प्रश्‍नमंजुषा 81 : अर्थसंकल्प

  •  प्रश्‍नमंजुषा 81 : अर्थसंकल्प

    प्रश्‍नमंजुषा 81 : अर्थसंकल्प

    • 02 Feb 2021
    • Posted By : Study Circle
    • 3613 Views
    • 3 Shares

    अर्थसंकल्प

    (1) अर्थसंकल्पाची व्याख्या, स्वरुप आणि वैशिष्ट्ये
    1) कोणत्या फ्रेंच शब्दावरून ‘बजेट’ ही संज्ञा तयार करण्यात आली आहे ?  
    1) बुगेट
    2) बुके
    3) बुगोटा
    4) बजेटो
     
    2) अंदाजपत्रक ...... हे सूचना व समर्पक माहिती देणारा लिखित संच असून त्याचा उपयोग अंदाजपत्रक कार्यक्रम अंमलबजावणीसाठीची नियम पुस्तिका व संदर्भ म्हणून होतो. 
    1) पुस्तिका
    2) पुस्तक
    3) उद्दिष्ट्ये  
    4) वरीलपैकी कोणतेही नाही
     
    3) विशिष्ट भविष्यकाळासाठी संख्यात्मक रूपात तयार केलेल्या योजनेला काय म्हणतात ? 
    1) कार्यक्रम
    2) अंदाजपत्रक
    3) उत्पन्न पत्रक
    4) बृहत आराखडा
     
    4) अंदाजपत्रक म्हणजे काय? 
    1) नियोजनाची खर्चाविषयीची रूपरेषा
    2) ताळेबंद 
    3) वार्षिक वित्त पत्रक
    4) खर्चविषयक अंदाज
     
    5) ‘वित्तीय प्रशासनाचा आत्मा‘ कशाला म्हणतात ?
    1) अंदाजपत्रक
    2) वित्तपत्रक
    3) योजनापत्रक
    4) वरीलपैकी नाही
     
    6) कार्यकारी व्यवस्थापन व कायदेशीर नियंत्रणाचे प्रभावी साधन कोणते ?
    1) अंदाजपत्रक
    2) लेखापरीक्षण
    3) निर्णायक मत
    4) निगराणी समिती 
     
    7) अर्थसंकल्प प्रस्थापित करणे, वास्तविक कार्यपालनाची नोंद करणे, प्रत्यक्ष व अंदाजित निकालांची तुलना करणे, फरकांची कारणमीमांसा करणे, सुधारकृती व उजळणी करणे या .......... प्रक्रियेतील पायर्‍या आहेत. 
    1) खर्च नियंत्रण व फरक विश्‍लेषण
    2) अर्थसंकल्पीय नियंत्रण
    3) वित्तनियंत्रण
    4) वरील कोणतेही नाही
     
    8) सरकारच्या अंदाजपत्रकीय धोरणाचा मुख्य उद्देश काय असतो?
    1) सार्वजनिक कर्जे कमी करणे
    2) साधनसामग्रीची उभारणी आणि गतिक्षमता
    3) चलनविषयक व्यवस्थापन
    4) विदेश विनिमय व्यवस्थापन
     
    9) सदोष अर्थसंकल्पात खालील बाबींचा समावेश होतो, असे म्हणता येणार नाही.
    1) एकाच बाबीकरिता दोन लेखाशिषाखाली तरतूद
    2) खर्चाच्या अपेक्षित बाबींसाठी तरतूद न करणे.
    3) वाजवीपेक्षा कमी किंवा अधिक तरतूद करणे
    4) मागील वर्षी जमा झालेल्या रक्कमांचा ओघ व चालू वर्षी प्रत्यक्ष जमा होणार्‍या रकमांचा कल विचारात घेऊन जमा रकमांचे अचूक अंदाज.
     
    10) खालीलपैकी कोणते विधान केन्सच्या सार्वजनिक वित्तव्यवस्थेवरील विचारांचे प्रतिनिधित्व करते ?
    1) जेव्हा अर्थव्यवस्थेत संसाधनेच बेकार असतील (न वापरलेली) तेव्हा अर्थसंकल्पाचा आकार लहान व समतोल ठेवणे शहाणपणाचे नसते.
    2) अर्थसंकल्पातील तूट टाळली पाहिजे.
    3) अर्थसंकल्पातील तूट चलनवाढीस चालना देणारी असते. 
    4) उपभोगावर कर असणे हे बचतीवर कर असण्यापेक्षा आवश्यक आहे.

    (2) केंद्र सरकारचा अर्थसंकल्प
    1) संविधानाच्या सेक्शन .......... अन्वये संसदेच्या दोन्ही सदनांसमोर ‘वार्षिक वित्तीय पत्रक’ (Annual Financial Statement)ठेवले जाते.
    1) कलम - 74
    2) कलम - 112
    3) कलम - 268
    4) कलम - 370
     
    2) अर्थसंकल्पीय अंदाज “ ...... “ या पुस्तकात प्रकाशित करतात.
    1) ग्रीन बुक
    2) व्हाईट बुक
    3) ब्लू बुक
    4) यलो बुक 
     
    3) पुढील विधानांचा विचार करा :
    a) स्वातंत्र्यानंतरचा भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी, 1948 ला आर. के. षण्मुख चेट्टी यांनी मांडला.
    b) भारतात सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडण्याचा मान अर्थमंत्री मोरारजी देसाई यांना मिळाला. 
    c) प्रणव मुखर्जी यांनी त्यांचा पाचवा अर्थसंकल्प 16 मार्च, 2012 रोजी मांडला होता.
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) बरोबर (b) आणि (c) चूक
    2) वरील सर्व बरोबर
    3) (b) आणि (c) बरोबर
      4) (a) आणि (b) बरोबर आहेत 
     
    4) खालीलपैकी कोणते विधान भारतीय केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील बदलाला लागू पडत नाही ?
    1) महसूल खर्चात प्रचंड वाढ.       
    2) चालू खात्यामध्ये 1970 च्या मध्यापर्यंत आधिक्य.
    3) महसूल प्राप्तीमध्ये सावकाश वाढ    
    4) भांडवली प्राप्तीमध्ये, भांडवली खर्चापेक्षा अधिक वेगाने वाढ.
     
    5) वित्त विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही हे कोण ठरविते?
    1) राष्ट्रपती
    2) वित्तमंत्री
    3) लोकसभा अध्यक्ष
    4) पंतप्रधान
     
    6) खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश भारत सरकारच्या अंदाजपत्रकात होतो ?
    अ) चालू वर्षाच्या आदल्या वर्षीचे लेखांक       
    ब) चालू वर्षाचे अंदाजपत्रकीय अनुमान व सुधारित अंदाज
    क) पुढील वर्षाचे अंदाजपत्रकीय अनुमान
    पर्यायी उत्तरे :
    1) अ व ब
    2) ब व क
    3) अ व क
    4) वरील सर्व 
     
    7) भारत सरकारचे अंदाजपत्रक खालील माहिती देते :
    a) पुढच्या वर्षाचे अंदाज
    b) आधीच्या वर्षीचे वास्तविक आकडे
    c) चालू वर्षातील अंदाज व सुधारीत आकडे
    d) सरकारच्या महसूल व खर्च यांचा पूर्ण तपशील
    पर्यायी उत्तरे :
    1) (a) फक्त
    2) (b) फक्त  
    3) (c) फक्त
    4) वरीलपैकी सर्व 
     
    8) जर केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेने पारित केला नाही तर-
    1) बजेटमध्ये सुधारणा करून ते परत सादर होते.
    2) असे बजेट राज्यसभेकडे सूचनांसाठी पाठविले जाते.
    3) केंद्रीय वित्त मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो.
    4) पंतप्रधान मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर करतो.
     
    9) विनियोजन विधेयक कशासाठी मांडले जाते ?
    अ) संचित निधीतून सरकारला पैसा काढण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी. 
    ब) विविध कर गोळा करण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी.
    क) विविध करांची निश्‍चिती करण्यासाठी.
    ड) सामान्य विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी विनियोजन विधेयक मांडले जाते. 
    वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
    1) अ फक्त 
    2) ब फक्त
    3) क आणि ड
    4) अ, ब, क आणि ड 
     
    10) ‘अंदाजपत्रक सादर करणे‘ ही कोणत्या विभागाची जबाबदारी आहे ? 
    1) अंदाजपत्रक विभाग
    2) आर्थिक घडामोडी विभाग
    3) महसूल विभाग
    4) व्यय विभाग
     
    11) केंद्रशासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते. केंद्रशासनाच्या महसुली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते स्त्रोत/मार्ग आहेत?
    अ) बाह्य कर्ज
    ब) कर महसूल 
    क) अल्प बचती
    ड) करेत्तर महसूल
    पर्यायी उत्तरे : 
    1) अ आणि ब
    2) ब आणि ड
      3) क आणि ड
    4) अ आणि क 
     
    12) भारत सरकारच्या भांडवली अर्थसंकल्पामध्ये ...... चा समावेश होतो.
    1) अंदाजित प्राप्ती आणि अंदाजित खर्च
    2) भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च
    3) महसुली प्राप्ती आणि महसुली खर्च
    4) वरील सर्व तिन्ही प्राप्ती आणि खर्च
     
    13) केंद्र सरकारच्या भांडवली प्राप्ती म्हणजे :
    1) कर्जाची पुन:प्राप्ती + इतर प्राप्ती + कर्ज दिलेले आणि इतर जिंदगी.
    2) कर्जाची पुन:प्राप्ती + इतर प्राप्ती + कर्ज उभारणी आणि इतर देयता.
    3) दिलेले कर्ज + इतर प्राप्ती + कर्ज उभारणी आणि इतर देयता.
    4) कर्जाची पुन:प्राप्ती + कर्ज उभारणी आणि इतर देयता.
     
    14) भारत सरकारच्या अंदाजपत्रकाबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
    1) दर दोन वर्षांनी संसदेत अंदाजपत्रक सादर केले जाते.
    2) अंदाजपत्रकात वित्तीय वर्षातील सरकारच्या अंदाजे खर्च व प्राप्ती यांची संपूर्ण माहिती दिलेली असते.
    3) अंदाजपत्रक हे नेहमी वाढाव्याचे अंदाजपत्रक असते.
    4) अंदाजपत्रकात सरकारच्या मागील वर्षातील खर्च व प्राप्ती यांची माहिती दिलेली असते.
     
    15) ब्रिटिश काळात केंद्रीय वित्त विभागाची सामान्य कार्याव्यतिरिक्त कोणती विशेष जबाबदारी होती ?
    1) महसूल उभारणी
    2) सामान्य वित्तीय नियमांची आखणी व स्पष्टीकरण
    3) निधी वाटप
    4) अर्थसंकल्प तयार करणे
     
    16) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? 
    1) अंदाजपत्रक तयार करण्यासाठीचा आधार म्हणजे विविध अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेले इनपुट.
    2) अंदाजपत्रक तयार करण्याचा आधार हा ‘खालून वर’ विचाराचा असेल.
    3) सर्वोच्च युनिटकडून अंदाज बांधले जातील आणि मुख्य कचेरीत संकलित केले जातील.
    4) संकलित अंदाजपत्रक सारांश स्वरूपात सादर केले जाईल.
     
    17) खालील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा :
    a) द्रव्यशास्तीची तरतूद करणारे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही. 
    b) एकत्रित निधीतून खर्चाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही. 
    c) संघाच्या लेखापरीक्षणाविषयीचे विधेयक हे धन विधेयक असेलच असे नाही. 
    पर्यायी उत्तरे :
    1) पर्याय (a) व (b) अचूक आहेत मात्र (c) चुकीचा आहे.   
    2) पर्याय (a) व (c) अचूक आहेत मात्र (b) चुकीचा आहे.   
    3) सर्व पर्याय अचूक आहेत.
    4) सर्व पर्याय चुकीचे आहेत.
     
    18) 2020-21 च्या अंदाजपत्रकानुसार केंद्र सरकारला खालीलपैकी कोणत्या करातून महत्तम उत्पन्न मिळाले?
    1) उत्पन्न कर
    2) सीमा कर
    3) निगम कर
    4) अबकारी कर 
     
    19) योग्य जोड्या लावा. (केंद्रीय कर महसुलातील करांचा वाटा 2019-20)
    a) महामंडळ कर i) 7 टक्के
    b) उत्पन्न कर ii) 4 टक्के
    c) सीमा शुल्क iii) 17 टक्के
    d) अबकारी कर iv) 21 टक्के
    e) वस्तू व सेवा कर v) 31 टक्के
    पर्यायी उत्तरे :
    (a) (b) (c) (d) (e)
    1) (v) (ii) (iii) (iv) (i)
    2) (iv) (iii) (ii) (i) (v)
    3) (iii) (i) (iv) (ii) (v)
    4) (iv) (iii) (ii) (i) (iv)
     
    20) एनडीए -2 सरकारच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या विकास योजनावर जास्त खर्च झाला ?
    a) प्रधानमंत्री ग्राम सडक योजना
    b) ग्रामीण विद्युतीकरण
    c) छोट्या व लघु उद्योगांना अर्थसहाय्य देण्यासाठी मुद्रा बँकेला 1.80 लाख कोटींची तरतूद.
    वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
    1) (a) आणि  (b)
    2) फक्त (a)
    3) (b) आणि (c)
    4) (a), (b) आणि (c)
     
    21) 2016-2017 च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने अर्थव्यवस्थेतील परकीय थेट गुंतवणूक (FDI) वाढीसाठी 2017 पूर्वी खालील धोरणात्मक निर्णय घेतले.
    विधाने :
    a) विमा, निवृत्तिवेतन निधी आणि संरक्षण या क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणूक 49 टक्क्यापर्यंत करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
    b) भारतात अन्नधान्य उत्पादन उत्पादित करणे आणि त्याची विक्री करणे या क्षेत्रातील 100 टक्के परकीय थेट गुंतवणुकीस सरकारने परवानगी दिली आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त (a) योग्य आहे
    2) फक्त (b) योग्य आहे   
    3) (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत
    4) (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत 
     
    22) पुढीलपैकी वित्तीय अंदाजपत्रक 2013-14 चे कोणती/कोणते निरीक्षण/निरीक्षणे बरोबर नाही/त?
    a) वर्ष 2013-14 मध्ये योजनांतर्गत खर्चामध्ये अंदाजित पातळीपेक्षा बरीच जास्त कपात झाली.
    b) त्या अंदाजपत्रकाचा मुख्य भर गुंतवणुकीत वाढ आणि सर्वसमावेशक विकास कार्यक्रमावर होता.
    c) वित्तीय तूट ही राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या 2.6% या प्रमाणात अनुमानित केली होती. 
    पर्यायी उत्तरे :
    1) (a)
    2) (b)
    3) (c) 
    4) सर्व (a),(b),(c) 
     
    23) 2013-14 च्या भारताच्या अर्थसंकल्पीय अंदाजाप्रमाणे एकूण राजकोषीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या 4.8 प्रतिशतपर्यंत योजनापूर्वक कमी करण्याचे पुढील प्रयत्नाद्वारे साध्य करणे अपेक्षित होते :
    अ) निर्गुंतवणुकीच्या प्राप्तीस अधिक चालना देणे.
    ब)  कर महसूल आणि दूरसंचरण क्षेत्रातील प्राप्तीस अधिक चालना देणे.
    क) अर्थ सहाय्यावरील खर्चात कपात करणे.
    वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
    1) अ फक्त
    2) ब आणि क फक्त
    3) अ आणि क फक्त
    4) अ, ब आणि क
     
    24) वित्तीय वर्ष 2013-14 च्या अंदाजपत्रकात पुढील बाबी होत्या.
    1) तेव्हा अस्तित्वात असलेली, करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली परंतु वैयक्तिक कराचे दर तेच ठेवले.
    2) तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली व वैयक्तिक आयकर दर कमी केले. 
    3) तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा बदलली नाही तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा बदलले नाहीत.
    4) तेव्हा अस्तित्वात असलेली करपात्र उत्पन्न मर्यादा वाढविली तसेच वैयक्तिक आयकर दर सुद्धा वाढवले.
     
    25) ‘केंद्रिय अर्थसंकल्प (न्यूक्लिअस बजेट) योजना‘ ही योजना कोणत्या विभागाची आहे ?
    1) वित्त विभाग
    2) नियोजन विभाग
      3) आदिवासी विकास विभाग
    4) सामान्य प्रशासन विभाग
     
    26) 2012-13 च्या केंद्रीय अर्थ संकल्पनेमध्ये सेवा करामध्ये समाविष्ट होणार्‍या सेवांच्या यादीबद्दल एक नवीन दृष्टिकोन मांडला गेला होता, तो कोणता होता?
    1) विस्तार पूर्ण यादी दृष्टिकोन
    2) नकारात्मक यादी दृष्टिकोन
    3) होकारात्मक यादी दृष्टिकोन
    4) वरीलपैकी कोणताही नाही

    (3) राज्य सरकारचा अर्थसंकल्प
    1) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ........ अन्वये प्रत्येक वित्तीय वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधानमंडळापुढे सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
    1) 202
    2) 360
    3) 220
    4) 201
     
    2) भारतात सर्वप्रथम कोणत्या राज्याने शून्याधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली ?
    1) उत्तर प्रदेश
    2) महाराष्ट्र 
    3) आंध्र प्रदेश 
    4) राजस्थान 
     
    3) राज्याचा पहिला कृषी आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने तयार केला? (2012)
    1) महाराष्ट्र
    2) कर्नाटक 
    3) पंजाब
    4) बिहार 
     
    4) खालीलपैकी कोणते विधान राज्य अंदाजपत्रकातील भारीत खर्चाबाबत चुकीचे आहे ?
    1) विधानसभा अध्यक्ष आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा पगार व भत्त्याचा खर्च भारीत खच आहे.
    2) राज्य विधीमंडळ कायदा करून भारतीय राज्यघटनेत नमूद विशिष्ट बाबीशिवाय इतर खर्च भारीत म्हणून जाहीर करू शकते.
    3) भारीत खर्च विधानसभेत मतास टाकता येत नाही.
    4) भारीत खर्चाबाबत विधानमंडळात चर्चा करता येत नाही.  
     
    5) खालील दिलेले अंदाजपत्रकाचे प्रकार आहेत त्यापैकी असा प्रकार निवडा की जो अंदाज पत्रक तयार करण्यासाठी व त्याची कार्यवाही करण्यासाठी सर्वानुमते मंजूर आहे किंवा स्वीकारलेला आहे.
    1) विधिमंडळाकडून तयार झालेले अदांजपत्रक
    2) अधिकारी वर्गाने तयार केलेले अंदाजपत्रक
    3) प्रशासकीय अधिकारी वा विधिमंडळातील अधिकारी यांनी तयार केलेले अंदाजपत्रक
    4) वरीलपैकी कुठलेही नाही
     
    6) राज्य सरकार अर्थसंकल्पीय तूट कोणत्या प्रकारे भरून काढते ?
    a) कंपनीकर कमी करून
    b) गुंतवणुकीला चालना देण्यासाठी नियमनात शिथिलता आणून
    c) जादा चलन छापून
    d) सार्वजनिक खर्चात कपात करून
    e) प्रत्यक्ष करात वाढ करून
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त (a)
    2) फक्त (a), (c), (d)
    3) फक्त (c), (d)
    4) वरील सर्व बरोबर
     
    7) पुढीलपैकी कोणती/कोणत्या जोडी/जोड्या योग्य आहे/आहेत?
    a) देशात दुसर्‍यांदा शून्याधारित अर्थसंकल्प सादर करणारे राज्य -आंध्रप्रदेश 
    b) हुंडाग्रस्त स्त्रियांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाची योजना - माहेर योजना
    c) नवव्या पंचवार्षिक योजनेचे घोषवाक्य -  सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त (a), (b)
    2) फक्त (b), (c)
    3) फक्त (a)
    4) (a), (b), (c)
     
    8) गेल्या काही वर्षातील महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात तरतुदीबाबत योग्य विधाने शोधा.
    a) दिव्यांगासाठी शीघ्र निदान व हस्तक्षेप योजना 
    b) राज्यातील सर्व पोलीस ठाणी सीसी टीव्हीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस यंत्रणेशी जोडणे
    c) स्मार्ट सीटी अभियानात निवड झालेल्या शहरांसाठी 1300 कोटी रुपये
    d) राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिकृती योजनेच्या लाभार्थीसाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत 
    वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत.
    1) फक्त (a)
    2) फक्त (a), (b) 
    3) फक्त (c), (d)
    4) वरील सर्व
     
    9) 2018-19 साली महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक महसुली तूट (14,883 कोटी रु.) कोणत्या कारणांमुळे आली होती ?
    a) जमीन महसूल, उत्पादन शुल्क व व्यवसाय करांमध्ये आलेली घट
    b) टोल आणि स्थानिक संस्था कर रद्द केल्याने आलेला बोजा 
    c) सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी
    d) शेतकर्‍यांची कर्जमाफी
    वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत.
    1) फक्त (a)
    2) फक्त (a), (b)
    3) सर्व (a), (b), (c), (d)
    4) यापैकी नाही
     
    10) महाराष्ट्र सरकारच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील, विविध महसूल स्रोतांच्या महत्त्वानुसार, विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे ?
    a) राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर
    b) वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर
    c) विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क
    d) शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, इतर कर
    वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
    1) फक्त (b)
    2) फक्त (c)
    3) (c) आणि (d)
    4) फक्त (d)
     
    11) जून 2014 मध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील खालीलपैकी कोणत्या तरतुदी बरोबर होत्या?
    a) व्यवसाय कर आकारणींची वेतन मर्यादा 7500 रुपये 
    b) कापसावरील कर 5 टक्के 
    c) ऊस खरेदी कर वर्ष 2013-14 करिता माफ
    d) रमाई आवास योजनेखाली 1 लाख रुपये मिळणार 
    पर्यायी उत्तरे :
    1) (a),(b),(c)
    2) (b),(c),(d)
    3) (a),(c),(d)
    4) वरील सर्व
     
    12) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नव्हते ?
    अ) करमणूक करामधून सूट
    ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट
    क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार
    ड) मालमत्ता करातून आणि अकृषी करातून सूट
    इ) अविकसित प्रदेशातून सूट
     योग्य पर्याय निवडा :
    1) अ, क आणि ड
    2) ब आणि क
    3) ब आणि ड
    4) फक्त ब 

    (4) स्थानिक स्वराज्य संस्थेचे अंदाजपत्रक 
    1) खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. 
    महानगरपालिका अंदाजपत्रक तयार करताना - 
    i) अंदाजपत्रकामध्ये सर्व जमा व खर्चाचा समावेश करू नका.
      ii) संतुलित अंदाजपत्रकाचा अवलंब करा.
      iii) समाज संघटना अथवा व्यक्तींना पैसे उसने द्यायला परवानगी आहे.
      iv) महसुली खर्चाच्या सहाय्यासाठी  पैसा उधारीने आणण्यासाठी परवानगी नाही.
    1) i) चूक   ii) बरोबर   iii) चूक   iv) बरोबर
    2) i) बरोबर   ii) चूक   iii) चूक   iv) बरोबर
    3) i) बरोबर   ii) बरोबर   iii) चूक   iv) बरोबर
    4) i) चूक   ii) बरोबर   iii) चूक   iv) चूक
     
    2) महानगरपालिकेच्या अंदाजपत्रक तयार करण्याच्या प्रक्रियेत कोणाचा समावेश होतो?
    1) फक्त महापालिका आयुक्त
    2) महानगरपालिकेतील विभाग प्रमुख किंवा समिती प्रमुख
    3) महानगरपालिकेतील खालच्या पातळीवर काम करणारे अधिकारी   
    4) वरील नमूद केलेले सर्वजण
     
    3) महानगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण सादर करतो?
    1) मनपा महापौर
    2) मनपा हिशेबनीस
    3) मनपा आयुक्त
    4) मनपा तपासनीस
     
    4) अंदाजपत्रक हे व्यवस्थापनाच्या ...... एक महत्त्वाचे साधन आहे.
    1) अभिप्रेरणेतील 
    2) संघटनेतील
    3) निर्णय प्रक्रियेतील
    4) संदेशवहनातील
     
    5) संघटनेमध्ये लवचीक अंदाजपत्रक तयार केले जाते -
    1) कार्याच्या (उत्पादनाच्या) वेग-वेगळ्या स्तरासाठी
    2) वेग-वेगळ्या विभागासाठी
    3) वेग-वेगळ्या काळासाठी
    4) वरीलपैकी सर्वांसाठी
     
    6) संघटनेमध्ये अंदाजपत्रक नियंत्रण पद्धतीची गरज असते, कारण......
    1) व्यवस्थापन कर्मचार्‍यांवर वचक ठेवू इच्छितात.
    2) व्यवस्थापनाचे हेच काम आहे.
    3) अंदाज करणे, कामाची अंमलबजावणी करणे व दुरुस्तीचे उपाय करणे, त्यामुळे नफावृद्धी होते.
    4) अति उच्च नफा कमावणे हा संघटनेचा उद्देश असतो.
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (81)
    (1) अर्थसंकल्पाची व्याख्या, स्वरुप आणि वैशिष्ट्ये
     
    1-1
     
    2-1
     
    3-2
     
    4-3
     
    5-1
     
    6-1
     
    7-3
     
    8-2
     
    9-4
     
    10-1
     
    (2) केंद्र सरकारचा अर्थसंकल्प
     
    1-2
     
    2-3
     
    3-4
     
    4-3
     
    5-3
     
    6-4
     
    7-4
     
    8-4
     
    9-1
     
    10-2
     
    11-2
     
    12-1
     
    13-2
     
    14-2
     
    15-2
     
    16-3
     
    17-1
     
    18-3
     
    19-4
     
    20-4
     
    21-3
     
    22-1
     
    23-4
     
    24-3
     
    25-3
     
    26-2
     
    (3) राज्य सरकारचा अर्थसंकल्प
     
    1-1
     
    2-2
     
    3-2
     
    4-4
     
    5-1
     
    6-4
     
    7-4
     
    8-4
     
    9-4
     
    10-2
     
    11-3
     
    12-4
     
    (4) स्थानिक स्वराज्य संस्थेचे अंदाजपत्रक 
     
    1-1
     
    2-4
     
    3-3
     
    4-3
     
    5-1
     
    6-4

Share this story

Total Shares : 3 Total Views : 3613