पर्यावरण / प्रश्‍नमंजुषा (१८२)

  • पर्यावरण / प्रश्‍नमंजुषा (१८२)

    पर्यावरण / प्रश्‍नमंजुषा (१८२)

    • 07 Jun 2021
    • Posted By : STUDY CIRCLE
    • 2793 Views
    • 5 Shares
    प्रश्‍नमंजुषा (१८२)
    १)  परिसंस्था पुनरुज्जीवनासाठी उपयुक्त अशा तीन आर च्या नियमात कोणत्या आर चा समावेश होत नाही ?
        १) रेड्यूस
        २) रियुझ
        ३) रिस्ट्रेन
        ४) रिसायकल

    २)  कार्बन फूटप्रिंट म्हणजे  ....
        १) एखाद्या प्रक्रियेतून जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या सीओटूचे उत्सर्जन किती झालं, याची गोळाबेरीज.
        २) प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेसाठी उपयुक्त सीओटू आणि त्यावेळी उत्सर्जन झालेल्या ओटू चे गुणोत्तर
        ३) एखाद्या प्रक्रियेतून जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या वायूंचं उत्सर्जन किती झालं, याची गोळाबेरीज.
        ४) एखाद्या प्रक्रियेतून जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या वायूंचं उत्सर्जन किती झालं, याची गोळाबेरीज.

    ३)  ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)‘आणि ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’ या संस्थांनी २०१६ साली केलेल्या एका अभ्यासानुसार आपल्या देशाचे झपाटयाने वाळवंटीकरण होत असून त्यात ....
              a) राजस्थान पहिल्या स्थानी आहे.
              b)  महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी आहे.
              वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        १) फक्त (a)
        २) फक्त (b)
        ३) (a) (b) दोन्ही
        ४) दोन्हीही नाहीत

    ४)  खालील विधाने विचारात घ्या :
        अ) मांसाहारी पदार्थांची कार्बन फूटप्रिंट तुलनेनं कमी असते.
        ब) शाकाहारी पदार्थांची कार्बन फूटप्रिंट सर्वात कमी असते.
        क) वेगान पदार्थांची कार्बन फूटप्रिंट सर्वात जास्त असते.
        ड) कार्बन फूटप्रिंट आणि जलसिंचनाचा जवळचा संबंध आहे.
        पर्यायी उत्तरे :
        १) विधाने अ, ब आणि क बरोबर
        २) विधाने ब, क आणि ड बरोबर
        ३) विधाने अ, ब आणि ड बरोबर   
        ४) विधाने अ, , क आणि ड  चूक

    ५)  गायीला ......... खाऊ घातलं तर मिथेनचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण होण्यास मदत होते.
        १) हिरवा चारा
        २) कोरडा चारा
        ३) सागरी शेवाळं
        ४) वरील सर्व

    ६)  खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
        विधान (अ) : मिथेन गॅस हा कार्बन डायऑक्साईडच्या तुलनेत २५ पटींनी अधिक ग्लोबल वॉर्मिंग निर्माण करतो.
        कारण (र) :  मिथेन वायू  उष्णता शोषून घेतो, तर कार्बन डायऑक्साईड वायू उष्णता निर्माण करतो.
        पर्यायी उत्तरे :
        (१)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
        (२)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
        (३)  (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
        (४)  (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.

    ७)  भातशेतीमध्ये तण उगवू नयेत म्हणून पूर्ण शेतात पाणी सोडलं जातं. या पाण्यामुळे .......
        १) ऑक्सिजन खालच्या मातीपर्यंत पोहोचू शकत नाही.
        २) सूक्ष्मजीवाणूंना मिथेन गॅसची निर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होतं.
        ३) सूक्ष्मजीवाणूंना कर्ब गॅसची निर्मिती करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होतं.
        ४) १ आणि २

    ८)  सीरियातल्या गृहयुद्धामुळे अलेप्पो शहरातली बियाणांची बँक नष्ट झाली होती, त्यावेळी नॉर्वेमधल्या ग्लोबल सीड व्हॉल्टमध्ये ठेवण्यात आलेल्या पिकांची लागवड ......... या देशात केल्याने सीरियातल्या  बियाणांचे संवर्धन करण्यात आले ?
        अ) अल्जीरिया
        ब) लेबनान
        क) जॉर्डन      
        ड) मोरोक्को
        पर्यायी उत्तरे :
        १) अ, ब आणि क बरोबर                        
        २) ब आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर
        ४)  अ, क आणि ड बरोबर

    ९)  खालील विधानांचा नीट विचार करा ः भारतातील जैवविविधतेची कारणे -
        अ) हवामान स्थितीमधील विविधता
        ब) अफाट मानवी लोकसंख्या
        क) देशाचे स्थान आणि विस्तार
        ड) भूगर्भरचनेतील बदल
        कोणती विधाने बरोबर आहेत?
        १) अ, ब आणि क
        २) ब, क आणि ड
        ३) अ, क आणि ड
        ४) ब, ड आणि अ

    १०) नदी अथवा नदीचे पाणी वळविणे, यासारख्या प्रकल्पांमुळे कुठल्या समुद्राची जैव-प्रणाली नष्ट झाली?
        १) लाल समुद्र
        २) अरल समुद्र
        ३) बाल्टिक समुद्र
        ४) भूमध्य सागर

    ११) खालील कोणते विधान अयोग्य आहे?
        १) पश्‍चिम व दक्षिण भागात सगळ्यात उष्ण महिना एप्रिल तर उत्तर भागात मे सर्वांत उष्ण महिना समजला जातो.
        २) रेड डेटा बुक अस्तित्व धोक्यात आलेल्या वनस्पतींबाबत माहिती देते.
        ३) बोटॅनिकल सर्व्हेे ऑफ इंडिया, झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया व भूगर्भशास्त्र सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोलकाता येथेच आहे.
        ४) वरील एकही नाही.

    १२) प्राण्यांच्या हाडामधील व दातांमधील चुनखडी संचय (कॅल्शिफिकेशन) होण्यासाठी कोणता पदार्थ कारणीभूत असतो?
        १) नायट्रेट
        २) फ्लोराईड
        ३) हायड्रोकार्बन
        ४) कारसीनोजेन्स

    १३) गेंड्याच्या शिंगाचा प्रमुख औषधीयुक्त उपयोग काय समजला जातो?
        १) कर्करोगावर औषध  
        २) लैंगिक इच्छा वाढविणे        
        ३) रक्त शुद्धी
        ४) रेचक

    १४) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a) कार्टाजिना प्रोटोकॉल जैवसुरक्षितता व आनुवंशिकता अभियांत्रिकी बाबींशी संबंधित.
        b) नागोया प्रोटोकॉल प्रवेश व लाभ वाटणे (अ‍ॅक्सेस व बेनेफिट शेअरिंग) शी निगडीत.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    १५) खालीलपैकी कोणती पाऊले जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलली ती चुकीची आहेत
              a) उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण
              b) हिंस्त्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे
              c) सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे
              d) प्राण्यांच्या विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचे रक्षण करणे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) (c) आणि (d)
        ३) फक्त (b)
        ४) (b) आणि (c)

    १६) खालीलपैकी चुकीची जोडी शोधा.
        १) १९७२ - वन्यजीव संरक्षण कायदा
        २) १९९३ - सुसर/मगर प्रसवण/निंपजवण प्रकल्प
        ३) १९८३ - हत्ती/गजराज प्रकल्प
        ४) वरीलपैकी एकही नाही

    १७) भारतात प्रतिमाणशी वनक्षेत्र साधारणपणे ....... हेक्टर आहे.
        १) १
        २) ०.८
        ३) < ०.१
        ४) २

    १८) डिसेंबर, १९७२ मध्ये वृक्षाच्या संरक्षणासाठी चिपको (आलिंगन) चळवळ कोणी सुरू केली  होती?
              a) चंदी प्रसाद
              b) सुंदरलाल बहुगुणा
        c) पांडुरंग हेगडे
        d) शरद जोशी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
        २)  (b) आणि (c) फक्त
        ३) (d) फक्त
        ४)  (a) आणि (b) फक्त

    १९) नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अ‍ॅथॉरिटीच्या २०१४ च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणार्‍या राज्यांचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा :
        १) कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र
        २) उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू
        ३) मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र
        ४) कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश

    २०) योग्य जोड्या लावा :
           यादी I (जिवावरण)              यादी II (स्थान)
        अ) मन्नारचे आखात             I) मध्य प्रदेश
        ब) शिमलीपाल                                        II) अरुणाचल प्रदेश
        क) देहांग-देबांग                                       III) ओरिसा
        ड) पंचमढी                                           IV) तामिळनाडू
            (अ)   (ब)  (क)   (ड)
        १)  IV          III        II            I
        २)  I             II         III           IV
        ३)  II           I           IV           III
        ४)  III          IV        I              II

    २१) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a) माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे.
        b) या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे. माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्याप्ती  काळवीटांमुळे.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    २२) फ्लेमिंगो (रोहीत) पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात ?
        १) थळघाट
        २) बोरघाट
        ३) माळशेज घाट
        ४) खंबाटकी घाट

    २३) जगातील २५ जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत. यातील एक पश्‍चिम घाट आहे, तर दुसरे कोणते?
        १) पूर्व घाट
        २) पूर्व हिमालय
        ३) राजस्थान वाळवंट
        ४) सुंदरबन

    २४) खालील जैविक आरक्षित प्रदेशांचा पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावून खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे ?
              a) देहांग-देहांग
        b) कांचनगंगा
        c) मानस
              d) नंदादेवी
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (c), (d)
              २) (d), (b), (c), (a)
        ३) (d), (b), (a), (c)
        ४) (a), (c), (b), (d)

    २५) पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्र जलपातळी एक मीटरने वाढली तर कोलकाताचा ...... टक्के भाग पाण्याखाली जाईल.
        १) ३०
        २) ४०
        ३) ५०
        ४) ६०

    २६) जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी (Low) अक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात ....... वाढ होऊ शकेल. 
        १) ३ - ५ टक्के
        २) ५ - १० टक्के
        ३) १० - १५ टक्के
        ४) १५ - २० टक्के

    २७) यादी I बरोबर यादी II च्या जोड्या लावा.
        यादी - I (हरितगृह वायू)        यादी - II (पृथ्वीच्या तापमान वृद्धीत वाटा %)
              a) कार्बन डायऑक्साईड                            i) ०६
              b) मिथेन                                             ii) १४
              c) क्लोरोफ्लुरोकार्बन्स             iii) २०
              d) नायट्रस ऑक्साइड             iv) ६०
        पर्यायी उत्तरे :
                 (a)     (b)     (c)     (d)
        १) (i)      (ii)     (iii)    (iv)
        २) (ii)     (iii)    (iv)    (i)
        ३)  (iii)    (iv)    (i)      (ii)
        ४)    (iv)    (iii)    (ii)     (i)

    २८) हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम :
        a) मानवी समाज आणि शेतीवर होतो
        b) पर्जन्य न्यूनता
        c) सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो
        d) सागराची पातळी वाढते
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) (c)
        २)  (b) (d)
        ३) (a), (b), (c) (d)
        ४) (a) (d)

    २९) समुद्रजल पातळीत वाढ होण्याची महत्त्वाची कारणे :
        a) त्सुनामी लाटा
        b) जागतिक तापमान वृद्धी       
              c) समुद्री जलचर
        d) हरितगृह परिणाम
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b) आणि (d) बरोबर आहेत.
        २) (b), (c) आणि (d) बरोबर आहेत.
        ३) (a), (b) आणि (c)  बरोबर आहेत.
        ४) वरील सर्व बरोबर

    ३०) उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतात
        a) मिथेन
        b) नायट्रस ऑक्साइड
        c) क्लोरोफ्लुरोकार्बन
        d) हायड्रोजन सल्फाइड
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (c)
        २) (a), (c), (d)
        ३) (b), (c), (d)
        ४) वरील सर्व

    ३१) खालीलपैकी हरित गृह वायू कोणते आहेत ?
              a) O2
        b) N2O
        c) CO2
        d) DH4
        पर्यायी उत्तरे :
        १) (a), (b), (c)
        २) (b), (c), (d)
        ३) (c), (d), (a)
        ४) (d), (a), (b)

    ३२) खालीलपैकी कोणते हरितगृह वायू (Green house) आहेत?
              a) पाण्याची वाफ, ऑक्सिजन, मिथेन
        b) नायट्रोजन ऑक्साईड, ऑक्सिजन, सी.एफ.सी.
        c) एच.एफ.सी., सी.एफ.सी., मिथेन
        d) सी.एफ.सी., सीओटू, नायट्रोजन ऑक्साईड
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त (a) आणि (b) बरोबर आहेत.
        २) फक्त (c) आणि (d) बरोबर आहेत.
        ३) फक्त (a) आणि (d) बरोबर आहेत.
        ४) फक्त (d) बरोबर आहे.

    ३३) यादी क्र. I  व यादी क्र. II  ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंकप्रणालीतून अचूक उत्तरे शोधून काढा.
              यादी क्र. I               यादी क्र. II
        a) कार्बनडाय ऑक्साइड           i)  नायट्रोजन खतांचा वापर, पशूंचे टाकाऊ पदार्थ
        b) मिथेन                                            ii)  शीतपेट्या, वातानुकूलन यंत्रणा
              c) नायट्रस ऑक्साइड            iii)  निर्वनीकरण
        d) सी. एफ. सी.                                      iv)  भातशेती, सखोल पशुपालन
        पर्यायी उत्तरे :
                 (a)     (b)     (c)     (d)
        १) (iv)    (iii)    (ii)     (i)
        २) (iii)    (iv)    (i)      (ii)
        ३)  (iii)    (i)      (ii)     (iv)
        ४)    (i)      (iv)    (iii)    (ii)

    ३४) खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही ?
        १) ओझोन
        २) कार्बन डाय ऑक्साईड        
        ३) पाण्याची वाफ
        ४) मिथेन

    ३५) खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
        १) कार्बन डाय ऑक्साइड
        २) क्लोरोफ्ल्युरो कार्बन
        ३) हायड्रोजन
        ४) वरीलपैकी एकही नाही

    ३६) जोड्या लावा.
            हवा प्रदूषक              मानवाच्या आरोग्यावरील परिणाम
              a) कार्बन मोनोऑक्साइड    i)  नाक व श्‍वसन मार्गाचा (CO) त्रस्तपणा
        b) अ‍ॅल्डेहायड्स                            ii)  मळमळ, डोळ्याची जळजळ व घश्याची खवखव
        c) हायड्रोजन सल्फाइड   iii)  छातीत जळजळ, डोकेदुखी, उलट्या व मृत्यू
        d) सल्फर डाय ऑक्साईड iv)  रक्ताची प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून नेण्याची क्षमता कमी करते
        पर्यायी उत्तरे :
                 (a)     (b)     (c)     (d)
             १)      (i)      (iii)    (iv)    (ii)    
             २)      (iii)    (i)      (iv)    (ii)
             ३)      (iv)    (i)      (ii)     (iii)
             ४)      (iii)    (ii)     (iv)    (i)  

    ३७) पशुशेती ........ टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते.
        १) १२
        २) २१
        ३) ३२
        ४) ४५

    ३८) खाली दिलेल्या हरितगृह वायूपैकी ...... वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या ७०० ppm पासून आता १७५० ppm पर्यंत वाढले आहे.
        १) कार्बन डायऑक्साईड         
        २) नायट्रोजन डाय ऑक्साइड
        ३) ओझोन
        ४) मिथेन

    ३९) खालीलपैकी भारतीय कृषी / शेतीमधून सोडल्या जाणार्‍या कोणत्या वायूचे जागतिक तापमानवाढीत सर्वाधिक योगदान आहे?
        १) मिथेन (CH4)
        २) नायट्रस ऑक्साईड (N2O)
        ३) कार्बन डायऑक्साईड (CO2)
        ४) कार्बन मोनोक्साईड (CO)

    ४०) जागतिक स्तरावर वातावरणामध्ये १०० वर्षापूर्वी कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण ........ होते.
        १) २७५ दशलक्ष प्रति भाग
        २) ४५० दशलक्ष प्रति भाग
        ३) ३५० दशलक्ष प्रति भाग
        ४) १५० दशलक्ष प्रति भाग

    ४१) खालीलपैकी कोणता वायू कार्बन क्रेडिटशी संबंधित आहे ?
        १) नायट्रोजन
        २) कार्बन डाय ऑक्साईड
        ३) नायट्रोजन ऑक्साईड         
        ४) सी.एफ.सी.

    ४२) जसे कार्बन डाय ऑक्साइडचे अवकाशातील प्रमाण वाढते, तशी  उष्णता वाढते व त्यामुळे .......
        a) वातावरणीय पट्टे विषुववृत्त (इक्वेटर) पासून ध्रुवाकडे सरकतील व वृक्षवल्लीही विषुववृत्तापासून दूर जातील.
        b) कीड, किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील. तद्वतच रोगराईही वाढेल.
          आता सांगा काय शक्य आहे ?
        १) केवळ (a)
              २) केवळ (b)
              ३) (a)  आणि  (b)
              ४)  (a) (b)

    ४३) कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि हॉलोजेनेटेड (halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते, कारण-
        १) हे वायू सौर ऊर्जेला भूपृष्ठापर्यंत पोहोचू देतात.
        २) हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात.
        ३) या वायूंचा भूपृष्ठावरील तापमान वाढविण्यात कोणताही सहभाग नाही.
        ४) हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाहीत.

    ४४) खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो?
        १) कार्बन डाय ऑक्साईड
        २) सल्फर डाय ऑक्साईड
        ३) कार्बन मोनोक्साईड
        ४) वरील सर्व

    ४५) ...... वायू कोळसा, पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जीवाश्म अर्धवट जळण्यामुळे निर्माण होतो.
        १) मिथेन
        २) कार्बन मोनोक्साईड          
        ३) नायट्रस ऑक्साइड
        ४) क्लोरोफ्लुरोकार्बन

    ४६) कार्बन मोनोक्साइड (CO) हा हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक आहे. मो मानवी आरोग्यासाठी कसा हानीकारक आहे ?
              a) यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
              b) तो रक्ताची प्राणवायू (ऑक्सीजन) वाहून नेण्याची क्षमता कमी करतो.
              c) तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो.
              d) यामुळे यकृताची हानी होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
        २) (b) (d)  फक्त 
        ३) (a), (b) (c) फक्त
        ४) वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत

    ४७) मोटार वाहनामधील धूर सोडणार्‍या नळीच्या शेवटी बसवलेल्या ......... मुळे बाहेर पडणार्‍या कार्बन मोनॉक्साईडचे रुपांतर शुद्ध ऑक्सीजन मध्ये होते.
              १) फील्टर्स
        २) इएसपी 
        ३) थर्मोरिअ‍ॅक्टर
        ४) पोल्यूशन रोज

    ४८) खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो ?
        १) कार्बन डायऑक्साइड         
        २) सल्फर डायऑक्साइड         
        ३) क्लोरोफ्लुरोकार्बन            
        ४) नायट्रोजन डायऑक्साइड

    ४९) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
        a) रेफ्रिजरेटर्समुळे हायड्रोफ्लुरोकार्बनस् निर्माण होतात.
        b) फायर एक्स्टींग्युशर्समुळे हेलॉनस् वाढतात.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    ५०) ओझोनच्या नाशाला कोणते कारण मूलभूत कारण आहे ?
              a) थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, स्प्रे चा वापर
        b) थंड हवा करणारी यंत्रणा, शीतपेटी, वॉटर फिल्टरचा वापर
        c) स्प्रे, हवा थंड करणारी यंत्रणांचा वापर
        d) कपडे धुण्याचे यंत्र, वॉटर फिल्टर, हवा थंड करण्याच्या यंत्रणेचा वापर
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (c) बरोबर आहेत.
        २) (b) आणि (d) बरोबर आहेत.
        ३) (c) आणि (d) बरोबर आहेत.
        ४) फक्त (a) बरोबर आहे.

    ५१) खालीलपैकी बरोबर वाक्य निवडा.
              a) काही रासायनिक क्रियेद्वारे वातावरणात तयार झालेला ओझोन प्रदूषकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो.
        b) ओझोन हा मानवी आरोग्य व पिकांच्या वाढीसाठी हानिकारक असतो.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) बरोबर (b) चूक
        २) (b) बरोबर (a) चूक           
        ३) दोन्हीही बरोबर              
        ४) दोन्हीही चूक

    ५२) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a) जागतिक सरासरी तापमान वाढ औद्योगिकरणापूर्वीच्या संदर्भात २ डिग्री मर्यादेपर्यंत ठेवण्यास ग्रीन हाऊस गॅसेस (२०५० पावेतो) २०१० च्या तुलनेत ३०% ने कमी करणे अपेक्षित आहे.
        b) ओझोन हा प्राणवायूचा ३ अणुरेणू आहे.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    ५३) क्योटो करार हा .......... शी संबंधित आहे.
        १) लोकसंख्या
        २) साधनसंपत्ती
        ३) जागतिक उबदारपणा
        ४) प्रदूषण

    ५४) क्योटो कराराबाबत खाली काही विधाने दिली आहेत त्यांचे अवलोकन करून अचूक विधान गटाचा पर्याय निवडा.
        a) हा करार १९९२ साली झाला.
        b) या कराराचा एक उद्देश कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन १९९५ च्या पातळीच्या खाली आणणे हा होता.
        c) या करारानंतर उत्सर्जन वर्षाला साधारण ३% या दराने वाढत राहिले.
              d) हा करार जपानमध्ये झाला.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त (a) आणि (c)
        २) फक्त (b)
        ३) फक्त (c) आणि (d)
        ४) फक्त (b) आणि (c)

    ५५) पुढील दोन विधानांचा विचार करा :
              a)  क्योटो येथील जागतिक तापमान वाढ परिषदेचा मुख्य उद्देश जागतिक तापमान वाढ यावर चर्चा करुन ते कमी करण्याचा करार संमत करणे असा होता.
              b) कार्बनची खरेदी आणि विक्री व्यापार व्यवस्था सुरु.
              पर्यायी उत्तरे :
        १) (a) (b) दोन्ही विधाने खरे आहेत.
        २) (a) (b) दोन्ही विधाने खोटे आहेत.
        ३) फक्त (a) विधान बरोबर आहे
        ४) फक्त (b) विधान बरोबर आहे

    ५६) क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश ........ होता.
        a) ओझोन पातळीत घट
        b) ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात घट
        c) ऑक्सिजनमध्ये घट          
        d) क्लोरीनमध्ये घट
        वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत?
        १) फक्त (a)
        २)  फक्त (b)
        ३) (a) आणि  (b)
        ४) (a), (b), (c) आणि  (d)

    ५७) जपानमधील क्योटो शहरात १९९७ मध्ये झालेल्या क्योटो थर्मल ट्रिटी (क्योटो प्रोटोकॉल) मध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
        १) २००८-१२ दरम्यान कार्बन डायऑक्साईड वायूत ३० प्रतिशत पर्यंत कपात
        २) हरितगृह वायूच्या कपातीचा निर्धारित भागाचे हस्तांतरण
        ३) सिंथेटिक रासायनिक घटकाचे उत्पादन कमी करणे    
        ४) हॅलोन वायूचे उत्पादन थांबविणे

    ५८) व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्राचे किती टक्के क्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने घोषित केले?
        १) १०%
        २) २०%
        ३) ३०%
        ४) ४०%

    ५९) राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार (प्राधिकरण) ने मार्च २०११ मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ....... ते ....... दरम्यान आहे.
        १) १३९-१७०
        २) १५९-१७९
        ३) १६९-१८०
        ४) १७९-१९०

    ६०) नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अ‍ॅथॉरिटीच्या २०१४ च्या व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार वाघांची सर्वाधिक संख्या असणार्‍या राज्यांचा उतरत्या क्रमाचा योग्य पर्याय निवडा :
        १) कर्नाटक, उत्तराखंड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र
        २) उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू
        ३) मध्यप्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र
        ४) कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्यप्रदेश

    ६१) ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प ........... आहे.
        १) पश्‍चिम महाराष्ट्र
        २) मध्य महाराष्ट्र
        ३) पश्‍चिम घाट
        ४) पूर्व महाराष्ट्र

    ६२) २०१० साली सह्याद्री व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या अभयारण्यात जाहीर झाला
        १) राधानगरी
        २) कोयना
        ३) चांदोली
        ४) यापैकी एकही नाही 

    ६३) जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यामुळे कमी (Low) अक्षांश भागामध्ये पर्जन्यमानात.......वाढ होऊ शकेल. 
        १) ३ - ५ टक्के
        २) ५ - १० टक्के
        ३) १० - १५ टक्के
        ४) १५ - २० टक्के

    ६४) पृथ्वीवरील तापमान वाढीमुळे जर समुद्र जलपातळी एक मीटरने वाढली तर कोलकाताचा ........ टक्के भाग पाण्याखाली जाईल.
        १) ३०
        २) ४०
        ३) ५० 
        ४) ६०

    ६५) जागतिक तापमान वाढीचे पुढील परिणाम महत्त्वाचे आहेत:
        a) जागतिक तापमान वाढल्यामुळे ‘आम्ल पर्जन्यात वाढ होऊन वाळवंटीकरणाची शक्यता आहे.‘
        b) जागतिक तापमान वाढल्यामुळे काही वनस्पतीत वाढ होईल तर कांही नष्ट होतील. वनस्पती प्रजातीचे संतुलन बिगडू शकते.
              c) जागतिक तापमान वाढीमुळे वार्‍याची दिशा सागराकडून भूखंडाकडे राहील परिणामी भूखंडावर पाऊस पडेल.
              d) जागतिक तापमान वाढीमुळे प्राण्याचे प्रजातीय संतुलन बिघडण्याची शक्यता वर्तविली जाते.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
        २) (a),(b) आणि(d) फक्त
        ३) (a),(b) आणि (c) फक्त
        ४) (a) आणि (c) फक्त

    ६६) जागतिक रिसोर्सेस संस्थेप्रमाणे (२०११) खालीलपैकी कोणता देश सर्वात अधिक कार्बन उत्सर्जन करतो?
        १) यू.एस. ए.
        २) रशिया
        ३) भारत
        ४) चीन

    ६७) कार्बन डायऑक्साईड, जलबाष्प आणि हॉलोजेनेटेड (halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते, कारण-
        १) हे वायू सौर ऊर्जेला भूपृष्ठापर्यंत पोहोचू देतात.
        २) हे वायू भूपृष्ठाद्वारे उत्सर्जित उष्णता ग्रहण करतात आणि तिला परत भूपृष्ठाकडे उत्सर्जित करतात.
        ३) या वायूंचा भूपृष्ठावरील तापमान वाढविण्यात कोणताही सहभाग नाही.
        ४) हे वायू हरितगृह परिणामाचे घटक नाहीत

    ६८) जसे कार्बन डाय ऑक्साइडचे अवकाशातील प्रमाण वाढते, तशी  उष्णता वाढते व त्यामुळे .......
        a) वातावरणीय पट्टे विषुववृत्त (इक्वेटर) पासून ध्रुवाकडे सरकतील व वृक्षवल्लीही विषुववृत्तापासून दूर जातील.
        b) कीड, किडे उष्ण वातावरणात अधिक वाढतील. तद्वतच रोगराईही वाढेल.
          आता सांगा काय शक्य आहे ?
        १) केवळ (a)
              २) केवळ (b)
              ३) (a)  आणि  (b)
              ४)  (a) (b)

    ६९) पशुशेती ........ टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते.
        १) १२
        २) २१
        ३) ३२ 
        ४) ४५

    ७०) जागतिक स्तरावर वातावरणामध्ये १०० वर्षापूर्वी कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण ........ होते.
        १) २७५ दशलक्ष प्रति भाग
        २) ४५० दशलक्ष प्रति भाग
        ३) ३५० दशलक्ष प्रति भाग        
        ४) १५० दशलक्ष प्रति भाग

    ७१) यादी क्र. I  व यादी क्र. II  ची योग्य जुळणी करून खाली दिलेल्या अंकप्रणालीतून अचूक उत्तरे शोधून काढा.
          यादी क्र. I                                    यादी क्र. II
        a) कार्बनडाय ऑक्साइड                             i)  नायट्रोजन खतांचा वापर, पशूंचे टाकाऊ पदार्थ
        b) मिथेन                                           ii)  शीतपेट्या, वातानुकूलन यंत्रणा
              c) नायट्रस ऑक्साइड             iii)  निर्वनीकरण
        d) सी. एफ. सी.                 iv)  भातशेती, सखोल पशुपालन
        पर्यायी उत्तरे :
                (a)    (b)     (c)     (d)
        १) (iv)    (iii)    (ii)      (i)
        २) (iii)    (iv)    (i)       (ii)
        ३)  (iii)   (i)     (ii)     (iv)
        ४)    (i)    (iv)   (iii)    (ii)

    ७२) खाली दिलेल्या हरितगृह वायूपैकी ...... वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या ७०० ppb पासून आता १७५० ppb पर्यंत वाढले आहे.
        १) कार्बन डायऑक्साईड          
        २) नायट्रोजन डाय ऑक्साइड
        ३) ओझोन
        ४) मिथेन

    ७३) खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
        १) कार्बन डाय ऑक्साइड         
        २) क्लोरोफ्ल्युरो कार्बन
        ३) हायड्रोजन
        ४) वरीलपैकी एकही नाही

    ७४) क्लोरोफ्लोराकार्बन (CFCs) संयुगांना फ्र्रिऑन म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान त्यांच्याबाबत चूक आहेत.
        फ्रिऑन हे .........
        १) रासायनिक अक्रियाशील, बिनविषारी आणि गंधहीन असतात.
        २) द्रावक म्हणून, सुक्ष्मतुषार प्रणोदनकारी आणि आकार्याच्या फेसासाठी स्पंजनकारक म्हणून वापर.
        ३) अवकाशाच्या वरील पट्ट्यात, सूर्यच्या जंबुलातील किरणांमुळे विघटन पावतात.
        ४) वरीलपैकी कोणतेही नाही.

    ७५) IPCC च्या अहवालानुसार जागतिक पातळीवर हरित गृह वायू निर्मितीकरिता कारणीभूत असलेल्या मानवनिर्मित स्रोतांची सूची खाली दिली आहे.
        या सूचीतील स्रोतांचा क्रम उत्सर्जन चढत्या क्रमाने लावा.
              a) जीवाश्म इंधनाचा वापर (CO2)
              b) पाणथळ जमिनीत, भात शेती (CH4)
              c) सिमेंट निर्मिती (CO2)          
              d) जंगलतोड, जीववस्तुमान क्षय (CO2)
              पर्यायी उत्तरे :
        १) (c), (b), (d), (a)
        २) (a), (c), (b), (d)
        ३) (d), (c), (a), (b)
        ४) (c), (a), (d), (b)

    ७६) मोटार वाहनामधील धूर सोडणार्‍या नळीच्या शेवटी बसवलेल्या ......... मुळे बाहेर पडणार्‍या कार्बन मोनॉक्साईडचे रुपांतर शुद्ध ऑक्सीजन मध्ये होते.
              १) फील्टर्स
        २) इएसपी 
        ३) थर्मोरिअ‍ॅक्टर
        ४) पोल्यूशन रोज

    ७७) कार्बन मोनोक्साइड (CO) हा हवा प्रदूषण करणारा प्रमुख घटक आहे. मो मानवी आरोग्यासाठी कसा हानीकारक आहे ?
              a) यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो.
              b) तो रक्ताची प्राणवायू (ऑक्सीजन) वाहून नेण्याची क्षमता कमी करतो.
              c) तो मज्जासंस्थेची सर्वसाधारण कार्यप्रणाली प्रभावित करतो.
              d) यामुळे यकृताची हानी होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) फक्त
        २) (b) आणि (d) फक्त
        ३) (a), (b) (c) फक्त
        ४) वरीलपैकी सर्व पर्याय योग्य आहेत

    ७८) १९८७ साली प्रसिद्ध झालेल्या ब्रुन्डटलॅन्ड अहवालाचे शीर्षक खालीलपैकी काय होते?
        १) आपले पर्यावरण
        २) आपले समान भविष्य
        ३) शाश्‍वत विकास
        ४) आपला एक उपग्रह (पृथ्वी)

    ७९) क्योटो प्रोटोकॉलचा प्रमुख उद्देश ........ होता.
        a) ओझोन पातळीत घट          
              b) ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनात घट
        c) ऑक्सिजनमध्ये घट           
              d) क्लोरीनमध्ये घट
        वरीलपैकी कोणती दोन विधाने सत्य आहेत?
        १)  फक्त (a)
              २)  फक्त (b)
        ३) (a) आणि  (b)
              ४) (a), (b), (c) आणि (d)

    ८०) जपानमधील क्योटो शहरात १९९७ मध्ये झालेल्या क्योटो थर्मल ट्रिटी (क्योटो प्रोटोकॉल) मध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
        १) २००८-१२ दरम्यान कार्बन डायऑक्साईड वायूत ३० प्रतिशत पर्यंत कपात
        २) हरितगृह वायूच्या कपातीचा निर्धारित भागाचे हस्तांतरण
        ३) सिंथेटिक रासायनिक घटकाचे उत्पादन कमी करणे    
        ४) हलोन वायूचे उत्पादन थांबविणे

    ८१) ‘कोप २१‘ (COP 21) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
        १) ही संयुक्त राष्ट्र संघटनेची पॅरीस येथे डिसेंबर २०१५ मध्ये हवामान बदलासंबंधीची परिषद होती.
        २) ही जागतिक नेत्यांची व १९० पेक्षा जास्त राष्ट्रांच्या प्रतिनिधींची शिखर परिषद होती.
        ३) किमान ५५ राष्ट्रांनी झालेल्या करारास मंजुरी दिल्यानंतर तो अंमलात येणार आहे.
        ४) कराराचे उद्दिष्ट जागतिक तापमान किमान ४ डिग्रीने सेल्सिअस थोपविण्याचे आहे.

    ८२) महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
        १) पश्‍चिम घाट
        २) सातपुडारांगा
        ३) मेळघाट प्रदेश
        ४) चिखलदरा टेकड्या

    ८३) फ्लेमिंगो (रोहीत) पक्षी खालीलपैकी कोणत्या घाटात आढळतात ?
        १) थळघाट
        २) बोरघाट
        ३) माळशेज घाट
        ४) खंबाटकी घाट

    ८४) वन्यजीवन कशाने धोक्यात आलेले नाही ?
        १) जंगलावरील अतिक्रमण
        २) वाढती लोकसंख्या            
        ३) अवैध जंगलतोड
        ४) वन्यप्राण्यांमधील आपापसातील वैर

    ८५) इकोलॉजी ही संज्ञा प्रथम कोणी मांडली?
        १) अर्नेस्ट हेकेल
        २) इलटॉन
        ३) ओडम्
        ४) क्रेबस

    ८६) पर्यावरणातील विविध थरांच्या विश्‍लेषणासाठी पर्यावरण मनोरा ही संकल्पना सर्वप्रथम ............. या ब्रिटिश पर्यावरणतज्ञाने मांडली.
        १) चार्ल्स एल्टन (१९२७)
        २) लिंडमन् (१९४२)
        ३) ई. पी. ओडूम (१९७१)
        ४) वरीलपैकी नाही

    ८७) विशिष्ट जातीचे तिच्या पर्यावरणाशी संबंध या अभ्यासाला काय म्हणतात?
        १) मेटेरिऑलॉजी
        २) ऑटइकॉलॉजी
        ३) सिनेकॉलॉजी
        ४) टर्मिनॉलॉजी

    ८८) प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणार्‍या अंतररचित (inbuilt) व्यवस्थेला म्हणतात.
        १) होमियोस्टॅटिक मेक्यानिजम
        २) प्रकाशसंश्‍लेषण
        ३) जैवरासायनिक प्रक्रिया         
        ४) नैसर्गिक प्रक्रिया

    ८९) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        अ) आधुनिक मनुष्य इओसीन कालखंडात जन्मास आला.
        ब) डानोसोअर क्रिटेशियस कालावधीत नाहीसे झाले.
        १) फक्त अ
        २) फक्त ब
        ३) दोन्ही अ आणि ब
        ४) दोन्ही नाहीत

    ९०) विशिष्ट विभागातील प्राणी आणि वनस्पतींचे जीवन हे त्या जीवसृष्टीच्या परिस्थितीची स्वतंत्र ओळख समजली जाते त्याला ....... म्हणतात.
        १)  बायोटा
        २) बायोमा
        ३) बायोमास
        ४) ब्लॉच

    ९१) तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकांमध्ये
        अ) दांत अणकुचीदार असतात.
        ब) आतडे आखूड असते.
        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        १) फक्त अ
        २) फक्त ब
        ३) दोन्ही अ आणि ब
        ४) दोन्ही नाहीत

    ९२) महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला ?
        १) १९७०
        २) १९९०
        ३) १९८५
        ४) १९७२

    ९३) पशू, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला?
        १) १९७०
        २) १९७४
        ३) १९७२
        ४) १९८०

    ९४) वन्यजीव सप्ताह केव्हा साजरा केला जातो ?
        १) २१ - २८ मार्च
        २) २२ - २९ मे 
        ३) ५ - १२ जून
        ४) १ - ७ ऑक्टोबर

    ९५) योग्य जोड्या लावा.
             'A'                                                                      'B'
        a) विश्‍व जलदिन                                             i) १० ऑक्टोबर
              b) पृथ्वी दिवस                                               ii) ५ जून
              c) विश्‍व पर्यावरण दिन                               iii) २२ एप्रिल
              d) राष्ट्रीय डाक दिन                                    iv) २२ मार्च
                       (a)    (b)    (c)     (d)
             १)      (i)     (ii)    (iii)   (iv)
             २)      (iii)   (iv)   (ii)    (i)
             ३)      (iv)   (iii)   (i)     (ii)
             ४)      (iv)   (iii)   (ii)    (i)

    ९६) महाराष्ट्राच्या ‘मानचिन्हा‘ बाबत योग्य जोड्या लावा :
             सूची I                         सूची II        
        अ) राज्य प्राणी                  I) हरियाल/हरोळी
        ब) राज्य पक्षी                   II) जारुळ/तामन
        क) राज्य फुलपाखरू              III) ब्ल्यू मॉरमॉन
        ड) राज्य फुल                   IV) शेकरु
            अ    ब    क     ड
        १) IV          I           III            II                       
        २) III          I           II             IV                   
        ३) IV          III         II             I
        ४)  I          II          III            IV

    ९७) खालीलपैकी कोणती पाऊले जैवविविधतेच्या संरक्षणासाठी उचलली गेली, ती चुकीची आहेत ?
              a) उपयुक्त वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण
              b) हिंस्त्र प्राणी व वनस्पतींचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणे
              c) सर्व प्राण्यांच्या शिकारी नियंत्रित करणे
              d) प्राण्यांच्या विश्रांती व भक्षण करण्याच्या ठिकाणांचे रक्षण करणे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) (c) आणि (d)
        ३) फक्त (b)
        ४) (b) आणि (c)

    ९८) पुढील प्रकल्प ज्या क्रमाने सुरू करण्यात आले तो क्रम सांगा :
        अ) सिंह प्रकल्प
        ब) व्याघ्र प्रकल्प
        क) मगरमच्छ पैदास प्रकल्प
        ड) गेंडा संवर्धन प्रकल्प
        १) ब, , ,
        २) अ, , ,
        ३) ब, , ,
        ४) अ, , ,

    ९९) खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
        १) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - नायोन आणि गोलाघाट
        २) किओलोदेव राष्ट्रीय उद्यान - भरतपूर
        ३) सुंदरबन जीवमंडळ संरक्षित क्षेत्र - पश्‍चिम बंगाल
        ४) नंदादेवी जीवमंडळ संरक्षित क्षेत्र - सिक्किम

    १००)  खालीलपैकी कोणत्या राज्याने ’भारतीय हत्ती’ हा आपला ’राज्य प्राणी’ म्हणून घोषित केलेला नाही?
        १) केरळ
        २) तामिळनाडू
        ३) कर्नाटक
        ४) झारखंड

    १०१)  गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे ...... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.
        १) वाघ
        २) हत्ती
        ३) सिंह
        ४) गेंडा

    १०२)  जागतिक वन्यजीव दिवस (WWD) जगभरात ३ मार्च २०१६ रोजी साजरा करण्यात आला. वर्ष २०१६ च्या (WWD) चा विषय ....... होता.
        १) वन्यजिवांचे भविष्य आपल्या हातात आहे.
        २) वन्यजीव हे निसर्गातील सौंदर्य आहे.             
        ३) भविष्य जतन करण्यासाठी वन्यजिवांचे जतन करा.
        ४) वरीलपैकी काहीही नाही 

    १०३)  खालील विधाने विचारात घ्या :   
        a) २ सप्टेंबर २०१५ रोजी भारताने युनेस्को बरोबर देहरादून येथे ‘नैसर्गिक वारसा संवर्धन‘ केंद्र स्थापन करण्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी केली.
        b)  युनेस्कोने २०१४ पर्यंत भारतातील ३२ जागतिक वारसा स्थळांना मान्यता दिली आहे.
        c) भारतातील एकूण वारसा स्थळांपैकी ७ ही ‘नैसर्गिक‘ वारसा स्थळे आहेत.
        वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/
        १) (a)
        २) (b) 
        ३) (a) आणि (c)
        ४) वरील सर्व

    १०४)  महाराष्ट्र राज्यातील किती टक्के जंगल हे राजस्व विभागाच्या अखत्यारीत येते?
        १) ९०
        २) ३०
        ३) १०
        ४) ०७

    १०५)  जोड्या लावा :
         स्तंभ-I (हिंस्र प्राणी/पक्षी योजना)          स्तंभ-II (जंगल प्रदेश)
        अ) वाघ                                             i) दाजीपूर
        ब) बायसन                                          ii) कर्नाळा
        क) शेखरू                                          iii) पेंच
        ड) पक्षी                                             iv) भिमाशंकर
                       (अ) (ब) (क) (ड)
        १)  (iii)    (i)      (ii)     (iv)
        २)  (i)      (iii)    (ii)     (iv)
        ३)  (iv)    (i)      (iii)    (ii)
        ४)  (iii)    (i)      (iv)    (ii)

    १०६)  कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
        १) वाघ
        २) गवा
        ३) सिंह
        ४) हत्ती

    १०७)  महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ...... आहे.
        १) २१%
        २) २५%
        ३) २७%
        ४) १०%

    १०८)  देशाच्या १९५२ च्या वन धोरणानुसार भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र हे वनाखाली असणे गरजेचे आहे ?
        १) सतरा टक्के
        २) तेहतीस टक्के
        ३) चाळीस टक्के
        ४) त्रेचाळीस टक्के

    १०९)  महाराष्ट्रामध्ये संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रम केव्हापासून सुरू करण्यात आला?
        १) १९८८
        २) १९९०
        ३) १९९२
        ४) १९९८

    ११०)  पहिले वनधोरण भारतामध्ये केव्हा अमलात आले?
        १) १९९४
        २) १८८४
        ३) १९८४
        ४) १८९४

    १११)  भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे?
        १) नागपूर
        २) पुणे
        ३) डेहराडून
        ४) नवी दिल्ली

    ११२)  साधन संपत्तीच्या संवर्धन खालीलपैकी कोणत्या एकाचा समावेश होत नाही ?   
        १) काळजीपूर्वक वापर            
        २) प्रमाणशीर वापर
        ३) वापर न करणे   
        ४) वाया जाण्यापासून त्यांना वाचविणे

    ११३)  खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
        विधान (अ) : निर्वनीकरणामुळे हवेतील कार्बनडाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढते.
        कारण (र) : वने जेव्हा प्रकाशसंश्‍लेषण क्रियेद्वारे स्वतःचे अन्न तयार करतात तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बनडाय-ऑक्साईडचा वापर होतो.
        पर्यायी उत्तरे :
        १) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
        २) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
        ३) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
        ४) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.

    ११४)  महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत?
        १) विदर्भ
        २) मराठवाडा
        ३) कोकण
        ४) वरील सर्व

    ११५)  खाली नमूद जिल्ह्यांची अनुक्रमाने पुनर्रचना तेथील वनक्षेत्रांप्रमाणे (चौ. किमी) उतरत्या क्रमाने लावा.
        अ) चंद्रपूर
        ब) गडचिरोली
        क) गोंदिया
        ड) अमरावती
        इ) वर्धा
        पर्यायी उत्तरे :
        १) ड, , , ,
        २) अ, , , ,
        ३) ब, , , ,
        ४) क, , , ,

    ११६)  महाराष्ट्र राज्यात ....... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
        १) सिंधुदुर्ग
        २) गडचिरोली
        ३) औरंगाबाद
        ४) सोलापूर

    ११७)  खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
        १) लातूर
        २) मुंबई उपनगर
        ३) उस्मानाबाद
        ४) जालना

    ११८)  जोड्या लावा.
          स्तंभ ।                          स्तंभ ॥
          अरण्ये प्रकार                  प्रदेश/जिल्हे
        अ) उष्णकटिबंधीय सदाहरित                  (i) मध्य महाराष्ट्र पठारी प्रदेश
        ब) आर्द्र पानझडी                                    (ii) सातपुडा आणि अजिंठा डोंगर रांगा
        क) रूक्ष पानझडी                                     (iii) दक्षिण कोकण
        ड) उष्णकटिबंधीय काटेरी           (iv) पूर्व विदर्भ
        पर्यायी उत्तर :
                  (अ) (ब) (क) (ड)
        १)    III      IV     II       I
        २)    III      IV     I        II
        ३)    II       I        III      IV
        ४)    IV     I        II       III

    ११९)  महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ...... या विभागात आहे.
        १) विदर्भ
        २) कोकण
        ३) मराठवाडा
        ४) नाशिक

    १२०)  कोणत्या जिल्ह्याचा सर्वात कमी भूभाग वनाखाली आहे?
        १) ठाणे
        २) पुणे
        ३) लातूर
        ४) जालना

    १२१)  सन २००९ मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वनक्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा :
        a) अरुणाचल प्रदेश
              b) महाराष्ट्र
              c) मध्य प्रदेश
        d) छत्तीसगड
        पर्यायी उत्तरे :       
        १) (c),(d),(a),(b)
        २) (a),(c),(d),(b)
        ३) (d),(c),(b),(a)
        ४) (c),(a),(d),(b)

    १२२)  महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात काटेरी वने आढळतात ?
        अ) सोलापूर
        ब) रत्नागिरी
        क) जळगाव
        ड) अहमदनगर
        १) फक्त (अ)
        २) फक्त (क)
        ३) (अ) आणि (क)
        ४) (अ) आणि (ड)

    १२३)  पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
        a) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत.
        b) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.
        पर्यायी उत्तरे :
        १) केवळ (a)
        २) केवळ (b)
        ३) दोन्ही
        ४) एकही नाही

    १२४)  महाराष्ट्राचे भूस्वरूप लक्षात घेता तेथे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या वनांचे क्षेत्र वाढायला भरपूर वाव आहे?
        १) सदाहरित
        २) पानझडी
        ३) कांदळवने
        ४) झुडपी

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१८२)
    १-३
    २-४
    ३-३
    ४-४
    ५-३
    ६-३
    ७-४
    ८-२
    ९-३
    १०-२
    ११-४
    १२-२
    १३-२
    १४-३
    १५-३
    १६-४
    १७-३
    १८-१
    १९-१
    २०-१
    २१-१
    २२-३
    २३-२
    २४-२
    २५-३
    २६-२
    २७-४
    २८-३
    २९-१
    ३०-१
    ३१-२
    ३२-२
    ३३-२
    ३४-३
    ३५-३
    ३६-३
    ३७-२
    ३८-४
    ३९-१
    ४०-१
    ४१-२
    ४२-३
    ४३-२
    ४४-३
    ४५-२
    ४६-३
    ४७-३
    ४८-३
    ४९-४
    ५०-१
    ५१-३
    ५२-२
    ५३-३
    ५४-३
    ५५-१
    ५६-२
    ५७-२
    ५८-२
    ५९-१
    ६०-१
    ६१-४
    ६२-२
    ६३-२
    ६४-३
    ६५-२
    ६६-४
    ६७-२
    ६८-३
    ६९-२
    ७०-१
    ७१-२
    ७२-४
    ७३-३
    ७४-४
    ७५-१
    ७६-३
    ७७-३
    ७८-२
    ७९-२
    ८०-२
    ८१-४
    ८२-१
    ८३-३
    ८४-४
    ८५-१
    ८६-१
    ८७-२
    ८८-१
    ८९-२
    ९०-१
    ९१-१
    ९२-४
    ९३-३
    ९४-४
    ९५-४
    ९६-१
    ९७-३
    ९८-२
    ९९-४
    १००-२
    १०१-३
    १०२-१
    १०३-४
    १०४-४
    १०५-४
    १०६-२
    १०७-१
    १०८-२
    १०९-३
    ११०-४
    १११-३
    ११२-३
    ११३-१
    ११४-१
    ११५-३
    ११६-२
    ११७-१
    ११८-१
    ११९-३
    १२०-३
    १२१-४
    १२२-४
    १२३-१
    १२४-२

Share this story

Total Shares : 5 Total Views : 2793