प्रश्नमंजुषा (9)
1. 2024 पर्यंत पहिली महिला चंद्रावर उतरवण्यासाठी अमेरिकन अंतराळ कार्यक्रमाला कोणत्या ग्रीक देवीचं नाव देण्यात आलं आहे?
1) रिया
2) नेमेसिस
3) एफ्रोडाइट
4) अर्टेसिस
2. कोणत्या अभिनेत्याने दिल, दिल चाहता है आणि दिल है की मानता नही या सर्व सिनेमात काम केलं आहे?
1) सलमान खान
2) शाहरुख खान
3) आमिर खान
4) सैफ अली खान
3. खालीलपैकी चपातीचा कोणता प्रकार मलबारी पराठ्यासारखा आहे?
1) भटूरा
2) लच्छा पराठा
3) नान
4) तंदूरी रोटी
4. श्रीनगरच्या दाल सरोवरात विहारासाठी वापरल्या जाणार्या नावेचे स्थानिक नाव काय आहे?
1) शिकारा
2) सुथन
3) कांगर
4) फेरन
5. डंक आणि ड्रिबल अशा शब्दांचा वापर कोणत्या खेळात केला जातो?
1) बास्केटबॉल
2) वॉलीबॉल
3) टेनिस
4) क्रिकेट
6. मसाबा गुप्ता, तरूण तहिलियानी आणि रितु कुमार यांनी कोणत्या व्यवसायात प्रसिद्धी मिळवली?
1) नृत्य दिग्दर्शन
2) इंटीरियर डिजाइनिंग
3) गायन
4) फॅशन डिजाइनिंग
7. भगवान विष्णुच्या कोणत्या अवताराने कालिया मर्दन आणि पूतनेचा वध केला होता?
1) भगवान राम
2) भगवान कृष्ण
3) भगवान नरसिंह
4) भगवान वामन
8. कोणत्या आजाराचा एडीज इजिप्ती डासामुळे प्रसार होत नाही ?
1) डेंगू
2) झिका वायरस
3) यलो फिव्हर
4) मलेरिया
9. भारतीय वायूसेनेच्या या एअरोबॅटीक टीमचं नाव काय आहे?
1) सारंग
2) पवन
3) थंडरबोल्ट्स
4) डेयरडेविल्स
10. भारताच्या कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात माजी संस्थानिकांच्या शासकांना दिली जाणारी प्रिवी-पर्स म्हणजे राजभत्ते बंद करण्यात आले होते?
1) लाल बहादुर शास्त्री
2) राजीव गांधी
3) इंदिरा गांधी
4) मोरारजी देसाई
11. लुम्बिनी कोणत्या धार्मिक महापुरूषांचं जन्मस्थान आहे?
1) महावीर
2) चैतन्य महाप्रभु
3) गौतम बुद्ध
4) 14वें दलाई लामा
12. फाळणीनंतर 1948 मध्ये पाकिस्तानच्या फेडरल कॅपिटल टेरिटरीला कोणतं शहर बनवण्यात आलं?
1) पेशावर
2) रावलपिंडी
3) लाहोर
4) कराची
13. मोनिका बात्रा या खेळाडूने 2018 च्या राष्ट्रमंडळ स्पर्धेत कोणत्या खेळात 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकलं होतं?
1) बॅडमिंटन
2) टेबल टेनिस
3) निशानेबाजी
4) तीरंदाजी
14. गांधीजी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना कुणी बंगालमध्ये झालेल्या 1947 च्या धार्मिक दंगलीला यशस्वीपणे नियंत्रित करण्यासाठी वन मॅन बाउंड्री फोर्स म्हटलं होतं?
1) जॉन साइमन
2) क्लीमेंट एटली
3) विंस्टन चर्चिल
4) लार्ड माउंटबॅटन
15. सरोजिनी नायडू यांनी कोणत्या भाषेत मेहर मुनीर हे नाटक लिहिलं होतं?
1) उर्दू
2) इंग्रजी
3) पर्शियन
4) तेलुगू
1-4
2-3
3-2
4-1
5-1
6-4
7-2
8-4
9-1
10-3
11-3
12-4
13-2
14-4
15-3