प्रश्नमंजुषा (3)
1. घटना समितीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवड महाराष्ट्र सोडून दुसर्या कोणत्या प्रदेशातून झाली?
1) पंजाब
2) गुजरात
3) मध्य प्रदेश
4) पश्चिम बंगाल
2. काळाराम मंदिराचा सत्याग्रह कोणत्या शहरात झाला?
1) कोल्हापूर
2) नागपूर
3) नाशिक
4) जळगाव
3. मासिक पाळीच्या दोन चक्रांमध्ये किती दिवसांचं अंतर असतं?
1) 20 ते 30
2) 28 ते 35
3) 10 ते 15
4) 24 ते 32
4. मासिक पाळीत शरीरातले कोणते हॉर्मोन्स मुख्य भूमिका बजावतात?
1) Gonadotropic hormone
2) Estrogene and Progesterone
3) Oxytocin
4) Testosterone
5. पुण्यात - एबीसी म्हणजे काय?
1) अप्पा बर्गर सेंटर
2) अमृततुल्य बटाटावडा चटणी
3) अप्पा बळवंत चौक
4) अबक
6. मुंबईला केंद्रशासित करण्याच्या नेहरूंच्या निर्णयाविरोधात कोणत्या नेत्याने राजीनामा दिला?
1) बाबासाहेब आंबेडकर
2) सी. डी. देशमुख
3) यशवंतराव चव्हाण
4) बाबासाहेब भोसले
7. महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये पुणे करार कोणत्या ठिकाणी झाला?
1) येरवडा कारागृह
2) आगा खान पॅलेस
3) साखर संकुल
4) सह्याद्री अतिथी गृह
8. विरारकडून चर्चगेटकडे येताना स्टेशनचा योग्य क्रम काय?
1) अंधेरी - वांद्रे - बोरिवली - खार रोड
2) मुंबई सेंट्रल - ग्रँट रोड - मीरारोड - मरिन लाइन्स
3) वसई रोड - भाईंदर - अंधेरी - दादर
4) माटुंगा रोड - माहीम - वांद्रे - खार रोड
9. यातली कोणती नदी मुंबईत आहे?
1) दहिसर
2) वैतरणा
3) उल्हास
4) तानसा
10. ’झालाच पाहिजे’ या विधानावरून आचार्य अत्रे यांनी कोणत्या राजकीय नेत्यावर तोंडसुख घेतलं?
1) जीवनराव पाटील
2) यशवंतराव चव्हाण
3) मारोतराव कन्नमवार
4) बाबासाहेब भोसले.
उत्तरे : प्रश्नमंजुषा - 3
1-4 घटना समितीत निवड होण्यासाठी कॅबिनेट मिशननं अट घातली होती की विधानसभेतून ज्या पक्षाचा किमान एक उमेदवार निवडून आला आहे, त्या पक्षातर्फेच उमेदवारी दाखल करता येईल. बाबासाहेबांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाचा मुंबईत एकही उमेदवार निवडून आला नाही. मात्र पश्रि्चम बंगालमधून त्यांच्या पक्षाचा एक उमेदवार निवडून आला होता. म्हणून त्यांनी पश्रि्चम बंगालमधून उमेदवारी दाखल केली आणि विजयी झाले.
2-3 नाशिक येथील काळाराम मंदिरात तत्कालीन अस्पृशयांना प्रवेश मिळावा, म्हणून बाबासाहेबांनी ही चळवळ उभी केली. प्रचंड संघर्षानंतर 1931 साली सर्वांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळाला. समानतेची वागणूक मिळवण्याच्या दृष्टीने हे एक मोठं पाऊल होतं.
3-4 मासिक पाळींच्या दोन चक्रांमध्ये साधारण 24 ते 32 दिवसांचं अंतर असतं. हे अंतर प्रत्येक स्त्रीनुरूप बदलू शकतं.
4-2 मासिक पाळीदरम्यान स्त्रीबीज बाहेर पडतं. तेव्हा Estrogene आणि Progesterone हे हॉर्मोन्सस्रवतात. योग्य वयात मासिक पाळीला गर्भाशय तयार होण्यासाठी सुद्धा या हॉर्मोन्सची मदत होते.
5-3
6-2 16 जानेवारी 1956 रोजी पंतप्रधान नेहरूंनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली. 17 जानेवारीला विरोधकांनी सार्वत्रिक संपाची घोषणा केली. 17 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मुंबईत मोठा हिंसाचार झाला. पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात 76 लोकांचा बळी गेला. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात केंद्रीय अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी 23 जानेवारी रोजी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे दिला.
7-1 दलितांसाठी वेगळे मतदारसंघ तयार करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या योजनेला बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता. त्याविरुद्ध महात्मा गांधी यांनी येरवडा कारागृहात उपोषण केलं. तेव्हा बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यात कायदेमंडळात अस्पृशयांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं, या मुद्दयावर सहमती झाली. या कराराला पुणे करार म्हणतात. 24 सप्टेंबर 1932 साली संध्याकाळी पाच वाजता हा करार झाला होता.
8-3
9-1
10-2 आचार्य अत्रे यांनी ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ अशी घोषणा केली होती. तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी ‘झालाच’मधल्या ‘च’ या शब्दाची काय गरज असा सवाल केला. तेव्हा अत्रे म्हणाले - चव्हाणांच्या नावातला ‘च’ का हवा? ‘चव्हाण’मधला ‘च’ काढला तर ‘वहाण’ (चप्पल) उरते.