-
छत्रपती राजाराम महाराज
- 02 Jun 2021
- Posted By : study circle
- 498 Views
- 0 Shares
छत्रपती राजाराम महाराज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”समाजसुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन” घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. सदर लेखात कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
१.३ प्रबोधन काळ :
* ब्राह्मणेत्तर चळवळ, जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाकरिता चळवळ आणि अस्पृश्यता निर्मूलन.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
छत्रपती राजाराम महाराज
* ३१ मे १९२२ रोजी राजर्षी शाहू महाराज यांचे पुत्र राजाराम महाराज यांनी राजर्षींच्या निधनानंतर आपला राज्याभिषेक मराठा पुरोहितांकडून करुन घेतला होता. त्या राज्याभिषेकाला ३१ मे २०२२ रोजी ९९ वर्षे पूर्ण झाली.
* ६ मे १९२२ रोजी राजर्षी शाहू छत्रपतींचे निधन झाले आणि आखिल ब्रह्मसमंध मराठा बहुजनांच्या मनात आणि व्यवहारात राजर्षींनी घडवून आणलेली परिवर्तनाची चाके उलटी फिरवण्याचे मनसुबे रचू लागला. राजर्षींचा अंत्यविधी त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई राणीसाहेब यांनी राजर्षींच्या इच्छेनुसार मराठा पुरोहितांकडून करून घेतला होता. पण थोडी धार्मिक वृत्ती असणार्या राजाराम महाराजांना फितवून, भीती घालून त्यांचा राज्याभिषेक मात्र पुन्हा ब्राह्मण राजोपाघ्यांकडून करुन घ्यायचे मनसुबे रचले जाऊ लागले. यासाठी भीती हे सनातनी हत्यार वापरण्याचा जोरदार प्रयत्न कोल्हापूर आणि बाहेरच्या तथाकथित भूदेवांकडून सुरू झाला.
* राज्याभिषेकासारखा महत्त्वाचा विधी करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण पुरोहितांनाच आहे असा आग्रह धरला गेला. असे झाले नाही तर अनर्थ, आघटित होण्याची भीती घातली जाऊ लागली. पण राजर्षींच्या रक्ताचा आणि विचारांचा छावा असणार्या राजाराम महाराजांनी या सनातनी वृत्तीला पायबंध घालून ३१ मे, १९२२ रोजी रितीप्रमाणे विधीपूर्ण राज्यकारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली.
सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
अधिक माहितीसाठी पाहा -