सोने

  •  सोने

    सोने

    • 12 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 267 Views
    • 0 Shares

     सोने

    भारत जगातील सोन्याची सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. भारतात सोन्याला भावनिक महत्त्व आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अधिक पटीने भारतात सोनं विकलं जाते. जगातील सर्वांत जास्त सोनं दक्षिण आफ्रिका आणि भारतात आढळतं. दक्षिण आफ्रिका आणि भारतापाठोपाठ उत्तर अमेरिकेमध्ये सोन्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमधील खाणींत बरंच सोनं सापडतं.

         सोन्याचे अर्थकारण -

    1)   दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये जगातली सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. विटवॉटर्स रँड खोर्‍यातून जगाला सर्वांत जास्त सोनं मिळतं. तसेच या खोर्‍याच्या 40 टक्के भागात अजूनही उत्खनन झालेलं नाही.

    2)   सोन्याची जगातली दुसरी सर्वांत मोठी खाण दक्षिण कर्नाटकमध्ये कोलार जिल्ह्यात आहे. हडप्पा आणि मोहंजोदाडोमध्ये सापडलेल्या सोन्याच्या वस्तूंचा संदर्भही कोलार जिल्ह्यातील या खाणीशी जोडला गेला आहे. 2001 पासून कोलारमधील ही खाण बंद असली तरी सोन्याच्या उत्पादनात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

    3)   लंंडनमधून सोन्याचे दर अमेरिकन डॉलर्स, पाऊंड आणि युरोमध्ये निश्चित केले जातात. ’लंडन बुलियन मार्केट’मध्ये ज्या दिवशी व्यवहार सुरू असतात त्यादिवशी दोन वेळा (लंडन वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता आणि दुपारी 3 वाजता) सोन्याची किंमत ठरवली जाते. या पद्धतीला ’लंडन गोल्ड फिक्स’ म्हणतात.  नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला फक्त एकदाच म्हणजे सकाळी सोन्याचे दर निश्चित केले जातात.

    4)   भारतात सध्या सोन्याच्या तीन खाणी आहेत -

         1)   कर्नाटकातील हुट्टी

         2)   कर्नाटकातील उती

         3)   झारखंडमधील हिराबुद्दिनी

    5)   भारतात सर्वांत जास्त सोनं मंदिरांमध्ये आहे. केरळच्या तिरुवनंथपुरममधील पद्मनाभस्वामी मंदिरात नेमकी किती सोनं आहे, याचा अंदाज नसला तरी 2011 मध्ये कोर्टाच्या आदेशानंतर जेव्हा मंदिराचा खजिना उघडला गेला त्यात सोन्याच्या मूर्ती, भांडी, दागिने, नाणी आणि मौल्यवान रत्नं सापडली व त्याची किंमत 100 अब्ज आहे.

    6)   आंध्र प्रदेशच्या तिरुपती बालाजी मंदिराने 2019  मध्ये पंजाब नॅशनल बँकेत 1,311 किलो सोनं जमा केलं होतं, तर 2020 मध्ये या मंदिराच्या ट्रस्टने 2,780 किलो सोनं स्टेट बँक ऑफ इंडियात जमा केलं.

    7)   आकडेवारीनुसार भारताकडे 600 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं असून भारत सरकारने यातला मोठा भाग नागपूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात साठवला आहे. 1956 साली भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या परवानगीनंतर मुंबई ऑफिसमधून लष्कराच्या कडक सुरक्षेत देशाचं सोनं नागपूरला नव्या तिजोरीत हलवलं होत. आजपर्यंत भारत सरकारचं सोनं हे परकीय आक्रमणांना लक्षात घेऊन नागपूरमध्येच ठेवलं आहे.

    8)   सध्या भारतात चलन आणि सोन्याचं कोणतंही नातं नाही. पूर्वी देशाकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यानुसार चलन छापलं जायचं. यामुळे देशाच्या चलनाला राखीव निधी म्हणून सोन्याचा आधार होता. 1971 मध्ये अमेरिकेनंही राखीव निधी म्हणून सोन्याला बाद ठरवलं होतं.


        प्रश्नमंजुषा (12)

    1)   कर्नाटकातील कोलार खाणीसंबंधी खालील विधाने विचारात घ्या ः

         अ)   2004 पासून कोलारमधील ही खाण बंद आहे.

         ब)   ही खाण मौर्य काळापासून कार्यरत होती.

         क)   हडप्पा आणि मोहंजोदाडोमध्ये सापडलेल्या सोन्याच्या वस्तूंचा संदर्भ या खाणीशी जोडला गेला आहे.

         ड)   ही देशातील सोन्याची दुसरी सर्वांत मोठी खाण आहे.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

         1)   अ, ब, क 

         2)   ब, क, ड  

         3)   अ, क, ड

         4)  फक्त क

    2)   पुढीलपैकी चूक विधान ओळखा.

         अ)   केरळच्या तिरुवनंथपुरम येथे पद्मनाभस्वामी मंदिर आहे.

         ब)   ’लंडन गोल्ड फिक्स’ पद्धतीनुसार सोन्याची किंमत ठरवली जाते.

         1)   अ बरोबर तर ब चूक आहे.

         2)   ब चूक तर अ बरोबर आहे.

         3)   दोन्ही विधाने चूक आहेत.

         4)   दोन्ही विधाने बरोबर आहेत.

    3)   खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

         a )   आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या परवानगीनंतर 1956 साली भारत सरकारने आरबीआयच्या मुंबई ऑफिसमधून देशाचं सोनं नागपूरला हलवलं होत.

         b)   1971 साली केंद्र सरकारने देशाच्या चलनाला राखीव निधी म्हणून सोन्याचा आधार रद्द केला.

         c)   तिरुपती बालाजी मंदिराने त्यांचे सोने रिझर्व्ह बँक, पंजाब नॅशनल बँक  व स्टेट बँक ऑफ इंडियात सुरक्षित ठेवले आहे.

         d)   भारत सरकारकडे 600 अब्ज डॉलर्स किमतीचं सोनं आहे.

         पर्यायी उत्तरे -

         1)   विधान (a) आणि (b)

         2)   विधान (a), (b) आणि (c)

         3)   विधान (a) आणि (d)

         4)   विधान (b), (c) आणि (d)

    4)   पुढीलपैकी काहीही चूक नसणारे विधान ओळखा.

         अ)   ’लंडन बुलियन मार्केट’मध्ये सोन्याची किंमत कामकाजाच्या प्रतिदिन दोनवेळा ठरवली जाते.

         ब)   लंडनमधून सोन्याचे दर अमेरिकन डॉलर्स, येन, रेनमॅन पाऊंड आणि युरोमध्ये निश्चित केले जातात.

         क)   नाताळ आणि 31 डिसेंबर दिवशी फक्त एकवेळाच सोन्याचे दर निश्चित केले जातात.   

         1)   फक्त अ

         2)   अ आणि क

         3)   क

         4)   वरील सर्व

    5)   जगातील सोन्याचे उत्पादन व बाजारपेठेनुसार योग्य चढताक्रम लावा-

         a)  भारत

         b)  अमेरिका

         c)  दक्षिण आफ्रिका

         c)  कॅनडा

         पर्यायी उत्तरे :

         1)   (d), (b), (c), (a)

         2)   (c), (b), (d), (a)

         3)   (d), (b), (a), (c)

         4)   (c), (a), (b), (d)

    6)   भारतातील या सोन्याच्या खाणीतून सोने उत्पादन केले जाते.

         a)   हिराबुद्दिनी

         b)   उती

         c)   कोलार

         d)   हुट्टी

         पर्यायी उत्तरे :

         1)   (a), (b), (c)

         2)   (b), (c), (d)

         3)   (a), (b), (d)

         4)   (a), (c), (d)

    उत्तरे ः प्रश्नमंजुषा (12)

    1-4

    2-4

    3-3

    4-4

    5-3

    6-4 

Share this story

Total Shares : 0 Total Views : 267