अजरबैजान / प्रश्‍नमंजुषा (25)

  •  अजरबैजान / प्रश्‍नमंजुषा (25)

    अजरबैजान / प्रश्‍नमंजुषा (25)

    • 24 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 110 Views
    • 0 Shares

     अजरबैजान 

    अजरबैजान आणि आर्मेनिया यांच्यात सुमारे 30 वर्षांपासून चालत आलेले युद्ध अजरबैजानने जिंकले. नोव्हेंबर महिन्यात अजरबैजानने आर्मेनियाई सेनेचा पराभव करुन वादग्रस्त प्रांत नागर्नो-कराबाखवर ताबा मिळवला.

    अजरबैजानच्या विजयाचे कारण -
    अजरबैजानने 3टी अर्थात टेक्नोलॉजी, टॅक्टिक्स आणि तुर्कीच्या बळावर युद्धात विजय मिळवला. अजरबैजानने तुर्कीच्या बॅराक्तर टीबी-2 आणि इस्त्रायलच्या कामिकेज ड्रोनचा वापर केला. तर आर्मेनिया टँक, आर्टिलरी, रडार आणि एअर डिफेन्स सिस्टमवर अवलंबून होते.

    आर्मेनियाचे युद्धात जास्त नुकसान -
    अजरबैजानने आर्मेनियाची टँक, आर्टिलरी, रूसनिर्मित एस-300 मिसाइल डिफेन्स सिस्टिम नेस्तनाबूत केली. या युद्धात जास्त नुकसान आर्मेनियाचे झाले. त्यांचे 185 टँक, 44 इन्फेंट्री फाइटिंग व्हेईकल्स, 147 टो आर्टिलरी गन, 19 सेल्फ-प्रोपेल्ड आर्टिलरी, 72 मल्टीबॅरल रॉकेट लॉन्चर्स व 12 रडार नष्ट झाले.

    ड्रोनचा निर्णायक वापर-
    आर्मेनियाचे पंतप्रधान पाशिन्यान यांच्या मते, अझरबैजानच्या भेदक ड्रोन मार्‍याला त्यांच्याकडे प्रत्युत्तर नव्हते. ड्रोन तापमान, इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या माध्यमातून भेदक मार्‍याचे लक्ष केंद्रीत करतो. बॅराक्तर आणि अंका-एस ड्रोन 4 मिसाइल, 15-55 किलोचे बॉम्ब घेऊन जाऊ शकतात. लेझर गाइडेड मिसाइल मारा करू शकते. सीरियात तुर्की ने रशियाची एस-300, एस-400 मिसाइल डिफेन्स सिस्टिम बेचिराख केली होती.

    अजरबैजानची  प्रभावशाली रणनीती-
    अजरबैजानने 1940 मध्ये निर्मित सिंगल प्रोपेलर इंजिन असलेल्या विमानाचे रुपांतर ड्रोन मध्ये केले. त्याच्या आक्रमणास प्रतिसाद म्हणून आर्मेनियाने मिसाइल डिफेंस यंत्रणा कार्यरत केली. त्यामुळे आर्मेनियाचा डिफेन्स उघडा पडला.

    प्रश्‍नमंजुषा (25)
    1) अजरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील युद्धाबाबत चुकीचे विधान शोधा.
    1) अजरबैजानने आर्मेनियाई सेनेचा पराभव केला.
    2) आर्मेनियास रशियाने मदत केली.
    3) हे युद्ध सुमारे 30 वर्षांपासून चालू होते.
    4) आर्मेनियाने वादग्रस्त प्रांत नागर्नो-कराबाखवर ताबा मिळवला.
     
    2) तुर्कीने रशियाची एस-300 आणि एस-400 मिसाइल डिफेन्स सिस्टिम कोणत्या देशात बेचिराख केली होती?
    अ) अजरबैजान
    ब) इराण
    क) आर्मेनिया
    ड) सिरिया
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) अ आणि ब
    3) क आणि ड
    4) फक्त ड
     
    3) अजरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील युद्ध अजरबैजानने जिंकले. त्यास कारणीभूत घटक ओळखा.
    अ) टेक्नोलॉजी
    ब) टर्की
    क) टँक्स
    ड) टॅक्टिक्स 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ, ब आणि क
    2) फक्त ब आणि ड
    3) अ आणि ड
    4) यापैकी कोणतेही नाही
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (25)
    1-4
     
    2-4
     
    3-4

Share this story

Total Shares : 0 Total Views : 110