-
ईपीएफ मध्ये जमा रकमेवर कर
- 23 Feb 2021
- Posted By : study circle
- 32 Views
- 0 Shares
ईपीएफ मध्ये जमा रकमेवर कर
2021 -22 च्या केंद्रीय अंदाजपत्रकात वार्षिक 2.50 लाखांहून जास्त रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये (ईपीएफ) जमा झाली असेल त्या रक्कमेवरील व्याजावर 1 एप्रिल 2021 पासून कर लावला जाणार आहे.
• काही कर्मचार्यांच्या ईपीएफ खात्यात मोठ़या रकमा जमा होतात. त्यामुळे त्यांना जमा रक्कम, त्यावरचे व्याज आणि रक्कम काढणे या सगळ्याच पातळीवर व्याजात सवलत मिळून फायदा होतो. हे थांबवण्यासाठी सरकारने ईपीएफ खात्यामध्ये सालाना 2.50 लाखांची मर्यादा घालण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
• ईपीएफ हा प्रामुख्याने कामगार वर्गासाठी आहे. आणि या तरतुदीमुळे या वर्गाला कोणताही फटका बसणार नाही. या निधीतील रकमेला व्याजसवलत मिळते, शिवाय त्यावर 8 टक्के परतावाही मिळतो. काही जण त्यात अगदी महिन्याला 1 कोटी रुपये ही जमा करताना दिसतात.
• ईपीएफमध्ये तसेच ग्रॅच्युइटीमध्ये सालाना वेतनाच्या टक्केवारीबरोबर स्वयंस्फूर्तीने देखील रक्कम जमा करता येते. पण त्याची रक्कम 2.50 लाखांच्या वर गेली तर संबंधित व्यक्तीला त्यावर कर द्यावा लागेल. त्या करामध्ये फक्त कर्मचार्याच्या बाजूने जमा होत असलेल्या वाट़याचा अंतर्भाव केला जाईल. मालकाच्या बाजूने जमा केली जाणारी रक्कम गृहीत धरली जाणार नाही.
• 30 टक्क्यांहून जास्त कर चौकटीत असलेल्या करदात्याच्या ईपीएफ खात्यातील अडीच लाखांहून जास्त ईपीएफ योगदानावर कर लावला जाईल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे या निधीतील सालाना योगदान 3 लाख रुपयांचे असेल तर त्याच्या वरील 50 हजार रुपयांवर त्याला 50 हजारांवर 8.5 टक्क्यांनी साधारणपणे 4,250 रुपये कर द्यावा लागेल. (या निधीत त्याव्यतिरिक्त स्वत:ची भर म्हणून स्वयंस्फूर्तीने घातलेल्या रकमेवरही कर बसेल) सालाना 12 लाख रुपये ईपीएफ मध्ये जमा करणार्या व्यक्तीची 9.5 लाख रुपये एवढी रक्कम कराच्या चौकटीत येईल आणि तिला त्यावर 8.5 टक्क्यांप्रमाणे 25,200 रुपये कर द्यावा लागेल.
• एखाद्या व्यक्तीने 2022 या आर्थिक वर्षांमध्ये ईपीएफ मध्ये 10 लाख रुपये भरले तर तिला 7.5 लाख रुपये या रकमेवर 8.5 टक्के दराने व्याज द्यावे लागेल. पण मुख्य म्हणजे ते त्या आर्थिक वर्षांपुरते न राहता जेवढा काळ ती रक्कम त्या खात्यात आहे तेवढा सगळा काळ ते व्याज द्यावे लागेल.
• ईपीएफ मध्ये दरमहा 20, 833 रुपयांहून जास्त गुंतवणूक करणार्या व्यक्तींवर या तरतुदीचा परिणाम होऊ शकतो. कारण तिची या निधीतील सालाना गुंतवणूक 2.50 लाखांचा आकडा पार करू शकते.
• दरमहा 1.74 लाख रुपयांहून जास्त बेसिक वेतन असणार्या व्यक्तीची ईपीएफ मधील वार्षिक जमा अडीच लाखांहून जास्त होऊ शकते.
• ईपीएफ मधील 4.50 कोटींपेक्षा अधिक खात्यांपैकी 1.23 लाख खाती उच्च उत्पन्न गटातील (हाय नेट वर्थ इंडिव्युज्युअल्स) व्यक्तींची आहेत. या व्यक्ती ईपीएफ मध्ये दरमहा प्रचंड मोठ़या रकमा जमा करतात. 2018-19 या आर्थिक वर्षांत या उच्च उत्पन्न गटातील व्यक्तींच्या खात्यात 62,500 कोटी रुपये जमा झाले.
सौजन्य : दैनिक लोकसत्ता