प्रश्नमंजुषा 80 : चालू घडामोडी
- 25 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 366 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा 80 : चालू घडामोडी
1) श्रेया सिंघल प्रकरणात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील कोणते कलम्न रद्द केले ?
1) 65 अ
2) 66 अ
3) 65 बी
4) 66 बी
2) खालील विधाने विचारात घ्या:
a) महिला सक्षमीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सृष्टी गोस्वामीला एक दिवसासाठी मुख्यमंत्री करण्यात आलं होतं.
b) 24 जानेवरीच्या राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त तिच्याकडे ही जबाबदारी दिली गेली होती.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
3) आझाद हिंद सरकार संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) आझाद हिंद बँकेची स्थापना 1943 मध्ये झाली होती.
ब) आझाद हिंद बँकेने 10 रुपयांच्या नाण्यापासून ते 1 लाखापर्यंतची नोट जारी केली होती.
क) 1 लाख रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटो छापला होता.
ड) या बँकेला 12 देशांचे समर्थन होते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ आणि ब बरोबर
4) भारत आणि फ्रान्समधील संशोधन सहकार्यातील भरीव योगदानाबद्दल प्रा. रोहिणी गोडबोले यांना 2021 चा फ्रेंच ‘नॅशनल वॉर्ड ऑफ मेरिट’ हा सन्मान घोषित झाला. त्या कोनत्या संस्थेत कार्यरत आहेत ?
1) बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या भौतिकशास्त्रज्ञ
2) पुणे येथील आघारकर संस्थेच्या प्राणीशास्त्रज्ञ
3) मुंबई येथील टीआयएफआर संस्थेच्या गणितज्ञ
4) बंगळूर येथील इस्रोच्या भौतिकशास्त्रज्ञ
5) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : ‘स्टँडर्ड मॉडेल’च्या आकलनाने विश्र्वाच्या उत्पत्तीनंतर काय घडले याची सविस्तर माहिती मिळते.
कारण (र) : अणुच्या मूलभूत कणांचे गुणधर्म सांगणारे ‘स्टँडर्ड मॉडेल’ कणभौतिकशास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
6) 2021 सालचा मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?
अ) आयआयएस बेंगलोरचे मंजुल भार्गव
ब) कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलेचे निखिल श्रीवास्तव
क) इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी लॉसानंचे अॅडम मार्क्स
ड) येल विद्यापीठाते डॅनिअल अॅलन स्पिलमॅन
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
7) शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध आला नसेल तर तो लैंगिक अत्याचार ठरू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल कोणत्या न्यायालयाने जानेवारी 2021 मध्ये दिला ?
1) सुप्रीम कोर्ट
2) एर्नाकुलम हायकोर्ट
3) मुंबई हायकोर्ट
4) अलाहाबाद हायकोर्ट
8) ‘छेल्ला कलान’ ही हवामानविषयक घटना कोण्तय राज्यात अनुभवास येते ?
1) पश्चिम बंगाल
2) जम्मू-काश्मीर
3) अरुणाचल प्रदेश
4) सिक्कीम
9) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ स्तंभ ब
अ. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया I. कोव्हॅक्सीन
ब. बायोटेक II. स्पुटनिक -5
क. रेड्डीज लॅबेरोटरी III. मॉडेर्ना
ड. टाटा हेल्थ IV. कोव्हीशील्ड
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III I IV
(2) II I III IV
(3) III II IV I
(4) IV III I II
10) 19 जानेवारी 2021 रोजी चेन्नई येथील अड्यार कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष डॉ. व्ही. शांता यांचे निधन झाले. त्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण त्यांचे आजोबा होते.
ब) 2005 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेेसे पुरस्कार देण्यात आला होता.
क) भारत सरकारने तीनही नागरी पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता.
ड) पदार्थ विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते डॉ. एस. चंद्रशेखर हे त्यांचे वडील होते.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
11) हँग सन डूंग गुहा ही जगातली सर्वात मोठी गुहा कोणत्या देशात आहे ?
1) कंबोडिया
2) इंडोनेशिया
3) व्हिएतनाम
4) फिलीपाईन्स
12) नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1) हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोन्ही संघटनांवर नेताजींनी जोरदार टीका केली होती.
2) नेताजी काँग्रएसचे अध्यक्ष असतानाच काँग्रेसच्या कुणाही सदस्याला हिंदू महासभा किंवा मुस्लिम लीगचा सदस्य राहण्याचा अधिकार असणार नाही असा निर्णय झाला होता.
3) कोलकत्याच्या महापालिकेची सत्ता नेताजींकडं आली तेव्हा त्यांनी हिंदूना नोकर्यांत आरक्षण जाहीर केलं.
4) नेताजी बहादूरशहा जफरना ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचा नेता मानत.
13) जानेवारी 2021 मध्ये, महापरीक्षा पोर्टल अंतर्गत येणार्या परीक्षा पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीनुसार निवड प्रक्रिया आणि जबाबदारी ...... यांच्याकडे देण्यात आली होती.
1) महाराष्ट्र ज्ञान महामंडळ लि. (एमकेसीएल), पुणे
2) महाराष्ट्र परीक्षा मंडळ, पुणे
3) महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ (महाआयटी), मुंबई
4) महाराष्ट्र लोक्सेवा आयोग
14) माहिती तंत्रज्ञान कायदा, (दुरुस्ती) 2008 नुसार कोणत्या गुन्ह्यांचा नव्याने त्यामध्ये समावेश केला गेलेला आहे?
अ) इलेक्ट्रॉनिक पुराव्याचे परीक्षक अधिसूचित करणे
ब) सायबर टेररीजम
क) लहान मुलांचे अश्र्लील शब्दचित्र रेखाटून इलेक्ट्रॉनिक स्वरुपात प्रसिद्ध करणे
ड) आयडेन्टीटी थेफ्ट
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
15) आझाद हिंद सेनेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या अभूतपूर्व पराक्रमाचे स्मरण म्हणून केंद्र सरकारने हा दिवस ‘पराक्रम दिन’ म्हणून घोषित केला ?
1) 23 फेब्रुवारी
2) 23 जानेवारी
3) 31 जानेवारी
4) 12 ऑगस्ट
16) माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मध्ये 2008 च्या दुरुस्तीनंतर कोणकोनत्या वर्षी छोट्या मोठ्या दुरुस्ती करण्यात आल्या ?
अ) 2017 आणि 2018
ब) 2015 आणि 2016
क) 2013
ड) 2009
इ) 2011
फ) 2014
ग) 2010
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) फ आणि ग वगळता सर्व
3) ब वगळता सर्व
4) ड, फ, ग वगळता सर्व
17) बनावटी बँक खाती आणि फेक बातम्या पसरवण्यासाठी सध्या कोणत्या घटनात्मक हक्काचा दुरुपयोग लोक करतात ?
1) जगण्याचा अधिकार
2) गोपनीयतेचा अधिकार
3) स्वातंत्र्याचा अधिकार
4) 2 आणि 3 बरोबर
18) जागतिक पर्यटन दिन कधी साजरा केला जातो ?
1) 20 फेब्रुवारी
2) 25 जानेवारी
3) 15 जानेवारी
4) 25 जून
19) जानेवारी 2021 मध्ये देशातील अनेक राज्यांमधील कोणत्या मध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला ?
अ) स्थलांतरित जंगली पक्षी
ब) कावळे
क) पोल्ट्री बर्ड्स
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
20) 24 जानेवारी 2021 रोजी पाल्माज फुटबॉल क्लबचे अध्यक्ष आणि क्लबच्या चार खेळाडूंचा प्लेन अपघातात मृत्यू झाला. हा क्लब या देशातील आहे ?
1) अर्जेंटिना
2) ब्राझील
3) जर्मनी
4) फ्रान्स
21) महाराष्ट्र सरकारने ‘एमएपीएसी’च्या कार्यकक्षेबाहेरील गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या परीक्षा पद्धती राबविण्याची जबाबदारी यांच्यावर सोपविली आहे?
अ) मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड
ब) पटेक लिमिटेड,आणि
क) जजर वेब्ज प्रायव्हेट लिमिटेड
ड) जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड,
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, ब, क आणि ड बरोबर
22) सोलापूर जिल्ह्याबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1) चिल्का पक्षी निरीक्षण केंद्रावर जेवढे पक्षी येतात, त्यापेक्षा अधिक पक्षी उजनी धरणावर पाहण्यास मिळतात.
2) नान्नज व वंगेवाडी भागातील माळरानातील जैवविविधतेमुळे येथे स्थलांतरित विदेशी पक्ष्यांची संख्या वाढली आहे.
3) सोलापूर शहरातील सिद्धरामेश्र्वर तलाव व सिद्धेश्र्वर वनविहार येथील स्थलांतरित स्थानिक पक्ष्यांची संख्या वाढली आहे.
4) हिप्परगा तलावासोबत कुरनूर येथील माळरानात माळढोक पक्षांची संख्या वाढली आहे.
23) पाकिस्तानने एफ-9 पार्क सारख्या आपल्या अनेक संस्था, इमारती आणि रस्ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाँड्सच्या माध्यमातून कर्ज प्राप्त करण्यासाठी तारण ठेवल्या आहेत. या पार्कबाबत चुकीचे विधान शोधा.
1) हे पार्क मदार-ए-मिलत फातिमा जिन्ना पार्क म्हणूनही ओळखलं जातं.
2) 500 अब्ज रुपयांचे कर्ज प्राप्त करण्यासाठी राजधानी इस्लामाबादमधील एफ-9 पार्क गहाण ठेवले जाणार आहे.
3) महमंद अली जिना यांनी या पार्कचं उदघाटन केलं होतं.
4) हे पाकिस्तानातील सर्वात मोठे पार्क आहे.
24) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) ’इंडिया इनोव्हेशन इंडेक्स ’ हा अहवाल केंद्रीय कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्रालयामर्फत प्रकाशित केला जातो.
ब) ’इंडिया इनोव्हेशन इंडेक्स 2020’ नुसार तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसर्या स्थानी आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
25) कोणत्याही सॅटेलाईट टेलिव्हिजन चॅनेलचे कार्यक्रम कसे असावेत, याबद्दलचा कायदा, केबल टेलिव्हिजन नेटवर्क क्ट भारतात कधीपासून अस्तित्वात आहे ?
1) 29 सप्टेंबर 1991
2) 1 जानेवारी 1995
3) 2 ऑक्टोबर 1994
4) 29 सप्टेंबर 1994
उत्तरे : प्रश्नमंजुषा (80)
1-2
2-3
3-4
4-1
5-1
6-2
7-3
8-2
9-4
10-1
11-3
12-3
13-3
14-2
15-2
16-2
17-4
18-2
19-4
20-2
21-4
22-4
23-3
24-2
25-4