साखर उद्योग / प्रश्नमंजुषा (१७६)
- 31 May 2021
- Posted By : study circle
- 620 Views
- 4 Shares
प्रश्नमंजुषा (१७६)
१) २०२०-२१ साली देशभरात किती साखरेचे उत्पादन झाले ?
१) २०० लाख टनांपेक्षा अधिक
२) ११० लाख टनांपेक्षा अधिक
३) ३०० लाख टनांपेक्षा अधिक
४) ३५० लाख टनांपेक्षा अधिक
२) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) देशाला दरवर्षी २०० लाख टन, तर महाराष्ट्राला ३५ लाख टन साखरेची गरज असते.
ब) २०२०-२१ मध्ये महाराष्ट्रात गरजेच्या तिप्पट साखर उत्पादन झाले.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) कोणतेही नाही
३) २०२१-२२ मध्ये देशातील साखर कारखान्यांना केंद्राने ठरवून दिलेला साखर निर्यातीचा कोटा किती होता ?
१) १०० लाख टन
२) ५० लाख टन
३) १०६ लाख टन
४) ६० लाख टन
४) खालील राज्यांचा ऊसाखालील क्षेत्रानुसारचा योग्य चढता क्रम लावा.
अ) गुजरात
ब) बिहार
क) महाराष्ट्र
ड) कर्नाटक
इ) उत्तरप्रदेश
पर्यायी उत्तरे :
१) अ - ब - क - ड - इ
२) इ - क - ब- ड - अ
३) अ - ब - ड - क - इ
४) इ -ड - ब - अ - क
५) मागील दहा वर्षांत राज्यात सरासरी ११.३० टक्क्यांपेक्षा अधिक असलेला साखर उतारा , २०२०-२१ मध्ये १०.५० टक्क्यांवर आला, त्याचे कारण शोधा.
१) कमी कालावधीचे ऊस पीक घेण्याकडे कल
२) साखर कारखान्यांचा इथेनॉलनिर्मितीवर भर
३) नैसर्गिक कारणे
४) वरील सर्व
६) साखर उद्योगासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टलरी बसवण्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागतो.
ब) पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सध्या १० टक्के निश्रि्चत आहे.
क) २०२०-२१ साली महाराष्ट्रात १०६ लाख टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन झाले.
ड) राज्यातील २० साखर कारखान्यांनी प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
७) परदेशात साखर कमी भावाने निर्यात करावी लागत असल्याने केंद्र सरकार निर्यात साखरेला किती अनुदान देते ?
१) प्रतिटनाला ५ हजार रुपये
२) प्रतिटनाला १० हजार रुपये
३) प्रतिटनाला ६ हजार रुपये
४) प्रतिटनाला ४ हजार रुपये
८) कोणत्या देशांनी जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ), साखर निर्यातीसाठी अनुदान मिळत असल्याने भारताची साखर जागतिक बाजारात जास्त येत असल्याने आमची साखर येऊ शकत नसल्याची तक्रार केली ?
अ) ब्राझील
ब) ऑस्ट्रेलिया
क) थायलंड
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ आणि क
४) अ, ब आणि क
९) खालील जोड्या अचूक जुळवा :
स्तंभ अ (घटक) स्तंभ ब (टक्केवारी)
अ) कर्बोदके I. ६३ टक्के
ब) प्रथिने II. १० ते २५ टक्के
क) तेल III. ५० टक्के
ड) खाद्य घटक IV. १७ टक्के
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) III IV II I
२) II I III IV
३) II III IV I
४) IV III I II
१०) २०२०-२१ च्या हंगामात राज्यातील ऊस क्षेत्र किती होते ?
१) १० लाख हेक्टर
२) २२ लाख हेक्टर
३) १२ लाख हेक्टर
४) १४ लाख हेक्टर
११) सोयाबीन पीकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) हे पीक स्वयमपरागीकरण होणारे आहे.
ब) महाराष्ट्रात राज्यात साधारण ५० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते.
क) महाराष्ट्रात रब्बी हंगाममध्ये घेतले जाणारे सोयाबीन हे एक महत्त्वाचे पीक आहे.
ड) अन्न व औषध असा दुहेरी वापर सोयाबीनचा केला जातो.
पर्यायी उत्तरे :
१) विधाने अ आणि ब बरोबर
२) विधाने ब, क आणि ड बरोबर
३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
४) विधाने अ आणि ड बरोबर
१२) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) सोयाबीनची उगवण क्षमता ६० टक्के अपेक्षित असते.
२) सोयाबीनची फुले पांढरी व जांभळट छटा असलेली असतात.
३) सोयाबीनच्या एका झुडपावर ४०० शेंगा लागतात.
४) कृषी खात्यांने सोयाबीनचे वर्गीकरण कडधान्य पीक म्हणून केलेले आहे.
१३) २०२० मध्ये सोयाबीनचा हमीभाव किती होता ?
१) ४८०० रुपये क्विंटल
२) ४१०० रुपये क्विंटल
३) ३८०० रुपये क्विंटल
४) ४५०० रुपये क्विंटल
१४) ग्राम बीजोत्पादन मोहीमे संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) ही मोहीम राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत राबविली जाते.
ब) या मोहिमेद्वारे शेतकर्यांनी घरचे राखून ठेवलेले बियाणे वापरले जाते.
क) महाबीजचे बियाणे उगवले नाही तर पर्यायी बियाणे देण्याची ही मोहीम आहे.
ड) खाजगी कंपन्यांच्या बियाणांची उगवण न झाल्यास भरपाई देणारी ही योजना आहे.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) फक्त ब बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१७६)
१-३
२-३
३-४
४-३
५-४
६-१
७-३
८-४
९-३
१०-१
११-४
१२-४
१३-३
१४-२