प्रश्नमंजुषा 83 : अर्थसंकल्पातील तुटी
- 02 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 4605 Views
- 15 Shares
अर्थसंकल्पातील तुटी
(1) वित्तीय (राजकोषीय) तूट
1) केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकातील खालील कोणती तूट सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न यातील अचूक फरक दर्शविते ?
1) राजकोषीय
2) प्राथमिक तूट
3) महसुली तूट
4) अर्थसंकल्पीय तूट
2) राजकोषीय तूट = महसुली प्राप्ती + .......... एकूण खर्च
1) भांडवली प्राप्ती
2) महसुली प्राप्ती
3) अंदाजपत्रकीय तूट
4) सरकारने बाजारातून उभारलेले कर्ज
3) राजकोषीय तूट = ...... + सरकारने बाजारातून उभारलेले कर्ज व देयता.
1) भांडवली प्राप्ती
2) महसुली खर्च
3) एकूण खर्च
4) अंदाजपत्रकीय तूट
4) एकूण खर्च - (प्राप्ती + घ्यावयाची रक्कम + सार्वजनिक मालमत्तेची विक्री) =
1) राजकोषीय तूट
2) अंदाजपत्रकीय तूट
3) प्राप्ती तूट
4) प्राथमिक तूट
5) वित्तीय तूट/राजकोषीय तूट म्हणजे :
a) वित्तीय तूट = अंदाजपत्रकीय तूट + कर्जे व अन्य देयता.
b) वित्तीय तूट = एकूण प्राप्ती - एकूण खर्च
c) वित्तीय तूट = महसुली उत्पन्न - महसूल खर्च
d) वित्तीय तूट = भांडवली उत्पन्न - भांडवली देयता.
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (b) व (c)
3) (c) व (d)
4) (d) फक्त
6) मौद्रिक तूट म्हणजे :
a) केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडून केलेल्या उचल रकमेमध्ये झालेली निव्वळ वाढ.
b) वित्तीय तुटीतून दिलेले व्याज वजा केल्यानंतर राहणारी शेष तूट होय.
c) महसुली प्राप्ती, अनुदाने, कर्जेत्तर भांडवली प्राप्ती यांच्यापेक्षा सरकारच्या खर्चाचे आधिक्य.
d) महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च आधिक्य.
पर्यायी उत्तरे :
1) (a) बरोबर
2) (b) बरोबर
3) (c) बरोबर
4) (d) बरोबर
7) खालील विधाने विचारात घ्या :
अ) वित्तीय तूट म्हणजे चालू वित्तीय प्राप्तीपेक्षा चालू वित्तीय खर्च जास्त असणे.
ब) अंदाजपत्रकीय तूट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे.
क) राजकोषीय तुट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणार्या एकूण उत्पन्नाची निर्देशक असते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त अ
4) फक्त क
8) सुखमॉय चक्रवर्ती समितीच्या शिफारशीनुसार वास्तव तुटीच्या संकल्पनेचे योग्य अर्थ बोधन होण्यासाठी खालीलपैकी कोणती संकल्पना योग्य आहे?
1) महसुली तूट
2) राजकोषीय तूट
3) प्राथमिक तूट
4) वरीलपैकी कोणतीही नाही
9) भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
a) देशांतर्गत कर्जे अर्थसंकल्पीय तूट कमी करण्यासाठी उभारली जातात.
b) बाहेरील देशांतून उभारलेली कर्जे व्यवहार शेष भरुन काढण्यासाठी वापरली जातात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) आणि (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
10) खालीलपैकी कोणते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीच्या आर्थिक अरिष्टाचे कारण होते ?
1) राजकोषीय तूट 1991 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 7.8 टक्के पर्यंत वाढली.
2) केंद्र सरकारचे अंतर्गत कर्ज 1991 मध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 49.7 टक्केपर्यंत वाढले.
3) ऋण व्यवस्थापनाचा भार हा केंद्र सरकारच्या एकूण खर्चाच्या 22.0 टक्केपर्यंत वाढला.
4) वरील सर्व कारणे
11) 2013-14 च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.8 प्रतिशतपर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे साध्य करणे अपेक्षित होते :
अ) निर्गुंतवणुकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे.
ब) कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे.
क) अर्थ सहाय्यावरील खर्चात कपात करणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
1) अ फक्त
2) ब आणि क फक्त
3) अ आणि क फक्त
4) अ, ब आणि क
12) 13 व्या वित्तीय आयोगानुसार वर्ष 2012-13 साठी राज्यांची लक्षांकित राजकोषीय तूट किती कोटी होती आणि वर्ष 2012-13 मध्ये महाराष्ट्र सरकारची राजकोषीय तूट किती कोटी होती?
1) राज्यांची लक्षांकित राजकोषीय तूट GSDP च्या 2.5% आणि महाराष्ट्र राज्याची राजकोषीय तूट GSDP च्या 1.7% होती.
2) राज्यांची लक्षांकित राजकोषीय तूट GSDP च्या 2.5% महाराष्ट्राची राजकोषीय तूट GSDP च्या 2.6% होती.
3) राज्यांची लक्षांकित राजकोषीय तूट GSDP च्या 2.5% आणि महाराष्ट्राची राजकोषीय तूट GSDP च्या 3% होती.
4) राज्यांची लक्षांकित राजकोषीय तूट GSDP च्या 2.5% आणि महाराष्ट्राची राजकोषीय तूट 2.5% होती.
13) सन 2011-12 मधील केंद्र सरकारच्या राज्यकोषीय असमतोल संदर्भात खालील जोड्या जुळवा :
स्तंभ अ (तपशील) स्तंभ ब (टक्केवारी)
अ) महसुली तुट I) 2.7%
ब) स्थूल राज्यकोषीय तूट II) 4.4%
क) प्राथमिक तुट III) 3.1%
ड) व्याजावरील खर्च IV) 5.7%
अ ब क ड
1) II IV I III
2) I II III IV
3) IV III II I
4) III IV I II
(2) महसुली तूट
1) महसुली तूट म्हणजे काय?
1) महसुली प्राप्ती आणि महसुली खर्चातील फरक
2) महसुली खाते आणि भांडवली खाते यांमधील फरक
3) नियोजीत आणि नियोजनेतर खर्चातील तफावत
4) मागणी आणि पुरवठ्यामधील तफावत
2) खालील विधाने तुटीच्या संदर्भातील आहे तः
अ) महसुली तुट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे.
ब) अंदाजपत्रकीय तुट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे.
क) राजकोषीय तुट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणार्या एकूण महसुली गरजांची निदर्शक असते.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) फक्त अ व ब
2) फक्त ब व क
3) फक्त अ व क
4) वरील सर्व
3) 1951 ते 1975 या कालावधीत केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात कोणती प्रवृत्ती दिसून येते?
1) महसुली वाढावा
2) महसुली तूट
3) महसुली खर्च व उत्पन्न समान
4) महसुली तूट आणि महसुली वाढावा
4) महाराष्ट्राचे अंदाजपत्रक 2011-12 च्या भाग ख नुसार उत्पन्न तूट (Revenue Deficit) किती होती?
1) 5688 कोटी
2) 7899 कोटी
3) 9860.2 कोटी
4) 5788 कोटी
5) जोड्या लावा :
यादी - I यादी - II
(राजकोषीय निर्देशक) (अंदाज पत्रकीय अनुमान (2018-19) सकल उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार)
a) राजकोषीय तूट I) 12.1
b) महसुली तूट II) 48.8
c) वर्ष अखेरीस एकूण थकबाकी देयता III) 2.2
d) स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर महसूल प्रमाण IV) 3.3
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (iii) (i) (iv) (ii)
3) (iv) (iii) (ii) (i)
4) (ii) (iv) (i) (iii)
(3) प्राथमिक तूट
1) राजकोषीय तूटीतून .... वजा केल्यावर प्रामिक तूट मिळते.
1) व्याज देणे
2) व्याज जमा
3) निव्वळ व्याज देणे
4) वरीलपैकी नाही
2) अंदाजपत्रकातील प्राथमिक तूट याचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
अ) एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च
ब) महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च
क) वित्तीय तूट वजा कर्जावरील व्याज
ड) वरीलपैकी सर्व
वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहेत?
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ड
4) फक्त क
3) अर्थसंकल्पातील तुटीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) महसुली तूट म्हणजे सरकारच्या महसुली खर्च आणि वर्तमान महसूल यामधील फरक होय.
2) प्राथमिक तूट म्हणजे वित्तीय तूट वजा व्याजदेयक.
3) वित्तीय तूट म्हणजे पूर्ण सरकारी खर्च आणि अनुदानासहित पूर्ण सरकारी महसूल यामधील फरक होय.
4) प्राथमिक तूट ही सरकारच्या एकूण संसाधन पोकळीचे परिमाण आहे.
4) या काळात भारत सरकार प्राथमिक तूट जीडीपीच्या टक्केवारी दृष्टीने ऋण होती.
1) 2007-08 आणि 2008-09
2) 2010-11 आणि 2011-12
3) 2006-07 आणि 2007-08
4) 2012-13 आणि 2013-14
5) केंद्र सरकारच्या राजकोषीय असमतोलाच्या संदर्भात (2015-16) खालील जोड्या जुळवा :
कॉलम अ (तपशील) कॉलम ब (स्थूल देशांतर्गत उत्पादनाची टक्केवारी)
अ) महसुली तूट i) 1.9%
ब) स्थूल राजकोषीय तूट ii) 0.7%
क) प्राथमिक तूट iii) 3.9%
ड) मुख्य अनुदाने iv) 2.5%
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (iv) (iii) (ii) (i)
3) (iii) (iv) (i) (ii)
4) (ii) (i) (iv) (iii)
(4) अंदाजपत्रकीय तूट
1) अंदाजपत्रकीय तूट म्हणजे -
1) एकूण खर्च वजा एकूण प्राप्ती
2) महसूली प्राप्त अधिक भांडवली प्राप्ती वजा एकूण खर्च
3) राजकोषीय तूट वजा व्याज देणी
4) महसूली खर्च वजा महसूली प्राप्ती
2) अर्थसंकल्पीय तूट या संज्ञेचा नेमका अर्थ कोणता?
1) महसुली जमा आणि महसुली खर्च यांतील अंतर
2) एकूण जमा आणि एकूण खर्च यातील अंतर
3) राजकोषीय तूट व प्राथमिक तूट
4) क्रमांक दोन व तीन दोन्ही
3) खालील विधाने लक्षात घ्या :
अ) अर्थसंकल्पीय तुटीचा भरणा करणारी ट्रेझरी बिल पद्धती 1997 पासून खंडित करण्यात आली आहे.
ब) ट्रेझरी बिलांची जागा वेझ अँड मीन्स अॅडव्हान्स यांनी घेतली आहे.
वरीलपैकी कोणते विधान (ने) बरोबर आहे/आहेत?
1) फक्त अ बरोबर आहे
2) फक्त ब बरोबर आहे
3) अ व ब दोन्हीही बरोबर आहेत
4) अ व ब दोन्हीही चूक आहेत
4) जोड्या लावा.
संज्ञा स्पष्टीकरण
अ) राजकोषीय तूट I) एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्चाचे अधिक्य
ब) अर्थसंकल्पीय तूट II) महसुली उत्पन्नापेक्षा महसुली खर्च अधिक असणे
क) महसुली तूट III) एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्जे
ड) प्राथमिक तूट IV) एकूण खर्चाचा एकूण प्राप्तीवरील अधिकांश वजा कर्जें व व्याजदेयता
(a) (b) (c) (d)
1) III I II IV
2) IV III II I
3) I III II IV
4) III I IV II
(5) तुटीचा अर्थभरणा
1) तुटीचा अर्थभरणा म्हणजे -
1) सार्वजनिक खर्चापेक्षा सार्वजनिक महसूल जास्त असणे
2) सार्वजनिक महसुलापेक्षा सार्वजनिक खर्च जास्त असणे
3) 1 आणि 2 दोन्ही
4) वरीलपैकी कोणतेही नाही
2) भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात :
a) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे.
b) (सरकारने) बाजारात आणलेल्या सरकारी हुंडींच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे.
c) चलन निर्माण करणे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (c)
2) (b) आणि (c)
3) (a) आणि (b)
4) सर्व (a), (b), (c)
3) भारतामध्ये वित्तीय तुटीचा अर्थभरणा कोणत्या प्रकारच्या संसाधनाच्या निर्मितीसाठी केला जातो ?
1) आर्थिक विकास
2) सार्वजनिक कर्ज भागविणे
3) व्यवहारतोलाचे समायोजन
4) परकीय कर्ज कमी करणे
4) तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही ?
1) आर्थिक विकासासाठी वित्तव्यवस्था करणे.
2) नियोजनासाठी भांडवल पुरविणे.
3) अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे.
4) विकास योजनेसाठी वित्त पुरवठा करणे.
5) भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
a) देशांतर्गत कर्जे अर्थसंकल्पीय तुट कमी करण्यासाठी उभारली जातात.
b) बाहेरील देशांतून उभारलेली कर्जे व्यवहार शेष भरुन काढण्यासाठी वापरली जातात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) आणि (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
6) पुढीलपैकी कशाचा समावेश तुटीच्या अर्थभरण्याच्या परिणामांमध्ये होतो ?
अ) किंमतीमध्ये वाढ
ब) बचत रचनेत बदल
क) बँकांची पतनिर्मिती
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ब
2) फक्त अ आणि क
3) फक्त ब आणि क
4) वरील सर्व
7) खालील विधाने तुटीच्या वित्तव्यवस्थेच्या संदर्भातील आहेतः
a) याचा उत्कृष्ट वापर चलनवाढीच्या काळात प्रभावी मागणीस उत्तेजन देण्यासाठी केला जातो.
b) पैशाचे लोकांकडून वा बँकेकडून देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे हस्तांतरण यातून सूचित होते.
c) देशाच्या अर्थसंकल्पाच्या चालू खात्यातील तुट भरून काढण्याचे हे साधन आहे.
d) याचा वापर आर्थिक मंदी दूर करण्यासाठी केला जातो. पण आर्थिक विकासास पैसा पुरवण्यासाठी हे साधन प्रभावी नाही.
वरीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
1) वरीलपैकी सर्व
2) वरीलपैकी कोणतेही नाही
3) (a) आणि (b)
4) (b) आणि (c)
8) भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात ः
a) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेणे.
b) (सरकारने) बाजारात आणलेल्या सरकारी हुंडींच्या प्रमाणात भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे.
c) चलन निर्माण करणे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (c)
2) (b) आणि (c)
3) (a) आणि (b)
4) सर्व (a), (b), (c)
उत्तरे : प्रश्नमंजुषा (83)
(1) वित्तीय (राजकोषीय) तूट
1-1
2-1
3-4
4-1
5-1
6-1
7-1
8-2
9-3
10-4
11-4
12-1
13-1
(2) महसुली तूट
1-1
2-1
3-2
4-3
5-3
(3) प्राथमिक तूट
1-1
2-4
3-4
4-1
5-2
(4) अंदाजपत्रकीय तूट
1-1
2-4
3-3
4-1
(5) तुटीचा अर्थभरणा
1-2
2-4
3-1
4-3
5-3
6-2
7-2
8-4