आत्मनिर्भर भारत- 3.0

  • आत्मनिर्भर भारत- 3.0

    आत्मनिर्भर भारत- 3.0

    • 13 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 243 Views
    • 0 Shares

    आत्मनिर्भर भारत- 3.0

    12 नोव्हेंबर 2020 - रोजगारवृद्धीला चालना देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील खर्च वाढवणे व उद्योग क्षेत्रांना सवलतींसह मदत करणारे ‘ आत्मनिर्भर भारत- 3.0’ हे आर्थिक पॅकेज केंद्र सरकारने जाहीर केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेले आत्मनिर्भर भारत-3.0 प्रोत्साहन पॅकेज 2.65 लाख कोटी रु. चे असून तिसर्या तिमाहीत अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. सदर पॅकेज जीडीपीच्या 15% आहे.

    •  आत्मनिर्भर भारत अभियान 3.0  ची वैशिष्ट्ये -

    1) 30 जून 2021 पर्यंत अग्रीमेंट व्हॅल्यू व सर्कल रेटमधील फरक 10 टक्क्यावरून 20 टक्के वाढवला असून त्याचा प्राप्तीकरातला फायदा 2 कोटी रु. पर्यंत गृहखरेदी करणार्या ग्राहकास मिळेल.

    2) ‘प्रधानमंत्री शहरी आवास योजने’साठी अतिरिक्त 18 हजार कोटी रु.ची तरतूद केल्याने त्याचा फायदा 12 लाख नव्या पण अपूर्ण घरांना तर 18 लाख पूर्ण बांधून झालेल्या घरांना मिळणार.

    3) पीएम गरीब कल्याण योजना, मनरेगा व ग्राम सडक योजना या योजनांवर 10 हजार कोटी रु. खर्चाची तरतूद.

    4) बांधकाम व पायाभूत क्षेत्रातील कंपन्यांना भांडवल आणि बँक गॅरंटीत दिलासा. या क्षेत्रातील कंपन्यांचे परफॉर्मन्स सिक्युरीटीत कपात करून ते 3 टक्क्यांवर. याचा थेट फायदा कंत्राटदारांना मिळू शकणार.

    5) शेतकर्यांना खत सवलतीसाठी 65 हजार कोटी रु.ची तरतूद. याचा फायदा 1.40 कोटी शेतकर्यांना मिळणार.

    6) उद्योग व नवे उद्योगजगत निर्माण करण्यासाठी 10,200 कोटी रु.ची तरतूद.

    7) संघटित क्षेत्रात 15 हजारांपेक्षा कमी मासिक पगाराच्या नव्या कर्मचार्यांच्या पीएफचे अंशदान केंद्र सरकार भरणार.

    8) निर्यातदारांना चालना देण्यासाठी 3 हजार कोटी.

    •   आत्मनिर्भर भारत रोजगार योजना -

    1) उद्देश : नव्या भरतीसाठी कंपन्यांना प्रोत्साहन.

    2) परिणाम : 1 हजार कर्मचारी असल्यास नव्या कर्मचार्यांच्या पीएफच्या 24% वर सबसिडी. जास्त असल्यास नव्यांच्या 12% योगदानावर 2 वर्षे सबसिडी.

    3) जे नवे कर्मचारी आहेत किंवा 1 मार्च-30 सप्टेंबरदरम्यान नोकरी गेली, त्यांना फायदा.

    •    12 लाख नवी घरे बनवणार, 18 लाख अपूर्ण घरे पूर्ण  -

    1) उद्देश : रोजगाराची समस्या दूर करणे आणि शहरातील गरिबांसाठी पक्क्या घरांची उपलब्धता.

    2) परिणाम : त्यातून सुमारे 78 लाखांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळण्याची सरकारला अपेक्षा.

    •    बिल्डर आणि लोकांना रजिस्ट्रीत सवलत -

    1) घर/फ्लॅटच्या खरेदीवर प्राप्तिकरात सवलतीची योजना 30 जून 2021 पर्यंत लागू. त्याअंतर्गत सर्कल रेट आणि अॅग्रीमेंट व्हॅल्यूत फरक 10% वरून वाढवून 20% करण्यात आला.

    2) उद्देश : रिअल इस्टेट आणि घर खरेदीदारांना दिलासा.

    आत्मनिर्भर भारत योजना (3) अंतर्गत अतिरिक्त मदत (कोटी) - 2 लाख 65 हजार 80 कोटी

    1)   गृहनिर्माण- 18 हजार  कोटी

    2)   ग्रामीण रोजगार प्रोत्साहन-10 हजार  कोटी

    3)   करोना लस संशोधन-900 कोटी

    4)   औद्योगिक विकास-10,200 कोटी

    5)   निर्यातवाढ- 3 हजार कोटी

    6)   उत्पादन प्रोत्साहन-1.46 लाख कोटी

    7)   खत अनुदान-65 हजार कोटी

    8)   पायाभूत सुविधा-6 हजार कोटी

    9)   रोजगार योजना-6 हजार कोटी

    आठ महिन्यांच्या करोनाकाळात केंद्राने दिलेली एकूण मदत - 29 लाख 87 हजार 641 कोटी.

    1)   गरीब कल्याण योजना-1.93 लाख कोटी

    2)   आत्मनिर्भर भारत योजना (1)- 11.03 लाख कोटी

    3)   पीएम गरीब कल्याण अन्न योजना (5 महिन्यांची मुदतवाढ जुलै-नोव्हेंबर)- 83 हजार कोटी

    4)   आत्मनिर्भर भारत योजना (2)- 73 हजार कोटी

    5)   आत्मनिर्भर भारत योजना (3)- 2.67 लाख कोटी

    6)   रिझर्व्ह बँकेचे साह्य (31 ऑक्टोबर 2020 पर्यंत) - 17.71 लाख कोटी


    प्रश्नमंजुषा (14)

    1)   आत्मनिर्भर भारत अभियान 3.0 पॅकेज कोणी जाहीर केले ?

         1)   रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशीकांत दास

         2)   केंद्रीय अर्थसचिव अजयभूषन पांडे

         3)   पंतप्रधान नरेंद्र मोदी

         4)   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

    2)   मार्च ते नोव्हेंबर 2020 दरम्यानच्या करोना पँडेमिक काळात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुमारे 30 लाख कोटी आर्थिक पॅकेजमधील विविध तरतुदींचा योग्य चढता क्रम लावा -

         a)   आत्मभारत- 1.0

         b)   आत्मभारत- 2.0

         c)   आत्मभारत- 3.0

         d)   पीएम गरीब कल्याण अन्न योजना

         पर्यायी उत्तरे :

         1)   (d), (b), (c), (a)  

         2)   (a), (d), (c), (b)

         3)   (a), (d), (b), (c)

         4)   (c), (a), (b), (d)  

    3)   आत्मनिर्भर भारत अभियान 3.0 मध्ये खालीलपैकी कोणत्या योजनेसाठी तरतूद नाही?

         1)   पीएम गरीब कल्याण योजना

         2)   मनरेगा व ग्राम सडक योजना

         3)   पंतप्रधान कृषी सिंचन योजना

         4)   प्रधानमंत्री शहरी आवास योजना

    4)   आत्मनिर्भर भारत अभियान 3.0 मध्ये खालीलपैकी कोणत्या योजनेसाठी सर्वात जास्त तरतूद करण्यात आली ?

         1)   औद्योगिक विकास

         2)   उत्पादन प्रोत्साहन (निर्मिती क्षेत्र)

         3)   खत अनुदान

         4)   ग्रामीण रोजगार प्रोत्साहन

    5)   खालील जोड्या योग्यप्रकारे लावा -

              स्तंभ अ (पॅकेज)                स्तंभ ब (रक्कम रुपये)

         a)   आत्मनिर्भर भारत योजना (3)      i)   17.71 लाख कोटी

         b)   आत्मनिर्भर भारत योजना (2)      ii)  11.03 लाख कोटी

         c)   आत्मनिर्भर भारत योजना (1)      iii)  2.67 लाख कोटी

         d)   रिझर्व्ह बँकेचे अर्थसाह्य           iv)    73 हजार कोटी

         पर्यायी उत्तरे :

              (a)  (b)  (c)  (d)

         1)   (iii)       (ii)        (iv)       (i)

         2)   (i)         (iv)       (ii)        (iii)

         3)   (iii)       (iv)       (ii)        (i)

         4)   (i)         (iv)       (iii)       (ii)

    उत्तरे : प्रश्नमंजुषा (14)

    1-4

    2-3

    3-3

    4-2

    5-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 243