर विरोधी मोहीम’ संघटित केली. 
    1) महात्मा गांधी
    2) सरदार वल्लभभाई पटेल
    3) मोतीलाल नेहरू
    4) एस. ए. डांगे
     
    21) कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली ?
    1) इंग्लंड
    2) जर्मनी
    3) ब्रह्मदेश
    4) तुर्कस्थान
     
    22) बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता?
    1) भात
    2) ज्यूट
    3) नीळ
    4) ऊस
     
    23) गांधीजींनी ”सत्याग्रह सभा” कशाच्या विरोधात सुरू केली?
    1) मीठ कायदा
    2) रौलेट कायदा
    3) भारत सरकारचा 1919 चा कायदा
    4) जालियनवाला बाग हत्याकांड
     
    24) ब्रिटिश सरकारने गांधीजींना ‘कैसर-ए-हिंद’ हा किताब बहाल केला, कारण ......
    1) गांधीजींनी परदेशी जाऊन आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर असाधारण लौकिक मिळविला
    2) गांधीजींनी लोकजागृतीचे कार्य केले
    3) पहिल्या जागतिक महायुद्धातील जखमी सैनिकांची गांधीजींनी शुश्रृषा केली
    4) गांधीजींनी आपल्या सत्याग्रहाच्या शस्त्राने दक्षिण आफ्रिकेत यशस्वी लढा दिला होता
    7) असहकार चळवळ
     
    1) डिसेंबर 1920, च्या नागपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार चळवळीबाबत अंतिम निर्णय कोणता झाला होता?
    1) ठराव मांडला गेला नाही.
    2) ठरावावर चर्चाच झाली नाही.
    3) ठराव मंजूर झाला नाही.
    4) ठराव बहुमताने मंजूर झाला.
     
    2) 1920 च्या असहकार चळवळीला काय प्रेरक होते?
    a) पहिल्या महायुद्धाने वाढलेली महागाई
    b) सरकारच्या कायद्याने व्यक्ती व व्यक्तिस्वातंत्र्यावर घातलेल्या मर्यादा
    c) ब्रिटिशांच्या विरोधातील असंतोष
    d) खिलाफत प्रश्‍नामुळे ब्रिटिश विरोधी मुस्लीम समाज
    1) (a), (b)
    2) (b), (c)
    3) (a), (b), (c)
    4) (a), (b), (c), (d)
     
    3) पुढील वाक्यांमध्ये कोणत्या संघटनेचा आणि व्यक्तीचा उल्लेख केला आहे?
    त्यांनी ती संघटना लोकशाही व जनसामान्यांची संघटना म्हणून उभी केली. त्यांच्यामुळे शेतकरी व नंतर औद्योगिक कामगारही या संघटनेत आले. कामगार वैयक्तिक तत्त्वावर आले आणि ते वेगळ्या अशा संघटित स्वरूपात आले नाहीत.
    1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, गांधीजी
    2) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, लोकमान्य टिळक
    3) भारतीय साम्यवादी पक्ष, मा. ना. रॉय
    4) समाजवादी आणि गो. कृ. गोखले
     
    4) असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस दोन भागात विभागली गेली.
    a) एक गट ज्यात वल्लभभाई पटेल, सी राजगोपालाचारी आणि राजेंद्र प्रसाद अग्रगणी होते असे समजत  होता की काँग्रेसने निवडणुकीत भाग घ्यावा व विधिमंडळात आतून हल्ला चढवावा.
    b) ज्या गटाचे पुढारी सी. आर. दास. मोतीलाल नेहरू व विठ्ठलभाई पटेल होते तो गट निवडणुकीच्या  विरोधात होता. 
    c) काँग्रेसच्या 1922 च्या पटना येथील सभेत, ज्या सभेचे अध्यक्षपद सी. आर. दास यांच्याकडे होते,  निवडणुकीचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. 
    वरील तीन पैकी कोणते विधान बरोबर आहे ?

    पर्यायी उत्तरे :

    1) (a)
    2) (b)
    3) (c)
    4) एकही नाही 
     
    5) खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता ?
    1) शाळांवरील बहिष्कार
    2) न्यायालयांवरील बहिष्कार
    3) परदेशी कापडांवरील बहिष्कार
    4)  कर न भरणे. 
     
    6) कालानुक्रमे रचना करा.
    a) मुस्लीम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिनांच्या चौदा कलमी कार्यक्रमास पसंती दिली.
    b) काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली.
    c) लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.
    d) गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरु केला. 
    1) (a), (c), (d)
    2) (d), (b), (a), (c)
    3) (b), (a), (c), (d)
    4) (a), (b), (c), (d)
     
    7) इ. स. 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले कारण :
    1) 1919 सालचा माँटेग्यू चेल्म्सफोर्ड कायदा निष्प्रभ ठरला होता. 
    2) मजूर पक्षाकडे सत्तापालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्याची धास्ती होती.
      3) स्वराज पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते. 
      4) वरील सर्व  
     
    8) गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा घटनेत 22 पोलीस मरण पावल्यावर काय झाले नाही?
    1) गांधीजींना धक्का बसला. त्यांनी चळवळ थांबविली.
    2) आम जनता व काँग्रेस पुढार्‍यांना गांधीजींच्या निर्णयाचा राग आला.
    3) इंग्रजांनी गांधीजींना शासन विरोधी कारवायांस्तव अटक केली.
    4) वरीलपैकी एकही नाही.
     
    9) असहकार चळवळीच्या तीन उद्देशांवर खिलाफत कमिटी व काँग्रेस यांचे एकमत झाले. हे तीन उद्देश कोणते?
    1) खिलाफत चळवळीवर समाधानकारक तोडगा मिळविणे, पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
    2)  बंगाल प्रश्‍नावर समाधानकारक तोडगा मिळविणे, पंजाबमध्ये केलेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
    3)  अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नावर तोडगा मिळविणे, जालियनवाला बागेत झालेल्या चुका सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
    4)  खिलाफत चळवळीवर तोडगा मिळविणे, बंगालमधील चूक सुधारणे व स्वराज्य मिळविणे.
     
    10) फेब्रुवारी 1922 च्या चौरीचौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली. या घटनेचे वर्णन ‘नॅशनल कॅलॅमिटी’ असे कोणी केले?
    1) पंडित मोतीलाल नेहरू
    2) लाला लजपत राय
    3) सुभाषचंद्र बोस
    4) पंडित जवाहरलाल नेहरू
     
    11) पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
    a) आंतरदेशीय स्थलांतर अधिनियम 1859 प्रमाणे आसाममधील चहा मळ्यातील कामगारांना मळे सोडून बिना परवानगी जाता यावयाचे नाही व अशी परवानगी क्वचितच मिळे.
    b) गांधीजींच्या असहकार चळवळीवरून त्यांनी सरकारला झुगारले. मळे सोडले व विनासायास घरी पोहोचले.

    पर्यायी उत्तरे :

    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) दोन्ही
    4) एकही नाही
     
    12) 1921 मधील मद्रास शहर चळवळीला महत्त्वाचा भाग म्हणजे ...... येथे चार महिने चाललेला संप होय.
    1) मद्रास बार काउन्सिल
    2) बकिंगहॅम अँड कर्नाटक टेक्स्टाइल मिल्स्
    3) राजामुंद्री कापड बाजार
    4) गुंटूर नगरपालिका
     
    13) स्वराज पार्टीची स्थापना झाल्यावर, गांधीजींना हवे होते की काँग्रेसजनांनी ग्रामीण भागात विधायक कामे करावीत त्यात काय सम्मिलित नव्हते?
    1) दारूबंदी मोहमी
    2) कमजोर वर्गात व अस्पृश्यांकरिता सामाजिक कार्य
    3) सर्व वर्गांकरिता इस्पितळांची स्थापना
    4) राष्ट्रीय शाळांची स्थापना
     
    14) गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय?
    1) गांधीजींना अटक
    2) काँग्रेसचा विरोध
    3) चौरी-चौरा घटना
    4) पहिले महायुद्ध
     
    15) जानकीदेवी बजाज यांनी 3 एप्रिल 1921 मध्ये देवळी येथे ...... वर भाषण दिले.
    1) सतीप्रथा व भ्रूणहत्या
    2) असहकार व स्वदेशी
    3) स्त्री शिक्षण व विकास
    4) हुंडापद्धती व स्त्रीदमन
     
    16) इ.स. 1928 च्या बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व .......... यांनी केले.
    1) सरदार वल्लभभाई पटेल
    2) महात्मा गांधी
    3) विठ्ठलभाई जे. पटेल
    4) महादेव देसाई
     
    17) गुजरातमधील शेतकर्‍यांनी.....यांच्या नेतृत्वाखाली ‘करविरोधी मोहीम’ संघटित केली.
    1) महात्मा गांधी
    2) सरदार वल्लभभाई पटेल
    3) मोतीलाल नेहरू 
    4) एस. ए. डांगे
     
    18) बार्डोलीचा सत्याग्रह .......... यांच्या नेतृत्वाखाली झाला.
    1) सरदार पटेल
    2) महात्मा गांधी
    3) विनोबा भावे
    4) महादेव देसाई
     
    19) असहकार चळवळीच्या काळात सरकारने दडपशाहीचे धोरण अंगीकारले होते.
    पुढे दिलेल्या व्यक्ती व त्यांच्याविरुद्ध दडपशाहीने केलेली कारवाई यांच्या जोड्या जुळवा.
    a) सी. आर. दास          i)  यांना कठोर तुरुंगवासाची शिक्षा दिली.
    b)  लाला लजपत राय ii)  यांना 18 महिन्याच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा दिली.
    c)  पंडित जवाहरलाल नेहरू iii)  यांना राजद्रोहकारक भाषण कायद्याखाली दोषी ठरवून तुरुंगात पाठविले.
    d)  जे. एम. सेनगुप्ता iv)  यांना दोषी ठरवून सहा महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षा दिली.

    पर्यायी उत्तरे :

    (a) (b) (c) (d)
    1) (i) (ii) (iii) (iv)
    2) (ii) (i) (iv) (iii)
    3) (iv) (iii) (ii) (i)
    4) (iii) (iv) (i) (ii)
     
    20) इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
    1) वाय. बी. चव्हाण
    2) मोरारजी देसाई
    3) विठ्ठलभाई पटेल
    4) वल्लभभाई पटेल
     
    21) संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
    1) लखनौ
    2) मुंबई
    3) लाहोर
    4) सुरत
     
    22) मुडीमन समिती का नेमण्यात आली होती ?
    1) इ.स. 1919 च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी 
    2) इ.स. 1909 च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी
    3) द्विदल राज्यपद्धतीच्या चौकशीसाठी
    4) जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी
     
    23) काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?
    1) काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते     
    2) मुस्लीम लीगला प्रतिनिधित्व होते
    3) संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते
    4) ब्रिटिशांनी ”तोडा/फोडा व राज्य करा” नीती वापरली
     
    24) सायमन कमिशनची स्थापना कशाकरता करण्यात आली होती?
    1) माँटेग्यू-चेल्म्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी
    2) मिंटो मोर्ले कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी
    3) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन करण्यासाठी
    4) वरीलपैकी कशासाठीही नाही.
     
    25) सायमन कमिशनने कोणत्या शिफारशी केल्या होत्या?
    1) एकूण लोकसंख्येच्या 10 ते 15 टक्के लोकांना मताधिकार मिळावा.
    2) केंद्रात द्विदल शासनपद्धतीचा स्वीकार करू नये.
    3) प्रांतामधील द्विदल शासनपद्धती रद्द करण्यात यावी.
    4) वरीलपैकी सर्व
     
    26) .......... ही जगातली पहिली धरण विरोधी चळवळ होती.
    1) भीमथडी सत्याग्रह
    2) नर्मदा सत्याग्रह
      3) मुळशी सत्याग्रह
    4) चिरनेर सत्याग्रह
     
    27) पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते?
    1) कृष्णराव भालेकर
    2) दिनकरराव जवळकर
    3) तात्यासाहेब करंदीकर
    4) श्रीपतराव शिंदे
     
    28) काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला?
    1) काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते     
    2) मुस्लीम लीगला प्रतिनिधित्व होते
    3) संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले नव्हते
    4) ब्रिटिशांनी ”तोडा/फोडा व राज्य करा” नीती वापरली
     
    29) इ.स. 1925 च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते?
    1) वाय. बी. चव्हाण
    2) मोरारजी देसाई
    3) विठ्ठलभाई पटेल
    4) वल्लभभाई पटेल
     
    30) संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
    1) लखनौ
    2) मुंबई
    3) लाहोर
    4) सुरत

    8) सविनय कायदेभंग चळवळ
     
    1) मीठ कायद्याबाबतच्या पुढील दोन विधानापैकी कोणते चुकीचे आहे ?
    a) या कायद्याप्रमाणे राज्याला एकाधिकार होता, जरी केवळ मीठ तयार करण्यावर मीठ विकण्यावर नव्हे.
    b) महात्मा गांधी व इतरांना वाटायचे की मिठावर कर लावणे अनैतिक आहे कारण मीठ आपल्या जेवणाचा अविभाज्य घटक आहे. 

    पर्यायी उत्तरे :

    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) न (a) आणि न (b)
    4) दोन्ही (a) व (b)
     
    2) खालील दोन विधानांपैकी कोणती अयोग्य आहेत ?
    a) अंबाबाई जिने उडुपी येथे परदेशी कपड्यांवर व मद्याच्या दुकानांवर हल्ला केला वास्तविक महाराष्ट्रातील होत्या.
    b) महात्मा गांधी प्रथमपासूनच मीठ सत्याग्रहात स्त्रियांच्या सहभागास पूर्णपणे राजी होते. 

    पर्यायी उत्तरे :

    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) न (a) न (b)
    4) (a) व (b) दोन्ही   
     
    3) पुढीलपैकी कोणी ‘दांडी संचलनाची’ तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचलनाशी केली होती?
    1) जवाहरलाल नेहरू
    2) सुभाषचंद्र बोस
    3) इंग्लिश पत्रकार
    4) फ्रेंच पत्रकार
     
    4) ...... यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.
    1) शंकरराव देव
    2) जमनालाल बजाज
    3) के. एफ. नरिमन
    4) किशोरलाल मश्रूवाला
     
    5) सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
    अ) खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग.
    ब) महात्मा गांधीजींनी ’कैसर-इ-हिंद’ पदवी सरकारला परत केली.
    क) धारासणा येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केले.
    ड) स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी.

    पर्यायी उत्तरे :

    1) अ आणि क विधाने बरोबर आहेत.
    2) ब, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
    3) अ, क आणि ड विधाने बरोबर आहेत.
    4) ब आणि ड विधाने बरोबर आहेत.
     
    6) ......... यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र सविनय कायदेभंगाच्या समितीला विले-पार्ले हून सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाला पाठींबा मिळाला.
    1) वा. वि. दास्ताने
    2) शंकरराव देव
    3) किशोरलाल मत्रूवाला
    4) अनंत वासुदेव सहस्त्रबुध्दे
     
    7) स्वातंत्र्यपूर्व काळात कोणता दिवस ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून साजरा करण्यात आला?
    1) 26 जानेवारी, 1949
    2) 26 जानेवारी, 1930  
    3) 26 जानेवारी, 1931
    4) 24 जानेवारी, 1930
     
    8) ..... येथील सविनय कायदेभंग चळवळीच्या काळात “कामगार व शेतकरी हे राष्ट्रीय सभेचे हात व पाय आहेत” अशा घोषणा दिल्या जात असत.
    1) चेन्नई
    2) मुंबई
    3) कोलकाता
    4) दिल्ली
     
    9) खालील विधान पुढीलपैकी कोणत्या चळवळीशी निगडीत असावे ?
    “युवकांचे हे पहिलेच क्रांतिकारी आंदोलन होते. जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस ह्यानंतर नेते म्हणून पुढे आले. कारण त्यांनीच ठीक ठिकाणी फिरून युवकांना जागृत केले होते.”
    1) धरासना आंदोलन
    2) सायमन विरोधी आंदोलन
    3) सविनय कायदेभंग
    4) चले जाव आंदोलन/भारत छोडो
     
    10) पुढील दोनपैकी कोणते विधान अयोग्य आहे?
    a) गांधीजींनी आपल्या मीठाच्या सत्याग्रहासाठी साबरमतीतील आपल्या आश्रमापासून गुजरात समुद्रकिनार्‍यावरील दांडीपर्यंत यात्रा काढली - ते अंतर 240 कि.मी. होते.
    b) गांधीजींच्या अनुयायांनी हे अंतर 24 दिवसात पूर्ण केले.

    पर्यायी उत्तरे :

    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) दोन्ही
    4) एकही नाही
     
    11) सायमन कमिशनमधील सभासद व त्यांना कमीशनवर का नेमले यांची कारणे यांच्या जोड्या जुळवा :
    सभासद :
    a) सर जॉन सायमन
    b) बर्नहॅम
    c) लेन फॉक्स
    d) व्हेरनॉन हार्टस्हॉरन्
    कारणे :
    i) भारतातील मवाळांना मान्य होतील असे वाटत होते.
    ii) ब्रिटीश साम्राज्यभर प्रवास केलेले होते
    iii) लॉर्ड आयर्विनचे मेहुणे
    iv) मजूर पक्षाचे सभासद

    पर्यायी उत्तरे :

    (a) (b) (c) (d)
    1) (iv) (iii) (ii) (i)
    2) (iii) (iv) (i) (ii)
    3) (ii) (i) (iv) (iii)
    4) (i) (ii) (iii) (iv)
     
    12) नेहरू कमिटी अहवालाबाबात पुढील दोन विधानांपैकी कोणते विधान खरे नाही?
    a) त्याने इंग्रजांच्या कॅनडा व ऑस्ट्रेलियातील वसाहतींमध्ये असल्याप्रमाणे स्वराज्य (डशश्रष र्ठीश्रश) ची मागणी केली.
    b) त्याने अशीही इच्छा प्रदर्शित केली की विविध भागांची त्यांच्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीनुसार पुनर्रचना व्हावी.

    पर्यायी उत्तरे :

    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) दोन्ही
    4) एकही नाही
     
    13) गांधी - आयर्विन करारामुळे काय साध्य झाले ?
    1) पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता मिळाली.
    2)  मिठावरील कर रद्द झाला.  
    3) गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
    4) वरीलपैकी काहीही नाही.  
     
    14) अयोग्य जोडी ओळखा -
    1) बापुजी अणे - धारासना सत्याग्रह
    2) डॉ. बापुसाहेब आंबेडकर - महाड सत्याग्रह
        3) सेनापती बापट - मुळशी सत्याग्रह
    4) साने गुरुजी - पंढरपूरचा सत्याग्रह 
     
    15) प्रसिद्ध दांडी यात्रा कुठून सुरू झाली ?
    1) राजकोट
    2) अहमदाबाद (साबरमती)
    3) सुरत
    4) वर्धा  
     
    16) बापूजी अणे यांनी पुसदमध्ये 10 जुलै 1930 रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शविण्यास काय केले?
    1) त्यांनी मीठ तयार केले व सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी झाले.
    2) त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
    3) त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला.
    4) त्यांनी पाश्‍चात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.
     
    17) सविनय कायदेभंगाच्या चळवळीचे उद्दिष्ट कोणते ?
    1) कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणे.
    2) सरकारकडून अधिक मागण्या मान्य करून घेणे.
    3) गोलमेज परिषदेत काँग्रेससाठी स्थान मिळवणे.
    4) वैयक्तिक सत्याग्रह लोकप्रिय करणे. 
     
    18) ’मीठ सत्याग्रहा’चे अंतिम उद्दिष्ट काय होते?
    1) मीठ कायदा खारीज करणे
    2) सर्वसामान्यांना आर्थिक विवंचनेतून सोडविणे
    3) पूर्ण स्वराज्य
    4) वरीलपैकी काहीही नाही
     
    19) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ?
    1) जमीनदार
    2) राष्ट्रीय नेते
    3) गिरणी कामगार
    4) व्यापारी
     
    20) महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह ...... येथे झाला.
    1) संगमनेर, रत्नागिरी, मालवण
    2) वडाळा, मालवण, शिरोडा
    3) शिरोडा, संगमनेर, ठाणे
    4) कल्याण, मालवण, शिरोडा
     
    21) ...... यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन झाली होती.
    1) शंकरराव देव
    2) जमनालाल बजाज
    3) के. एफ. नरिमन
    4) किशोरलाल मश्रूवाला
     
    22) पहिल्या गोलमेज परिषदेविषयी काय खरे आहे?
    a) 12 नोव्हेंबर 1930 रोजी तिचे उद्घाटन झाले.
    b) ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते.
    c) काँग्रेस धरून 57 ब्रिटिश अमलाखालील भारतीय सभासद तिला उपस्थित होते.
    d) परिषदेस एकूण 89 सभासद होते.

    पर्यायी उत्तरे :

    1) (a) आणि (b) फक्त
    2) (a), (b) आणि (d) फक्त
    3) (b), (c) आणि (d) फक्त
    4) (c) आणि (d) फक्त
     
    23) खालीलपैकी कोणत्या करारानुसार 1931 मध्ये ‘मिठाच्या कायद्यात सुधारणा‘ करण्यासंदर्भातील अटी मान्य करण्यात आल्या ? 
    1) पूना करार
    2) गांधी - इर्विन करार
    3) आसाम करार
    4) ताश्कंद करार
     
    24) 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली?
    1) लॉर्ड कॅनिंग
    2) रॅम्से मॅक्डोनॉल्ड
    3) लॉर्ड रिपन
    4) लॉर्ड माऊंटबॅटन

    9) अस्पृश्यता निवारण आणि गांधीजी
     
    1) 1920 मधील ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद’ कुठे संपन्न झाली होती?
    1)  सोलापूर
    2) मुंबई
    3) नागपूर
    4) पुणे
     
    2) 1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री-सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत ...... या सहभागी होत्या.
    1) बेबी कांबळे
    2) ताराबाई शिंदे
    3) शांताबाई दाणी
    4) अवंतिकाबाई गोखले
     
    3) गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ...... म्हणून संबोधावे असे म्हटले होते.
    1)  महार
    2) हरिजन
    3) प्रोटेस्टंट हिंदू
    4) नवबौद्ध
     
    4) खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ?
    1) माँटेग्यू-चेल्म्सफोर्ड कायदा
    2) रॅमसे-मॅक्डोनाल्ड निवाडा
    3) वेव्हेल योजना
    4) 1935 चा सुधारणा कायदा
     
    5) हरिजन साप्ताहिकाबद्दल काय खरे आहे?
    a) त्याच्या पहिल्या अंकासाठी रविंद्रनाथ टागोरांनी ’द क्लिन्सर’ ही कविता दिली होती.
    b) डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला.
    c) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हते त्याच्या मालकी हक्काविषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते.
    d) गांधीजींनी डॉ. आंबेडकरांना सांगितले की साप्ताहिक जसे कुठल्याही हिंदूंचे आहे तितकेच आंबेडकरांचेही आहे.

    पर्यायी उत्तरे :

    1) (a), (b), (c) फक्त
    2) (a), (b), (d) फक्त
    3) ((b), (c), (d) फक्त
    4) (a), (b), (c) आणि (d)
     
    6) गांधीजींनी मद्रासमध्ये सहा सभा घेतल्या होत्या. त्यांत ........ ना उद्देशून बोलताना गांधीनी त्यांना हातात झाडू व बादली घेऊन मद्रासमधील हरिजन वस्त्या स्वच्छ करण्यास सांगितले.
    1) विद्यार्थी
    2) स्त्रिया
    3) पुरुष
    4) हरिजन
     
    7) कोणत्या कायद्यात वा योजनेत ‘अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ‘ तयार करण्याची तरतूद होती ?
    1) माँटेग्यू - चेल्म्सफर्ड कायदा
    2) रॅम्से मॅक्डोनाल्ड निवाडा
    3) वेव्हेल योजना
    4) 1935 चा भारत सुधारणा कायदा
     
    8) इ.स. 1932 साली ‘पुणे करारा’वर कुणी स्वाक्षर्‍या केल्या? 
    1) महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर
    2) महात्मा गांधी व पंडित नेहरू
    3) पंडित नेहरू व डॉ. आंबेडकर
    4) डॉ. आंबेडकर व सरदार पटेल 

    10) 1935 चा कायदा व गांधीजी
     
    1) क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली?
    1) मुस्लीम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता.
    2) भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता.
    3) क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता.
    4) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही.
     
    2) वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता?
    1) दुसर्‍या महायुद्धात सामील होण्याचा
    2) दुसर्‍या महायुद्धात सामील न होण्याचा
    3) परदेशी वस्तूंचा बहिष्कार
    4) उपरोक्त कशाचाही नाही
     
    3) गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला?
    1) कारण शासनाने भारताला ऑगस्ट ऑफर दिली.
    2) कारण शासनाने पूर्ण स्वराज्याची मागणी पूर्ण केली.
    3) कारण युद्ध चालू होते व जपान भारताच्या सीमेवर येऊन ठेवला होता.
    4) वरील कोणतेही कारण योग्य नाही.
     
    4) गांधीजींनी ........... ला “बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक” असे म्हटले जाते. 
    1) क्रिप्स योजना
    2) रौलेट कायदा
    3) कॅबिनेट मिशन योजना
    4) ऑगस्ट देणगी
     
    5) क्रिप्स योजना काँग्रेसने का नाकारली?
    1) मुस्लीम लीगने क्रिप्स मिशनला पाठिंबा दिला होता.
    2) भारतातील कोणताही राजकीय पक्ष क्रिप्स योजनेबाबत समाधानी नव्हता.
    3) क्रिप्स योजनेत पाकिस्तान निर्मितीचा समावेश होता.
    4) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही.

    11) दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन 
     
    1) सन 1942 मध्ये इंग्रज विरोधात सुरु झालेली ‘चले जाव‘ (छोडो भारत) चळवळ अपयशी ठरली कारण ....
    a) इंग्रजांनी कूट नीतीने चळवळीत फूट पाडली.
    b) या चळवळीस मुस्लीम लीगने पाठिंबा दिला नाही. 
    c) सशस्त्र इंग्रजापुढे नि:शस्त्र भारतीयांचा निभाव लागला नाही. 
    d) देशव्यापी चळवळीची आखणी करण्यात नेते कमी पडले. 

    पर्यायी उत्तरे :

    1) (a),(b) आणि (c)
    2) (c) आणि (d)
    3) (b),(c) आणि (d)
    4)  (a),(b),(c) आणि (d)
     
    2) 1942 च्या भारत छोडो आंदोलनात ब्रिटिशांविरुद्ध भूमिगत चळवळ चालविणार्‍या क्रांतिकारी महिला कोण?
    a) अरुणा असफ अली
    b) सुचेता कृपलानी
    c) उषा मेहता
    d) विजयालक्ष्मी पंडित
    1) (a), (c), व  (d)
    2) (a), (b), व (d)
    3)   (a), (b) व (c)
    4) (a), (b), (c) व (d)  
     
    3) भारत छोडो आंदोलनात काँग्रेस रेडिओ चालविण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली?
    1) सरोजिनी नायडू
    2) उषा मेहता
    3) कमला नेहरू
    4) इंदिरा गांधी
     
    4) लीलाताई पाटील, विजयाताई लाड, लक्ष्मीबाई नायकवडी आणि राजूताई पाटील या स्त्रियांच्यात कोणती गोष्ट समान आहे?
    1) त्यांचे विवाह सत्यशोधक पद्धतीने झाले.
    2) त्या आझाद हिंद सेनेच्या सदस्या होत्या.
    3) त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात भाग घेतला.
    4) त्यांनी सातार्‍याच्या प्रतिसरकारमध्ये सहभाग घेतला.
     
    5) चले जाव चळवळीमध्ये जसे सातार्‍यात समांतर प्रति सरकार स्थापन झाले होते, तसेच बंगालमध्ये ....... येथे ‘जातीय सरकार स्थापन झाले होते.
    1)  गुरपाल
    2) तामलुक
    3) तालचेर
    4) जांबुसर
     
    6) शिकागो रेडिओ आणि टेलिफोन कंपनीचे मालक..... यांनी काँग्रेस रेडिओ करिता उपकरणे आणि तंत्रज्ञ पुरविले.
    1)  चंद्रकांत बाबूभाई झवेरी
    2) विठ्ठलदास के. झवेरी
    3) डॉ. राम मनोहर लोहीया
    4) नानक मोटवानी
     
    7) पुढीलपैकी कोणत्या स्त्रियांनी चिमुर येथे बळी पडलेल्यांना भेट दिली (1942) ?
    a) डॉ. (सौ.) वालझकर
    b) विमला अभ्यंकर
    c) रमाबाई तांबे
    d) देवस्कर 

    पर्यायी उत्तरे :

    1) (a) आणि (d) फक्त
    2) (b) आणि (c) फक्त
    3) (b) आणि (d) फक्त
    4) (a),(b),(c) आणि (d) 
     
    8) बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील .......... येथे 17 डिसेंबर 1942 रोजी ‘जातीय सरकार‘ अस्तित्वात आले होते.
    1) बीरभूम
    2) बंकुरा
    3) दीनाजपूर
    4) तामलुक 
     
    9) 1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने ’1942 ची झांशीची राणी’ म्हणून कोणाचा सन्मान केला होता?
    1) सुचेता कृपलानी
    2) मृदूला साराभाई
    3) अरुणा असफ अली
    4) लीलाताई पाटील
     
    10) मराठीत लोकप्रिय प्रेमकथा-कादंबर्‍यांचे लेखक म्हणून ना. सी. फडके प्रसिद्ध होते. त्यांनी चलेजाव चळवळीच्या पार्श्‍वभूमीवर आधारित ...... नावाचे कादंबरी लिहिली होती.
    1) झंझावात
    2) अखेरचे बंड
    3) तुफान
    4) अल्ला हो अकबर
     
    11) भारत छोडो आंदोलनात देशात कोठे ‘प्रति सरकार’ स्थापन करण्यात आले होते?
    1) बालिया (उ.प्र.)
    2) मिदनापूर (बंगाल)
    3) सातारा (महाराष्ट्र)
    4) वरील सर्व पर्याय योग्य
     
    12) 1942 च्या ”चलेजाव आंदोलनाचे” महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणते शहर आंदोलनाचे केंद्र बनले होते?
    1) नागपूर
    2) पुणे
    3) मुंबई
    4) रत्नागिरी
     
    13) विद्यार्थ्यांनी हिंसेचा मार्ग अवलंबला. त्यांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला. जी. आय. पी. व बी. बी. सी. आय. च्या रेल्वे रुळांवर परिणाम झाला. माटुंगा स्टेशनवर हल्ला केला व परळ येथे जन आंदोलन केले. या घटना खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या होत्या?
    1) असहकार आंदोलन
    2) सविनय कायदेभंग
    3) चले जाव आंदोलन
    4) वरील तिन्ही
     
    14) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी  केंद्र कोठे चालवले ?
    1) पुणे
    2) नागपूर
    3) मीरत
    4) मुंबई
     
    15) सन 1942 ची चळवळ अयशस्वी का झाली?
    a) ब्रिटिश सरकारपुढे नि:शस्त्र लोकांचा निभाव लागणे कठीण होते.
    b) चळवळीपूर्वीच सरकारने गांधींना अटक केली.
    c) सरकारी नोकरीत असलेल्यांनी चळवळीत भाग घेतला नाही.
    d) मुस्लीम लीगने चळवळीस पाठिंबा दिला नाही.
    1) (a), (b) व (c)
    2) (b), (c) व (d)
    3) (b) व (c)
    4) (a), (b), (c) व (d)
     
    16) भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल’‘ असे कोणी म्हटले ?
    1) पंडित नेहरू
    2) मानवेंद्रनाथ रॉय
    3) महात्मा गांधी
    4) डॉ. आंबेडकर
     
    17) खालील दोन विधानांचा विचार करा.
    a) सेवाग्राम आश्रमाचे प्रोफेसर भनसाली दि. 1 नोव्हेंबर 1942 रोजी दिल्लीला गेले व बापूजी अणेंना भेटले. 
    b) त्यांना चिमूर येथे अत्याचार झालेल्या स्त्रियांकरता न्याय हवा होता. 
     आता सांगा की - 
    1) दोन्ही विधाने खरी आहेत व (b) हे (a) चे कारण आहे. 
    2) दोन्ही विधाने खरी आहेत परंतु (b) हे (a) चे कारण नाही. 
    3) विधान (a) बरोबर आहे परंतु (b) नाही.
    4) दोन्हीतील कोणतेच विधान बरोबर नाही  
     
    18) 1942 च्या भूमिगत क्रांतिकारकांचे नेतृत्व केल्याबद्दल दैनिक ट्रिब्यूनने ’1942 ची झांशीची राणी’ म्हणून कोणाचा सन्मान केला होता?
    1) सुचेता कृपलानी
    2) मृदूला साराभाई
    3) अरुणा असफ अली
    4) लीलाताई पाटील

    12) स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी 
     
    1) विधान - a) म. अ. जिन्हा यांनी काँग्रेस सोडली.
    कारण - b) त्यांना काँग्रेसमधील गांधीजीसारखे गबाळ्या कपड्यांतील हिंदुस्तानी बोलणारे सदस्य आवडले नव्हते.

    पर्यायी उत्तरे :

    1) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत व (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
    2) (a) बरोबर आहे, परंतु (b) चूक आहे.
    3) (a) चुकीचे आहे (b) चुकीचे आहे.
    4) (a) बरोबर आहे, (b) बरोबर आहे परंतु ते (a) चे बरोबर स्पष्टीकरण नाही.
     
    2) ‘कॅबिनेट मिशन‘ने कोणती योजना फेटाळली ? 
    1) भारताची फाळणी
    2) पाकिस्तानची निर्मिती
    3) दोन्ही बरोबर
    4) दोन्ही चूक
     
    3) 15 ऑगस्ट 1947, या दिवशी भारत स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी कोठे होते ?
    1) समांतर कार्यक्रमासाठी ते जवाहरलाल नेहरू बरोबर दिल्लीत लाल किल्ल्यावर होते.
    2) ते खान अब्दुल गफार खान ह्यांच्या बरोबर सरहद्दीवर होते.
    3) ते पंजाब प्रांतात हिंदू-मुस्लीम दंगे रोखण्याचे प्रयत्न करत होते.
    4) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही

    13) गांधीवाद
     
    1) भारताला बलवान बनविण्याचा कार्यक्रम समजावून सांगताना गांधी हाताची पाच बोटे दाखवीत असत. त्यांच्या मते प्रत्येक बोट कोणते गोष्ट दर्शवीत असे?
    1) सूतकताई, अस्पृश्यता निवारण, मितपान (दारू किंवा अफू यांचे सेवन न करणे), हिंदू-मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता.
    2) स्वच्छता, अस्पृश्यता निवारण, मितपान, हिंदू-मुस्लीम स्नेहभाव आणि स्त्रियांकरिता समानता.
    3) सूतकताई, सर्वांकरिता शिक्षण, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि हिंदू-मुस्लीम स्नेहभाव.
    4) मूलभूत शिक्षण, शेती, अस्पृश्यता निवारण, मितपान आणि स्त्रियांकरिता समानता.
     
    2) पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?
    a) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल्-अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.
    b) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी अल्-हिलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते.

    पर्यायी उत्तरे :

    1) महमद इक्बाल
    2) बॅरिस्टर जिन्ना
    3) अबुल कलाम आझाद
    4) शौकत अली

    14) गांधीजींचे अनुयायी
     
    1) पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?
    अ) ती गांधीजींची कट्टर अनुयायी होती.
    ब) ती ब्रिटिश आरमार प्रमुखाची मुलगी होती.
    क) ती मीरा बेन या लोकप्रिय नावाने ओळखली जात असे.
    1) सिस्टर निवेदिता
    2) मिस कार्पेंटर
    3) मिस स्लाद
    4) मिस नाइटिंगेल
     
    2) पूर्व गोदावरी जिल्हा, मद्रास येथे गांधीजींना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी स्त्रियांचा एक गट आला होता. त्यापैकी ........... या महिलेने ‘स्वतंत्रता संग्रामात‘ उडीच घेतली.
    1) श्रीमती दुर्गाबाई देशमुख
    2) श्रीमती दुव्वूरी सुब्बामम्
    3) श्रीमती अंबूजाम्माल 
    4) श्रीमती मुथूलक्ष्मी रेड्डी
     
    3) खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हटले जाई, बाबत काय खरे नाही ?
    a) ते नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सचे पशूतून लीडर होते.
    b) ते खुदाई खिदमतगार चे संस्थापक होते.
    c) त्यांनी भारताच्या फाळणीबाबत काँग्रेसला दोष दिला.
    पर्यायी उत्तरे :
    1) (a)
    2) (b)
    3) (c)
    4) वरील एकही नाही 
     
    4) काँग्रेस सोशलिस्ट, .......... हे मुंबईतील भूमिगत काँग्रेस संघटनेचे प्रमुख होते.
    1) पुरुषोत्तम कानजी
    2) सुरजी वल्लभदास
    3) रतनसी चापसी
    4) पुरुषोत्तम त्रिकमदास
     
    5) 1931 च्या कराची येथील काँग्रेसच्या सभेत :
    a) मूलभूत हक्कांबाबतचा महत्त्वाचा ठराव मंजूर केला गेला.
    b) काही उद्योगांचे राष्ट्रीयकरण करावे यास पसंती दिली गेली. 
    वरील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) न (a) न (b)
    4) दोन्ही (a) व (b)  
     
    6) जोड्या जुळवा :
    अ) दीनबंधू मित्र   I)    बार्डोली सत्याग्रह
    ब) बाबा रामचंद्र   II)   मुळशी सत्याग्रह
    क) सरदार वल्लभभाई पटेल   III)  अयोध्येच्या शेतकर्‍यांचा लढा
    ड) सेनापती बापट  IV) ’ नीलदर्पण’ नाटक

    पर्यायी उत्तरे :

    1) III IV II I
    2) II I IV III
    3) IV III I II
    4) III I IV II
     
    7) ’बार्डोली किसान चळवळी’चे नेतृत्व कोणी केले?
    1) महात्मा गांधी
    2) वल्लभभाई पटेल
    3) पंडित नेहरू
    4) महंमद अली जीना
     
    8) वल्लभभाई पटेल यांना ‘सरदार’ ही पदवी बहाल करण्यात आली. तो सत्याग्रह म्हणजे
    1) खेडा सत्याग्रह
    2) बार्डोली सत्याग्रह
    3) नागपूर झेंडा सत्याग्रह
    4) हैद्राबाद मुक्ती लढा
     
    9) साने गुरूजींनी प्रामुख्याने .... या भागातील शेतकरी वर्ग संघटित करण्याचा प्रयत्न केला. 
    1) कोकण
    2) मराठवाडा
    3) खानदेश
    4) विदर्भ
     
    10) .... हे ‘देशबंधू’ म्हणून ओळखले जातात.
    1) एम. ए. जिना
    2) अण्णादुराई
    3) सी. आर. दास
    4) जे. एम. नेहरू
     
    11) जोड्या जुळवा.    
                        ब
    a) महात्मा गांधी i)   दांडी यात्रा
    b) जवाहरलाल नेहरू ii)  लाल डगला आंदोलन
    c) खान अब्दुल गफारखान iii)  संस्थानांचे विलिनीकरण
    d) सरदार पटेल iv)  पूर्ण स्वराज्य
       (a)   (b)   (c)   (d)
    1) (ii)   (iii)   (iv)   (i)
    2) (i)    (ii)   (iii)  (iv)
    3) (iv)   (iii)   (ii)   (i)
    4) (i)    (iv)   (ii)   (iii)
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (89)
     
    1) बालपण व पोरबंदरमधील वास्तव्य
     
    1-3
     
    2-2
     
    3-4
     
    4-3
     
    5-4
     
    2) इंग्लंड -बॅरिस्टर
     
    1-4
     
    2-3
     
    3-4
     
    4-3
     
    3) दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य व सत्माग्रह
     
    1-3
     
    2-1
     
    3-2
     
    4-2
     
    5-4
     
    6-4
     
    7-2
     
    8-3
     
    4) भारतातील सार्वजनिक जीवन
     
    1-3
     
    2-1
     
    3-3
     
    5) पहिल्या महायुुद्धातील गांधीजींची भूमिका 
     
    1-3
     
    2-3
     
    6) 1920 पर्यंतचे सत्याग्रह
     
    1-1
     
    2-3
     
    3-2
     
    4-3
     
    5-1
     
    6-4
     
    7-3
     
    8-2
     
    9-1
     
    10-3
     
    11-2
     
    12-4
     
    13-4
     
    14-3
     
    15-1
     
    16-1
     
    17-4
     
    18-2
     
    19-1
     
    20-2
     
    21-4
     
    22-3
     
    23-2
     
    24-2
     
    7) असहकार चळवळ
     
    1-4
     
    2-4
     
    3-1
     
    4-4
     
    5-4
     
    6-3
     
    7-4
     
    8-4
     
    9-1
     
    10-3
     
    11-2
     
    12-2
     
    13-3
     
    14-3
     
    15-2
     
    16-1
     
    17-2
     
    18-1
     
    19-3
     
    20-3
     
    21-3
     
    22-1
     
    23-1
     
    24-1
     
    25-4
     
    26-3
     
    27-3
     
    28-1
     
    29-3
     
    30-3
     
    8) सविनय कायदेभंग चळवळ
     
    1-1
     
    2-4
     
    3-2
     
    4-1
     
    5-3
     
    6-2
     
    7-2
     
    8-2
     
    9-2
     
    10-1
     
    11-4
     
    12-2
     
    13-4
     
    14-1
     
    15-2
     
    16-3
     
    17-1
     
    18-3
     
    19-3
     
    20-2
     
    21-1
     
    22-2
     
    23-2
     
    24-2
     
    9) अस्पृश्यता निवारण आणि गांधीजी
     
    1-3
     
    2-3
     
    3-3
     
    4-2
     
    5-4
     
    6-1
     
    7-2
     
    8-1
     
    10) 1935 चा कायदा व गांधीजी
     
    1-2
     
    2-2
     
    3-3
     
    4-1
     
    5-2
     
    11) दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन 
     
    1-3
     
    2-3
     
    3-2
     
    4-4
     
    5-2
     
    6-4
     
    7-4
     
    8-4
     
    9-3
     
    10-1
     
    11-4
     
    12-3
     
    13-3
     
    14-4
     
    15-4
     
    16-3
     
    17-1
     
    18-3
     
    12) स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी 
     
    1-1
     
    2-3
     
    3-4
     
    13) गांधीवाद
     
    1-1
     
    2-3
     
    14) गांधीजींचे अनुयायी
     
    1-3
     
    2-2
     
    3-4
     
    4-4
     
    5-3
     
    6-3
     
    7-2
     
    8-2
     
    9-3
     
    10-3
     
    11-4
     

Share this story

Total Shares : 10 Total Views : 8512