मानव विकास अहवाल 2020 / प्रश्नमंजुषा (62)
- 20 Dec 2020
- Posted By : Study Circle
- 26067 Views
- 33 Shares
मानव विकास अहवाल 2020
15 डिसेंबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र विकास उपक्रमाने (यूएनडीपी) त्यांचा Human Development Report 2020 : The Next Frontier - Human Development and the Anthropocene हा 30 वा अहवाल प्रकाशित केला. सदर अहवाल 2019 च्या आकडेवारीवर आधारित आहे. यामध्ये समाविष्ट केलेल्या विविध अहवालापैकी मानवी विकास निर्देशांका (ह़्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स - एचडीआय) नुसारच्या क्रमवारीत 189 देशांमध्ये भारताचा क्रमांक 131 वा आहे, 2018 मध्ये भारत 129 व्या क्रमांकावर होता. तसेच या अहवालात लैंगिक विषमता निर्देशांकात भारत 123 व्या (162 देशामध्ये) क्रमांकावर आहे.
► भारताची एचडीआय नुसारची क्रमवारी -
1) 2020 चा अहवाल - 131 (0.645)
2) 2019 चा अहवाल - 129
3) 2018 चा अहवाल - 130
4) 2017 चा अहवाल - 131
5) 2016 चा अहवाल - 131
6) 2015 चा अहवाल - 130 (0.609)
7) 2014 चा अहवाल - 134
8) 2011 चा अहवाल - 134 (0.570)
9) 1990 चा अहवाल - (0.429)
► 2020 च्या मानव विकास निर्देशांकानुसार पहिले 5 देश -
1) नॉर्वे ( 0.957)
2) आयर्लंड (0.955)
3) स्वित्झर्लंड ( 0.955)
4) हाँगकाँग (0. 949)
5) आईसलँड (0.949)
► 2020 च्या मानव विकास निर्देशांकानुसार शेवटचे 5 देश -
1) 189 वा - नायजर (0.394)
2) 188 वा - मध्य आफ्रिकन रिपब्लिक (0.397)
3) 187 वा - छाड (0.398)
4) 186 वा - दक्षिण सुदान (0.433)
5) 185 वा - बुरुंडी (0.433)
► भारताचे शेजारी आणि सार्क देशांचा मानव विकास निर्देशांक अहवाल 2020 -
1) श्रीलंका - 0.782 (72)
2) चीन - 0.761 (85)
3) मालदीव - 0.740 (95)
4) भूतान - 0.654 (129)
5) भारत - 0.645 (131)
6) बांगलादेश - 0.632 (133)
7) नेपाळ -0.602 (142)
8) पाकिस्तान - 0.557 (154)
9) म्यानमार - 0.583(147)
10) अफगाणिस्तान - 0.511 (169)
► ब्रिक्स देशांचा मानव विकास निर्देशांक अहवाल 2020 -
1) रशिया 52 वा क्रमांक (0.824)
2) ब्राझील 84 वा क्रमांक (0.765)
3) चीन 85 वा क्रमांक (0.761)
4) दक्षिण आफ्रिका 114 वा क्रमांक (0.709)
5) भारत 131 वा क्रमांक (0.645)
► मानव विकास निर्देशांकावर आधारित विविध देशांची वर्गवारी केली जाते -
1) अतिउच्च मानव विकास गट - 0.758 पेक्षा जास्त मानवी विकास निर्देशांक
2) उच्च मानव विकास गट - 0.640 ते 0.758 मानव विकास निर्देशांक
3) मध्यम मानव विकास - 0.466 ते 0.640 मानव विकास निर्देशांक
4) कमी मानव विकास गट - 0.640 पेक्षा कमी मानव विकास निर्देशांक
मानव विकास अहवाल 2020 मधील नोंदी
1) भारताचा एकूण निर्देशांक 0.645 इतका आहे. 2019 च्या आहवालात तो 0.642 इतका होता. 1990 पासून गेल्या 30 वर्षात भारताच्या एचडीआयमध्ये 0.429 वरुन 0.645 इतकी सुधारणा झाली. भारताची सुधारणा अल्प प्रमाणात असली, तरी त्यामध्ये पन्नास टक्क्यांनी सुधारणा झाली आहे.
2) मानव विकास निर्देशांक 0 ते 1 च्या दरम्यान असतो, 0 म्हणजे मानवी विकास झालेला नाही तर 1 म्हणजे पुर्ण मानवी विकास होय.
3) 2020 च्या अहवालात प्रथमच, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅमने प्रत्येक देशाच्या दरडोई कार्बन उत्सर्जनामुळे आणि त्यातील भौतिक गोष्टींमुळे होणारा परिणाम प्रतिबिंबित करण्यासाठी नवीन मेट्रिक सादर केले. या मेट्रीकनुसार वस्तू तयार करण्यासाठी वापरलेल्या जीवाश्म इंधन, धातू आणि इतर संसाधनांचे प्रमाण मोजले गेले.
4) कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मात्र भारताची कामगिरी चांगली असून भारत अन्य देशांच्या विकासाला हातभार लावू शकतो. कार्बन उत्सर्जनाबाबत भारतााची कटिबद्धता वाखाणण्याजोगी आहे.
5) 2020 च्या मानव विकास निर्देशांक अहवालात नॉर्वेने पुन्हा 0.957 निर्देशांकासह अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड हे देश आहेत.
6) श्रीलंका आणि चीन अनुक्रमे 72 व्या आणि 85 व्या स्थानावर म्हणजे पहिल्या शंभरात आहेत.
7) मानव विकास अहवालानुसार श्रीलंका आणि भूतानसारखे छोटे देशदेखील निर्देशांकात भारतापेक्षा पुढे आहेत. श्रीलंका 72 व्या स्थानावर असून भूतान 129 व्या स्थानावर आहे.
8) बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, अफगाणिस्तान भारताच्या मागे आहेत- बांगलादेश (133), नेपाळ (142), म्यानमार (147), पाकिस्तान (154) आणि अफगाणिस्तान (169). बांगलादेशने चांगली कामगिरी करत, या यादीत 135 वरून 133 व्या स्थानावर मजल मारली.
9) युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन डिव्हीजन, युनेस्को, जागतिक बँक या संस्थांकडून गोळा केलेल्या विविध माहितीच्या आधारे मानव विकास निर्देशांक मोजला जातो.
10) दीर्घाआयुरारोग्य, शिक्षणाची संधी आणि जीवनमानाचा दर्जा या तीन प्रमुख निकषांवर ही क्रमवारी आधारित आहे. मात्र प्रत्येक देशामध्ये निराळी धोरणे, निराळी सरकारे, निराळी परिस्थिती असल्यामुळे परस्परांशी तुलना अनेकदा अप्रस्तुत ठरते.
11) या अहवालानुसार 2019 साली भारतीयांचे जीवनमान हे 69.7 वर्षे एवढे होते. बांगलादेशात ते 72.5 वर्षे, पाकिस्तानात 67.3 वर्षे एवढे होते.
12) मानव विकास अहवालानुसार 1980 मध्ये भारतातील सरासरी आयुष्यमर्यादा 53.9 वर्षे होती. त्यात 2019 मध्ये 69.7 वर्षे इतकी वाढ झाली.
13) 1980 मध्ये भारताचे दरडोई उत्पन्न 1255 डॉलर इतके होते, ते 2018 मध्ये 6,829 डॉलर, तर 2019 मध्ये 6,681 डॉलरवर आले. यामध्ये लोकांच्या क्रयशक्तीचा विचार करण्यात आला .
14) 2020 च्या अहवालात तज्ञांच्या म्हणण्यानुसार, जरी भारताची घसरण झाली असली, तरी भारताची कामगिरी गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली आहे. तसेच इतर देशांनी भारतापेक्षा अधिक चांगली कामगिरी केली.
15) भारताची गणना मध्यम मानव विकास गटात होते. 2011 च्या मानव विकास अहवालनुसार भारताचा मानव विकास निर्देशांक 0.570 इतका होता. त्यावेळी 187 देशांच्या सूचीमध्ये भारताचा क्रमांक 134 वा होता.
16) जगातील दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या, पहिल्या क्रमांकाची लोकशाही, क्रयशक्ती तुल्यतेच्या निकषावर जगातील पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असूनही भारत मागे राहतो. 2018 पर्यंत भारताचा विकासदर जगात सर्वाधिक होता.
17) चीन, रशिया, ब्राझील, भारत, दक्षिण आफ्रिका अशा नवप्रगत अर्थव्यवस्थांचा ब्रिक्स गट किंवा मेक्सिको, तुर्कस्तान, इंडोनेशिया अशा काही जी 20 देशांमध्ये आर्थिक, औद्योगिक विकास वेगात होत असताना, त्याच्या फायद्यापासून लोकसंख्येचा एक प्रचंड हिस्सा वंचित राहिलेला दिसून येतो. या देशांनी पाश्चिमात्य आर्थिक विकासाचे प्रारूप स्वीकारताना, त्या देशांचे मानवी विकास प्रारूप अंगीकारले नाही. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवार्याइतक्याच आरोग्य आणि शिक्षण या आधुनिक मानवाच्या मूलभूत गरजा बनल्या असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
18) भारतीय अर्थव्यवस्था 8 टक्क्यांहून अधिक वेगाने वाढत असतानाही डॉ. अमर्त्य सेन यांच्यासारखे अर्थतज्ज्ञ बजावत होते की, हा दर राखणे भारतासारख्या देशासाठी गौरवास्पद नव्हे तर अनिवार्य ठरते. अन्यथा कित्येक लाख लोक भुकेकंगाल राहतील. भारताची लोकशाही अनेक नवप्रगत देश किंवा आपले बहुतेक शेजारी देश यांच्यापेक्षा सशक्त आणि सळसळती आहे. चीनप्रमाणे वेचक भागांमध्ये प्रगती होऊ दिली आणि निवडक भागांत ती रोखली असे केलेले नाही. तरीही भारतातल्या भारतात केरळसारखी राज्ये मानवी विकास निर्देशांकात पुढे आणि बिहारसारखी राज्ये मागे असे असमान चित्र दिसून येते. तेथे समतोल साध्य होत नाही तोवर भारताची गणना मागास देशांमध्येच होत राहील. विकासाला मानवी चेहरा मिळाला, तरच तो खरा आणि शाश्र्वत विकास ठरतो.
19) संयुक्त राष्ट्राने मानवी विकासाची व्याख्या ‘लोकांच्या निवडींच्या विस्ताराची प्रक्रिया’ (Process of enlarging people's choices) अशी केली आहे.
मानव विकास अहवाल 2020 : भारताची आकडेवारी
मानव विकास अहवालात दरवर्षी 5 निर्देशांक जाहीर केले जातात -
1) मानव विकास निर्देशांक (HDI)
2) असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI)
3) बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI)
4) लैंगिक असमानता निर्देशांक (GII)
5) लिंगाधारित विकास निर्देशांक (GDI)
HDI Value 0.645 (World: 0.737)
IHDI Value 0.475 (World: 0.587)
MPI Value 0.820 (World: 0.943)
GII Value 0.123 (Developing Countries: 0.108)
GDI Value 0.488 (World: 0.436)
1) Health
Life expectancy at birth (years) : 69.7
2) Education
Expected years of schooling (years) : 12.2
3) Income/Composition of Resources
Gross national income (GNI) per capita (2017 PPP$) : 6,681
4) Inequality
Inequality-adjusted HDI (IHDI) : 0.475
5) Gender
Gender Development Index (GDI) : 0.820
6) Poverty
Population in multidimensional poverty (%) : 27.9
7) Work, employment and vulnerability
Employment to population ratio (% ages 15 and older) : 46.7
8) Human Security
Homicide rate (per 100,000 people) : 3.1
9) Trade and Financial Flows
Exports and imports (% of GDP) : 40.0
10) Mobility and Communication
Internet users, total (% of population) : 34.5
11) Environmental sustainability
Carbon dioxide emissions, production emissions per capita (tonnes) : 2.0
12) Demography
Total population (millions) (Data refers to 2030) : 1,503.6
13) Socio-economic sustainability
Skilled labour force (% of labour force) : 21.2
मानव विकास निर्देशांक
1990 पूर्वी वापरात असलेल्या भौतिक जीवनमान निर्देशांकातील (PQLI) त्रुटी लक्षात घेऊन मेहबूब उल हक यांनी मानवी जीवनमानाच्या संदर्भात सुधारित निर्देशांकाची जी मांडणी केली, त्याला मानव विकास निर्देशांक असे म्हणतात.
1) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम 1990 पासून दरवर्षी जगातील विविध देशांच्या (सध्या 189 देश) मानव विकास स्थितीचा अभ्यास करून जागतिक क्रमवारी प्रसिद्ध करते.
2) दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानप्राप्ती व राहणीमानाचा दर्जा या तीन घटकांचे मूल्य काढून प्रत्येक घटकाचा स्वतंत्र निर्देशांक तयार केला जातो.
3) दीर्घ आणि निरोगी जीवनाचे आकलन होण्यासाठी व्यक्तीचे जन्मावेळी अपेक्षित सरासरी आयुर्मान, ज्ञानप्राप्तीच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी व्यक्तीने शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे व शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्ष आणि जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी दरडोई उत्पन्न विचारात घेतले जाते. या तिन्ही घटकांची आकडेवारी गोळा करून एकत्रित सर्वसमावेशक असा मानव विकास निर्देशांक तयार केला जातो.
► एचडीआयचे आयाम व (निर्देशांक) -
1) दीर्घ व निरोगी जीवन (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान)
2) ज्ञानाची सुगमता (शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे, अपेक्षित शिक्षणाची वर्षे)
3) चांगले राहणीमान (जीएनपी-पीपीपी, आधारभूत वर्ष 2005)
4) गुणांकन : 0-1 (0 = अपूर्ण मानव विकास, 1 = पूर्ण मानव विकास )
2010 सालानंतर एचडीआयमध्ये बदल -
मानव विकास निर्देशांक मोजणीची नवी पद्धत
► 4 नोव्हेंबर 2010 नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.
► मानवी विकास निर्देशांक हा खालील तीनही निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो.
► मानवी विकास निर्देशांक = (आ. नि.)(शै. नि.)(उ. नि.) या गुणाकाराचे घनमूळ.
1. आयुर्मान निर्देशांक (आ. नि.) = (सरासरी आयुर्मान - 20) / (85 - 20)
जेव्हा सरासरी आयुर्मान 85 असते तेव्हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 20 असते तेव्हा निर्देशांक 0 असतो.
2. शैक्षणिक निर्देशांक (शै. नि.) = (स. शा. व. नि. + अ. शा. व. नि.)/2
सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (स. शा. व. नि.) = सरासरी शालेय शिक्षण वर्ष / 15
अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (अ. शा. व. नि.) = अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष / 18
3. उत्पन्न निर्देशांक (उ. नि.) = (द. डो. ए. रा. उ.) - (100) / (75,000) - (100)
जेव्हा दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (द.डो.ए.रा.उ.) हे 75,000 डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 100 डॉलर असते तेव्हा तो 0 असतो.
असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक 2020
1990 ते 2020 या 30 वर्षाच्या कालावधीत भारताने कोट्यवधी लोकांना दारिद्य्रातून बाहेर काढण्यात यश मिळविलेे आहे. असे असले, तरी देशातील विषमताही वाढली आहे.
1) 2020 च्या अहवालातील भारताचा विषमता निर्देशांक 25.7 टक्के आहे. त्यामुळेच देशातील विषमता विचारात घेतली तर एचडीआय 0.645 वरुन 0.475 इतका कमी होतो. मध्यम गटातील देशासाठी जागतिक स्तरावर या मूल्यात 26.30 टक्क्यांनी घसरण झाली. म्हणजेच जगाच्या तुलनेत देशातील विषमतेच्या वाढीचे प्रमाण किंचितसे कमी झालेले आहे.
2) माणसाची प्रतिष्ठा जपणारे रोजगारविषयक धोरण आखणे महत्वाचे असल्याचे हा अहवाल सुचवितो. मनरेगा या भारतातील ग्रामीण भागात रोजगार हमी देणार्या योजनेची अहवालात प्रशंसा करण्यात आली आहे.
3) स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील 4 टक्के वाढीमुळे भारतातील जनतेला सामाजिक सुरक्षा, निवृत्ती वेतन, मुलभूत आरोग्य सुविधा, बाल कल्याण आणि रोजगार योजना यांचा लाभ मिळू शकतो.
4) अशी विषमता कमी करणार्या शासकीय योजना चांगल्या असतात, पण त्या लाभार्थींपर्यंत आणि वंचितांपर्यंत किती प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने पोहचतात, यावर त्या योजनेचे यश किंवा अपयश अवलंबून असते. यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण केल्यास भारताची कामगिरी उंचावू शकते.
5) एचडीआय काढताना प्रत्येक आयामाचे सरासरी मूल्य काढले जाते. त्या आयामाबाबत लोकसंख्येमध्ये त्याबाबत असलेली तफावत समायोजित केल्यास आयएचडीआय मिळतो.
7) एचडीआय व आयएचडीआय सारखाच असेल तर = मानव विकासात संपूर्ण समानता.
8) एचडीआय व आयएचडीआयमध्ये तफावत जेवढी जास्त तेवढी जास्त असमानता.
लिंगाधारित विकास निर्देशांक अहवाल 2020
2014 सालापासून यूएनडीपी लिंगाधारित विकास निर्देशांक प्रकाशित करते. भारताचा हा निर्देशांक 0.820 असून आहे. बांगाला देश व पाकिस्तानचा लिंगाधारित विकास निर्देशांक हा अनुक्रमे 0.904 आणि 0.745 आहे. 0.835 हा निर्देशांक मध्यम पातळीची स्त्रीपुरुष समता दर्शवितो, त्यापेक्षा कमी आकडा म्हणजे टोकाची लैंगिक विषमता मानली जाते. त्यानुसार बांगला देशातील लैंगिक विषमता भारतापेक्षा कमी आहे.
1) पुरुष आणि महिला यांच्या संदर्भातील मानवी विकासाच्या सर्व पैलूंची तुलना करुन लैंगिक विषमता निश्चित केली जाते, त्यानुसार 167 देशांचे 5 गटात वर्गीकरण केले जाते. भारताचा अशा शेवटच्या 5 व्या गटात समावेश आहे.
2) स्त्री-पुरुष विकासातील फरकाच्या अमूर्त चल (absolute deviation) नुसार लैंगिक विषमतेचे वर्गीकरण -
- गट (1) उच्च पातळीची स्त्री-पुरुष समता - 2.5 पेक्षा कमी अमूर्त चल
- गट (2) उच्च ते मध्यम पातळीची स्त्री-पुरुष समता - 2.5 ते 5.0 अमूर्त चल
- गट (3) मध्यम पातळीची स्त्री-पुरुष समता - 5.5 ते 7. 5 अमूर्त चल
- गट (4) मध्यम ते निम्न पातळीची स्त्री-पुरुष समता - 7.5 ते 10 अमूर्त चल
- गट (5) अतिनिम्न पातळीची स्त्री-पुरुष समता - 10 पेक्षा जास्त अमूर्त चल
लैंगिक विषमता निर्देशांक अहवाल 2020
2010 पासून प्रकाशित होणार्या या अहवालात स्त्रियांना मिळणार्या राजकीय निर्णय प्रक्रियेत स्थान, आर्थिक व सामाजिक संधी आणि समानतेचा विचार केला जातो. भारताचा हा निर्देशांक 0.488 असून जगातील 162 देशामध्ये 123 क्रमांक आहे. या संदर्भात बांगाला देश 133 व्या, तर पाकिस्तान 135 व्या क्रमांकावर आहेत.
1) 2019 च्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण स्त्रियांपैकी केवळ 13.5 टक्के स्त्रियांना संसदीय प्रणालीत स्थान मिळते. हायस्कूलपर्यंतचे शिक्षण 27.7 टक्के स्त्रिया घेतात. हेच प्रमाण पुरुषांमध्ये 56.6 टक्के इतके आहे.
2) 15 ते 19 या वयोगटातील दर 1 हजार स्त्रियांमागे जन्मदर 13.2 इतका आहे. पूर्वी तो 32.8 इतका होता. त्यामुळे कुमारवयीन मातांचे प्रमाण कमी होत आहे.
3) दर 1 लाखजिवंत जन्मामागे भारतातील मातामृत्यू दर 133 आहे.
4) स्त्रियांचा एकूण श्रमबाजारातील सहभाग फक्त 27 टक्के आहे. स्त्रियांच्या बाबतीत संधींची असमानता अधोरेखित करणारे हे वास्तव आहे.
5) महिलांच्या छळाचे प्रमाण घटले - आर्थिक सुरक्षितता आणि जमिनीच्या मालकीमुळे महिलांच्या सुरक्षेमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून येते. यामुळे लिंगभेदावर आधारित छळ कमी झाला आहे.
जागतिक स्तरावरील विकासाचे निर्देशांक
विकासाचे मोजमाप करताना विविध देशांसाठी पुढील 4 प्रमुख निर्देशांकांची गणना केली जाते -
1) मानव विकास निर्देशांक
2) असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक
3) लैंगिक असमानता निर्देशांक
4) बहुआयामी दारिद्य्र निर्देशांक
1) मानव विकास निर्देशांक
(HDI - Human Development Index)
► मेहबूब-उल-हक यांना ‘मानव विकास निर्देशांकाचे जनक’ म्हणून संबोधले जाते.
► 2010 मध्ये हा निर्देशांक ज्या घटकांवरून काढला जाई, त्यात बदल करण्यात आला. त्यानुसार, मानव विकास निर्देशांक पुढील 3 निकष (dimensions) व त्यांच्याशी संबंधित 4 निर्देशक (indicators) यावरून काढला जातो -
1) दीर्घ आणि निरोगी जीवन (Long Healthy Life) -
► देशाचा आरोग्याचा स्तर मोजण्यासाठी (1) जन्माच्या वेळेचे आयुर्मान (Life Expectamcy at birth) हा निर्देशक वापरला जातो.
► दीर्घ आणि निरोगी जीवन यांचे मापन करण्यासाठी जन्मावेळचे अपेक्षित आयुर्मान निर्देशक वापरला जातो. अपेक्षित आयुर्मान किंवा अपेक्षित दीर्घायुष्य म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे आयुष्य होय. जन्माला आलेले प्रत्येक बालक किती वर्ष जगण्याची अपेक्षा करू शकते. त्याची सरासरी म्हणजे अपेक्षित आयुर्मान होय.
► व्यक्तीचे सरासरी आयुर्मान देशपरत्वे भिन्न असल्याचे दिसून येते. (उदा. मानव विकास अहवाल 2019 नुसार भारतीयांचे सरासरी आयुर्मान 69.4 वर्ष होते. हाँगकाँग सर्वाधिक 84.7 वर्ष तर मध्य आफ्रिकी गणराज्यचे सरासरी आयुर्मान सर्वात कमी 52.8 वर्ष)
► जन्माला येणारे प्रत्येक बालक सामान्यपणे किती वर्ष जगण्याची अपेक्षा करू शकते यावर अनेक घटक परिणाम करतात. देशांमध्ये उपलब्ध असणार्या आरोग्यविषयक सुविधांचा यावर प्रामुख्याने परिणाम होतो. त्यामुळे अपेक्षित आयुर्मान हा निर्देशक देशातील आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेचेही मोजमाप करतो. हा निर्देशांक तयार करताना मानवी आरोग्याशी संबंधित कुपोषण, बालमृत्यू दर, एकूण मृत्युदर, आरोग्य सुविधांवर होणारा खर्च, साथीच्या आजारांमुळे होणार्या मृत्यूंची संख्या, लसीकरणाची स्थिती, इ विविध घटकांचा अभ्यास केला जातो.
2) ज्ञान प्राप्ती व शैक्षणिक संपादणूक (Educational Attainment) -
► देशाचा शैक्षणिक स्तर मोजण्यासाठी पुढील दोन निर्देशक वापरले जातात. शिक्षणाचा निर्देशांक या दोन्ही निर्देशकांचा भूमितीय मध्य असतो -
(2) 25 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या प्रौढांची सरासरी शालेय वर्षे (Mean years of schooling)
(3) 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची अपेक्षित शालेय वर्षे (Expected years of schooling)
► शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे मोजण्यासाठी 25 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रौढांनी शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर शिक्षणामध्ये व्यतीत केलेल्या वर्षांची सरासरी घेतली जाते. तर शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्षे मोजण्यासाठी शाळायोग्य वयाच्या बालकांना शाळेत प्रवेश केल्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी लागणारी अपेक्षित वर्षे लक्षात घेतली जातात. शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावरील शाळायोग्य वयाच्या बालकांची एकूण लोकसंख्या या दोन घटकांवरून शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्षे मोजली जातात.
► येथे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, शिक्षणाच्या प्रत्येक स्तराचा कालावधी देशानुसार वेगवेगळा असू शकतो म्हणूनच शिक्षणाच्या सरासरी आणि अपेक्षित वर्षांची गणना करताना हे विचारात घेतले जाते.
► शैक्षणिक प्राप्तीचा निर्देशांक काढताना शिक्षणामध्ये व्यतीत केलेली सरासरी वर्षे व शिक्षणासाठी लागणारी अपेक्षित वर्षे या घटकांशिवाय शिक्षणावर होणारा सरकारी खर्च, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावरील संयुक्त पटनोंदणी दर, प्रौढ साक्षरता दर, शाळांमधील इंटरनेटची उपलब्धता, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण, शिक्षणातील गळतीचे प्रमाण, इत्यादी बाबींचा अभ्यास केला जातो.
3) जीवनमानाचा दर्जा (Decent standard of living) -
► देशाच्या जीवनमानाचा दर्जा मोजण्यासाठी (4) दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पन्न (Per capita GNI) हा निर्देशक वापरला जातो.
► जीवनमानाचे मापन करण्यासाठी क्रयशक्ती समतेवर आधारित (Purchasing Power Parity) वास्तविक दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (GNI) विचारात घेतले जाते. कोणत्याही व्यक्तीला दीर्घायुष्य आणि ज्ञानप्राप्ती शिवाय आयुष्यभरात असंख्य वस्तू मिळविण्याची इच्छा असते. व्यक्तीला इच्छा असलेल्या वस्तू चांगले जीवनमान व्यतीत करण्यासाठी आवश्यक असतात. व्यक्तीचे उत्पन्न अशा वस्तू प्राप्त करण्याचे प्रमुख साधन आहे. व्यक्तीच्या उत्पन्नावरूनच व्यक्तीचे राहणीमान किंवा जीवनमानाचा दर्जा ठरत असतो. त्यामुळे देशाचे दरडोई उत्पन्न हा निर्देशक जीवनमानाचा दर्जा निश्चित करण्यासाठी वापरला जातो.
1) प्रथम वरील 4 निर्देशांकासाठी किमान व कमाल मूल्ये ठरविली जातात. त्यांना गोलपोस्ट म्हणतात. प्रत्येक देश या मुलाच्या दरम्यान कोठे आहे, यानुसार त्या देशाचा मानव विकास निर्देशांक ठरवला जातो. त्याचे मूल्य 0 ते 1 दरम्यान व्यक्त केले जाते. 1 च्या जवळ असलेले मूल्य मानव विकासाचा उच्च स्तर दर्शवितो.
2) संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम या संस्थेने तयार केलेल्या मानवी विकास अहवालानुसार जगातील देशांचे मानवी विकास निर्देशांक यादीत संयुक्त राष्ट्रसंघाच्या 192 सदस्य राष्ट्रांपैकी 180 राष्ट्रांचा तसेच हाँगकाँग व पॅलेस्टिनी भूभाग ह्यांचा समावेश आहे.
3) सर्व देश एकूण चार वर्गांमध्ये विभागले आहेतः अति उच्च, उच्च, मध्यम व कमी मानवी विकास.
4) 2007 सालापासून पहिल्या विभागातील देशांना विकसित देश तर उर्वरित तीन विभागांमधील देशांना विकसनशील देश असे संबोधण्यात येते.
एचडीआयमधील घटक निर्देशांक काढण्याचे सूत्र
► मानव विकास निर्देशांकाच्या दीर्घ आणि निरोगी जीवन, ज्ञानप्राप्ती व राहणीमानाचा दर्जा या तीन घटकांचे मूल्य काढून प्रत्येक घटकाचा स्वतंत्र निर्देशांक तयार केला जातो. त्यासाठी पुढील सूत्राचा वापर केला जातो.
वास्तव मूल्य - न्यूनतम मूल्य
घटक निर्देशांक = ------------------------------------------
महत्तम मूल्य - न्यूनतम मूल्य
► घटक निर्देशांकाचे मूल्य काढण्यासाठी प्रत्येक घटकाचे न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य UNDP निश्चित करते. 2014 च्या जागतिक विकास अहवालानुसार घटक निर्देशांक काढण्यासाठी निश्चित केलेले न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य पुढील प्रमाणे आहे -
1. आयुर्मान निर्देशांक (Life Expectancy Index) -
► आयुर्मान निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 20 वर्ष ते 85 वर्ष या मर्यादेत निश्चित केले आहे. देशाच्या सरासरी आयुर्मानाचे वास्तव मूल्य आणि न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य सूत्रामध्ये टाकून आयुर्मान निर्देशांक काढला जातो.
सरासरी आयुर्मान - 20
आयुर्मान निर्देशांक = ---------------------------------
85 - 20
► जेव्हा देशाचे सरासरी आयुर्मान 85 असते तेव्हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 20 असते तेव्हा निर्देशांक 0 असतो.
2. शैक्षणिक निर्देशांक (Education Index) -
► सरासरी शालेय वर्ष निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 0 वर्ष ते 15 वर्ष या मर्यादेत निश्चित करण्यात आले आहे तर अपेक्षित शालेय वर्ष निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 0 ते 18 वर्ष या मर्यादेत निश्चित करण्यात आले आहे. देशातील सरासरी शालेय वर्ष व अपेक्षित शालेय वर्षाचे वास्तव मूल्य सूत्रामध्ये टाकून सरासरी शालेय वर्ष निर्देशांक व अपेक्षित शालेय वर्ष निर्देशांक असे दोन भिन्न निर्देशांक तयार केले जातात. त्यांचा गणितीय मध्य काढून शैक्षणिक निर्देशांक तयार केला जातो.
सरासरी शालेय शिक्षण वर्ष - 0
सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक = ------------------------------------------
15 - 0
अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष - 0
अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक = -------------------------------------------------
18 - 0
सरासरी शा. शि. वर्ष निर्देशांक + अपेक्षित शा. शि. वर्ष निर्देशांक
शैक्षणिक निर्देशांक = ---------------------------------------------------------------------------------------
2
3. उत्पन्न निर्देशांक (Income Index) -
► उत्पन्न निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 100 US ते 75000 US या मर्यादेत निश्चित करण्यात आले आहे. देशाचे दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न आणि न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य सूत्रामध्ये टाकून उत्पन्न निर्देशांक काढला जातो. उत्पन्नाचे खरेदी शक्तीमध्ये रुपांतर करण्यासाठी मुल्यांचा श्रेस घेतला जातो. त्यासाठी सूत्रामध्ये थोडा बदल केला जातो.
लॉग (दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न) - लॉग (100)
उत्पन्न निर्देशांक = -------------------------------------------------------------------
लॉग (75000) - लॉग (100)
► जेव्हा दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न हे 75000 अमेरिकन डॉलर असते. तेव्हा हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 100 अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो 0 असतो.
मानव विकास निर्देशांक निश्चिती -
► मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भूमितीय मध्य असतो. तीनही निर्देशांकांचा गुणाकार करून त्यांचे घनमूळ घेतले जाते. त्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते.
► मानव विकास निर्देशांक = (आयुर्मान निर्देशांक * शिक्षण निर्देशांक * उत्पन्न निर्देशांक) याचे घनमूळ
2) असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक
(IHDI - In-equalitiy adjusted Human Development Index )
1) 2010 च्या अहवालात हा निर्देशांक पहिल्यांदा लागू करण्यात आला.
2) हा निर्देशांक मानव विकास निर्देशांकाप्रमाणेच काढला जातो.
3) मानव विकास निर्देशांक काढतांना प्रत्येक निर्देशकाचे सरासरी मूल्य धरले जात असते. मात्र लोकसंखेमध्ये त्याबाबतीत मोठी असमानता असते. त्यामुळे IHDI काढतांना ही असमानता समयोजित (adjust) केली जाते.
4) देशात चारही निर्देशकांच्या बाबत पूर्ण समानता असेल तर HDI आणि IHDI समान येतील. मात्र IHDI चे मूल्य HDI पेक्षा जसजसे कमी होईल तशी असमानता वाढत जाईल.
3) लैंगिक असमानता निर्देशांक
(GII - Gender Inequality Index)
► हा निर्देशांक 2010 च्या अहवालात पहिल्यांदा लागू करण्यात आला. त्याने 1995 पासून लागू करण्यात आलेल्या लिंगाधारित विकास निर्देशांक (GDI) व लिंग सबलीकरण परिमाण (GEM) यांची जागा घेतली.
► 0 = लिंग समानता, 1 = तीव्र असमानता.
हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो -
1) प्रजनन आरोग्य (Reproductive health) -
ते मोजण्यासाठी पुढील 2 निर्देशक वापरले जातात-
1) माता मृत्यू (Maternal mortality)
2) किशोरवयीन प्रजनन (Adolescent fertility)
2) महिला सबलीकरण (Women Empowerment) -
याचे प्रमाण मोजण्यासाठी पुढील 3 निर्देशक वापरले जातात-
1) संसदीय प्रतिनिधित्व (Parliamentary representation)
2) शैक्षणिक कामगिरी - माध्यमिक व वरील स्तरावरील (Educational attainment)
3) श्रमबाजारातील सहभाग - रोजगार क्षेत्रातील स्त्री पुरुषांचा सहभाग (Labour market)
4) बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक
(Multi-Dimensional Poverty Index: MPI)
1) या निर्देशांकाची सुरुवात युएनडीपी आणि अॅक्सफोर्ड विद्यापीठ यांनी मिळून जुलै 2010 मध्ये केली. या निर्देशांकाने 1997 पासून लागू करण्यात आलेल्या मानवी दारिद्र्य निर्देशांकांची (HPI1, HPI2) जागा घेतली.
2) विकासाप्रमाणेच दारिद्र्य बहुआयामी (multidimensional) असते. अनेक देश दारिद्रयाचा बहुआयामीपणा दडवून ठेवतात. त्यामुळे या निर्देशांकाची रचना HDI च्या तिन्ही निकषांच्या बाबतीत आढळणारी बहुवंचितता (multiple deprivations) ओळखण्यासाठी करण्यात आली.
► हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो -
1) आरोग्य (Health) -
याचा स्तर मोजण्यासाठी 2 निर्देशक वापरले जातात-
1) पोषण
2) बालमृत्यू
2) शिक्षण (Education) -
याचा स्तर मोजण्यासाठी 2 निर्देशक वापरले जातात-
1) शालेय वर्षे
2) बालक पटसंख्या
3) जीवनमान दर्जा (Living Standards) -
याचा स्तर मोजण्यासाठी 6 निर्देशक वापरले जातात-
1) मालमत्ता
2) वीज
3) पाणी
4) स्वच्छता गृह
5) स्वयंपाकाचे इंधन
6) जमीन (अस्वच्छ जमीनीवरील जगणे)
मानव विकास संकल्पना
देशाचा आर्थिक विकास मोजण्यासाठी व दोन राष्ट्रांच्या विकास प्रक्रियेची तुलना करण्यासाठी गेली अनेक वर्षे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नातील वाढ हे दोन निकष वापरले जात आहेत. परंतु हे दोन्ही निर्देशक संख्यात्मक असून त्यावरून विकासाचे वास्तव चित्र प्राप्त होत नाही. याची प्रचिती आल्याने आर्थिक विकासाचे पर्यायी निर्देशक शोधण्याच्या प्रयत्नांना वेग आला. या प्रयत्नांचा भाग म्हणून 1990 मध्ये मानव विकास ही संकल्पना उदयास आली.
1) 1990 मध्ये मेहबूब उल हक व अमर्त्य सेन यांच्या प्रेरणेतून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक पातळीवर पहिला मानव विकास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
2) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने (UNDP)1990 मध्ये प्रकाशित केलेल्या मानव विकास अहवालात मानव विकास ही संकल्पना सर्वप्रथम मांडण्यात आली.
3) मानव विकास अहवालामध्ये मानव विकासात आरोग्य, शिक्षण व जीवनमानाबरोबरच, लिंगनिरपेक्ष सामाजिक विकास, स्त्री-पुरुषांचे समान सक्षमीकरण, मानवी दारिद्य्र, मानवी राहणीमान, पोषण, बालमृत्यूदर, रोजगार, साक्षरता दर, या घटकांना महत्त्व दिले गेले. त्यानुसार मानवी कल्याणाच्या मापदंडाची निर्मिती व त्याचे मोजमाप करताना 1990 मध्ये प्रथम मानव विकास निर्देशांक (HDI), 2010 मध्ये बहुआयामी दारिद्य्र निर्देशांक (MPI), असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI), लिंगभाव असमानता निर्देशांक (GII), व 2014 मध्ये लिंगभाव विकास निर्देशांक (GDI) असे प्रमुख निर्देशक तयार करण्यात आले.
4) पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ मेहबूब उल हक आणि नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी मानव विकास ही संकल्पना विकसित करण्यात व मानव विकास मोजण्यासाठी निर्देशांक तयार करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
5) सॅम्युएल्सन यांच्या मते, मानवी विकास म्हणजे मनुष्याची शारीरिक व बौद्धिक कार्यक्षमता वाढविण्यात आलेले यश होय.
6) मानव विकास अहवाल 1997 नुसारची व्याख्या - एखाद्या देशात सर्वसामान्य लोकांना मिळणार्या संधीचा व निवडीचा परिघ वाढवत नेण्याची प्रक्रिया म्हणजे मानवविकास होय.
7) मेहबूब उल हक यांच्या मते, आर्थिक वृद्धी आणि मानवी विकास यातील मूलभूत फरक म्हणजे आर्थिक वृद्धीचा संबंध फक्त उत्पन्नाच्या वाढीशी असतो तर मानवी विकासाचा संबंध मानवी जीवनाशी निगडित आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटकांशी असतो.
8) डम स्मिथ यांच्या मते, Prosperity of a country is determined by the skill, efficiency and attitude of the labour used by that country.
9) डॉ. अमर्त्य सेन म्हणतात की, ‘मानव विकास हा एक असा दृष्टिकोन आहे, ज्यात मानवी जीवनाचा एक भाग असलेल्या अर्थव्यवस्थेच्या विकासापेक्षा तेथील मानवी जीवन वृद्धींगत, विकसित होणे गरजेचे आहे.’
10) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या पहिल्या अहवालानुसार, ‘मानव विकास म्हणजे लोकांना मिळणार्या संधीचा परीघ मोठा करण्याची एक प्रक्रिया होय.’
11) मानवाचा केवळ आर्थिक विकासच नव्हे; तर त्यासोबतच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, मानसिक, सास्कृतिक इ. अशा सर्व अंगानी विकास होणे म्हणजे मानव विकास होय.
12) मानव विकास निर्देशांक मानव विकास ही एक बहुअंगी संकल्पना असून मानव विकासाचे मोजमाप करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे.
13) मानव विकास निर्देशांक हा स्थूलमानाने आयुर्मान, ज्ञान प्राप्ती व चांगले राहणीमान या तीन सामाजिक घटकांची सरासरी होय.
14) मानव विकास निर्देशांक म्हणजे सरासरी आयुर्मान निर्देशांक, शिक्षणाची प्राप्ती निर्देशांक व जीवनमान निर्देशांक या तिन्हीची समभारीत सरासरी होय.
15) सरासरी आयुर्मान, शालेय सरासरी वर्षे, शालेय अपेक्षित वर्षे व दरडोई उत्पन्न इ. मानकांना समान महत्त्व देऊन मानव विकास निर्देशांक काढला जातो.
16) या निर्देशांकाचे एकूण मूल्य 0 ते 1 च्या दरम्यान असून निर्देशांक जेवढा 1 या अंकाच्या जवळ असेल तेवढा देशाचा विकास चांगला असतो.
17) मानव संसाधनाची प्रवृत्ती, इच्छाशक्ती, क्षमता आणि कौशल्याच्या जोरावर जगातील अनेक देशांनी वेगवान आर्थिक विकासाचे ध्येय साध्य केल्याचे दिसून येते. उदा. जपान, सिंगापूर, जर्मनी हाँगकाँग, चीन, इत्यादी.
विकासाचे आर्थिक निर्देशक
► विकासाचे अंतिम उद्दिष्ट्य मानवी प्रगती आहे आणि हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आर्थिक वृद्धी हे एक महत्वाचे माध्यम आहे. त्यामुळे एखाधा देशाला झालेला किंवा होत असलेला आर्थिक विकास मोजण्यासाठी ज्या घटकांचा वापर केला जातो, त्यांना ‘विकासाचे आर्थिक निर्देशक’ असे म्हणतात. त्यामध्ये पुढील निर्देशकांचा/सूचकांचा समावेश होतो.
1) राष्ट्रीय उत्पादन व उत्पन्न :
► देशातील आर्थिक क्रियांचा स्तर मोजण्यासाठी राष्ट्रीय उत्पाद व राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली जाते. राष्ट्रीय उत्पाद बाजारभावला मोजले जाते, तर राष्ट्रीय उत्पन्न घटक किमातींना मोजले जाते.
► केवळ वस्तू-सेवांच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यानेही राष्ट्रीय उत्पाद वाढते. मात्र ही खरी वाढ नसते, म्हणून राष्ट्रीय उत्पाद चालू तसेच स्थिर किंमतींना मोजले जाते.
2) दरडोई उत्पन्न :
► दरडोई उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न भगिले लोकसंख्या होय. म्हणजेच, एका व्यक्तिमागील राष्ट्रीय उत्पान्न होय. दरडोई उत्पन्न हा अधिक चांगला निर्देशक मनाला जातो, मात्र तो एक साधा सरासरी असतो, त्यातून उत्पन्नाचे खरे वितरण समजून येत नाही.
► देशाचे दरडोई उत्पन्न जास्त असले तरी मात्र त्याचे व्यक्तिनिहाय वितरण अत्यंत असमान असू शकते.
3) उत्पन्न व संपत्तीची समानता/ विषमता :
► कोणत्याही देशात उत्पन्न व संपत्तीची पूर्ण समानता असणे शक्य नाही. यावरून उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचे प्रमाण मोजण्यासाठी लॉरेंझ वक्ररेषा व गिनी गुणांकाचा वापर केला जातो. लॉरेंझ वक्ररेषेवरुन काढलेला गिनी गुणांक जेवढा कमी तेवढे उत्पन्न/संपत्तीचे वितरण अधिक समान असते, तर याउलट गिनी गुणांक जेवढा जास्त तेवढे हे वितरण अधिक असमान असते.
4) दारिद्रयाचा स्तर :
► दारिद्रयाचा उच्च स्तर आर्थिक विकासाची कमतरता दर्शवितो. दरिद्रयाचा स्तर दारिद्रय रेषेने दर्शविला जातो. दारिद्रयाच्या स्तरावरून जीवनाच्या गुणवत्तेचा स्तर, उपासमार, कुपोषण, निरक्षरता व पर्यायाने मानवी विकास स्तराचा अंदाज येतो.
विकासाचे सामाजिक निर्देशक
शिक्षण व आरोग्य हे मनवी विकासाचे महत्वाचे घटक आहेत. यावरून, विकासाचे महत्वाचे सामाजिक सूचक पुढीलप्रमाणे आहेत -
1) शिक्षणविषयक निर्देशक -
► देशातील शैक्षणिक स्तर दर्शविण्यासाठी साक्षरता दर, विशेषत: महिलांची साक्षरता, विभिन्न वयोगटातील शाळकरी मुलांचे स्थूल व निव्वळ पटसंख्या प्रमाण (Drop out ratio) विद्यार्थी-शिक्षक प्रमाण यांसारखे सूचक वापरले जातात.
2) आरोग्यविषयक निर्देशक -
► शिक्षणातून प्राप्त केलेली कौशल्ये वापरण्याची क्षमता आरोग्याच्या स्तरावर अवलंबून असते. दीर्घ जीवनकाल (longevity) दर्शविणार्या निर्देशकांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो: जन्माच्या वेळेचे आयुर्मान, अर्भक मृत्यू दर, बालमृत्यू दर, माता मृत्यू दर, पोषण दर्जा, स्वच्छतेची स्थिती इत्यादी.
3) लोकसंख्येच्या वाढीचा दर -
► आर्थिक विकास न लोकसंख्येच्या वाढीचा दर यांत जवळचा संबंध असतो. पारंपरिक व न्यून-विकसित समाजात लोकसंख्येच्या वाढीचा दर उच्च असतो. लोकसंख्येचा वाढीचा दर जन्म दर, मृत्यू दर, जनन दर यांसारख्या दारांवरून ठरत असतो.
4) लिंगविषयक विकास निर्देशक -
► महिलांच्या विकासाचा स्तर परिगणित करण्यासाठी लिंगविषयक विकास सूचक वापरले जातात. उदा. जेंडर असमानता निर्देशांक.
5) जागतिक उपासमार निर्देशांक -
2006 पासून प्रकाशित
प्रकाशन : IFPRI (International Food Policy Research Istitute)
0 = चांगला, 100 = अति वाईट
आयाम -
- लोकसंख्येतील कुपोषणाचे प्रमाण
- बालकांमधील कुपोषणाचे प्राबल्य
बालमृत्यू दर -
- HPI-1 विकसनशील देशांसाठी
- HPI-2 विकसित व औद्योगिक देशांसाठी
6) जीवनमानाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक (PQLI) -
- संकल्पना : मॉरीस डी मॉरीस (1979)
- प्रकाशन : ओव्हरसीज डेव्हलपमेंट कौन्सिल
घटक -
- सरासरी आयुर्मान
- बालमृत्यू प्रमाण
- साक्षरता
जागतिक बँकेचा मानव विकास निर्देशांक
सप्टेंबर 2020 मध्ये मानवी विकास निर्देशांक आकडेवारी जागतिक बँकेने जाहीर केली. जागतिक बँकेच्या या वार्षिक मानवी विकास निर्देशांकात 174 देशांच्या यादीत भारताने 116 वे स्थान मिळविले. 2019 साली भारताचा 157 देशांच्या मानव विकास निर्देशांकाच्या यादीत 115 वा क्रमांक होता.
1) 2019 साली मानव विकास निर्देशांक घसरल्यानंतर भारत सरकारने आकडेवारीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अर्थव्यवस्थेच्या धक्क्यानंतर यंदा भारताची मानव विकास निर्देशांक स्थिती आणखी चिंताजनक झाली आहे. असे असले तरी वर्ष 2018 च्या तुलनेत देशाचे मानवी विकास निर्देशांकात गुणांकन हे 0.49 वरून 0.44 टक्के झाले.
2) मानवी विकास निर्देशांक 2020 मध्ये आरोग्य आणि शैक्षणिक याविषयीची मार्च 2020 मधील आकडेवारी विचारात घेण्यात आली. तसेच कोरोनाच्या पूर्वीच्या काळातील मुलांचे आरोग्य आणि शैक्षणिक आकडेवारी मानवी विकास निर्देशांकात देण्यात आली.
3) कोरोनाच्यापूर्वी काळात बहुतांश देशांनी मुलांच्या मानवी विकासात प्रगती केल्याचे दिसून आले आहे.
4) कोरोना संकटाचा विकसनशील देशांवर मोठा परिणाम झाला आहे. या देशांमधील संघटित आणि असंघटित बाजार कोसळला आहे. त्याठिकाणी मर्यादित सामाजिक सुरक्षा आहे. विकसनशील देशांमध्ये 12 टक्के रोजगारांचे प्रमाण कमी झाले आहे. विकसनशील देशांमध्ये अत्यावश्यक असलेल्या आरोग्याच्या सेवा मिळणे वरचेवर कठीण होत आहे. 80 दशलक्ष मुले हे अत्यावश्यक असलेल्या लसीकरणापासून वंचित आहेत.
राष्ट्रीय मानव विकास अहवाल 2001
► 2001 मध्ये पहिला मानव विकास अहवाल प्रकाशित
► निर्देशक -
1) आरोग्य (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान)
2) शिक्षण (साक्षरता दर व समायोजित शिक्षणाची सरासरी वर्षे)
3) उत्पन्न (दरडोई उपभोग्य बाबींवरील वास्तविक खर्च)
► निकृष्ट राहणीमान, मुलभूत सोयींचा अभाव, कुपोषण व निरक्षरता ही दारिद्रयाची प्रमुख लक्षणे आहेत. दारिद्रय निर्मूलन हे नियोजनबद्ध विकासाचे ध्येय ठरवून राज्य शासन आणि केंद्र सरकारची वाटचाल चालू आहे.
► मानवाच्या तीन सर्वात महत्त्वाच्या आकांक्षा आहेत- दीर्घ व आरोग्यपूर्ण जीवन जगणे, ज्ञान प्राप्त करणे आणि चांगल्या प्रतीचे राहणीमान उपभोगणे. या तीन आकांक्षाची परिपूर्ती करण्याची प्रक्रिया म्हणजे मानव विकास म्हणता येईल. मानव विकास निर्देशांक ठरवतांना या तीन बाबींचा विचार केला जातो.
► सर्वसाधारणपणे दीर्घायुष्य हे जन्मवेळच्या आयुर्मानात मोजले जाते. शिक्षण हे प्रौढ साक्षरता प्रमाण (15 वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचे साक्षरतेचे प्रमाण) व पटावरील एकत्रित नोंदणीची गुणोत्तरे यावरुन ठरवतात आणि चांगल्या प्रतीचे राहणीमान हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या आधारे मोजण्यात येते.
राष्ट्रीय मानव विकास अहवाल 2011
► विषय : सामाजिक सामावेशानाकडे
- निर्मिती : नियोजन आयोग
- जाहीर : अहलुवालिया
- निर्देशांक : 0.547
- महाराष्ट्र : 0.752
महाराष्ट्र राज्य उच्च मानव विकास गटात मोडते.
राज्यांतर्गत दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र दुसरे
- क्रमवारी : केरळ, दिल्ली, गोवा, पंजाब, महाराष्ट्र.
महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2002
हा राज्याचा मानव विकासाची परिस्थिती दर्शविणारा पहिला प्रयत्न होता. त्यामध्ये वाढ, दारिद्रय, समानता, शिक्षण, आरोग्य व पोषण इ. पैलूंचा विचार केला होता. त्यानंतर राज्याने मानव विकासासंबंधी निर्देशाकांमध्ये भरीव प्रगती केली आहे. जसे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणे झाले आहे. आरोग्यविषयक सुविधांचे जाळे विस्तीर्ण आहे.
► महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2002 नुसार महाराष्ट्र राज्याचा मानव विकास निर्देशांक 0.58 एवढा होता. मराठवाडयातील प्रत्येक जिल्हयाचा आणि राज्यातील काही जिल्हयाचा निर्देशांक सरासरीपेक्षा खूप कमी होता.
► त्यामुळे अति मागासलेल्या जिल्हयांचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राज्य सरकारने 29 जून, 2006 च्या शासन आदेशान्वये महाराष्ट्रा मानव विकास मिशन गठित केले.
► मिशनच्या अंमलाखाली 25 तालुके व महाराष्टातील 12 जिल्हयांचा ज्यांचा मानव विकास निर्देशांक 0.43 पेक्षा कमी आहे, त्यांचा समावेश करण्यात आला.
► मानव विकास निदेशांकांत वाढ होण्याकरिता दरडोई उत्पन्नात वाढ, आरोग्य, दारिद्रय निर्मूलन, शिक्षण सुविधा याकरिता विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
► 2002 मध्ये राज्याने पहिला मानव विकास अहवाल प्रकाशित केला.
► निर्देशांक -
1) आयुर्मान (अर्भक मृत्यू दर)
2) ज्ञानार्जन (साक्षरता दर व शिक्षणाची सरासरी वर्षे)
3) आर्थिक साध्य (दरडोई जिल्हा उत्पन्न)
► महाराष्ट्र सरासरी = 0.58
1) सर्वात कमी मानव विकास : गडचिरोली
2) सर्वात गरीब जिल्हा : धुळे
3) सर्वात श्रीमंत : मुंबई
राज्य मानव विकास अहवाल2012
2012 साली गतिमान, शाश्वत व सर्वसमावेशक वाढ हे तत्व केंद्रीभूत ठेवणार्या अकराव्या व बाराव्या पंचवार्षिक योजनांना समोर ठेऊन महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2012 मध्ये मानव विकासाचे विश्र्लेषण केले. मानव विकास अहवाल 2012 मध्ये मानव विकासासंबंधी राज्याच्या सद्यस्थितीचे विश्लेषण केले आहे, त्याचबरोबर विकासातील असमानता, क्षमता संवर्धन, मानव विकासातील प्रगती, त्यातील कमतरता आणि मानव विकासासाठी उपाययोजना यांचेही विवेचन केले आहे.
► मानव विकासातील सर्वसमावेशकता या तत्वानुसार 5 अंगांनी मानव विकासाचे विश्लेषण केले -
1) स्त्री-पुरुष
2) ग्रामीण-शहरी
3) विभाग
4) सामाजिक गट व
5) उत्पन्न गट
► योजनांचे मूल्यमापन - मानव विकास केंद्रातर्फे अनेक योजनांचे मूल्यमापन केले आहे. त्यापैकी मुलींसाठी सायकलींचे वितरण, शाळांमधील विज्ञान केंद्रे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयांची व्याप्ती वाढवणे, मुलींसाठी बसची व्यवस्था या काही योजना आहेत.
► जिल्हा विकास अहवाल आणि जिल्हा मानव विकास अहवाल - मानव विकास केंद्राने गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा जिल्हा विकास अहवाल तर नागपूर, नंदूरबार, औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचा मानव विकास अहवाल तयार केला.
► महाराष्ट्रातील तालुक्यांचा मानव विकास निर्देशांक - मानव विकास केंद्रामार्फत महाराष्ट्रातील सर्व 356 तालुक्यांचे प्राथमिक सर्वेक्षण करुन त्या आधारावर प्रत्येक तालुक्याचा मानव विकास निर्देशांक काढला आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच संशोधन अभ्यास आहे.
मानव विकास मिशन व आायुक्तालय, औरंगाबाद
राज्यातील 12 अतिमागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता सन 2006 मध्ये महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली. सर्वात कमी मानव विकास निर्देशांक असलेल्या 12 जिल्ह्यातील 25 तालुक्यांत मानव विकास कार्यक्रम राबविण्यात आला. लोकांच्या शिक्षण, आरोग्य, उत्पन्न वाढ यांत सुधारणा करण्यासाठी स्थानिक गरजेनुसार एकात्मिक प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करण्यात आले. या तालुक्यांची निवड करतांना 2001 च्या जनगणनेनुसार तालुक्यातील स्त्री साक्षरतेचे प्रमाण व 2002 च्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबाचे प्रमाण हे दोन निकष विचारात घेण्यात आले. मानव विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर मानव विकास निर्देशांकाची निश्चिती यशवतंराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी म्हणजेच यशदा या संस्थेकडून करण्यात येते.
► 29 जून 2006 : राज्यातील 12 अतिमागास जिल्हयांचा मानव विकास निर्देशांक उंचावण्याकरिता मानव विकास मिशनची स्थापना करण्यात आली.
► 2011-12 पासून मानव विकास कार्यक्रमाची व्याप्ती 22 जिल्हयांतील 125 तालुक्यांपर्यंत वाढविण्यात आली - ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोली.
► 12 जुलै 2012 : मानव विकास कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाची 15 जिल्हयातील ’क’ वर्ग नगरपालिका क्षेत्रात अंमलबजावणी सुरु झाली.
► 4 जानेवारी, 2020 : विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांच्या विशेष निधीतून मागास तालुक्यांमधील मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या प्रस्तावांना राज्यपालांची त्वरित मंजुरी.
► राज्याचे मानव विकास आयुक्त व औरंगाबादचे विभागीय आयुक्त - एस.एम. केंद्रेकर
► उद्दिष्टे : 22 जिल्हयातील 125 तालुके व 15 जिल्हयातील 43 ’क’ वर्ग नगरपालिकांमध्ये मानव विकास निर्देशांक वाढविणे.
मानव विकास मिशन कार्यक्रमाचे आयुक्त -
► अधिकार आणि कार्ये - मानव विकास निर्देशांकाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सनियंत्रण करणे, राष्ट्रीय तसेच आंतर्राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या संस्थांच्या सहकार्याने मानव विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, मानव विकास निर्देशांकाशी निगडित सर्व प्रकारच्या केंद्र व राज्य शासनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी मानव विकास निर्देशांक सुधारण्यासाठी निवडण्यात आलेल्या तालुक्यात प्राथम्याने करणे व अशा प्रकारची अंमलबजावणी केली जात नसेल तर संबंधित विभागास निर्देश देणे
► जिल्हा प्रशासन - कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी हे ’नियंत्रक’ अधिकारी म्हणून काम पाहतील. कामाची अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी जिल्हास्तरीय पुढीलप्रमाणे राहील. जिल्हाधिकारी-अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद- सह अध्यक्ष, संबंधित विभागांचे जिल्हा प्रमुख - सदस्य, जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्हा परिषदेने नामनियुक्त केलेला एक सभापती-सदस्य, एक अशासकीय सेवाभावी संस्था-सदस्य, अग्रणी बँकेचे अधिकारी- सदस्य तर जिल्हा नियोजन अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
► तालुका प्रशासन- तालुका स्तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गट विकास अधिकारी यांची राहील. कार्यक्रमाची अंमलबजावणी व संनियत्रणासाठी तालुकास्तरीय समिती पुढीलप्रमाणे राहील. गट विकास अधिकारी-अध्यक्ष, तहसिलदार किंवा तहसिलदारांनी नामनिर्देशित केलेला नायब तहसिलदार- निमंत्रित सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी-सदस्य, गट शिक्षणाधिकारी-सदस्य, तालुका आरोग्य अधिकारी- सदस्य, एक अशासकीय सेवाभावी संस्था- सदस्य, पंचायत समितीने नामनियुक्त केलेला एक सभासद- सदस्य तर विस्तार अधिकारी (पंचायत) हे सदस्य सचिव असतील.
► गट विकास अधिकारी स्तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्याकरिता व्यवसायिक तज्ञांची आवशयकता विचारात घेता, मागास क्षेत्र अनुदान निधीच्या धर्तीवर कंत्राटी पध्दतीने, वैयक्तिक निवडीद्वारे अथवा व्यवसायिक संस्थांमार्फत आऊटसोर्सिंग पध्दतीने सेवा उपलब्ध करुन घेता येतील.
► विकासाचा त्रिसूत्री कार्यक्रम -
⇒ मानव विकास कार्यक्रमामधून शिक्षण, आरोग्य व बालकल्याण आणि उत्पन्नवाढीच्या योजना असा त्रिसूत्री कार्यक्रम ठरविण्यात आला आहे.
► शिक्षण विकास योजना -
1) इयत्ता 10 वी आणि 12 वी मध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे
2) मोठ्या गावातील माध्यमिक शाळात अभ्यासिका सुरु करण्यासाठी सोलार लाईट व फर्निचर/पुस्तके पुरविणे
3) ग्रामीण भागातील सर्वच मुलींना इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे या करिता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देणे
4) माध्यमिक/उच्च माध्यमिक शासकीय/अनुदानीत शाळांमध्ये प्रयोगशाळांकरिता साहित्य पुरविणे
5) तालुक्याच्या ठिकाणी बालभवन-विज्ञान केंद्र स्थापन करणे.
6) कस्तुरबा गांधी बालिका योजनेची व्याप्ती इयत्ता 10 वी पर्यत वाढविणे.
► आरोग्य व बालकल्याण-
1) तज्ञ महिला डॉक्टरकडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच शून्य ते 6 महिने वयोगटातील बालकांची व मातांची तपासणी करणे आणि औषधोपचार करणे.
2) किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक बाबी व व्यवसाय कौशल्य विकसित करण्याबाबत प्रशिक्षण देणे.
3) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजूरी देणे.
► उत्पन्नवाढीच्या योजना-
1) रेशीम कोष विकसित करण्याकरिता किटक संगोपन गृह बांधणे.
2) फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा सुरु करणे.
3) ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगाराकरिता व्यवसाय कौशल्याचे प्रशिक्षण देणे.
4) स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून परसबाग/किचन गार्डन योजना राबविणे आदींचा समावेश आहे.
► कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम -
⇒ स्त्रीरोग तज्ञांकडुन गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच 0 ते 6 महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा मातांची तपासणी करणे आणि औषधोपचार करणे तसेच 6 महिने ते 2 वर्ष वयोगटातील बालकांची बालरोग तज्ञाकडून तपासणी करणे.
⇒ अ.जा./अ.ज./ दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलेला बुडीत मजुरीपोटी रु. 800 गरोदरपणातील नवव्या महिन्यात देणे. (भंडारा व अमरावती वगळून - या जिल्हयांत इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना लागू आहे.)
⇒ किशोरवयीन मुलींना पौगंडावस्थेतील आरोग्य व जीवन कौशल्ये विकसित करण्याबाबत प्रशिक्षण देणे. (गोंदिया, गडचिरोली, नाशिक, अमरावती, नांदेड, बीड, नागपुर, बुलढाणा वगळून - या जिल्हयांत सबला योजना लागू आहे.)
► अंमलबजावणी पद्धती
⇒ राज्य स्तरावर कार्यक्रमाची अंमलबजावणी व सनियंत्रण आयुक्त मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद हे करतात. जिल्हाधिकारी यांना त्यांच्या जिल्हयांतील मानव विकास कार्यक्रम अंतर्गत येणार्या बाबींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार दिलेले आहे. या कार्यक्रमातील आरोग्य विषयक सेवा ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरी भागात नगरपालिकामार्फत दिल्या जातात. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडून सनियंत्रण केले जाते.
► निधी वितरण
⇒ मानव विकास कार्यक्रमाकरीता निधी वितरीत करताना जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडे निधी वितरीत करतात, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचेकडुन जिल्हा शल्य चिकित्सक यांना निधीचे वाटप केले जाते, त्यांचेकडून वैद्यकीय अधिक्षकांना निधी वितरीत येतो. जिल्हा आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केद्रांना तालुका आरोग्य अधिकार्यांच्या अधिपत्याखाली निधी वितरीत करतात.
► सेवा देणाीया आरोग्य संस्था
⇒ मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिबीरे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय स्तरावर राबविली जातात.
► कार्यक्रमांतर्गत विविध योजना व उपक्रम
⇒ स्त्रीरोग तज्ञांकडुन गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच 0 ते 6 महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा मातांची तपासणी करणे आणि औषधोपचार करणे.
⇒ अ.जा./अ.ज./दारिद्रय रेषेखालील गरोदर महिलेला बुडीत मजुरीपोटी रु. 800/- गरोदरपणातील नवव्या महिन्यात देणे. (भंडारा व अमरावती वगळून - या जिल्ह्यात इंदिरा गांधी मातृत्व अनुदान योजना लागू आहे.)
⇒ किशोरवयीन मुलींना पौगंडावस्थेतील आरोग्य व जीवन कौशल्ये विकसित करण्याबाबत प्रशिक्षण देणे. (गोंदिया, गडचिरोली, नाशिक, अमरावती, नांदेड, बीड, नागपुर, बुलढाणा वगळून इतर जिल्ह्यांत सबला योजना लागू आहे.)
► अंमलबजावणी कालावधी व पद्धती
⇒ प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये प्रत्येक महिन्यात किमान 2 शिबीरे आयोजित करण्यात येतात. शिबीरे आयोजनाबाबतची माहिती सर्व संबधित ग्रामपंचायतींच्या आरोग्य कर्मचारी यांचेमार्फत कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देण्यात येते. शिबीराच्या ठिकाणी स्त्रीरोगतज्ञ आणि बालरोग तज्ञ यांचेकडून लाभार्थ्यांची वैद्यकीय तपासणी व उपचार केले जातात, एक वेळचा अल्पोपहार लाभार्थ्यांना देण्यात येतो. गरोदर मातांचा व 6 महिन्यांपर्यंत स्तनदा मातांचा पाठपुरावा केला जातो. तसेच जोखमीच्या मातांना उपचार व संदर्भीत केले जाते व पाठपुरावा करण्यात येतो.
► देण्यात येणारे लाभ / सेवा
⇒ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी लाभार्थ्यांना ने-आण करण्याकरिता केंद्राच्या वाहनाचा वापर करता येतो. जेथे वाहन उपलब्ध नसेल त्या ठिकाणी वाहने भाडयाने घेणे, स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ यांना मानधन देणे, शिबिरामध्ये लाभार्थ्यांना एक वेळ अल्पोपहार देणे, औषधे व प्रयोगशाळा साहित्य आणि मंडप व्यवस्था याकरीता अनुदान देण्यात येते. अ.जा./अ.ज./दारिद्रय रेषेखालील गरोदर मातांना बुडित मजुरीपोटी रु. 800 गरोदरपणाच्या नवव्या महिन्यात देण्यात येते.
मानव विकास केंद्र, पुणे
2010 साली यशदातील पूर्वीच्या बालहक्क आणि विकास केंद्राचे रुपांतर मानव विकास केंद्रामध्ये झाले.
► उद्दिष्टे -
1) शासनाला धोरणे तयार करण्यासाठी आवश्यक ती माहिती गोळा करुन त्याचे विश्र्लेषण करणे.
2) शासनाच्या सूचनेनुसार सर्वेक्षण घेणे जेणेकरुन मानव विकासाशी संबंधित सांख्यिकी माहितीचे एकत्रीकरण होईल.
3) शिक्षण व आरोग्य या क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, ज्यामुळे राज्याची मानव विकासाची पातळी उंचावेल.
4) राज्याचा आणि जिल्ह्याचा मानव विकास अहवाल तयार करणे.
5) मानव विकासाशी संबंधित योजनांचे मूल्यमापन करणे.
6) मानव विकास केंद्रातंर्गत झालेली प्रमुख कामे
► प्रमुख कार्य -
1) शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षण. प्रशिक्षण गरजा ओळखणे हे काम केंद्रामध्ये केले जाते.
2) ‘विश्लेषणाकडून कृतीकडे’ या तत्वावर मानव विकास केंद्र काम करते.
3) मानव विकासाशी संबंधित निर्देशांकाची सांख्यिकी माहिती गोळा करुन त्याचे विश्लेषण करुन त्यावर आधारित धोरणात्मक कृती कार्यक्रम निश्चित करणे.
प्रश्नमंजुषा (62)
1) मानवी विकास म्हणजे मनुष्याची शारीरिक व बौद्धिक कार्यक्षमता वाढविण्यात आलेले यश होय, ही व्याख्या कोणाची ?
1) पाकिस्तानी अर्थशास्त्रज्ञ मेहबूब उल हक
2) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम
3) सॅम्युएल्सन
4) नोबेल पारितोषिक विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन
2) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) 15 डिसेंबर 2020 रोजी संयुक्त राष्ट्र विकास उपक्रमाने (यूएनडीपी) त्यांचा 20 वा अहवाल प्रकाशित केला.
ब) या अहवालाचे शीर्षक Human Development Report 2020 : The Next Frontier - Human Development and the Anthropocene हे आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
3) खालीलपैकी कोणते विधान ”मानव विकास निर्देशांक ” संदर्भात सत्य आहे?
1) हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
2) हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो.
3) हा निर्देशांक 3 निकष व 4 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
4) हा निर्देशांक 4 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
4) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : 2020 च्या मानव विकास अहवालानुसार बांगला देशातील लैंगिक विषमता भारतापेक्षा कमी आहे.
कारण (र) : भारताचा लिंगाधारित विकास निर्देशांक निर्देशांक 0.820 असून बांगला देशाचा तो 0.904 इतका म्हणजे भारतापेक्षा जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
5) मानव विकास अहवाल 2020 नुसार मानव विकास निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा कोणता क्रमांक होता?
1) 129
2) 133
3) 131
4) 134
6) 2020 च्या अहवालात संयुक्त राष्ट्र विकास उपक्रमाने (यूएनडीपी)ने प्रथमच कशाचा समावेश केला?
अ) प्रदूषणास करणीभूत भौतिक गोष्टींमुळे होणारा परिणाम
ब) वस्तू निर्मितीसाठी वापरलेल्या जीवाशम इंधन, धातू आणि इतर संसाधनांचे प्रमाण मोजले.
क) दरडोई कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण
ड) सर्व ’शाश्वत विकास उद्दिष्टे : 2030’ ची प्रगती
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
7) मानव विकास अहवाल 2020 नुसार खालीलपैकी कोणता देश या निर्देशांकात भारतापेक्षा पुढे नाही?
1) भूतान
2) मालदीव
3) श्रीलंका
4) बांगला देश
8) 2020 च्या मानवी विकास अहवालानुसार खालील जोड्या जुळवा ः
अ (देश) ब (HDI क्रमवारी)
a) चीन i) 19
b) श्रीलंका ii) 85
c) मालदीव iii) 95
d) जपान iv) 72
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (iv) (iii) (ii) (i)
3) (ii) (iii) (iv) (i)
4) (iii) (iv) (i) (ii)
9) जर BRICS देशांची नावे (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका), त्यांच्या मानव विकास निर्देशांकातील 2020 च्या स्थानानुसार (वरच्या स्थानापासून खालच्या स्थानापर्यंत) रचायची झाली, तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे?
1) RBCIS
2) BRCSI
3) SCRBI
4) RBCSI
10) खालीलपैकी कोणते विधान ”लैंगिक असमानता निर्देशांक ” संदर्भात सत्य आहे?
1) हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
2) हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो.
3) हा निर्देशांक 3 निकष व 4 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
4) हा निर्देशांक 4 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
11) 2020 च्या मानव विकास अहवालातील विविध निर्देशांकाबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (निर्देशांक) स्तंभ ब (जागतिक सरासरी)
अ. मानव विकास निर्देशांक (HDI ) I. 0.737
ब. असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI) II. 0.587
क. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) III. 0.943
ड. लैंगिक असमानता निर्देशांक(GII) IV. 0.108
इ. लिंगाधारित विकास निर्देशांक (GDI) V. 0. 436
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड इ
1) II III I V IV
2) I II III IV V
3) III II IV I V
4) V IV III II I
12) कोणत्य संस्थांकडून गोळा केलेल्या विविध माहितीच्या आधारे मानव विकास निर्देशांक मोजला जातो ?
अ) जागतिक बँक
ब) युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन डिव्हीजन
क) युनेस्को
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
13) 2020 च्या मानव विकास अहवालातील विविध निर्देशांकाबाबत खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (निर्देशांक) स्तंभ ब (भारताचा निर्देशांक)
अ. मानव विकास निर्देशांक (HDI) I. 0.488
ब. असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक (IHDI) II. 0. 123
क. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (MPI) III. 0.820
ड. लैंगिक असमानता निर्देशांक (GII) IV. 0.475
इ. लिंगाधारित विकास निर्देशांक (GDI ) V. 0.645
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड इ
1) II III V IV I
2) I V III IV II
3) III II IV I V
4) V IV III II I
14) बहुआयामी दारिद्य निर्देशांक काढताना जीवनमानाचा स्तर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते निर्देशक वापरले जातात?
अ) स्वयंपाकाचे इंधन
ब) पेयजल पुरवठा
क) दरडोई उत्पन्न
ड) अस्वच्छ जमीनीवरील रहिवास
इ) स्वच्छता गृह
फ) दरमहा दरडोई खर्च करण्याची क्षमता
ग) कुटुंबातील सदस्यांची संख्या
ह) मालमत्तेची मालकी
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) ड आणि फ वगळता सर्व
3) क आणि फ वगळता सर्व
4) क, फ, ग वगळता सर्व
15) 2020 च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारताचे शेजारील देश भूतान आणि नेपाळ यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत.
1) 129 वा आणि 133 वा
2) 135 वा आणि 147 वा
3) 133 वा आणि 154 वा
4) 129 वा आणि 142 वा
16) 2020 च्या मानव विकास निर्देशांकानुसार पहिले 5 देशांचा योग्य क्रम लावा.
अ) स्वित्झर्लंड
ब) आयर्लंड
क) हाँगकाँग
ड) नॉर्वे
इ) आईसलँड
पर्यायी उत्तरे :
1) अ - इ - ब - क - ड
2) इ- क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - इ-क
4) ड - ब - अ - क -इ
17) मानव विकास निर्देशांका संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) जेव्हा सरासरी आयुर्मान 85 वर्षे असते तेव्हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 20 वषेर्र् असते तेव्हा निर्देशांक 0 असतो.
ब) जेव्हा दरडोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न हे 75 हजार डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक 1 असतो आणि जेव्हा ते 100 डॉलर असते तेव्हा तो 0 असतो.
क) सरासरी शालेय वर्ष निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 0 वर्ष ते 18 वर्ष या मर्यादेत आहे.
ड) अपेक्षित शालेय वर्ष निर्देशांक काढण्यासाठी न्यूनतम मूल्य व महत्तम मूल्य 0 ते 15 वर्ष या मर्यादेत आहे
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ आणि ब बरोबर
4) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
18) 2020 च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारताचे शेजारील देश बांगला देश आणि पाकिस्तान यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत.
1) 133 वा आणि 142 वा
2) 135 वा आणि 147 वा
3) 133 वा आणि 154 वा
4) 129 वा आणि 147 वा
19) मानव विकास निर्देशांक मोजणीच्या नव्या पद्धतीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
1) मानवी विकास निर्देशांक हा तीन निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो.
2) 0 निर्देशांक म्हणजे मानवी विकास झालेला नाही, तर 1 म्हणजे पूर्ण मानवी विकास होय.
3) मानव विकास निर्देशांक 4 निकष (dimensions) व त्यांच्याशी संबंधित 3 निर्देशक (indicators) यावरून काढला जातो.
4) 4 नोव्हेंबर 2010 नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.
20) 2020 च्या मानव विकास निर्देशांकानुसार शेवटूनच्या 5 देशांचा योग्य क्रम कोणता?
अ) नायजर
ब) मध्य आफ्रिकन रिपब्लिक
क) छाड
ड) दक्षिण सुदान
इ) बुरुंडी
पर्यायी उत्तरे :
1) अ - ब - क - ड - इ
2) इ - क - अ - ड - ब
3) ब - ड - अ - इ - क
4) इ - ड - क - ब - अ
21) खालीलपैकी कोणते विधान ”बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक निर्देशांक ” संदर्भात सत्य आहे?
1) हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
2) हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो.
3) हा निर्देशांक 3 निकष व 4 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
4) हा निर्देशांक 4 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
22) मानव विकास अहवाल 2010 नुसार मानव विकास निर्देशांकाच्या जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा कोणता क्रमांक होता?
1) 119
2) 115
3) 132
4) 134
23) 2013 च्या मानवी विकास अहवालानुसार खालील जोड्या जुळवा :
अ (देश) ब (HDI क्रमवारी)
a) चीन I) 10
b) भारत II) 146
c) पाकिस्तान III) 136
d) जपान IV) 101
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (iv) (iii) (ii) (i)
3) (ii) (iii) (iv) (i)
4) (iii) (iv) (i) (ii)
24) 2014 च्या मानव विकास निर्देशांकानुसार भारत आणि त्याचा शेजारील देश पाकिस्तान यांचे क्रमांक अनुक्रमे असे आहेत.
1) 135 वा आणि 141 वा
2) 126 वा आणि 136 वा
3) 136 वा आणि 146 वा
4) 125 वा आणि 147 वा
25) मानवी विकास निर्देशांकाचे गट आणि या गटात समाविष्ट असणार्या देशांची नावे खाली देण्यात आली आहेत.
योग्य जोड्या जुळवा.
युनिट - I युनिट - II
a) अतिउच्च मानव विकास निर्देशांक (HDI 0.8 आणि च्या वर) I) भारत
b) उच्च मानव विकास निर्देशांक (HDI 0.7 ते 0.8) II) नायजेर
c) मध्यम मानव विकास निर्देशांक (HDI 0.5 ते 0.7) II) ब्राझील
d) निम्न मानव विकास निर्देशांक (HDI 0.5 च्या कमी IV) नॉर्वे
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iii) (i) (ii) (iv)
2) (iv) (iii) (i) (ii)
3) (ii) (iv) (iii) (i)
4) (i) (ii) (iv) (iii)
26) मानवी विकास, 2014 च्या अहवालात मानवी विकास निर्देशांक मूल्यानुसार नार्वे प्रथम क्रमांकावर आहे. या अहवालानुसार संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम संकल्पनेप्रमाणे मानवी विकास निर्देशांक 2013 नुसार भारत 187 राष्ट्रांपैकी 135 व्या क्रमांकावर आहे. मानवी विकास निर्देशांकाचे महत्तम मूल्य काय आहे. जे कोणत्याही राष्ट्राला गाठता आलेले नाही.
1) 1
2) 100
3) 500
4) 1000
27) 2014 च्या मानवी विकास निर्देशांका संदर्भात जुळणी करा:
a) सिंगापूर I) 0.891
b) इस्राईल II) 0.901
c) जपान III) 0.888
d) दक्षिण कोरिया IV) 0.890
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (c)
1) (ii) (iii) (iv) (i)
2) (ii) (i) (iv) (iii)
3) (iii) (i) (ii) (iv)
4) (iv) (ii) (i) (iii)
28) खालीलपैकी कोणते विधान ” असमानता-समायोजित मानव विकास निर्देशांक ” संदर्भात सत्य आहे?
1) हा निर्देशांक 3 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
2) हा निर्देशांक 3 निकष व 10 निर्देशकांच्या सहाय्याने काढला जातो.
3) हा निर्देशांक 3 निकष व 4 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
4) हा निर्देशांक 4 निकष व 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो.
29) 2015 च्या मानव निर्देशांकामधील क्रमवारीप्रमाणे खालील देश आणि त्यांचा क्रमांक अशा योग्य जोड्या जुळवा :
a) भारत I) 188
b) अमेरिका (यु.एस.ए.) III) 131
c) जर्मनी III) 10
d) सेंट्रल अफ्रिकन रिपब्लिक IV) 4
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (iv) (iii) (ii)
2) (ii) (iii) (iv) (i)
3) (iii) (ii) (i) (iv)
4) (iv) (i) (iii) (ii)
30) प्राथमिक मानवी गरजा, कल्याण आणि संधी हे सामाजिक प्रगतीचे निर्देशक आहेत. यासंदर्भात खालील जोड्या जुळवा:
देश सामाजिक प्रगती निर्देशांक (2016)
अ) फिनलँड I. 57.40
ब) चीन II. 53.92
क) भारत III. 90.09
ड) नेपाळ IV. 62.01
अ ब क ड
1) I II IV III
2) II I III IV
3) III IV II I
4) IV III I II
31) UNDP च्या 2011 च्या मानव विकास अहवालात बहुअंगी दारिद्य्र निर्देशांकाचे मापन खालीलपैकी कोणत्या देशांसाठी केलेले होते :
अ) भारत
ब) कोलंबिया
क) केनिया
ड) नायजेरिया
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ, ब आणि क
2) फक्त ब, क आणि ड
3) फक्त अ, क आणि ड
4) फक्त अ, ब आणि ड
32) 2011 या वर्षीच्या मानव विकास निर्देशांक मुल्यांकाच्या उतरत्या क्रमात पुढील देशांची योग्य मांडणी ओळखा -
अ) नार्वे
ब) ऑस्ट्रेलिया
क) चीन
ड) भारत
1) अ, ब, क आणि ड
2) अ, क, ब आणि ड
3) अ, ब, ड आणि क
4) ड, क, ब आणि अ
33) यु.एन्.डी.पी. च्या 2013 च्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार (HDI) पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा.
a) दक्षिण कोरिया
b) जपान
c) अमेरिका
d) नॉर्वे
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (c), (d), (b), (a)
3) (b), (a), (c), (d)
4) (d), (c), (b), (a)
34) UNDP च्या मानव विकास अहवालाप्रमाणे (2009) पुढील दोन विधानांतील कोणते योग्य नाही ?
(भारताची आयु अपेक्षा 63.4 व प्रौढ साक्षरतेची टक्केवारी (2007) 66 होती.)
a) अमेरिका, युके, फ्रान्स, जपान, कॅनडा यांची सरासरी आयु अपेक्षा 2007 मध्ये सुमारे 84 होती.
b) वरील देशात प्रौढ साक्षरता टक्केवारी 2007 मध्ये सुमारे 99 होती.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) केवळ (b)
3) दोन्ही
4) एकही नाही
35) जर BRIC देशांची नावे (ब्राझील, रशिया, भारत आणि चीन), त्यांच्या मानव विकास निर्देशांकातील स्थानानुसार (वरच्या स्थानापासून खालच्या स्थानापर्यंत) रचायची झाली, तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे?
1) RBCI
2) BRCI
3) CRBI
4) RCBI
36) 1995 साली जागतिक पातळीवर प्रकाशित झालेला मानव विकास अहवाल लोकसंख्येच्या ...... समस्येशी संबंधित होता.
a) स्त्री विकास
b) लिंगभेद
c) लोकसंख्या वाढ
d) आरोग्य सुविधा
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) (c), (d)
3) फक्त (b)
4) (a), (c)
37) मानव विकास अहवाल 1995 मध्ये लिंगविषयक दोन नवे निर्देशांक जागतिक पातळीवर प्रथमच लागू करण्यात आले. ते कोणते?
a) लैंगिक असमानता निर्देशांक
b) लिंग संबंधित विकास निर्देशांक
c) लैंगिक सक्षमीकरण मापन
d) लैंगिक तफावत निर्देशांक
वरीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत?
1) (a), (b)
2) (a), (c)
3) (b), (c)
4) (c), (d)
38) मानव विकास अहवाल वर्ष आणि विषय -
a) मानव विकास अहवाल 2001 - सहस्रादी विकास लक्ष : गरिबी हटविण्यासाठी राष्ट्रांमध्ये सामंजस्य
b) मानव विकास अहवाल 2006 - तुटवड्यांच्या पलीकडे : ऊर्जा, गरिबी आणि वैश्विक जल संकट
c) मानव विकास अहवाल 2008 - अडचणीवर विजय : मानव गतिशीलता आणि विकास
d) मानव विकास अहवाल 2003 - दक्षिणेचा उदय : विविधता पूर्ण विश्वामध्ये मानव विकास
वरीलपैकी कोणते पर्याय बरोबर आहेत?
1) (a) व (c)
2) (b), (c) व (d)
3) (b) व (d)
4) सर्व बरोबर आहेत.
39) कुठले विधान बरोबर आहे?
अ) मानवी विकास निर्देशांकाच्या (HDI) जागतिक क्रमवारीत 2000 साली भारताचा 124 वा क्रमांक होता, तिथून घसरून 2004 मध्ये तो 126 वा झाला.
ब) या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली वाढ नोंदविली.
क) श्रीलंका 2004 साली 89 व्या, अर्थात भारतापेक्षा खूप वरच्या क्रमांकावर होती.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ब आणि क
4) सर्व वाक्ये/विधाने बरोबर आहेत
40) UNDP जागतिक विकास अहवाल 2010 नुसार मानवी विकास निर्देशांकामधील घटक कोणते?
1) अपेक्षित जीवन निर्देशांक, शैक्षणिक निर्देशांक आणि उत्पन्न निर्देशांक.
2) अपेक्षित जीवन निर्देशांक, शैक्षणिक निर्देशांक आणि स्थूल स्वदेशी उत्पादन निर्देशांक
3) अपेक्षित जीवन निर्देशांक, साक्षरता निर्देशांक आणि उत्पन्न निर्देशांक
4) अपेक्षित जीवन निर्देशांक, शैक्षणिक निर्देशांक आणि नामधारी उत्पन्न निर्देशांक
41) जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाला (2010) बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
a) विकसनशील अर्थव्यवस्थेखाली विश्वाची सुमारे 83% लोकसंख्या आहे व ती जगाच्या सुमारे 38% स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आय दर्शविते.
b) युरोपातील काही देश विकसनशील अर्थव्यवस्था दर्शवितात.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) केवळ (b)
3) दोन्ही
4) एकही नाही
42) खालील विधाने विचारात घ्या :
a) संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांक अहवाल (2013) नुसार 187 देशापैकी भारताचा 136 वा क्रमांक आहे.
b) या अहवालानुसार अमेरिकेचा प्रथम क्रमांक आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b)
4) यापैकी नाही
43) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने 14 मार्च, 2013 रोजी मनुष्य विकास निर्देशांकानुसार देशांची यादी सादर केली. 187 देशांमधून भारताचा क्रमांक 136 वा आहे. खालीलपैकी कोणत्या निकषांचा वापर क्रमवारी ठरविण्यासाठी केला गेला?
a) ज्ञानाची सुगमता
b) लिंग गुणोत्तर
c) आयुर्मानातील वृद्धी
d) दरडोई राष्ट्रीय स्थूल उत्पन्न
पर्यायी उत्तरे :
1) (b), (c) आणि (d)
2) (a), (b) आणि (d)
3) (a), (b) आणि (c)
4) (a), (c) आणि (d)
44) पुढील दोन विधानांपैकी कोणते आहे ?
a) यू.एन.डी.पी. च्या (2014 च्या) मानव विकास अहवालानुसार, लिंगभेद निर्देशांकानुसार 152 देशांमध्ये भारताचा 127 वा क्रमांक लागतो.
b) त्याच अहवालानुसार मानव विकास निर्देशांकात भारत 187 पैकी 165 वा आहे.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) केवळ (b)
3) दोन्ही
4) एकही नाही
45) सन 2014 च्या मानवी विकास अहवालानुसार :
a) नॉर्वे या देशाचे मानवी विकास निर्देशांक मूल्य हे सर्वाधिक आहे.
b) भारताची मानवी विकास निर्देशांक श्रेणी श्रीलंकेपेक्षा वरची आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b) दोन्हीही चूक आहेत
2) (a) आणि (b) दोन्हीही बरोबर आहेत
3) (a) बरोबर तर (b) हे चुकीचे विधान आहे.
4) (a) चूक तर (b) हे बरोबर विधान आहे.
46) मानवी विकास निर्देशांक - 2018 च्या अहवालाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
a) ती आयुर्मान, शिक्षण आणि उत्पन्न याची समग्र आकडेवारी आहे.
b) 2018 च्या मानवी विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक 130 वा आहे.
c) नेदरलँडस, सिंगापूर, स्वीडन, हाँगकाँग, आईसलँड यांची क्रमवारीत आघाडी आहे.
d) नायजेर, द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, साऊथ सुदान, चाड आणि बुरुंडी यांचे मानवी विकास निर्देशांकात सर्वात कमी गुण आहेत.
वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
1) (a), (b), (c)
2) (a), (b), (d)
3) (b), (c), (d)
4) वरील सर्व
47) मानवी विकास निर्देशांक हा मानवी विकासाची प्रमुख परिमाणे मोजणार्या ...... निर्देशांकांवर आधारित आहे.
1) चार
2) तीन
3) पाच
4) सहा
48) खाली काही अर्थशास्त्रज्ञांची नावे दिली आहेत :
a) ए. के. सेन
b) जेकब वायनर
c) मेहबूब-उल-हक
d) आर, नर्कस्
या नावांपैकी कोणती नावे ”मानवी विकास”या संज्ञेशी जोडली गेली आहेत?
1) (a) आणि (c)
2) (b) आणि (c)
3) (b) आणि (d)
4) (a) आणि (d)
49) मानव विकास निर्देशांकाची संकल्पना कोणी मांडली ?
1) डॉ. मेहबूब उल हक आणि डॉ. अमर्त्य सेन
2) पी. चिदंबरम् आणि यशवंत सिन्हा
3) डॉ. मनमोहन सिंग व नरसिंहराव
4) वरीलपैकी कोणीही नाही
50) खालीलपैकी कोणते सहस्रक विकास ध्येय नाही?
1) अतिगरिबी आणि भूख यांचे उच्चाटन
2) सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता
3) बालमृत्यूदर कमी करणे
4) कृषी शाश्वतता साध्य करणे
51) मानवी विकास ही .............. ची प्रक्रिया आहे.
1) दरडोई उत्पन्न वाढ
2) लोकांची निवड विस्तुत करणे
3) स्थूल राष्ट्रीय उत्पन्न वाढ
4) वरील सर्व
52) 2010 पासून मानवी विकास निर्देशांक (HDI) ची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणार्या सामान्य निर्देशांकाचे ........... अशी केली जाते.
1) गणित मध्य
2) भूमितीय मध्य
3) मध्यम मध्य
4) बहुलक मध्य
53) मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो.
अ) दीर्घ आणि निरोगी आयुष्य.
ब) प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान.
क) दारिद्य्र रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी.
1) वरील सर्व अ, ब आणि क
2) अ आणि क फक्त
3) ब आणि क फक्त
4) अ आणि ब फक्त
54) संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमा मार्फत मानवी विकासाचे मोजमापन मानवी विकास निर्देशांकानुसार केले जाते. ते आहेत :
a) मानवी विकास निर्देशांक
b) मानवी दारिद्य्र निर्देशांक
c) स्थूल विकास निर्देशांक
d) लिंग संबंधी विकास निर्देशांक
वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत ?
1) फक्त (c)
2) फक्त (d)
3) (c) व (d)
4) वरीलपैकी एकही नाही.
55) 1990 मध्ये अवलंबलेला मानवी विकास निर्देशांक हा अंतिम विकासाच्या तीन फळांवर आधारित होता. ही तीन फळे खालीलपैकी कोणती?
1) दीर्घायुष्य, शाश्वतता आणि राहणीमानाचा दर्जा
2) शाश्वतता, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा
3) राहणीमानाचा दर्जा, साक्षरता आणि आर्थिक विकास.
4) दीर्घायुष्य ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा
56) मानव विकास निर्देशांक (HDI) विषयीच्या पुढील विधानांपैकी सत्य विधाने कोणती आहेत?
र) HDI दाखवतो की आर्थिक वृद्धी ही विकासाचे एक साधन आहे पण केवळ एकमात्र साधन नाही.
ल) कोणत्याही देशाचा विकासाचा अंतिमतः निकष म्हणून मानवाच्या निवडींचा अवकाश विस्तारण्यावर HDI ने भर दिला आहे.
ल) मानव सुरक्षा आणि सक्षमीकरणासंबंधी HDI मध्ये प्रतिबिंबीत होत नाहीत.
व) असमानता आणि दारिद्य्र HDI मध्ये प्रतिबिंबीत होत नाहीत.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (a), (b), (c)
3) (a), (b), (d)
4) (a), (d)
57) जागतिक मानव विकासात देशाची क्रमवारी ठरवितांना खालीलपैकी कोणत्या घटकाचा आधार घेतला जातो ?
a) दरडोई उत्पन्न
b) शिक्षण
c) रोजगार संधी
d) आरोग्य सुविधा
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b)
2) (b),(c)
3) (a), (d)
4) वरीलपैकी सर्व
58) मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकाचा वापर होत नाही?
1) साक्षरता दर
2) दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न
3) जन्माच्यावेळी जगण्याचा दर
4) कृषी उत्पादकता
59) संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमा मार्फत मानवी विकासाचे मोजमापन मानवी विकास निर्देशांकानुसार केले जाते. ते आहेत :
a) मानवी विकास निर्देशांक
b) मानवी दारिद्य्र निर्देशांक
c) स्थूल विकास निर्देशांक
d) लिंग संबंधी विकास निर्देशांक
वरीलपैकी कोणता/ते पर्याय चुकीचा/चे आहे/आहेत ?
1) फक्त (c)
2) फक्त (d)
3) (c) व (d)
4) वरीलपैकी एकही नाही.
60) मानवी दारिद्य्र निर्देशांकाचे मोजमापन खालील निकषाच्या आधारे केले जाते :
1) दीर्घ, आयुर्मान, आहार आणि ज्ञान
2) ज्ञान, मूलभूत गरजा आणि राहणीमानाचा दर्जा
3) दीर्घ आयुर्मान, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा
4) दीर्घ आयुर्मान, राहणीमानाचा दर्जा आणि आरोग्य व्यवस्था
61) मानव विकास निर्देशांकाचे (HDI) मूलभूत तीन घटक पुढील पैकी कोणते?
1) जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर-स्थूलशिक्षण प्रवेश दर (GER) आणि दरडोई स्थूल राष्ट्रीय उत्पादन-GDP
2) आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणावरील खर्च
3) दारिद्य्र रेषेखालील लोकसंख्या, दारिद्य्र रेषेवरील लोकसंख्या आणि निवासाची व्यवस्था
4) सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर व राष्ट्रीय उत्पन्न
62) मूलभूत मानवी क्षमतांमधील सरासरी वाढ मोजण्यासाठी मानवी विकास निर्देशांक सूत्रणाचे आधार कोणते?
a) दिर्घायुचे निर्देशक
b) शिक्षण प्राप्ती
c) उत्पन्नाचा स्तर
d) सभ्य राहणीमानाचा दर्जा
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे?
1) (b) आणि (c) फक्त
2) (a), (b) आणि (d) फक्त
3) (a) आणि (c) फक्त
4) (c), (d) आणि (a) फक्त
63) खालीलपैकी कोणता एक निर्देशांकाचा (मानव विकास निर्देशांक) घटक नाही ?
1) अपेक्षित आयुष्यमान
2) रस्ते व ग्रामीण विकास
3) साक्षरता
4) बालमृत्यू
64) मानवी विकास निर्देशांक खालील/पुढील तीन निर्देशांक मिळून तयार होतो ......
1) आयुर्मान, ज्ञान, एकूण लोकसंख्या
2) आयुर्मान, ज्ञान, जीवनमान
3) वय, ज्ञान, दरडोई खर्च
4) प्रौढ साक्षरता प्रमाण, ज्ञान, जीवनमान
65) मानवी विकास निर्देशांक (HDI) विकासासंबंधी खालील सरासरी प्राप्त मूलभूत बाबी निर्देशकांचे मोजमाप करण्यासाठी विचारात घेतो :
अ) सरासरी आयुर्मानावर आधारित दीर्घ आणि सुदृढ जीवन
ब) साक्षरतेवर आधारित ज्ञान
क) राहणीमानाचा चांगला दर्जा
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ब आणि क
4) अ,ब आणि क
66) मानव विकास निर्देशांक हा ........ वर आधारित आहे.
1) दरडोई उत्पन्न
2) दरडोई उत्पन्न, सरासरी आयुमर्यादा आणि प्रौढ साक्षरता
3) सरासरी आयुमर्यादा, प्रौढ साक्षरता आणि संयुक्त प्रवेशदर
4) सरासरी आयुमर्यादा, प्रौढ साक्षरता, संयुक्त प्रवेशदर, आणि वास्तव स्थूल राष्ट्रीय उत्पादन
67) मानवी विकास निर्देशांकाची संकल्पना खालीलपैकी कोणत्या तीन चलघटकांवर आधारित आहे?
1) दरडोई उत्पन्न, साक्षरता दर आणि लिंग समभाव
2) लिंग समभाव, अपेक्षित आयुर्मर्यादा आणि प्रौढ साक्षरता
3) अपेक्षित आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता आणि दरडोई उत्पन्न
4) अपेक्षित आयुर्मर्यादा, प्रौढ साक्षरता आणि दरडोई उत्पन्न
68) 2011 च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्य्र निर्देशांकाचा जो अंदाज सादर केला होता, त्या अहवालानुसार या देशांतील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्य्र अनुभवीत होते?
1) 1/2
2) 1/3
3) 1/4
4) 1/5
69) सामाजिक विकास सूचकांक 2014 च्या यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे?
1) 85
2) 92
3) 102
4) 105
70) ’जागतिक आनंदी अहवाल-2016‘ नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता ?
1) स्वीडन
2) डेन्मार्क
3) स्वित्झर्लंड
4) भूतान
71) विकासाचे निर्देशांक कोणते?
अ) उत्पन्न निर्देशांक
ब) उत्पन्नेतर निर्देशांक
क) सामाजिक आणि राजकीय विकास निर्देशांक
ड) मानवी विकास निर्देशांक
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1) अ फक्त
2) अ आणि ब फक्त
3) अ, ब आणि क
4) अ, ब आणि ड
72) योग्य पर्याय निवडा :
मानवी दारिद्य्र निर्देशांक मापनाच्या संदर्भात :
a) दीर्घ व निरोगी आयुष्य
b) ज्ञान आणि माहिती
c) योग्य राहणीमान
d) सामाजिक विशेष
पर्यायी उत्तरे :
1) (a) व (b) योग्य
2) (a) व (b) अयोग्य
3) (a), (b) आणि (c) योग्य
4) केवळ (c) आणि (d) बरोबर
73) भारत देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण जबाबदारी असणार्या बिनशासकीय संस्थांसाठी नीती आयोगाने उपलब्ध केलेल्या पोर्टलचे नाव काय?
1) एन.जी.ओ. - दर्पण
2) एन.जी.ओ. - ऑनलाईन
3) एन.जी.ओ. - अपडेट
4) एन.जी.ओ. - डेव्हलपमेंट
74) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
a) मानवी दारिद्य्र निर्देशांक हा सर्वप्रथम सन 1997 च्या मानवी विकास अहवालात प्रस्तुत केला गेला.
b) सर्व राज्यात केरळ, महाराष्ट्र, पंजाब व हरियाणा ही सर्वात उच्च मानवी विकास निर्देशांक असलेली पहिली चार राज्ये आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) केवळ (b)
3) दोन्ही
4) एकही नाही
75) अजेंडा-21’ (Agenda-21) ची योग्य व्याख्या लक्षण कोणते ?
1) युनोच्या मानवाधिकार संरक्षणासाठी असलेला कृती आराखडा.
2) 21 व्या शतकातील जागतिक पर्यावरणाच्या संधारणाचा कृती आराखडा.
3) आण्विक निःशस्त्रीकरणावरील 21 प्रकरणांचे पुस्तक.
4) सार्कच्या पुढील सभेमधील अध्यक्षांच्या निवडणुकीसाठीची विषय पत्रिका
76) अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी. यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती ? खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
1) उपजीविका, स्वत:बद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार/हक्क
2) आरोग्य, भरणपोषण, शिक्षण, क्षमता, अधिकार/हक्क
3) अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता
4) राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दर डोई उत्पन्न, मूलभूत गरजा, स्वातंत्र्य, शिक्षण
77) खालील विधाने विचारात घ्या :
a) 2016 साली जागतिक अर्थ परिषदेने (WEF) जाहीर केलेल्या जगातील राहण्यायोग्य 60 सर्वोत्तम देशांच्या प्रारंभिक यादीमध्ये भारताचा 22 वा क्रमांक आहे.
b) सदरहू यादी ही स्थिरता, सांस्कृतिक प्रभाव, उद्योजकता, आर्थिक प्रभाव आणि जीवनशैली यावर आधारित तयार करण्यात येते.
c) या यादीमध्ये स्विडनला सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.
d) या यादीमध्ये जर्मनीचा दुसरा क्रमांक आहे.
1) फक्त (a)
2) (a) आणि (b)
3) (a), (b), आणि (c)
4) (b), (c), आणि (d)
78) 2000 साली स्वीकारलेल्या सहस्रक विकास उद्दिष्टांमध्ये याचा समावेश आहे ः
a) दारिद्य्र आणि उपासमारीचे निर्मूलन
b) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण
c) सर्वांना विनामूल्य आणि सुरक्षित पेयजल
d) पर्यावरण निरंतरता
पर्यायी उत्तरे ः
1) (a) फक्त
2) (a), (b) आणि (d)
3) (c) फक्त
4) वरील सर्व
79) 1996 आणि 2006 मध्ये भारतासाठी लिंगसंबंधित विकास निर्देशांकाचे परिगणन केले होते. दोन्ही वर्षांमध्ये सर्वाधिक दर असलेली केवळ तीनच राज्ये/केंद्रशासित प्रदेश होते. ही राज्ये/केंद्रशासित प्रदेश कोणते?
1) चंदिगड, दिल्ली आणि महाराष्ट्र
2) गोवा, केरळ आणि आंध्रप्रदेश
3) केरळ, चंदिगड आणि गोवा
4) दिल्ली, गोवा आणि कर्नाटक
80) लिंग सक्षमीकरण मापन (GEM) यासाठी कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात?
अ) महिलांचा आर्थिक सहभाग
ब) महिलांचा शिक्षणातील सहभाग
क) महिलांचा राजकीय सहभाग
ड) महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग
पर्यायी उत्तरे :
1) (अ) आणि (ड) फक्त
2) (अ), (ब) आणि (ड)
3) (अ), (क) आणि (ड)
4) (अ) आणि (क) फक्त
81) लिंगसापेक्ष विकास निर्देशांकात (GDI) कोणत्या पैलूंचा विचार केला जातो ?
a) स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान
b) स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळामधील नावनोंदणी गुणोत्तर
c) स्त्रियांचे दरडोई उत्पन्न
d) शेतात काम करणार्या स्त्रियांची टक्केवारी
पर्यायी उत्तरे :
1) (a),(b),(d)
2) (a),(b),(c)
3) (b),(c),(d)
4) (a),(b),(c),(d)
82) लिंग असमानता निर्देशांकामध्ये (GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो?
1) प्रजनन स्वास्थ्य
2) सबलीकरण
3) श्रम बाजार
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ आणि ब
2) फक्त ब आणि क
3) फक्त ब
4) अ, ब, क आणि ड
83) मानवी विकास अहवाल - 1995 मध्ये लिंग सक्षमीकरण परिमाण ही संज्ञा विकसित करण्यात आली. ही संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते ?
1) स्त्रियांचे आयुर्मान अधिक आहे काय ?
2) स्त्रियांच्या साक्षरतेच्या आणि रोजगारीचा दर अधिक आहे काय ?
3) लिंग दर हा स्त्रियांच्या बाजूने आहे काय ?
4) स्त्रिया आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेऊ शकत आहेत काय ?
84) खालीलपैकी कोणती संज्ञा स्त्रियांची आर्थिक आणि राजकीय जीवनात सहभाग क्षमता मोजते ?
1) लिंग सशक्तीकरण मोजमाप
2) लिंग संबंधित विकास निर्देशांक
3) बहुआयामी दारिद्य्र निर्देशांक
4) मानवी विकास निर्देशांक
85) खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या संधीवर लक्ष केंद्रित करते?
1) मानव विकास निर्देशांक
2) मानव दारिद्य्र निर्देशांक
3) लिंगभाव सबलीकरण मापन
4) दारिद्य्र तफावत निर्देशांक
86) स्त्री सक्षमीकरण म्हणजे काय?
1) स्त्रियांची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारणे
2) स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण सुधारणे
3) स्त्रियांना रोजगारसंधी पुरविणे
4) स्त्रियांचा आर्थिक सहभाग वाढविणे
87) पुनरुत्पादी आरोग्य, सशक्तीकरण आणि श्रमबाजारात सहयोग या स्त्रियांविषयक तीन महत्त्वाच्या परिमाणांना सामावून घेणारा निर्देशांक खालीलपैकी कोणता ?
1) लिंग सशक्तीकरण निर्देशांक
2) लिंग समानता निर्देशांक
3) लिंग असमानता निर्देशांक
4) लिंगविषयक मानवी विकास निर्देशांक
88) लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांविषयीच्या ज्या तीन परिमाणांचा समावेश होतो ती म्हणजे -
1) सरासरी आयुर्मान, शैक्षणिक यशप्राप्ती आणि उत्पन्न/मिळकत
2) शिक्षण, आर्थिक सहभाग आणि आर्थिक संसाधनांची मालकी
3) जननक्षम आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रमबाजारातील सहभाग
4) वरीलपैकी एकही नाही
89) तिसरी नैरोबी जागतिक परिषद कशासाठी आयोजित केली गेली होती?
अ) संयुक्त राष्ट्रांच्या महिला दशकाचा मूल्यन व आढावा घेण्यासाठी तसेच समानता, विकास व शांततेसाठी.
ब) स्त्रियांविरुद्धच्या अत्याचाराचे उच्चाटन करण्यासाठी.
क) राष्ट्रीय स्तरावर स्त्रियांना सर्वोच्च पातळी गाठण्याकरिता विशिष्ट प्रक्रिया/प्रणाली तयार करण्यासाठी.
ड) संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ पदांवर महिलांची नियुक्ती करण्यासाठी प्रक्रिया/प्रणाली विकसित करणे.
1) (अ) फक्त
2) (अ) आणि (ब) फक्त
3) (ब), (क) आणि (ड)
4) (अ), (ब) आणि (ड)
90) मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ...... पेक्षा जास्त आहे.
1) 0.3
2) 0.5
3) 0.9
4) 0.8
91) 2001 च्या राष्ट्रीय मानव विकास अहवालानुसार भारताचा एकत्रित मानव विकास निर्देशांक (HDI) 2001 साली किती होता?
1) 0.52%
2) 0.47%
3) 0.44%
4) 0.60%
92) खालील जोड्या जुळवा :
मानव विकास स्तर राज्य
a) उच्च आर्थिक वृद्धी व मंद मानव विकास i) राजस्थान
b) उच्च मानव विकास पण सापेक्षतेने कमी उत्पन्न ii) केरळ
c) मध्यम आर्थिक व मानव विकास iii) पश्चिम बंगाल
d) अपुरा आर्थिक व मानव विकास iv) बिहार
अ ब क ड
1) (i) (ii) (iv) (iii)
2) (ii) (i) (iv) (iii)
3) (ii) (i) (iii) (iv)
4) (i) (ii) (iii) (iv)
93) मानवी विकास निर्देशांकानुसार खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांक पटकावते ?
1) महाराष्ट्र
2) चंदिगड
3) केरळ
4) वरीलपैकी कोणतेही नाही
94) 2012 च्या सर्वेक्षणात मानव विकास निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?
1) पहिला
2) दुसरा
3) तिसरा
4) चौथा
95) 2007-09 या काळात ....... या राज्यांत प्रसूती सामग्री माता मृत्यूदर 100 पेक्षा कमी होता.
a) केरळ
b) तामिळनाडू
c) महाराष्ट्र
d) गुजरात
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) (a) फक्त
3) (a), (b), (c) आणि (d)
4) (a) आणि (c)
96) किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे ...... शी संबंधित आहे.
1) नेहरू - गांधी प्रतिमान
2) गांधी प्रतिमान
3) नव - गांधी प्रतिमान
4) मार्क्स प्रतिमान
97) महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2002 प्रमाणे पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
a) मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यानंतर ठाणे सर्वात अग्रगणी आहे.
b) गडचिरोली जिल्हा सर्वात खाली असून जालना खालून दुसर्या क्रमांकावर आहे.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a)
2) केवळ (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) एकही नाही
98) महाराष्ट्र मानव विकास कार्यक्रम विषयक विधाने लक्षात घ्या व अचूक उत्तर द्या?
a) महाराष्ट्रातील अतिमागास जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक उंचविण्यासाठी हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
b) महाराष्ट्र शासनाने जून 2005 मध्ये महाराष्ट्र मानव विकास मिशनची स्थापना केली.
c) महाराष्ट्र मानव विकास अहवालानुसार महाराष्ट्रातील 12 अतिमागास जिल्ह्यांसाठी या कार्यक्रमाचा प्रारंभ केला.
d) याअंतर्गत मानव विकासासाठी तालुका हा घटक मानण्यात आला.
e) याअंतर्गत मानव विकासासाठी जिल्हा हा घटक निर्धारित करण्यात आला.
पर्यायी उत्तरे ः
1) (a), (b), (c), (e) अचूक तर (d) चूक
2) (a), (c), (e) अचूक तर (b), (d) चूक
3) (a), (c), (d) अचूक तर (b), (e) चूक
4) वरील सर्व अचूक
99) आर. बी. आय. गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखालील गटाने नुकताच राज्यांसाठी नवा विकास निर्देशक सुचविला आहे. त्यानुसार राज्यांनी विविध प्रकारात वर्गवारी केली आहे. खालीलपैकी कोणता वर्गप्रकार त्यात समाविष्ट नाही?
1) अत्यल्प विकसित
2) अल्प विकसित
3) तुलनात्मकदृष्टीने विकसित
4) पूर्णपणे विकसित
100) पुढीलपैकी कोणत्या पर्यायांचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाच्या मिल्लेनियम डेव्हलपमेंट गोल्स (MDGs) मध्ये होतो.
a) आत्यंतिक गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन
b) सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे
c) विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे
d) बाल मृत्यूदर कमी करणे
e) HIV / AIDS, मलेरिया आणि इतर आजारांशी सामना करणे
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d), (e)
2) (a), (b), (c)
3) (b), (d), (e)
4) (a), (c), (e)
101) टिकाऊ सातत्यपूर्ण विकासाची 2030 ची कार्यक्रम पत्रिका संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशानी 2015 मध्ये स्वीकृत केली ज्या द्वारे लोकांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. यात 17 टिकाऊ विकास ध्येये अंतर्भूत आहेत. खालील कोणते गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देते ?
1) ध्येय 8
2) ध्येय 4
3) ध्येय 2
4) ध्येय 12
102) भारताच्या सहस्रक विकास उद्दिष्टांच्या चौकटीमध्ये सर्व ...... उद्दिष्टांचा ...... लक्ष्यांचा आणि संबंधित ...... निर्देशकांचा समावेश होतो.
1) 8, 21, 60
2) 8, 11, 18
3) 8, 12, 35
4) 8, 18, 53
103) संयुक्त राष्ट्र आणि जागतिक समुदाय सहस्रकातील विकासाची पुढीलपैकी कोणती ध्येये गाठण्यासाठी वचनबद्ध होती?
1) दारिद्य्र आणि उपासमारीचे निर्मूलन
2) जगभरात प्राथमिक शिक्षणाचे ध्येय साध्य करणे.
3) स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरणाला इ. स. 2015 पर्यंत बळकटी देणे.
4) वरील सर्व
104) खालीलपैकी कोणते ‘सहस्रकीय विकासाचे’ ध्येय नाही?
1) वैश्विक प्राथमिक शिक्षण प्राप्ती साध्य करणे.
2) लोकसंख्या वाढीच्या वेगात घट साध्य करणे.
3) मातेचे आरोग्य सुधारणे.
4) पर्यावरणाच्या शाश्वत विकासाची खात्री करणे.
105) विषमता कमी करणे ...... याचे उद्दिष्ट नाही.
a) मिल्लेनियम डेव्हलपमेंट गोल्स
b) सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स
c) नियोजन उद्दिष्ट्ये
d) जागतिक व्यापार संघटना
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) फक्त (d)
3) (c) आणि (d)
4) फक्त (c)
106) खालील विधाने सहस्रकातील विकासाच्या (स. वि. उ.) संदर्भातील आहेत -
a) संयुक्त राष्ट्रांची स.वि.उ.ची पूर्तता 2015 पर्यंत करायची होती.
b) स.वि.उ. चे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणार्यांची संख्या निम्म्याने कमी करणे.
c) मुक्त आणि रास्त व्यापार.
d) एकूण आठ स. वि. उ. आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) वरील सर्व
2) (a), (b) आणि (c)
3) (a), (c) (d)
4) (a), (b) व (d)
107) खालील विधाने विचारात घ्या -
a) संयुक्त राष्ट्रांची एकूण आठ सहस्रक विकास उद्दिष्टे आहेत जी सर्व 181 सभासदांनी 2015 पर्यंत गाठण्याचे ठरविले आहे.
b) सहस्रक विकास (MDGs) उद्दिष्टांपैकी चार उद्दिष्टे प्रत्यक्षपणे आरोग्याशी संबंधित आहेत.
वरील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे?
1) केवळ (a)
2) केवळ (b)
3) कोणतेही नाही
4) दोन्हीही
108) खालीलपैकी कोणते विधान ’सहस्रक विकास ध्येयाला’ लागू पडत नाही?
a) गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन
b) सार्वत्रिक उच्च शिक्षण मिळवणे
c) बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे
d) आरोग्यपूर्ण मातृत्व
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (b)
2) (a) आणि (b)
3) वरील सर्व
4) फक्त (d)
109) जून 2012 मध्ये Rio + 20 घोषणापत्रा संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट्ये (SDGs) ठरविण्यात आली. त्यानुसार पुढीलपैकी कोणते/कोणती वैशिष्ट्य/वैशिष्ट्ये ठरविण्यात आलेले नव्हते ?
अ) गरिबीचे उच्चाटन, असमानतेविरुद्ध संघर्ष, लिंगभाव समानता.
ब) आरोग्य व शिक्षण सुधारणा, महासागर व जंगल रक्षण
क) अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी, पाठपुरावा आणि समीक्षासाठी प्रभावी संरचना विकास
पर्यायी उत्तरे :
1) फक्त क आणि ड
2) फक्त अ, ब आणि क
3) फक्त ड
4) फक्त अ
उत्तरे : प्रश्नमंजुषा (62)
1-3
2-2
3-3
4-1
5-3
6-1
7-4
8-3
9-4
10-1
11-2
12-4
13-4
14-4
15-4
16-4
17-3
18-3
19-3
20-4
21-2
22-1
23-2
24-3
25-2
26-1
27-1
28-3
29-2
30-3
31-2
32-1
33-4
34-1
35-1
36-3
37-3
38-3
39-4
40-1
41-2
42-1
43-4
44-1
45-3
46-2
47-2
48-1
49-1
50-4
51-2
52-2
53-4
54-1
55-4
56-1
57-4
58-4
59-1
60-3
61-1
62-2
63-2
64-2
65-4
66-4
67-3
68-2
69-3
70-2
71-4
72-3
73-1
74-1
75-2
76-1
77-2
78-2
79-3
80-3
81-2
82-4
83-4
84-1
85-3
86-1
87-3
88-3
89-1
90-4
91-2
92-4
93-3
94-4
95-1
96-2
97-1
98-3
99-3
100-1
101-2
102-3
103-4
104-2
105-2
106-4
107-3
108-1
109-3