खनिज तेलाचे वाढते दर

  • खनिज तेलाचे वाढते दर

    खनिज तेलाचे वाढते दर

    • 23 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 46 Views
    • 0 Shares

    खनिज तेलाचे वाढते दर 

     

     

           फेब्रुवारी 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सातत्याने कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. जगभरात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाले असून, बहुतांश देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तेलाची मागणी वाढू लागली आहे. 10 फेब्रुवारी 2021 रोजी वर्षभरानंतर पहिल्यांदाच प्रति तेल पिंपाचा दर 60 डॉलरच्या पुढे गेला. 
    •• 2020 मध्ये करोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशात कठोर लॉकडाउन सुरु होता. त्यामुळे तेलाचे दर पडले होते. भाववाढीसाठी तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात घटही केली होती. ऑक्टोंबर 2020 महिन्यापासून कच्चा तेलाच्या दरांमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त वाढ झाली आहे.

    कच्चा तेलाच्या किंमती का वाढल्या?
    ••• करोना साथीमुळे मागणी घटल्याने मागच्यावर्षी महत्त्वाच्या तेल उत्पादक देशांनी तेल उत्पादनात घट केली. तेलाचे दर वाढल्यानंतरही तेल उत्पादक देशांनी उत्पादनात वाढ केलेली नाही. कच्चा तेलाचे भाव बळकट करण्यासाठी सौदी अरेबियाने तेल उत्पादनात प्रतिदिन 10 लाख बॅरलची घट केली आहे.
    ••• करोना प्रतिबंधक लसीकरण सुरु झाल्यामुळे मागणी वाढणार हा तेल उत्पादक देशांना ठाम विश्वास आहे.

    भारतावर काय परिणाम होणार ?
    ••• कच्चा तेलाचे दर वाढत राहिले, तर भारताचं आयतीचं बिलही वाढणार. भारताला एकूण तेलाची जितकी आवशयकता आहे, त्याच्या 80 टक्के तेल आपण आयात करतो.
    ••• भाववाढ अशीच सुरु राहिली तर त्या दबावामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती अशाच वाढत राहणार. केंद्रीय आणि राज्य स्तरावरील करांमुळे देशात सध्या इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आज मुंबईत प्रतिलिटर पेट्रोलचा दर 93.83 तर प्रतिलिटर डिझेलचा दर 84.36 आहे.
    ••• 2020 साली आर्थिक व्यवहार मंदावलेले असताना, महसूल वाढवण्यासाठी सरकारने पट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 13 आणि 11 रुपयांची केंद्रीय करवाढ केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलांचे दर कमी असूनही ग्राहकांना त्याचा फायदा मिळू शकला नाही.
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 46