डॉ. बाबासाहेब आंबेडकर (1891-1956) / प्रश्नमंजुषा (124)
- 17 Apr 2021
- Posted By : study circle
- 7483 Views
- 12 Shares
प्रश्नमंजुषा (124)
1) पुढील वाक्यात वर्णन केलेले समाजसुधारक कोण ते ओळखा:
अ) त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणार्या कबीराच्या शिकवणुकीवर विश्वास होता.
ब) त्यांचे वडिल सैन्यात होते आणि ते सुभेदार-मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते.
क) त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे.
ड) ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाहीत.
1) महात्मा ज्योतिबा फुले
2) श्री जवळकर
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) श्री घोलप
2) श्री. धनंजय कीर या सुप्रसिद्ध चरित्रकाराने आपल्या एका चरित्रनायकाचे वर्णन खालील शब्दात केले आहे. हा चरित्रनायक कोण ते ओळखा?
”त्यांनी वृत्तपत्राचे संपादन केले. त्यांनी अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र यावर ग्रंथ लिहिले... ते एका विधी महाविद्यालयाचे प्राचार्य होते... या लोकनेत्याने सामाजिक, राजकीय व कामगार चळवळींचे नेतृत्व केले...”
1) वीर सावरकर
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) लोकमान्य टिळक
4) महात्मा गांधी
3) डॉ. आंबेडकरांचे वादग्रस्त व्यंगचित्र कोणी रेखाटलेले आहे?
1) रामन पिल्लेई
2) शंकर पिल्लेई
3) आर. बालकृष्णन पिल्लेई
4) रावन पिल्लेई
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील घटनाक्रम लावा:
1) बहिष्कृत हितकारणी सभा, महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार
2) महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, बहिष्कृत हितकारणी सभा, पुणे करार
3) बहिष्कृत हितकारणी सभा, काळाराम मंदिर सत्याग्रह, महाड सत्याग्रह, पुणे करार
4) पुणे करार, महाड सत्याग्रह, बहिष्कृत हितकारणी सभा, काळाराम मंदिर सत्याग्रह
5) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत पुढील 3 विधानांचा विचार करा.
a) दलितांच्या राजकीय हक्कांसाठी त्यांनी सन 1936 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.
b) त्यांनी म्हटले होते “जरी मी जन्माने हिंदू असली तरी मरताना हिंदू राहणार नाही“.
c) ते त्याच वर्षी निवर्तले ज्या वर्षी त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला.
वरील कोणती विधाने बरोबर आहेत ?
1) (a) आणि (b)
2) (b) आणि (c)
3) (a) आणि (c)
4) (a), (b) आणि (c)
6) भारतरत्न हा पुरस्कार मरणोत्तर कोणास प्रदान करण्यात आला ?
1) धो. के. कर्वे
2) शाहू महाराज
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) वरील कोणासही नाही
7) .......... यांना डॉ. आंबेडकर त्यांच्या तीन गुरूंपैकी एक मानत, पहिले गौतम बुद्ध व दुसरे महात्मा फुले यांना ते गुरू मानीत.
1) तुकाराम
2) कबीर
3) नामदेव
4) एकनाथ
8) महात्मा जोतिबा फुले हे माझे तिसरे गुरु असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कशामुळे म्हणतात?
1) भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदत केली म्हणून.
2) क्रांती घडवून आणण्यासाठी मदत केली म्हणून.
3) अस्पृश्य समाजावर अन्याय होत होता त्या विरुद्ध आवाज उठविला म्हणून
4) महात्मा जोतिबा फुलेंनी मुलींची शाळा काढली म्हणून.
9) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी.एच.डी. प्रदान केली?
1) लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
2) बोस्टन विद्यापीठ
3) कोलंबिया विद्यापीठ
4) केंब्रिज विद्यापीठ
10) एम. ए. साठी ......... यांचा प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंधाचा विषय होता.
1) गोपाळ आगरकर
2) बाळ टिळक
3) वि. दा. सावरकर
4) बी. आर. आंबेडकर
11) पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली ?
1) डॉ. भि. रा. आंबेडकर
2) वि. रा. शिंदे
3) ग. बा. जोशी
4) नामदार गोखले
12) डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना ......... यांनी केली.
1) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) महात्मा गांधीजी
4) महात्मा फुले
13) “भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ“ ची स्थापना ........ ह्यांनी केले.
1) विठ्ठल रामजी शिंदे
2) ज्योतिबा फुले
3) डॉ. बी.आर.आंबेडकर
4) रमाबाई रानडे
14) मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे व्हावे यासाठीच्या आंदोलनात पुढीलपैकी कोणते नेते सहभागी होते?
a) गंगाधर गाडे
b) म. भि. चिटणीस
c) हाजी मस्तान मिर्झा
d) गोविंदभाई श्रॉफ
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b) आणि (d)
2) (b), (c) आणि (d)
3) (a), (c) आणि (d)
4) (a), (b) आणि (c)
15) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईत पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले?
1) मिलिंद महाविद्यालया
2) एल्फिन्स्टन महाविद्यालय
3) सिद्धार्थ महाविद्यालय
4) महात्मा फुले महाविद्यालय
16) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केव्हा केली ?
1) 1924
2) 1936
3) 1942
4) 1946
17) शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हे कोणाचे ब्रीदवाक्य होते?
1) दीनबंधू
2) सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी
3) समता संघ
4) बहिष्कृत हितकारिणी सभा
18) ”बहिष्कृत हितकारिणी सभा” या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
1) वि. रा. शिंदे
2) राजर्षी शाहू महाराज
3) डॉ. बी. आर. आंबेडकर
4) महात्मा फुले
19) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापित केलेल्या खालील संघटनांची कालानुक्रमे रचना करा.
a) अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन
b) बहिष्कृत हितकारिणी सभा
c) द बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया
d) पिपल्स एज्युकेशन सोसायटी
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (c), (b), (a), (d)
3) (b), (a), (d), (c)
4) (c), (d), (b), (a)
20) अनार्यदोषपरिहारक मंडळा ची स्थापना पुढीलपैकी कोणी केली?
अ) शिवराम जानबा कांबळे
ब) गोपाळबुवा वलंगकर
क) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ड) विठ्ठल रामजी शिंदे
पर्यायी उत्तरे :
1) अ व ब
2) क व ड
3) ब फक्त
4) क फक्त
21) जोड्या लावा.
a) आत्मोद्धार i) काकासाहेब बर्वे
b) भारत ii) धनाजी बिर्हाडे
c) सेवक iii) एस. एन. चौधरी
d) दलित भारत iv) एस. एन. मेढे
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (i) (ii) (iii) (iv)
2) (ii) (iv) (iii) (i)
3) (iii) (i) (iv) (ii)
4) (iv) (iii) (i) (ii)
22) बहिष्कृत हितकारिणी सभेतील उद्दिष्ट्ये खालीलप्रमाणे मांडण्यात आली आहेत. यामधील अयोग्य असे उद्दिष्ट कोणते?
1) स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजाविण्याच्या कामात मदत करावी.
2) स्पृश्य लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांना वार लावून जेवण द्यावे.
3) समाजामध्ये उच्च संस्कृतीची वाढ करण्यासाठी वाचनालये, शैक्षणिक वर्ग व स्वाध्याय संघ स्थापन करावे.
4) मृत जनावरे ज्याची त्यांनी ओढावी.
23) योग्य जोड्या लावा :
यादी - I यादी - II
a) गोपाळबाबा वलंगकर i ) बहिष्कृत हितकारणी सभा
b) राजर्षी शाहू महाराज ii) सन्मानबोधक निराश्रित समाज
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर iii) वेदोक्त प्रकरण
d) किसन बनसोडे iv) अनार्य दोष परिहारक मंडळी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (iii) (i) (iv)
2) (iv) (iii) (i) (ii)
3) (ii) (i) (iii) (iv)
4) (iv) (i) (iii) (ii)
24) “मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.”ही घोषणा कोणी व कोठे केली?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
2) महात्मा ज्योतीबा फुले
3) स्वामी विवेकानंद
4) स्वामी दयानंद सरस्वती
25) सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला?
1) सावित्रीबाई फुले
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) महात्मा फुले
4) महात्मा गांधी
26) बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली?
1) महात्मा गांधी
2) महात्मा फुले
3) सावरकर
4) आंबेडकर
27) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोठे घेतली?
1) नागपूर
2) औरंगाबाद
3) नाशिक
4) महाड
28) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले?
1) नाशिक
2) रत्नागिरी
3) महाड
4) मुंबई
29) चवदार तळ्याचे आंदोलन जेथे झाले ते ठिकाण कोणते?
1) अलिबाग
2) चिरनेर
3) शिरढोण
4) महाड
30) मार्च 1927 मध्ये कुलाबा जिल्ह्यात डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली कुलाबा डिस्ट्रिक्ट डिप्रेस्ड क्लासेसची सभा झाली त्यात ..... हा ठराव कार्यान्वित करण्याचे ठरले.
1) मंदिर प्रवेश
2) महाड तळे
3) बोले ठराव
4) पर्वती प्रदेश
31) दलित चळवळीबाबत पुढील दोन विधानांपैकी काय बरोबर आहे?
a) गोपाळ बाबा वलंगकर यांनी दापोली येथे दलितासाठी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला.
b) शिवराम जानबा कांबळे यांनी दलितांना शिक्षण मिळावे म्हणून चोखामेळा मंडळ सुरू केले.
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (a) परंतु (b) नाही
2) केवळ (b) परंतु (c) नाही
3) (a) व (b) पैकी कोणतेही नाही
4) (a) व (b) दोन्ही
32) डॉ. आंबेडकरांनी नेतृत्त्व केलेल्या चळवळींची त्यांच्या कालानुक्रमानुसार मांडणी करा.
अ) काळाराम मंदिर सत्याग्रह
ब) चदार तळे सत्याग्रह
क) मनुस्मृती दहन
ड) धर्मांतर चळवळ
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब, क, ड
2) ब, क, अ, ड
3) अ, क, ब, ड
4) ब, क, ड, अ
33) शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा 1910 मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?
1) जी. बी. वालंगकर
2) ज्योतिबा फुले
3) वरील दोघांचाही
4) वरील कोणाचाही नाही.
34) अस्पृश्यांना मानवी हक्क मिळावे यासाठी लढणार्या ....... यांनी 1903 मध्ये सन्मार्ग बोधक निराश्रित समाज आणि 1907 मध्ये चोखामेळा मुलींची शाळा सुरू केली.
1) शिवराम जानबा कांबळे
2) किसन फागोजी बंदसोडे
3) गोपाळबाबा वलंगकर
4) विठ्ठल रामजी शिंदे
35) 1926-27 मध्ये अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठीच्या चळवळीचे यशस्वी नेते कोण होते?
1) विसोजी डोणे
2) विश्राम रामजी घोले
3) पंजाबराव देशमुख
4) बापूजी अणे
36) 1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री-सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत ...... या सहभागी होत्या.
1) बेबी कांबळे
2) ताराबाई शिंदे
3) शांताबाई दाणी
4) अवंतिकाबाई गोखले
37) 1927 साली डॉ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या संस्थेच्या कार्यक्रमांमध्ये दलित व दलितेतरांमध्ये सहभोजनाचा समावेश होता.
1) अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद
2) समाज समता संघ
3) अस्पृश्योद्धारक मंडळी
4) बहिष्कृत हितकारिणी सभा
38) अस्पृश्यता निर्मूलनाचे छत्रपती शाहू महाराजांनी सक्रिय प्रयत्न केले. कोल्हापुरात एका व्यक्तीला सत्य सुधारक हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली जिथे ते स्वत: नेहमी जात असत. या व्यक्तीचे नाव काय?
1) कृष्णा कांबळे
2) गंगाराम कांबळे
3) रामचंद्र कांबळे
4) गणपत कांबळे
39) जोड्या लावा.
a) महाराजा सयाजीराव गायकवाड i) न्यायपक्षाची स्थापना
b) पी. त्यागराव आणि टी. एम. नायर ii) विटाळ विध्वंसन ग्रंथाचे लेखन
c) गोपाळ बाबा वलंगकर iii) चोखामेळा सुधारणा मंडळाची स्थापना
d) किसन फागुजी बंदसोडे iv) अस्पृश्यता निवारक परिषदेचे आयोजन
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iv) (i) (ii) (iii)
2) (iii) (iv) (i) (ii)
3) (ii) (i) (iv) (iii)
4) (i) (iii) (iv) (ii)
40) औपनिवेशिक भारतात खालील जाती संबंध आंदोलनासंबंधित नेत्यांचे वक्तव्य वाचा.
1) बी आर आंबेडकर यांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन वर्ष 1942 मध्ये केले.
2) स्वामी अच्युतानंद बिहार मधील दलित आंदोलनातील प्रमुख नायक होते.
3) महात्मा ज्योतिबा फुले याने सामाजिक धार्मिक विचार आपले पुस्तक गुलामगिरी यात व्यक्त केले आहे.
4) ई वी रामस्वामी नायकर पेरियार, मद्रास प्रॉव्हिन्स मधील जस्टीस पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
वरीलपैकी कोणते वक्तव्य बरोबर आहे ?
1) 1,2,3 आणि 4
2) 1,2 आणि 3 फक्त
3) 2 आणि 3 फक्त
4) 1 आणि 3 फक्त
41) बर्याच वादविवादानंतर खालच्या जातींच्या लोकांना काही सवलती मान्य करण्यात आल्या.
या संदर्भात कोण पुढील प्रमाणे बोलले, “आमची हजारो वर्षे मुस्कटदाबी झाली. तुम्ही आम्हाला स्वत:च्या फायद्यासाठी ठेवले आणि आम्हाला एवढे दाबून ठेवले की न आमची मने, न आमचे शरीर न आमचे हृदय काम करते आणि न आम्ही पुढे वाटचाल करू शकतो !
1) बी. आर. आंबेडकर
2) एम. के. गांधी
3) एच. जे. खांडेकर
4) विठ्ठल रामजी शिंदे
42) मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे ...... चे पुढारी होते.
1) महार समाज
2) मातंग समाज
3) माथडी समाज
4) माळकरी समाज
43) अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकर्या मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली?
अ) शिवराम जानबा कांबळे
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) अॅड. बी. सी. कांबळे
ड) गोपाळबुवा वलंगकर
पर्यायी उत्तरे :
1) अ फक्त
2) ब फक्त
3) क आणि ड
4) ड फक्त
44) 1912 साली झालेल्या महाराष्ट्र अस्पृश्य परषिदेचे अध्यक्ष ...... होते.
1) विठ्ठल रामजी शिंदे
2) रामकृष्ण भांडारकर
3) नारायण चंदावरकर
4) बाबासाहेब आंबेडकर
45) जोड्या जुळवा :
a) छत्रपती शाहू महाराज i) मुंबई येथे भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या परिषदेचे अध्यक्ष
b) सयाजीराव गायकवाड ii) श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज
c) गोपाळराव वलंगकर iii) मिस क्लार्क होस्टेलची स्थापना
d) शिवराम जानबा कांबळे iv) अनार्य दोष परिहार समाज संस्थेची स्थापना
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (iii) (i) (iv)
2) (iii) (i) (iv) (ii)
3) (i) (iv) (ii) (iii)
4) (ii) (i) (iv) (iii)
46) 1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती?
1) सोलापूर
2) मुंबई
3) नागपूर
4) पुणे
47) देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी परिषद घेतली होती ?
1) नागपूर
2) माणगाव
3) महाड
4) निपाणी
48) सन 1927 मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते?
1) मासिक
2) दैनिक
3) साप्ताहिक
4) पाक्षिक
49) लॉर्ड साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटी मध्ये सरकार ने कोणाची निवड केली ?
1) वि. रा. शिंदे
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) वि. रा. शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) गोपाळकृष्ण गोखले
50) विविध विषयांचे तज्ज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील ठिकाणी आपली साक्ष नोंदवली.
a) सायमन कमिशन
b) युनिर्व्हसिटी रिफॉर्म्स कमिटी
c) रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स
d) साउथ बरो कमिटी
पर्यायी उत्तरे :
1) केवळ (b), (c) आणि (d)
2) केवळ (a), (b) आणि (c)
3) केवळ (a) आणि (d)
4) सर्व (a), (b), (c) आणि (d)
51) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले?
a) मूलभूत अधिकार समिती
b) अल्संख्याक उपसमिती
c) सल्लागार समिती
d) राज्ये समिती
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a), (b), (c)
2) फक्त (b), (c), (d)
3) फक्त (a), (b), (d)
4) फक्त (a), (c), (d)
52) गोलमेज परिषदेतील निवेदनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाला ...... म्हणून संबोधावे असे म्हटले होते.
1) महार
2) हरिजन
3) प्रोटेस्टंट हिंदू
4) नवबौद्ध
53) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या गोलमेज परिषदेत उपस्थित होते?
A) पहिली गोलमेज परिषद
B) दुसरी गोलमेज परिषद
C) तिसरी गोलमेज परिषद
पर्यायी उत्तरे :
1) (A) फक्त
2) (A) आणि (B) फक्त
3) (B) आणि (C) फक्त
4) (A), (B), (C)
54) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढीलपैकी कोणती वर्तमानपत्रे सुरू केली होती?
1) समता, गुलामी, जनता
2) बहिष्कृत भारत, जनता, गुलामी
3) बहिष्कृत भारत, जनता, समता
4) बहिष्कृत भारत, समता, गुलामी
55) कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते ?
1) हरिजन
2) मूकनायक
3) समता
4) प्रबुद्ध भारत
56) सन 1927 मध्ये डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत हे काय होते?
1) मासिक
2) दैनिक
3) साप्ताहिक
4) पाक्षिक
57) खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते?
1) मूकनायक
2) जनता
3) समता
4) संदेश
58) मूकनायक ची सुरुवात झाली तेव्हा खालीलपैकी कोणता गट त्याच्याशी संबंधित होता ?
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, ज्ञानदेव घोलप
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पांडुरंग भाटकर, दिनकरराव जवळकर
59) हरिजन साप्ताहिकाबद्दल काय खरे आहे?
a) त्याच्या पहिल्या अंकासाठी रविंद्रनाथ टागोरांनी द क्लिन्सर ही कविता दिली होती.
b) डॉ. आंबेडकरांनी पहिल्या अंकासाठी संदेश देण्यास नकार दिला.
c) गांधीजींनी स्पष्ट केले की हरिजन हे काही त्यांचे साप्ताहिक नव्हते त्याच्या मालकी हक्काविषयी सांगायचे तर ते हरिजन सेवक समाजाचे होते.
d) गांधीजींनी डॉ. आंबेडकरांना सांगितले की साप्ताहिक जसे कुठल्याही हिंदूंचे आहे तितकेच आंबेडकरांचेही आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c) फक्त
2) ((a), (b), (d) फक्त
3) (b), (c), (d) फक्त
4) (a), (b), (c) आणि (d)
60) ”थॉट्स ऑन पाकिस्तान” हा ग्रंथ कोणी लिहिला?
1) सर सय्यद अहमद खान
2) बॅ. महमद अली जीना
3) मौलाना अब्दुल करीम आझाद
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
61) डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला?
1) भारतातील जाती
2) जातिभेद-निर्मूलन
3) शुद्र पूर्वी कोण होते?
4) बुद्ध व त्याचा धम्म
62) पुढीलपैकी कोणत्या ग्रंथांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचे बारकाईने परीक्षण केले आहे ?
a) फिलॉसॉफी ऑफ हिंदूइझम
b) रिडल्स इन हिंदूइझम
c) रिलिजन इन इंडिया
d) बुद्ध अॅन्ड हिज धम्म
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (a),(b)आणि (d) फक्त
3) (c) फक्त
4) (d) फक्त
63) खालीलपैकी कोणती जोडी विसंगत आहे ?
1) महात्मा फुले - शेतकर्यांचा असूड
2) बाबासाहेब आंबेडकर - हू वेअर द शुद्राज.
3) मौलाना मुहम्मद अली - कॉमरेड
4) स्वामी विवेकानंद - सत्यार्थ प्रकाश
64) विटाळ विध्वंसन ........ यांनी लिहिले.
1) गोपाळबाबा वलंगकर
2) शिवराज जानबा कांबळे
3) किसन फागुजी बनसोडे
4) गणेश अक्काजी गवई
65) स्वतंत्र मजूर पक्षाबाबत काय खरे नाही ?
a) तो डॉ. आंबेडकरांनी स्थापन केला.
b) जनता या पक्षाचे मुखपत्र होते.
c) काबाडकष्ट करणार्यांचे हित पक्षाने जोपासले.
d) पक्षाने 1937 च्या निवडणुका लढविल्या.
e) पक्ष अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मध्ये विलीन झाला.
योग्य पर्याय निवडा :
1) (b)
2) (c)
3) (d)
4) (e)
66) डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
1) शेतकरी कामगार पक्ष
2) ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन
3) द इनडिपेंडन्ट लेबर पार्टी
योग्य पर्याय निवडा :
1) फक्त 1 आणि 2
2) फक्त 2 आणि 3
3) फक्त 1
4) 1, 2 आणि 3
67) संयुक्त मजूर पक्षा ची स्थापना कोणी केली ?
1) मेघाजी लोखंडे
2) श्रीपाद अमृत डांगे
3) महात्मा फुले
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
68) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालील कोणते राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुकांमध्ये उमेदवार उभे केले?
अ) बहिष्कृत हितकारिणी सभा
ब) रिपब्लिकन पक्ष
क) स्वतंत्र मजूर पक्ष
ड) शेड्युल्ड कास्ट फेडरेशन
पर्यायी उत्तरे :
1) (ब) फक्त
2) (अ) आणि (ब) फक्त
3) (अ), (ब) आणि (ड)
4) (क) आणि (ड)
69) 1926 साली मुंबई कायदेमंडळात ...... यांनी असे विधेयक मांडले की ग्रामजोशांना संस्कार करायला बोलावले नसेल, तर त्यांना दक्षिणा मागण्याचा हक्क राहणार नाही.
1) बॅरिस्टर जयकर
2) राव बहादूर सी. के. बोले
3) भास्करराव जाधव
4) दामोदर सखाराम यंदे
70) पुणे कराराबाबत कोणती विधाने बरोबर आहेत?
a) बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात तो झाला.
b) आंबेडकरांची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य झाली.
c) अस्पृश्यांसाठी राखीव जागा देण्यात आल्या.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b)
2) (a), (c)
3) (b), (c)
4) वरील तिन्ही
71) 1932 साली झालेल्या पुणे करारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधीजी यांच्यात कोणत्या गोष्टींवर एकमत झाले?
a) दलितांना सरकारी नोकर्यांत आरक्षण
b) दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ
c) दलितांसाठी प्रादेशिक विधिमंडळात 147 राखीव जागा
d) केंद्रीय कायदेमंडळात दलितांसाठी 28% राखीव जागा
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) फक्त (c)
3) (c) आणि (d)
4) (a) आणि (d)
72) खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ तयार करण्याची तरतूद होती ?
1) माँटेग्यू-चेल्म्सफोर्ड कायदा
2) रॅमसे-मॅक्डोनाल्ड निवाडा
3) वेव्हेल योजना
4) 1935 चा सुधारणा कायदा
73) जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेला निवाडा रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला?
1) 16 ऑगस्ट, 1932
2) 17 ऑगस्ट, 1932
3) 18 ऑगस्ट, 1932
4) 20 ऑगस्ट, 1932
74) खालील विधानांचा विचार करा :
अ) डॉ. बी. आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.
ब) श्री. एच. जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.
पर्यायी उत्तरे :
1) ब बरोबर आहे
2) अ बरोबर आहे
3) अ व ब दोन्ही बरोबर आहेत
4) अ व ब दोन्ही चूक आहेत.
75) विधान (A) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना परिषदेत असे सुचवले की भारताची राष्ट्रभाषा संस्कृत असावी.
विधान (B) : संस्कृतवर प्रभुत्व असल्याखेरीज प्राचीन भारतीय साहित्य आणि अन्य ज्ञानशाखांत भारतीयांनी किती महत्त्वाचे योगदान दिले होते हे कळणार नाही.
पर्यायी उत्तरे :
1) (A) आणि (B) दोन्ही चुकीचे आहेत.
2) (A) आणि (B) दोन्ही बरोबर आहेत.
3) (A) चुकीचे आहे, (B) बरोबर आहे.
4) (A) बरोबर आहे, (B) चुकीचे आहे.
उत्तरे : प्रश्नमंजुषा (124)
1-3
2-2
3-2
4-1
5-4
6-3
7-2
8-3
9-3
10-4
11-1
12-2
13-3
14-4
15-3
16-1
17-4
18-3
19-3
20-3
21-3
22-3
23-2
24-1
25-2
26-4
27-1
28-3
29-4
30-3
31-1
32-2
33-3
34-2
35-3
36-3
37-2
38-2
39-1
40-4
41-3
42-2
43-1
44-2
45-2
46-3
47-4
48-4
49-3
50-4
51-1
52-3
53-4
54-3
55-1
56-4
57-4
58-3
59-4
60-4
61-4
62-2
63-4
64-1
65-4
66-2
67-4
68-4
69-2
70-2
71-2
72-2
73-1
74-2
75-2