प्रश्नमंजुषा 86 : करसुधारणा
- 03 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 2298 Views
- 6 Shares
करसुधारणा
1) सन 2000 मधील ..... घटना दुरुस्तीनुसार केंद्रीय कर महसुलाच्या केंद्र व राज्य शासनादरम्यानच्या वितरणात लक्षणीय बदल घडून आले आहेत.
1) 79 व्या
2) 81 व्या
3) 80 व्या
4) 83 व्या
2) 1991 ची करसुधारणा समिती ......... यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली.
1) श्री. विजय केळकर
2) राजा जे. चेल्लया
3) एल. के. झा
4) एम. गोविंदराव
3) आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचे सुलभीकरण खालीलपैकी कोणत्या समितीच्या सूचनांनुसार केले गेले ?
1) केळकर समिती
2) राजा चेलिया समिती
3) नरसिंहन समिती
4) 1 आणि 2
4) भारतात 1991 नंतर खालीलपैकी कोणत्या विशेष उल्लेखनीय कर सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली?
अ) वैयक्तिक उत्पन्न कर, कमी कर दर आणि कमी स्लॅब
ब) महामंडळ कर 30 टक्क्यांपर्यंत कमी करणे.
क) 1994-95 पासून सेवा कर आकारणी
ड) 1 एप्रिल, 2005 पासून मूल्यवर्धित कराची (VAT) 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात अंमलबजावणी
1) फक्त अ आणि ड
2) फक्त ब आणि क
3) फक्त अ, ब आणि क
4) अ, ब, क आणि ड
5) ‘महाराजस्व अभियान‘ हा कार्यक्रम राज्यात कधीपासून राबविण्यात आला ?
1) 1 ऑगस्ट, 2015
2) 1 ऑगस्ट, 2016
3) 15 ऑगस्ट, 2016
4) 2 ऑक्टोबर, 2016
6) विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे?
1) वित्तीय क्षेत्रात सुधारणा
2) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा
3) प्रशासकीय सुधारणा
4) व्यापार सुधारणा
7) ‘डॉ. राजा चेल्लय्या आयोग‘ खालील बाबत निगडित आहे.
1) केंद्र-राज्य संबंध
2) बँकिंग क्षेत्रातील सुधारणा
3) करविषयक सुधारणा
4) विमा क्षेत्रातील सुधारणा
8) विजय केळकर समितीने भारतीय करप्रणाली सुधारणेच्या संदर्भात कोणते धोरण सुचवले आहे?
1) सरकारी खर्चात कपात
2) करआकारणीचा पाया विस्तृत करणे
3) जास्त कर दर
4) मूल्यवर्धित कर निर्मूलन
9) कर महसूल, स्थूल उत्पन्नाच्या वाढीशी लवचीक करण्याच्यादृष्टीने, खालीलपैकी कोणता उपाय कर-सुधारणा समितीने सुचविला होता?
1) उच्च कर दर आणि संकुचित कर आधार
2) उच्च कर दर आणि प्रशस्त कर आधार
3) कमी कर दर आणि संकुचित कर आधार
4) कमी कर दर आणि प्रशस्त कर आधार
10) 2016-17 अर्थसंकल्पांतर्गत कृषी कल्याण अधिभार सर्व सेवांवर आकारला गेला. या अधिभाराचा दर .... टक्के होता.
1) 0.5
2) 1
3) 1.5
4) 2
(1) प्रत्यक्ष कर संहिता
1) खालील विधानांचा विचार करा ः
अ) थेट करसंहिता आणि वस्तू व सेवा करांची सुरुवात.
ब) कर चुकवेगिरी विरोधातील साधारण नियमांबाबत स्पष्ट धोरण.
क) वित्तीय सर्वसमावेशकतेबाबतची समिती.
1) अ आणि ब या क ने सुचविलेल्या कर सुधारणा आहेत.
2) अ फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे.
3) ब फक्त ही प्रस्तावित कर सुधारणा आहे.
4) अ आणि ब या क ने सुचविलेल्या नाहीत.
2) प्रत्यक्ष कर कोड (डीटीसी) यात बहुतेक कोणते माफ केलेले उत्पन्न काढून टाकले गेले?
a) युलीप (युनायटेड लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन)
b) इक्वीटी लिंक्ड म्युच्युअल फंड
c) मुदत ठेवी
d) नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स
1) (a) आणि (b) फक्त
2) (b) आणि (c) फक्त
3) (a), (b), (c) आणि (d)
4) (c) आणि (d) फक्त
3) प्रत्यक्ष कर संहितेने (DTC) पुढीलपैकी कोणत्या कायद्याची जागा घेतली ?
a) आयकर कायदा, 1961
b) केंद्रीय विक्रीकर कायदा, 1956
c) केंद्रीय उत्पादनशुल्क कायदा, 1944
d) केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, 2017
पर्यायी उत्तरे ः
1) फक्त (d)
2) फक्त (a)
3) फक्त (a) आणि (d)
4) फक्त (b) आणि (c)
4) खालीलपैकी कोणत्या घटकांची जागा नवीन प्रत्यक्ष कर संहितेने (DTC) घेतली ?
1) भारतातील उत्पन्न कर कायदा 1961
2) भारतातील अप्रत्यक्ष कर संहिता
3) भारतातील प्रत्यक्ष कर संहिता
4) वरीलपैकी कशाचीही नाही
जनरल अँटी-अव्हायडन्स रूल
1) गार (GAAR) म्हणजे :
1) जागतिक कर चुकवेगिरी विरोधातील नियम
2) अमेरिकन सामान्य लेखा नियम
3) जागतिक लेखा व परिक्षण नियम
4) सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील नियम
2) जनरल अँटी-अव्हायडन्स रूल (GAAR) च्या सुधारित तरतुदी भारतात केव्हापासून लागू झाल्या ?
1) एप्रिल 1, 2016
2) एप्रिल 1, 2015
3) जानेवारी 1, 2015
4) एप्रिल 1, 2017
कॉर्पोरेशन टॅक्स व आयकर
1) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
a) कंपन्यांना कॉर्पोरेशन टॅक्स त्या नफा कमवत असतील किंवा नसतील तरी भरावा लागतो.
b) कॉर्पोरेशन टॅक्सचे दर देशी व विदेशी कंपन्यांसाठी वेगवेगळे आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) दोन्ही (a) व (b)
4) कोणतेही नाही
2) प्रमंडळ कर हा ........ कर आहे.
a) कंपन्यांच्या उत्पन्नावर
b) कंपन्यांच्या एकूण प्राप्तीवर
c) कंपन्यांच्या उलाढालीवर
d) कंपन्यांच्या देणग्यांवर
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (a) आणि (b)
3) (a),(b) आणि (c)
4) (a),(b),(c) आणि (d)
3) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
a) महामंडळ कर हा केंद्र सरकारकडून आकारला जातो.
b) सन 1990-91 पासून महामंडळ कराचे दर टप्प्याटप्प्याने वाढले आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (b) फक्त
3) (a) व (b) दोन्हीही
4) (a) व (b) दोन्हीही नाहीत
4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ) आय कर ‘भरण्याची क्षमता’ या तत्त्वावर आकारला जातो.
ब) आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो.
1) फक्त अ
2) फक्त ब
3) दोन्ही अ आणि ब
4) दोन्ही नाहीत
5) खालील विधाने विचारात घ्या.
a) व्यक्तिगत उत्पन्न कर हा वैयक्तिक उत्पन्नावर आकारला जातो.
b) उत्पन्नाच्या पुनर्वाटपात सकारात्मक भूमिका बजावण्यात उत्पन्न कर अपयशी ठरला आहे.
c) महामंडळ कर हा नोेंदणीकृत कंपन्या आणि महामंडळ यांच्या उत्पन्नावर आकारला जातो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने सत्य आहे/आहेत ?
1) (a),(b) आणि (c)
2) (a) आणि (b)
3) (a) आणि (c)
4) फक्त (c)
6) कोणाला एप्रिल 2012 मध्ये आयकर इ-फाईलिंग अनिवार्य केले गेले होते?
1) ज्यांची प्राप्ती रु. 10 लाखापेक्षा अधिक आहे.
2) ज्यांच्या मालकीची दोन पेक्षा अधिक वाहने आहेत.
3) ज्यांच्या मालकीची दोन पेक्षा अधिक घरे आहेत.
4) ज्यांच्या मालकीची 10 हेक्टर पेक्षा अधिक जमीन आहे
7) वस्तूच्या आयात व निर्यातीवर लावल्या जाणार्या करास ...... असे म्हणतात.
1) सीमा शुल्क
2) अबकारी कर
3) मूल्यवर्धित कर
4) वस्तू आणि सेवा कर
(2) वस्तू आणि सेवा कर
1) वस्तू आणि सेवा करासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) वस्तू आणि सेवा करांची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून सुरु झाली.
ब) भारत सरकारने वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर अबकारी कर रद्द केला.
क) वस्तू आणि सेवा कर मोठ्या उद्योगधंद्याच्या उत्पन्नावर लागू करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधाने चूक आहेत ?
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त क
4) यापैकी नाही
2) वस्तू व सेवा कराशी (GST) संबंधित घटनादुरुस्ती कोणती?
1) 98 वी घटनादुरुस्ती
2) 99 वी घटनादुरुस्ती
3) 100 वी घटनादुरुस्ती
4) 101 वी घटनादुरुस्ती
3) भारतात 1 जुलै, 2017 पासून वस्तू व सेवा कर लागू केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचे किती कर कमी झालेत?
1) केंद्र - 6 आणि राज्य - 11 कर
2) केंद्र - 7 आणि राज्य - 9 कर
3) केंद्र - 8 आणि राज्य - 9 कर
4) केंद्र - 9 आणि राज्य - 8 कर
4) वस्तू व सेवा करामध्ये (GST) पुढीलपैकी कोणत्या करदराचा समावेश होत नाही ?
अ) 5 टक्के
ब) 12 टक्के
क) 22 टक्के
ड) 28 टक्के
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ब
2) फक्त क आणि ड
3) फक्त अ, ब आणि ड
4) फक्त क
5) खालील विधानांचा विचार करा.
a) वस्तू व सेवा कर हा राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कर आहे.
b) हा सेवा कराशी मिळताजुळता आहे.
c) यामध्ये आदान करासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त बरोबर आहे
2) (b) फक्त बरोबर आहे
3) (a) व (c) फक्त बरोबर आहेत
4) (b) व (c) फक्त बरोबर आहेत
6) वस्तू आणि सेवा करासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) वस्तू आणि सेवा करांची अंमलबजावणी 1 जुलै, 2017 पासून झाली.
ब) भारत सरकारने वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणी नंतर प्रवेश कर रद्द केला.
क) वस्तू आणि सेवा कर फक्त मोठ्या उद्योगधंद्याच्या उत्पन्नावर लागू करण्यात आला.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त अ आणि क
4) वरीलपैकी सर्व
7) वस्तू आणि सेवा कर (GST) काय सूचित करतो?
1) वस्तू आणि सेवांसाठी एकच कर
2) वस्तू आणि सेवांसाठी वेगवेगळे कर
3) प्रत्यक्ष कर
4) वरीलपैकी कोणतेही नाही
8) वस्तू व सेवा कायद्यामधून खालील करास वगळण्यात आले.
a) मूल्यवर्धित कर/मुंबई विक्रीकर
b) केंद्रीय विक्रीकर
c) केंद्रीय उत्पादन शुल्क कर
d) सरचार्ज
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a) आणि (b) बरोबर
2) फक्त (b) आणि (c) बरोबर
3) फक्त (a), (b), (c) बरोबर
4) (a), (b), (c), (d) सर्व बरोबर
9) भारतात सेवा कर ...... रोजी लावण्यात आला होता.
1) 1 जुलै 1993
2) 1 जुलै 1994
3) 1 जुलै 1995
4) 1 जुलै 1996
10) कुठल्या वर्षी भारतामध्ये सेवाकर प्रथम लागू करण्यात आला होता?
1) 1991-92
2) 1994-95
3) 1995-96
4) 1997-98
11) 1 एप्रिल 2012 पासून भारतात किती सेवाकर लागू करण्यात आला होता?
1) 8%
2) 10%
3) 12%
4) 15%
12) अनुच्छेद 268- क कशाशी संबंधित आहे?
1) आयकर
2) विक्रीकर
3) सेवाकर
4) उत्पादन शुल्क
13) खालील विधाने विचारात घ्या.
a) 2011-12 मध्ये सेवा करापासून मिळणार्या महसुलात 37.4% वाढ झाली. याचा अर्थ असा की सेवा कर हा सार्वजनिक उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत बनू लागला होता.
b) सात योजनांसाठी प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण योजना 1 जानेवारी 2013 ला संपूर्ण भारतात सुरू झाली.
वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) यापैकी नाही
14) वस्तू आणि सेवा करदात्याच्या ओळख क्रमांकातील पहिले दोन अंक ...... दर्शवितात.
1) उत्पादन संकेतांक
2) राज्य संकेतांक
3) देश संकेतांक
4) सेवा संकेतांक
15) पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आहे ते ओळखा.
1) सेवाकर केंद्रशासनाद्वारे लादला जातो.
2) सेवाकर केंद्रशासन आणि राज्यशासनाद्वारा गोळा केला जातो.
3) सेवाकराचा विनियोग केंद्रशासन आणि राज्यशासनाद्वारा केला जातो.
4) समवर्ती सूचीमध्ये 92 क ‘सेवावरील कर’ ही नवी नोंद करण्यात आली आहे.
(3) मूल्यवर्धित कर /व्हॅट
1) मूळ मूल्यवर्धित कर कायद्यात खालील कुठला कर काढून टाकण्यात आला होता?
1) खरेदी कर
2) कार्यकंत्राट कर
3) वस्तूवापर कर
4) मोटरस्पिरिट कर
2) भारतामध्ये राज्य विक्री कर रद्द करून पुढीलपैकी कोणता कर लागू करण्यात आला होता?
1) वस्तू व सेवा कर
2) सेवा कर
3) मूल्यवर्धित कर
4) महामंडळ कर
3) खालीलपैकी कोणती बाब व्हॅटचे वैशिष्ट्य दर्शविते?
1) व्हॅट हा वस्तूच्या विक्रीवर लावला जातो.
2) व्हॅट हा फक्त विक्रीच्या वेळेला वसूल केला जातो.
3) व्हॅट हा वस्तूची विक्रीची किंमत आणि खरेदीच्या किमतीच्या फरकावर लावला जातो.
4) वरीलपैकी सर्व
4) खालीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/आहेत ?
a) मूल्यवर्धित कर ही बहु केंद्रीय कर गोळा करणारी पद्धती आहे.
b) अमूल्यवर्धित कर ही एक केंद्रित (उद्देशीय) कर गोळा करणारी पद्धत आहे.
c) मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) (b) आणि (c)
3) फक्त (c)
4) वरील सर्व
5) मूल्यवर्धित करासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ) अप्रत्यक्ष करातील बाहुल्य नष्ट करण्यासाठी मूल्यवर्धित कर लागू होतो.
ब) सर्व राज्यातील विविध मूल्यवर्धित कराचे दर एक सारखे आहेत.
क) मूल्यवर्धित कर प्रणाली 10 एप्रिल, 2006 पासून अमलात आली.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त अ आणि क
4) वरील सर्व
6) खालील विधाने विचारात घ्या :
अ) मूल्यवर्धित कर (VAT) ही बहुउद्देशीय कर गोळा करणारी पद्धती आहे.
ब) अ-मूल्यवर्धित कर ही एकल-बिंदू करभरणा करणारी पद्धती आहे.
क) मूल्यवर्धित करांच्या अंमलबजावणी मुळे गरीब लोकांच्या राहणीमानात सुधारणा आणि खरेदीशक्तीत वाढ होईल.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) फक्त अ व ब
2) फक्त ब व क
3) फक्त अ व क
4) वरील सर्व
7) व्हॅल्यू अॅडेड टॅक्सचे खालीलपैकी कोणते लक्षण नव्हते?
1) ही मल्टी पॉइंट डेस्टिनेशन बेस्ड कर पद्धती
2) उत्पादन वितरण साखळी प्रक्रियेत हस्तांतरणाच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्यवर्धित कर आकारणीची ही पद्धत.
3) हा केंद्र सरकारचा विषय असून राज्य सरकार याबाबत अंमलबजावणी करताना फॅसिलिटेटर म्हणून यशस्वी भूमिका पार पाडते.
4) वस्तू किंवा सेवेच्या अंतिम उपभोगावर आकारलेला हा कर असून तो ग्राहकामार्फत सोसला जातो.
8) व्हॅट् कोणावर लागू होता?
a) थेट ग्राहकांवर
b) उत्पादनाच्या अंतिम टप्प्यावर
c) उत्पादनाच्या पहिल्या टप्प्यावर
d) उत्पादन आणि अंतिम विक्री दरम्यान मूल्य वर्धनाच्या सर्व टप्प्यांवर
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (a), (b) आणि (c)
3) (b) आणि (c)
4) (d) फक्त
9) पूर्वीच्या कायद्यातील कोणता/कोणते कर कायदा/कर कायदे मूल्यवर्धित कर कायद्यात समाविष्ट करण्यात आला/आले होता/होते?
1) ऐषआराम करकायदा
2) व्यवसायकर कायदा
3) मोटरवाहन प्रवेश कर कायदा
4) कार्यकंत्राटकर कायदा, वस्तूवापर कर कायदा, मुंबई मोटर स्पिरिट कर कायदा
10) मूल्यवर्धित कर कायद्यानुसार नोंदणीसाठी अटीशिवाय उलाढाल मर्यादा किती होती?
1) रु. 1,00,000
2) रु. 5,00,000
3) रु. 8,00,000
4) रु. 10,00,000
11) 2017 पूर्वी राज्य सरकारला कर महसूल मिळवून देण्यामध्ये VAT चा वाटा सर्वात मोठा होता. अर्थात यासंदर्भात काही दोषही पुढे आलेले होते. खालीलपैकी कोणते विधान VAT मधील उणीव/उणिवा या संदर्भात योग्य होते?
अ) वाढीव खर्च VAT च्या कार्यात/अंमलबजावणीत समाविष्टीत करण्यात येई.
ब) VAT कर आकारणीच्या बाबत समानता या तत्त्वाच्या विरोधी होता.
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) वरीलपैकी एकही नाही
12) व्यवसाय कराबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
1) व्यवसाय कराची कमाल मर्यादा रु.250 वरून रु.2500 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
2) ही वित्तीय मर्यादा वाढविण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यकता असते.
3) हा कर लावण्याची व वसूल करण्याचे अधिकार कोणत्याही परिस्थितीत स्थानिक प्राधिकरणाकडे सोपविता येत नाही.
4) व्यवसाय कर हा प्राप्ती कराचा एक भाग आहे या कारणावरून याबाबतचा राज्य कायदा असंवैधानिक ठरत नाही.
13) खालील विधाने विचारात घ्या :
अ) केंद्रीय विक्रीकर कायदा, 1956 नुसार विक्रीकर हा आंतर-राज्य वस्तू विक्रीकर आकाराला जातो.
ब) केंद्रीय विक्रीकर दरामध्ये जून, 2008 पासून 3% वरून 2% पर्यंत कपात करण्यात आली.
क) केंद्रीय विक्रीकर हा प्रामुख्याने सवलत (सूट) नसलेला स्रोताधारित कर आहे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) फक्त अ व ब
2) फक्त ब व क
3) फक्त अ व क
4) वरील सर्व
14) भारत सरकारला कोणत्या वस्तूंच्या गटाच्या उत्पादन आणि विक्रय उलाढालीपासून सर्वाधिक महसूल प्राप्त होतो?
a) अफू
b) दारू
c) तंबाखू
d) सिगारेट
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b) व (c)
2) (a), (b) व (d)
3) (b), (c) व (d)
4) (a), (c) व (d)
15) खालील विधाने लक्षात घ्या ः
a) आर्थिक नियोजनाच्या पहिल्या चार दशकांमध्ये वस्तू करांवरील भर वाढला होता.
b) त्यांचा (वस्तू करांचा) केंद्र सरकारच्या एकूण कर उत्पन्नामध्ये सन 1990-91 मध्ये 84% हिस्सा होता.
c) अप्रत्यक्ष कर उत्पन्न व एकूण कर उत्पन्नाचे गुणोत्तर 2016-17 मध्ये 51.7% इतके होते.
वरीलपैकी कुठले/कुठली विधान/ने चुकीची आहे/त?
1) वरील सर्व
2) फक्त (a)
3) फक्त (c)
4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तरे : प्रश्नमंजुषा (86)
1-3
2-2
3-1
4-4
5-1
6-2
7-3
8-2
9-4
10-1
(1) प्रत्यक्ष कर संहिता
1-4
2-3
3-2
4-1
जनरल अँटी-अव्हायडन्स रूल
1-4
2-1
कॉर्पोरेशन टॅक्स व आयकर
1-2
2-1
3-2
4-3
5-1
6-1
7-1
(2) वस्तू आणि सेवा कर
1-4
2-4
3-3
4-4
5-3
6-1
7-1
8-4
9-2
10-2
11-3
12-3
13-3
14-2
15-4
(3) मूल्यवर्धित कर /व्हॅट
1-1
2-3
3-4
4-4
5-1
6-1
7-4
8-4
9-4
10-4
11-3
12-3
13-4
14-2
15-4