६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९
- 07 Apr 2021
- Posted By : study circle
- 529 Views
- 0 Shares
६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९
२२ मार्च २०२१- दिल्लीमध्ये २०१९ साठीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा निवड समितीचे अरूण चढ्ढा यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वाभूमीवर कोरोना संसर्गामुळे २०१९ च्या पुरस्कारांची घोषणा २०२० मध्ये झालेली नव्हती. २०१९ च्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये मराठी चित्रपट आणि कलाकारांची कामगिरी विशेष महत्त्वाची ठरली आहे.
• राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमागील प्रमुख हेतू -
१) भारतीय चित्रपटांचा सौंदर्यशास्त्रीय आणि तंत्रद़ृष्ट्या विकास तसेच शैक्षणिक आणि सांस्कृतिक मूल्यवृद्धी करणे.
२) भारतीय चित्रपटकर्त्यांना सकस चित्रपटनिर्मितीसाठी प्रोत्साहित करणे.
३) भारतीय प्रेक्षकांना अन्य प्रादेशिकपटांची ओळख होऊन आंतरभारती संकल्पना रुजविने.
• घटनाक्रम -
१) १९५४ सालापासून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे आधीच्या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना देण्यात येतात. सुरुवातीला स्टेट अॅीवॉर्डस् फॉर फिल्म्स असे ओळखल्या जाणार्या पुरस्कारांचे नामकरण नंतर नॅशनल फिल्म अॅेवॉर्डस असे झाले.
२) सुवर्ण कमळ आणि रजत कमळ असे दोन पुरस्कार सर्वांगसुंदर चित्रपटाना दिल्यानंतर, बाकीचे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चित्रपटाच्या इतर कलात्मक आणि तांत्रिक अंगांसाठी दिले जातात.
३) भारतीय सिनेमाकरिता आजीवन योगदान दिलेल्या व्यक्तीस दादासाहेब फाळके पुरस्कार हा जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.
४) १९७५ पासून निखळ मनोरंजन करणार्यात लोकप्रिय चित्रपटांचा वेगळा विभाग करून त्यांना पुरस्कार मिळू लागले. कारण, संमिश्र प्रेक्षकस्तर लक्षात घेऊन चित्रपट निर्माण करताना काही तडजोडी करूनही आपल्याला जे सांगायचे आहे ते प्रभावीपणे पोहोचविणार्या चित्रपटकर्त्यांची दखल घेणेही महत्त्वाचे होते.
५) २०१५ मध्ये बाहुबलीस निखळ मनोरंजन करणार्या लोकप्रिय चित्रपटाच्या गटातच नव्हे, तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्णकमळ पुरस्कार मिळाला.
६७ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ प्राप्त चित्रपट व कलाकार
• सुवर्ण कमळ -
(पुरस्कार विजेत्याला सुवर्णकमळ, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम दिली जाते)
१) सर्वोत्कृष्ट चित्रपट : मरक्कर अरबीक्काडालिंटे सिंहम (मल्याळी चित्रपट, दिग्दर्शक - प्रियदर्शन, निर्माते - अँटोनी पेरांबवूर) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी २.५० लाख रुपये.
२) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय पुरनसिंह चौहान (हिंदी चित्रपट बहात्तर हुरेन) - पुरस्कार दिग्दर्शकाला दिला जातो - २.५० लाख रुपये.
३) दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट (इंदिरा गांधी पुरस्कार) : हेलन (मल्याळी चित्रपट, दिग्दर्शक - मथुकुट्टी झेविअर, निर्माते- विनीत श्रीनिवासन) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी १.२५ लाख रुपये.
४) सर्वोत्कृष्ट लोकप्रिय/सर्वांगीण मनोरंजक चित्रपट : महर्षि (तेलुगु चित्रपट, दिग्दर्शक - वांशी पिडीपल्ली, निर्माते - व्यंकटेश क्रियशन्स व इतर) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी २.०० लाख रुपये.
५) सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : कस्तूरी (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - विनोद कांबळे, निर्माते - इनसाइट फिल्म्स) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी २.५० लाख रुपये.
• नॉनफिचर फिल्म सुवर्ण कमळ -
नॉनफिचर गटात लघुपटांचा आणि माहितीपटांचा समावेश होतो.
१) सर्वोत्कृष्ट नॉनफीचर फिल्म : अॅहन इंजीनिअर्ड ड्रीम (हेमंत गाबा) - १.५० लाख रुपये.
२) सर्वोत्कृष्ट नॉनफीचर फिल्म दिग्दर्शक : सुधांशु सरिया (नॉक, नॉक, नॉक - बंगाली/इंग्लीश चित्रपट) - १.५० लाख रुपये.
• चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकासाठीचे सुवर्णकमळ -
१) बेस्ट बुक ऑन सिनेमा : ए गांधारी अफेयर (मल्याळी भाषेतील, लेखक - संजय सुरी, प्रकाशक - हार्पिन कॉलीन्स) - प्रत्येकी ७५ हजार रुपये.
२) बेस्ट फिल्म क्रिटिक : सोहोनी चट्टोपाध्याय (इंग्लीश भाषेतील पुस्तक) - ७५ हजार रुपये.
• रजत कमळ -
पुरस्कार विजेत्याला रजतकमळ, प्रशस्तिपत्र व रोख रक्क्म दिली जाते.
१) सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मकता चित्रपट (नर्गिस दत्त पुरस्कार) : ताजमाल (मराठी चित्रपट, दिग्दर्शक - नियाझ मुजावर, निर्माते - ट्यूलीन स्टुडिओ) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी १.५० लाख रुपये.
२) सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : आनंदी गोपाळ (मराठी चित्रपट, दिग्दर्शक - समीर विद्वांस, निर्माते -एस्सेल व्हिजन व इतर) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी १.५० लाख रुपये.
३) सर्वोत्कृष्ट चित्रपट पर्यावरणावरील : वॉटर बरिअल (अरुणाचलच्या मोनपा भाषेतील चित्रपट, दिग्दर्शक - शांतनू सेन, निर्माते - फारुख इफ्तिकार लस्कर) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी १.५० लाख रुपये.
४) सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले - हिंदी चित्रपट) आणि धनुष (असुरन - तामीळ चित्रपट) या दोघांना विभागून - प्रत्येकी ५० हजार रुपये.
५) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (मनकर्णिका व पंगा या हिंदी चित्रपटांतील मुख्य भूमिकांसाठी) - ५० हजार रुपये.
६) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : विजय सेतूपती (सुपर डिलक्स - तामीळ चित्रपट) - ५० हजार रुपये.
७) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : पल्लवी जोशी (द ताश्कंद फाइल्स या हिंदी चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी) - ५० हजार रुपये.
८) सर्वोत्कृष्ट बालकलाकार : नागा विशाल (केडी, तामिळ चित्रपट) - ५० हजार रुपये.
९) सर्वोत्कृष्ट पार्श्वागायक : बी. प्राक (केसरी या हिंदी चित्रपटातील तेरी मिट्टी या गीतासाठी) - ५० हजार रुपये.
१०) सर्वोत्कृष्ट पार्श्व५गायिका : सावनी रवींद्र (बार्डो या मराठी चित्रपटातील रान पेटलं या गाण्यासाठी) - ५० हजार रुपये.
११) सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : गिरीशा गंगाधरन (जल्लीकट्टू - मल्याळी चित्रपट) - ५० हजार रुपये.
१२) सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ) : कौस्तुभ गांगुली (ज्येष्ठोपुत्रो - बंगाली चित्रपट) - ५० हजार रुपये.
१३) सर्वोत्कृष्ट पटकथा (रुपांतरित) : श्रीजीत मुखर्जी (गुमनामी - बंगाली चित्रपट) - ५० हजार रुपये.
१४) सर्वोत्कृष्ट पटकथा (डायलॉग्ज) : विवेक रंजन अग्निहोत्री (ताशकंद फाइल्स - हिंदी चित्रपट) - ५० हजार रुपये.
१५) सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (साऊंड डिझायनर) : मंदार कमलापूरकर (त्रिज्या - मराठी चित्रपट) - ५० हजार रुपये.
१६) सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट) ः देबाजित गयान (इवदुह -खासी चित्रपट) - ५० हजार रुपये.
१७) सर्वोत्कृष्ट ऑडियोग्राफी (अंतिम मिश्रित ट्रॅकचे रेकॉर्डिस्ट) : रसूल पोक्कुट्टी (ओथ्था सेरुप्पू साइझ ७ - तामिळ चित्रपट) - ५० हजार रुपये.
१८) सर्वोत्कृष्ट संकलन /एडिटिंग : नवीन नूली (जर्सी - तेलगू चित्रपट) - ५० हजार रुपये.
१९) सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : सुनील नागवेकर आणि नीलेश वाघ (आनंदी गोपाळ - मराठी चित्रपट) - ५० हजार रुपये.
२०) सर्वोत्कृष्ट वेषभूषा : सुजित सुधाकरन आणि व्ही. साई (मरक्कर अरबीक्काडालिंटे सिंहम - मल्याळी चित्रपट) - ५० हजार रुपये.
२१) सर्वोत्कृष्ट रंगभूषा : रणजित (हेलन - मल्याळी चित्रपट) - ५० हजार रुपये.
२२) सर्वोत्कृष्ट संगीतकार : डी. इम्मन (विश्विसम - तामीळ चित्रपट) - ५० हजार रुपये.
२३) सर्वोत्कृष्ट गीतकार ः प्रभा वर्मा (कोलांबी - मल्याळी चित्रपट) - ५० हजार रुपये.
२४) सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत : प्रबुद्ध बॅनर्जी (ज्येष्ठोपुत्रो - बंगाली चित्रपट) - ५० हजार रुपये.
२५) सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स : सिद्धार्थ प्रियदर्शन (मरक्कर अरबीक्काडालिंटे सिंहम - मल्याळी चित्रपट) - ५० हजार रुपये.
२६) सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन / कोरिओग्राफी : राजू सुंदरम (महर्षि - तेलुगु चित्रपट) - ५० हजार रुपये.
२७) सर्वोत्कृष्ट अॅतक्शन दिग्दर्शन : विक्रम मोरे (अवन्नी श्रीमनारायण - कन्नड चित्रपट) - ५० हजार रुपये.
२८) स्पेशल ज्युरी अवॉर्ड : आर. पार्तिबन (ओथ्था सेरुप्पू साइझ ७ - तमिळ चित्रपट) - २ लाख रुपये.
• विशेष उल्लेख -
१) लता भगवान करे (अभिनेत्री लत करे - मराठी चित्रपट) - फक्त प्रशस्तीपत्र
२) पिकासो (दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग - मराठी चित्रपट) - फक्त प्रशस्तीपत्र
३) जोनाकी पोरुआ (अभिनेता बेंजामिन दायमरी - आसामी चित्रपट) - फक्त प्रशस्तीपत्र
४) बिर्याणी (दिग्दर्शक सज्ज्न बाबू - मल्याळी चित्रपट) - फक्त प्रशस्तीपत्र
५) अशोक राणे यांचे सिनेमा पाहणारा माणूस पुस्तक - फक्त प्रशस्तीपत्र
६) पी. आर. रामदास नायडू यांचे कन्नड सिनेमा हे पुस्तक - फक्त प्रशस्तीपत्र
• नॉनफिचर फिल्म रजतकमळ -
१) दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट नॉनफिचर चित्रपट : खिसा (मराठी चित्रपट, दिग्दर्शक - राजप्रितम मोरे, निर्माते - संतोष मैथानी) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी ७५ हजार रुपये.
२) सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह नॉनफिचर चित्रपट : जक्कल (मराठी चित्रपट, दिग्दर्शक - विवेक वाघ, निर्माते - निऑन रील क्रिएशन्स) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी ५० हजार रुपये.
३) सामाजिक बाबीवरील सर्वोत्कृष्ट नॉनफिचर चित्रपट : होली राइटस (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - फराह खातून, सुदिप्तो कुंडू निर्माती- प्रियांका प्रदीप मोरे) - पुरस्कार निर्माता व दिग्दर्शक दोघांना दिला जातो - प्रत्येकी ५० हजार रुपये.
४) स्पेशल ज्युरी अवॉर्ड : स्मॉल स्केल सोसायटीज ( विपिन विजय - इंग्लीश चित्रपट) - १ लाख रुपये.
• संविधानाच्या ८ व्या परिशिष्टात नमूद प्रादेशिकभाषातील पुरस्कार -
संविधानाच्या ८ व्या परिशिष्टात नमूद भाषेतील चित्रपटांना सदर पुरस्कार (निर्मात व दिग्दर्शक) दिले जातात.
१) सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मराठी) : बार्डो (दिग्दर्शक - भीमराव मुडे, निर्माते - रितू फिल्म्स) - प्रत्येकी १ लाख रुपये.
२) सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (हिंदी) : छिछोरे (दिग्दर्शक - नितीश तिवारी, निर्माते - नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेटव इतर ) -प्रत्येकी १ लाख रुपये.
३) सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (मल्याळी) : कला नोत्तम (दिग्दर्शक - राहुल रिज्जी नायर, निर्माते - फर्स्टप्रिंत स्टुडिओ) - प्रत्येकी १ लाख रुपये.
४) सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (तमिळ): असुरन (दिग्दर्शक - वेत्रिमारन, निर्माते - व्ही. क्रिएशन्स) - प्रत्येकी १ लाख रुपये.
५) सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (तेलुगू) : जर्सी (दिग्दर्शक - गौतम तिन्नानुरी, निर्माते -सितारा एंटरटेनमेट) -प्रत्येकी १ लाख रुपये.
६) सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट (बंगाली) : गुमनामी (दिग्दर्शक - श्रीजीत मुखर्जी, निर्माते - एसव्हीएफ एंटरटेनमेट) - प्रत्येकी १ लाख रुपये.
• संविधानाच्या ८ व्या परिशिष्टात नमूद नसलेल्या भाषेतील चित्रपट पुरस्कार -
१) बेस्ट फिचर फिल्म खासी : इवेदु (दिग्दर्शक - प्रदीप कुर्भा, निर्माते - शिवन आर्ट्स ) - प्रत्येकी १ लाख रुपये.
२) बेस्ट फिचर फिल्म हरियाणवी : छोरियां छोरों से कम नहीं
३) बेस्ट फिचर फिल्म छत्तीसगढी : भुलन दी मेज
• २०१९ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटांची कामगिरी
१) सर्वोत्कृष्ट बालचित्रपट सुवर्ण कमळ : कस्तूरी (हिंदी चित्रपट, दिग्दर्शक - विनोद कांबळे) - २.५० लाख रुपये
२) राष्ट्रीय एकात्मतेवरील नर्गिस दत्त पुरस्कार / रजत कमळ : ताजमाल (दिग्दर्शक - नियाझ मुजावर) - १.५० लाख रुपये.
३) सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपट रजत कमळ : आनंदी गोपाळ (दिग्दर्शक समीर विद्वांस) - १.५० लाख रुपये.
४) सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री रजत कमळ : पल्लवी जोशी (द ताश्कंद फाइल्स चित्रपटासाठी) - ५० हजार रुपय
५) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका रजत कमळ : सावनी रवींद्र (बार्डो चित्रपटातील रान पेटल, या गाण्यासाठी) - ५० हजार रुपये.
६) सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा पुरस्कार रजत कमळ : सुनील निगवेकर आणि निलेश वाघ (आनंदी गोपाळ चित्रपटासाठी) - ५० हजार रुपये.
७) सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफी (साउंड डिझायनर) रजत कमळ : मंदार कमलापूरकर (त्रिज्या या मराठी चित्रपटासाठी) - ५० हजार रुपये.
८) सर्वोत्कृष्ट अॅिक्शन दिग्दर्शन रजत कमळ : विक्रम मोरे (अवन्नी श्रीमनारायण - कन्नड चित्रपट) - ५० हजार रुपये.
९) दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट नॉनफिचर चित्रपट रजतकमळ : खिसा (मराठी चित्रपट, दिग्दर्शक - राजप्रितम मोरे, निर्माते - संतोष मैथानी) - प्रत्येकी ७५ हजार रुपये.
१०) सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह नॉनफिचर चित्रपट रजतकमळ : जक्कल (मराठी चित्रपट, दिग्दर्शक - विवेक वाघ, निर्माते - निऑन रील क्रिएशन्स) - प्रत्येकी ५० हजार रुपये.
११) सामाजिक बाबीवरील सर्वोत्कृष्ट नॉनफिचर चित्रपट रजतकमळ : होली राइटस (हिंदी चित्रपट, निर्माती- प्रियांका प्रदीप मोरे) - ५० हजार रुपये.
१२) सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : बार्डो (दिग्दर्शक भीमराव मुडे )
१३) विशेष नोंदीस पात्र अभिनय : लता करे (लता भगवान करे चित्रपटासाठी)
१४) विशेष नोंदीस दिग्दर्शकीय कामगिरी : दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग (पिकासो चित्रपटासाठी)
१५) चित्रपटावरील सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा पुरस्कार : अशोक राणे द्वारा लिखित सिनेमा पाहणारा माणूस
• बार्डो -
१) हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला.
२) या चित्रपटातील रान पेटल, या गाण्यासाठी सावनी रवींद्र हिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
३) दिग्दर्शक भीमराव मुडे यांचा हा चित्रपट आइन्स्टाईन यांच्या थेअरी ऑफ ड्रीम रिलेटीव्हिटीवर आधारित आहे. काळाच्या चौकटीतून एखाद्या व्यक्तीचे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ यांचे अवलोकन करणारी ती कलाकृती आहे
४) मामी आणि एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे.
• ताजमाल -
१) नियाज मुजावर लिखित या चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील नर्गिस दत्त पुरस्कार मिळाला.
२) ताजमहालसारखी दिसणारी म्हणून नाव ताजमाल असणार्याक बकरीभोवती दिग्दर्शक नियाज मुजावर यांनी चित्रपटाचे कथानक फिरविले आहे.
३) हा चित्रपट भीमा कोनाडे या गरीब शेतकर्यािच्या जीवनाविषयी आहे, तो आपला एकुलता एक मुलगा बाळ याच्या कल्याणासाठी त्याच्या ताजमाल नावाच्या बकरीचा
कुलदेवतेला बळी देण्याचा निर्णय घेतो. परंतु बाळला आपल्या जिवापेक्षा त्या ताजमाल नावाच्या बकरीच्या जीवाचे संरक्षण करायचे असते.
• आनंदी गोपाळ -
१) या चरित्रात्मक चित्रपटाने सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान (दिग्दर्शक समीर विद्वंस) पटकावला.
२) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइनचा पुरस्कारही मिळाला. सुनील निगवेकर आणि निलेश वाघ यांनी या चित्रपटाचे प्रॉडक्शन डिझाइन केले आहे.
३) या चित्रपटाची कथा ही डॉ. आनंदी गोपाळ आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्याभोवती फिरते, ज्यांनी तिला वैद्यकीय अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेल्या. १८८६ मध्ये त्यांनी एमडी पदवी प्राप्त केली.
४) भाग्यश्री मिलिंद हिने आनंदी गोपाळ यांची, तर ललित प्रभाकर याने तिच्या पतीची भूमिका साकारली आहे.
• त्रिज्या -
१) पूर्वी ध्वनिमुद्रणासाठी केवळ एकच पुरस्कार असायचा. आता तो साऊंड डिझायनिंग, सिंक साऊंड आणि साऊंड मिक्सिंग अशा तीन बाबींसाठी वेगवेगळा दिला जातो.
२) ध्वनिसंरचनेसाठीचा (साऊंड डिझायनिंग) पुरस्कार मंदार कमलापूरकर यांना अक्षय इंडीकर दिग्दर्शित त्रिज्यासाठी मिळाला.
३) या चित्रपटात अवधूत या मुलाचा प्रवास चित्रित केला गेला असून ग्रामीण भागातल्या त्याच्या मूळ गावापासून आणि भारतातल्या एका मोठ्या शहरात आपल्या आयुष्यातील स्वप्नांच्या आणि आकांक्षांच्या वास्तवाचा कसा सामना करतो याचा शोध घेतला आहे.
४) या चित्रपटात टँजेन्ट जाणार्या नॉन-डायजेटिक ध्वनी आणि अँबिएन्टिक संगीताचा प्रत्ययकारी वापर केला आहे. केवळ द़ृश्य भरून काढणे म्हणून नव्हे, तर व्यक्तिरेखेस आणि आशयसूत्रास एक नेमके परिमाण देण्याचा द़ृष्टीने सर्जनशीलतेने ध्वनीचा वापर केला आहे.
• खिसा -
१) खिसा या लघुपटात महाराष्ट्रातील दुर्गम गावात राहणार्याण एका लहान मुलाची कहाणी आहे. शाळेच्या शर्टसाठी एक मोठा खिशा शिवण्याचा तो निर्णय घेतो व त्याचा हा खिसा लवकरच खेड्यातील वडिलधार्याश मंडळींमधील वादाचा मुद्दा ठरतो. यात सर्वसामान्यांच्या जगण्यातील साध्या साध्या आनंदाच्या बाबींवर धर्मांधतेमुळे पडणार्या विरजणाचे अस्वस्थकारी दर्शन घडवले आहे.
२) नॉन-फिचर गटात लघुपटांचा आणि माहितीपटांचा समावेश होतो. या गटात पदार्पणीय दिग्दर्शकाचा पुरस्कार राज मोरे यास खिसा या कैलाश वाघमारे लिखित, अभिनित लघुपटासाठी मिळाला.
• जक्कल -
१) या ७२ मिनिटांच्या माहितीपटात काही वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्यासत्राचा विविध अंगाने मागोवा घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
२) या माहितीपटास उत्कृष्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्मचा पुरस्कार मिळाला.
• विशेष उल्लेखनीय पुरस्कार -
मराठीत दोन विशेष उल्लेखनीय पुरस्कार (लता भगवान करे आणि पिकासो या चित्रपटांना) मिळाले.
१) लता भगवान करे या चित्रपटात लता करे यांनी स्वत:ची भूमिका साकारली. त्यामुळे लता करे अभिनयासाठी विशेष नोंदीस पात्र ठरल्या. त्यांनी नवर्याळच्या उपचारासाठी वयाच्या ६५ व्या वर्षी मॅरेथॉनमध्ये भाग घेत ती शर्यत जिंकली होती. या सत्यघटनेवर आधारित प्रत्यक्षातील व्यक्तींना घेऊन केलेल्या या चित्रपटाचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण आहे.
२) पिकासो (दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग) या चित्रपटाची दिग्दर्शकीय कामगिरी ही परीक्षकांच्या विशेष नोंदीस पात्र ठरली. जागतिक प्रीमिअर झालेला अॅिमेझॉन प्राइम व्हिडीओचा पहिला मराठी चित्रपट म्हणजे पिकासो. अॅलमेझॉन प्राईम व्हिडिओने २४० हून अधिक देशांमध्ये चित्रपट पोहोचवला. या कलाकृतीमध्ये बाप आणि मुलाची कथा दशावताराच्या पार्श्वभूमीवर साकारते. कोकणातील एका दुर्गम खेड्यातील सातवी इयत्तेच्या विद्यार्थ्याची कथा आहे. त्याची पिकासो कला शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली असून स्पर्धेतील विजेत्याला पिकासोचे जन्मस्थान स्पेनला जाण्याची संधी मिळणार असते. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विरनी मुकादम हे प्रमुख भूमिकेत आहेत. मध्यवर्ती व्यक्तिरेखा आणि त्याचे कुटुंब वगळता अन्य सर्व व्यक्तिरेखा या दशावतार साकारणार्यात कलाकारांनी पेलल्या आहेत.
• पल्लवी जोशी -
१) २०१९ च्या पुरस्कारात पल्लवी जोशी यांना द ताश्कंद फाइल्स या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
२) द ताश्कंद फाइल्स या चित्रपटाचे दिग्दर्शन पल्लवीचे पती दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे.
३) पल्लवी जोशींंची कारकीर्द-बालकलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का या चित्रपटात अभिनय. १९७९ रोजी रिलीज झालेल्या दादा या चित्रपटात एका कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीची भूमिका साकारली होती. १९९० च्या दशकात रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी, वंचित आणि रिहाई प्रमुख या चित्रपटांमध्ये काम केले होते. सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम या चित्रपटातदेखील तिची प्रमुख भूमिका होती. अंधा युद्ध (फिल्मफेअर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्रीसाठी नामांकन), वो छोकरी (विजेती - स्पेशल जूरी अवार्ड - ४१वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा), मेकिंग ऑफ द महात्मा, रिटा (मराठी चित्रपट), इलायुम मुल्लुम (मलयालम चित्रपट) या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.
४) मिस्टर योगी, भारत एक खोज, इम्तिहान, आरोहन, अल्पविराम, मृगनयनी, तलाश आदी टीव्ही मालिकांमधील त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या होत्या.
• आसुरन -
१) हा चित्रपट साहित्य अकादमी पुरस्कार विजेते साहित्यिक पुमणी यांच्या वेक्कई या कादंबरीवर आधारित आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी एका दलित कुटुंबाने गावातल्या सावकाराशी केलेला संघर्ष म्हणजे आसुरन.
२) या चित्रपटासाठी अभिनेता धनुष याला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्याचप्रमाणं या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार घोषित झाला.
३) आसुरनमधला शिवस्वामी हा दलित शेतकरी आपला जमिनीचा तुकडा वाचविण्यासाठी झगडतो आहे. सावकाराच्या शेतीशी लागून असल्यामुळं त्याचा एक फॅक्टरी उभारण्यासाठी या जमिनीवर डोळा आहे. तो आपल्या जमिनीला विजेच्या तारांचे कुंपण घालतो, तेथून हा संघर्ष पेटतो. या संघर्षात शिवस्वामीच्या थोरल्या मुलाला अटक केली जाते. त्याला सोडविण्यासाठी शिवस्वामीला लज्जास्पदरीतीने सार्या गावकर्यांचे पाय धरून लोटांगण घालावे लागते, अगदी गावातल्या पोरासोरांसह. तरीही पुढे त्याच्या थोरल्या मुलाची नृशंस हत्या केली जाते. मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून मुंडके तोडून कुत्र्यांना खाऊ घातले जाते. धाकटा कुमारवयीन मुलगा त्या रागात सावकाराची हत्या करतो. त्याला वाचवण्यासाठी हे कुटुंब आपली जमीनही द्यायला एका क्षणी तयार होते. हरेक संघर्षमय प्रसंगाला सामोपचाराच्या भूमिकेतून सामोरे जात असताना अत्याचाराचा रक्तरंजित प्रतिकार करण्याचीही वेळ त्यांच्यावर येते.
४) अंतिमतः शिवस्वामी त्याच्या मुलाला सांगतो, आपल्याकडे जमीन असेल, तर ते काढून घेतील; पैसा असेल तर ते लुटून नेतील; मात्र, शिक्षण असेल तर कोणीही ते हिरावून घेऊ शकणार नाही. अशाप्रकारे आंबेडकरवादाशी समग्राचा सांधा इथे जुळविला जातो. त्याची महत्ता अधोरेखित केली जाते.