गिलगिट व बाल्टिस्तान

  • गिलगिट व बाल्टिस्तान

    गिलगिट व बाल्टिस्तान

    • 17 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 203 Views
    • 0 Shares

    गिलगिट व बाल्टिस्तान

    15 नोव्हेंबर - गिलगिट, बाल्टिस्तान या प्रदेशात पाकिस्तानने निवडणुका घेतल्या असल्या तरी तेथील गुंता विचित्र आहे. तेथे पाकिस्तानला विरोध असणारे, भारताच्या बाजूने असणारे अनेक समूह आहेत. स्वायत्ततेची मागणी करणारा एक वर्ग तेथे आहे. शिवाय, मानवाधिकारांचे तेथे सातत्याने उल्लंघन होत असल्यामुळे भारताने तेथील परिस्थिती पुराव्यांसह जगासमोर आणली पाहिजे.

    1) गिलगिट, बाल्टिस्तान प्रदेशात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने तेथील निवडणुकात चांगली कमगिरी केली. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा दुसर्यांदा उचलून धरला होता.

    2) 2013 च्या आसपास चीनने पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली, कारण चीनकडून या प्रदेशात जी गुंतवणूक केली जात आहे, त्यात बाधा येण्याची शक्यता आहे. या प्रदेशाची संवैधानिक स्थिती विवादास्पद आहे. हे त्रिशंकूप्रमाणे अडकून पडलेले क्षेत्र आहे. कारण पाकिस्तान हे क्षेत्र आपले मानत नाही आणि ते भारताच्याही ताब्यात नाही. या भागावर केवळ नियंत्रण पाकिस्तानचे आहे. आता पाकिस्तानात या प्रश्नावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दबाव वाढत आहे. एक मतप्रवाह असा आहे की, या इलाख्याला प्रांताचा दर्जा द्यावा; परंतु एक पळवाट शिल्लक ठेवावी, कारण संयुक्त राष्ट्रसंघाचा प्रस्ताव आल्यास त्यावर कोणताही परिणाम होता कामा नये. अनेक लोक या निर्णयाच्या विरोधात आहेत. त्यामुळे आपली बाजू कमकुवत होईल, असे या मंडळींना वाटते. कारण गेल्या सत्तर वर्षांपासून पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाचीच प्रतीक्षा करीत आहेअशा प्रकारे निर्णय घेतल्याने संयुक्त राष्ट्रांचे प्रस्ताव संपुष्टात येतील.

    3) पाकिस्तानातील संबंधित भागाला प्रांताचा दर्जा द्यायचा असेल तर घटनेत बदल करावा लागतो. वित्त आयोगातून त्या प्रांतासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. त्या भागातील प्रतिनिधींसाठी संसदेत जागा ठेवाव्या लागतील. पाकिस्तानच्या राज्यसभेत म्हणजे सिनेटमध्ये या भागाला प्रतिनिधित्व द्यावे लागेल. इतर प्रांतांप्रमाणे प्रत्येक बाबतीत या प्रांतालासुद्धा हिस्सा द्यावा लागेल. त्यासाठी घटना बदलण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. घटना बदलायची असेल तर दोन तृतीयांश बहुमत मिळणे आवश्यक आहे. इम्रान खान सरकारकडे हे बहुमत नाही. विरोधी पक्षांनी आपण या प्रस्तावाच्या बाजूने नसल्याचे सांगितले आहे.

    4) पाकिस्तानला मीरपूर आणि मुझफ्फराबाद भागात विरोधाचा सामना करावा लागत आहे. कारण तेथील लोक या इलाख्याला ‘आझाद काश्मीर’ मानतात. वस्तुतः हा विभाग ‘आझाद’ही नाही आणि सद्यस्थितीत काश्मीरसुद्धा नाही; परंतु तो जुन्या काश्मीर संस्थानाचा हिस्सा आहे. तेथील लोकांचा मोठा विरोध आहे. या लोकांचे म्हणणे असे की, 1949 मध्ये प्रशासकीय कारणांमुळे हा भाग पाकिस्तानापासून अलग ठेवण्यात आला आणि आता इम्रान सरकार तो जोडत आहे. असे केल्यास ती आमच्या स्वायत्ततेशी केलेली तडजोड ठरेल. विरोधी पक्षांचाही असा आरोप आहे की, इम्रान खान या भागाला पाकिस्तानात सामील करून घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलाच आंतरराष्ट्रीय सीमा बनवीत आहे. ही कृती भारताच्या हिताचीच ठरेल. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांमध्ये या गोष्टीमुळे राग आहे.

    5) भारतात जे फुटीरतावादी लोक आहेत, त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. कारण ते नेहमी जनमताची मागणी करीत आले आहेत आणि या निर्णयामुळे त्यांची स्थिती कमकुवत होईल. पाकिस्तानने हा विभाग आपल्यात सामील करून घेतला तर या भागात जनमत कसे होईल? संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावातील पहिली अट अशी आहे की, पाकिस्तानने या भागातून आपल्या फौजा मागे घ्याव्यात आणि बाहेरून तेथे येऊन स्थायिक झालेल्या लोकांना बाहेर काढावे. त्या भागाचा कब्जा भारताकडे द्यावा लागेल. कायदा-सुव्यवस्थेसाठी भारत आपल्या फौजा तेथे तैनात करेल.


    प्रश्नमंजुषा (18)

    1)   खालीलपैकी कोणता भाग जुन्या काश्मीर संस्थानाचा हिस्सा नाही ?

         )   मीरपूर 

         )   मुझफ्फराबाद    

         )   गिलगिट व बाल्टिस्तान

         )   अक्साई चीन

         पर्यायी उत्तरे :

         1)   फक्त अ

         2)   अ आणि ब

         3)   क आणि ड

         4)   फक्त क

    2)   पाकव्याप्त काश्मीरमधील कोणत्या भागातील लोक त्या इलाख्याला ‘आझाद काश्मीर’ मानतात ?

         )   गिलगिट व बाल्टिस्तान

         )   नॉर्दर्न एरिया व फाटा (फेडरली अडमिनिस्टर्ड एरिया)

         )   मीरपूर आणि मुझफ्फराबाद

         वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत

         पर्यायी उत्तरे :

         1)   फक्त क

         2)   फक्त अ आणि ब

         3)   फक्त अ आणि क

         4)   , ब आणि क

    3)   खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

         )   1949 मध्ये प्रशासकीय कारणांमुळे गिलगिट व बाल्टिस्तान हा भाग पाकिस्तानापासून अलग ठेवण्यात आला.

         )   2013 पासून गिलगिट व बाल्टिस्तान या प्रदेशाची संवैधानिक स्थिती विवादास्पद आहे.

         पर्यायी उत्तरे :

         1)   फक्त अ            

         2)   फक्त ब   

         3)   अ आणि ब दोन्ही

         4)   कोणतेही नाही

    4)   संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकाराने विवादाग्रस्त जम्मू काश्मीरमध्ये जनमत घेण्यासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूक आहे?

         1)   पाकिस्तानने या भागातून आपल्या फौजा मागे घ्याव्यात.

         2)   बाहेरून तेथे येऊन स्थायिक झालेल्या लोकांना बाहेर काढावे.

         3)   त्या भागाचा कब्जा भारताकडे द्यावा व कायदा-सुव्यवस्थेसाठी भारत आपल्या फौजा तेथे तैनात करेल.

         4)   भारतीय संविधानाचे 35 अ व 370 कलम पुन्हा लागू करावे.

    5)   खाली दोन विधान दिलेली आहेत () विधान असून () हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

         विधान ()   पाकिस्तानातील विरोधी पक्षांचा गिलगित बाल्टिस्तान  भागाला प्रांताचा दर्जा देण्यास विरोध अहे.

        कारण () या भागाला पाकिस्तानात सामील करून घेऊन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलाच आंतरराष्ट्रीय सीमा बनविण्याची पाकिस्तान सरकारची ़कृती भारताच्या हिताची ठरेल.

         पर्यायी उत्तरे :

         1)   () आणि () दोन्ही सत्य असून () हे () चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.

         2)   () आणि () दोन्ही सत्य असून () हे () चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.

         3)   () सत्य असून विधान () असत्य आहे.

         4)   () असत्य असून विधान () सत्य आहे.

    उत्तर : प्रश्नमंजुषा (18)

    1-4

    2-1

    3-1

    4-4

    5-1

Share this story

Total Shares : 0 Total Views : 203