मुंबई मॉडेल / प्रश्नमंजुषा (151)
- 18 May 2021
- Posted By : study circle
- 201 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (151)
1) सिरो सर्व्हेमध्ये नागरिकांमधील अँटीबॉडीचे प्रमाण कमी झाल्यास ....
a) कोव्हिडची साथ नियत्रणात येत असल्याचे ते लक्षण मानले जाते.
b) त्या ठिक़ाणी रुग्णांची घट अपेक्षित असते.
c) त्या ठिक़ाणी रुग्णांची वाढ अपेक्षित असते.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (c)
3) (a) आणि (b)
4) (a), (b) आणि (c)
2) कोव्हॅक्स संदर्भात खालीलपैकी कोणता/कोणते पर्याय बरोबर आहे/आहेत?
a) कोव्हॅक्सची स्थापना ’जागतिक आरोग्य संघटना’ आणि ’गावी’ यांनी केली.
b) कोवॅक्स अंतर्गत 5 अब्ज कोरोना लसी खरेदी करण्याचे उद्दिष्ट होते.
c) कोरोना लशीची किमत 1, 2, आणि 3 डॉलर अशी ठरवली जाणार होती.
d) खरेदी केलेल्या लशीतून प्रत्येक देशाला किमान 10 टक्के लसी देण्याचे नियोजन होते.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (c)
2) (b) आणि (d)
3) (a) आणि (b)
4) (c) फक्त
3) फायझरच्या कोरोना लसीसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
a) 12 डिसेंबर 2020 रोजी फायझरच्या लसीला अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिल्याने फायझरने लसीची किंमत प्रतिडोस 20 डॉलर केली.
b) फायझरने कोवॅक्सला 4 करोड लसी देण्याचा शब्द दिला होता.
c) कोव्हॅक्सच्या लस मिळविण्याच्या उद्दिष्टपूर्तीमध्ये फायझरचा वाटा फक्त 10 टक्के आहे.
d) फायझरच्या कोरोना लसीचा फक्त एक डोस लसीकरणासाठी पुरेसा आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c)
2) (b), (c), (d)
3) फक्त (a) आणि (b)
4) फक्त (c) आणि (d)
4) 1940 च्या दशकात भारताने स्वीकारलेल्या डॉ. जोसेफ भोर कमिटीच्या शिफारशीनुसार .....
a) उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा रुग्णालये अशी अरोग्यसेवेची उतरंड तयार झाली.
b) शहरी भागात डिस्पेन्सरी - रेफरल हॉस्पिटल - स्पेशालिटी रुग्णालये अशी यंत्रणा विकसित झाली.
c) ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य सेवेचे एक मॉडेल विकसित झाले.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b) फक्त
2) (b), (c) फक्त
3) (a) फक्त
4) यापैकी तीनही
5) मे 2021 मध्ये भारतात कोरोनाची दुसरी लाट अतितीव्र होण्याचे योग्य कारण शोधा.
a) 5 राज्यांमध्ये निवडणुकादरम्यान लाखांच्या सभा घेतल्याने संक्रमण वाढले.
b) केंद्र सरकारने येऊ घातलेल्या संकटाला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी पुरेशी पूर्वतयारी केली नाही.
c) हरिद्वार येथे कुंभ मेळ्याला परवानगी दिली.
d) लशीकरणाचे प्रभावी नियोजन केले नाही.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (a), (b), (c)
3) (a), (d)
4) (a), (b), (d)
6) कोव्हिड नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) मुंबई महापालिकेने प्रत्येक वॉर्ड स्तरावर वॉर रूम स्थापन केली.
ब) सर्व जम्बो रुग्णालयातील 70 टक्के बेडस् ऑक्सिजनयुक्त बेड केली.
क) टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट या तीन ‘ट’च्या आधारे मुंबईतील कोव्हिड रुग्णांचे अत्यंत काटेकोरपणे सर्वेक्षण.
ड) राज्य टास्क फोर्सच्या ऑक्सिजन प्रोटोकॉलनुसार रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिट केले.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
7) द लॅन्सेट संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1) द लॅन्सेट जगातलं सगळ्यात जुनं आणि प्रतिष्ठित आरोग्यविषयक मासिक आह
2) ब्रिटिश सर्जन डॉ. थॉमस वॅकली यांनी 1823 मधे त्याची सुरुवात केली.
3) 2019 साली जम्मू काशमीरमधलं कलम 370 हटवल्यावर लॅन्सेटमध्ये त्याबाबत संपादकीय आले होते.
4) 2010 साली लॅन्सेटची ‘द लॅन्सेट स्टुडंट’ नावाची वेबसाईट सुरू झाली.
8) केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे 1 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोरोनामुळे 10 लाख मृत्यू होऊ शकतात, असा इशारा कोणत्या वृत्तपत्राने दिला होता (मे 2021)?
1) द ऑस्ट्रेलियन
2) टाईम
3) वॉशिंग्टन पोस्ट
4) द लॅन्सेट
9) फायझरच्या कोरोना लसीची निर्मिती कोणी केली आहे?
1) फायझरच्या अमेरिकेतील प्रयोगशाळेने
2) फायझरची सहकारी ब्रिटिश कंपनी ’अॅस्ट्राझेंका’ ने
3) फायझरची सहकारी जर्मन कंपनी ’बायोएनटेक’ ने
4) फायझरची सहकारी भारतीय कंपनी ’कॅडिला लॅब’ ने
10) मुंबई महापालिकेने मुंबईमधील या साथ रोगांवर नियंत्रण ठेवण्यास प्रभावी व पुरेसे कार्य केलेले आहे.
a) 2009 मध्ये आलेला स्वाईन फ्लू
b) झोपडपट्टी विभागातील टीबीचे वाढते प्रमाण
c) 1990 च्या दशकातील एचआयव्ही एडस्
d) 2010-11 च्या दरम्यान मुंबईमध्ये प्रचंड पसरलेला मलेरिया
पर्यायी उत्तरे :
1) (b), (c)
2) (a), (b), (c), (d)
3) (b), (d)
4) (a), (b), (d)
11) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) कोरोनाच्या लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि लसींसदर्भात कार्यरत उपक्रम ’गावी’ यांनी मिळून ’कोवॅक्स’ची स्थापना केली आहे.
ब) जगभर कोवॅक्स अंतर्गत 5 अब्ज लसी खरेदी केल्या जाणार होत्या.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
12) दर 10 लाख लोकांमागे कोरोना बाधितांची एकूण संख्या (मे 2021) यानुसारचा विविध देशांचा योग्य उतरता क्रम लावा.
अ) भारत
ब) अमेरिका
क) इंग्लंड
ड) फ्रान्स
पर्यायी उत्तरे :
1) अ-ब-क-ड
2) क-अ-ड-ब
3) ब-ड-अ-क
4) ब-ड-क-अ
13) पुढील विधाने विचारात घ्या :
a) कोरोनामुळे जगभरात सुमारे 30 लाख लोकांचा मृत्यू झाला (मे 2021 पर्यंत).
b) जानेवारी 2021 पासून जगभरातील 40 देशांतील केवळ 1 टक्का लोकांचे लसीकरण झाले (मे 2021 पर्यंत).
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a) बरोबर आहे.
2) फक्त (b) बरोबर आहे.
3) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत.
4) (a) आणि (b) दोन्ही चूक आहेत.
14) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) महाराष्ट्र राज्यात 27 महापालिका अस्तित्वात आहेत.
2) मुंबई हे महानगर एकूण 26 वॉर्डांमध्ये विभागले गेले आहे.
3) महाराष्ट्र राज्यातील निम्म्याहून अधिक लोक शहरांमध्ये राहत आहेत.
4) 1940 च्या दशकात भोर कमिटीने मुंबईत आरोग्य सेवेचे मॉडेल विकसित केले.
15) दर 10 लाख लोकांमागे कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या (मे 2021) यानुसारचा विविध देशांचा योग्य चढता क्रम लावा.
अ) जागतिक सरासरी
ब) भारत
क) इंग्लंड
ड) जर्मनी
पर्यायी उत्तरे :
1) ब-अ-ड-क
2) क-अ-ड-ब
3) ब-ड-अ-क
4) ब-ड-क-अ
16) मुंबई संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या :
a) महाराष्ट्राच्या 20 टक्के लोकसंख्या ही एकट्या मुंबईमध्ये राहते.
b) जागतिक पातळीवरील पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबईचा समावेश होतो.
c) मुंबईची लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटर पाठीमागे 21 हजार लोक इतकी आहे
पर्यायी उत्तरे :
1) फक्त विधान (a) बरोबर आहे.
2) फक्त विधान (b) बरोबर आहे.
3) विधान (b) आणि (c) बरोबर आहेत.
4) विधान (a), (b) आणि (c) बरोबर आहेत.
उत्तरे : प्रश्नमंजुषा 151
1-2
2-1
3-3
4-4
5-1
6-4
7-4
8-4
9-3
10-2
11-1
12-4
13-3
14-2
15-1
16-3