खाद्यतेल / प्रश्नमंजुषा (१७४)
- 31 May 2021
- Posted By : study circle
- 310 Views
- 0 Shares
प्रश्नमंजुषा (१७४)
१) भारतात तेलबियांच्या लागवडीखालील क्षेत्र किती आहे ?
१) सुमारे २.०० कोटी हेक्टर
२) सुमारे १.५० कोटी हेक्टर
३) सुमारे २.५० कोटी हेक्टर
४) सुमारे ३.५० कोटी हेक्टर
२) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) टेकनॉलॉजी मिशन ऑन ऑईलसीड्स ही योजना राजीव गांधींच्या प्रेरणेने सुरु झाली.
ब) १९८६ साली भारतात तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठी राष्ट्रीय धोरण आखले गेले.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) कोणतेही नाही
३) भारत कोणत्या देशाकडून खनिजतेल आयात करत नाही ?
१) इराक व इराण
२) सौदी अरेबिया व कुवेत
३) इंडोनेशिया व मलेशिया
४) यापैकी नाही
४) भारताच्या आयातीतील वस्तूंचा योग्य उतरता क्रम लावा.
अ) खाद्य तेल
ब) सोने
क) क्रुड ऑईल
ड) रत्ने, हिरे व माणिक
पर्यायी उत्तरे :
१) अ - ब - क - ड
२) क - अ - ड - ब
३) क - ब - अ - ड
४) ड - ब - अ - क
५) भारतातील खाद्यतेल बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) २०३० पर्यंत देशांतर्गत खाद्यतेलाची गरज ३५० लाख मेट्रिक टन एवढी वाढणार आहे.
२) एकूण खाद्यतेलाच्या वापरात पाम तेलाचे प्रमाण ४० टक्के आहे.
३) १९९२-९३ मध्ये भारतात प्रति व्यक्ती खाद्यतेलाचा वापर वर्षाला ५ किलो होता.
४) २०२० साली भारताने ८० हजार कोटी रुपयांच्या खाद्यतेलाची आयात केली.
६) आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती वाढण्याची (२०२१) कारणे विचारात घ्या :
अ) खाद्यतेलाचे स्पॉट मार्केट
ब) खाद्यतेलाचा फूड बास्केटमधून फ्युएल बास्केटमध्ये समावेश
क) अमेरिकेकडून अधिकाधिक खाद्यतेल साठ्याची खरेदी
ड) इंडोनेशिया-मलेशियामध्ये कच्च्या पाम तेलाच्या निर्यातीवर असणारे भरमसाठ कर
पर्यायी उत्तरे :
१) विधाने अ, ब आणि क बरोबर
२) विधाने ब, क आणि ड बरोबर
३) विधाने अ, ब आणि ड बरोबर
४) विधाने अ, क आणि ड बरोबर
७) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
१) भारतात ग्रामीण भागात दरमहा प्रतिमाणशी खाद्यतेलाचा वापर शहरी भागापेक्षा जास्त आहे.
२) भारतात ग्रामीण भागात दरमहा प्रतिमाणशी खाद्यतेलाचा वापर शहरी भागापेक्षा कमी आहे.
३) भारतात ग्रामीण भागात दरमहा प्रतिमाणशी खाद्यतेलाचा वापर शहरी भागाइतकाच आहे.
४) भारतात गेल्या पाच वर्षात सरासरी दरडोई तेल सेवनात ३ किलोंची वाढ झाली.
८) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
अ) देशात खाद्यतेलाची खरी मागणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार्या सणांच्या हंगामात वाढते.
ब) भारत गरजेच्या जवळपास ८२ टक्के खनिज तेल आयात करतो.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त ब
३) अ आणि ब दोन्ही
४) कोणतेही नाही
९) भारताच्या खाद्यतेल आयातीच्या दिशेसंदर्भात खालील जोड्या विचारात घ्या :
अ) पाम तेल : इंडोनेशिया-मलेशिया
ब) मस्टार्ड तेल : ऑस्ट्रेलिया-रशिया
क) सोयाबीन तेल : अर्जेंटिना-ब्राझील
ड) सनफ्लॉवर तेल : युक्रेन-अर्जेंटिना
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क बरोबर
२) ब, क आणि ड बरोबर
३) अ, ब आणि ड बरोबर
४) अ, क आणि ड बरोबर
१०) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१) २०१९ साली भारतास १.५० कोटी टन खाद्यतेल आयात करावे लागले.
२) २०१९ साली भारताने खाद्यतेल आयातीवर केलेला खर्च ७३०० कोटी रु. इतका होता.
३) भारत एकूण खाद्यतेल गरजेच्या ५६ टक्के तेल आयात करतो.
४) जागतिक स्तरावरील खाद्यतेलाची एक तृतियांश मागणी भारतामधून येते.
११) भारत कोणत्या देशाकडून खाद्यतेल आयात करतो?
अ) युक्रेन
ब) मलेशिया
क) इंडोनेशिया
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ आणि क
४) अ, ब आणि क
१२) आंतरराष्ट्रीय बाजारात कोणत्या वस्तू स्पॉट मार्केटमध्ये विकल्या जातात ?
१) खाद्यतेल व खनिज तेल
२) धातू व कापूस
३) कडधान्ये व सोने
४) १ आणि २
१३) भारतातातील आयातीच्या प्रमाणानुसार खाद्यतेलांचा योग्य चढता क्रम लावा.
अ) सोया तेल
ब) सनफ्लॉवर तेल
क) ऑलिव्ह तेल
ड) पाम तेल
पर्यायी उत्तरे :
१) अ - ब - क - ड
२) क - अ - ड - ब
३) ब - ड - अ - क
४) क - ब - अ - ड
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१७४)
१-३
२-३
३-४
४-३
५-३
६-३
७-१
८-३
९-४
१०-४
११-४
१२-४
१३-४