संदीप कटारिया / प्रश्नमंजुषा (43)
- 08 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 125 Views
- 0 Shares
संदीप कटारिया
बाटाच्या ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह (आंतरराष्ट्रीय सीईओ) पदी 49 वर्षीय संदीप कटारिया यांची, आधीचे सीईओ अॅलेक्सिस नसार्ड यांच्या जागी निवड झाली. नसार्ड हे पाच वर्षे बाटाचे आंतरराष्ट्रीय सीईओ होते.
• संदीप कटारिया यांनी आयआयटी दिल्लीतून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर कटारिया यांनी जमशेदपूर येथील ‘झेवियर लेबर रिसर्च इन्स्टिट़यूट’मधून व्यवस्थापनशास्त्रात पदव्युत्तर (1993 चे गोल्ड मेडलिस्ट) प्रशिक्षण घेतले.
• ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात त्यांनी प्रामुख्याने काम केलेले दिसून येते. त्यांच्याकडे युनिलिव्हर, यम ब्रॅण्डस आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांमध्ये 24 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे.
• 2017 मध्ये संदीप कटारिया बाटा इंडियाचे सीईओ म्हणून रुजू झाले होते. कटारिया यांच्या नेतृत्वाखाली बाटा इंडियाने दुप्पट नफा कमावला. 2019-20 मध्ये बाटा इंडियाचा महसूल 3,053 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट 327 कोटी रुपये होते.
• बाटा कंपनी -
1) स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बाटासाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. भारतात दरवर्षी साधारण 5 कोटी चपला-जोड़यांची विक्री होते.
2) 126 वर्षांच्या इतिहासात, चप्पल आणि बुटांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘बाटा’ कंपनीच्या बाटाच्या नेतृत्व प्रथमच एका भारतीय व्यक्तीच्या हाती आले.
3) बाटा कंपनीचे मूळ स्वित्झर्लंडमधले आणि संस्थापक पूर्वाश्रमीच्या चेकोस्लोव्हाकियातील, पण ती भारतीय नाममुद्रा वाटते. किफायती आणि परवडण्याजोगी उत्पादने हे बाटाचे वैशिष्ट़य.
4) बाटा कंपनीचा जागतिक पसारा खूप मोठा आहे. जगात सर्वाधिक जोडे ही कंपनी बनवते. 70 देशांमध्ये 5,300 दुकाने आणि 18 देशांमध्ये या कंपनीचे उत्पादक कारखाने आहेत.
• जगातील अनेक प्रमुख कंपन्यांची धुरा भारतीय वशांच्या व्यक्तीच्या हाती आहे-
1) सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ
2) सुंदर पिचाई अल्फाबेटचे सीईओ
3) अजय बंगा मास्टरकार्डचे सीईओ
4) अरविंद कृष्णा आयबीएमचे सीईओ
5) लक्ष्मण नरसिंहन रेकिट बेन्किसरचे सीईओ
प्रश्नमंजुषा (43)
1) बाटा कंपनी संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
अ) मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये
ब) संस्थापक चेकोस्लोव्हाकियाचे
क) ग्लोबल चीफ एक्झिक्युटिव्ह (आंतरराष्ट्रीय सीईओ) भारताचे
ड) उत्पादनांचा सर्वात जास्त खप अमेरिकेमध्ये
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) अ आणि ब
3) क आणि ड
4) फक्त अ, ब आणि क
2) खालील जोड्या जुळवा :
स्तंभ अ (सीईओ ) स्तंभ ब (कंपनी)
अ. सुंदर पिचाई I. रेकिट बेन्किसर
ब. अजय बंगा II. आयबीएम
क. अरविंद कृष्णा III. मास्टरकार्ड
ड. लक्ष्मण नरसिंहन IV. अल्फाबेट
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
(1) II III I IV
(2) IV III II I
(3) III II IV I
(4) IV III I II
3) बाटा कंपनीची स्थापन कोणत्या वर्षी झाली?
1) 1884
2) 1894
3) 1914
4) 1920
उत्तरे : प्रश्नमंजुषा (43)
1-4
2-2
3-2