प्रश्नमंजुषा 77 : चालू घडामोडी

  •  प्रश्नमंजुषा 77 : चालू घडामोडी

    प्रश्नमंजुषा 77 : चालू घडामोडी

    • 22 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 193 Views
    • 0 Shares

    प्रश्नमंजुषा 77 : चालू घडामोडी 

    1) खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
    1) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील 2 महाभियोग अयशस्वी ठरले.
    2) महाभियोग पारित होण्यासाठी अमेरीकी सिनेटमध्ये 2/3 बहुमत मिळणे आवशयक असते.
    3) अमेरिकी कॉग्रेसच्या कनिष्ष्ठ सभागृहामध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. 
    4) 20 जानेवाीरी 2021 पासून कमला हॅरीस या अमेरिकी सिनेटच्या अध्यक्षा आहेत.
     
    2) पार्वती दत्ता यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) त्यांना सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाचा ’डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार’ 2020 प्रदान करण्यात आला.
    ब) ’युनेस्को’च्या सांस्कृतिक विभागाच्या ’युनेस्को कल्चरल अवार्ड’ ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
    क) महागामी या ’सांस्कृतिक सेवाश्रम’ संस्थेत त्या कार्यरत आहेत.
    ड) त्यांनी सेवाश्रम संस्थेची निर्मिती केली. 
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    3) 2020 मध्ये ’ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही चळवळ कोणत्या देशता सुरु झाली होती?
    1) फ्रान्स 
    2) इटली
    3) दक्षिण आफ्रिका
    4) अमेरिका
     
    4) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) :  कोव्हिड लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्यास नश्रि्चत निकषांच्या आधारे ’नो फॉल्ट कॉम्पेन्सेशन’ या तत्वानुसार नुकसान भरपाई दिली जाते.
    कारण (र) : कोव्हिड लसीला परवानगी देताना ’आपत्कालीन वापरासाठी परवानगी’ (इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन) असा शॉर्टकट जगभरातील सरकारांनी या लसीबाबाबत घेतला आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    2)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    3)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    4)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    5) निरनिराळ्या लसींच्या बाबतीतील गंभीर दुष्परिणामाचे प्रमाण कसे आसते ?
    1) सरासरी 1 ते 2 लाख डोसच्या मागे एक
    2) सरासरी 1 ते 3 लाख डोसच्या मागे एक
    3) सरासरी 1 ते 5 लाख डोसच्या मागे एक
    4) सरासरी 1 ते 7 लाख डोसच्या मागे एक
     
    6) अमेरिकेतील सर्वांत तरुण अध्यक्ष म्हणून कार्य केलेल्या राष्ट्राध्यक्षांचा योग्य क्रम ओळखा.
    अ) थिओडोर रुझवेल्ट 
    ब) बिल क्लिटंन 
    क) जॉन केनेडी
    पर्यायी उत्तरे :
    1) क - ब - अ
    2)  अ - क - ब
    3) ब - अ - क
    4)  अ - ब - क
     
    7) अमेरिकेचे सर्वांत वयस्कर अध्यक्ष म्हणून इतिहासात कोणाची नोंद आहे ?
    1) रोनाल्ड रेगन
    2) डोनाल्ड ट्रम्प
    3) जोसेफ बिडेन ज्युनियर
    4) जॉर्ज बुश सिनियर
     
    8) 126 वे घटनादुरुस्ती विधेयक 2019 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात साध्या बहुमताने म्हणजेच हजर राहून मतदान करणार्‍या सदस्यांच्या बहुमताने मंजूर झाले आहे.
    2) या विधेयकाने लोकसभा आणि विधानसभांमधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेला राखीव जागांचा हिस्सा आणखी पुढील 10 वर्षांसाठी वाढविण्यात आला आहे.
    3) या विधेयकाने अँग्लो-इंडियन जमातीसाठी असलेला राखीव जागांचा हिस्सा वाढविण्याची शिफारस केलेली नाही ज्याची मुदत 25 जानेवारी 2020 रोजी संपलेली आहे.
    4) वरीलपैकी एकही नाही
     
    9) ’चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ’(CDS) (भारत) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
    1) सी.डी.एस.चे वर्णन सेवेतील प्रमुखांमध्ये ’समानातील प्रमुख’ असे केले जाते.
    2) सी.डी.एस. हे सेना व्यवहार विभागाचे (Department of Military Affairs) प्रमुख आहे.
    3) सी.डी.एस. हे पद ’माहिती अधिकार कायद्याखाली’ येणार नाही.
    4) सी.डी.एस. यांचे वेतन आणि भत्ते हे सेवेतील प्रमुखांच्या इतके असेल.
     
    10) लडाख बाबत योग्य विधाने शोधा.
    अ)  लडाख मध्ये लेह आणि कारगील असे दोन जिल्हे आहेत.
    ब)  लामांचे मुखवटा नृत्य या भागात प्रसिद्ध आहे.
    क)  लामायुरू मानेस्ट्री/धर्मशाळा तेथील चंद्रासारख्या पृष्ठभूमीसाठी प्रसिद्ध आहे.
    ड)  लामायुरूची स्थापना दलाई लामा यांनी केली आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब, क आणि ड
    2) अ, ब आणि क
    3) अ, क आणि ड
    4) ब आणि क
     
    11) नानकानासाहिब बाबत योग्य विधान शोधा.
    अ) त्याचे पूर्वीचे नाव तलवंडी होते.
    ब) राय बुलर भट्टी यांनी या शहराचे नामकरण ’नानकाना साहिब’ असे केले.
    क) ब्रिटिश काळात या गुरुद्वारामध्ये झालेल्या हिंसक हल्ल्यातून गुरुद्वारा सुधारणा चळवळीत मैलाचा दगड मानले जाते.
    ड) महाराजा रणजीत सिंह यांनी येथील जन्मस्थान समाधी देवस्थानाचे बांधकाम केले आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब, क आणि ड
    2) अ, ब आणि क
    3) अ, क आणि ड
    4) अ आणि ड
     
    12) डॉ. अभिजीत बॅनर्जी यांनी लिहिलेली पुस्तके शोधा.
    अ) मेकिंग एड वर्क
    ब) व्हॉट द इकॉनामी नीड्स नाऊ
    क) डेव्हलपमेंट अ‍ॅज फ्रीडम
    ड) पुअर इकोनॉमिक्स
    इ) द आयडिया ऑफ जस्टिस
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब, क, ड आणि इ
    2) ब, क आणि ड
    3) अ, ब आणि ड
    4) अ आणि ड
     
    13) जोड्या जुळवा (अर्जुन पुरस्कार 2019 बाबत):
    खेळाडू              खेळाचा प्रकार
    अ) तेजिंदरपाल सिंग तूर i)   फूटबॉल
    ब) अजय ठाकूर                ii)   टेबल टेनिस
    क) हरमित राजूल देसाई       iii)   कबड्डी
    ड) गुरप्रित सिंग संधू        iv)  अ‍ॅथलेटिक्स
    पर्यायी उत्तरे :
    1) iv ii iii i
    2) i iii ii iv
    3) i iv iii ii
    4) iv iii ii i
     
    14) खालील विधाने विचारात घ्या :
    अ) आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार सर्व राज्य शासनांनी ’राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण’ स्थापन करणे अनिवार्य आहे.
    ब) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे’ अध्यक्ष म्हणून राज्याचे गृहमंत्री कार्य करतात.
    क) ’जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे’ अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अथवा जिल्हा दंडाधिकारी हे असतात.
    वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
    1) फक्त क
    2) ब आणि क
    3) अ आणि क
    4) वरील सर्व
     
    15) ’जागतिक तंबाखूविरोधी दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
    1) 30 जून
    2) 31 मार्च
    3) 30 मे
    4) 31 मे
     
    16) 1991 मध्ये भारतातने औद्योगिकरणासाठी उदार मतवादी धोरण स्विकारले तेव्हा .... अर्थमंत्री होते. 1) पी. व्ही. नरसिंह राव
    2) डॉ. मनमोहन सिंग
    3) मोरारजी देसाई
    4) पी. चिदंबरम्
     
    17) खालीलपैकी कोणते युक्तीवाद ’खाजगीकरणाच्या’ बाजूचे आहेत?
    अ) जलद निर्णय
    ब) बेकारीत वाढ
    क) मालमत्तेचे अधोमूल्यन
    ड) सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त ब आणि क
    2) ब, क आणि ड
    3) फक्त अ आणि ड
    4) अ, ब आणि क
     
    18) जगातील पहिले 100% सौर उर्जेवर चालणारे विमानतळ ...... येथे आहे.
    1) कोचीन, केरळ
    2) बंगलुरु, कर्नाटक
    3) चेन्नई, तामिळनाडू
    4) मुंबई महाराष्ट्र
     
    19) जोड्या जुळवा :
    अ) व्हीपटेल रोग          i. बटाटा
    ब) डायबॅक रोग         ii. फुलकोबी
    क) खैरा रोग         iii. लिंबू
    ड) अर्ली ब्लाइट रोग iv. भात
    पर्यायी उत्तरे :
    a b c d
    1) i ii iii iv
    2) iii iv ii i
    3) ii iii iv i
    4) iv i iii ii
     
    20) ”इनर्जी फार येव्हर” हा हेतू कोणत्या भारतीय उपक्रमात आहे?
    1) भारतीय जैव तंत्रज्ञान विकास
    2) भारतीय रिनिवेबल उर्जा विकास एजन्सी
    3) भारतीय नॉन-रिनिवेबल उर्जा विकास
    4) यापैकी नाही
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा 77
    1-3
     
    2-1
     
    3-4
     
    4-1
     
    5-3
     
    6-2
     
    7-3
     
    8-1
     
    9-3
     
    10-2
     
    11-1
     
    12-3
     
    13-4
     
    14-3
     
    15-4
     
    16-2
     
    17-3
     
    18-1
     
    19-3
     
    20-2

Share this story

Total Shares : 0 Total Views : 193