प्रश्नमंजुषा (2)

  • प्रश्नमंजुषा (2)

    प्रश्नमंजुषा (2)

    • 10 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 323 Views
    • 0 Shares

     

    प्रश्नमंजुषा (2)

    1.   बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र कोणत्या विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून शिकवलं जातं?

         1)   डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

         2)   सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

         3)   स्टॅनफोर्ड

         4)   कोलंबिया

    ·     बाबासाहेबांचे ‘वेटिंग फॉर व्हिसा’ ही आत्मचरित्रात्मक पुस्तिका कोलंबिया विद्यापीठात पाठ्यपुस्तक म्हणून शिकवलं जातं. या विद्यापीठात बाबासाहेबांचा पुतळासुद्धा आहे.

    2.   भारतातील शाळांमध्ये पाळी येण्याच्या वयात मुलींच्या शाळागळतीचं प्रमाण किती टक्के आहे?

         1)   12

         2)   7

         3)   15

         4)   20

    ·        •संयुक्त राष्ट्रसंघाच्या ताज्या आकडेवारीनुसार 9 ते 14 वयोगटातील मुलीचं शाळागळतीचं प्रमाण 20 टक्के इतकं आहे. पाळीविषयीची स्वच्छता, शौचालयाचा अभाव आणि सुरक्षेच्या कारणांपोटी मुलींची शाळा बंद होते.

     3.   पुणे मेट्रोचा पहिला टप्पा कोणत्या दोन भागांना जोडणार?

         1)   बंड गार्डन ते विश्रांतवाडी

         2)   पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट

         3)   लोणावळा ते हडपसर

         4)   लोहगाव ते डेक्कन

     4.   सीप्झचा फुलफॉर्म काय आहे?

         1)   सांताक्रुझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन

         2)   सेंट्रल इंडस्ट्रीयल एक्साईज प्रोडक्शन झोन

         3)   चकाला इंडस्ट्रीयल इस्टेट अँड प्रोडक्शन झोन

         4)   चारकोप इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन

     5.   महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून आजही कुठे चळवळ सुरू आहे?

         1)   डांग (गुजरात)

         2)   बेळगाव (कर्नाटक)

         3)   छिंदवाडा (मध्यप्रदेश)

         4)   वरील सर्व

    ·        मराठी भाषिकांचं प्राबल्य असलेलं बेळगाव महाराष्ट्रात असावं, अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र समितीने केली होती. पण बेळगाव जिल्हा कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. बेळगाव महाराष्ट्रात सामील व्हावा, म्हणून गेल्या 60 वर्षांपासून तिथले अनेक मराठी भाषिक आंदोलन करत आहेत. त्याविषयीची केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे.

     6.   महाराष्ट्र राज्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं?

         1)   यशवंतराव चव्हाण

         2)   पं. जवाहरलाल नेहरू

         3)   सरदार वल्लभभाई पटेल

         4)   मोरारजी देसाई

    ·        मुंबई महाराष्ट्राला द्यायला विरोध करणार्या पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्याच हस्ते महाराष्ट्र राज्याचं उद्घाटन करण्यात आलं. 1 मे 1960 रोजी राजभवनात त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचं अनावरण करण्यात आलं.

     7.   सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी कोणत्या शाळेविरोधात रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती?

         1)   अंजुमन--इस्लाम

         2)   बाँबे स्कॉटिश

         3)   सेंट झेवियर्स हायस्कूल

         4)   शारदाश्रम

     8.   मस्तानी पुण्यात कुठे रहायची, असं मानतात?

         1)   मगरपट्टा

         2)   शनिवारवाडा

         3)   पिंपरी-चिंच

         4)   कोथरुड

     9.   खालीलपैकी कोणतं पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलं आहे?

         1)   शेतकर्याचा आसूड

         2)   संविधान

         3)   अन्हायलिएशन ऑफ कास्ट

         4)   दुर्दम्य

    ·      अन्हायलिएशन ऑफ कास्ट’ म्हणजेच ‘जातीचे निर्दालन’ हे बाबासाहेबांच्या जातीबद्दलच्या विचारांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. जातपात तोडक मंडळाने त्यांना भारतीय जातिव्यवस्थेवर व्याख्यान देण्यासाठी बोलावलं होतं. पण भाषणाचा प्रक्षोभक मसुदा बघून आयोजकांनी भाषण रद्द केलं. या भाषणाच्या 1500 प्रती पुस्तकाच्या स्वरूपात बाबासाहेबांनी स्वखर्चाने छापल्या.

    10. भारतातील कोणत्या देवीला Menstruation Goddess म्हणजेच ’पाळीची देवी’ म्हटलं जातं?

         1)   यलम्मा

         2)   कालकाजी

         3)   शबरीमला

         4)   कामाख्या

    ·     आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं मंदिर आहे. या देवीला तीन दिवस पाळी येते अशी आख्यायिका आहे. पाळी आलेल्या देवीसाठी आषाढ महिन्यात तीन दिवसांची मोठी जत्रा भरते.

     

     सौजन्य : BBC न्यूज

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 323