प्रश्नमंजुषा 88 : वित्तीय धोरण
- 03 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 5513 Views
- 8 Shares
वित्तीय धोरण
1) खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही ?
1) कर आकारणी
2) सार्वजनिक कर्ज
3) खुल्या बाजारात कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
4) सार्वजनिक खर्च
2) खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन/साधने आहे/आहेत ?
अ) विदेशी गुंतवणूक
ब) कर
क) सार्वजनिक खर्च
ड) बँक दर धोरण (BRP)
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) ब आणि क
3) अ आणि ड
4) फक्त ड
3) नवीन वित्तीय धोरणात पुढीलपैकी कोणत्या बाबींवर भर देण्यात आला आहे?
a) कररचना व कराच्या कायद्यात सुलभीकरण करणे.
b) कर प्रशासनात सुधारणा करणे.
c) साधन सामुग्रीचे वितरण व करप्रणालीचे समान महत्त्व.
d) खर्च नियंत्रण करणारी नवीन प्रभावी पद्धत अवलंबिणे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) (a) व (b) फक्त
2) (b) व (d) फक्त
3) (c) व (d) फक्त
4) वरील सर्व
4) भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे ?
1) बँक दर
2) कर व करेतर महसूल
3) प्रत्यक्ष कारवाई
4) राखीव निधीचे प्रमाण
5) मध्यावधी राजकोषिय सुधारणाचा अंतिम उद्देश :
a) कर्ज चिरस्थायी पातळी पर्यंत घटविणे.
b) राजकोषिय तुटीत वाढ करणे.
c) चालू खात्यावरील तूट कमी करणे.
d) अर्थसाहाय्य कमी करणे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) (a), (b), (c)
3) फक्त (c)
4) फक्त (d)
6) मंदीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरण अधिक यशस्वी ठरेल?
1) करामध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चात कपात
2) करामध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चात वाढ
3) करामध्ये कपात आणि सार्वजनिक खर्चात कपात
4) करामध्ये कपात आणि सार्वजनिक खर्चात वाढ
7) सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख राजकोषीय कार्यापैकी अर्थव्यवस्थेच्या स्थिरीकरणासाठी खालील कोणत्या साधनाचा वापर होतो ?
1) करांचा विस्तार किंवा संकोच
2) बाजारातून कर्ज उभे करणे
3) उपलब्ध साधनांचे योग्य वितरण
4) व्याजदरातील बदल
8) खालीलपैकी कोणती वित्तीय उपाययोजना चलनवाढ रोखण्यासाठी परिणामकारक ठरेल ?
1) सरकारी खर्चात वाढ
2) सरकारी कर्जात वाढ
3) कराच्या दरात वाढ
4) रोखतेच्या राखीव दरात वाढ
9) मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक .......... वर आपले नियंत्रण ठेवते.
1) सार्वजनिक खर्च
2) पैशाचा पुरवठा
3) कर महसूल
4) वरील सर्व
10) खालील विधाने विचारात घ्या :
अ) मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे.
ब) आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उद्दिष्ट आहे.
क) बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) अ आणि ब
2) ब आणि क
3) अ आणि क
4) वरील सर्व
11) खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) विकसनशील देशात राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट गुंतवणुकीचा दर वाढविणे, बेरोजगारी व अर्धबेरोजगारी कमी करणे आणि भाववाढीची प्रवृत्ती नियंत्रित करणे, हे असते.
ब) राजकोषीय साधनाच्या शस्त्रागारामधील सक्तीचा उपभोग हे एक नवीन शस्त्र आहे.
क) कर आकारणी हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख साधन आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त अ आणि क
4) फक्त ब
12) खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची भूमिका पार पाडते.
ब) राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीत मदत करण्याचे महत्त्वाचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते.
क) भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातून दोन वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) फक्त अ व ब
2) फक्त ब व क
3) फक्त अ व क
4) वरील सर्व
13) खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेची स्थापना 1993 मध्ये झाली.
ब) राजीव गांधी समभाग बचत योजनेची सुरुवात फेब्रुवारी, 2013 मध्ये झाली.
क) राष्ट्रीय अल्पबचत निधीची स्थापना 2 ऑक्टोबर, 2005 मध्ये झाली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) फक्त अ व ब
2) फक्त ब व क
3) फक्त अ व क
4) वरील सर्व
14) खालील विधाने विचारात घ्या.
a) सरकारने ऑगस्ट 1991 मध्ये चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय व्यवस्था समितीची स्थापना केली.
b) व्याजदराची आधार दर पद्धती 1 जुलै, 2010 मध्ये जाहीर केली.
c) आधार दर पद्धती ही जुन्या कर्जाचे नूतनीकरण आणि सर्व नवीन कर्जासाठी लागू आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
1) फक्त (b)
2) फक्त (a)
3) (a) आणि (c)
4) (b) आणि (c)
15) खालील विधाने विचारात घ्या.
a) राज्य सरकारांच्या वित्तावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रीय वित्त मंत्रालयाची आहे.
b) राज्यघटनेनुसार जर राज्याच्या नावावर केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज शिल्लक असेल तर राज्य सरकार केेंद्र सरकारच्या परवानगी शिवाय बाजारातून कर्ज घेऊ शकत नाही.
c) राज्यघटनेनुसार राज्य सरकारांना परकीय कर्ज घेण्याची परवानगी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?
1) (a) आणि (b)
2) (b) आणि (c)
3) (a) आणि (c)
4) फक्त (c)
16) भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार स्थापन केलेल्या भारतीय वित्त आयोगाला खालीलपैकी कोणता अधिकार नाही?
1) कर उत्पन्नाचे केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये वाटप करणे.
2) राज्य सरकारांना अनुदान देण्याबद्दलच्या सूचना करणे.
3) केंद्रीय अर्थसंकल्प तयार करणे.
4) निकोप वित्ताशी संबंधित सूचना करणे.
17) सरकारचे सार्वजनिक कर्जफेड निधीची स्थापना करण्यामागे काय उद्दिष्ट्ये आहेत ?
1) अर्थव्यवस्थेला संकटातून वाचविणे.
2) मुद्दल व व्याजाचे हप्ते समयी भरता यावे.
3) वरील (1) व (2) दोन्ही नाही
4) वरील (1) आणि (2)
18) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात बाजारपेठा अयशस्वी ठरून सरकारी हस्तक्षेप महत्त्वाचा ठरला आहे ?
a) मक्तेदारी व वस्तूंची किंमत
b) आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना सार्वजनिक वस्तूंची उपलब्धी.
c) सिंचन, रेल्वे, रस्ते यांसारख्या पायाभूत वस्तूंची उपलब्धी.
d) अपूर्ण स्पर्धायुक्त बाजारपेठ
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) (b) आणि (c)
3) वरीलपैकी कोणताच नाही
4) वरील सर्व
19) भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधनसामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो ?
1) नियोजन आयोग
2) वित्त आयोग
3) केंद्रीय लोकसेवा आयोग
4) वरीलपैकी कोणतेही नाही
20) खाली देण्यात आलेल्या युनिट - I व युनिट - II मध्ये सार्वजनिक कर्जाशी संबंधित बाबी दिल्या आहेत. योग्य जोडी निवडा.
युनिट - I युनिट - II
a) सार्वजनिक कर्ज परतफेडीची पद्धती i) उत्पादनामध्ये वाढ
b) सार्वजनिक कर्जाचे परिणाम ii) उत्पादक आणि अनुत्पादक सार्वजनिक कर्ज
c) सार्वजनिक कर्जाचे स्रोत iii) तुटीचा अर्थ भरणा
d) सार्वजनिक कर्जाचे प्रकार iv) आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (iv) (i) (iii)
2) (iii) (i) (iv) (ii)
3) (iv) (i) (ii) (iii)
4) (iv) (i) (iii) (ii)
21) खाली केंद्र राज्य यांच्यातील वित्तीय विवादासंबंधी दोन विधाने दिलेली आहेत. त्यातील योग्य ते निवडा.
a) वित्तीय दृष्ट्या प्रभावी केंद्र आणि प्रभावहीन घटक राज्ये निर्मितीसाठी भारतीय राज्यघटना जबाबदार आहे.
b) केंद्र सरकार अनावश्यक, विभागाची द्विरुक्ती करीत आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a) बरोबर आहे
2) फक्त (b) बरोबर आहे.
3) (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.
4) (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत.
उत्तरे : प्रश्नमंजुषा (88)
1-3
2-2
3-4
4-2
5-3
6-4
7-1
8-3
9-2
10-4
11-3
12-4
13-1
14-2
15-4
16-3
17-4
18-4
19-2
20-2
21-4