नेमणुका / प्रश्नमंजुषा (57)

  • नेमणुका  / प्रश्नमंजुषा (57)

    नेमणुका / प्रश्नमंजुषा (57)

    • 16 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 162 Views
    • 0 Shares
    डॉ. अनिल सोनी 
     
            9 डिसेंबर 2020 - भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ अनिल सोनी यांची जागतिक आरोग्य  संघटना फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. अनिल सोनी 1 जानेवारी 2021 पासून आपली जबाबदारी सांभाळतील. मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संकटादरम्यान जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरुवात केली होती. 
    • जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख - डॉ. टेड्रोस घेब्रेयसस 
     
    • अनिल सोनी यांचे कार्य -
    1) एचआयव्हीच्या उपचारामध्ये महत्वाची भूमिका बजावली.
    2) 2005 ते 2010 दरम्यान क्लिटंन हेल्थ अ‍ॅक्सेसमध्ये कार्यरत
    3) बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम केले.
    4) ग्लोबल हेल्थकेअर कंपनी वियाट्रिसमध्ये ग्लोबल इंफेक्शन डिसीजचे प्रमुख 
     
    हिना नागराजन 
     
     
            11 डिसेंबर 2020 - हिना नागराजन यांची भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. 1 जुलै 2021 पासून हिना नागराजन या आनंद कृपालू यांची जागा घेणार आहेत. सध्या त्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड ची मूळ कंपनी डियाजिओमध्ये आफ्रिकन बाजार विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून  कार्यरत आहेत. 
    •• हिना नागराजन या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त होणार्‍या पहिल्या महिला आहेत.
    •• 2014 मध्ये या कंपनीत आनंद कृपालू हे रूजू झाले होते. युनाटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी ते 30 जून 2021 पर्यंत कायम राहणार आहेत. 
    •• त्यांनी डियाजिओमध्ये पद सांभाळण्यापूर्वी नेस्ले इंडिया, मॅरी के या कंपन्यांमध्येही व्यवस्थापकीय संचालक पदाची धुरा सांभाळली आहे. त्या 2018 मध्ये डियाजिओमध्ये रूजू झाल्या होत्या. 
     
    नामिबियाचा अडॉल्फ हिटलर
     
     
            5 डिसेंबर 2020 - नामिबियामधील ओम्पुजा विधानसभा निवडणुकीत 85 टक्के मते मिळवून अडॉल्फ हिटलर उनेना ही व्यक्ती कौन्सिलर म्हणून निवडून आली. ती व्यक्ती सत्ताधारी स्वापो पक्षाची सदस्य आहे.  नाझीवादाशी त्याचा काहीही संबंध नाही. 
    •• एकेकाळी नामिबिया जर्मनीचा एक भाग होता त्यामुळे नामिबियामध्ये हिटलर हे नाव सामान्य आहे. 
    •• 1884 ते 1915 दरम्यान, नामिबिया जर्मनीचा हिस्सा होते. तेव्हा या देशाला जर्मन दक्षिण पश्चिमी आफ्रीका म्हटले जात होते. 
     
    राजा जॉन चारी
     
     
           नासाच्या चांद्रमोहीमेसाठी निवड झालेले भारतीय वंशाचे राजा जॉन वुरपुतूर चारी यांचा जन्म, शिक्षण तसेच आयुष्य अमेरिकेतच गेले असले तरी त्यांचे वडील भारतीय होते. तेलंगणातील महबूबनगरचे रहिवासी असलेले श्रीनिवास चारी उच्च शिक्षणासाठी 1950 साली अमेरिकेत गेले आणि अमेरिकन मुलीशी विवाह करून तिथेच स्थायिक झाले. राजा चारी हे त्यांचे पुत्र. 
    •• अंतराळ, अंतराळ यान यांच्याशी संबंधित उच्च शिक्षण घेऊन ते अमेरिकन हवाई दलात दाखल झाले. लढाऊ विमानांचे अत्याधुनिकिकरण करण्याच्या हवाई दलाच्या मोहिमेसाठी त्यांनी काम केले असून 2 हजारांहून अधिक तासांच्या विमानोड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. 

     
    प्रश्नमंजुषा (57)
    1) युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त होणार्‍या पहिल्या महिला कोण? 
    1) किरण मजूमदार शॉ 
    2) रेणुका जगतीयानी 
    3) हिना नागराजन 
    4) नैना किडवाई
     
    2) नामिबिया संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 1884 ते 1915 दरम्यान, नामिबिया जर्मनीचा भाग होता.
    ब) नामिबियातील सत्ताधारी स्वापो पक्ष हा नाझीवादावर आधारित आहे.
    क) नामिबियाला पूर्वी जर्मन दक्षिण पश्चिमी आफ्रीका म्हटले जात होते. 
    ड) नामिबियामध्ये अनेक मुलांचे नाव अडॉल्फ हिटलर असे ठेवले जाते.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    3) भारतीय वंशाचे आरोग्य तज्ज्ञ अनिल सोनी यांच्याबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) त्यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम केले आहे.
    ब) 1 जानेवारी 2021 पासून  ते जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळतील.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    4) भारतातील सर्वात मोठी मद्यनिर्मिती कंपनी कोणती आहे ?
    1) सुला वाईन्स
    2) डहाणुकर कोपरगांव इंडस्ट्रीज
    3) युनायटेड  ब्रेव्हरीज लिमिटेड 
    4) युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड 
     
    5) खालील जोड्या अचूक जुळवा :
     स्तंभ अ (व्यक्ती)              स्तंभ ब ( नेमणूक)
    अ. एडवर्ड फेल्सेंथल     I.      अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष 
    ब. एरिक युआन             II.     नामिबियातील कौन्सिलर
    क. कमला हॅरिस             III.    झूमचे सीईओ 
    ड. अडॉल्फ हिटलर उनेना     IV.   टाइमचे मुख्य संपादक 
    पर्यायी उत्तरे :
     ब  क  ड
    1) II  III  I  IV
    2) IV  III  I  II
    3) IV  III  II  I
    4) II  III  IV  I
     
    6) सध्या जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख कोण आहेत ?
    1) डॉ. सौम्या स्वामिनाथन
    2) डॉ. टेड्रोस घेब्रेयसस 
    3) डॉ. हर्षवर्धन
    4) डॉ. अनिल सोनी
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (57)
    1-3
     
    2-4
     
    3-3
     
    4-4
     
    5-2
     
    6-2

Share this story

Total Shares : 0 Total Views : 162