भारत-जपान सामंजस्य करार

  • भारत-जपान सामंजस्य करार

    भारत-जपान सामंजस्य करार

    • 02 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 16 Views
    • 0 Shares

    भारत-जपान सामंजस्य करार

    1 नोव्हेंबर 2020 - चीनच्या भारत विरोधात वाढत्या कारवाया लक्षात घेऊन केंद्र सरकारने,  माहिती तसेच दळवळण तंत्रज्ञान क्षेत्रात भारत-जपान द्विपक्षीय सहकार्य करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्यामुळे पुढील अनेक क्षेत्रामध्ये देशाला जपानकडून सहकार्य मिळणार आहे -

    1)  5 जी नेटवर्क

    2)  दूरसंचार सुरक्षा

    3)  सबमरीन केबल

    4)  दूरसंचार क्षेत्रामध्ये वापरण्यात येणार्‍या उपकरणांचे प्रमाणिकरण आणि प्रमाणपत्र

    5)  अत्याधुनिक बिनतारी संदेश तंत्रज्ञान

    6)  आयसीटी क्षमता निर्माण करणे

    7)  सार्वजनिक संरक्षण

    8)  आपत्ती निवारण

    9)  कृत्रिम बुद्धिमत्ता

    10)  व्यवस्थापन

    • जपानबरोबरच्या या सामंजस्य सहकार्य करारामुळे भारताला जागतिक स्तरावरच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक संधी मिळू शकतील. आयसीटी तंत्रज्ञान सहकार्यामुळे देशामध्ये आयसीटी पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत मिळेल. नेटवर्क आणि तंत्रज्ञानाच्या सहकार्यामुळे देशातल्या दुर्गम भागाशी संपर्क साधणे शक्य होईल. आयसीटी क्षेत्रामध्ये मनुष्य बळ क्षमता निर्माणासाठी आणि स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देताना आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साध्य करणेही शक्य होणार आहे.

Share this story

Total Shares : 0 Total Views : 16