छत्रपती राजाराम महाराज/ प्रश्नमंजुषा (१७८)
- 03 Jun 2021
- Posted By : study circle
- 1105 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (१७८)
छत्रपती राजाराम महाराज (१९२२-४०)
१) छत्रपती राजाराम (तिसरे राजाराम) हे १९२२ ते १९४० पर्यंत कोल्हापूरचे महाराज होते, त्यांचा जन्म कधी झाला होता ?
१) २ एप्रिल १८९४
२) ३१ जुलै १८९७
३) १७ मार्च १८८४
४) २६ जुलै १९०२
२) राजर्षी शाहू महाराज यांच्यानंतर राजर्षी राजाराम महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात केलेले कार्य ओळखा.
अ) अद्ययावत पाणीपुरवठा प्रणाली
ब) उच्च दर्जाची स्त्री शिक्षण संस्था
क) आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांना आश्रय
ड) आधुनिक गृहनिर्माण विकास
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
३) ब्राह्मणेत्तर मराठा पुरोहितांकडून वैदिक विधीने संपन्न झालेला आखिल हिंदुस्थानातील पहिला राज्याभिषेक समारंभ कोणता ?
१) बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचा राज्याभिषेक १८७५
२) राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक १८८४
३) छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक १९२२
४) छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक १६८१
४) राजर्षी शाहू छत्रपतींनी बहुजनांना धार्मिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी मराठा पुरोहित निर्माण करणार्या कोणत्या संस्थेची स्थापन केली होती?
१) आर्य समाज कोल्हापूर
२) क्षात्र जगतगुरुपीठ विद्यालय कोल्हापूर
३) श्री शिवाजी क्षत्रिय वैदिक विद्यालय कोल्हापूर
४) सत्यशोधक समाज कोल्हापूर
५) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) छत्रपती शाहूंनी सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली (१९१३).
२) छत्रपती शाहूंनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली (१९१८).
३) छत्रपती शाहूंनी जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला (१९२०).
४) छत्रपती शाहूंनी बलुतेदारांना त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले (१९२२).
६) कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी सनातनी वृत्तीला पायबंध घालून मराठा पुरोहितांकडून राज्याभिषेक करवून घेऊन राज्यकारभाराची सूत्रे ........ रोजी आपल्या हाती घेतली होती.
१) ३१ मे १९२१
२) ३१ मे १९२२
३) ६ मे १९२२
४) ६ मे १९२३
७) खालील पैकी कोणास” विजयी मराठा” कार म्हणून ओळखले जाते ?
१) ग. गो. जाधव
२) केशवराव भोसले
३) केशवराव जेधे
४) श्रीपतराव शिंदे
८) राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात कृषी उत्पादनासाठी खालीलपैकी कोणती बाजारपेठ वसविली नव्हती ?
१) शाहूपुरी
२) जयसिंगपूर
३) राजारामपुरी
४) १ आणि २
९) खालीलपैकी कोणते विधान छत्रपती राजाराम यांच्या बाबतीत चुकीचे आहे?
१) १९१८ मध्ये छत्रपती राजाराम यांचे धाकटे बंधू शिवाजी यांचे अपघाती निधन झाले होते.
२) राजाराम महाराजांच्या नंतर छत्रपती सातवे शिवाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजे बनले.
३) शाहू महाराजाप्रमाणेच सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांनी त्यांना प्रशिक्षित केले.
४) त्यांनी कोल्हापूर येथे उच्च न्यायालय स्थापन केले.
१०) राजर्षी शाहू छत्रपतींचे निधन कधी झाले ?
१) १ मे १९२३
२) ३१ मे १९२२
३) ६ मे १९२२
४) ६ मे १९२१
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१७८)
१-२
२-४
३-३
४-३
५-४
६-२
७-४
८-३
९-३
१०-३