प्रकाशझोतातील स्थळे / प्रश्नमंजुषा (69)

  • प्रकाशझोतातील स्थळे / प्रश्नमंजुषा (69)

    प्रकाशझोतातील स्थळे / प्रश्नमंजुषा (69)

    • 27 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 170 Views
    • 0 Shares

    किलुआ ज्वालामुखी

            24  डिसेंबर 2020-  अमेरिकेत हवाई येथील किलुआ ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुमारे 200 फूट उंच लाव्हा उसळला. त्याची राख 3 किमी पर्यंत पसरली. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर रिश्टर स्केलवर 4.4 तीव्रतेचा भूकंपाचा धक्काही बसला. परिसरातील भागात घरांना तडे गेले आहेत. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर या भागात विषारी द्रवाची गळती झाली.
    •• मे 2018 मध्ये याआधी किलुआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. यादरम्यान 30 हजार फुटांहून जास्त उंचीपर्यंत लाव्हा उसळला. त्यामुळे 550 घरांचे नुकसान झाले होते. 
     
    जामसर
     
     
            24 डिसेंबर 2020- पालघर जिल्ह्यातील जामसर परिसरात जैवविविधता तसेच ऐतिहासिक पुरावे आढळले. पुरातत्त्व अभ्यासकांना 125 पेक्षा अधिक आदिवासी संस्कृतींचे पुरावे जामसर गावाच्या आजूबाजूला आढळले. यामध्ये युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मारक असणारे वीरगळ, सतीस्मारक शिळा त्याचबरोबर शिल्पांवर कोरलेली आदिवासी कलेसह एका मोठ़या मंदिर संकुलाचे अवशेषही आढळले. ते देवतळी आणि जामसर तलावाच्या दरम्यान विखुरलेल्या अवस्थेत होते. 
    • जामसर  येथील पुरावे सहाव्या ते बाराव्या शतकांदरम्यान या भागात आदिवासी लोकसंस्कृतीचे प्रबळ प्रस्थ असल्याचे सिद्ध करतात. तसेच तेराव्या शतकापासून ब्रिटिश काळापर्यंत जव्हार - जामसर परिसर हा मुकणे साम्राज्याच्या आधिपत्याखाली होता, असे दिसून येते. तसेच त्या काळी जामसर तलावाजवळचा रस्ता हा नालासोपारा (शूर्पारख)-भरूच दरम्यानचा महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता.
    ••• जामसर हे शूरपारख ते नाशिक व शूरपारख ते भरूच या दरम्यान प्राचीन काळी असलेल्या व्यापारी मार्गावरचे  महत्त्वाचे व्यापारी शहर होते.
    ••• 1980 च्या सुमारास पुरातत्त्व अभ्यासक सदाशिव टेटीवलकर यांनी जामसेर भागास भेट दिली होती. त्यानंतर 2018 साली ठाणे, जिल्हा वेटलँड समितीने ‘स्येंमंतक’सह या परिसरास भेट दिली तेव्हा विखुरलेले अवशेष निदर्शनास आले. हे सर्व अवशेष मध्ययुगीन काळातील संस्कृतीचे असल्याचे अभ्यासावरून दिसून आले असून त्या काळात या भागात आदिवासी संस्कृती प्रबळपणे अस्तित्वात असल्याचे प्रकाशझोतात आले.
    ••• जामसर तलाव परिसर पाणथळ जागा म्हणून घोषित करण्यात आली असून जैवविविधतेने नटलेला हा संपूर्ण परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जाणार आहे.
     
    अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा शताब्दी समारंभ
            23 डिसेंबर 2020 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) शताब्दी कार्यक्रमास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी एका विशेष डाक तिकीटाचे अनावरण केले.
    •••• 56 वर्षात एएमयू येथे भाषण देणारे लाल बहादूर शास्त्री नंतर मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. आपल्या भाषणात मोदींनी विद्यापीठाचा इतिहास, माजी विद्यार्थी, येथील संशोधन आणि महिलांच्या शिक्षणाबद्दल बोलताना धर्मनिरपेक्षतेविषयी भाष्य केले. 
    •••• 1 डिसेंबर 1920 रोजी सरकारी आदेशानुसार मुहम्मद अँग्लो-ओरिएंटल कॉलेजचे रुपांतर अलिगड मुस्लिम विद्यापीठ झाले. पुढे 17 डिसेंबर 1902 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठ म्हणून त्याचे औपचारिक उदघाटन झाले.
    •••• 1964 साली एएमयूच्या कार्यक्रमास तत्कालीन पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर 56 वर्षांनी देशाच्या दुसर्‍या एका पंतप्रधानाने एएमयूच्या कार्यक्रमास हजेरी लावली हे या कार्यक्रमाचे विशेष. 
    •••• एएमयूमध्ये सध्या शिक्षण घेत असलेल्यांत 35 टक्के मुलींचा समावेश आहे. महिला ज्यावेळी शिक्षित होते, तेव्हा संपूर्ण पिढी शिक्षित होत असते. मोदी सरकारने तिहेरी तलाकवर बंदी घालून पीडीत महिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. युवा पिढीचे भविष्य लक्षात घेऊन नेशन फर्स्टची भावनेला चालना देणारे, नवे शिक्षण धोरण 2020 जाहीर झाले आहे.
    •••• देशात 2014 मध्ये 16 आयआयटी होते, 2020 मध्ये त्याची संख्या 23 झाली. तसेच सध्या देशात 20 आयआयएम आहेत.
     
    प्रश्नमंजुषा (69)
    1) जामसर संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) हे शहर पालघर जिल्ह्यात आहे.
    ब) जामसर तलाव परिसर पाणथळ जागा म्हणून घोषित 
    क) नाशिक ते नालासोपारा मागार्र्वरचे हे म्हत्वाचे शहर आहे.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    2) 2020 साली कोणत्या विद्यापीठाचा शताब्दी समारंभ साजरा झाला ?
    1) बनारस हिंदू विद्यापीठ
    2) जामिया मिलिया विद्यापीठ
    3) अलिगड मुस्लिम विद्यापीठ
    4) वरील सर्व
     
    3) डिसेंबर 2020 मध्ये किलुआ ज्वालामुखीचा उद्रेक झाला, हा ज्वालामुखी कोठे आहे ?
    1) युरोपातील इटली
    2) इंडोनेशियातील जेंटिंग बेटे
    3) अमेरिकेत हवाई 
    4) जपानमधील फुकुशिमा
     
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (69)
    1-4
     
    2-3
     
    3-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 170