प्रश्नमंजुषा 85 : करप्रणाली
- 02 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 2492 Views
- 3 Shares
सार्वजनिक वित्तीय संरचना : करप्रणाली
1) आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी “कार्यात्मक वित्त“ ही संकल्पना विकसित केली आहे. कार्यात्मक वित्त संकल्पना मांडण्याचे श्रेय खालीलपैकी कोणाला दिले जाते ?
1) जे. एम. केन्स
2) ए. सी. पिंगू
3) ए. पी. लर्नर
4) रिचर्ड मसग्रेव्ह
2) जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा :
समिती कार्य
a) वांच्छू समिती i) कंपन्यांच्या दिवाळखोरी संबंधी उपाय
b) सुंदरराजन समिती ii) औद्योगिक धोरण परवाना
c) बी. बाळकृष्ण इराडी iii) प्रत्यक्ष कर पद्धती
d) दत्त समिती iv) तेलक्षेत्र सुधार समिती
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iii) (iv) (i) (ii)
2) (iv) (iii) (ii) (i)
3) (iii) (ii) (i) (iv)
4) (i) (ii) (iii) (iv)
3) केंद्र सरकारने प्रशासकीय कामकाज चालविण्यासाठी कर आणि इतर स्वरूपात जमा केलेला महसूल हा यात जमा केला जातो ?
1) काँटिजन्सी फंड ऑफ इंडिया
2) पब्लिक अकौंट
3) कन्सोलायडेटेड फंड ऑफ इंडिया
4) डिपॉझिट्स अँड अॅडव्हान्सेस फंड
4) वित्ताचे (Finance) नियमित (routine) कार्य कोणते ?
1) रोख प्राप्ती व शोधन यावर देखरेख
2) भांडवलाची गरज निश्चित करणे
3) रोखप्रवाह निश्चित करणे
4) गुंतवणूक निर्णय
5) भारताची सार्वजनिक वित्तीय संरचना खालीलपैकी कोणत्या प्रकारास मोडते ?
1) संघ राज्यस्तरीय
2) एक घटकीय
3) तुटीची
4) राज्यस्तरीय
(1) कर संक्रमण व कराघात
1) खालील विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?
a) कर म्हणजे केवळ उत्पन्नाचे साधन आहे.
b) कर हे सक्तीचे देणे आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) बरोबर आहे.
2) (b) बरोबर आहे.
3) (a) व (b) बरोबर आहे.
4) वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही.
2) कर संक्रमण हे .......... शी संबंधीत आहे.
1) कर टाळणे
2) कर लादणे
3) एकाकडून दुसर्याकडे कर संक्रमित होणे
4) यापैकी नाही
3) कराघात हा ........... संबंधित आहे.
1) अंतिम पैशाचे ओझे
2) अप्रत्यक्ष वास्तव ओझे
3) त्वरित वास्तव ओझे
4) त्वरित पैशाचे ओझे
4) कर आयात (इन्सिडन्स), हा कर संक्रमण क्रियेचा कोणता परिणाम असतो ?
1) प्रारंभिक
2) मध्यम
3) अंतिम
4) यापैकी नाही
5) करांचे ओझे जोखण्याची सर्वात सुलभ व सोपी पद्धत:
a) करांचे सकल देशांतर्गत उत्पन्नाशी प्रमाण
b) सर्वोच्च कर दर
c) कर लागू होण्याची कमीतकमी उत्पन्न पातळी
d) उत्पन्न वजावटीची सर्वात जास्त मर्यादा
1) (b)
2) (a)
3) (d)
4) (c)
6) खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत कॅपिटल गेन्सचा मुद्दा उपस्थित होतो ?
अ) ज्यावेळी उत्पादनाची विक्री वाढते
ब) ज्यावेळी मालकीच्या स्थावर संपत्तीचे मूल्य नैसर्गिकरीत्या वाढते
क) एखादे पेंटिंग्ज विकत घेतले व त्याचा लोकप्रियतेमुळे त्याचे मूल्य वाढले
योग्य पर्याय निवडा :
1) फक्त अ
2) फक्त ब व क
3) फक्त ब
4) अ, ब व क
7) भारतात कर आकारणीकरिता कोणत्या कर पद्धतीचा अवलंब केला जातो ?
1) प्रमाणशीर कर (Proportional taxes)
2) पुरोगामी कर (Progressive taxes)
3) प्रतिगामी कर (Regressive taxes)
4) अधोगामी कर (Degressive taxes)
8) चाणक्य कर प्रशासनाची तुलना कशाशी करतो ?
1) चिमणीने घरटे बांधणे
2) गाईपासून दूध मिळविणे
3) मधमाश्यांनी फुलामधील मध गोळा करणे
4) सर्व अंडी एका टोपलीत ठेवणे.
9) प्रगतिशील करप्रणालीमुळे -
1) सरकारच्या उत्पन्नात वाढ होते
2) आर्थिक विषमता कमी होते
3) सर्वांना न्याय मिळतो
4) यापैकी सर्व
10) भारतात कर आकारणी करताना येणारी मुख्य अडचण ......
1) लोकसंख्या वाढदर जास्त
2) दरडोई उत्पन्न कमी
3) अमौद्रिक क्षेत्राची मोठी वाढ
4) वरील सर्व
11) विशेष कर (special tax) खालीलपैकी कशावर लावला जातो ?
1) वस्तूंच्या आकारावर
2) वस्तूंच्या वजनावर
3) वस्तूंच्या गुण व दर्जावर
4) वस्तूंच्या आकार व वजनावर
12) अतिरिक्त महसूल मिळण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात वाढविलेल्या कराला कोणती संज्ञा आहे ?
1) टोल (Toll)
2) सेस (Cess)
3) मार्गदर्शक कर
4) अधिभार (Surcharge)
(2) केंद्र शासनाचे कर
1) हे कर केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात :
a) आयकर
b) सीमा शुल्क
c) निगम कर
d) पथकर
पर्यायी उत्तरे :
1) (a) व (b) फक्त
2) (c) व (d) फक्त
3) (a), (b) व (c) फक्त
4) (b), (c) व (d) फक्त
2) जोड्या जुळवा.
अ गट ब गट
अ) केंद्रीय विक्रीकर कायदा I) 1899
ब) अतिरिक्त अबकारी कर कायदा II) 1957
क) भारतीय तिकीट कायदा III) 1956
(अ) (ब) (क)
1) I II III
2) III II I
3) I III II
4) III I II
3) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 366 मध्ये, संविधान (46 वी सुधारणा) अधिनियम, 1982 नुसार कोणता खंड समाविष्ट करण्यात आला?
1) 29 A
2) 29
3) 26 A
4) 26
4) आयात केलेला माल आणि उत्पादित माल यांच्यामध्ये भेदभाव होणार नाही यासाठी आयात केलेल्या मालावर कोणत्या अनुच्छेदाप्रमाणे कर लावण्याचे अधिकार आहेत?
1) अनुच्छेद 301
2) अनुच्छेद 304
3) अनुच्छेद 345
4) अनुच्छेद 348
5) संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची यामधील विषयांचे विभाजन करणारा अनुच्छेद कोणता?
1) अनुच्छेद 246
2) अनुच्छेद 247
3) अनुच्छेद 248
4) अनुच्छेद 249
6) कोणत्या सूचीत खालील विषयक सामील आहेत?
अ) शेतजमिनीसोडून अन्य मालमत्तेचे हस्तांतरण, विलेख व दस्तऐवज यांची नोंद.
ब) व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकर्या यांवरील कर.
क) कंपन्यांच्या भांडवलावरील कर.
ड) मद्यार्काने किंवा अफूने युक्त असलेले औषधीय व प्रसाधन सिद्धपदार्थ.
A B C D
1) सूची III सूची II सूची I सूची I
2) सूची II सूची I सूची I सूची III
3) सूची II सुची II सुची III सुची I
4) सूची I सूची III सूची II सूची II
7) खालील विधाने भारताच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या महसूल प्रवाहासंबंधी आहेत.
a) कर महसुलामध्ये सर्वसाधारणपणे वाढ झाली आहे.
b) केंद्र सरकारचा महसूल हा राज्यसरकारच्या महसुलापेक्षा वेगाने वाढत आहे.
c) वैयक्तिक उत्पन्न कर हा केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा एक कर आहे.
d) केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा बिगरकर महसूल स्रोत म्हणजे केंद्रसरकारने राज्यसरकारांना दिलेल्या कर्जावरील व्याज.
वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
1) (a) आणि (b)
2) (a),(b) आणि (c)
3) (b),(c) आणि (d)
4) वरील सर्व
8) जोड्या जुळवा :
कर वैशिष्ट्य
a) मालमत्ता कर i) 1985 मध्ये रद्द झाला
b) संपत्ती कर ii) कॉल्डर ने सुरू केला
c) मूल्यानुसार कर (मूल्यवर्धित कर) iii) एल. के. झा समिती
d) सेवा कर iv) 1994-95 मध्ये सुरू केला
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (iii) (iv) (i)
2) (i) (ii) (iii) (iv)
3) (iii) (iv) (i) (ii)
4) (iv) (i) (ii) (iii)
9) खालील विधाने विचारात घ्या :
a) भारतात मालमत्ता कर प्रथम 1953 मध्ये आकारला गेला.
b) संपत्तीवर वार्षिक कर प्रथम मे 1957 मध्ये आकारला गेला.
c) संपत्ती कर हा महसुलाचा मोठा स्रोत आहे.
d) देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला.
वरीलपैकी कोणते/ती विधाने असत्य आहे/त ?
1) (a) व (d)
2) (b) व (c)
3) फक्त (c)
4) फक्त (d)
10) योग्य पर्याय निवडा.
प्रो. कॅल्डोर यांनी भारतात मालमत्ता कराऐवजी कोणता कर सुरू करण्याची शिफारस केली?
a) उत्पादन कर
b) संपत्ती कर
c) भांडवली लाभ कर
d) देणगी कर
e) व्यय कर
पर्यायी उत्तरे :
1) (a) व (b)
2) केवळ (d)
3) (c) व (e)
4) वरीलपैकी नाही
11) मुद्रांक शुल्क आणि औषधीय व प्रसाधन पदार्थावरील उत्पादन शुल्क यांची आकारणी खालीलपैकी कोण करू शकते?
1) स्थानिक संस्था
2) केंद्र सरकार
3) राज्य सरकार
4) नगरपालिका
12) अनुच्छेद 269 नुसार, “मालाच्या विक्रीवरील किंवा खरेदीवरील कर” या शब्दप्रयोगाचा अर्थ, ..... व्यतिरिक्त अन्य मालाची विक्री किंवा खरेदी जेथे आंतरराज्यीय व्यापार किंवा वाणिज्यव्यवहार यांच्या ओघात घडते तेथे अशी विक्री किंवा खरेदी यांवरील कर असा आहे.
1) जमीन
2) पैसा
3) रोखे
4) वृत्तपत्र
13) संसदेला कायद्याद्वारे राज्याराज्यातील अथवा भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागातील व्यापार, वाणिज्य किंवा व्यवहारसंबंध यांच्या स्वातंत्र्यावर .......... आवश्यक असतील असे निर्बंध घालता येतात.
1) सामाजिक हितार्थ
2) राज्य हितार्थ
3) राष्ट्रीय हितार्थ
4) सार्वजनिक हितार्थ
14) केंद्र शासनाचा महसूल सर्वाधिक वेगाने वाढणारा/वाढवणारे कर ....... आहे/आहेत.
अ) सेवा कर
ब) प्रमंडळ कर
क) आय कर
1) फक्त अ
2) अ, ब आणि क
3) अ आणि ब
4) अ आणि क
15) भारताचा एकत्रित निधी किंवा आकस्मिता निधी यांची अभिरक्षा करणे, अशा कोणत्याही निधीत भरणा करणे किंवा त्यातून पैसे काढणे संबंधित तरतुदी म्हणजे -
1) वार्षिक वित्तीय विवरण पत्र
2) लेखानुदान
3) अंदाजपत्रक
4) धन विधेयक
16) भारतीय करपद्धतीत बदल घडवून आणण्याच्या खालीलपैकी कोणत्या मार्गाचा अवलंब, डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतिदलाने केला होता ?
1) खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे.
2) अनुत्पादक खर्चाचे नियमन करणे.
3) करांची संख्या वाढवणे.
4) कर चुकवेगिरीचे प्रमाण कठोर उपायांनी कमी करणे.
(3) राज्य सरकारचे प्रमुख कर
1) राज्य सरकारचे प्रमुख कर महसूल स्रोत ........ आहेत.
1) वाणिज्य कर व जमीन महसूल
2) मद्य व इतर अंमलीपदार्थावरील राज्याचे उत्पादन शुल्क
3) मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी
4) वरीलपैकी सर्व कर
2) राज्यसरकारचे महत्त्वाचे महसूलाचे हे मार्ग आहेत.
a) राज्य सरकारचे स्वतःचे कर
b) केंद्र शासनाच्या महसूल उत्पन्नातील राज्य सरकारचा वाटा
c) केंद्र शासनाचे अनुदान व इतर मदत
d) राज्य सरकारचा कराच्या स्वरूपात नसलेला महसूल
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (b) फक्त
3) (c) फक्त
4) वरीलपैकी सर्व
3) खालील विधाने विचारात घ्या.
a) 2006-07 मध्ये केंद्रीय करांचा राज्यांच्या कर उत्पन्नातील वाटा 31% होता.
b) राज्यांच्या महसुलामध्ये कंपनी कराचे योगदान सर्वाधिक आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b)
4) यापैकी नाही
4) कर महसुलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्त्वाचा घटक ........ हा आहे.
1) गेल्या पाच वर्षातील दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग.
2) राज्याच्या लोकसंख्येची घनता
3) विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि देशातील दरडोई उत्पन्न यामधील अंतर
4) विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्याचे दरडोई उत्पन्न यातील अंतर
5) राज्य सरकारच्या उत्पन्नाच्या साधनाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
1) केंद्रसरकारमार्फत जमा केलेल्या करांमधून राज्य सरकारला काहीच दिले जात नाही
2) विक्रीकर हा राज्यसरकारच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग होता
3) अनुदानामधून राज्यसरकारांना बरेच उत्पन्न प्राप्त होते.
4) वरीलपैकी कोणतेही नाही.
6) राज्य सरकारने विक्रीकराच्या जागी कोणता कर लागू केला होता?
1) मूल्यवर्धित कर
2) राज्य उत्पादन शुल्क
3) केंद्रीय विक्री कर
4) सीमा शुल्क
7) व्यवसाय कराबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
1) व्यवसाय कराची कमाल मर्यादा रु.250 वरून रु.2500 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
2) ही वित्तीय मर्यादा वाढविण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यकता असते.
3) हा कर लावण्याची व वसूल करण्याचे अधिकार कोणत्याही परिस्थितीत स्थानिक प्राधिकरणाकडे सोपविता येत नाही.
4) व्यवसाय कर हा प्राप्ती कराचा एक भाग आहे या कारणावरून याबाबतचा राज्य कायदा असंवैधानिक ठरत नाही.
8) राज्याच्या एकत्रित निधीत कशाचा समावेश नसतो?
1) जमा होणारा महसूल
2) कर्जे उभारून जमा होणारा निधी
3) कर्जाच्या परतफेडीपोटी प्राप्त होणार निधी
4) कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेली रक्कम
9) खालील विधाने भारताच्या केंद्र आणि राज्यसरकारच्या महसूल प्रवाहासंबंधी आहेत.
a) कर महसुलामध्ये सर्वसाधारणपणे वाढ झाली आहे.
b) केंद्र सरकारचा महसूल हा राज्यसरकारच्या महसुलापेक्षा वेगाने वाढत आहे.
c) वैयक्तिक उत्पन्न कर हा केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा एक कर आहे.
d) केंद्र सरकारसाठी सर्वात महत्त्वाचा बिगरकर महसूल स्रोत म्हणजे केंद्रसरकारने राज्यसरकारांना दिलेल्या कर्जावरील व्याज.
वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
1) (a) आणि (b)
2) (a), (b) आणि (c)
3) (b), (c) आणि (d)
4) वरील सर्व
10) कर महसुलातील राज्यांचा वाटा ठरवणारा महत्त्वाचा घटक ........ हा आहे.
1) गेल्या पाच वर्षातील दरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग.
2) राज्याच्या लोकसंख्येची घनता
3) विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि देशातील दरडोई उत्पन्न यामधील अंतर
4) विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्याचे दरडोई उत्पन्न यातील अंतर
11) केंद्र सरकारकडून घटक राज्यांना कोणत्या करातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो ?
1) अबकारी कर
2) प्राप्ती कर
3) संपत्ती कर
4) विक्री कर
12) शेतीतील उत्पन्नावर आयकर लावण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
1) भारत सरकार
2) राज्य सरकार
3) जिल्हा परिषद
4) यापैकी कोणीही नाही
13) राज्यसरकारने विक्रीकराच्या जागी कोणता कर लागू केला?
1) मूल्यवर्धित कर (VAT)
2) राज्य उत्पादन शुल्क
3) केंद्रीय विक्री कर
4) सीमा शुल्क
14) महाराष्ट्राच्या सुधारीत पथकर धोरणा ( Toll Policy)
बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणार्या रस्त्यांच्या प्रकल्पांवर पथकर आकारला जाणार नाही.
ब) 200 कोटी रुपयांमधील प्रकल्प खाजगीकरणांतर्गत करण्यात येणार नाही.
क) फक्त 200 कोटी रुपयांमधील खाजगी प्रकल्पासाठी पथकर आकारला जाईल.
ड) एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांवरील अंतर किमान 20 किमी असावे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) अ, ब, आणि क
2) अ, क आणि ड
3) ब, क, आणि ड
4) अ, ब, क आणि ड
15) 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाचा ....... इतका वाटा मिळालेला आहे.
1) 17.959
2) 9.665
3) 5.521
4) 7.548
16) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे?
1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांच्या वित्तीय साधनांना पूरक निधी
2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे.
3) रस्ते आणि पूल बांधणे.
4) आर्थिक विकासास चालना देणे.
17) राज्याचा एकत्रित निधी म्हणजे
1) राज्य शासनाला प्राप्त झालेल्या महसुलाच्या सर्व रकमा.
2) राजकोष पत्रांच्या विक्रीद्वारे उभारलेली सर्व कर्जे व अर्थोपाय आगाऊ रकमा
3) कर्जाच्या परतफेडीच्या रूपाने शासनाकडे जमा झालेला पैसा
4) वरीलपैकी सर्व
18) महाराष्ट्राच्या नवीन सुधारीत पथकर धोरणा ( Toll Policy)
बाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणार्या रस्त्यांच्या प्रकल्पांवर पथकर आकारला जाणार नाही.
ब) 200 कोटी रुपयांमधील प्रकल्प खाजगीकरणांतर्गत करण्यात येणार नाही.
क) फक्त 200 कोटी रुपयांमधील खाजगी प्रकल्पासाठी पथकर आकारला जाईल.
ड) एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांवरील अंतर किमान 20 किमी असावे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
1) अ, ब, आणि क
2) अ, क आणि ड
3) ब, क, आणि ड
4) अ, ब, क आणि ड
19) खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश राज्यशासनाच्या देयकांमध्ये केला गेला आहे ?
a) भविष्यनिर्वाह निधी
b) राखीव निधी
c) वित्त आयोगाने शिफारशीत केलेले अनुदान
d) केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत.
1) फक्त (a)
2) फक्त (a), (b)
3) फक्त (a), (c), (d)
4) फक्त (b)
20) खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश राज्यशासनाच्या देयकांमध्ये केला आहे ?
अ) भविष्यनिर्वाह निधी
ब) केंद्र सरकारकडून घेतलेले कर्ज
क) राखीव निधी
1) अ व ब
2) ब व क
3) अ व क
4) वरील सर्व
(4) स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर
1) कोणत्या कराची वसुली व उत्पन्न स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असते ?
1) विक्री कर
2) आयकर
3) व्यवसाय कर
4) जकात कर
2) पंचायत राज्य संस्था निधीसाठी मुख्यत: ......... वर अवलंबून असतात.
1) स्थानिक कर
2) संपत्ती कर
3) शासकीय निधी (राज्यशासन)
4) केंद्र सरकारचे अनुदान व मदत
3) ग्राम पंचायत खालील कर बसवू शकत नाही.
1) इमारत कर
2) यात्रा कर
3) उत्पन्न कर
4) जत्रा कर
4) ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने कोणती?
1) घरपट्टी, पाणीपट्टी आणि यात्रा यातून त्यांना मिळणारा कर.
2) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील 30% वाटा त्यांना मिळतो.
3) विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यशासन ग्रामपंचायतीला अनुदान देते.
4) वरील सर्व.
5) गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती वाटा ग्रामपंचायतीला मिळतो?
1) 20%
2) 50%
3) वाटा मिळत नाही
4) वरील एकही नाही
6) ऑक्ट्रॉय-स्थानिक संस्था कर व मूल्यवर्धित कराबाबत काय खरे नाही?
a) ऑक्ट्रॉय ऐवजी स्थानिक संस्था कर आला 31.3.2012 रोजी.
b) शहरात येणार्या मालावर आकारल्या जाणार्या कराला ऑक्ट्रॉय म्हणतात.
c) स्थानिक संस्था कर हा वस्तूंच्या किंमतीवर आकारल्या जाणारी रक्कम आहे.
d) ऑक्ट्रॉय रोजी रोखीत वसूल केला जातो.
e) स्थानिक संस्था कर शहरात माल आणला गेल्यापासून 30 दिवसात भरला जातो.
f) व्यापार्यांना स्थानिक संस्था कर नको.
g) असे म्हटले जाते की शासन त्याऐवजी मूल्यवर्धित कर वाढवेल.
h) पुणे महानगरपालिकेकरता ऑक्ट्रॉय मोठे उत्पन्नाचे स्रोत होते- एकूण महसुलाच्या सुमारे 40% महसूल खेचून!
i) 2013-14 मध्ये पुमपा चे स्थानिक संस्था कर संकलन जवळपास पूर्वीच्या ऑक्ट्रॉय संकलनाएवढेच झाले.
j) अशी भिती आहे की स्थानिक संस्था कराऐवजी मूल्यवर्धित कर अधिक झाल्यास स्थानिक संस्था आपले आर्थिक स्वातंत्र्य गमावेल!
पर्याय -
1) (a) आणि (i)
2) (a) आणि (e)
3) (h) आणि (i)
4) (g) आणि (j)
7) स्थानिक नागरी संस्थामार्फत बसविण्यात येणारा मालमत्ता कर हा ....... वर ठरविण्यात येतो.
1) मालमत्तेची बाजार भावानुसार होणारी किंमत
2) मालमत्तेचे भाडे
3) करपात्र मूल्य
4) मालमत्तेचे क्षेत्र
8) भारतात नागरी स्थानिक संस्थांच्या महसुलाचे मुख्य स्रोत हे आहेत.
1) कर
2) फी व दंड
3) अनुदाने व कर
4) सेवा आकार
9) महानगरपालिका क्षेत्रात विकास शुल्क हे ... द्यावयाचे असते.
1) दर सहामाहीस
2) दर वर्षाला
3) एक वेळेस
4) वरीलपैकी कोणताही पर्याय नाही.
10) मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक संस्था कर (ङइढ) लागू होण्याची तारीख -
1) 1 एप्रिल 2013
2) 1 ऑक्टोबर 2013
3) 1 एप्रिल 2014
4) 1 ऑक्टोबर 2014
(5) प्रत्यक्ष कर
1) खालीलपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर आहे?
1) विक्रीकर
2) मूल्यवर्धित कर
3) उत्पादन शुल्क
4) संपत्ती कर
2) खालील करांपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही ?
1) देणगी कर
2) विक्री कर
3) संपत्ती कर
4) उत्पन्न कर
3) प्रत्यक्ष कराचा अंतिम करभार कोणावर पडतो ?
1) ग्राहक
2) सरकार
3) करदाता
4) व्यापारी
4) प्रत्यक्ष करांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) प्रत्यक्ष कराचा कराचा आणि कारभार एकाच व्यक्तीवर असतो.
b) प्रत्यक्ष कराचा करारात आणि कारभार मागणी व पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतो.
c) प्रत्यक्ष कराच्या बाबतीत कारभार इतरांवर ढकलता येत नाही.
d) प्रत्यक्ष करांच्या बाबतीत कारभार इतरांवर ढकलता येतो.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (c)
2) (a), (b), आणि (c)
3) (a), (b), आणि (d)
4) वरीलपैकी नाही
5) खालीलपैकी प्रत्यक्ष कर कोणता आहे ?
1) अबकारी कर
2) विक्री कर
3) आयकर
4) वरीलपैकी सर्व
6) आयकर हा ........... कर आहे.
1) प्रत्यक्ष
2) अप्रत्यक्ष
3) कार्पोरेट
4) मालमत्ता
7) खालीलपैकी कोणता एक प्रत्यक्ष कर आहे ?
1) अबकारी कर
2) करमणूक कर
3) सेवा कर
4) भांडवली लाभ कर
8) खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे ?
1) प्राप्ती कर
2) मनोरंजन कर
3) विक्री कर
4) जकात
9) कोणत्या दोन करांचे प्रमाण राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नाच्या संदर्भात (कर व राष्ट्रीय ढोबळ उत्पन्न गुणोत्तर) वाढले आहे?
1) प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर
2) अप्रत्यक्ष कर व सेवाकर
3) प्रत्यक्ष कर व सेवाकर
4) वरील सर्व
10) करांच्या संबंधित योग्य विधानाची निवड करा :
1) उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर नाही.
2) वस्तू व सेवा कर हे अप्रत्यक्ष कर आहेत.
3) संपत्ती कर हे सुद्धा अप्रत्यक्ष कर आहेत.
4) उत्पादन कर हे प्रत्यक्ष कर आहेत.
11) अप्रत्यक्ष कराचा करभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो?
1) मागणी पूर्णपणे अवलचिक असते.
2) मागणी पूर्णपणे लवचीक असते.
3) मागणी सापेक्ष असते.
4) मागणी सापेक्ष अलवचिक असते.
12) विजय केळकर समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे?
1) वित्तीय क्षेत्रात सुधारणा
2) प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणा
3) प्रशासकीय सुधारणा
4) व्यापार सुधारणा
13) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
1) 2007-08 ते 2011-12 या काळात केंद्र सरकारचा प्रत्यक्ष कर महसूल अप्रत्यक्ष कर महसुलापेक्षा अधिक आहे.
2) 2007-08 ते 2011-12 या काळात केंद्र सरकारचा कर महसूल प्रत्यक्ष कर महसुलापेक्षा अधिक आहे.
3) 2007-08 ते 2011-12 या काळात केंद्र सरकारचा प्रत्यक्ष करमहसूल व अप्रत्यक्ष कर महसूल समान आहे.
4) वरीलपैकी कोणतेही नाही.
(6) अप्रत्यक्ष कर
1) अप्रत्यक्ष कराबाबत कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो.
ब) अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही.
क) अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो.
ड) अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसर्या व्यक्तीवर पडतो.
1) फक्त अ आणि ब
2) फक्त अ आणि क
3) फक्त क आणि ड
4) वरीलपैकी कोणतेही नाही
2) खालीलपैकी कोणते अप्रत्यक्ष कर आहेत ?
1) आयकर किंवा उत्पन्न व खर्चावरील कर
2) मालमत्ता कर किंवा भांडवली व मालमत्तेवरील कर
3) वस्तूवरील कर किंवा वस्तू व सेवेवरील कर
4) वरीलपैकी कोणतेही नाही
3) अप्रत्यक्ष करांचा समाजावर ...... परिणाम होतो.
1) पुरोगामी
2) न्याय
3) प्रतिगामी
4) प्रमाणशीर
4) आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर :
1) वाढले
2) कमी झाले
3) ऋण झाले
4) स्थिर राहिले
5) विकसनशील राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कोणत्या कराचे जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते ?
1) अप्रत्यक्ष कर
2) प्रत्यक्ष कर
3) शेती कर
4) यापैकी कोणताही नाही
6) अप्रत्यक्ष कराचा भार कोणावर पडतो ?
1) उत्पादक
2) विक्रेता
3) ग्राहक
4) वरील सर्व
7) अप्रत्यक्ष कराचा करभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे केव्हा ढकलू शकतो?
1) मागणी पूर्णपणे अवलचिक असते.
2) मागणी पूर्णपणे लवचीक असते.
3) मागणी सापेक्ष असते.
4) मागणी सापेक्ष अलवचिक असते.
8) भारत सरकारला जास्त महसूल ....... करापासून मिळतो.
1) अप्रत्यक्ष
2) आयात
3) प्रत्यक्ष
4) निर्यात
9) कोणत्या कारणामुळे किमती वाढतात ?
1) अप्रत्यक्ष कर
2) प्रत्यक्ष कर
3) अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष कर
4) वरीलपैकी नाही
10) आर्थिक सुधारणानंतरच्या काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर :
1) वाढले
2) कमी झाले
3) ऋण झाले
4) स्थिर राहिले
11) अप्रत्यक्ष कराबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
अ) अप्रत्यक्ष कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो.
ब) अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येत नाही.
क) अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत करभार इतरांवर ढकलता येतो.
ड) अप्रत्यक्ष कराचा कराघात एका व्यक्तीवर आणि करभार दुसर्या व्यक्तीवर पडतो.
1) फक्त अ आणि ब
2) फक्त अ आणि क
3) फक्त क आणि ड
4) वरीलपैकी कोणतेही नाही
(7) करेतर महसूल
1) करेतर महसूल खालीलपैकी कोणत्या स्रोतातून येतो?
1) चलन, नाणीपाडणे, टांकसाळ
2) व्याज पावती व लाभांश
3) बाकी करेतर महसूल
4) वरीलपैकी सर्व
2) करेतर महसुलात याचा समावेश होतो :
a) व्याज प्राप्ती
b) लाभांश व नफा
c) अनुदान
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (a) व (b) फक्त
3) (a) व (c) फक्त
4) वरील सर्व
3) खालीलपैकी राज्यांचा करेतर महसूल कोणता ?
1) केंद्र सरकारच्या करउत्पन्नातील राज्याचा वाटा.
2) जनतेच्या अल्प बचती
3) संपत्ती व भांडवली व्यवहारांवर राज्यांनी आकारलेले कर.
4) केंद्र सरकारचा मदत निधी
4) करेत्तर महसुली उत्पन्नामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ?
अ) वित्तीय सेवांपासूनचे उत्पन्न
ब) व्याजापासूनचे उत्पन्न
क) लाभांश व नफा (सार्वजनिक उपक्रम)
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ब
2) फक्त अ आणि क
3) फक्त ब आणि क
4) वरील सर्व
उत्तरे : प्रश्नमंजुषा (85)
सार्वजनिक वित्तीय संरचना : करप्रणाली
1-3
2-1
3-3
4-1
5-1
(1) कर संक्रमण व कराघात
1-2
2-3
3-4
4-3
5-2
6-4
7-2
8-3
9-4
10-3
11-4
12-4
(2) केंद्र शासनाचे कर
1-3
2-2
3-1
4-2
5-1
6-1
7-1
8-2
9-3
10-2
11-2
12-4
13-4
14-1
15-4
16-1
(3) राज्य सरकारचे प्रमुख कर
1-4
2-4
3-1
4-4
5-2
6-1
7-3
8-4
9-1
10-4
11-2
12-2
13-1
14-1
15-3
16-2
17-3
18-1
19-3
20-1
(4) स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर
1-4
2-3
3-3
4-4
5-4
6-2
7-3
8-3
9-2
10-3
(5) प्रत्यक्ष कर
1-4
2-2
3-3
4-1
5-3
6-1
7-4
8-1
9-3
10-2
11-1
12-2
13-1
(6) अप्रत्यक्ष कर
1-3
2-3
3-3
4-2
5-1
6-3
7-1
8-1
9-1
10-2
11-3
(7) करेतर महसूल
1-4
2-4
3-4
4-4