प्रश्नमंजुषा 82 : अर्थसंकल्पाचे प्रकार
- 02 Feb 2021
- Posted By : Study Circle
- 6106 Views
- 8 Shares
अर्थसंकल्पाचे प्रकार
(1) शून्याधारित अर्थसंकल्प
1) शून्याधारित अंदाजपत्रक तंत्र सर्वप्रथम ...... या देशाने राबविले
1) इंग्लंड
2) अमेरिका
3) भारत
4) जपान
2) शून्याधारित अर्थसंकल्पाच्या संकल्पनेचा प्रवर्तक कोण आहे?
1) पीटर एस. सन्स
2) पीटर ए. पीहर
3) पीटर एम. जॉफरी
4) यापैकी नाही
3) प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते ...... अंदाजपत्रक होय.
1) कायदे मंडळ
2) रोख
3) बहुआयामी
4) शून्याधारित
4) शून्याधारित अंदाजपत्रक खालील कोणत्या मूलभूत गृहीतकावर आहे?
1) गतवर्ष हे मूळ वर्ष म्हणून गृहित धरले जात नाही.
2) प्रत्येक वर्ष हे नवीन वर्ष असते.
3) खर्चाचा अंदाज करताना शून्य आधार मानला जातो.
4) वरीलपैकी सर्व
5) शून्याधारित अर्थसंकल्पामध्ये
अ) गतवर्षीपासून आरंभ असतो
ब) प्रत्येक कृतीचे समर्थन करावे लागते
क) खर्च नियंत्रण महत्त्वाचे असते
ड) परिणामकारकता महत्त्वाची असते
1) ब आणि ड
2) अ आणि ब
3) क आणि ड
4) अ, ब आणि ड
6) शून्याधारित अंदाजपत्रक तयार करण्यामागे सरकारचा काय हेतू असतो?
1) आयातीवर नियंत्रण
2) चलनवाढ नियंत्रण
3) योजनेतर खर्चावर नियंत्रण
4) सरकारच्या वाढीव खर्चावर नियंत्रण
7) खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजपत्रकात विद्यमान कार्यक्रम आणि उपक्रम यांना आपोआप/स्वयंचलित निधी उपलब्ध होत नाही?
1) पारंपरिक अर्थसंकल्प
2) तात्पुरता अर्थसंकल्प
3) शून्याधारित अर्थसंकल्प
4) असमाधानकारक (Lame)/नकारात्मक (duck)अर्थसंकल्प
8) शून्याधारित अंदाजपत्रकाच्या गरजा खालील बाबींमधून शोधा:
i) उद्दिष्टे निश्चित करणे आणि मर्मभेदक बनविणे.
ii) उद्दिष्टे आणि कार्यक्रम यांचा अग्रक्रम बनविणे.
iii) व्यय-लाभ आणि व्यय-परिणामकारकता यांच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट पर्यायाची निवड करणे.
iv) गतकाळात मान्य झालेल्या योजना आणि कार्यक्रम पुढील कोणतेही परीक्षण न करता तसेच चालू ठेवणे
1) (i) (ii) (iv)
2) (ii) (iii) (iv)
3) (i) (ii) (iii)
4) (i) (iii) (iv)
9) शून्याधारित अर्थसंकल्पात ...... समाविष्ट असते.
1) निर्णय पुडक्यांची मांडणी
2) निर्णय पुडक्यांना दर्जा देणे
3) निवडलेल्या पुडक्यांना संसाधनाचे वाटप करणे
4) वरील सर्व
10) खालील विधाने विचारात घ्या ः
i) ज्या संघटनांमध्ये शून्याधारित अंदाजपत्रक अमलात आणले जाते अशा काही संघटनांमध्ये विविध विभाग बचत दाखवायला नाखूष असतात.
ii) त्यांना असे भय वाटते की जी रक्कम वाचवलेली आहे ती रक्कम अन्य खात्याकडे वर्ग करण्यात येईल.
आता खालील पर्यायातून योग्य उत्तर निवडा.
1) (i) हे चूक आहे परंतु (ii) हे बरोबर आहे.
2) (i) हे बरोबर आहे परंतु (ii) हे चूक आहे.
3) (i) आणि (ii) हे दोन्ही बरोबर आहेत परंतु (ii) हे (i) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
4) (i) आणि (ii) हे दोन्ही बरोबर आहेत आणि (ii) हे (i)चे योग्य स्पष्टीकरण आहे.
11) शून्याधारित अंदाजपत्रकाबद्दल कोणतेही विधान खरे नाही?
1) पारंपरिक अंदाजपत्रकाची प्रक्रिया ते उलट दिशेने नेते.
2) मागील खर्चाची पातळी विचारार्थ घेते.
3) प्रत्येक विभागाच्या कामकाजाचा आढावा घेते.
4) संपूर्ण अंदाजपत्रकातील वाढ किंवा घट याबद्दल ते तटस्थ असते.
(2) कामगिरी बजेट
1) कोणत्या प्रकारचे बजेट हे विविध सरकारी कामकाजाच्या भौतिक व वित्तीय घटकांचे एकत्रीकरण करून आदाने व प्रदाने यांच्यात अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करते ?
1) शून्याधारित बजेट
2) कामगिरी बजेट
3) वित्तीय बजेट
4) आयटम सूची बजेट
2) खालील विधाने विचारात घ्या :
i) परफॉर्मन्स अंदाजपत्रकाला ठरावीक मर्यादा आहेत.
ii) अंदाजपत्रक प्रक्रियेतील प्रशासकीय उणिवांबाबत त्यातून कोणताच उपाय मिळत नाही.
आता खालील पर्यायातून योग्य उत्तराची निवड करा.
1) (i) आणि (ii) दोन्ही बरोबर आहेत आणि (ii) हे (i) चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) (i) आणि (ii) दोन्ही बरोबर आहेत परंतु (ii) हे (i) चे योग्य स्पष्टीकरण नाही.
3) (i) चूक आहे परंतु (ii) बरोबर आहे.
4) (i) बरोबर आहे परंतु (ii) चूक आहे.
(3) लिंग अंदाजपत्रक
1) लिंग अंदाजपत्रक म्हणजे ......
1) अधिक लिंग समान समाजासाठी वित्तीय तरतूद
2) अधिक लिंग असमान समाजासाठी वित्तीय तरतूद
3) मानवी विकास साध्य करण्यासाठी वित्तीय तरतूद
4) प्रत्येक नागरिकाच्या समानतेसाठी वित्तीय तरतूद
(4) लेखानुदान
1) विनियोजन विधेयक विधानमंडळात मंजूर होईपर्यत नवीन वर्षाच्या काही काळासाठी खर्चासाठी विधानमंडळाने मंजूर केलेले आगाऊ अनुदान म्हणजे?
1) पूरक अनुदान
2) लेखानुदान
3) सुधारित विनियोजन
4) लाक्षणिक अनुदान
2) लेखानुदान आणि हंगामी अर्थसंकल्प यातील फरक ओळखा.
अ) लेखानुदानाचा वापर नियमित सत्तेत असलेले सरकार करते तर हंगामी अर्थसंकल्प कायदा व सरकारद्वारे सादर केले जातात.
ब) लेखानुदान फक्त सरकारच्या अर्थसंकल्पीय कर्जाशी संबंधित असते, तर हंगामी अर्थसंकल्प हा खर्च आणि जमा या दोन्हींशी संबंधित असतो.
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ फक्त ब दोन्ही
4) अ किंवा ब दोन्हीही नाहीत.
(5) मुख्य व पूरक अंदाजपत्रक
1) सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत?
1) 2
2) 3
3) 4
4) वरीलपैकी कोणतेही नाही
2) जे अंदाजपत्रक व्यवसायाच्या सगळ्या कार्यात्मक क्षेत्रांचा समावेश करते त्याला ......
1) निदेशक / मुख्य अंदाजपत्रक (Master Budget)
2) विक्री अंदाजपत्रक
3) उत्पादन अंदाजपत्रक
4) रोख अंदाजपत्रक (Cash Budget)
3) संकेतमान्य (क्रमशः वाढणारे) अंदाजपत्रकाबद्दल कोणतेही विधान खरे नाही.
1) ते स्थिर आणि क्रमशः बदलते.
2) भिन्न घटकातील अंदाजपत्रकांचे सुसूत्रीकरण करणे सोपे असते.
3) अंदाजपत्रकाच्या कमालमर्यादेपर्यंत खर्च करण्यापासून ते परावृत्त करणे.
4) ही पद्धत समजण्यास आणि वापरात आणण्यास सोपी आहे.
4) केंद्र सरकार पूरक अंदाजपत्रक केव्हा सादर करते ?
1) रोजगार निर्मिती होण्याकरिता
2) गरिबी निर्मूलनाकरिता
3) युद्ध भूकंप यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत
4) चलनवाढ नियंत्रित ठेवण्याकरिता
5) विशिष्ट भविष्य कालावधीसाठी उत्पन्न व खर्चाचा अंदाज करून तक्ता तयार करणे याला ......... म्हणतात.
1) वेळेचा अंदाजपत्रक
2) प्रमुख अंदाजपत्रक
3) कार्यरत अंदाजपत्रक
4) आर्थिक अंदाजपत्रक
6) विविध प्रशासकीय कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक रकमेचे पूर्वानुमान करण्याच्या उद्देशाने तयार केलेले अंदाजपत्रक म्हणजे ...... होय.
1) विक्री आणि वितरण अंदाजपत्रक
2) भांडवली खर्च अंदाजपत्रक
3) उत्पादन खर्च अंदाजपत्रक
4) प्रशासकीय खर्च अंदाजपत्रक
(6) भांडवली अर्थसंकल्प
1) भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये ......... चा समावेश होतो.
1) अंदाजित प्राप्ती व अंदाजित खर्च
2) भांडवली प्राप्ती व भांडवली खर्च
3) महसुली प्राप्ती व महसुली खर्च
4) वरील सर्व तिन्ही प्राप्ती व खर्च
2) केंद्र सरकारच्या भांडवली उत्पन्नामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो ?
a) अंतर्गत कर्जापासून उत्पन्न
b) बहिर्गत कर्जापासून उत्पन्न
c) अल्प बचतीपासून उत्पन्न
d) भविष्य निर्वाह निधीपासूनचे उत्पन्न
योग्य पर्याय निवडा :
1) (a) आणि (b)
2) (c) आणि (d)
3) (a),(c) आणि (d)
4) वरील सर्व
3) भारतातील भांडवली अर्थसंकल्पाबाबत योग्य विधाने शोधा.
a) त्यामध्ये सार्वजनिक लेख्यातील व्यवहाराचा समावेश होतो.
b) त्यामध्ये सरकारने रिझर्व्ह बँकेकडून घेतलेल्या उसनवारीचा समावेश होतो.
1) फक्त (a)
2) फक्त (a) चूक
3) फक्त (b)
4) दोन्ही बरोबर
(7) महसुली अंदाजपत्रक
1) खालीलपैकी कोणता/कोणते महसुली अंदाजपत्रकाचा भाग नाही/नाहीत ?
अ) शेअर्स/भागामधील गुंतवणूक
ब) वस्तूंवरील चालू उपभोग खर्च
क) हस्तांतरणीय देणी
ड) सेवांवरील चालू उपभोग खर्च
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब आणि क
3) फक्त क
4) फक्त अ आणि ड
2) सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते?
1) महसूली
2) भांडवली
3) तुटीचे
4) शिल्लकीचे
(8) तुटीचे व शिल्लकीचे अंदाजपत्रक
1) जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो, त्याला ....... म्हणतात.
1) आधिक्य अंदाजपत्रक
2) तुटीचे अंदाजपत्रक
3) समतोल अंदाजपत्रक
4) वरीलपैकी कोणतेही नाही
2) तुटीच्या अंदाजपत्रकाची आवश्यकता भारतामध्ये यामधून निर्माण झाली :
a) सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठी आवश्यक तेवढा निधी जमा करण्यामागील शासनाचे अपयश.
b) विकासबाह्य अनुत्पादक कामांवरचा वेगाने वाढणारा खर्च.
वरीलपैकी कुठले बरोबर आहे ?
1) (a)
2) (b)
3) (a) आणि (b)
4) कुठलेच नाही.
3) तुटीचे अंदाजपत्रक म्हणजे
1) खर्चापेक्षा महसूल अधिक
2) महसुलापेक्षा खर्च अधिक
3) समान महसूल आणि खर्च
4) निर्यातीपेक्षा आयात अधिक
4) अंदाजपत्रकीय तूट = एकूण प्राप्ती - .............
1) भांडवली खर्च
2) एकूण खर्च
3) महसुली खर्च
4) सरकारचे कर्ज आणि दायित्व
5) तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते?
1) उत्पादनात घट
2) बँकांना तोटा होता
3) किंमत पातळीत वाढ
4) वरीलपैकी कोणतेही नाही
6) खालील विधाने विचारात घ्या :
अ) शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.
ब) तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
क) भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधाने/ने असत्य आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) अ आणि ब
2) ब आणि क
3) फक्त ब
4) फक्त क
उत्तरे : प्रश्नमंजुषा (82)
(1) शून्याधारित अर्थसंकल्प
1-2
2-2
3-4
4-4
5-1
6-4
7-3
8-3
9-4
10-4
11-2
(2) कामगिरी बजेट
1-2
2-1
(3) लिंग अंदाजपत्रक
1-1
(4) लेखानुदान
1-2
2-2
(5) मुख्य व पूरक अंदाजपत्रक
1-2
2-1
3-2
4-3
5-4
6-4
(6) भांडवली अर्थसंकल्प
1-2
2-4
3-4
(7) महसुली अंदाजपत्रक
1-1
2-1
(8) तुटीचे व शिल्लकीचे अंदाजपत्रक
1-2
2-3
3-2
4-2
5-3
6-4