भारताची फाळणी / प्रश्‍नमंजुषा (१६८)

  • भारताची फाळणी / प्रश्‍नमंजुषा (१६८)

    भारताची फाळणी / प्रश्‍नमंजुषा (१६८)

    • 25 May 2021
    • Posted By : sudy circle
    • 2535 Views
    • 8 Shares
     भारताची फाळणी
     
        महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणीवर अनेक प्रश्‍न विचारले गेलेले आहेत. याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) :  इतिहास विभाग
     
    राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
     
    १.९ सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी -
     
        मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ (सर सय्यद अहमद खान व अलिगढ चळवळ, मुस्लीम लीग व अली बंधू, इक्बाल, जिन्ना), हिंदू महासभेचे राजकारण.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    मुस्लीम लीग व फाळणीकडे वाटचाल
     
    १)  ’मुस्लीम हे हिंदुस्तानचे नागरिक असून त्यांनी हिंदुस्तानाशी निष्ठा राखली पाहिजे.’ असे देवबंद चळवळी दरम्यान कोणत्या विद्वानाने म्हटले?
        १) मोहम्मद कासिम नानौतवी
        २) रशीद अहमद गंगोही
        ३) शिबली निमानी
        ४) मिर्झा गुलाम अहमद

    २)  स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली ?
        १) बॅ. जिना
        २) रहमत अली
        ३) महंमद इक्बाल
        ४) मौलाना आझाद

    ३)  ऑल इंडिया मुस्लीम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
              १) बॅरीस्टर जिन्हा
        २) सर सय्यद अहमदखान          
        ३) आगाखान
        ४) सलिमुल्ला खान

    ४)  ’मुस्लीम ऑल इंडिया कॉन्फीडरसी’ ही संस्था कोणी स्थापन केली होती ?
        १) अजिमुल्ला
        २) कवी इक्बाल
        ३) सलिमुल्ला
        ४) सर सय्यद अहमद खान

    ५)  सर्व आसाम पूर्व बंगालला जोडून पाकिस्तानात त्याचा समावेश करावा.अशी सूचना कोणी केली होती ?
        १) कमूम खान
        २) गोपीनाथ बार्डोलाय
        ३) सर महमद सादुल्ला खान
        ४) बॅरिस्टर जिन्ना

    ६)  ३० डिसेंबर, १९०६ रोजी जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली, तेव्हा ढाका येथे ............. च्या विसाव्या अधिवेशनासाठी मुस्लिम प्रतिनिधी एकत्र आले होते.
        १) भारतीय राष्ट्रीय सभा
        २) मुस्लिम शिक्षण परिषद
        ३) मुस्लिम राष्ट्रीय सभा
        ४) बंगाल मुस्लिम काँग्रेस

    ७)  १९१२ साली भरलेल्या मुस्लिम लीगच्या सहाव्या अधिवेशनास मोहम्मद अली जीन्नाह, बिशन नारायण धर आणि ................. हे निमंत्रित पाहुणे होते.
        १) अबुल कलाम आझाद
        २) सरोजिनी नायडू
        ३) मोहम्मद अमीर खान
        ४) कमला दास

    ८)  योग्य व्यक्ती ओळखा :
        अ) त्यांनी १९२१ मध्ये वकिलीवर पाणी सोडले.
        ब) ’द मदरलँड’ नावाचे इंग्रजी साप्ताहिक त्यांनी सुरू केले.
        क) ते तीन वेळा शाही विधानमंडळावर (इंपीरिअल लेजिस्लेचर) निवडून गेले होते.
        पर्यायी उत्तरे :
        १) मोतीलाल नेहरू
        २) हकीम अजमल खान
        ३) लाला लजपत राय
        ४) मझार उल हक

    ९)  विजोड व्यक्ती ओळखा :
        १) नबाब सैय्यद महोमद
        २) नबाब मोहसीन-उल्-मुल्क
        ३) अब्बास एस. तय्यबजी
        ४) जस्टीस तय्यबजी

    १०) पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ?
              a) ते दुधू मिया म्हणून ओळखले जात.
        b) त्यांच्यात संघटनेचे कौशल्य होते.
        c) त्यांचे मुख्यालय बहादुरपूर येथे होते.
        d) जुलै १८५७ मध्ये त्यांना अटक केले व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले.
        e) ते २४ सप्टेंबर १८६० रोजी बहादुरपूर येथे मरण पावले.
        पर्यायी उत्तरे :
        १) शरीयतउल्ला
        २) सय्यद अहमद
        ३) महमद मुशिन
        ४) मीर नासिर अली

    ११) १९४१ साली ’मुस्लीम स्टुडंट्स फेडरेशन’ तर्फे ’पाकिस्तान परिषदे’चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
        १) भागलपूर
        २) ल्यालपूर
        ३) दिल्ली
        ४) कानपूर

    १२) विधान -a) म. अ. जिन्हा यांनी काँग्रेस सोडली.
        कारण -b) त्यांना काँग्रेसमधील गबाळ्या कपड्यांतील हिंदुस्तानी बोलणारे सदस्य आवडले नव्हते.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत व (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
        २) (a) बरोबर आहे, परंतु (b) चूक आहे.             
        ३) (a) चुकीचे आहे (b) चुकीचे आहे.
        ४) (a) बरोबर आहे, (b) बरोबर आहे परंतु ते (a) चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

    १३) खाकसार म्हणजे ...... होय.
        १) मुसलमानांची लढाऊ संघटना
        २) हिंदूची लढाऊ संघटना
        ३) शिखांची लढाऊ संघटना
        ४) गुरख्यांची लढाऊ संघटना

    १४) १९३३ साली मुस्लीम लीगच्या राजकीय पुढार्‍यांनी ’जॉइन्ट कमिटी ऑफ कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म’ च्या पुढे पाकिस्तानच्या मागणीला काय म्हटले ?
        १) ते विद्यार्थ्यांचे स्वप्न
        २) ते शिक्षकांचे स्वप्न
        ३) ते राजकीय पुढार्‍यांचे स्वप्न
        ४) ते आम जनतेचे स्वप्न

    १५) सर सय्यद अहमद खान यांनी .......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
        १) पुणे
        २) सातारा
        ३) आग्रा
        ४) अलिगड

    १६) मुस्लीम समाजातील पडदापद्धती व बहुपत्नीकत्व या पद्धतींना ...... यांनी विरोध केला होता.
        १) सर सय्यद अहमद खान       
        २) बॅरिस्टर जिना
        ३) खान अब्दुल गफार खान
        ४) रहेमत अली

    १७) ’वहाबी’ चळवळीचे उद्दिष्ट कोणते?
        १) मुसलमानांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे.
        २) जगातील सर्व मुसलमानाचे एकत्रीकरण करणे.
        ३) हिंदूंना विरोध करणे.
        ४) मुसलमानांचे राज्य स्थापन करणे.

    १८) डब्ल्यू. डब्ल्यू. हंटर यांच्या ‘द इंडियन मुसलमान्स’ या ग्रंथात मुसलमानांचे वर्णन ...... असे केले आहे.
        १) बंड करण्याची दांडगी इच्छा असलेले.
        २) बंड करण्याइतपत शूर
        ३) बंड करण्यास कमकुवत
        ४) संघटना बांधण्यास कमकुवत

    १९) विधान (A) : १८९३ मध्ये ‘मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन फॉर अप्पर इंडिया’ची स्थापना करण्यात आली.
        कारण (R) : मुसलमानांना राजकीय क्षोभापासून अलिप्त ठेवण्यासाठी व भारतात ब्रिटिशांची सत्ता मजबूत करण्यासाठी.
        १) (A) आणि  (R) दोन्ही बरोबर आहेत.
        २) (A) चुकीचे आहे(R) चुकीचे आहे            
        ३) (A) बरोबर आहे, (R) चुकीचे आहे
        ४) (A) चुकीचे आहे, (R)  बरोबर आहे.

    २०) १९३० च्या मुस्लीम कुठल्या अधिवेशनात कवी मोहंमद इक्बालने मुस्लीम राष्ट्राची कल्पना मांडली?
        १) दिल्ली
        २) कोलकाता
        ३) अलाहाबाद
        ४) ढाक्का

    २१) खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने हे तर्क दिले आहे की लाहोर क्रांती, जी मुस्लीम लीग तर्फे होती. हा जिना यांचा चातुर्य प्रहारहोता आणि काँग्रेस वर हिंदू मुस्लीम प्रकाराला केंद्रात आणून राज्यासाठी  स्वशासन मागण्याचा प्रकार होता ?
        १) आयेशा जलाल
        २) बिपिन चंद्र
        ३) डेव्हिड गिल मार्टिन
        ४) मुशिरुल हसन

    २२) मुस्लीम लीगने ‘मुक्ती दिन’ केव्हा साजरा केला?
        १) १९२६ मध्ये, जेव्हा स्वराज्य पक्षाने प्रांतातील आपले बहुमत गमाविले.
        २) १९२९ मध्ये, काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची मागणी जाहीर केली त्यानंतर.
        ३) १९३२ मध्ये, सरकारने काँग्रेसला बेकायदा घोषित केले तेव्हा.
        ४) १९३९ मध्ये, द्वितीय जागतिक महायुद्धात भारताला ढकलले, त्याचा निषेध म्हणून प्रांतातील काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले तेव्हा.

    २३) सर सय्यद अहमद खान यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
        १) त्यांनी इंग्रजांना खात्री देण्याचा प्रयत्न केला की मुस्लीम १८५७ च्या उठावाकरिता जबाबदार नव्हते.
        २) त्यांनी मुस्लिमांची मने वळविण्याचा प्रयत्न केला की त्यांनी इंग्रजी शिक्षण घ्यावयास हवे.
        ३) त्यांनी मुस्लिमांना अशी विनंती केली की त्यांनी इंग्रजांना सहकार्य करावे.
        ४) त्यांनी १८५७ च्या उठावानंतर दोन पुस्तके लिहिली एक उठावाची कारणे दाखवण्यास्तव व दुसरे उठावाचा परिणाम काय झाला हे लिहिण्यास्तव.

    २४) ‘हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे (भारत) दोन डोळे‘ अशी उपमा कोणी दिली ?    
        १) जवाहरलाल नेहरू
              २) मुहम्मद इक्बाल
        ३) सय्यद अहमदखाँ
        ४) महात्मा गांधी

    २५) डिसेंबर, १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात कोणाच्या अध्यक्षीय भाषणाने ’पाकिस्तानचा’ पाया घातला गेला असे मानले जाते?
        १) रहमत अली
        २) इकबाल
        ३) मो. जिन्ना
        ४) लॉर्ड कर्जन

    २६) विधान - a) म. अ. जिन्हा यांनी काँग्रेस सोडली.
        कारण - b) त्यांना काँग्रेसमधील गबाळ्या कपड्यांतील हिंदुस्तानी बोलणारे सदस्य आवडले नव्हते.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b) दोन्ही बरोबर आहेत व (b) हे (a) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
        २) (a) बरोबर आहे, परंतु (b) चूक आहे.
        ३) (a) चुकीचे आहे (b) चुकीचे आहे.
        ४) (a) बरोबर आहे, (b) बरोबर आहे परंतु ते (a) चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

    २७) पुढीलपैकी कोणते विधान सर सय्यद अहमद खान यांचे आहे?
        a) आधुनिक शिक्षणाचा व इंग्रजी भाषेचा स्वीकार केल्याशिवाय मुस्लीम समाजाची प्रगती होणे अवघड आहे.
        b) हिंदू व मुसलमान म्हणजे ’भारत वधूचे’ नेत्र होत.
              c) हिंदुस्थानात हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत.
              d) मुसलमानांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून दूर राहावे.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a) आणि (b)
        २) (c) आणि (d)
        ३) (c) फक्त
        ४) वरील सर्व

    २८) पुढील कोणते विधान अयोग्य आहे?
        a) पाकिस्तान सरकारला निझामाने ८०० लक्ष रुपये दिले होते.
        b) जिन्हांच्या मदतीने पोर्तुगिजांकडून गोवा बंदर वापरण्याची परवानगी हवी होती.
        c) निझामाने एका पाकिस्तानीची त्याच्या मुख्य मंत्रीपदी नेमणूक केली.
        पर्यायी उत्तरे :
        १) (a)
        २) (b)
        ३) (c)
        ४) एकही नाही

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (१६८)
     
    १-३
    २-२
    ३-३
    ४-३
    ५-३
    ६-२
    ७-२
    ८-४
    ९-२
    १०-३
    ११-२
    १२-१
    १३-१
    १४-१
    १५-४
    १६-१
    १७-४
    १८-३
    १९-१
    २०-३
    २१-१
    २२-४
    २३-४
    २४-३
    २५-२
    २६-१
    २७-४
    २८-१

     

Share this story

Total Shares : 8 Total Views : 2535