कृषी व ग्रामीण विकास

  • कृषी व ग्रामीण विकास

    कृषी व ग्रामीण विकास

    • 23 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 56 Views
    • 0 Shares

    कृषी व ग्रामीण विकास 

    टूलकिट 

            16 फेब्रुवारी 2021  - बंगळुरूतील 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात अटक केली. तिने शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट संपादित करून बदल केले आणि पुढे पाठवली. जी नंतर ग्रेटा थनबर्गनेही ट्विट केली होती, असा आरोप तिच्यावर आहे. 

    •   कृषी कायदे रद्द करा, अशी मागणी करत दिल्लीत शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलनाला 2 महिने उलटले, तरी सरकारकडून ठोस आश्वासन मिळत नसल्यानं शेतकर्‍यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली. त्यात हिंसाचार उफाळला आणि सरकारनं आंदोलन स्थळी अधिक निर्बंध घातले. 
    •   यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले. यात पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकर्‍यांना समर्थन दिलं. त्याचबरोबर शेतकरी आंदोलनासंदर्भात एक टूलकिटही ट्विट केली होती. जी नंतर डिलीट करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची चर्चा झाली. दिशाच्या अटकेनंतर हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला.

    टूलकिट म्हणजे नेमकं काय, त्यात काय असतं?
    •   जगाच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं आंदोलन होत असतात. मग ते अमेरिकेतील ब्लॅक लीव्हज मॅटर असो वा लॉकडाउन विरोधी आंदोलन पर्यावरणाशी निगडित ” क्लायमेट स्ट्राईक कँपेन ” असो किवा दुसरं कुठलं आंदोलन, अशा स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम (अ‍ॅक्शन पॉईंटस) तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणं वा तीव्र करणं करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं जातं. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम  नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं.

       ‘टूलकिट’चा वापर कशासाठी आणि कसा केला जातो?
    •   आंदोलनाची पोस्टर वा पत्रक अनेकदा बघायला मिळतात. ज्यात लोकांना आवाहन केलं जातं. त्याचे सोशल मीडियातील स्वरूप म्हणजे टूलकिट असते. ज्या लोकांच्या सहभागामुळे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढू शकते वा त्यांची मदत आंदोलनासाठी होऊ शकेल अशा लोकांना टूलकिट शेअर केली जाते. टूलकिट आंदोलनाच्या रणनीतीचा एक भाग असते.
    •   आंदोलकांमध्ये समन्वय साधण्याचं काम टूलकिटच्या माध्यमातून केलं जातं. 
    •   आंदोलनासंदर्भात काय लिहिलं जाऊ शकतं. कोणते हॅशटॅग वापरायला हवे. कोणत्या वेळेत ट्विट केल्यास फायदा होऊ शकतो आणि कुणाचा उल्लेख ट्विटमध्ये वा फेसबुक पोस्टमध्ये केल्यास प्रभावी ठरेल, अशी माहिती असते.

    टूलकिटचा परिणाम काय होतो?
    •   सोशल मीडियावर अनेकवेळा आपल्याला वेगवेगळे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये असल्याचं बघायला मिळतं. एकाचवेळी अनेकांनी ट्विट करून तो हॅशटॅग वापरल्यानं हा परिणाम दिसून येतो. टूलकिटच्या माध्यमातून लोकांना समर्थन देण्याचं आवाहन करण्याबरोबरच त्या आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग वापरून ट्विट करण्याचं आवाहन केलं जातं. 
    •   आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावरील लोकांचं याकडे लक्ष वेधलं जातं. महत्त्वाचं म्हणजे टूलकिट फक्त आंदोलनासाठीच वापरली जाते असं नाही. तर राजकीय पक्षांकडून मोठ्या कंपन्यांकडूनही त्याचा वापर केला जातो. विविध कार्यक्रमा प्रसंगी, अभियानावेळी वा एखाद्या घटनेनंतर टूलकिटचा वापर केला जातो.
     
    सौजन्य : दैनिक लोकसत्ता
     
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 56