प्रश्नमंजुषा (4)

  • प्रश्नमंजुषा (4)

    प्रश्नमंजुषा (4)

    • 11 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 309 Views
    • 1 Shares

     प्रश्नमंजुषा (4)

    1.   बाबासाहेबांनी खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं?

         1)   सुधारक

         2)   मूकनायक

         3)   हरिजन

         4)   शतपत्र


    2.   संयुक्त महाराष्ट्र चळवळीला कोणत्या राजकीय पक्षाचा सक्रिय पाठिंबा होता?

         1)   शिवसेना

         2)   काँग्रेस

         3)   कम्युनिस्ट पक्ष

         4)   जनसंघ


    3.   महाडच्या सत्याग्रहाला आणखी कोणत्या नावानं संबोधलं जातं?

         1)   चवदार मिठाचा सत्याग्रह

         2)   चवदार तळ्याचा सत्याग्रह

         3)   काळ्या पाण्याचा सत्याग्रह

         4)   उत्तर कोकणचा सत्याग्रह


    4.   मुंबईतील मोनोरेलचा पहिला टप्पा कोणता?

         1)   सायन ते मानखुर्द

         2)   चेंबूर ते वडाळा

         3)   वर्सोवा ते घाटकोपर

         4)   सांताक्रुझ ते चेंबूर


    5.   मुंबईतील कोणता बंगला अमिताभ बच्चन यांचा नाही?

         1)   जलसा

         2)   जनक

         3)   प्रतीक्षा

         4)   जन्नत


    6.   पुलंच्या भाषेत बोलायचं झालं तर, पुण्यात सर्वांत ‘प्रेक्षणीय स्थळ’ कोणतं?

         1)   स्वारगेट

         2)   मंडई

         3)   एफसी रोड

         4)   येरवडा


    7.   जुळ्या, तेल्या, डुल्या ही पुण्यातील कसली नावं आहेत?

         1)   असली नावं हल्ली कुणी पुण्यात ठेवत नाही

         2)   मित्रांची

         3)   रामाची

         4)   मारुतीची


    8.   मासिक पाळी स्त्रीच्या कोणत्या अवयवाशी निगडीत आहे?

         1)   ओटीपोट

         2)   गर्भाशय

         3)   कंबर

         4)   योनी


    9.   भारतात मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्तीचं साधारण वय काय?

         1)   40-50

         2)   45-52

         3)   55-60

         4)   30-40


    10.  यांपैकी कोणती वाडी मुंबईच्या गिरगावात नाही?

         1)   झावबाची वाडी

         2)   खोताची वाडी

         3)   टायकल वाडी

         4)   तालमक्की वाडी


    उत्तरे ः प्रश्नमंजुषा - 4

    1-2   आपल्या कार्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून बाबासाहेबांनी 1920 साली मुंबईतून मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केलं.

    2-3   संयुक्त महाराष्ट्र चळवळीला कम्युनिस्ट पक्षाचा सक्रिय पाठिंबा होता. या चळवळीच्या केंद्रस्थानी कामगार वर्ग होता आणि त्यांच्यात डाव्या संघटनांचा जोर होता.

    3-1   रायगड महाड इथल्या चवदार तळ्यातलं पाणी प्यायला तत्कालीन अस्पृशय समाजाला बंदी होती. हा हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेबांनी आंदोलन छेडलं. 20 मार्च 1927ला बाबासाहेबांनी चवदार तळ्याचं पाणी पिऊन सत्याग्रह केला.

    4-2

    5-4

    6-3

    7-4

    8-2   मासिक पाळी ही गर्भाशयाशी निगडीत असते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बीजाडांतून पूर्ण होऊन बाहेर पडतं. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादनही तयार केलं जातं. योग्य काळात पुरुषाच्या वीर्यातील पुरुषबीज आणि स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी या  स्त्रीबीजाचा संयोग होत नाही त्यावेळेस संयोग न झालेल्या बीजासहित आच्छादन बाहेर टाकलं जातं.

    9-2   45 ते 52 हे रजोनिवृत्तीचं म्हणजे मेनोपॉजचं साधारण वय आहे. 40 वर्षांच्या आधी पाळी गेली किंवा 52च्या नंतर पाळी येत राहिल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

    10-3

      

Share this story

Total Shares : 1 Total Views : 309