क्रांतिकारक चळवळी / प्रश्नमंजुषा (१६३)
- 22 May 2021
- Posted By : study circle
- 10513 Views
- 13 Shares
क्रांतिकारक चळवळी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”क्रांतिकारक चळवळी” वर अनेक प्रश्न विचारले जातात. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, महाराष्ट्र-बंगाल-पंजाब मधील क्रांतिकारी चळवळी व संघटना, त्यांचे संस्थापक, त्यांचे कार्य व त्यावर विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास विभाग
* राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.६ ब्रिटिश शासनविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव -
१.६.२ क्रांतिकारी चळवळी - महाराष्ट्रातील बंड - वासुदेव फडके, अभिनव भारत, बंगाल व पंजाब मधील क्रांतिकारी चळवळी, अमेरिका, इंग्लंड, येथील भारतीयांच्या क्रांतिकारी चळवळी, आझाद हिंद सेना.
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
क्रांतिकारक चळवळी
१) महाराष्ट्रातील क्रांतिकारक
२) वासुदेव बळवंत फडके
३) चाफेकर बंधू
४) मित्र मेळा व अभिनव भारत
५) अनंत कान्हेरे
६) सेनापती बापट
७) सातारा येथे प्रतिसरकार
८) महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना
१) महाराष्ट्रातील क्रांतिकारक
१) ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतिकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली?
a) किचकवध
b) सुभद्राहरण
c) सौभद्र
d) कट्यार काळजात घुसली
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b)
३) (c) आणि (d)
४) (b) फक्त
२) बॉम्ब निर्मितीचे शिक्षण घेण्याकरिता वासूकाका जोशी व त्यांचे साथीदार .......... येथे केवळ नेपाळच्या राजाच्या चांगुलपणामुळे जाऊ शकले.
१) जर्मनी
२) रशिया
३) जपान
४) चीन
३) सशस्त्र क्रांतिकारकांच्या व त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्या जोड्या लावा.
a) श्रीधर परांजपे i) हैदराबाद
b) डॉ. सिद्धनाथ काणे ii) अमरावती
c) दादासाहेब खापर्डे iii) यवतमाळ
d) नरहरिपंत घारपुरे iv) वर्धा, नागपूर
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (i) (ii)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (i) (ii) (iii) (iv)
४) (ii) (i) (iv) (iii)
४) उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले ?
१) पुणे
२) नागपूर
३) मीरत
४) मुंबई
५) बॅरिस्टर केशवराव देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या अंधेरीत साधकआश्रम सुरू केले गेले, जेथे प्रवेश घेण्याकरता विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा घ्यावी लागत असे की :
१) ते वैज्ञानिक विचारधारा वाढवतील.
२) ते स्त्रियांच्या शिक्षणासाठी व विधवांच्या पुनर्विवाहासाठी काम करतील.
३) ते समाजातील सर्व अनिष्ट प्रथांविरुद्ध झगडतील.
४) ते शासकीय नोकरी कधीही पत्करणार नाहीत.
६) क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
१) भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
२) श्रीमंतांकडून कोणत्याही मार्गांनी पैसे काढणे.
३) रेल्वे लाईनस् व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटिश साम्राज्य अडचणीत येईल.
४) वरील सर्वांचा त्या कार्यक्रमात सहभाग होता.
७) महाराष्ट्रातील व भारतीय क्रांतिकारकांना जपानकडून काय मिळाले?
१) प्रेरणा व बॉम्ब बनविण्याची प्रक्रिया
२) आर्थिक मदत व शस्त्रास्त्र रसद.
३) वरील दोन्ही
४) वरील एकही नाही.
८) जोड्या जुळवा :
a) आर. एस. रुईकर i) हिंदुस्थान रेड आर्मी
b) मगनलाल बागडी ii) प्राचार्य, सेकसारीआ, कॉमर्स कॉलेज
c) डॉ. खेडेकर iii) फॉरवर्ड ब्लॉक
d) श्रीमन नारायण अग्रवाल iv) अकोल्याचे स्वातंत्र्य सैनिक
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (iv) (ii)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (ii) (iv) (i) (iii)
४) (i) (ii) (iii) (iv)
९) कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या नेपाळ योजनेत ...... हे त्यांचे सहकारी होते.
अ) हनमंत अण्णाजी कुलकर्णी
ब) रंगनाथ गोविंद तिखे
क) दामू जोशी
ड) बंडोपंत रूईकर
१) फक्त अ आणि क
२) फक्त क आणि ड
३) फक्त अ, ब, आणि ड
४) अ, ब, क आणि ड
१०) भारताबाहेर घडलेल्या काही घटनांनीही इंग्रजांविरुद्धच्या व देशप्रेमी भावना वाढविल्या. खालीलपैकी त्यातील कोणती घटना नव्हती ?
a) इथियोपियन लोकांकडून ब्रिटिशांचा पराभव
b) जपानकडून सन १९०५ मध्ये रशियाचा पराभव.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) दोन्ही (a) व (b)
४) न (a) न (b)
११) मीरत कट खटल्यात पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती?
१) श्री. अ. डांगे
२) निंबकर
३) मुझफ्फर अहमद
४) राजेंद्र लाहिरी
१२) क्रांतिकार्यांच्यासंबंधी खालीलपैकी कोणते वक्तव्य चूक आहे ?
१) त्यांच्यासाठी १९२० आणि १९३० दरम्यानचा काळ उत्तम होता.
२) त्यांचे प्रमुख लक्ष्य होते अत्याचारी ब्रिटिश अधिकार्यांना ठार मारणे.
३) त्यांना बाँब बनवण्याची काहीच माहिती नव्हती.
४) काही क्रांतिकार्यांनी विदेशातून हत्यारांचे प्रशिक्षण घेतले होते.
१३) १९३४ नंतर क्रांतिकारी संघटना जवळ जवळ प्रभावहीन झाल्या कारण.......
१) गांधीजींचे अहिंसावादी आंदोलन जनतेने पसंत केले.
२) इंग्रजांच्या जुलमी कार्यवाहीमुळे क्रांतिकारक संघ मागे पडले.
३) गुप्ततेची गरज असल्यामुळे सामान्य जनतेला विश्वासात घेतले नाही.
४) क्रांतिकारकांना मार्गदर्शन करण्यास मध्यवर्ती नेतृत्व नव्हते.
१४) खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता ?
१) दामोदर चाफेकर
२) विनायक दामोदर सावरकर
३) अरविंद घोष
४) भगत सिंग
१५) यादी - I आणि यादी -II जुळवा आणि खालील कोडच्या माध्यमाने अचूक उत्तर मिळवा.
यादी - I (नेता) यादी -II (केस)
A) चाफेकर बंधू १) काकोरी कांड
B) चंद्रशेखर आजार २) रँड हत्याकांड
C) सूर्य सेन ३) मेरठ कांड
D) एस ए डांगे ४) चितगाँग हत्यार पकडण्याचे केस
पर्याय :
१) A-2, B-1, C-3, D - 4
२) A-2, B-1, C- 4, D-3
३) A-2, B-4, C-1, D-3
४) A-1, B-2, C-3, D-4
१६) मीरत कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावर सर्वात महत्त्वाचा कोणता परिणाम झाला ?
१) दीर्घकाळ घातलेल्या खटल्यामुळे पक्षाला जनतेची सहानुभूती मिळाली.
२) गांधीजी जेलमध्ये आरोपांना भेटावयास गेले.
३) हाय कमांडला स्वतःची योग्यता कळाली.
४) साम्यवाद्यांचा विद्यार्थी संघटनेत शिरकाव झाला.
१७) साम्यवादी व डाव्या पक्षांनी सहभाग घेतलेल्या किसान सभेत राष्ट्रीय सभेचे काही सदस्य का हजर राहिले?
१) बहुतेक सर्व मेरठ कटाशी संबंधित होते व सुटकेनंतर शेतकर्यासाठी काम करण्याची इच्छा बाळगून होते.
२) ते नेहरू व गांधीजींच्या शेती विषयक धोरणाच्या बाबतीत निराश होते.
३) ते सर्व शेतमजुरी करणारे होते व अन्याय विरोधात सामील झाले होते.
४) स्वतः जमीनदार असल्यामुळे शेतकरी संघटनेवर वर्चस्व ठेवण्यास हजर होते.
१८) खालील जोड्या लावा :
a) तांबवा i) के. डी. पाटील
b) कामेरी ii) काशिनाथ देशमुख
c) इंदोली iii) कृष्णराव कुर्हाडे
d) पलुस iv) दिनकरराव निकम
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iv) (iii)
२) (iv) (iii) (i) (ii)
३) (i) (ii) (iii) (iv)
४) (iv) (iii) (ii) (i)
२) वासुदेव बळवंत फडके
१) राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी ब्रिटीश सत्तेविरूद्ध महाराष्ट्रात सशस्त्र उठाव कोणी केले?
अ) चंद्रशेखर आझाद
ब) उमाजी नाईक
क) वासुदेव बळवंत फडके
ड) नानासाहेब पेशवे
१) फक्त (ब) आणि (क)
२) फक्त (अ) आणि (ब)
३) फक्त (ब) आणि (ड)
४) वरील सर्व
२) भिल्ल, कोळी आणि धनगर यांच्या शिवाय ...... वासुदेव बळवंत फडक्याना येऊन मिळाले.
a) सिताराम गद्रे
b) रामचंद्रपंत कुलकर्णी
c) गोपाळ मोरेश्वर साठे
d) उमाजी नाईक
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (c) फक्त
२) (b) आणि (d) फक्त
३) (b) आणि (d) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d)
३) महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते ?
१) राजाराम मोहन रॉय
२) दादाभाई नौरोजी
३) वि. दा. सावरकर
४) वासुदेव बळवंत फडके
४) वासुदेव बळवंत फडके यांनी आपल्या सहकार्यांच्या मदतीने कोणत्या गावावर पहिला दरोडा घातला ?
१) कराड
२) दापोली
३) दौंड
४) धामारी
५) वासुदेव बळवंत फडके ...... खात्यात लिपिक होते.
१) लष्करी
२) टपाल
३) संरक्षण
४) रेल्वे
६) ............ हे महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक होते.
१) दामोदर चाफेकर
२) वासुदेव बळवंत फडके
३) विनायक दामोदर सावरकर
४) सरदार भगतसिंग
७) ...... हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होय.
१) वि. दा. सावरकर
२) वासुदेव बळवंत फडके
३) दामोदर चाफेकर
४) अनंत कान्हेरे
८) महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते ?
१) राजाराम मोहन रॉय
२) दादाभाई नौरोजी
३) वि. दा. सावरकर
४) वासुदेव बळवंत फडके
९) ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
१) ठाणे
२) अंदमान
३) मंडाले
४) एडन
१०) वासुदेव बळवंत फडकेबाबत काय खरे नाही?
१) त्यांनी स्वत:ची ओळख लपविण्यासाठी दाढी राखली होती व साधूच्या वेषात लोकांत जनजागृती केली.
२) कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाही व प्रथमत: त्यांनी लष्करात नोकरी केली व तद्नंतर रेल्वेत.
३) सुरुवातीस रामोशांची त्यांना मदत होती परंतु नंतर रामोश्यांनी त्यांची साथ सोडली.
४) वरीलपैकी एकही नाही.
३) चाफेकर बंधू
१) पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची १८९३ मध्ये ......... याने हत्या केली.
१) दामोदर हरी चाफेकर
२) वासुदेव बळवंत फडके
३) उस्ताद लहुजी मांग
४) अनंत कान्हेरे
२) ...... या चाफेकर बंधूंनी कमिशनर रँडची हत्या केली.
१) दामोदर व गोपाळ
२) बाळकृष्ण व वासुदेव
३) बाळकृष्ण व गोपाळ
४) दामोदर व बाळकृष्ण
३) “सोसायटी फॉर दी प्रोटेक्शन ऑफ हिन्दू लिजन” ही संस्था कोणी स्थापन केली ?
१) वि. दा. सावरकर आणि अनंत कान्हेरे
२) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर
३) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर
४) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर
४) ....... या इंग्रज अधिकार्याचा खून चाफेकर बंधूनी केला.
१) एलफिन्स्टन
२) रँड
३) जॅक्सन
४) वायली
५) पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या ?
a) महादेव विनायक रानडे
b) दामोदर भिडे
c) खंडेराव साठे
d) बळवंत नातू
पर्यायी उत्तरे :
१) परमहंस सभा
२) चाफेकर क्लब
३) स्टार क्लब
४) अभिनव भारत सोसायटी
६) पुणे येथे ...... उत्सव साजरा केल्यावर दहा दिवसातच पुण्याचे कलेक्टर श्री. रँड व दुसर्या अधिकार्याची सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
१) शिवाजी
२) गणपती
३) दुर्गा
४) नवरात्री
७) जून २२, १८९७ रोजी आरोग्य अधिकारी वॉल्टर रँड आणि एच. आयर्स्टन यांनी पुणे येथे चाफेकर बंधूंनी का मारले?
१) मुंबई प्रांतात भारतीयांच्या विरोधात कुप्रसिद्ध उपाययोजना करण्यामुळे.
२) मुंबई सरकारला भारतीयांच्या विरोधात खोटे रिपोर्ट पाठवणे यामुळे.
३) प्लेगच्या साथीचे नियंत्रण करण्यात पुणे येथे वापरण्यात आलेल्या जाचक उपाययोजनांमुळे
४) भारतीयांना कुठल्याही चौकशी शिवाय अटक करण्यामुळे.
४) मित्र मेळा व अभिनव भारत
१) स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्वा. सावरकरांनी सोलापूरला केव्हा भेट दिली होती?
१) १० सप्टेंबर, १९३८
२) १५ डिसेंबर, १९३९
३) २१ जानेवारी, १९४०
४) ८ ऑगस्ट, १९३७
२) सन १९०० मध्ये नाशिक मध्ये स्थापन झालेल्या “मित्र मेळा” संघटनेबाबत काय खरे नाही ?
१) वि. दा. सावरकर तिचे क्रियाशील सभासद होते.
२) ती एक गुप्त संघटना होती.
३) ती मवाळांची संघटना होती
४) तिचे नंतर रूपांतर अभिनव भारत या संस्थेत झाल
३) पुढीलपैकी कोणत्या कारणांसाठी १८९९ मध्ये नाशिक येथे मित्रमेळा ची स्थापना केली गेली?
१) गणपती उत्सव साजरा करण्यासाठी
२) शिवाजी जयंती साजरी करण्यासाठी
३) त्र्यंबक उत्सव साजरा करण्यासाठी
४) सप्तश्रृंगी उत्सव साजरा करण्यासाठी
४) सावरकर बंधूंनी सन १९०४ मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली?
१) क्रांतीसेना
२) अभिनव भारत
३) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
४) अनुशीलन समिती
५) अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली ?
१) बाळ गंगाधर टिळक
२) चाफेकर बंधू
३) लहुजी साळवे
४) वि. दा. सावरकर
६) अभिनव भारत ही संघटना ...... यांनी स्थापन केली.
१) अरविंद घोष
२) वि. दा. सावरकर
३) फिरोजशहा मेहता
४) राजा राम चिपळूणकर
७) सावरकर बंधू ज्यांनी अभिनव भारताची स्थापना केली त्यांच्याबाबत खालीलपैकी कोणते चुकीचे आहे?
a) विनायक सावरकरांवर इटालियन देशभक्त मॅझिनीचा खूप प्रभाव होता, ज्यांचे आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित केले.
b) बाबाराव सावरकरांनाही त्यांच्या प्रक्षोभक कारवायांकरिता अंदमानात डांबले गेले होते, ज्यामुळे (ज्याविरुद्ध) कान्हेरेंनी जॅकसनला गोळ्या घालून ठार केले.
१) केवल (b)
२) केवल (a)
३) (a) व (b) पैकी एकही नाही
४) (a) व (b) दोन्ही
८) ......... संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
१) बॉम्बे असोसिएशन
२) होमरूल लीग
३) अभिनव भारत
४) लँड होल्डर्स असोसिएशन
९) सावरकर बंधू ज्यांनी अभिनव भारताची स्थापना केली त्यांच्याबाबत खालील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?
a) विनायक सावरकरांवर इटालियन देशभक्त मॅझिनीचा खूप प्रभाव होता, ज्यांचे आत्मचरित्र त्यांनी भाषांतरित केले.
b) बाबाराव सावरकरांनाही त्यांच्या प्रक्षोभक कारवायांकरिता अंदमानात डांबले गेले होते, ज्यामुळे (ज्याविरुद्ध) कान्हेरेंनी जॅकसनला गोळ्या घालून ठार केले.
१) केवल (b)
२) केवल (a)
३) (a) व (b) पैकी एकही नाही
४) (a) व (b) दोन्ही
१०) अभिनव भारतचे उद्देश काय होते?
A) परदेशातून तस्करी करून हत्यारे मिळविणे.
B) इंग्रज विरोधी विचारांचा सैनिकात प्रचार करणे.
C) स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या संकल्पना लोकमानसात रुजविणे.
D) जेव्हा शक्य आहे तेव्हा गुरिल्ला डावपेच अवलंबिणे.
१) (A) व (C)
२) (A), (B) व (C)
३) (B), (C) व (D)
४) (A), (B), (C) व (D)
११) देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली?
a) श्रीमती दुर्गादेवी बोहरा
b) कल्पना दत्त
c) सौ. येसू बाबाराव सावरकर
d) सौ. लक्ष्मीबाई दातार
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (c) बरोबर आहे.
२) (a) व (b) दोन्ही बरोबर आहेत.
३) वरील सर्व बरोबर आहेत.
४) वरील सर्व चुकीचे आहेत.
१२) आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती ?
१) दुर्गादेवी बोहरा
२) येसूबाई गणेश सावरकर
३) वीणा दास
४) सुहासिनी गांगुली
१३) श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये शिक्षणाकरिता कोणत्या भारतीय विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळवून दिली?
१) गणेश दामोदर सावरकर
२) विनायक दामोदर सावरकर
३) सुभाषचंद्र बोस
४) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
१४) ...... यांना इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रतिष्ठीत शिवाजी शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.
१) खुदीराम बोस
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) विनायक दामोदर सावरकर
४) श्यामजी कृष्ण वर्मा
१५) धार्मिक सलोखा रहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकांनी १९०६ मध्ये ........... जयंती साजरी केली.
१) कबीर
२) मॅझिनी
३) आदिलशहा
४) अकबर
१६) ”हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे” असे कोणी सुचविले?
१) गोळवलकर गुरूजी
२) राजाराम शास्त्री भागवत
३) वि. का. राजवाडे
४) वि. दा. सावरकर
५) अनंत कान्हेरे
१) नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या कोणत्या क्रांतिकारकाने केली?
१) गणेश चाफेकर
२) वि. दा. सावरकर
३) अनंत कान्हेरे
४) विष्णू गणेश पिंगळे
२) नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांच्या खुनात खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली?
अ) अनंत कान्हेरे
ब) विनायक देशपांडे
क) कृष्णाजी कर्वे
ड) विनायक आपटे
पर्याय -
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ, ब, आणि क
४) फक्त अ, ब, क आणि ड
३) जॅक्सन खून खटल्यात कोणास फाशीची शिक्षा देण्यात आली ?
१) कृष्णाजी गोपाळ कर्वे, विनायक नारायण देशपांडे
२) ब्रह्मगिरी बुवा, गणेश वैद्य
३) दत्तात्रय पांडुरंग जोशी, सिद्धनाथ काणे
४) वामन फडके, निरंजन पाल
४) जॅक्सनच्या खुनासाठी पुढीलपैकी कोणाला फाशी दिले नाही?
१) अनंत लक्ष्मण कान्हेरे
२) दत्तात्रय पांडुरंग जोशी
३) कृष्णाजी गोपाळ कर्वे
४) विनायक नारायण देशपांडे
५) दि. २१ डिसेंबर १९०९ रोजी जॅक्सन वर कोणी गोळ्या झाडल्या?
१) विं. दा. सावरकर
२) अनंत कान्हेरे
३) विनायक दामोदर चाफेकर
४) गणेश दामोदर चाफेकर
६) सेनापती बापट
१) १९०७ मध्ये पॅरिस येथे असताना ...... व त्यांचे सहकारी हेमचंद्र दास आणि मिरझा अब्बास यांनी एका रशियन क्रांतीकारीकडून बॉम्ब निर्मितीचे नवीनतम तंत्र शिकून घेतले.
१) पांडुरंग महादेव बापट
२) विनायक दामोदर सावरकर
३) आबासाहेब रामचंद्र
४) भाई परमानंद
२) सरकारी शिष्यवृत्ती घेऊन इंजिनिअरींगचा अभ्यास करण्यासाठी ....... यु.के. ला गेले परंतु त्या ऐवजी ते सावरकरांना जाऊन मिळाले.
१) श्यामजी कृष्ण वर्मा
२) मुकूंद देसाई
३) पांडूरंग महादेव बापट
४) विष्णू गणेश पिंगळे
३) इंडिया हाऊस लंडन येथे खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांनी बॉम्ब तयार करण्याची माहिती मिळवली?
(a) सेनापती बापट
(b) हेमचंद्र दास
(c) मिर्झा अब्बास
(d) लाला हरदयाळ
पर्यायी उत्तरे -
१) (a) फक्त
२) (a) व (b) फक्त
३) (a), (b), (c) फक्त
४) वरील सर्व
४) ......... हे सरकारी शिष्यवृत्ती घेऊन यु. के. येथे इंजिनियरिंग शिक्षण घेण्यास गेले, परंतु तेथे जाऊन त्यांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेत प्रवेश केला.
१) पांडुरंग महादेव बापट
२) अच्युत बळवंत कोल्हटकर
३) विष्णू गणेश पिंगळे
४) श्यामची कृष्ण वर्मा
५) त्या व्यक्तीला ओळखा !
a) ते इंडिया हाउस मध्ये सहभागी झाले.
b) जर ते मरण पावले तर त्यांचा पुनर्जन्म भारतात व्हावा जेणेकरून ते त्यांचे उर्वरित कार्य पूर्ण करू शकतील असे ते मानीत.
c) बॉम्ब तयार करण्याचे तंत्र शिकण्यास ते पॅरिसला गेले.
d) सन १९१४ पासून त्यांनी सशस्त्र चळवळ सोडून विकासात्मक सामाजिक कार्यास झोकून घेतले.
e) त्यांना सेनापती बापट म्हणून अधिक चांगले ओळखले जाते.
१) पांडुरंग महादेव
२) गोपाळ हरी देशमुख
३) बाबा पद्मनजी
४) वासुदेव गणेश जोशी
७) महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना
१) महाराष्ट्रातील शहरे व त्यातील क्रांतिकारी संघटना यांच्या योग्य जोड्या ओळखा :
अ) वर्धा- नागपूर i) आर्यबंधू समाज
ब) नाशिक ii) चाफेकर क्लब
क) कोल्हापूर iii) शिवाजी क्लब
ड) पुणे iv) राष्ट्रभक्त समूह
पर्यायी उत्तरे -
१) (अ) आणि (क)
२) (ब) आणि (ड)
३) (क) आणि (ब)
४) (ड) आणि (अ)
२) १९०२ मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?
१) बंगाल
२) मद्रास
३) मुंबई
४) पुणे
३) जोड्या जुळवा :
a) कळंब क्लब i) पिंपरीकर
b) ट्वेल्व्ह् स्टार्स ii) दिनकरशास्त्री कानडे
c) ठाणे ग्रुप iii) काक नाईक
d) बेळगाव ग्रुप iv) गंगाधरराव देशपांडे आणि गोविंदराव यालगी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (ii) (iii) (iv) (i)
४) बाल समाज, बांधव समाज आणि समर्थ शिवाजी समाज हे काय होते ?
१) व्यायाम शाळा
२) सामाजिक संघटना
३) क्रांतीकारी संघटना
४) धार्मिक संघटना
५) जोड्या जुळवा :
a) ट्वेल्व्ह स्टार्स i) डॉ. आठल्ये
b) सातारा रेव्होल्युशनरीज ii) दिनकरशास्त्री कानडे
c) ठाणे ग्रुप iii) काका नाईक
d) बेळगाव ग्रुप iv) गोविंदराव यालगी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (i) (iii) (iv) (ii)
३) (ii) (i) (iii) (iv)
४) (iii) (iv) (ii) (i)
सातारा येथे प्रतिसरकार
१) भारत छोडो चळवळीमध्ये .......... यांनी सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना केली.
१) नरदेव शास्त्री
२) उमाजी नाईक
३) गणपतराव कथळे
४) नाना पाटील
२) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती ?
१) सोलापूर
२) पुणे
३) सातारा
४) कोल्हापूर
३) सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना .... च्या काळात झाली.
१) होमरूल चळवळ
२) असहकारितेची चळवळ
३) सविनय कायदेभंगा
४) चलेजाव चळवळ
४) नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांती चळवळीत योगदान दिले?
१) तुफानी सेना
२) वानर सेना
३) बहुजन सेना
४) मावळ्यांची सेना
५) भारत छोडो आंदोलनात महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी भूमिगत राहून सातारा येथे महत्त्वाची कामगिरी बजावली?
अ) डॉ. राममनोहर लोहिया
ब) अरुणा असफअली
क) नाना पाटील
ड) यशवंतराव चव्हाण
पर्यायी उत्तरे :
१) (अ) फक्त
२) (अ) आणि (ब) फक्त
३) (क) आणि (ड) फक्त
४) वरीलपैकी नाही
६) महाराष्ट्रात प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती?
१) किसन वीर
२) डी. जी. लाड
३) क्रांतिसिंह नाना पाटील
४) यशवंतराव चव्हाण
७) भारत छोडो आंदोलनात देशात कोठे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते?
१) बालिया (उ.प्र.)
२) मिदनापूर (बंगाल)
३) सातारा (महाराष्ट्र)
४) वरील सर्व पर्याय योग्य
८) महाराष्ट्रात सातारा येथे प्रतिसरकार ...... यांनी स्थापन केले.
१) स्वामी रामानंद तीर्थ
२) छत्रपती शाहू महाराज
३) क्रांतिसिंह नाना पाटील
४) गोपाळ हरी देशमुख
भारतीय क्रांतिकारक
१) भारतीय क्रांतिकारकांच्या संघटनांच्या अपयशाचे महत्त्वाचे कारण म्हणजे
१) क्रांतिकारकांमध्ये एकसूत्रता नव्हती
२) इंग्रज व क्रांतिकारक हा लढा विसंगत होता.
३) इंग्रजांनी दडपशाही केली.
४) क्रांतिकारकांनी दहशत निर्माण केली.
२) काकोरीचा कट कोणत्या गटाच्या सभासदांनी आखला होता?
१) अभिनव भारत
२) इंडिया होम रुल सोसायटी
३) अनुशीलन समिती
४) हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी
३) लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना ...... यांनी केली.
१) लाला हरदयाळ
२) श्यामजी कृष्ण वर्मा
३) स्वातंत्र्यवीर सावरकर
४) सुभाषचंद्र बोस
४) अचूक कालक्रम लावा -
अ) गदर पार्टीची स्थापना
ब) चौरीचौरा घटना
क) खुदीराम बोसची फाशी
ड) मलबारमध्ये मोपला बंड
अ = १, ब = २, क = ३, ड = ४
१) अ, ब, क, ड (१, २, ३, ४)
२) ब, अ, ड, क (२, १, ४, ३)
३) क, ड, अ, ब (३, ४, १, २)
४) क, अ, ड, ब (३, १, ४, २)
५) ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास ...... साली फाशी दिली.
१) १८६०
२) १८९१
३) १९००
४) १९०९
६) आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती ?
१) उषा मेहता
२) अरुणा असफ अली
३) लक्ष्मी सेहगल
४) यापैकी नाही
७) आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ कशाने झाली?
१) दुसर्या महायुद्धात ब्रिटिश संकटात सापडल्याने
२) पहिल्या महायुद्धातील ब्रिटिशांचा प्रभाव
३) बंगालची फाळणी
४) वरीलपैकी काही नाही
८) अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली?
१) इंडिया हाऊस
२) गदर
३) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी
४) मित्रमेळा
९) इंडिया हाउसची स्थापना कोणी केली?
१) वि. दा. सावरकर
२) लाला हरदयाल
३) श्यामजी वर्मा
४) खुदीराम बोस
१०) कर्झन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारले?
१) अनंत कान्हेरे
२) खुदीराम बोस
३) मदनलाल धिंग्रा
४) दामोदर चाफेकर
११) हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली?
१) लाला हरदयाल
२) चंद्रशेखर आझाद
३) जतिंद्रनाथ दास
४) कन्हैयालाल दत्त
१२) चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी १९२८ मध्ये कोणती संघटना स्थापना केली ?
१) नवजीवन सैनिक संघ
२) गदर
३) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
४) नवभारत
१३) तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हांला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटले ?
१) सुभाष चंद्र बोस
२) नारायण गुरु
३) सुखदेव
४) भगत सिंग
१४) सुभाषचंद्र बोस यांनी सन १९२३ मध्ये कोणते इंग्रजी दैनिक सुरु केले ?
१) देहली मेल
२) हिंदुस्थान टाइम्स
३) फ्री प्रेस जर्नल
४) फॉरवर्ड
१५) “जन्मठेपेपेक्षा फासावर जाणे मला अधिक आवडेल. माझ्या मायभूमीस स्वतंत्र करण्यासाठी मला पुर्नजन्म मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत प्रत्येक पुर्नजन्मी स्वातंत्र्यासाठी फाशी जाण्यासारखा दुसरा आनंद नाही” - हे उद्गार कोणाचे ?
१) भगतसिंग
२) राजगुरू
३) कर्तारसिंग
४) स्वातंत्र्यवीर सावरकर
१६) योग्य पर्यायाने विधान पूर्ण करा.
सन १९०१ मध्ये कलकत्त्यात स्थापन झालेली अनुशीलन समिती ......... साठी प्रसिद्ध होती.
१) आरोग्य शिक्षण
२) व्यावसायिक शिक्षण
३) शारीरिक शिक्षण
४) औद्योगिक शिक्षण
१७) ४ नोव्हेंबर १९०५ मध्ये स्थापन केलेल्या (कार्ललाईल) परिपत्रक विरोधी संस्थेचा मुख्य उद्देश कोणता होता?
१) परिपत्रकाला विरोध करणे.
२) काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणे.
३) विद्यार्थी आंदोलनाचे आयोजन करणे.
४) वरीलपैकी कोणताच उद्देश नव्हता.
१८) संस्था/संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता?
संस्था/संघटना संस्थापक
(अ) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (i) रासबिहारी बोस
(ब) आझाद हिंद सेना (ii) सचिंद्रनाथ संन्याल
(क) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (iii) सुभाषचंद्र बोस
(ड) इंडिया हाऊस (iv) चंद्रशेखर आझाद
(v) श्यामजी कृष्ण वर्मा
१) (अ) - (iv), (ब) - (iii), (क) - (i), (ड) - (ii)
२) (अ) - (ii), (ब) - (i), (क) - (iv), (ड) - (v)
३) (अ) - (iv), (ब) - (i), (क) - (ii), (ड) - (v)
४) (अ) - (v), (ब) - (iii), (क) - (ii), (ड) - (i)
१९) आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते?
१) पेटती मशाल
२) चरख्याचे चित्र
३) भरारी घेणारा फिनिक्स पक्षी
४) झेप घेणारा वाघ
२०) लंडन प्रमाणेच पॅरिस येथेही भारतीय क्रांतिकारकांनी एक कार्यकेंद्र सुरू केले. त्याचे मुख्य सूत्रधार कोण होते?
अ) वि. दा. सावरकर
ब) मादाम कामा
क) सरदार सिंग राणा
ड) शामजी कृष्ण वर्मा
१) अ आणि ब
२) क आणि ड
३) फक्त क
४) फक्त ड
२१) १९०७ साली जगातील साम्यवाद्यांच्या परिषदेत मॅडम मादाम कामा यांनी कोणता तिरंगा ध्वज फडकविला?
१) तारे व कमळ असलेला
२) चक्र व कमळ असलेला
३) तारे व चक्र असलेला
४) चक्र असलेला
२२) ९ ऑगस्ट १९२५ च्या काकोरी कटात यापैकी कोणते क्रांतिकारी सहभागी नव्हते ?
a) चंद्रशेखर आझाद व राजेंद्रनाथ लहरी
b) रामप्रसाद बिस्मिल्ल व रोशन सिंग
c) अश्फाक उल्ला खान व योगेश चॅटर्जी
d) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (c) फक्त
३) (d) फक्त
४) वरीलपैकी कोणीही नाही
२३) पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे ?
a) क्रांतिवीर देशभक्त भगत सिंह हा १९२० व्या दशकात कायर्र्रत होता.
b) १९३० व्या दशकातील दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) न (a) व न (b)
४) (a) व (b) दोन्ही
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१६३)
महाराष्ट्रातील क्रांतिकारक
१-१
२-३
३-२
४-४
५-४
६-४
७-१
८-१
९-३
१०-१
११-४
१२-३
१३-४
१४-४
१५-२
१६-१
१७-२
१८-१
वासुदेव बळवंत फडके
१-१
२-४
३-४
४-४
५-४
६-२
७-२
८-४
९-४
१०-२
चाफेकर बंधू
१-१
२-४
३-४
४-४
४-२
५-२
६-१
७-३
मित्र मेळा व अभिनव भारत
१-४
२-३
३-१
४-२
५-४
६-२
७-३
८-३
९-३
१०-४
११-१
१२-२
१३-२
१४-३
१५-४
१६-४
अनंत कान्हेरे
१-३
२-३
३-१
४-२
५-२
सेनापती बापट
१-१
२-३
३-३
४-१
५-१
महाराष्ट्रातील क्रांतिकारी संघटना
१-१
२-१
३-१
४-३
५-३
सातारा येथे प्रतिसरकार
१-४
२-३
३-४
४-१
५-३
६-३
७-४
८-३
भारतीय क्रांतिकारक
१-१
२-४
३-२
४-४
५-४
६-३
७-१
८-२
९-३
१०-३
११-२
१२-३
१३-१
१४-
१५-३
१६-३
१७-२
१८-३
१९-४
२०-३
२१-१
२२-३
२३-२