प्रश्नमंजुषा 79 : नेताजी सुभाषचंद्र बोस

  •  प्रश्नमंजुषा 79 : नेताजी सुभाषचंद्र बोस

    प्रश्नमंजुषा 79 : नेताजी सुभाषचंद्र बोस

    • 25 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 2282 Views
    • 5 Shares

     प्रश्नमंजुषा (79)

    1) खालीलपैकी कोणते विधान सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस यांच्या बाबत चुकीचे आहे ?
    1) इंग्रज सरकारने त्यांना रायबहादूर हा किताब दिला होता. 
    2) ते बंगाल विधानसभेचे सदस्य ही होते.
    3) मूळचे माहिनगरचे (बंगाल) असलेले जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओरिसा) आले होते.
    4) सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान सुभाषचंद्र बोस तुरुंगात असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
     
    2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) सुभाषचंद्र बोस 1933-36 अशी तीन वर्षे व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे राहिले. 
    ब) 1921 ते 1941 या 20 वर्षाच्या कालावधीत सुभाषबाबूंना एकूण 11 वेळा कारावास भोगावा लागला.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    3) खालीलपैकी कोणत्या शाळेत / महाविद्यालयात सुभाषचंद्र बोस यांचे शिक्षण पूर्ण झाले ?
    1) स्कॉटिश चर्च कॉलेज
    2) रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल 
    3) प्रेसिडेंसी महाविद्यालय
    4) वरील सर्व
     
    4) सुभाषचंद्र बोस यांचे संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) सुभाषबाबूंचे राजकीय गुरू चित्तरंजन दास हे होते.
    ब) सुभाषबाबूंचे अध्यात्मिक गुरू रविद्रनाथ टागोर हे होते.
    क) सी. आर. दास ह्यांच्या सल्ल्यानुसार ते मुंबईला महात्मा गांधींना भेटले होते.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    5) सुभाषचंद्र बोस यांच्या उपस्थितीत कोणत्या प्रसंगी ‘जय हिंद’ हा नारा सर्वप्रथम देण्यात आला ?
    1) 1942 -  आझाद हिंद नभोवाणी केंद्राचे उदघाटन
    2) 6 जुलै 1944 - आझाद हिंद रेडियो वरचे गांधीजींना उद्देशून भाषम्न्गांधीजींना उद्देशून भाषण
    3) 18 मार्च 1944 - आझाद हिंद सेनेचा भारतभूमीवरील विजय
    4) 6 नोव्हेंबर 1941 - आझाद हिंद केंद्राची बैठक 
     
    6) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) आझाद हिंद सेनेची घोषणा - चलो दिल्ली
    ब) आझाद हिंद सेनेचे स्फूर्तीगीत - कदम कदम बढाए जा.
    क) आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा
    ड) आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य - जय हिंद
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ आणि ब बरोबर
     
    7) महात्मा गांधींनी नेताजींचा उल्लेख देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता ?
    1) 1938 - काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन हरिपुरा (गुजरात) येथील भाषणात
    2) 21 ऑक्टोबर 1943 - सिंगापूर येथे  स्थापन झालेल्या आझाद हिंद सर्कारला शुभेच्छा देताना
    3) 1939 - काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन त्रिपुरी (जबलपूर) येथील भाषणात
    4) 1944 - अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना 
     
    8) 1941 साली कोलकाता येथील आपल्या घरात नजरकैदेत असलेल्या सुभाषचंद्र बोस यांनी भारतातून पलायन केले व अर्ध्या जगाची सफर करून ते जपानला पोहोचले, त्यावेळी त्यांचा या शहराशी संबंध आला होता -
    अ) इंडोनेशियातील पेडाँग
    ब) जर्मनीची राजधानी बर्लिन
    क) इटलीची राजधानी रोम
    ड) जपानची राजधानी टोकियो
    इ) रशियाची राजधानी मॉस्को 
    फ) सिंगापूर
    ग) अफगाणिस्तानची राजधानी काबूल
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) ब वगळता सर्व
    4)  फ वगळता सर्व
     
    9) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
    1) सी. आर. दास कोलकात्त्याचे महापौर असताना सुभाषबाबू महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी होते.
    2) 1929 साली सुभाषबाबूंनी कोलकात्त्यातील सायमनविरोधी आंदोलनाचे नेतृत्व केले. 
    3) सुभाषचंद्र बोस बेंगॉल नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य होते.  
    4) सुभाषचंद्र बोस स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक होते.  
     
    10) सुभाषचंद्र बोस यांच्या संपर्कात आलेल्या नेत्याबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
       स्तंभ अ (नेता) स्तंभ ब (देश)
    अ. केमाल आतातुर्क I. आयर्लंड 
    ब. डम फॉन ट्रॉट    II. इटलीचे नेते 
    क. डी व्हॅलेरा   III. टर्की
    ड. बेनिटो मुसोलिनी    IV. जर्मनी
    पर्यायी उत्तरे :
    1) III II I IV
    2) II IV I III
    3) III IV I II
    4) IV III I II
     
    11) कोणत्या साली  सुभाषचंद्र बोस यांची काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून जवाहरलाल नेहरूंबरोबर नियुक्ती झाल्यानंतर दोघांनी मिळून इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली होती ?
    1) 1927
    2) 1928
    3) 1930
    4) 1931
     
    12) 1928 च्या काँग्रेस वार्षिक अधिवेशनसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) हे पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले.
    ब) महात्मा गांधीनी या अधिवेशनात वसाहतीचे स्वराज्य मागण्यासाठी ठराव मांडला होता.
    क)  जर एका वर्षात इंग्रज सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर काँग्रेस पूर्ण स्वराजची मागणी करेल असे ठरले.
    ड) सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली. 
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    13) ‘फॉरवर्ड ब्लॉक’ चे संस्थापक कोण होते ? 
    1) खान अब्दुल गफार खान 
    2) सुभाषचंद्र बोस
    3) मोतीलाल नेहरू
    4) सी. आर. दास
     
    14) सुभाषचंद्र बोस ह्यांच्या संदर्भात असलेल्या खालील घटना कालक्रमानुसार लावा :
    अ) त्यांचे जर्मनीस पलायन
    ब) त्यांचे जपान येथे आगमन   
    क) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
    ड) सिंगापूर येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगचे अध्यक्षपद
    पर्यायी उत्तरे :
    1) क, ब, ड, अ
    2) क, अ, ड, ब
    3) क, अ, ब, ड
    4) क, ब, अ, ड
     
    15) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
    1) आझाद हिंद सेनेची महिला तुकडीही स्थापण्यात आली.
    2) ती कॅप्टन लक्ष्मी सुब्रमण्यम यांच्या हाताखाली होती.
    3) तिला राणी झांसी तुकडी (रेजीमेंट) म्हणत.
    4) वरील तीनपैकी कोणतेही अयोग्य नाही.
     
    16) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य नाही?
    a) सोहन सिंग भाकना आणि त्यांच्या क्रांतिकारी मित्रांनी सन 1907 मध्ये कॅलिफोर्निया येथे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. लाला हरदयाल यांच्या येण्यानंतर 1911 मध्ये या संस्थेच्या कारवाया काढल्या.
    b) तारकानाथ यांनी सन 1913 मध्ये सॅन फ्रँसिस्को येथे गदर पार्टीची स्थापना केली. त्यांनी अमेरिकाभर फिरून तेथे राहणार्‍या भारतीयांमध्ये इंग्रजांविरुद्ध भावना जागृत केल्या.
    पर्यायी उत्तरे :
    1) केवळ (a)
    2) केवळ (b)
    3) दोन्ही
    4) एकही नाही
     
    17) पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
    1) इंग्रज इंडियन नॅशनल आर्मी व तिच्या पुढार्‍यांच्या अतिशय विरोधात होते.
    2) इंग्रजांनी त्यांच्या प्रमुख 3 अधिकार्‍यांवर : गुरुबक्षसिंग धिल्लो, शाहनवाझ खान व पी. के. सेहगल यांच्यावर लाल किल्ला दिल्ली येथे इंग्रजांविरुद्ध लढा देण्यास्तव केस चालविली.
    3) त्या सर्वांवर गुन्हा साबीत केला.
    4) त्याप्रमाणे त्या तिघांना शिक्षा झाली.
     
    18) 1945 मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यात आझाद हिंद फौजेवर चाललेल्या खटल्याचे वेळी वकील कोण होते?
    a) पंडीत जवाहरलाल नेहरू
    b) भुलाभाई देसाई
    c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    d) तेजबहादूर सप्रू
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b) आणि (d) फक्त
    2) (b), (c) आणि (d) फक्त
    3) (a) आणि (b) फक्त
    4) (a) आणि (d) फक्त
     
    19) राणी झांशी रेजिमेंटला ........ युद्ध आघाडीवर जाण्याची संधी मिळाली होती.
    1) मंडाले
    2) मायमोला
    3) शान
    4) बागो
     
    20) ICS प्राप्त करून देखील सुभाषचंद्र बोस यांनी त्या नोकरीकडे का पाठ फिरविली ?
    1) त्यांना स्वातंत्र्य आंदोलनात उडी घ्यायची होती.
    2) ब्रिटिशांची नोकरी करणे त्यांना आवडले नाही.
    3) त्यांना इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगितले गेले.
    4) त्यांना इंग्रजांची सत्ता मान्य नव्हती.
     
    21) आझाद हिंद सरकारची स्थापना ........ यांनी केली. 
    1) लाला हरदयाळ
    2) सुभाषचंद्र बोस
    3) रास बिहारी बोस
    4) रविंद्रनाथ टागोर
     
    22) आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती ?
    1) उषा मेहता
    2) अरुणा असफ अली 
    3) लक्ष्मी सेहगल (स्वामीनाथन)
    4) यापैकी नाही 
     
    23) ’आझाद हिंद सेनेतील’ ’झाशीची राणी’ या पथकाच्या प्रमुख कोण होत्या ?
    1) डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन
    2) सरोजिनी नायडू
    3) शांती घोष
    4) प्रीतीलता वड्डेदार
     
    24) कोणत्या नेत्याने आपल्या मृत्युपत्रामध्ये आपल्या संपत्तीचे विश्र्वस्त म्हणून सुभाषचंद्र बोस यांना नेमले होते ?
    1) सरदार वल्लभभाई पटेल
    2) देशबंधू चित्तरंजन दास
    3) विठ्ठलभाई पटेल
    4) पंडित मोतीलाल नेहरू
     
    25) 1932 च्या जानेवारीमध्ये सशस्त्र क्रांतिकारक चळवळीशी संबंध जोडून सरकारने  सुभाषचंद्र बोस यांना पुन्हा स्थानबद्ध करुन येथे ठेवले होते.
    1) म्यानमारच्या मंडाले कारागृहात
    2) अलीपूरच्या तुरुंगात 
    3) अलमोडा येथील तुरुंगात 
    4) येरवडा येथील तुरुंगात 
     
    26) 1939 सालच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकी संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) सुभाषबाबूंना निवडणुकीत 1580 मते मिळाली तर पट्टाभी सितारमैय्यांना 1377 मते मिळाली. 
    ब) गांधीजीनी अध्यक्षपदासाठी पट्टाभि सितारमैय्या यांना पाठिंबा दिला होता.
    क) प्रफुल्लचंद्र राय, मेघनाद साहा सारखे वैज्ञानिक पुन्हा सुभाषबाबूंनाच अध्यक्ष करावे ह्या मताचे होते.
    ड) निवडणुकीत पंडित जवाहरलाल नेहरू तटस्थ राहिले.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2) ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4) अ, क आणि ड बरोबर
     
    27) ‘इंडियन इंडिपेन्डन्स लीग’ ही संघटना 1924 मध्ये कोणी स्थापन केली ?
    1) भगत सिंग
    2) नेताजी सुभाषचंद्र बोस
    3) लाल हरदयाल
    4) रासबिहारी बोस
     
    28) ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हांला स्वातंत्र्य देईन’ हे कोणी म्हटले ?
    1) सुभाष चंद्र बोस
    2) नारायण गुरु
    3) सुखदेव
    4) भगत सिंग
     
    29) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद रेडिओ केंद्र ...... येथे सुरू केले.
    1) पॅरीस
    2) बर्लिन
    3) मेरठ
    4) सिंगापूर
     
    30) नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘हंगामी आझाद हिंद सरकार’ची स्थापना कोठे केली ?
    1) बँकॉक
    2) टोकियो
    3) बर्लिन
    4) सिंगापूर
     
    31) सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? 
    1) आझाद हिंद सेना
    2) क्रांतीकारी सेना
    3) फॉरवर्ड ब्लॉक
    4) अभिनव भारत
     
    32) कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा देहांत ..
    1) 21 जुलै 2012 रोजी कानपूर येथे झाला
    2) 23 जुलै 2012 रोजी झांसी येथे झाला
    3) 23 जुलै 2012 रोजी कानपूर येथे झाला
    4) 25 जुलै 2012 रोजी झांसी येथे झाला
     
    33) आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली?
    1) दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश संकटात सापडल्याने  
    2) पहिल्या महायुद्धातील ब्रिटिशांचा प्रभाव
    3) बंगालची फाळणी
    4) वरीलपैकी काही नाही
     
    34) सुभाषचंद्र बोस यांनी सन 1923 मध्ये कोणते इंग्रजी दैनिक सुरु केले ?
    1) स्वराज्य
    2) हिंदुस्थान टाइम्स
    3) फ्री प्रेस जर्नल
    4) फॉरवर्ड
     
    35) सुभाषचंद्र बोस यांच्यावरील साहित्याबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
            स्तंभ अ (पुस्तक)              स्तंभ ब (लेखक)
    अ. नेताजी सुभाषचंद्र बोस I. विश्र्वास पाटील
    ब. महानायक                II. रमेश मुधोळकर
    क. नेहरू अँड बोस       III. वि. स. वाळिंबे
    ड. यहिंद आझाद हिंद       IV. रुद्रांग्शू मुखर्जी
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I IV III
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    36) 1945 साली सुभाषचंद्र बोस यांना मांचुरियाहून रशियाकडे धाडण्याची व्यवस्था कोनई केली होती ?  
    1) कर्नल हबीबुर रहमान
    2) जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो 
    3) फिल्ड मार्शल ताराऊ 
    4) लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान 
     
    37) सुभाषचंद्र बोस यांनी भाषण करून ब्रिटिशांशी कोणत्याही प्रकारचा समझोता न करण्याचे, फाळणी न स्वीकारण्याचे व लढा चालू ठेवण्याचे देशबांधवांना आवाहन कधी केले होते?
    1) 6 जुलै 1944 - आझाद हिंद रेडियोद्वारे 
    2) 12 सप्टेंबर 1944 - रंगून आकाशवाणीवरून 
    3)  18 ऑगस्ट 1945 - कर्नल हबिबूर रहमान यांच्यामार्फत
    4) 17 ऑगस्ट 1945 - सायगावहून त्यांनी मांचुरियाच्या दिशेने प्रयाण करण्यापूर्वी
     
    38) कोलकाता येथील आपल्या घरात नजरकैदेत असलेल्या सुभाषचंद्र बोस यांनी कोनत्या नावने नामांतर करुन पलायन केले होते ?
    1) मिया अकबर शहा
    2) ओरलँडो मझयुटा 
    3) महमद झियाउद्दीन
    4) 2 व 3 बरोबर
     
    39) सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भत योग्य घटनाक्रम लावा. 
    अ)  बेंगलोर येथे प्रसिद्ध वैज्ञानिक सर विश्र्वेश्र्वरैय्या ह्यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान परिषदेचे आयोजन.
    ब)  अलीपूरच्या तुरूंगात आमरण उपोषण
    क) कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर
    ड) पटेल-बोस जाहीरनामा प्रसिद्ध
    पर्यायी उत्तरे :
    1) अ - ब - क - ड
    2) क - अ - ड - ब
    3) क -  ड - अ - ब
    4) ड - ब - अ - क
     
    40) मंडाले कारागृहात वास्तव्यात सुभाषचंद्र बोस यांना कोनत्या रोगाची लागण झाली होती ?
    1) कावीळ
    2) प्लेग
    3) क्षयरोग
    4) कोलायटीस
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (79)
    1-4
     
    2-3
     
    3-4
     
    4-3
     
    5-4
     
    6-4
     
    7-4
     
    8-3
     
    9-2
     
    10-3
     
    11-2
     
    12-2
     
    13-2
     
    14-3
     
    15-2
     
    16-3
     
    17-4
     
    18-1
     
    19-2
     
    20-3
     
    21-2
     
    22-3
     
    23-1
     
    24-3
     
    25-3
     
    26-1
     
    27-4
     
    28-1
     
    29-4
     
    30-4
     
    31-3
     
    32-3
     
    33-1
     
    34-1
     
    35-2
     
    36-3
     
    37-2
     
    38-4
     
    39-3
     
    40-3
     

Share this story

Total Shares : 5 Total Views : 2282