राष्ट्रपती राजवट / प्रश्नमंजुषा (109)
- 30 Mar 2021
- Posted By : study circle
- 1127 Views
- 1 Shares
प्रश्नमंजुषा (109)
1) खालीलपैकी कोणत्या कलमाखाली राज्यपालांनी शपथ घेतलेली असते की मी राज्यघटनेशी प्रामाणिक राहीन?
1) कलम 161
2) कलम 163
3) कलम 159
4) कलम 162
2) 359 कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी काळात ......
अ) कलम 19 नुसारचे सर्व मूलभूत हक्क निलंबित होतात.
ब) कलम 19 नुसारचे सर्व मूलभूत हक्क बिजावण्याचा नागरिकांचा हक्क निलंबित होतो.
क) राष्ट्रीय आणीबाणी उठल्यानंतर ते हक्क पूर्ववत होतात.
ड) कलम 20 आणि 21 नुसारचे मूलभूत हक्क अबाधित असतात.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
3) आणीबाणीच्या काळात राज्य विधानसभा किंवा लोकसभा यांचा कार्यकाल 1 वर्षापर्यंत वाढविता येतो ?
1) राष्ट्रीय आणीबाणी - अनुच्छेद 352
2) राष्ट्रपती शासन - अनुच्छेद 356
3) आर्थिक आणीबाणी - अनुच्छेद 360
4) वरील सर्व
4) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार वागत असल्याने प्रत्यक्षात याचा अर्थ असा होतो की ...
अ) राज्यपालांना नेमणे आणि काढणे दोन्ही पंतप्रधानांच्या हातात आहे.
ब) त्यामुळे राज्यपाल कायम पंतप्रधानांची मर्जी सांभाळतात.
क) ही राजकीय वस्तुस्थिती देशातील सर्व पंतप्रधानांच्या बाबतीत दिसून आलेली आहे.
ड) कलम 74 कलमाखाली मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ, ब आणि ड बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
5) डॉ. आंबेडकर यांनी कोणत्या तरतुदींचा उल्लेख हा मृतवत तरतूद असा केला होता ?
1) घटनेच्या कलम 360 नुसारची तरतूद
2) घटनेच्या कलम 365 नुसारची तरतूद
3) घटनेच्या कलम 355 नुसारची तरतूद
4) घटनेच्या कलम 356 नुसारची तरतूद
6) राष्ट्रपतींनी एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली असेल तर ती, लागू केल्याच्या तारखेपासून .....
अ) 2 महिन्यापर्यंत अस्तित्त्वात असते.
ब) संसदेच्या साध्या बहुमताद्वारे ती कमाल 1 वर्षापर्यंत वाढविता येते.
क) 6 महिन्यापर्यंत अस्तित्त्वात असते.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क
7) पुड्डुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील सध्याची राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या कलमानुसार लागू आहे ?
1) भारतीय संविधानाच्या कलम 293 एबी नुसार
2) भारत सरकारचा केंद्रशासित प्रदेश कायदा 1963 च्या कलम 73 नुसार
3) भारत सरकारचा केंद्रशासित प्रदेश कायदा 1963 च्या कलम 51 नुसार
4) भारतीय संविधानाच्या कलम 293 एबी नुसार
8) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) 356 कलमातील तरतुदी, विधानसभेची तरतूद असलेल्या केंद्र शासित प्रदेशांना लागू होत नाहीत.
ब) 356 कलमातील तरतुदी, विधानसभेची तरतूद नसलेल्या केंद्र शासित प्रदेशांना लागू होतात.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त अ
2) फक्त ब
3) अ आणि ब दोन्ही
4) कोणतेही नाही
9) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
2021 च्या एप्रिल महिन्यापर्यंत ....
1) देशात सर्वाधिक काळ राष्ट्रपती राजवट जम्मू आणि काशमीर मध्ये लागू झालेली आहे.
2) मणिपूर राज्यात सर्वात जास्त म्हणजे 10 राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे.
3) उत्तर प्रदेशमध्ये 9 वेळा राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे.
4) छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्यामध्ये एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही.
10) देशात 2021 पर्यंत ....
अ) राष्ट्रीय आणीबाणी तीनवेळा लागू झालेली आहे.
ब) आर्थिक आणीबाणी एकदाही लागू झालेली नाही.
क) 356 कलमान्वये राष्ट्रपती राजवट देशभरात 131 वेळा लागू केली गेली आहे.
ड) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात 355 या कलमाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग केला जातो.
पर्यायी उत्तरे :
1) अ, ब आणि क बरोबर
2) ब, क आणि ड बरोबर
3) अ आणि ब बरोबर
4) अ, क आणि ड बरोबर
11) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
राष्ट्रपती राजवट लागू झाली की .....
1) राज्यपाल आणि राज्यातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते.
2) विधीमंडळाची सत्ता संसदेकडे जाते.
3) उच्च न्यायालयावर तसेच नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर काही परिणाम होत नाही.
4) राज्यपाल राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करु शकतात.
12) 356 कलमावर अशी टिका करण्यात येते की, घटकराज्यांना नामोहरम करण्यासाठी केंद्राच्या हातातील ते एक शस्त्र आहे. कारण ....
a) राष्ट्रपती राजवटीच्या काळात राष्ट्रपती घटनेच्या कलम 19 अन्वये दिलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा घालू शकतो.
b) जीविताचा अधिकार वा स्वसंरक्षणाचा अधिकार (कलम 20 आणि 21) सोडल्यास इतर व्यक्तिस्वातंत्र्य भंग झाले, तर घटनात्मक उपायांचे अधिकारही संपुष्टात येतात. त्
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) व (b) दोन्ही
4) दोन्हीही नाहीत
13) खालीलपैकी कोणते विधान एस. आर. बोमई खटल्याच्या (1994) निकालासंदर्भात चुकीचे आहे ?
1) राष्ट्रपती राजवट हा शेवटचा उपाय आहे.
2) ज्या राज्यात सरकारला बहुमत आहे, अशा राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही.
3) राज्यातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकरता राज्यावर राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही.
4) राष्ट्रपती राजवट योग्य/अयोग्य यावर पुनर्विचाराचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.
14) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (राष्ट्रीय आणीबाणी) स्तंभ ब (कारण)
अ. 1962 I. देशांतर्गत अशांतता व अव्यवस्था
ब. 1971 II. भारत- चीन युद्ध
क. 1975 II. भारत- पाकिस्तान युद्ध
पर्यायी उत्तरे :
अ ब क
(1) II I III
(2) III I II
(3) II III I
(4) I III II
15) खालीलपैकी कोणते विधान 163 कलमानुसार राज्यपालांना मिळालेल्या तारतम्य अधिकारासंदर्भात अयोग्य आहे ?
1) विधानपरिषदेवरील राज्यपालनियुक्त सदस्यांची निवड करणे.
2) 356 कलमान्वये राष्ट्रपती राजवट शिफारशीसाठी मुख्यमंत्र्यांचा सल्ला आवशयक नाही.
3) एखाद्या कायद्याचे विधेयक राष्ट्रपतींकडे विचारार्थ ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाचा सल्ला आवशयक नाही.
4) शेजारच्या राज्याचा/केंद्रशासित प्रदेशाचा अतिरिक्त कारभार राज्यपालांकडे असल्यास त्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सल्ला आवशयक नाही.
16) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (राज्यपालाची भूमिका) स्तंभ ब (तज्ज्ञ)
अ. राज्यपाल घटनेचे रक्षक आहेत की भक्षक आहेत? I. सोली सोराबजी
ब. राज्यपाल केंद्राचे नोकर असल्यासारखे वागतात. II. घटनातज्ज्ञ डी. डी. बासू
क. राज्यपालांनी अंपायरसारखी निःपक्षपाती वागावे. III. सर्वोच्च न्यायालय
पर्यायी उत्तरे :
अ ब क
(1) I III II
(2) II III I
(3) I II III
(4) III II I
17) खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपती राजवटीविरोधात कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही, अशी तरतूद झाली होती ?
1) 38 व्या घटनादुरुस्तीद्वारे (1975)
2) 44 व्या घटनादुरुस्तीद्वारे (1979)
3) 78 व्या घटनादुरुस्तीद्वारे (1994)
4) 88 व्या घटनादुरुस्तीद्वारे (2002)
18) बाबरी मशीद पाडल्यावर उत्तर प्रदेशमध्ये कल्याणसिंह यांना बहुमत असूनही राष्ट्रपती राजवट लावण्यात आली. ती योग्य होती असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते, कारण ....
1) केंद्राने दिलेल्या आदेशांची कल्याणसिंह सरकारने अंमलबजावणी केली नाही.
2) कल्याणसिंह सरकार घटनात्मक पद्धतीने काम करीत नसल्याचा अहवाल राज्यपालांनी पाठविला.
3) कल्याणसिंह सरकारने बहुमत गमावले होते.
4) ती एस. आर. बोमई निवाड्यानुसार लागू केली गेली होती.
19) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : एखाद्या मंत्र्यांने भ्रष्ट्राचार केला किंवा एखाद्या अधिकार्याने मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते.
कारण (र) : राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी ठोस कारण असावे लागते.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
20) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात अनुच्छेद 352 ते 360 मध्ये आणीबाणीच्या परिस्थितीबाबत तरतुदी आहेत.
1) 16 व्या भागात
2) 19 व्या भागात
3) 21 व्या भागात
4) 18 व्या भागात
21) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती राजवटीचा निर्णय रद्द करू शकते.
कारण (र) : सुप्रीम कोर्टाने उत्तराखंडमध्ये लावण्यात आलेली राष्ट्रपती राजवट असंवैधानिक असल्याचा निर्णय दिला होता.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
22) कोणत्या घटनादुरुस्तीनंतर राष्ट्रपती राजवट योग्य/अयोग्य यावर पुनर्विचाराचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला मिळाला आहे ?
1) बेचाळीसाव्या
2) सेचाळीसाव्या
3) चव्वेचाळीसाव्या
4) चाळीसाव्या
23) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
विधान (अ) : राष्ट्रपती कॅबिनेट किंवा राज्यपालांचा राष्ट्रपती राजवटीचा निर्णय/अहवाल परत पाठवू/ नाकारु शकतात.
कारण (र) : 1994 च्या बोम्मई खटल्यात त्यांना तसा अधिकार मिळालेला आहे.
पर्यायी उत्तरे :
(1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
(2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
(3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
(4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
24) आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कोणाच्या वेतनात आवश्यकतेनुसार राष्ट्रपती कपात करू शकतो ?
1) केंद्र वा राज्य सरकारच्या कर्मचार्यांच्या
2) सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या
3) वरील दोन्ही
4) यापैकी नाही
25) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट) स्तंभ ब (कारण)
अ. पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट I. निवडणूकीनंतर कोणत्याही पक्षास बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे
ब. दुसर्यांदा राष्ट्रपती राजवट II. केंद्र व राज्यात वेगवेगळ्या पक्षाची सत्ता
क. तिसर्यांदा राष्ट्रपती राजवट II. राज्य सरकार अल्पमतात
पर्यायी उत्तरे :
अ ब क
(1) I III II
(2) II I III
(3) III II I
(4) II III I
26) आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी ......
1) संसदेची साध्या बहुमताने मान्यता आवश्यक असते.
2) संसदेची साध्या बहुमताने व देशातील निम्म्यापेक्षा जास्त विधानसभांची मान्यता आवश्यक असते.
3) संसदेची 2/3 बहुमताने मान्यता आवश्यक असते.
4) संसदेची 2/3 बहुमताने व देशातील निम्म्यापेक्षा जास्त विधानसभांची मान्यता आवश्यक असते.
27) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (आणीबाणीचा प्रकार) स्तंभ ब (तरतूद)
अ. राष्ट्रीय आणीबाणी I. कलम 360
ब. आर्थिक आणीबाणी II. कलम 356
क. राष्ट्रपती शासन III. कलम 352
पर्यायी उत्तरे :
अ ब क
(1) II III I
(2) III I II
(3) III II I
(4) I III II
28) एखाद्या राज्यात लागू केलेली राष्ट्रपती राजवट ....
1) राष्ट्रपती संसदेच्या परवानगीनेच उठवू शकतात.
2) राष्ट्रपती कॅबिनेटच्या परवानगीनेच उठवू शकतात.
3) राष्ट्रपती कोणत्याही वेळी संसदेच्या परवानगी शिवाय उठवू शकतात.
4) तिची मुदत संपल्यावर राष्ट्रपती संसदेच्या परवानगीने उठवू शकतात.
29) राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते :
a) जेव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते.
b) जर राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल.
c) जर केंद्राने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल.
d) जेव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्त्वाच्या मुद्यावर मतभिन्नता असेल.
पर्यायी उत्तरे :
1) (a), (b) आणि (c)
2) (b) आणि (c)
3) (a), (b) आणि (d)
4) (b), (c) आणि (d)
30) एस.आर. बोम्मई विरुद्ध भारत सरकार या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधात खालील विधाने विचारात घ्या ः
a) न्यायालयाने सांगितले की, राष्ट्रपतीने संसदेने मान्यता दिल्यानंतरच राज्य विधानसभा विसर्जित करावी.
b) जर संसदेने घोषणेला मान्यता दिली नाही तर विधानसभा पुनर्जीवित करण्यात यावी.
c) राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या समर्थनार्थ योग्य ती सुसंबंद्ध कारणे आहेत, ती सिद्ध करण्याची जबाबदारी केंद्राची आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
1) फक्त (a)
2) (a) आणि (b)
3) (a) आणि (c)
4) वरील सर्व
31) भारतीय संविधानाच्या कलम 356 च्या विषयी अनेक वादविवाद उत्पन्न झाले आहेत. खालीलपैकी कोणत्या विषयाशी या कलमाचा संबंध असल्याने ते विवादास्पद ठरते ?
1) राज्याराज्यांत पाण्याचे वाटप
2) राज्यांना आर्थिक बाबींमध्ये अधिक स्वायत्तता
3) राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे.
4) काश्मीरचा दर्जा
32) राज्यपाल राज्याचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात त्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
a) राष्ट्रपती - त्या विधेयकाला मान्यता द्यावी की परत पाठवावे हा निर्णय घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात.
b) राष्ट्रपतींवर अनुमती दिली आहे किंवा अनुमती राखून ठेवल्याचे घोषित करण्यासाठी संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन घातलेले नाही.
c) जर राज्य विधीमंडळाने तेच विधेयक दुसर्यांदा पारित केले तर त्यास राष्ट्रपतींनी मान्यता देणे त्यांच्यावर बंधनकारक असते.
पर्यायी उत्तरे :
1) (a)
2) (b)
3) (c)
4) वरीलपैकी एकही नाही
33) राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
a) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.
b) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करू शकतात.
c) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
d) एकदा का राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.
पर्यायी उत्तरे :
1) (a) फक्त
2) (b), (c), (d)
3) (a), (d)
4) (a), (b), (d)
34) 44 व्या घटनादुरुस्तीनुसार, एखाद्या राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट या अटी पूर्ण केल्यास राष्ट्रपती राजवट 1 वर्षापेक्षा जास्त काळ राहू शकते.
अ) संपूर्ण देशात राष्ट्रीय आणिबाणी असल्यास
ब) केंद्रीय निवडणूक आयोगाने संबधित राज्यात नव्याने निवडणूका घेणे शक्य नसल्याचा अहवाल दिल्यास
क) राष्ट्रपतींनी स्वतः संबधित राज्यात घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्याची खात्री करुन घेतल्यास
ड) देशातील कोणत्याही भागात राष्ट्रीय आणिबाणी असल्यास.
पर्यायी उत्तरे :
1) विधाने अ, ब आणि क बरोबर
2) विधाने ब, क आणि ड बरोबर
3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
4) विधाने अ, क आणि ड बरोबर
35) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
1) राज्याच्या राज्यपालांच्या अहवालाच्या आधारे अथवा राज्यपालांच्या अहवालाशिवाय अनुच्छेद 356 खाली राष्ट्रपती राजवट लादली जाऊ शकते.
2) राष्ट्रपती राजवट लादण्याच्या निर्णयास संसदेच्या दोन्ही सभागृहांची एक महिन्याच्या आत मान्यता मिळाली पाहिजे.
3) संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवट सहा महिन्यापर्यंत चालू राहते.
4) राज्यशासनाने विधानसभेचा विश्वास गमावला आहे किंवा नाही या प्रश्नाचा निर्णय केवळ सभागृहाच्या पटलावरच झाला पाहिजे.
36) अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या ः
अ) तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर.
ब) राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर.
1) विधान ’अ’ बरोबर
2) विधान ’ब’ बरोबर
3) दोन्हीही विधाने बरोबर
4) दोन्हीही विधाने चुकीची
37) ‘कॅबिनेट‘ या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो ?
1) कलम 74
2) कलम 75
3) कलम 352
4) कलम 353
38) खालील विधाने विचारात घ्या :
a) भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत.
b) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 356 राज्य आणीबाणीशी (राष्ट्रपती राजवट) संबंधित आहे.
c) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र.360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
1) फक्त (a)
2) (a) आणि (b)
3) (b) आणि (c)
4) (a), (b) आणि (c)
39) खालीलपैकी कोणता राज्याच्या राज्यपालाचा स्व-विवेकाधीन अधिकार नाही?
1) विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे.
2) विधान सभा बरखास्त करणे.
3) विधान सभेवर एका आंग्ल-भारतीयाची नियुक्ती करणे.
4) घटकराज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळल्यास राष्ट्रपतीकडे तसा अहवाल पाठविणे.
40) खालील जोड्या योग्यपणे जुळवा :
(कलमे) (तरतुदी)
अ) कलम-352 I) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट
ब) कलम-356 II) आर्थिक आणीबाणी
क) कलम-371 III) राष्ट्रीय आणीबाणी
ड) कलम-360 Iv) महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या संदर्भात विशेष तरतूद
खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा ः
अ ब क ड
1) II IV I III
2) II IV I III
3) III I IV II
4) IV III II I
41) चुकीची तरतूद ओळखा :
राष्ट्रीय आणीबाणी (अनुच्छेद-352) राष्ट्रपती राजवट (अनुच्छेद-356)
1) एक महिन्याच्या आत : संसदेची मान्यता दोन महिन्याच्या आत संसदेची मान्यता
2) विशेष बहुमताद्वारे : संसदेची मान्यता साध्या बहुमताद्वारे संसदेची मान्यता
3) तिचा कमाल अमलात : राहण्याचा कालावधी तिचा कमाल अमलात राहण्याचा कालावधी
विहित (ठरलेला) आहे. वहित (ठरलेला) नाही.
4) तिला मागे घेण्यासाठी : लोकसभा ठराव ती केवल राष्ट्रपतीद्वारे
मंजूर करू शकते. मागे घेता येऊ शकते.
42) जेव्हा आणीबाणीची उद्घोषणा अंमलात असेल तेव्हा राष्ट्रपतीला आदेशाद्वारे (अनुच्छेद 20 व 21 खेरीज) भारतीय संविधानाच्या भाग तीन अंतर्गत येणारे मूलभूत हक्क, खालील दिलेल्यापैकी कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत निलंबित करता येईल?
a) 360
b) 361
c) 358
d) 359
पर्यायी उत्तरे -
1) (a) फक्त
2) (b) फक्त
3) (d) फक्त
4) (a) आणि (b) फक्त
43) राज्यपालांचा खालीलपैकी कोणता स्वेच्छाधीन अधिकार नाही ?
1) राज्य विधान परिषदेत एक शष्टांश सदस्य नामनिर्देशित करणे.
2) राष्ट्रपतींच्या संमतीसाठी विधेयक राखून ठेवणे.
3) जेव्हा विधान सभेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तेव्हा मुख्यमंत्र्याची नेमणूक करणे.
4) राज्यात राष्ट्रपती शासन लादण्यासाठी शिफारस करणे.
44) युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणार्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यास घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत? योग्य पर्याय निवडा.
a) केंद्र व राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदींमध्ये केंद्र बदल करू शकते.
b) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते.
c) राज्य सूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते.
d) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचार्यांना पगारात कपात करण्याचे आदेश देऊ शकते.
1) (a), (c), (d)
2) (a), (b), (d)
3) (a), (b), (c)
4) (b), (c), (d)
45) खालील विधाने विचारात घ्या :
अ) राज्यघटनेतील केंद्र-राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुच्छेद 256) आणीबाणी विषयक तरतुदी (अनुच्छेद - 352, 353, 356) या 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणार्या आहेत.
ब) राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारा संबंधीच्या तरतुदी देखील 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते, त्याच्याशी जुळणार्या आहेत.
1) विधान अ बरोबर आहे, ब चुकीचे आहे.
2) विधान ब बरोबर आहे, अ चुकीचे आहे.
3) दोन्हीही विधाने बरोबर आहेत.
4) दोन्हीही विधाने चुकीची आहेत.
46) घटनात्मक दृष्ट्या राज्यपालाचे खालीलपैकी कोणता/ते विवेकाधिकार नाहीत ?
अ) विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे.
ब) जेव्हा राज्यविधीमंडळाचे अधिवेशन चालू नसते तेव्हा अध्यादेश काढणे.
क) विधान परिषदेवर सदस्य नामनिर्देशित करणे.
ड) मंत्रिमंडळाने बहुमत गमावले असता विधानसभा विसर्जित करणे.
पर्यायी उत्तरे :
1) फक्त क
2) फक्त अ,ब आणि क
3) फक्त ब,क आणि ड
4) फक्त ब आणि क
47) केंद्र सरकारच्या राज्यांना निर्देश देण्याच्या अधिकारात या गोष्टींचा समावेश होतो.
अ) लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या दळणवळणाच्या साधनांचे बांधकाम आणि दुरुस्ती
ब) राज्यातील काही लोक वापरत असलेल्या भाषेला मान्यता
क) राज्यामधील रेल्वेमार्गाचे संरक्षण
ड) मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी
इ) राज्य सूचीतील विषयांवर केलेल्या कायद्याची अंमलबजावणी
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
1) क, ड, इ
2) ब, क, ड
3) अ, ब, ड
4) अ, ब, क
48) खालील विधाने विचारात घ्या ः
a) भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे.
b) राज्याच्या सीमेबाबतीत संंबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
पर्यायी उत्तरे :
1) फक्त (a)
2) फक्त (b)
3) (a) आणि (b)
4) दोन्हीही चुकीची
उत्तरे : प्रश्नमंजुषा (109)
1-3
2-2
3-1
4-4
5-4
6-2
7-3
8-1
9-1
10-3
11-4
12-3
13-4
14-3
15-1
16-3
17-1
18-1
19-4
20-4
21-1
22-3
23-3
24-3
25-4
26-3
27-2
28-3
29-2
30-4
31-3
32-3
33-3
34-4
35-2
36-4
37-3
38-2
39-3
40-3
41-3
42-3
43-1
44-4
45-1
46-3
47-4
48-4