वैश्विक लिंगभेद अहवाल 2021 / प्रश्नमंजुषा (118)
- 04 Apr 2021
- Posted By : study circle
- 185 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (118)
1) कोणत्या सालापासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून दरवर्षी ”जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक ” प्रसिद्ध केला जातो ?
1) 2011
2) 2001
3) 1996
4) 2006
2) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ”2021 च्या वैश्रि्वक लिंगभेद अहवाला” बाबत खालील विधाने विचारात घ्या:
अ) 2021-22 सालातील भारताचे ’जेंडर बजेट’ यंदा 26 टक्क्यांनी कमी झाले आहे.
ब) भाारतात महिलांचे नोकरी-व्यवसायांतील श्रममूल्य भारतात पुरुषांच्या 20 टक्केही नाही.
क) भारतातील महिलांचे श्रमातील स्थान 24.8 टक्क्यावरून घसरून 22.3 टक्के झाले आहे.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
3) वैश्विक लिंगभेद अहवाल 2021 नुसार देशाच्या क्रमांकाबाबत चुकीची जोडी ओळखा.
1) बांगला देश - 65 व्या क्रमाकांवर
2) नेपाळ - 111 व्या क्रमाकांवर
3) श्रीलंका - 116 व्या क्रमाकांवर
4) भूतान - 130 व्या क्रमाकांवर
4) खालील विधानांचा विचार करा :
a) प्राचीन किंवा वैदिक काळात भारतीय समाजातील महिलांचे स्थान नक्कीच प्रायोरिटीचे होते.
b) त्यावेळी सभा आणि समितीसारख्या सामाजिक संस्थांमध्ये महिलांचे समान प्रतिनिधित्व होते.
पर्यायी उत्तरे :
1) विधान (a) सत्य आहे आणि (b) विधानाची कारणमिमांसा आहे.
2) (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.
3) (a) विधान सत्य आहे परंतु (b) चूक आहे.
4) (a) आणि (b) एकमेकांशी संबंधित नाहीत.
5) वैश्विक लिंगभेद अहवाल 2021 नुसार जगातील प्रगत देशांचा योग्य उतरता क्रम ओळखा -
1) लिथुआनिया, आयर्लंड, स्वित्झर्लंड, नामिबिया, रवांडा
2) आइसलँड, फिनलँड, आयर्लंड, स्वित्झर्लंड, लिथुआनिया,
3) आइसलँड, न्यूझीलंड, स्वीडन, फिनलँड, नॉर्वे,
4) आइसलँड, फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, स्वीडन
6) खालीलपैकी कोणती विधान/विधाने ”जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक 2021” बद्दल सत्य आहे/आहेत?
a) या अहवालानुसार द. आशियात बांगला देशची कामगिरी सर्वोत्तम झाले आहे.
b) बांगला देशातील पुरुष व महिलांमधील अंतर 63 टक्क्याने कमी झाले, तर भारतात हे प्रमाण 73 टक्क्याने कमी झालेले दिसून आलेले आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (b) फक्त
3) (a) आणि (b) दोन्ही
4) वरीलपैकी कोणतेही नाही
7) ”ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स ” हा स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेची परीक्षा करणारा अहवाल दरवर्षी कोणामार्फत प्रकाशित केला जाअतो ?
1) जागतिक बँक
2) आंतराष्ट्रीय मुद्रा निधी
3) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
4) युनेस्को
8) ’वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ द्वारे स्त्री-पुरुष समानतेच्या या मुद्द्यांचा वापर करून वैश्विक लिंगभेद अहवाल प्रकाशित करण्यात येतो.
a) महिलांचे शिक्षण व शिक्षणाची उपलब्धता
b) महिलांची राजकीय ताकद
c) महिलांना उपलब्ध समान संधी
d) महिलांच्या आरोग्याचे संरक्षण
e) महिलांचा आर्थिक क्षेत्रातील सहभाग
f) महिलांचा राजकीय क्षेत्रातील सहभाग
पर्यायी उत्तरे :
1) (a), (c) आणि (e) फक्त
2) (b), (c), (d) आणि (e) फक्त
3) (a), (b), (c) आणि (d) फक्त
4) वरील सर्व
9) जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक 2021 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
1) आइसलँड पहिल्या क्रमांकावर सलग 12 व्यांदा आला आहे.
2) लैंगिक समानतेबाबत अफगाणिस्तान सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.
3) या अहवालानुसार स्त्री-पुरुष समानतेत भारताच्या मागे केवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहेत.
4) त्यात 153 देशांचे परीक्षण करण्यात आले.
10) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : भारताच्या एकूण जीडीपीमध्ये महिलांच्या नुसत्या घरातील कामाचा वाटा 4 टक्क्यांहूनही अधिक आहे.
कारण (र) : भारतातील महिलांचे कुटुंबकष्ट भारतात मोजले जात नसल्याने तत्सम कष्टांना ’अॅबस्ट्रॅक्ट लेबर’ अशी संज्ञा आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
11) वैश्विक लिंगभेद अहवाल 2021 नुसार खराब कामगिरी करणार्या शेवटच्या देशांचा योग्य क्रम ओळखा -
1) अफगाणिस्तान, येमेन, पाकिस्तान, सीरिया, काँगो
2) इराण, माली, चाड, सौदी अरेबिया, काँगो
3) येमेन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सीरिया, काँगो
4) अफगाणिस्तान, सीरिया, काँगो, येमेन, पाकिस्तान
12) पुढील विधनांचा विचार करा :
a) 1975 मध्ये आईसलँड देशातील 90 टक्के गृहिणींनी अचानक संप पुकारला होता.
b) आईसलँड स्त्री-पुरुष समानतेत गेली 12 वर्षे पहिल्या क्रमांकावर आहे.
पर्यायी उत्तरे :
1) दोन्ही विधाने चूक आहेत.
2) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमिमांसा आहे.
3) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमिमांसा नाही.
4) (a) बरोबर परंतु (b) चूक आहे.
13) जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक 2021 अहवालामध्ये भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
1) भारतातील वरिष्ठ व व्यवस्थापन पदावरील महिलांचे स्थान घसरत चालले असून या पदांवर केवळ 14.6 टक्के महिला आहेत.
2) भारतातील 34.2 टक्के महिला अशिक्षित असून अशिक्षित पुरुषांची टक्केवारी 17.6 टक्के इतकी आहे.
3) भारतात पुरुषांच्या तुलनेत केवळ 30 टक्के महिला कमवतात.
4) भारतातील महिलांचे श्रमातील स्थान 24.8 टक्क्यावरून घसरून 22.3 टक्के झाले आहे
14) खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा.
a) आईसलँडची लोकसंख्या 6 लाखांच्या आसपास आहे.
b) 1975 पासून महिलांच्या ’मोजल्या न जाणार्या अपार कामाचे’ मोजमापकरनारा आईसलँद हा पहिला देश आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b) बरोबर
2) (a) बरोबर (b) चूक
3) (a) चूक (b) बरोबर
4) (a) आणि (b) चूक
15) ” जागतिक लिंगभाव असमानता निर्देशांक ” या संकल्पनेबाबत खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) त्याअंतर्गत विविध देशांना 0 ते 1 दरम्यान गुण देण्यात येतात.
ब) 0 गुणांचा अर्थ संपूर्ण समानता तर 1 गुणाचा अर्थ संपूर्ण असमानता असा होतो.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
16) खालील कथने लक्षात घ्या :
a) वैश्विक लिंगभेद अहवाल 2020 नुसार भारताचे जागतिक स्थान 112 वे होते.
b) वैश्विक लिंगभेद अहवाल 2018 नुसार भारताचे जागतिक स्थान 108 वे होते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने अयोग्य आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) आणि (b) दोन्ही
4) (a) आणि (b) दोन्ही नाही
17) वैश्विक लिंगभेद अहवाल 2021 नुसारची पुढील विधाने विचारात घ्या :
a) दक्षिण आशियात सर्वात खराब कामगिरी करणार्या शेवटच्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश झाला.
b) स्त्री-पुरुष समानतेत भारताच्या मागे केवळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a) बरोबर आहे.
2) फक्त (b) बरोबर आहे.
3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
4) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
18) 21 व्या शतकातील महिला सबलीकरणाचे उपक्रम राबविताना भारत सरकारने कोणत्या जागतिक मार्गदर्शकांचा आधार घेतलेला आहे ?
a) नैरोबी भविष्य निर्धारण रणनीती (1985)
b) तिसर्या पिढीचा मानवी हक्क जाहीरनामा (1966)
c) मेक्सिकन कृती योजना (1975)
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
1) फक्त (a)
2) (a) आणि (b)
3) (a) आणि (c)
4) फक्त (c)
19) ”स्त्री व पुरुष यासाठी नीति-अनितीची वेगळी फूटपट्टी नसावी, योनि शुचितेचा बोजा स्त्रियांनी झिडकारून द्यावा. सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेमुळे महिलांना विकासासाठी कमी संधी मिळतात, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व पूर्णपणे विकसित झालेले नाही.”भारतीय स्त्रियांच्या बाबतीत हे विचार कोणाचे आहेत ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) महात्मा गांधी
3) मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे
4) डॉ. राममनोहर लोहिया
20) खालीलपैकी कोणत्या स्त्रियांनी वेदांच्या निर्मितीस हातभार लावला होता ?
a) गार्गी
b) लोपामुद्रा
c) अपाला
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) (a) आणि (c)
3) (b) आणि (c)
4) वरील तीनही विधाने बरोबर आहेत.
उत्तरे : प्रश्नमंजुषा (118)
1-4
2-4
3-4
4-1
5-4
6-1
7-3
8-4
9-4
10-2
11-1
12-2
13-3
14-3
15-1
16-3
17-3
18-3
19-4
20-3