महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येत वृद्धी
- 23 Feb 2021
- Posted By : study circle
- 23 Views
- 0 Shares
महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येत वृद्धी
फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढली. त्यामुळे लोकांच्या एकत्र जमण्यावर आणि हालचालींवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले.
• या काळात महाराष्ट्रात दर दिवशी 3 हजारपेक्षा जास्त नव्या करोना रुग्णांची नोंद झाली.
• फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयापेक्षा दुसर्या आठवडयात 14 टक्के जास्त रुग्णवाढ दिसून आली. 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान 20,207 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. तेच 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान करोना रुग्णांची संख्या 17,672 होती. 25 ते 31 जानेवारी दरम्यान 17,293 करोना रुग्णांची नोंद झाली.
• मुंबई, पुण्याच्या आसपासचा भाग आणि विदर्भामध्ये मोठी रुग्णवाढ दिसून आली. फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि अमरावती भागातून 60 टक्के नव्या करोना रुग्णांची नोंद झाली.
• जानेवारी महिन्यात सरासरी 2 ते 2.50 हजार इतकी करोना रुग्णांची नोंद सुरु होती.
महाराष्ट्रातील रुग्ण वाढण्याचे कारण -
• मुंबईत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु झाल्यामुळे करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची चर्चा आहे.
• ग्राम पंचायत निवडणुकांमुळे ग्रामीण भागात रुग्णवाढ झालेली असू शकते. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात ग्राम पंचायत निवडणुकीत 80 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे करोनाचा फैलाव झालेला असू शकतो. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात पॉझिटिव्ह करोना रुग्णांचे प्रमाण 32.7 टक्के आहे. या भागात निवडणूक प्रचार आणि मतदानासाठी बर्यापैकी गर्दी झाली होती.
• 2020 मध्ये करोनामुळे लग्नसोहळे आणि अन्य कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले होते. पण पुन्हा हे सोहळे सुरु झाल्यामुळे सुद्धा करोनाचा फैलाव होऊ शकतो. लग्न समारंभाला 400-500 लोकांची उपस्थिती असते.
• करोना चाचण्यांची संख्या आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न थोडे कमी झाले होते. सिंधुदुर्ग, वर्धा, पालघर, उस्मानाबाद, नंदूरबार आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये करोना चाचण्यांचे प्रमाण कमी होते.
• रुग्णवाढीची प्रमुख कारणे...
कोरोनाबद्दलची भीती नागरिकांमध्ये पूर्वीसारखी दिसतच नाही
मास्कचा वापर होत नाही तथा कमी होऊ लागला, अनलॉकनंतर वाढली गर्दी
प्रशासनाने घालून दिलेल्या संख्येचे कोणतेही निर्बंध पाळले नाहीत
विवाह, आंदोलने, सभा, सार्वजनिक कार्यक्रमांना शेकडोंची राहिली उपस्थिती
सार्वजनिक व खासगी प्रवासाच्या ठिकाणी ना वैद्यकीय तपासणी ना कोणत्याही शासकीय यंत्रणांचे लक्ष