महाराष्ट्राचा इतिहास : (2) महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट व प्रशासन - प्रश्नपुस्तिका (130)
- 14 May 2021
- Posted By : study circle
- 5182 Views
- 11 Shares
महाराष्ट्राचा इतिहास : (२) महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट व प्रशासन
१) महसूल व पोलीस प्रशासकीय यंत्रणा
२) न्यायालयीन यंत्रणा
३) रेल्वे व दळणवळण
४) रस्तेविकास
५) नगररचना व इमारती
६) जमीन महसूल पद्धती
७) व्यापारकेंद्रे व वसाहती
८) लष्कर प्रशासन
९) इंग्रजांचा स्थानिक राजवटीशी संघर्ष व युद्धे
१. बंगालमधील युद्धे
२. कर्नाटक युद्धे
३. अँग्लो-म्हैसूर युद्धे
४. शीख राजवट
१०) लॉर्ड कॉर्नवॉलिस
११) लॉर्ड वेलस्ली व तैनाती फौज पद्धत
१२) लिॉर्ड विल्यम बेंटिक
१३) लॉर्ड डलहौसी व संस्थान खालसा धोरण
१४) लॉर्ड लिटन
१५) लॉर्ड रिपन
१६) लॉर्ड कर्झन
१७) ब्रिटिशांचे फोडा आणि झोडा धोरण
महसूल व पोलीस यंत्रणा
१) भारतात कोणत्या साली जिल्हाधिकार्यांचे पद निर्माण करण्यात आले ?
१) १७७१
२) १७७४
३) १७७२
४) १७७७
२) ...... यांनी १७७२ साली जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली.
१) वॉरन हेस्टींग्ज
२) सर जॉर्ज कॅम्पबेल
३) एल्फिन्स्टन
४) लॉर्ड रिपन
३) खालीलपैकी कोणी भारतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली?
१) लॉर्ड कॉर्नवालीस
२) वॉरेन हेस्टिंग्ज
३) सायमन कमिशन
४) सर चार्लस मेटकाफ
४) कॉर्नवॉलिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले ?
१) मुलकी पाटील
२) दरोगा
३) जिल्हाधिकारी
४) तलाठी
५) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
१) रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था
२) लॉर्ड कॉर्नवालिस - मुलकी नोकरशाहीची निर्मिती
३) लॉर्ड मेकॉले - राज्य खालसा धोरण
४) लॉर्ड बेटिंक- सतीबंदिचा कायदा
६) १८५७ च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली?
१) सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया
२) लेफ्टनेंट गव्हर्नर
३) चीफ कमिश्नर
४) परराष्ट्र मंत्री
७) जिल्हाधिकारी हा शासनाचे नेत्र आणि त्याची जीव्हा आहे. हे विधान ........ यांनी केले.
१) लॉर्ड कॉर्नवालीस
२) सर जॉर्ज कॉम्पबेल
३) रॅमसे मॅक्डोनॉल्ड
४) व्ही. टी. कृष्णमाचारी
८) लॉर्ड कॉर्नवालीसच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) प्रशासन व्यवस्थेचे शुद्धीकरण केले.
b) पोलीस यंत्रणेचे आधुनिकीकरण केले.
c) दर वीस मैलावर पोलीस चौक्या बसविल्या.
d) भारतीय लोकांना मोठ्या पदांवर नेमले.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (a),(b),(c) फक्त
३) (b),(c),(d) फक्त
४) (c) आणि (d) फक्त
न्यायालयीन यंत्रणा
१) ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकार्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?
१) लॉर्ड कॉर्नवॉलीस
२) वॉरेन हेस्टिंग्ज
३) लॉर्ड रिपन
४) विलियम हंटर
२) जेव्हा ...... स्त्रियांनी इल्बर्ट बिलमधील भारतीय न्यायाधीशांना युरोपियनांसंबंधित खटले चालविण्यास परवानगी दिली या गोष्टीला पाठिंबा दर्शविणारे पत्र लिहिले, तेव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयी दृष्टिकोन बदलला.
१) महाराष्ट्रीयन
२) गुजराती
३) बंगाली
४) पंजाबी
रेल्वे व दळणवळण
१) मुंबई-ठाणे हा पहिला रेल्वे मार्ग केव्हा सुरु झाला ?
१) १८५५
२) १८५३
३) १९५७
४) १८५६
२) भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली ?
१) मद्रास, जुलै १८, १९२०
२) दिल्ली, ऑगस्ट १५, १९५०
३) मुंबई, जुलै २८, १९२७
४) कोकलता, जानेवारी १, १९४८
३) भारतात रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते ?
१) लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड डलहौसी
३) लॉर्ड अॅटली
४) लॉर्ड कर्झन
४) भारतामध्ये रेल्वेची सुरुवात झाली त्यावेळेस भारताचे गव्हर्नर जनरल ...... हे होते.
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड डलहौसी
३) लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड कॅनिंग
५) भारतातील रेल्वे म्हणजे ब्रिटिशांसाठी दुधारु/दुभती गाय होती, असे पुढीलपैकी कोणी म्हटले होते ?
१) दादाभाई नौरोजी
२) फिरोजशाह मेहता
३) जगन्नाथ शंकरशेठ
४) पं. जवाहरलाल नेहरू
६) भारतातील पहिली रेल्वे ...... ते ...... या ठिकाणी धावली.
१) मुंबई ते दिल्ली
२) मुंबई ते पुणे
३) मुंबई ते ठाणे
४) दिल्ली ते कलकत्ता
७) भारतात पहिला रेल्वे मागे कोठे सुरू झाला ?
१) मुंबई ते नागपूर
२) मुंबई ते आग्रा
३) मुंबई ते ठाणे
४) मुंबई ते पुणे
८) जोड्या लावा.
a) महाराष्ट्रातील पहिली वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे i) मुंबई ते कुर्ला
b) महाराष्ट्रातील पहिली विजेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे ii) मुंबई ते ठाणे
c) महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे iii) सिंहगड एक्सप्रेस
d) महाराष्ट्रातील पहिली दुमजली रेल्वे iv) महाराष्ट्र एक्सप्रेस
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iii) (iv) (ii) (i)
३) (ii) (iv) (iii) (i)
४) (ii) (i) (iv) (iii)
९) १८४९ मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्यांबरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वांत पहिले रेल्वे करार केले?
a) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी
b) बॉम्बे, बरोडा अॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे कंपनी
c) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी
d) निझाम्स् गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी
पर्यायी उत्तरे :
१) वरील सर्व
२) (a) आणि (c)
३) (b) आणि (d)
४) (a) आणि (b)
१०) हिंदुस्तानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ......... स्थापन केले.
१) कृषी बोर्ड
२) दळणवळण बोर्ड
३) कामगार बोर्ड
४) रेल्वे बोर्ड
११) (A) आणि (B) विधाने वाचून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
A) ब्रिटिशकाळात भारतातील रेल्वेमार्ग सरकारी निधीतून बांधले गेले नाहीत.
B) भारतातील रेल्वेमार्ग खाजगीरित्या उभारलेल्या निधीतून बांधण्यात आले, त्यामुळे इंग्लिश लोकांना भारतात भांडवल गुंतविण्याची संधी मिळाली.
१) (A) चूक आहे (B) बरोबर आहे
२) (A) बरोबर आहे (B) चुकीचे आहे.
३) (A) चूक आहे (B) देखील चूक आहे
४) (A) आणि (B) दोन्हीही बरोबर आहेत.
१२) भारतात ब्रिटिशांचा रेल्वे उभारणीचा हा हेतू होता.
अ) भारतातील ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या आर्थिक, राजकीय व लष्करी हितसंबंध जपणे.
ब) देशांतर्गत मालवाहतूक करणे व माल निर्यात करणे.
क) भारतात इंग्रजी प्रशासन व्यवस्थेचा खर्च भागविणे.
ड) व्यापारासाठी भांडवल निर्माण करणे.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) फक्त क
४) फक्त अ आणि ब
१३) भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण
अ) भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळविण्यात सहजता यावी.
ब) ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करुन देण्यासाठी.
क) भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता.
पर्यायी उत्तरे :
१) अ फक्त
२) अ आणि ब फक्त
३) ब आणि क फक्त
४) अ, ब आणि क
१४) १८४६ साली हार्डिंजने लिहिले, “बंड होऊ नये,युद्धाची झटपट समाप्ती व्हावी आणि साम्राज्य सुरक्षित रहावे, यासाठी .......... ची योजना केली होती.“
१) जातवार रेजिमेंट रचना
२) रेल्वे
३) सैन्यातील सुधारणा
४) जलसंधारण योजना
१५) भारतात ”आधुनिक टपालसेवेची”सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली?
१) विल्यम बेंटिंक
२) लॉर्ड डलहौसी
३) लॉर्ड कॅनिंग
४) लॉर्ड रिपन
१६) लंडन येथील दि टाइम्सच्या वार्ताहराने लिहिले, “........ च्या शोधापासून या गोष्टीचा आजच्या भारतात जितका जोरदार आणि महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. तितका आजतागायत कधीही नव्हता. ही गोष्ट नसती तर सेनेच्या प्रमुखांचे निम्मे सैन्य हतबल झाल्यासारखे होते.” हा वार्ताहर कोणत्या गोष्टीबद्दल बोलता होता?
१) डाक सेवा
२) विजेवर चालणारे तारायंत्र
३) एन्फील्ड रायफल
४) तैनाती फौज
१७) भारतातील तारसेवेच्या कालखंडाबाबत खालील विधानांपैकी कोणते बरोबर नाही?
१) ती १८५० साली प्रायोगिक तत्त्वावर कोलकाता व डायमंड हार्बर दरम्यान सुरू करण्यात आली होती.
२) १८५४ मध्ये ती सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
३) या सेवेत ब्रेल लिपीचा वापर केला जात होता.
४) १५ जुलै, २०१३ पासून ही सेवा अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे.
रस्तेविकास
१) १९४१-१९६१ अशी २० वर्षांची रस्ते बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात आली. त्या योजनेचे नाव काय होते?
१) मुंबई योजना
२) नागपूर योजना
३) पुणे योजना
४) मुंबई-पुणे योजना
२) १९३४ मध्ये नागपूर योजना कशासाठी प्रसिद्ध होती?
१) नागपूरचा आर्थिक विकास
२) रस्ते बांधकाम
३) रेल्वे विकास
४) जलवाहतूक नियंत्रण
३) ९ मे, १८७४ रोजी मुंबईमध्ये प्रथम ट्राम रेल्वे सेवा कोणत्या दोन स्थानकादरम्यान चालू झाली?
१) कुलाबा ते भायखळा
२) कुलाबा ते पायधुनी
३) बोरीबंदर ते ठाणे
४) बोरीबंदर ते भायखळा
४) पहिले विजेवर चालणारी ट्राम मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून .......... पर्यंत होती.
१) कुलाबा मार्केट
२) फोर्ट मार्केट
३) क्रॉफर्ड मार्केट
४) भायखळा मार्केट
५) ब्रिटिश इंडिया कंपनीला महाराष्ट्रात रस्ते बांधण्याची आवश्यकता वाटली, कारण :
अ) महाराष्ट्रातील जमिनीचा सर्व्हे करणे, मोजणी करणे आणि महसूल व्यवस्थेत सुधारणा करून कंपनीचे उत्पन्न वाढविणे.
ब) महाराष्ट्रात पिकणारा कापूस व साखर अंतर्गत भागातून निर्यातीसाठी समुद्र किनार्यावर आणण्याची कंपनीला गरज.
क) दुष्काळग्रस्त भागाला लवकर धान्यपुरवठा करणे.
ड) जनतेच्या सोयीसाठी रस्ते बांधणी करणे.
पर्यायी उत्तरे :
१) (अ), (ब) आणि (क)
२) (अ) आणि (ब) फक्त
३) (ब) फक्त
४) (ड) फक्त
६) योग्य जोड्या लावा :
a) लॉर्ड बेंटिक i) ग्रँड ट्रंक रोड
b) लॉर्ड डलहौसी ii) सार्वजनिक बांधकाम खाते
c) बॅ. मुकुंदराव जयकर कमिटी iii) इंडियन रोड डेव्हलपमेंट
d) श्री. वालचंद हिराचंद iv) हिंदुस्थान एअरक्राफ्ट लिमिटेड
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (iv) (i)
२) (i) (ii) (iii) (iv)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (iii) (iv) (i) (ii)
नगररचना व इमारती
१) खालीलपैकी कोणत्या इमारतींची रचना एफ्. डब्ल्यू. स्टिव्हनस्न यांनी केली होती ?
a) व्हिक्टोरिया टर्मिनस (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)
b) म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बिल्डींग
c) द रॉयल अलफ्रेड सेलर्स होम
d) पश्चिम रेल्वेचे मुख्यालय
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (d) फक्त
३) (a) आणि (c) फक्त
४) (a),(b),(c) आणि (d)
२) एशियाटिक सोसायटीची स्थापना सर्वप्रथम ........ शहरात झाली.
१) कोलकाता
२) मुंबई
३) चेन्नई
४) नागपूर
जमीन महसूल पद्धती
१) पहिले वनधोरण भारतामध्ये केव्हा अमलात आले?
१) १९९४
२) १८८४
३) १९८४
४) १८९४
२) योग्य जोड्या लावा :
a) स्वातंत्र्य, समता आणि बंधुता i) जेम्स स्टिफन्स
b) कायमधारा पद्धती ii) लॉर्ड कॉर्नवॉलिस
c) महालवारी पद्धती iii) थॉमस मन्रो
d) रयतवारी iv) लॉर्ड विल्यम बेंटिक
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iv) (iii)
२) (ii) (iii) (iv) (i)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (iv) (i) (ii) (iii)
३) ब्रिटीश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला ?
१) मद्रास, मुंबई
२) बंगाल, पंजाब
३) कलकत्ता, नागपूर
४) दिल्ली, हिमाचल प्रदेश
४) जोड्या जुळवा.
a) कायमधारा पद्धती i) मुंबई आणि मद्रास
b) महालवारी पद्धत ii) बंगाल, बिहार, बनारस
c) मालगुजारी पद्धत iii) पंजाब, आग्रा, अवध
d) रयतवारी पद्धत iv) सेंट्रल प्रॉव्हिन्स
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (i) (iii) (ii) (iv)
४) (ii) (iii) (iv) (i)
५) खोती पद्धत कोठे होती ?
१) मराठवाडा
२) खानदेश
३) विदर्भ
४) कोकण
६) खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ?
१) अॅलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्त्वे दिसत नाहीत.
२) १७६५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली.
३) लॉर्ड कॉर्नवालिस यांनी २२ मार्च १७९३ रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली.
४) प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन १८२३ साली असिस्टंट रेव्हिन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली.
७) एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे ...... यांचा समन्वय होता.
१) मक्ता, रयतवारी, कायमधारा
२) रयतवारी, महालवारी, मौजेवारी
३) मौजेवारी, कायमधारा, रयतवारी
४) मक्ता, मौजेवारी, महालवारी
८) एलफिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती ?
१) कायमधारा पद्धत
२) रयतवारी पद्धत
३) महालवारी पद्धत
४) मौजेवारी पद्धत
९) रयतवारी पद्धतीबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
१) शेतकर्यांनी सरकारला या अंतर्गत प्रत्यक्ष शेतसारा दिला.
२) सरकारने शेतकर्यांना पट्टे दिले.
३) शेतसारा वसूल करण्यासाठी सरकारने जमिनीचे सर्वेक्षण व मोजणी करून शेतसारा आकारला.
योग्य पर्याय निवडा :
१) फक्त १
३) १ आणि २
२) १, २ आणि ३
४) यापैकी नाही
१०) ब्रिटिशांनी शेतसारा वसूल करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला ?
१) जमीनदारी आणि रयतवारी
२) जमीनदारी आणि वतनदारी
३) रयतवारी आणि जागीरदारी
४) वतनदारी आणि रयतवारी
११) खालीलपैकी कोणता रयतवारी पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे ?
१) शेतकरी आणि शासन यांचा संबंध
२) शेतकरी आणि राजकीय पक्ष यांचा संबंध
३) शेतकरी आणि पाटील यांचा संबंध
४) शेतकरी आणि अशासकीय संघटना यांचा संबंध
१२) जोड्या लावा आणि उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
a) वॉरन हेस्टिंग्ज i) महालवारी पद्धती
b) लॉर्ड कॉर्नवॉलिस ii) कायमधारा पद्धती
c) थॉमस मन्रो iii) रयतवारी पद्धती
d) होल्ट मॅकेन्झी iv) बोली पद्धती
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (ii) (iii) (i)
२) (i) (iii) (iv) (ii)
३) (ii) (i) (iii) (iv)
४) (iii) (iv) (i) (ii)
१३) ब्रिटिश सत्तेने कायमधारा पद्धती भारताच्या इतर प्रदेशात वाढविली नाही कारण :
a) कायमधारा पद्धतीत वसाहतिक सत्तेला वाढलेल्या उत्पन्नानुसार आपला हिस्सा वाढविता येत नसे.
b) ब्रिटिश अधिकारी डेव्हिड रिकार्डोच्या विचारांनी प्रभावित झाले होते आणि त्यांना ते विचार अंमलात आणायचे होते.
c) कायमधारा पद्धतीत अनेक कमतरता होत्या.
पर्यायी उत्तरे :
१) (a),(b)
२) (b),(c)
३) (a),(c)
४) (a),(b),(c)
१४) खालील विधाने लक्षात घ्या.
अ) जमिनीचे स्वरूप आणि पिकाचा दर्जा यानुसार शेतसार्याची आकारणी
ब) युद्धामध्ये मोबाईल कॅनॉनचा वापर
क) तंबाखू आणि तांबड्या मिरचीची लागवड
यापैकी कशाची ब्रिटिशांनी भारतात सुरुवात केली?
योग्य पर्याय निवडा :
१) अ आणि ब फक्त
२) ब आणि क फक्त
३) फक्त ब
४) यापैकी नाही
व्यापारकेंद्रे व वसाहती
१) पहिली ब्रिटिश फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापित केली गेली ?
१) कालीकट
२) कोलकाता
३) चेन्नई
४) सुरत
२) भारतात युरोपीय वसाहतींच्याच्या वाणिज्य आणि सैन्य कामगिरीबाबत संबंधी खालील वक्तव्य वाचा.
१) पोर्तुगाली अॅडमिरल अल्बुकर्क हा तुर्की, इजिप्त आणि गुजरात सल्तनत यांच्या एकत्र सैन्यासमोर १५०९ मध्ये हरला.
२) शाहजहान याने पोर्तुगालीपासून १६३२ मध्ये बंगालमधील हुगळी मिळवले.
३) बंगाल मधील चिन्सुरा हे डच व्यावसायिक फॅक्टरीचे स्थान होते.
४) बंगालमधील चंद्रनगर मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने आपली पहिली फॅक्टरी स्थापन केली.
वरीलपैकी कोणते वक्तव्य बरोबर आहे ?
१) १,२ आणि ३ फक्त
२) २,३ आणि ४ फक्त
३) १,३ आणि ४ फक्त
४) १ आणि २ फक्त
३) खालीलपैकी ईस्ट इंडिया कंपनी विषयक कोणते वक्तव्य चूक आहे ?
१) कंपनी निजी व्यावसायिकांचा संघ होती
२) निदेशकांच्या न्यायालयात कंपनीचे प्रबंधन संपले.
३) कंपनीने जमीनदारी अधिकाराच्या प्रभावाने कलकत्त्यावर अधिकार केला.
४) कंपनीने चार्टर प्रत्येक १५ वर्षाने नवीन होत असे.
४) औद्योगिक संशोधनासाठी भारत सरकारने १९४० साली ...... ही संस्था स्थापन केली.
१) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च
२) कौन्सिल फॉर सायन्टिफिटिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च
३) भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर
४) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
लष्कर प्रशासन
१) ग. ज. लॉर्ड वेलस्लीने भारतात तैनाती फौज पद्धत सुरू केली ज्या राजांनी ही फौज स्वीकारली त्यांना......
अ) कंपनीचे आधिपत्य मान्य करावे लागे.
ब) कंपनीने आपला प्रदेश बहाल केला.
क) कंपनीच्या सैनिकांचा खर्च करावा लागे.
ड) कंपनीने बक्षिसे देऊन पदव्या बहाल केल्या.
पर्यायी उत्तरे :
१) (अ) आणि (ब) फक्त
२) (ब) आणि (क) फक्त
३) (अ) आणि (क) फक्त
४) (अ), (क) आणि (ड)
२) लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
१) बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले.
२) कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेली.
३) सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले.
४) भारतीय लष्करावर विश्वास ठेवला.
३) लॉर्ड डलहौसीच्या साम्राज्य विस्तार धोरणासंदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) दत्तक वारस नामंजूर करुन सातारा व नागपूर ही राज्ये खालसा केली.
b) युद्धमार्गाचा अवलंब करुन शिखांचे राज्य जिंकले.
c) गैरकारभाराच्या कारणास्तव औधचे राज्य खालसा केले.
d) लष्करी कारवाई करुन पेशव्यांचे राज्य जिंकले.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a),(b) आणि (c) फक्त
३) (b),(c) आणि (d) फक्त
४) (a),(b),(c) आणि (d)
इंग्रजांचा स्थानिक राजवटीशी संघर्ष व युद्धे
१) कार्यकाळानुसार क्रमाने बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान व औरंगजेब हे ग्रेट मुघल्स म्हणून गणल्या जातात. औरंगजेबच्या मृत्यूनंतर आलेल्या मुघल सम्राटांना “लेटर मुघल्स/नंतरचे मुघल्स“ म्हणून संबोधले जाते. पुढील लेटर मुघल्सचा त्यांच्या कालावधीप्रमाणे क्रम लावा.
a) अहमद शहा
b) बहादूर शहा
c) जहांदर शहा
d) महम्मद शहा
१) अहमद शहा, बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा
२) बहादूर शहा, जहांदर शहा, महम्मद शहा, अहमद शहा
३) बहादूर शहा, महम्मद शहा, जहांदर शहा, अहमद शहा
४) जहांदर शहा, महम्मद शहा, बहादूर शहा, अहमद शहा
२) औरंगजेबनंतरच्या काळातील सर्वोत्कृष्ट राजपूत राजा होता, अंबरचा सवाई राजा जय सिंग! त्याने जयपूर हे सुंदर शहर निर्माण केले. त्याने पाच ठिकाणी जंतरमंतर बांधले.
पुढीलपैकी किती ठिकाणी त्याने जंतरमंतर बांधले नाही ?
a) बनारस
b) उज्जैन
c) मथुरा
d) उदयपूर
e) अलाहाबाद
पर्यायी उत्तरे -
१) एक
२) दोन
३) तीन
४) चार
३) तो एक गणिती, खगोलशास्त्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि नगररचनाकार होता. त्याने जयपूर, दिल्ली, उज्जैन, बनारस आणि मथुरा येथे वेधशाळा बांधल्या. हा कोणता राजा होता?
१) सवाई माधवसिंग
२) राजा मानसिंग
३) राजा तोडरमल
४) सवाई राजा जय सिंग
४) त्याला “निझाम-उल-मुल्क“ हा किताब देण्यात आला होता. त्याला दख्खनचा गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले होते. त्याने आसफजाही राजघराणे स्थापन केले. त्याच्या उत्तराधिकार्यांना हैद्राबादचे निझाम म्हणून ओळखले जाते. त्याला ओळखा ?
१) चिन क्विलिच खान
२) मुर्शिद कुली खान
३) सादत खान
४) हुसेन अली खान
बंगालमधील युद्धे
१) १७५७ च्या प्लासीच्या युद्धात इंग्रजांना विजय मिळाला कारण :
अ) बंगालचा नबाब शेजारील प्रांतात गेला होता.
ब) इंग्रजांना मोठी मदत मीर कासीमने केली होती.
क) नबाबाचा सेनापती मीर जाफर हा इंग्रजांना फितूर झाला होता.
ड) नबाबाच्या दरबारात भ्रष्टाचार व गोंधळ निर्माण झाला होता.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
१) (अ) आणि (ब) फक्त
२) (अ), (ब) आणि (क)
३) (क) आणि (ड) फक्त
४) (अ), (ब), (क) आणि (ड)
२) मीर जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लाईव्हने का ठरविले ?
१) लॉर्ड क्लाईव्हच्या मागण्या त्याने पूर्ण केल्या नाहीत.
२) कंपनीने केलेली पैशाची मागणी तो पूर्ण करू शकत नाही.
३) तो लॉर्ड क्लाईव्हचे ऐकत नव्हता.
४) तो राज्यकारभार योग्य पद्धतीने चालवीत नव्हता.
कर्नाटक युद्धे
१) चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने ...... याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्याचा परिचय दिला.
१) वेरेल्स्ट
२) लॉरेन्स
३) सॉण्डर्स
४) डुप्ले
२) कर्नाटक युद्धात इंग्रज, फ्रेंच यांच्या विरुद्ध यशस्वी नाही झाले, त्यासाठी खालीलपैकी कोणते कारण नव्हते?
१) क्लाईव्हने बंगाल मधून शिकून आलेल्या प्रकाराचा वापर फ्रेंच लोकांच्या विरोधात केला.
२) इंग्रजी सैन्य ताकद फ्रेंच पेक्षा जास्त होती.
३) बंगालचे नियंत्रण असल्यामुळे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी उत्तम स्थितीत होती.
४) फ्रेंच कंपनी फक्त राज्याचा एक विभाग असल्यामुळे वित्तीय परिस्थितीने सीमित होती आणि फ्रेंच सरकार कडून सुद्धा सहाय्य नव्हते.
३) पाँडिचेरीबाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे नाही?
a) सन १७६१ व १८१६ मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटून पालटून वर्चस्व होते.
b) फ्रान्सने अंतिमतः २६ सप्टेंबर १८१६ रोजी पाँडिचेरीवर आपली सत्ता स्थापित केली जी ३१ ऑक्टोबर १९५४ पर्यंत चालली.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
अँग्लो-म्हैसूर युद्धे
१) टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टन तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती?
१) टीपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रुपये इंग्रजांना द्यावेत.
२) टीपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे.
३) टीपूची दोन मुले इंग्रजांकडे ओलीस राहतील.
४) टीपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.
२) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे?
a) सन १८२४ मध्ये कित्तूरच्या स्वातंत्र्यासाठी व पुनर्स्थापनेसाठी मधुकर शाह याने बंड केले.
b) सन १८४२ मध्ये सागरच्या सिव्हिल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध रायप्पा याने बंड केले.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही
४) एकही नाही
शीख राजवट
१) सन १७९९ मध्ये रणजितसिंगाने लाहोर जिंकून आपले राज्य स्थापन केले. राजा रणजितसिंगबाबत कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) तो एक महत्त्वाकांक्षी राजा होता.
ब) त्याने युरोपियन पद्धतीने लष्कर तयार केले.
क) इंग्रज, नेपाळ व अफगाणिस्तानचे राजे हे रणजितसिंगाचे शत्रू होते.
ड) लॉर्ड वेलस्ली याने रणजितसिंगाबरोबर करार केला.
पर्यायी उत्तरे :
१) (अ) आणि (ब) फक्त
२) (क) आणि (ड) फक्त
३) फक्त (अ), (ब), (क)
४) (अ), (ब), (क) आणि (ड)
२) रणजितसिंहाला लाहोरवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यास इमानशाहने संमती का दिली ?
१) इमानशाह रणजितसिंहाचा मित्र होता.
२) इमानशहाने रणजितसिंहाला लाहोर बक्षीस दिले.
३) रणजितसिंहाने तोफा इमानशाहकडे पाठविल्या होत्या म्हणून
४) रणजीतसिंह इमानशाहच्या मर्जीतील होता.
लॉर्ड कॉर्नवॉलिस
१) खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश व्यवस्थापकाने हे विचार नाही ठेवले की पारंपारिक भारतीय समाजात लहान, कधीही न बदलणारे ग्राम्य आणि स्वतंत्र गणतंत्र आहे ?
१) लॉर्ड कॉर्नवॉलिस
२) चार्ल्स मेटकाल्फ
३) हेन्री मेने
४) बी एच बादेन पॉवेल
२) १७९३ मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत लागू केल्यानंतर जमीन आणि शेतसाराबाबतच्या खटल्यांची संख्या वाढली. सामान्यपणे याला कारणीभूत असणारा घटक कोणता ?
१) रयतांच्या तुलनेत जमीनदारांचे स्थान उंचावले.
२) जमीनदारांची हितसंबंधी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीची प्रतिमा
३) न्याय व्यवस्था जास्त कार्यक्षम बनल्याने
४) वरील सर्व.
३) कायमधारा पद्धतीची कोणती दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती?
अ) सर्व जमीनदार व वसुली अधिकार्यांचे जमीनदारांमध्ये रूपांतर करणे.
ब) जमिनीवरचे पूर्वापार चालत आलेले हक्क हिरावून घेणे.
क) महसुलाची आकारणी व वसुलीची पद्धत निश्चित करणे.
ड) शेतीच्या तंत्राची सुधारणा करणे.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त क आणि ड
४) फक्त ड
लॉर्ड वेलस्ली व तैनाती फौज पद्धत
१) ”तैनाती फौजेची” पद्धत कोणी सुरू केली?
१) लॉर्ड डलहौसी
२) लॉर्ड क्लाईव्ह
३) लॉर्ड वेलस्ली
४) लॉर्ड हेस्टिंग्ज
२) तैनाती फौजेसंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) हिंदी राजांना इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आधिपत्याखाली आणण्याचा प्रयत्न केला.
२) कंपनीच्या प्रदेशात वाढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात मदत झाली.
३) तैनाती फौजेमुळे दुसरे इंग्रज-मराठा युद्ध झाले.
४) लॉर्ड रिपनने तैनाती फौजेची योजना सुरू केली.
३) इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे ........ होय.
१) मैसूरचा टिपू सुलतान
२) हैदराबादचा निजाम
३) पंजाबचा दलीपसिंग
४) पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव
४) हैद्राबादच्या निजामाने लॉर्ड वेलस्लीबरोबर करार करून तैनाती फौज स्वीकारली कारण ः
अ) निजामाच्या संस्थानाला टिपू सुलतानापासून धोका होता.
ब) निजामाला फ्रेंचांची भिती वाटत होती.
क) निजामाला मराठा सत्तेकडून धोका होता.
ड) निजामाचे सामर्थ्य कमी होते.
पर्यायी उत्तरे :
१) (अ) व (क) फक्त
२) (ब) फक्त
३) (अ), (क) व (ड) फक्त
४) (क) फक्त
५) गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहेत असे मानून कलकत्त्यास प्रवेश करू दिला नाही?
१) पेंढारी
२) मराठा सरदार
३) बॅप्टिस्ट धर्मोपदेशक
४) फ्रेंच व डॅनिश सैनिक
विल्यम बेंटिक
१) गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिकने कोणत्या सुधारणा केल्या ?
अ) राज्यकारभारातील अनावश्यक पदे रद्द केली.
ब) कंपनीच्या नोकरांचे पगार कमी करण्यात आले.
क) भत्ता देणे बंद करण्यात आले.
ड) भारताला स्वातंत्र्य देण्याचे घोषित केले.
१) अ, ब आणि क
२) अ आणि ड फक्त
३) अ, ब आणि ड
४) वरील सर्व
२) सती बंदीचा कायदा कुणी केला ?
१) म. फुले
२) राजा राममोहन रॉय
३) म. कर्वे
४) लॉर्ड विल्यम बेंटिक
३) भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता?
१) कर्झन
२) डलहौसी
३) वॉरन हेस्टींग
४) लॉर्ड बेंटिक
लॉर्ड डलहौसी व संस्थान खालसा धोरण
१) ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील केवळ सत्ताविस्तारावर तो खूष नव्हता. त्याला कंपनीची सत्ता भारतात मजबूत करायची होती. त्याला आधुनिक भारताचा निर्माता म्हणतात. तो कोण होता ?
१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड कॉर्नवॉलिस
४) लॉर्ड डलहौसी
२) ......... ने PWD (Public Works Department) नावाचे स्वतंत्र एक खातेच निर्माण करुन हिंदुस्थानात रस्त्यांचे जाळेच निर्माण केले.
१) लॉर्ड बेंटिक
२) लॉर्ड डलहौसी
३) ग्रँड डफ
४) एलफिस्टन
३) इ.स. १८४८ ते १८५६ या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड विल्यम बेंटिंक
३) लॉर्ड कॉर्नवालिस
४) लॉर्ड डलहौसी
४) लॉर्ड डलहौसीने संस्थाने खालसा करताना दत्तक वारसा नामंजूर हे धोरण स्वीकारले होते. हे धोरण पूर्वी खाली
दिलेल्या गव्हर्नन्स जनरलांपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्वीकारले होते?
१) लॉर्ड आकॅलंड
२) लॉर्ड बेंटिक
३) लॉर्ड कॉर्नवॉलिस
४) लॉर्ड रिपन
५) ......... संस्थान खालसा करण्याचा डलहौसीचा निर्णय,ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाला रद्द करावा लागला.
१) जैतपूर
२) बागहट
३) नागपूर
४) करौली
६) लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्त्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली?
a) सातारा
b) जैतपूर
c) भगत
d) बडोदा
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b), (c), (d)
२) फक्त (b) आणि (c)
३) (a) आणि (b) फक्त
४) (a), (b), (c) फक्त
७) खालीलपैकी कोणती घटना लॉर्ड डलहौसी यांच्या गव्हर्नर जनरलशिप मधील नाही ?
१) टेलिग्राफ आणि पोस्टल सिस्टिमचा प्रारंभ
२) प्रथम अँग्लो शीख युद्ध
३) कलकत्ता पासून पेशावर पर्यंत जी टी रोडचा निर्माण
४) कराची, मुंबई आणि कलकत्ता मध्ये बंदराचा निर्माण
लॉर्ड लिटन
१) भारतातील नागरी सेवेतील (आय. सी. एस.) वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे कोणी केली ?
१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड लिटन
४) लॉर्ड मेयो
२) खाली नमूद केलेली चीड आणणारी कृत्ये कोणी केली होती?
अ) भारतीय नागरी सेवेत प्रवेश करण्याचे वय कमी करणे.
ब) वृत्तपत्र स्वातंत्र्यावर नियंत्रण घालणे.
क) १८७८ चा शस्त्र कायदा.
ड) ब्रिटिश उत्पादनावरील आयात कर काढून टाकणे.
१) लॉर्ड लिटन
२) जेम्स विल्सन
३) सर लॉरेन्स
४) लॉर्ड मेकॉले
३) वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भाषा वृत्तपत्र कायदा (१८७८) कोणी मंजूर केला ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड लिटन
३) लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड डफरीन
लॉर्ड रिपन
१) संपूर्ण भारतातील पहिली जनगणना कधी झाली ?
१) १८७१
२) १९२७
३) १९४७
४) १८८१
२) जोड्या लावा :
अ ब
a) लॉर्ड मेयोचा ठराव i) १८७०
b) लॉर्ड रिपनचा ठराव ii) १८८८
c) बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट iii) १९०७
d) विकेंद्रीकरण आयोग iv) १८८२
(a) (b) (c) (d)
१) (i) (iv) (ii) (iii)
२) (i) (iv) (iii) (ii)
३) (iv) (i) (ii) (iii)
४) (iv) (i) (iii) (ii)
३) भारतातील पहिली जनगणना ........ साली झाली.
१) १८७२
२) १९२७
३) १९४७
४) १८५७
४) त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले, त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला. त्यांनी आर्म्स अॅक्ट रद्द केला. ते कोण होते?
१) लॉर्ड लिटन
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड हेस्टिंग्ज
४) लॉर्ड इलबर्ट
५) इल्बर्ट बिल प्रकरण कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत उद्भवले ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड लिटन
३) लॉर्ड विल्यम बेंटिंग
४) लॉर्ड डलहौसी
६) इ.स. १८७१ पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
a) लोकांचा धर्म
b) लोकांची जात
c) लोकांचा व्यवसाय
d) लोकांचे दारिद्र्य
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (d) फक्त
३) (a), (b) आणि (c) फक्त
४) सर्व बरोबर आहेत
लॉर्ड कर्झन
१) १९०५ मधील बंगालच्या फाळणीस कोण जबाबदार होता ?
१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड रिपन
३) वॉरेन हेस्टिंग्ज
४) मेयो
२) लॉर्ड कर्झनचा कोणता निर्णय लॉर्ड हार्डिंग कडून अमान्य घोषित करण्यात आला.
१) बहादुरशाह जफरचे निष्कासन
२) बंगाल विभाजन
३) औधचे सम्मीलन
४) भगत सिंहला फाशी
३) अयोग्य जोडी निवडा.
१) इल्बर्ट बिल - लॉर्ड रिपन
२) खालसाकरणाचे तत्त्व - लॉर्ड डलहौसी
३) बंगालची फाळणी - लॉर्ड कर्झन
४) काँग्रेसची स्थापना - लॉर्ड लिटन
ब्रिटिशांचे फोडा आणि झोडा धोरण
१) ब्रिटिश सरकारने ब्राह्मणेतर संघटना व मुसलमान संघटना यांना का प्रोत्साहित केले?
१) दोन्ही संघटना अहिंसावादी होत्या.
२) बहुतेक सदस्यांची सरकारवर निष्ठा होती.
३) राष्ट्रीय सभा (काँग्रेस)ला आव्हान.
४) त्यांची संख्या जास्त होती.
२) लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली?
a) प्रशासनाच्या सोयीसाठी
b) राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी
c) अन्य भाषिक प्रदेश (बिहार, ओरिसा) वेगळा काढण्यासाठी
१) (a), (b)
२) (b), (c)
३) (a), (c)
४) (a), (b), (c)
३) बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड डफरीन
३) लॉर्ड डलहौसी
४) लॉर्ड कर्झन
४) इ.स. १९११ मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा .......... याने केली.
१) लॉर्ड कर्झन
२) पंचम जॉर्ज
३) इंग्लंड सरकार
४) ब्रिटिश पार्लमेंट
५) ब्रिटिश पंतप्रधान सर रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी आपला सुप्रसिद्ध जातीय निवाडा केव्हा जाहिर केला ?
१) १४ ऑगस्ट, १९३२
२) १५ ऑगस्ट, १९३२
३) १६ ऑगस्ट, १९३२
४) १७ ऑगस्ट, १९३२
६) भारताच्या फाळणीची योजना कोणी जाहीर केली ?
१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड माऊंटबॅटन
३) लॉर्ड वेव्हेल
४) लॉर्ड इरविन
: उत्तरे :
महसूल व पोलीस यंत्रणा
१-३
२-१
३-२
४-२
५-३
६-१
७-३
८-२
न्यायालयीन यंत्रणा
१-१
२-३
रेल्वे व दळणवळण
१-२
२-३
३-२
४-२
५-१
६-३
७-३
८-४
९-२
१०-४
११-४
१२-४
१३-२
१४-२
१५-२
१६-२
१७-३
रस्तेविकास
१-२
२-२
३-२
४-३
५-१
६-२
नगररचना व इमारती
१-४
२-१
जमीन महसूल पद्धती
१-४
२-१
३-१
४-४
५-४
६-४
७-३
८-४
९-२
१०-१
११-१
१२-१
१३-१
१४-१
व्यापारकेंद्रे व वसाहती
१-४
२-२
३-४
४-
लष्कर प्रशासन
१-३
२-४
३-२
इंग्रजांचा स्थानिक राजवटीशी संघर्ष व युद्धे
१-२
२-२
३-४
४-१
बंगालमधील युद्धे
१-३
२-२
कर्नाटक युद्धे
१-४
२-१
३-१
अँग्लो-म्हैसूर युद्धे
१-४
२-४
शीख राजवट
१-४
२-३
लॉर्ड कॉर्नवॉलिस
१-१
२-४
३-२
लॉर्ड वेलस्ली व तैनाती फौज पद्धत
१-३
२-४
३-२
४-३
५-३
विल्यम बेंटिक
१-१
२-४
३-४
लॉर्ड डलहौसी व संस्थान खालसा धोरण
१-४
२-२
३-४
४-१
५-४
६-४
७-२
लॉर्ड लिटन
१-३
२-१
३-२
लॉर्ड रिपन
१-४
२-१
३-१
४-२
५-१
६-३
लॉर्ड कर्झन
१-१
२-२
३-४
ब्रिटिशांचे फोडा आणि झोडा धोरण
१-३
२-४
३-४
४-२
५-३
६-२