सामान्यविज्ञान / प्रश्नमंजुषा (112)
- 02 Apr 2021
- Posted By : study circle
- 751 Views
- 0 Shares
राज्यसेवा पूर्व परीक्षा, 21 मार्च 2021 पेपर (1)
सामान्यविज्ञान घटकावरील प्रश्न
(1) भौतिकशास्त्र
1) जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन दृढ भिंतीवर आदळेल तेव्हा त्याचे प्रतिबिंबित रूप हे :
1) 180 अंशानी (π) अवस्था संकुचित होईल.
2) अवस्था बदल होणार नाही.
3) 90 अंशांनी (π/2) अवस्था विरलन होईल.
4) विरलन होईल पण अवस्था बदलणार नाही.
2) 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. जर एका युनिटचा दर रु. 3.00 असेल, तर मार्च महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती?
1) रु. 279.00
2) रु. 31.00
3) रु. 27.00
4) रु. 27.90
3) थॉम्पसनच्या अणू प्रतिकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात?
1) एकूण अणूची तटस्थता
2) हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती
3) इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान
4) अणूची स्थिरता
4) खालील विधानांचा विचार करा :
a) मृत प्राणी अथवा वनस्पती यांचेमध्ये कार्बन-14 ते कार्बन-12 यांचे गुणोत्तर बदलत असते.
b) किरणोत्सारी कार्बन-14 समस्थानिकांचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात.
पर्यायी उत्तरे :
1) विधान (a) सत्य आहे आणि (b) विधानाची कारणमीमांसा आहे.
2) (a) आणि (b) दोन्ही विधाने चूक आहेत.
3) (a) विधान सत्य आहे परंतु (b) चूक आहे.
4) (a) आणि (b) एकमेकांशी संबंधित नाहीत.
5) ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्षे असून त्याचा बिटा किरणांनी क्षय होतोय. 25 वर्षांनंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील?
1) 0 (शून्य)
2) 0.5
3) 0.25
4) 0.125
6) पुढील विधानांचा विचार करा :
a) दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते.
b) म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते.
पर्यायी उत्तरे :
1) दोन्ही विधाने चूक आहेत.
2) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमीमांसा आहे.
3) (a) विधान बरोबर आणि ते (b) ची कारणमीमांसा नाही.
4) (a) बरोबर परंतु (b) चूक आहे.
7) भारताच्या गगनयान मोहिमे विषयी अयोग्य विधाने शोधा.
a) गगनयान साठी भारतीय हवाई सेनेच्या चार वैमानिकांची निवड अंतराळवीर प्रशिक्षणासाठी करण्यात आली आहे.
b) त्यांचे प्रशिक्षण रशिया येथे युरी गागारीन कॉस्मोनॉट सेंटर येथे होणार आहे.
c) या मोहिमेची घोषणा पंतप्रधानांनी 2014 मध्ये केली होती.
व) याचे नियोजन 2022 साठी पाच सदस्यांचे चमू एक महिन्याचे अंतराळातील वास्तव्य यासाठी करण्यात आले आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (b), (c), (d)
3) (c), (d)
4) (b), (c)
सीसॅट पेपरमधील भौतिकशास्त्रा संबंधीचा उतारा
भौतिकशास्त्र
न्यूटनच्या गतीविषयक दुसर्या नियमाच्या सहाय्याने पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे प्रचंड वस्तूंच्या गतीची समीकरणे सोडविता येतात. गुरुत्वाकर्षण बल हे पुढील समीकरणाने दाखवले जाते.
येथे G म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक, m म्हणजे पदार्थाचे वस्तुमान, Me म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान आणि R म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून पदार्थापर्यंतचे अंतर. ह्या विश्लेषणानुसार पृथ्वीभोवती फिरणार्या उपग्रहांबाबतचे गतीचे नियम केपलर यांनी जे ग्रहगतीचे नियम शोधले तसेच लागू होतात. जोहान्स केप्लर (1571-1630) यांनी ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्याच्या निरीक्षणांवरून जे ग्रह-गतीबाबत तीन नियम शोधून काढले, तेच पृथ्वी आणि तिच्या उपग्रहांबाबत मांडले तर ते खालीलप्रमाणे देता येतील ः
(I) सर्व उपग्रह पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत गतिमान असतात व या लंबवर्तुळाच्या एका केंद्राशी पृथ्वी असते.
(II) उपग्रह पृथ्वीभोवती फिरताना उपग्रह आणि पृथ्वीचे केंद्रस्थान यांना जोडणारा अक्ष या कक्षेमधील समक्षेत्र समवेळेत पार करतो.
(III) कोणत्याही उपग्रहाचा आवर्तनकालाचा (परिभ्रमण कालाचा) वर्ग हा त्याच्या कक्षेच्या अर्ध-दीर्घांशाच्या (माध्य-अंतराच्या) घनाच्या समप्रमाणात असतो.
पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील वस्तूंसाठी गणितामध्ये गुरुत्वाकर्षण बल हे अंदाजे स्थिर मानले जाते. समजा R = Re + h, येथे Re म्हणजे पृथ्वीची त्रिज्या, h म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूचे अंतर, तर गुरुत्वाकर्षण बल असेल :
हे अंदाजे F = GmMe या बरोबर असेल जेव्हा h<<Re.
R2
हे स्थिर बल नेहमीप्रमाणे mg इतके असते. यातील स म्हणजे मुक्त पतन त्वरण.
(टीप : वैश्विक गुरुत्वाकर्षण स्थिरांक : G = 6.67 x 10-11 N.m2/kg2 , पृथ्वीचे वस्तुमान : Me = 5.98 x 1024 kg आणि पृथ्वीची त्रिज्या : Re = 6.37 x 106 m)
1) खालीलपैकी कोणती पदावली ही गुरुत्वीय त्वरण व पदार्थाची पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची याचा संबंध दर्शविते ?
1) G(Re + h)
2) 2G(Re + h)2
3) GMe .
(Re + h)
4) GMe
(Re + h)2
2) पृथ्वीच्या केंद्रापासूनm = GmMe (1/Re - 1/R) इतक्या अंतरावर ... इतक्या वस्तुमानाच्या एका अग्निबाणाला गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा ..... इतकी आहे. तर ह्या अग्निबाणाला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रापासून पूर्णतः निसटण्यासाठी कमीत कमी किती वेग दिला पाहिजे ?
1) ( 2 GM )1/2
RE
3) (2 gh)1/2
4) (2 mGRe)1/2
3) पृथ्वीच्या केंद्रापासून R या अंतरावर एक उपग्रह गोलाकार कक्षेत फिरत आहे. उपग्रह φ या कोनातून फिरताना व्यापले जाणारे क्षेत्र A = R2f/2 आहे. केपलरच्या दुसर्या नियमानुसार असे सूचित होते की, उपग्रहाला 2ष कोनाइतका जाण्यासाठी लागणारा वेळ :
1) φ कोनातून जाण्याच्या दुप्पट वेळ लागेल.
2) φ कोनातून जाण्याच्या अर्धा वेळ लागेल.
3) φ कोनातून जाण्याच्या वेळेच्या वर्गाइतका वेळ लागेल.
4) φ कोनातून जाण्या इतकाच समान वेळ लागेल.
4) पृथ्वीच्या केंद्रापासून R इतक्या अंतरावर m इतक्या वस्तुमानाचा एक उपग्रह गोलाकार कक्षेमध्ये फिरत आहे. जर R हे अंतर 4 पटीने वाढवले, तर त्या कक्षेचा आवर्तकाल :
1) बदलणार नाही
2) 4 पटीने वाढेल
3) 8 पटीने वाढेल
4) 64 पटीने वाढेल
5) सारख्याच उंचीवरून दोन असमान वस्तुमानाचे गोळे खाली टाकले. गुरुत्वाकर्षण बल हे स्थिर आहे असे समजले, तर उपपत्तीच्या भाकितानुसार दोन्ही गोळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकाच वेळेस आदळतील. पण जर वास्तविक बल गृहीत धरले तर :
1) जास्त वस्तुमान असलेला गोळा प्रथम आदळेल.
2) कमी वस्तुमान असलेला गोळा प्रथम आदळेल.
3) दोन्ही गोळे एकाच वेळेत आदळतील.
4) वरीलपैकी काहीही नाही, कारण गती समीकरणे हे स्थिर बल अंदाजित केल्याशिवाय सोडविता येणार नाहीत.
6) योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा.
a) संपुष्टात न येणारी संसाधने i) मानवनिर्मित कृत्ये
b) स्ट्रॅटोस्फिअर ii) जीवाश्म इंधन जसे कोळसा, पेट्रोल
c) अपुनरावर्ती/पुनर्नुतनीकरणास अयोग्य iii) सौर ऊर्जा
संसाधने किंवा अनुतनावर्ती संसाधने
व) क्लोरोफ्लुरोकार्बन्स iv) ओझोनचा दाट थर
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (c)
1) (iv) (iii) (ii) (i)
2) (iv) (ii) (iii) (i)
3) (iii) (iv) (ii) (i)
4) (ii) (iii) (iv) (i)
जैवइंधन
हेन्री फोर्ड आणि रुडॉल्फ डिझेल या दोन व्यक्तींनी मोटार काय उद्योगात क्रांती घडवून आणली. आपल्या मोटारी वनस्पतींपासून तयार केलेल्या इंधनावर धावल्या पाहिजेत अशी त्यांची अपेक्षा होती, पण त्या काळात अतिशय स्वस्त असलेल्या खनिज इंधनाने बाजी मारून नेली. पेट्रोल हेच इंधन लोकप्रिय झाले आणि फोर्ड व डिझेल यांचे स्वप्न हवेत विरून गेले. एका शतकानंतर फोर्ड आणि डिझेल यांची इच्छा फलद्रुप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वर्तमानकाळी आकाशाला भिडत जाणार्या पेट्रोलियमच्या किमतींनी जैवइंधनाला पुन्हा एकदा चालना दिली आहे. हळूहळू कार, ट्रक आणि विमाने यांच्यासाठी जैवइंधन लोकप्रिय होत झालेले आहे.
जैवइंधनाच्या क्षेत्रात ब्राझील या देशाने आघाडी घेतली आहे. आजच त्या देशात चारशेपेक्षा जास्त इथेनॉल उत्पादन केंद्रे आहेत. त्यामध्ये निव्वळ ऊसापासून इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. वाहनांसाठी शुद्ध गॅसोलीन न वापरता त्यात 25 टक्के इथेनॉल मिसळले जाते. नजीकच्या काळात केवळ इथेनॉलवर धावणारी वाहने त्या देशात निर्माण केली जातील. ऊस आणि इथेनॉल देणार्या अन्य वनस्पतींच्या लागवडीखाली अधिकाधिक भूमी आणली जात आहे. ङ्गगॅसोलिनकार हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.फ असा त्या देशातील तंत्रज्ञांचा दावा आहे.
अमेरिकेत मक्यापासून इथेनॉल हस्तगत केले जाते. युरोपातील जर्मन हा देश बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक आहे. भारतासह अन्य 30 देशांत निरनिराळ्या वनस्पतींपासून इथेनॉलचे उत्पादन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. नारळ, सोयाबीन, भुईमूग, पाम, द्राक्षे, बीट अशा अनेक वनस्पतींपासून इथेनॉलचे उत्पादन करता येते.
महत्त्वाची गोष्ट अशी की, पारंपरिक कार इंजिन्स जैवइंधनावर चालू शकतात. याशिवाय गॅसोलीन किंवा डिझेल यामध्ये योग्य प्रमाणात इथेनॉल मिसळून ते मिश्रण इंधन म्हणून वापरता येते. पारंपरिक डिझेल इंजीन 20 टक्के जैवइंधनावर उत्तम प्रकारे चालते. अर्थात जैवइंधनासाठी वाहनांची इंजिने बदलण्याचे कारण नाही. जैवइंधनातून कार्बन-डाय-ऑक्साइड निर्माण होत नाही, हे त्याचे आणखी एक वैशिष्ट आहे.
खनिज तेल निर्माण करण्यासाठी निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागतात. याउलट अनेक जिवंत वनस्पतींपासून जैवइंधन प्राप्त करता येते. जैवइंधनामधून केवळ कार्बन-डाय-ऑक्साइडच्या उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते, असे नाही, तर नायट्रोजन ऑक्साइडसारखे अन्य विषारी वायूही अशा इंधनातून उत्सर्जित केले जात नाहीत. वनस्पतींची वर्धनक्षमता आणि त्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध जमीन यांवरच केवळ जैवइंधनाचे उत्पादन अवलंबून राहील. याशिवाय अनेक प्रकारच्या कचर्यापासूनही जैवइंधनाचे उत्पादन करता येईल.
1) जैवइंधन वापराचे खालीलपैकी कोणते फायदे बरोबर आहेत ?
a) जैवइंधन वनस्पतीपासून तयार करता येते.
b) जैवइंधनामुळे प्रदूषण कमी होईल.
c) जैवइंधनामुळे खनिजतेल वाचविता येते.
d) जैवइंधन स्वस्त आहे.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) (b) आणि (c)
3) (a), (b) आणि (c)
4) वरील सर्व
2) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) पारंपरिक कार इंजीन जैवइंधनावर चालू शकतात.
b) गॅसोलीन कार नामशेष होतील.
c) जैवइंधनामुळे प्रदूषण कमी होऊ शकते.
d) जैवइंधनामुळे वाहनांचे इंजीन बदलण्याचे कारण नाही.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b) बरोबर
2) (a), (b) आणि (c) बरोबर
3) (a), (c) आणि (d) बरोबर
4) वरील सर्व बरोबर
3) खालीलपैकी कोणते इंधन मोटारीत वापरल्यामुळे फोर्ड आणि डिझेल यांचे स्वप्न हवेत विरून गेले ?
1) बायोडिझेल
2) डिझेल
3) इथेनॉल
4) पेट्रोल
4) खालील विधान व निष्कर्ष यावरून योग्य पर्याय निवडा.
विधान : जैवइंधन हे खनिज तेलाला पर्याय ठरू शकते.
निष्कर्ष (A) : खनिज तेल निर्मितीला कोट्यावधी वर्ष लागतात.
(B) : खनिज तेलाच्या उत्सर्जनामुळे विषारी वायूंची निर्मिती होते.
पर्यायी उत्तरे :
1) निष्कर्ष (A) बरोबर व (B) चूक
2) निष्कर्ष (A) आणि (B) बरोबर
3) निष्कर्ष (A) आणि (B) चूक
4) निष्कर्ष (A) चूक व (B) बरोबर
5) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) ब्राझीलने जैवइंधन उत्पादनात आघाडी घेतली.
b) अमेरिकेत ऊसापासून इथेनॉल हस्तगत केले जाते.
c) युरोपातील जर्मन हा देश बायोडिझेलचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a) बरोबर आहे
2) फक्त (a) आणि (b) बरोबर
3) फक्त (a) आणि (c) बरोबर आहेत
4) सर्व बरोबर आहेत
(2) रसायनशास्त्र
1) आधुनिक आवर्तसारणीतील अणूची त्रिज्या हा आवर्ती गुणधर्म विचारात घेता खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
a) वरून खाली जाताना वाढते.
b) वरून खाली जाताना कमी होते.
c) डावीकडून उजवीकडे जाताना वाढते.
d) डावीकडून उजवीकडे जाताना कमी होते.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (d)
2) (a), (c)
3) (b), (d)
4) (b), (c)
2) टेट्राहेड्रल [Ni(CO)4] व्यामिश्रां/जटिल (complex) मध्ये विजोड इलेक्ट्रॉनची संख्या ...... आहे.
1) 0
2) 1
3) 2
4) 3
3) रासायनिक घटाचे विद्युतगामक बल धन असते, जेव्हा अभिक्रियेचा मुक्त ऊर्जा बदल हा ...... असतो.
1) > 0
2) < 0
3) = 0
4) मुक्त ऊर्जा बदल आणि विद्युतगामक बलाचा संबंध नाही
4) खालीलपैकी कोणत्या रासायनिक अभिक्रिया ऑक्सिडीकरण-क्षपण या प्रकारात मोडतात?
a) 2Mg + O2 → 2MgO
b) MnO2 + 4HCl → MnCl2 + 2H2O + Cl2
c) 2Na + Cl2 → 2NaCl
d) 2NaBr + H2O2 → 2 NaOH + Br2
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a), (d)
2) फक्त (b), (c)
3) फक्त (a), (b)
4) वरील सर्व
5) खालीलपैकी कोणास टरपिनॉइड समजले जातात?
1) फक्त मेंथॉल
2) फक्त अ जीवनसत्त्व
3) दोन्ही, मेंथॉल आणि अ जीवनसत्त्व
4) दोन्हीही नाही
(3) वनस्पतीविज्ञान
1) खालीलपैकी ...... कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननांद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केल्या जाते.
1) बडींग
2) लेअरींग
3) कटींग
4) ग्राफ्टींग
2) ”सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारांत वाढत्या प्रमाणांत मागणी आहे. ”
वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक ” वरील विधानाच्या ”संदर्भाने संयुक्तिक नाही. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा.
1) फुलांमध्ये नैसर्गिकरीत्या अॅन्टीऑक्सीडंट व अपमार्जन (ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची क्षमता) कार्यक्षमता असते.
2) फुलांमध्ये ”अन्थोसायनीन ” प्रचुर प्रमाणात असते.
3) फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात.
4) फुलं महत्त्वाची जीवनसत्त्वे व खनिजांचा (मिनरल्स) स्रोत आहे.
3) अॅमेझॉन जंगला विषयी योग्य विधान शोधा.
a) हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहे.
b) या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे.
c) या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापला आहे.
d) ह्या जंगलात मकाऊ, ट्युकन्स आणि ब्लॅक स्कीमर्स आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (a), (b), (c)
3) (a), (d)
4) (a), (b), (d)
सीसॅट पेपरमधील वनस्पतीशास्त्रासंबंधीचा उतारा
वनस्पती सृष्टी
वनस्पती सृष्टीमध्ये शेवाळे, ब्रायोफाईटस, टेरेडोफाईटस अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी ह्या गटांचा समावेश असतो. शेवाळे ही हरितद्रव्ये असलेली, साधी, स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारी आणि बहुतेकवेळा पाण्यात जगणारी वनस्पती असते. ह्या वनस्पतीमध्ये असणार्या रंगद्रव्यानुसार आणि संग्रहीत होणार्या अन्नप्रकारानुसार त्यांचे तीन गटात वर्गीकरण होते. जसे की, क्लोरोफायसी, फियोफायसी आणि र्होडोफायसी. शेवाळांमधील पुनरुत्पादन हे बहुतेकवेळा बाह्यवृद्धी विखंडनामुळे, अलैंगिक ही विविध प्रकारच्या बिजाणुंमुळे आणि लैंगिक ही विविध प्रकारचे गॅमेटस जे एकसारखे किंवा विविध आकाराचे अथवा ओगॅमिक असतात.
ब्रायोोफाईटस ही वनस्पती मातीमध्ये जगू शकते, परंतु लैंगिक पुनरुत्पादनासाठी ती पाण्यावर अवलंबून असते. ह्या वनस्पतीचे शरीर हे शेवाळापेक्षा अधिक विकसित असते. हे थॅलेसप्रमाणे चपटे अथवा उभे आणि खालील बाजूस मुळांनी चिकटलेले असते. त्यामध्ये मुळांप्रमाणे, पानांप्रमाणे आणि खोडांप्रमाणे अवयव असतात. ब्रामोफाईटस हे मॉस आणि लिव्हरवॉर्टस ह्या दोन गटांत विभागलेले असतात. लिव्हरवॉर्टस चे शरीर हे थॅलेसप्रमाणे चपटे वाढणारे असते. तर मॉस हे उभे वाढणारे, अरुंद खोडावर आवर्त पद्धतीने वाढणार्या पानांचे असते. ब्रामोफाईटस चे मुख्य अंग हे गॅमेंटस तयार करणारे असते, म्हणून त्याला गॅमेटोफाईट असे म्हणतात. त्यावर अॅन्थे्रडिआ हे पुरुष लिंग आणि अरचेगोनिआ हे स्त्रीलिंग असते. पुरुष आणि स्त्री बीजे यांचे संयोग होऊन झायगोट तयार होते. जे स्पोरोफाईट नावाचे अनेक पेशींचे अंग तयार करते. ते हप्लोइड बीजे तयार करतात. जी परत गॅमेंटोफाईटस मध्ये अंकुरीत होतात.
टेरेडोफाईटस मध्ये मुख्य शरीर हे स्पोरोफायटीक असते. जे मूळ, खोड आणि पानांत विभागलेले असते. ह्या सर्व अवयवांमध्ये पूर्ण वाढ झालेले ऊतक असतात. स्पोरोफाईटस वर बीजे तयार करणारी स्पोरांजीआ असतात. बीजे थंड, ओलसर जागी अंकुरीत होऊन त्यातून गॅमेंटोफाईटस तयार होतात. ह्या गॅमेटोफाईटस वर पुरुष लिंग-अन्थे्रडिआ आणि स्त्रीलिंग-आरचेगोनिआ वाढतात. पुरुष बीजे ही पाण्याच्या सान्निध्यात आरचेगोनिआवर येऊन त्यांच्या संयोगातून झायगोट तयार होते. हे झायगोट पुनःश्च स्पोरोफाईटस मध्ये अंकुरीत होते.
अनावृत्तबीजी ह्या वनस्पतीमध्ये अंडे (ओव्ह्युल) हे कोणत्याही प्रकारच्या आवरणामध्ये बंदिस्त नसते. संयोगीकरणानंतर तयार होणारी बीजे ही अनावृत्त असतात, म्हणून त्यांना अनावृत्त बीजधारी वनस्पती असेही म्हणतात. ही जिम्नोस्पर्मस त्यांच्या स्पोरोफीलस मध्ये अतिसूक्ष्म बीजे आणि मोठी बीजे ही अनुक्रमे मायक्रोस्पोरान्जीया आणि मेगॅस्पोरान्जीया मध्ये तयार करतात. ही सूक्ष्मस्पोरोफीलस आणि मोठी स्पोरोफीलस खोडावर आवर्तप्रमाणे रचलेले असतात. जी अनुक्रमे पुरुष शंकू आणि स्त्री शंकू तयार करतात. परागकण अंकुरीत होऊन पुरुष बीज हे परागनळीमधून स्त्रीबीजावर सोडले जाते. जेथे त्याचे स्त्री बीजाशी संयोग होऊन झायगोट तयार होते. झायगोट हे गर्भात तर ओव्ह्युल हे बीजात अंकुरते.
1) हरित द्रव्ये खालीलपैकी कोणत्या वनस्पतींमध्ये आढळून येतात ?
a) शेवाळ
b) ब्रायोफाईटस
c) टेरोडोफाईटस
d) अनावृत्त बीजधारी झाडे
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) (a) आणि (b)
3) (c) आणि (d)
4) (a), (b), (c) आणि (d)
2) .......... ह्या वनस्पतींमध्ये पूर्ण वाढ झालेली ऊतक असतात परंतु योग्य बिया नसतात.
1) शेवाळ
2) ब्रामोफाईटस
3) अनावृत्त बीजधारी वनस्पती
4) वरीलपैकी एकही नाही
3) ब्रामोफाईटस मध्ये हॅप्लोईड बीजे .............. ह्यामध्ये तयार होतात.
1) अनेक पेशींचे स्पोरोफाईटस
2) अनेक पेशींचे गॅमेटोफाईटस
3) एक पेशीचे गॅमेटोफाईटस
4) एक पेशीचे स्पोरोफाईटस
4) शेवाळ वनस्पती ही अन्नासाठी परावलंबी असतात आणि त्यामध्ये अनेक प्रकारची रंगद्रव्ये आढळतात.
a) वरील विधान पूर्णपणे बरोबर आहे.
b) वरील विधानातील पूर्वार्ध बरोबर आहे.
c) वरील विधान पूर्णपणे चूक आहे.
d) वरील विधानातील पूर्वार्ध चूक आहे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) (a) आणि (b)
3) फक्त (d)
4) (b) आणि (c)
5) अनावृत्त बीजधारी वनस्पतींमध्ये अतिसूक्ष्म बीजे ............... ह्यामध्ये तयार होतात.
1) मेगस्पोरान्जीआ जे सूक्ष्मस्पोरोफिलवर वाढते
2) माय्क्रोस्पीरान्जीआ जे सूक्ष्मस्पोरोफिलवर वाढते
3) मेगॅस्पोरान्जीआ जे मेगॅस्पोरोफिलवर वाढते
4) माय्क्रोस्पीरान्जीआ जे मेगॅस्पोरोफिलवर वाढते
(4) प्राणीविज्ञान
1) कोशिकांचे सर्वप्रथम वर्णन कोणी केले?
1) लॅमार्क
2) स्श्वान
3) रॉबर्ट हुक
4) रुडॉल्फ विरचौ
2) खालील जोड्या जुळवा (योग्य पर्याय निवडा) :
a) अॅरिस्टॉटल i) औषधशास्त्राचा जनक
b) थिओफ्रास्टस ii) अनुवंशिकशास्त्राचा जनक
c) हिप्पोक्रेट्स iii) वनस्पतिशास्त्राचा जनक
d) ग्रेगर जोहान मेंडेल iv) जीवशास्त्राचा जनक
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (i) (iv) (iii)
2) (iii) (ii) (iv) (i)
3) (iv) (iii) (i) (ii)
4) (i) (ii) (iv) (iii)
3) जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहिन प्राणी ............... आहे.
1) ऑक्टोपस
2) कटल फिश
3) कोलोस्सल स्क्वीड
4) जायंट स्क्वीड
4) जोड्या लावा :
स्तंभ-ख (प्राणी जाती) स्तंभ-खख (महत्त्व)
a) कीटक i) कीटकांना खातो
b) सर्प ii) पीक परागकण वाहक
c) बेडूक iii) जमिनीची सुपीकता
d) गांडूळ iv) उंदरांपासून संरक्षण
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (iv) (i) (iii)
2) (ii) (iv) (iii) (i)
3) (iii) (iv) (i) (ii)
4) (iv) (i) (iii) (ii)
5) समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये, पेशीत आणि ऊतीत घ+ आयनाची संहती ...... आणि छर+ आयनाची संहती ...... असते.
1) कमी, अधिक
2) कमी, कमी
3) अधिक, कमी
4) अधिक, अधिक
6) खालीलपैकी कोणत्या प्राण्यांच्या जाती 1952 च्या फार पूर्वी नष्ट होणार्या आहेत असे जाहीर करण्यात आले?
1) आशियातील चित्ता
2) आशियातील हत्ती
3) वाळवंटातील कोल्हा
4) गंगेतील डॉल्फिन
(5) मानवी आरोग्य व पोषण
1) खालीलपैकी कोणती विधान/विधाने ”सारकोमेअर” बद्दल सत्य आहे/आहेत?
a) सारकोमेअर हे कोणत्याही तंतूचे खंड आहेत.
b) ते ऊतकीय संरचना आणि क्रियात्मक कार्याचा भाग आहेत.
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (b) फक्त
3) (a) आणि (b) दोन्ही
4) वरीलपैकी कोणतेही नाही
2) खालीलपैकी कोणता प्रोटोझुआन रोग/आजार ”त्से त्से /टिसी टिसी ” माशी चावल्यामुळे होतो?
1) स्लिपिंग सिकनेस
2) दिल्ली बोली
3) काला आजार
4) चागास् रोग
3) आरे दुग्ध वसाहती विषयी योग्य विधाने शोधा :
a) ही वसाहत 1946 मध्ये तयार झाली.
b) आरे वसाहतीचे उद्घाटन पं. जवाहरलाल नेहरूंनी केले होते.
c) आरे जंगलातून 1970 नंतर फिल्म सिटी तयार करण्यात आली.
d) याची निर्मिती दुग्ध विकासासाठी दिलेल्या जमिनीवर करण्यात आली.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (b), (c), (d)
3) (b), (c)
4) (b), (d)
(6) पर्यावरणविज्ञान, परिस्थितिकी व प्रदूषण
1) पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा.
a) बायोस्फिअर i) महासागर, समुद्र, नद्या, तळे इ.
b) लिथोस्फिअर ii) वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव इ.
c) हायड्रोस्फिअर iii) पृथ्वीच्या सभोवतालचे, वायू आवरण
d) अॅटमॉसफिअर iv) पृथ्वीचा घन (खडकांचा) घटक
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (c)
1) (iii) (ii) (i) (iv)
2) (iv) (iii) (ii) (i)
3) (ii) (iv) (i) (iii)
4) (iii) (ii) (iv) (i)
2) वस्तीस्थान नष्ट होणे खालीलपैकी कोणत्या उपक्रमामुळे होऊ शकते?
a) निर्वणीकरण
b) दलदलींचे पुनःप्रापण
c) जमिनीच्या वापरात होणारे बदल
d) उदरनिर्वाह शेती
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a), (b) आणि (d)
2) फक्त (a), (b) आणि (c)
3) फक्त (a)
4) वरील सर्व
3) जोड्या लावा :
स्तंभ-I (नॅशनल पार्क) स्तंभ-II (राज्य)
र) नरमधाफा i) गोवा
ल) भगवान महावीर ii) उत्तराखंड
ल) सिमलीपाल iii) अरुणाचल प्रदेश
व) दुधवा iv) ओडिशा
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (ii) (iv) (iii) (i)
2) (i) (iii) (iv) (ii)
3) (iii) (i) (ii) (iv)
4) (iii) (i) (iv) (ii)
4) भारतातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांका विषयी योग्य विधाने शोधा :
a) हा निर्देशांक हवेची गुणवत्ता दररोज नोंदवतो.
b) जेवढा हा निर्देशांक अधिक तेवढी हवेच्या प्रदूषणाची पातळी अधिक असते.
c) भारतात 500 गुणांचा/बिंदूंचे प्रमाण वापरतात.
d) हा निर्देशांक मोजण्यासाठी मॉनिटर मुख्य प्रदूषकांच्या केंद्रीकरणाची नोंद घेते.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b), (c), (d)
2) (a), (b), (c)
3) (b), (c)
4) (b), (c), (d)
5) जोड्या लावा :
मनुष्याच्या कार्यांवर ध्वनी प्रदूषणाचे परिणाम.
स्तंभ-ख (आवाजाची पातळी) स्तंभ-खख (कार्य)
a) 100 db i) झोपेत अडथळा
b) 40 db ii) कार्यक्षमतेची हानी
c) 70 db iii) कायमची श्रवण क्षमतेची हानी
d) 90 db iv) भाषणात व्यत्यय
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
1) (iii) (i) (ii) (iv)
2) (iii) (i) (iv) (ii)
3) (i) (iii) (iv) (ii)
4) (iv) (ii) (iii) (i)
सीसॅट पेपरमधील पर्यावरणासंबंधीचा उतारा
सांडपाण्यावरील प्रक्रिया
जेव्हा सांडपाणी जमिनीवर पडते तेव्हा मातीत असणारे जिवाणू त्यावर आक्रमण करतात आणि सांडपाण्यातील घटकांचे वनस्पतींना उपयुक्त अन्नात रूपांतर करतात. वनस्पती नंतर ते आपल्या मुळांद्वारे शोषून घेतात. सांडपाण्यात असणारे सेंद्रिय पदार्थ एरोबिक आणि नॉनएरोबिक जिवाणू द्वारे अपघटीत होतात, परंतु जमिनीमार्फत होणारी एरोबिक अपघटन क्रिया अधिक फायदेशीर असते. एरोबिक अपघटनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन हा जमिनीच्या विविध थरांमध्ये उपलब्ध असतो. अपघटनामुळे तयार होणारा कार्बनडायऑक्साइड हा जमिनीकडून वातावरणास दिला जातो व त्या बदल्यात वातावरणातील ऑक्सिजन शोषून घेतला जातो. ही ऑक्सिजन आणि कार्बनडाय ऑक्साइडची देवाणघेवाण वार्याचे वहन, तापमानातील बदल, बदलणारा दाब, मातीचे गाळप इत्यादी प्रक्रियांमुळे होते. जेव्हा सांडपाणी जमिनीवर टाकले जाते तेव्हा ऑक्सिडेशन रासायनिक प्रक्रिया सुरू होते. त्यामध्ये सांडपाण्यातील सेंद्रिय घटकांचे जमिनीतील जिवाणू ऑक्सिडेशन करतात. गाळणाचे तत्त्व हे भौतिक प्रक्रियेचे जमिनीमार्फत होणार्या सांडपाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेचे मुख्य तत्त्व आहे. जेव्हा सांडपाणी जमिनीच्या विविध थरातून संक्रमित होते, तेव्हा त्याचे विविध कण जमिनीच्या थरांमधील सूक्ष्म छिद्रांमध्ये अडकवून ठेवले जातात. नंतर पुरेशा हवेच्या सान्निध्यात एरोबिक जिवाणू त्यांचे ऑक्सिडेशन करतात. ही भौतिक प्रक्रिया मुख्यत्वे जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असते. सरंध्र मोकळ्या, कणीदार, मृदू जमिनीमध्ये ही गाळण प्रक्रिया अधिक उत्तम आणि समाधानकारक असते. जड आणि चिकट माती ही गाळण प्रक्रियेसाठी फारशी उपयुक्त नसते तर खडकाळ जमीन ही गाळण प्रक्रियेसाठी पूर्णतः निरुपयोगी असते.
सांडपाण्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते जे सिंचन प्रक्रियेसाठी वापरले जाते. सांडपाण्यामध्ये नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फेटस आणि सेंद्रिय आम्ले इत्यादी असतात. म्हणूनच त्यांचे पोषणमूल्य जास्त असते, या घटकांमुळेच सांडपाण्याचा वापर वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी त्वरित करू शकतात. याचाच अर्थ सांडपाण्यामुळे जमिनीचे पोषणूल्य वाढते व तिचा पोत सुधारतो. सदर जमिनीवर कोणते पिक घ्यायचे हे प्रामुख्याने त्यामध्ये असणार्या सांडपाण्याच्या प्रमाणावर आणि दर्जावर निर्धारित असते.
1) सांडपाण्याचे वनस्पती खाद्यामध्ये रूपांतर ....... मुळे होते.
a) भौतिक प्रक्रिया
b) रासायनिक क्रिया
c) कार्बन डायऑक्साइड
d) जिवाणू
पर्यायी उत्तरे :
1) (a), (c)
2) (b), (c)
3) (b), (d)
4) (b), (c), (d)
2) खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
a) गाळणे ही भौतिक क्रिया आहे
b) मातीमध्ये तयार झालेल्या ऑक्सिजनची वातावरणातील कार्बन डायऑक्साइड बरोबरची अदलाबदल तापमानावर अवलंबून असते.
c) सांडपाणी, जमिनीची सुपीकता वाढवते
d) सेंद्रिय पदार्थाचे अपघटन हे एरोबिक किंवा नॉनएरोबिक जिवाणूंद्वारे होते.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a) आणि (c)
2) फक्त (a) आणि (d)
3) फक्त (b) आणि (d)
4) (a), (c) आणि (d)
3) खालीलपैकी कोणती विधाने चूक आहेत य
a) जिवाणूंच्मा नॉनएरोबिक अपघटनाला, एरोबिक अपघटनापेक्षा प्राधान्य दिले जात नाही.
b) सरंध्र मातीला गाळण क्रियेत प्राधान्य दिले जात नाही.
c) मातीत असलेले सेंद्रिय आम्ल मातीची सुपीकता कमी करतात.
d) खडकाळ जमीन, गाळण प्रक्रियेला आणि नॉनएरोबिक अपघटनाला उपयुक्त नाही
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (b) आणि (c)
2) फक्त (c) आणि (d)
3) (a), (b), (c)
4) (b), (c), (d)
4) सांडपाण्याच्या जिवाणू मार्फत होणार्या एरोबिक अपघटनाच्या प्रक्रियेत .......
a) आवश्यक असलेला ऑक्सिजन हा सरळ वातावरणातून घेतला जातो.
b) तयार झालेल्या कार्बन डामऑक्साईडची अदलाबदल वातावरणातील ऑक्सिजन बरोबर होते.
c) मातीच्या विविध थरात उपलब्ध असलेला कार्बन डायऑक्साइड वापरला जातो.
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (b)
2) (b)
3) (b) आणि (c)
4) वरीलपैकी कोणतेही नाही
5) सांडपाण्यामध्ये प्रमुख हिस्सा ......... ह्याच/ह्यांचा असतो.
a) सेंद्रिय पदार्थ
b) नायट्रोजन
c) कण पदार्थ
d) पाणी
पर्यायी उत्तरे :
1) (a) आणि (d)
2) (b) आणि (d)
3) (c) आणि (d)
4) (d)
उत्तरे : प्रश्नमंजुषा (112)
(1) भौतिकशास्त्र
1-2
2-4
3-1
4-1
5-3
6-2
7-3
सीसॅट पेपरमधील भौतिकशास्त्रा संबंधीचा उतारा
भौतिकशास्त्र
1-4
2-2
3-1
4-3
5-3
6-3
जैवइंधन
1-4
2-3
3-4
4-2
5-3
(2) रसायनशास्त्र
1-1
2-1
3-2
4-4
5-3
(3) वनस्पतीविज्ञान
1-4
2-3
3-4
सीसॅट पेपरमधील वनस्पतीशास्त्रासंबंधीचा उतारा
वनस्पती सृष्टी
1-4
2-4
3-1
4-3
5-2
(4) प्राणीविज्ञान
1-3
2-3
3-3
4-1
5-3
6-1
(5) मानवी आरोग्य व पोषण
1-3
2-1
3-2
(6) पर्यावरणविज्ञान, परिस्थितिकी व प्रदूषण
1-3
2-2
3-4
4-1
5-2
सीसॅट पेपरमधील पर्यावरणासंबंधीचा उतारा
सांडपाण्यावरील प्रक्रिया
1-3
2-4
3-1
4-2
5-4