प्रकाशझोतातील स्थळे / (60)
- 16 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 221 Views
- 0 Shares
युनेस्कोचा वारसा दर्जा
8 डिसेंबर 2020 - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाला वारसा यादीत समावेश झाल्यानंतर मानसिंग प्रासाद, गुजरी महाल व सहस्र बाहू मंदिर यावर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे.
► ग्वाल्हेर - ग्वाल्हेरची स्थापना नवव्या शतकात झाली. तेथे गुर्जर प्रतिहार राजवंश, तोमर, बाघेल, कछवाहो, शिंदे घराण्यांचे राज्य होते. त्यांनी ठेवलेल्या स्मृतिखुणा आजही तेथील स्मारके, किल्ले व राजवाडे यात बघायला मिळतात.
► ओरछा - हे शहर मंदिरे व राजप्रासादांसाठी प्रसिद्ध आहे. 16 व्या शतकात बुंदेला राजांची ती राजधानी होती. तेथे राजमहाल, जहांगीर महाल, रामराजा महाल, राय प्रवीण महाल व लक्ष्मीनारायण मंदिर आहे.
करोनारहित लक्षद्वीप
9 डिसेंबर 2020 - केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप येथे 8 डिसेंबर 2020 पर्यंत एकही करोना केस आलेली नाही. मास्क, सॅनीटायझर, आणि सोशल डीस्टन्सिंग असे कोणतेही प्रतिबंध येथे नाहीत. या बेटांवर शाळा, ऑफिसेस सुरळीत सुरु आहेत.
► लक्षद्वीपचे खासदार पी पी मोहम्मद फेजल यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीपासून नियमांचे कडक पालन केल्याने ही बेटे करोना मुक्त राहिली आहेत.
► या बेटांवर पर्यटक मोठ्या संखेने येतात, पण जानेवारी 2020 पासून येथे सहज प्रवेश दिला गेलेला नाही.
► या बेटावर येऊ इच्छिणार्या सर्वाना कोच्ची येथे 7 दिवस विलगीकरणात राहिल्यानंतरच बेटावर प्रवेश दिला जातो. कोच्ची येथून जलमार्गे, विमानाने या बेटांवर जाता येते आणि येथे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे.
► अरबी समुद्रात 32 किमीच्या परिसरात ही सुंदर 36 बेटे आहेत.
► 2011 च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 64 हजार आहे.
उत्ट्वीआगविग शहर
17 नोव्हेंबर 2020 रोजी पृथ्वीच्या द. ध्रुवावरील अलास्का मधल्या उत्ट्वीआगविग शहराने 2020 वर्षातील शेवटचा सूर्यास्त अनुभवला, हा सोहळा पोलर नाईट नावाने ओळखला जातो.
► 66 दिवसांनी त्यांना नवी पहाट आणि नवा सूर्य उगविताना पाहता येणार. या काळात दिवसातील काही तास येथे उजेड असतो पण सूर्य दिसत नाही.
► 23 जानेवारी 2021 ला येथील नागरिक पुन्हा चमकत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकतील.
► पृथ्वीवरील उत्तर आणि दक्षिण धृवावर सूर्यप्रकाश एकाच वेळी पडू शकत नाही. उत्तर धृवावर सहा महिने दिवस असतो तेव्हा द. धृवावर काळोख असतो. उत्तर ध्रुवाला आर्क्टिक सर्कल म्हटले जाते तर द.ध्रुवाला अन्टार्कटीक सर्कल म्हटले जाते.
► अलास्का आर्क्टिक सर्कलचा भाग आहे. उत्ट्वीआगविग हे शहर अन्य भागाच्या तुलनेत अधिक उंचीवर आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबर पासून या शहरात सूर्यदर्शन होणार नाही. या काळात येथे कडाक्याची थंडी असते आणि तापमान उणे 23 डिग्री पर्यंत घसरते
कर्तारपूर कॉरिडॅार
भारत-पाक सीमेवर डेरा नानक बाबा, हा जगातील पहिला गुरुद्वारा आहे. पवित्र तीर्थस्थळ अमृतसरपासून 4.7 किमी अंतरावर आहे. पाकिस्तान सरकारने 1,700 कोटी रुपये खर्च करून या गुरुद्वाराचा जीर्णोद्धार केला. ही योजना तीन टप्प्यांत होणार असून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दोन टप्पे बाकी आहेत. गुरुद्वाराच्या आतल्या मोठ्या अंगणात तीन संगमरवरी इमारती आहेत. यापैकी एका इमारतीत बाबा गुरुनानक यांचे समाधिस्थळ आहे. उर्वरित दोन इमारतींत गुरुद्वारा आणि लंगरस्थळ आहे.
► भारताला जोडण्यासाठी 1 किमी लांबीचा कॉरिडॉर बनवण्यात आला.
► या गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना 5 चेक पॉइंट्स ओलांडावे लागतात. अधिकारी सर्व यात्रेकरूंच्या कागदपत्रांची कडक तपासणी केली जाते. प्रत्येक भाविकाला गुरुद्वारामध्ये जाण्यासाठी इलेक्ट्रॉनिक परवानगी कार्ड दिले जाते.
► गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी - सरदार गोविंदसिंह.
► न्यूयॉर्क येथील भारताच्या यूएन स्थायी मिशनचे सचिव आशिष शर्मा यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या 75 व्या सत्रात पाकिस्तानने 2019 मध्ये झालेल्या शांतता संस्कृतीच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचे म्हटले. कारण कर्तारपूर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन प्रशासकीय नियंंत्रण पाकिस्तानने शीख समुदायाच्या संस्थेकडून बिगर शीख संस्थेकडे दिले. तिला आयएसआयचा पूर्ण पाठिंबा आहे. या संस्थेत एकही शीख व्यक्ती नाही.
आयएनएस विराटवर संग्रहालय
डिसेंबरमध्ये गुजरातच्या अलंग येथे ऐतिहासिक आयएनएस विराटच्या तोडकामाला सुरुवात झाल्याने आयएनएस विराटचे म्युझियममध्ये रुपांतर करण्यात यावे, यासाठी संरक्षण मंत्रालयाने तात्काळ हस्तक्षेप करण्यात यावा अशी मागणी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. भारतीय नौसेनेची ऐतिहासिक युद्धनौका आयएनएस विराटचा ताबा असलेल्या कंपनीने घातलेल्या कठीण अटींमुळे विराटवर संग्रहालय उभारण्यात अडथळे निर्माण झाले होते.
► ब्रिटिश बनावटीच्या आयएनएस विराट या विमानवाहू युद्धनौकेने प्रथम ब्रिटिश रॉयल नेव्ही आणि नंतर भारतीय नौदलात सेवा बजावली.
► 2013 पर्यंत 30 वर्षे देशासाठी सेवा देणार्या या ऐतिहासिक युद्धनौकेने दुसर्या महायुद्धातही महत्वाची भूमिका बजावली होती. ऑपरेशन ज्युपिटर आणि ऑपरेशन परक्रमामध्येही ही युद्धनौका तैनात होती.
► जलमेव यश्य, बलमेव तस्य हे आयएनएस विराटचं ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ जो समुद्रावर नियंत्रण ठेवतो, तो सामर्थ्यवान आहे असा होतो.
► सेवानिवृत्तीनंतर संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी या युद्धनौकेचा ताबा आंध्रप्रदेश राज्य सरकारकडे देण्यात येणार होता. मात्र तो प्रस्ताव प्रत्यक्षात आला नाही. त्यानंतर एका ब्रिटीश व्यावसायिकाने क्लाऊड फंडींगच्या माध्यमातून संग्रहालय उभारणीचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.
► गुजरात येथील एक कंपनी एन्व्हिटेक मरीन कन्सल्टंट्स आणि गुजरात सरकार यांनी संयुक्तपणे या संग्रहालय उभारणीचा प्रस्ताव दिला होता.
► आयएनएस विराट ही युद्धनौका सरकारच्या मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशनकडून श्रीराम शिप ब्रेकर या कंपनीने 38 कोटी रुपयांना खरेदी केली होती. मात्र, या कंपनीने एन्व्हीटेककडे 110 कोटी रुपयांची मागणी केली. त्याचप्रमाणे शासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची अट घातली आहे. युद्धनौकेच्या खरेदीसाठी ही किंमत एकरकमी देण्याची श्रीराम शिप ब्रेकरची मागणी आहे. इन्व्हिटेकने काही हप्त्यांमध्ये रक्कम देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, श्रीराम शिप ब्रेकरने हा प्रस्ताव नाकारला.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन
► दरवर्षी 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवसपाळला जातो.
► भारतातील मानवाधिकार -
1) राजकीय आणि नागरी स्वातंत्र्य
2) समानतेचा अधिकार
3) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
4) शोषणाविरोधात आवाज उठविण्याचा अधिकार
5) धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार
6) जीवन जगण्याचा अधिकार
7) सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार
30 प्रकारचे मानवाधिकार -
► डिसेंबर 1948 रोजीच्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार घोषणापत्रानुसार
► ऑक्टोबर 1993 रोजी भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना
मानवाधिकारांचे काटेकोर पालन करणारे देश -
► नेदरलँड्स, नॉर्वे, कॅनडा, स्वीडन, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, फिनलँड, ऑस्ट्रेलिया
मानवाधिकाराचे सर्वात अधिक उल्लंघन होणारे देश -
► उत्तर कोरिया, लिबिया, सुदान, ब्रह्मदेश, एरिट्रिया, येमेन, सीरिया, रशिया, चीन, तुर्कस्तान
प्रश्नमंजुषा (60)
1) जलमेव यश्य, बलमेव तस्य हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे ?
1) भारतीय नौदल
2) आयएनएस विक्रमादित्य
3) आयएनएस विक्रांत
4) आयएनएस विराट
2) विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटसंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) या युद्धनौकेने पहिल्या महायुद्धात महत्वाची भूमिका बजावली होती.
ब) निवृत्तीनंतर या युद्धनौकेचा ताबा सुरुवातीस आंध्रप्रदेश राज्य सरकारकडे होता.
क) ऑपरेशन ज्युपिटर आणि ऑपरेशन परक्रमामध्येही ही युद्धनौका तैनात होती.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त क
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
3) 2020 मध्ये कोणत्या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले ?
अ) चितोड
ब) ओरछा
क) भोपाळ
ड) ग्वाल्हेर
पर्यायी उत्तरे :
1) ब आणि क
2) अ, ब आणि ड
3) क आणि ड
4) यापैकी नाही
4) केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
1) हा 36 बेटांचा समूहा आहे
2) 2011 च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या 64 हजार आहे.
3) येथे डिसेंबर 2020 पर्यंत एकही करोना केस आढळलेली नाही.
4) ही बेटे अरबी समुद्रात कोच्ची पासून 32 किमीवर आहेत .
5) खालील विधाने विचारात घ्या :
अ) अलास्का हा आर्क्टिक सर्कलचा भाग आहे.
ब) उत्ट्वीआगविग हे शहर अलास्का मध्ये आहे.
क) नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान उत्ट्वीआगविगशहरात सूर्यदर्शन होतनाही.
ड) पृथ्वीवरील उत्तर आणि दक्षिण धृवावर सूर्यप्रकाश एकाच वेळी पडू शकत नाही.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब, क आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
6) जगातील पहिला गुरुद्वारा कोठे आहे ?
1) अमृतसर
2) लाहोर
3) कर्तारपूर
4) भारत-पाक सीमेवर डेरा नानक बाबा
उत्तरे : प्रश्नमंजुषा (60)
1-4
2-1
3-4
4-4
5-3
6-4