ड्रॅगन फ्रुट

  • ड्रॅगन फ्रुट

    ड्रॅगन फ्रुट

    • 17 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 198 Views
    • 0 Shares

    ड्रॅगन फ्रुट

    विदेशातील ड्रॅगन फ्रुट हे मुळात आरोग्यदायी असलेले फळ, त्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. ते शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित तर ठेवतेच तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविते. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबत पचनक्रिया सुरळीत करते.

    1)   मूळ मेक्सिकोतील असलेल्या या फळापिकाची लागवड कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स, इंडोनेशिया आदी देशांत होते.

    2)   या फळाची भारतातील आवक तैवान आणि व्हिएतनाममधून होते.

    3)   भारतात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आदी राज्यांतही मोठ्या प्रमाणावर ड्रॅगन फ्रुटची लागवड झाली आहे. तमिळनाडू कृषी विद्यापीठाने त्यावर संशोधन केले. गुजरातमधील जुनागड व कच्छमध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्याने आनंद कृषी विद्यापीठात त्यावर संशोधन सुरू आहे.

    4)   महाराष्ट्रातील दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रुटची लागवड वाढल्यामुळे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात या फळांवर संशोधन केले जात आहे.

     •    ड्रॅगन फ्रुट हे तीन प्रकारांत येते -

    1)   वरून लाल रंग आतील गर पांढरा

    2)   वरून लाल रंग, आतील गर लाल - या फळाला मागणी जास्त आहे.

    3)   वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा

     •    ड्रॅगन फ्रुटचे फायदे -

    1)   या फळात 90 टक्के पाणी आणि भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असते.

    2)   कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि बी जीवनसत्त्वामुळे गुणकारी

    3)   सौंदर्यवर्धक, क जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

    4)   केस गळण्यास प्रतिबंध करते. चेहर्यावरील डाग, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादीवर उपयुक्त, चेहर्यावरील सुरकुत्या नाहीशा करते.

    5)   कोलेस्टेरॉल कमी करते. बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, हृदयविकारात गुणकारी.

    6)   तंतुमय असल्याने पोट साफ राहते, कॅल्शियममुळे संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात, हाडे मजबूत होतात.

    7)   हे फळ कर्करोगाला अटकाव करते. लठ्ठपणा आणि चरबी कमी करण्यास मदत करते. मधुमेह नियंत्रित करते.

    8)   पांढर्या पेशी हे फळ खाल्ल्याने वाढतात. विषमज्वर, डेंगू, कावीळ असे आजार झालेल्या रुग्णांना हे फळ खायला देतात.


    प्रश्नमंजुषा (17)

    1)   ड्रॅगन फ्रुटमधील कोणत्या घटकामुळे संधिवाताच्या वेदना कमी होतात ?

         1)   बीटा कॅरोटीन

         2)   पोटॅशियम

         3)   लोह आणि बी जीवनसत्त्वा

         4)   कॅल्शियम

    2)   विषमज्वर, डेंगू, कावीळ असे आजार झालेल्या रुग्णांना ड्रॅगन फळ खायला देतात, कारण -

         a)   हे फळ खाल्ल्याने शरीरातील पांढर्या पेशी वाढतात.

         b)   त्यात भरपूर प्रमाणात क जीवनसत्त्व असते.

         c)   हे फळ खाल्ल्याने शरीरातील  तांबड्या पेशी वाढतात.

         वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत

         1)   (a) फक्त

         2)   (b) फक्त

         3)   (a) आणि (b) फक्त

         4)   (a), (b) आणि (c) 

    3)   कोणत्या प्रकारच्या ड्रॅगन फळाला मागणी जास्त आहे ?

         1)   वरून लाल रंग आतील गर पांढरा

         2)   वरून लाल रंग, आतील गर लाल

         3)   वरून रंग पिवळा व आतील गर पांढरा

         4)   वरून रंग पिवळा व आतील गर लाल

    4)   विदेशातील ड्रॅगन फ्रुटबाबत खालील विधाने विचारात घ्या ः

         a)   या फळाची भारतातील आवक तैवान आणि व्हिएतनाममधून होते.

         b)   भारतात तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र राज्यांत ड्रॅगन फ्रुटची लागवड होते.

         c)   हे फळ मूळ इंडोनेशियातील आहे.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / विधाने बरोबर आहेत?

         1)   (a) आणि (b)

         2)   (b) आणि (c)

         3)   (a) आणि (c)

         4)   (a), (b) आणि (c)

    5)   भारतातील कोणत्या विद्यापीठात ड्रॅगन फ्रुटवर संशोधन सुरू आहे ?

         a)   तमिळनाडू कृषी विद्यापीठ

         b)   आनंद कृषी विद्यापीठ

         c)   एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ

         d)   महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

         वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत.

         1)   (a) फक्त

         2)   (c) (d) फक्त

         3)   (a), (b) (d) फक्त 

         4)   (a) (b) फक्त

     उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (17)

    1-4

    2-1

    3-2

    4-1

    5-3

Share this story

Total Shares : 0 Total Views : 198