मराठा आरक्षण / प्रश्‍नमंजुषा (१७५)

  • मराठा आरक्षण / प्रश्‍नमंजुषा (१७५)

    मराठा आरक्षण / प्रश्‍नमंजुषा (१७५)

    • 31 May 2021
    • Posted By : study circle
    • 411 Views
    • 1 Shares
     आरक्षण : प्रश्‍नमंजुषा (१७५)
     
    १)  खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात आपला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवू शकते ?
        १) कलम ३४१
        २) कलम ३४४ ए
        ३) कलम ३४२ बी
        ४) कलम ३४२ ए

    २)  १९९२ साली किती न्यायमूर्तींच्या न्यायपीठाने, इंद्रा सहानी प्रकरणाचा निकाल देताना, आरक्षण कोणत्याही स्थितीत ५० % पेक्षा जास्त असू नये, हे स्पष्ट केले होते ?
        १) अकरा न्यायमूर्तींचे न्यायपीठ
        २) दहा न्यायमूर्तींचे न्यायपीठ
        ३) नऊ न्यायमूर्तींचे न्यायपीठ
        ४) पाच न्यायमूर्तींचे न्यायपीठ

    ३)  खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
        अ) केंद्र सरकारच्या मते, राज्य सरकारना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देता येते.
        ब) सर्वोच्च न्यायालयाच्या मते, १०२ व्या घटना दुरुस्तीद्वारे राज्य सरकारचे सामाजिक आणि आर्थिक मागास वर्गाला आरक्षण देण्याचे अधिकार अबाधित ठेवलेले आहेत.
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ     
        २) फक्त ब    
        ३) अ आणि ब दोन्ही           
        ४) कोणतेही नाही

    ४)  कोणत्या घटनादुरुस्तीन्वये केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गाला १० टक्के आरक्षण दिलेले आहे ?
        १) १०१ व्या घटना दुरुस्ती
        २) १०२ व्या घटना दुरुस्ती
        ३) १०३ व्या घटना दुरुस्ती
        ४) १०४ व्या घटना दुरुस्ती

    ५)  मराठा आरक्षणासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) इंद्रा सहानी खटल्याचा आधार देत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले.
        ब) न्या. गायकवाड आयोगााचा आधार घेत मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला मान्यता दिली होती.
        क) सध्या देशातील २६ राज्यांत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवर गेलेली आहे.
        ड) राज्यघटनेच्या कलम १५ (६) आणि १६ (६) च्या अंतर्गत कोणत्याही मागास वर्गाबद्दल कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारना आहे
        पर्यायी उत्तरे :
        १) अ आणि ब बरोबर  
        २) ब, क आणि ड बरोबर
        ३) अ, ब आणि ड बरोबर        
        ४)  अ, क आणि ड बरोबर

    ६)  कोणत्या घटनादुरस्तीच्या आधारावर महाराष्ट्र राज्य सरकारने न्या. एम. जी. गायकवाड आयोग नेमलेला होता ?
        १) १०० व्या घटनादुरस्तीच्या आधारावर
        २) ८७ व्या घटनादुरस्तीच्या आधारावर
        ३) १०३ व्या घटनादुरस्तीच्या आधारावर
        ४) १०२ व्या घटनादुरस्तीच्या आधारावर

    ७)  मराठा आरक्षणासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
        अ) न्या. एम. जी. गायकवाड यांच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने विधीमंडळात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर केला होता.
        ब) सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही हे सांगत मराठा कायदा रद्द केला
        क) मराठा आरक्षण ५ न्यायमूर्तींच्या न्यायपीठाने एकमताने रद्द केले.
        वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
        पर्यायी उत्तरे :
        १) फक्त अ                   
        २) फक्त अ आणि ब  
        ३) फक्त अ आणि क           
        ४) अ, ब आणि क

    ८)  १०३ व्या घटनादुरुस्तीने आरक्षणाचा कोणता संवर्ग निर्माण केला ?
        १) एसबीसी
        २) एसइबीसी
        ३) इडब्ल्यूएस
        ४) इएसबीसी

    ९)  महाराष्ट्रातील आरक्षणासंबंधी खालील जोड्या अचूक जुळवा :
          स्तंभ अ (संवर्ग)                स्तंभ ब (आरक्षणाची टक्केवारी)
        अ. अनुसूचित जाती                                        I.  १९ टक्के
        ब. अनुसूचित जमाती                                     II.  १३ टक्के
        क. इतर मागास वर्गीय                                III.  ७ टक्के
        ड. विशेष मागास वर्गीय                               IV.  २ टक्के
        पर्यायी उत्तरे :
                  अ    ब     क     ड
              (1)     II          III          I              IV
              (2)     II          III          I              IV
              (3)     III         II           IV           I
              (4)     IV         III          I              II

    १०) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
        १)  संसदेने घटनादुरुस्ती करून इडब्ल्यूएस आरक्षणासाठी १० टक्क्यांची मर्यादा घातली आहे.
        २)  एससी आणि एसटी वगळता इतर सर्व आरक्षणांमध्ये उत्पन्नाची मर्यादा (एनसीएल) ही अट आहे.
        ३)  महाराष्ट्रात एकूण ३२ टक्के मराठा समाज आहे.
        ४)  वार्षिक उत्पन्न ७ लाखांहून अधिक असेल तर इडब्ल्यूएस आरक्षणासाठी व्यक्ती पात्र ठरत नाही.

    ११) १०३ व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
        अ) या घटनादुरुस्तीने इडब्ल्यूएस संवर्ग तयार केला.
        ब) इडब्ल्यूएस अंतर्गत १० टक्के आरक्षण आहे.
        क) इडब्ल्यूएस अंतर्गत राजकारणात व प्रशासनात आरक्षण मिळू शकते.
        ड) ज्या कुटुंबाची शेती  ४ एकरापेक्षा जास्त नाही त्या व्यक्ती इडब्ल्यूएस संवर्गात येतात.
        पर्यायी उत्तरे :
        १) विधाने अ, ब आणि क बरोबर
        २) विधाने ब, क आणि ड बरोबर
        ३) विधाने अ, ब आणि ड बरोबर  
        ४) विधाने अ आणि  ब बरोबर

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१७५)
    १-४
    २-३
    ३-१
    ४-३
    ५-१
    ६-४
    ७-२
    ८-३
    ९-२
    १०-४
    ११-४

     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 411