वसाहतवादी अर्थकारण / प्रश्नमंजुषा (१५९)
- 21 May 2021
- Posted By : study circle
- 2860 Views
- 4 Shares
वसाहतवादी अर्थकारण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”भारताचा आर्थिक इतिहास” यावर अनेक प्रश्न विचारले जातात. ब्रिटिशांच्या राजवटीचा भारतीय अर्थकारणावरील प्रभाव, त्यासंबंधीचे सिद्धांत, अर्थतज्ज्ञ व त्यांची पुस्तके, त्यावर विचारले गेलेले प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास विभाग
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.४ वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था -
व्यापारिक टप्पा, संपत्तीचे वहन, दादाभाई नौरोजी यांचा संपत्ती वहन सिद्धांत, अनौद्योगीकरण, भारतीय हस्तोद्योगांचा र्हास, भारतीय कृषी व्यवस्थेचे वाणिज्यिकरण.
आधुनिक उद्योगांचा उदय - भारतीय व्यापारी समुदायाची भूमिका, ब्रिटिश वित्तीय भांडवलाचे भारतात आगमन, टिळक स्वराज्य निधी (फंड) व गो. कृ. गोखले यांचे योगदान.
१.६ ब्रिटिश शासनविरोधी झालेले प्रसिद्ध उठाव -
१.६.१ शेतमजुरांचे उठाव, आदिवासींचे उठाव
१.६.३ साम्यवादी (डावी) चळवळ - ट्रेड युनियन चळवळ
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
वसाहतवादी अर्थकारण : शेतकरी व कामगार संघटना आणि आंदोलने
१) महाराष्ट्रातील आर्थिक राष्ट्रवादाचा पाया
२) आर्थिक शोषणाचा सिद्धांत
३) ब्रिटिश भांडवलाची गुंतवणूक
४) कृषी क्षेत्राचे व्यापारीकरण
५) शेतकरी संघटना आणि चळवळी
६) भारतीय उद्योगाचा विकास
७) कामगार संघटना आणि आंदोलने
८) ट्रेड युनियन चळवळ (१९२०-)
महाराष्ट्रातील आर्थिक राष्ट्रवादाचा पाया
१) भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण ?
१) बाळशास्त्री जांभेकर
२) विष्णुशास्त्री पंडित
३) रामकृष्ण विश्वनाथ
४) भाऊ महाजन
२) न्यायमूर्ती रानड्यांचा आर्थिक राष्ट्रवाद पुढील कोणत्या गोष्टींत त्यांनी घेतलेल्या पुढाकारावरून दिसून येतो?
a) वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणोत्तेजक मंडळी.
b) औद्योगिक प्रदर्शन.
c) औद्योगिक परिषद.
d) पश्चिम भारताची औद्योगिक मंडळी.
पर्यायी उत्तरे :
१) (b), (c) आणि (d)
२) (a), (b) आणि (c)
३) (a), (b) आणि (d)
४) (a), (c) आणि (d)
३) भारताच्या आर्थिक स्थितीसंबंधी केलेल्या मुळगामी चिकित्सेमुळे कोणाला ”आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते” म्हटले जाते?
१) न्यायमूर्ती म. गो. रानडे
२) बाळ गंगाधर टिळक
३) महात्मा ज्योतिबा फुले
४) दादाभाई नौरोजी
४) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने / व्यक्तींनी सर्वप्रथम आर्थिक राष्ट्रवादाची तात्त्विक भूमिका मांडली?
१) दादाभाई नौरोजी फक्त
२) दादाभाई नौरोजी आणि म. गो. रानडे
३) म. गो. रानडे आणि रा. गो. भांडारकर
४) दादाभाई नौरोजी आणि बा. गं. टिळक
५) भारतीय राष्ट्रीय सभेबाबत प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नसते. असे विधान कोणी केले होते?
१) म. गो. रानडे
२) गोपाळ कृष्ण गोखले
३) फिरोझ शहा मेहता
४) दादाभाई नौरोजी
६) १९ व्या शतकामध्ये भारतीय इतिहासाची पहिल्यांदा आर्थिक दृष्टिकोनातून कोणी मांडणी केली आहे?
अ) दादाभाई नौरोजी
ब) न्या. एम. जी. रानडे
क) रोमेशचंद्र दत्त
ड) आर. सी. मजुमदार
१) अ फक्त
२) अ आणि ब फक्त
३) अ, ब आणि क
४) अ आणि ड फक्त
७) कोणी परवाना अधिनियमाला तो व्यापार धंद्यांकरिता विपरीत ठरेल म्हणून विरोध केला?
१) भाऊ दाजी लाड
२) गोपाळ हरी देशमुख
३) दादोबा पांडुरंग तर्खडकर
४) आचार्य बाळशास्त्री जांभेकर
८) A) न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी हातमाग उद्योगाला प्रोत्साहन दिले नाही.
B) न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला.
१) (A) व (B) ही दोन्ही विधाने बरोबर आहेत.
२) (A) व (B) ही दोन्ही विधाने चूक आहेत.
३) (A) हे विधान चूक आहे, (B) विधान बरोबर आहे.
४) (B) हे विधान चूक आहे, (A) विधान बरोबर आहे.
९) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने राजकीय अर्थशास्त्रावर मराठीतून पुस्तके लिहीली नाहीत ?
१) रामकृष्ण विश्वनाथ
२) लोकहीतावादी
३) केशवजी पाठार
४) विष्णूशास्त्री चिपळूणकर
१०) मिठावरील कर म्हणजे लूट व शुद्ध जुलूम आहे. हे विधान आपल्या पुस्तकात कोणी लिहिले?
१) रॅम्से मॅकडोनाल्ड
२) लॉर्ड आयर्विन
३) महात्मा गांधी
४) सरोजिनी नायडू
११) आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी २० व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला :
१) अर्ज विनंत्यांच्या राजकारणाद्वारे
२) घटनात्मक साधनांद्वारे
३) आंदोलनात्मक मार्गाद्वारे
४) वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे
१२) ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा भारतीयांच्या जीवनांवर कोणता परिणाम झाला नव्हता?
१) अखिल भारतीय संघटनेच्या निर्मितीची पार्श्वभूमी तयार झाली.
२) तळागाळातील व्यक्तीला खाजगी स्वातंत्र्य अजिबात नव्हते.
३) भारतीय खेड्यातही सामाजिक शिष्टाचार, वेष, मनोरंजन आदिबाबत पाश्चात्त्यांचे अनुकरण आढळते.
४) अनेक इंग्रजी शब्दांनी स्थानिक भाषांमध्ये जागा घेतली.
१३) पुढीलपैकी कोणता रेल्वे विकासाचा आर्थिक परिणाम नव्हता?
१) शेतीवरील परिणाम
२) किमतीचे स्थिरीकरण
३) उत्पादनाच्या किमतीच्या चढउतारात वाढ
४) शहरांच्या संख्येत वाढ
१४) १९२९ च्या आर्थिक महामंदी नंतर ब्रिटिश सरकारने साखर व कापड उद्योगांना संरक्षण का दिले?
१) राष्ट्रीय सभेच्या सततच्या टीकेमुळे.
२) जेणेकरून स्वदेशी चळवळीला आळा बसेल.
३) जेणेकरून शेतकरी डाव्या संघटनेकडे आकृष्ट होणार नाहीत.
४) भारतीय भांडवलदारांना गुंतवणुकीपासून दूर ठेवायचे होते.
१५) १९३० च्या दशकातील जागतिक महामंदीमुळे पुढीलपैकी काय झाले?
अ) मुंबईची लोकसंख्या घटली.
ब) अहमदाबादमधील कापडगिरण्यांची संख्या घटली.
क) मुंबई गिरणीमालकांनी कामगारांच्या वेतनात ३०-५०% कपात केली.
ड) वरील सर्व पर्याय योग्य.
१) अ आणि क योग्य आहेत
२) ड योग्य आहेत
३) ब आणि क योग्य आहेत
४) अ आणि ब योग्य आहेत
आर्थिक शोषणाचा सिद्धांत
१) भारतात ब्रिटिशांनी संपत्तीची जी लूट केली त्याबद्दल ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांना भारतात लुटारूंची नियुक्ती करणारे प्राधिकरण असे कोणी म्हटले?
१) दादाभाई नौरोजी
२) अॅडम स्मिथ
३) लोकमान्य टिळक
४) ब्रॅड लॉ
२) आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडून ब्रिटिश सरकारविरुद्ध आर्थिक जागृती कोणी घडवून आणली?
१) फिरोजशाह मेहता
२) महादेव गोविंद रानडे
३) दादाभाई नौरोजी
४) गोपाळ गणेश आगरकर
३) ब्रिटिशांनी केलेल्या आर्थिक शोषणाबाबत पॉव्हर्टी अॅण्ड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक......यांनी लिहिले.
१) न्यायमूर्ती रानडे
२) दादाभाई नौरोजी
३) सुब्रमण्यम् अय्यर
४) के. टी. तेलंग
४) भारताच्या दारिद्र्याच्या मुळाशी ब्रिटिशांचे आर्थिक धोरण जबाबदार आहे. असे ठामपणे प्रतिपादन करणारे पहिले भारतीय विचारवंत कोण?
१) दादाभाई नौरोजी
२) व्ही. के. आर. व्ही. राव
३) रमेशचंद्र दत्त
४) विनगेट
५) पॉव्हर्टी अॅन्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया या ग्रंथात ...... यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला.
१) दादाभाई नौरोजी
२) वासुदेव बळवंत फडके
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) उमाजी नाईक
६) पॉव्हर्टी अॅन्ड अनब्रिटिश रुल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला ?
१) दादाभाई नौरोजी
२) लाला लजपतरॉय
३) वि.दा. सावरकर
४) लोकमान्य टिळक
७) ब्रिटिशांचे आर्थिक धोरण या नावाने ओळखले जात होते ......
१) राष्ट्रांची संपत्ती
२) धननिःसारण अथवा संपत्तीचा निचरा
३) वरील दोन्ही उत्तरे बरोबर आहेत.
४) वरीलपैकी दोन्ही चूक आहेत.
८) “इकॉॅनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया“ हा ग्रंथ कोणी लिहिला?
१) दादाभाई नौरोजी
२) राजाराम मोहन रॉय
३) रोमेशचंद्र दत्त
४) आर. सी. मजुमदार
९) ”दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिद्ध ग्रंथाचा लेखक कोण होता?
१) एच. एच. विल्सन
२) आर. सी. दत्त
३) कार्टराईट
४) हारग्रीव्हज
१०) जोड्या जुळवा :
a) इंडिया अंडर दर क्वीन i) विल्यम डिग्बी
b) इंडिया टुडे ii) रमेशचंद्र दत्त
c) इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया iii) रजनी पाम दत्त
d) प्रॉस्परस ब्रिटिश इंडिया iv) विल्यम हंटर
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (ii) (i) (iii)
२) (i) (iv) (iii) (ii)
३) (ii) (i) (iv) (iii)
४) (iv) (iii) (ii) (i)
११) रोमेश चंद्र दत्त बाबत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
a) ते आय.सी.एस. अधिकारी होते.
b) ते प्रथम भारतीय विभागीय आयुक्त होते.
c) ते बडोदा राज्यात मंत्री होते.
d) ते आर्थिक संशोधनात अत्युत्कृष्ट होते.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (c)
३) (d)
४) कोणतेही नाही
भारतीय भांडवल व संपत्तीचे शोषण
१) ....... यांना मुंबई बाजाराचे संस्थापक म्हटले जाते.
१) जमशेटजी टाटा
२) मोरारजी गोकुळदास
३) कासवजी दावर
४) प्रेमचंद रॉयचंद
२) इंग्रज सरकार आणि भारतातील राजेशाही प्रांतामध्ये वित्तीय संबंध कसे असावेत याबाबत शिफारसी करण्यासाठी ......... यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नेमली होती.
१) डब्ल्यू. एस. होल्ड्सवर्थ
२) सिडनी पील
३) रशब्रुक विलिअम्स
४) हारकोर्ट बटलर
३) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?
१) बागची - प्राइव्हेट इनव्हेस्टमेेंट इन इंडिया
२) एस. गोपाल - इमर्जन्सी ऑफ इंडियन नॅशनॅलीझम्
३) अनिल सिल - प्रॉब्लेम्स अँड पॉलीटिक्स ऑफ ब्रिटिश इन इंडिया - १८८५-८९
४) हिरालाल सिन्हा - ब्रिटिश पॉलिसी इन इंडिया
४) खालीलपैकी कोणती ऐतिहासिक जर्नल आणि त्यांचे मुद्रण संबंधी स्थानाची जोडी चूक जुळवली गेली आहे?
१) इंडियन इकॉनॉमी अॅन्ड सोशल हिस्ट्री रिव्ह्यू - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
२) इंडियन हिस्टॉरिकल रिव्ह्यू - इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च
३) मॉडर्न एशियन स्टडीज - नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर
४) पास्ट एन्ड प्रेझेंट - युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड
५) पुढीलपैकी कोणत्या प्रकाराने भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे ?
अ) भारतात काम करीत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकार्यांचे पगार व निवृत्ती वेतन.
ब) भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा.
क) ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च.
ड) हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त अ,क आणि ड
२) फक्त अ,ब आणि क
३) अ,ब,क आणि ड
४) फक्त ब,क आणि ड
६) खालीलपैकी कोणते बिन्दू होम चार्ज मधील नव्हते, होम चार्ज अर्थात एकोणिसाव्या शतकातील दुसर्या भागात झालेल्या भारतापासून इंग्लंड कडे धनाच्या प्रवाहासंबंधी घटना ?
१) भारतापासून इंग्लंडला कॉटन आणि सिल्क वस्त्रांचा निर्यात
२) भारतात कार्यालय स्थापना संबंधी खर्च
३) रेल्वेच्या भांडवली निवेश संबंधी व्याज
४) सैन्य स्टोअर्स खरेदी
७) भारतातील ब्रिटिशांच्या वसाहती राजवटी दरम्यान जे भारताचे आर्थिक शोषण झाले त्यामध्ये होम चार्जेस हा घटक महत्त्वाचा होता. यामध्ये समाविष्ट असलेला निधी कोणता ?
१) लंडन मधील इंडिया ऑफिस चालवण्यासाठी वापरला गेलेला निधी.
२) भारतातील ब्रिटिश अधिकार्यांचे पगार, पेन्शन यासाठी वापरलेला निधी.
३) भारताच्या बाहेर ब्रिटिशांनी केलेल्या युद्धासाठी वापरलेला निधी.
१) फक्त १ बरोबर
२) फक्त १ आणि २ बरोबर
३) २ व ३ बरोबर
४) १, २ आणि ३
८) वर्ष १९२० आणि १९३० मधील राष्ट्रीय आंदोलनातील भारतीय भांडवलदारांच्या सहभागासंबंधी हे वक्तव्य वाचा.
१) अनेक भारतीय भांडवलदार राष्ट्रीय आंदोलनात होते आणि जमनालाल बजाज, वाडीलाल लालुभाई मेहता आणि लाला शंकरलाल यासरख्या उद्योजकांना तुरुंगवास घडला होता.
२) भारतीय भांडवलदार वर्गाच्या प्रमुख भागाने काँग्रेसचा साथ दिला परंतु नंतर ते आधीच्या प्रकारावर निर्भर झाले.
३) भारतीय उद्योजकापैकी, टाटा यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय आंदोलनाला उत्तम साथ होती.
४) भारतीय भांडवलदारांनी, कामगार संघटनात वामपंथाचा प्रभाव वाढल्याचे दिसल्याने काँग्रेसमधील कॉन्झर्वेटिव्ह राष्ट्रवादींना साथ दिली.
वरीलपैकी कोणते वक्तव्य अचूक आहे ?
१) १, २, ३ आणि ४
२) २, ३ आणि ४
३) १, २ आणि ३
४) १, २ आणि ४
कृषी क्षेत्राचे व्यापारीकरण
१) शेतीचे व्यापारीकरण म्हणजे ......
१) नगदी पिकांचे उत्पादन घेणे.
२) शेतीमध्ये कारखानदारी उभारणे.
३) शेतीची खरेदी-विक्री करणे.
४) पारंपरिक पिके घेणे.
२) शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय ?
१) पारंपरिक पिकांची लागवड करण्यावर भर
२) नगदी व पारंपरिक पिकांची लागवड करण्यावर भर
३) नगदी पिकांची लागवड करण्यास अधिक महत्त्व
४) यांपैकी कोणतेही नाही.
३) ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणामुळे शेतीचे व्यापारीकरण झाले म्हणजे -
१) कृषिक्षेत्र नवीन शोधांनी विकसित झाले.
२) कृषी क्षेत्राचा मालकी हक्क जमीनदारांकडे सोपविण्यात आला.
३) लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ वाढले.
४) अधिकाधिक नफा मिळेल असे उत्पादन घेणे.
४) शेतीच्या व्यापारीकरणामुळे महाराष्ट्रावर काय परिणाम झाले ?
अ) जुन्या धंद्याचा र्हास झाला तरी शेत मालावर आधारित काही नवीन यांत्रिक धंद्याची वाढ झाली.
ब) महाराष्ट्रातील अंतर्गत व्यापार वाढला.
क) शेतातील कच्च्या मालाची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढली.
ड) व्यापारी व सावकार यांचे महत्त्व कमी झाले.
१) (अ) फक्त
२) (क) फक्त
३) (अ), (ब) आणि (क)
४) (अ) आणि (ड)
५) पुढीलपैकी कोणते मुद्दे ब्रिटिश राजवटीचा भारतीय आर्थिक जीवनावर झालेला प्रभाव दर्शवितात?
a) शेतीचे व्यापारीकरण
b) जमीन विक्रीयोग्य वस्तू बनली
c) नगदी पिकांचा तुटवडा
d) महसूल पद्धतीत बदल
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b) आणि (d) फक्त
२) (a), (c) आणि (d) फक्त
३) (a), (b) आणि (c) फक्त
४) (a), (b), (c) आणि (d)
६) ब्रिटिश धोरणांचा भारताच्या आर्थिक जीवनावर कोणता प्रभाव झाला ?
१) शेतीचे-व्यापारीकरण
२) जमीन विक्रीयोग्य वस्तू ठरली नाही
३) अन्नधान्य मुबलक झाले
४) पारंपरिक गृहोद्योगांची भरभराट झाली
७) शेती व्यवसायाच्या व्यापारीकरणामुळे ब्रिटिशांच्या काळात भारतावर काय परिणाम झाले ?
१) शेती व्यवसायाची भरभराट
२) ग्रामीण अर्थ व्यवस्थेत सुधारणा
३) ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव
४) दुष्काळ विमोचन
८) ब्रिटिशांनी भारतीय शेतकर्यांवर नगदी पिकांचे उत्पादन घेण्याची सक्ती करण्याचा प्रयत्न का केला ?
१) भारतीय लोकांचा आर्थिक फायदा व्हावा.
२) भारतीय प्रगतीत हातभार लागावा.
३) ब्रिटिशांना याद्वारे प्रचंड नफा होणार होता.
४) शेतकर्यांना फार मोठा नफा मिळणार होता.
९) ब्रिटिशांच्या अर्थनीतीमुळे शेतीवरील ताण कसा वाढला ?
अ) भारतीय कुटिरोद्योगातून लक्षावधी कारागीर बेकार झाले.
ब) शेतीतून आवश्यक तेवढे उत्पादन होत नव्हते.
क) शेतकर्यांना शेती करणे परवडत नव्हते.
ड) शेतकर्यांना आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे अशक्य झाले.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ फक्त
४) ड फक्त
१०) ब्रिटिश सरकारने जमीन महसूल पद्धतीत कोणते बदल केले ?
अ) ब्रिटिशांनी जमिनीची मोजणी करून जमीन महसूल निश्चित केला.
ब) ब्रिटिशांनी शेतकर्यांना जमीन महसूल रोखीने भरणे सक्तीचे केले.
क) वेळेत जमीन महसूल न भरणार्या शेतकर्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा फायदा केला.
ड) सर्व शेतकर्यांनी जमीन महसूल वेळेत भरणे आवश्यक केले.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
१) अ आणि ब फक्त
२) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त
४) वरील सर्व
११) इंदापूर तालुक्यातील जमीन मोजणी खालीलपैकी कोणत्या सिद्धांतानुसार करण्यात आली?
अ) रिकॉर्डोचा खंड सिद्धांत
ब) प्रिंगलचा खंड सिद्धांत
क) नॅशचा खंड सिद्धांत
ड) गोल्डस्मिथचा सिद्धांत
१) फक्त अ
२) फक्त ब
३) ब आणि क
४) फक्त ड
१२) मुंबई इलाख्यातील रयतवारी पद्धतीने इ. स. १८३६ साली सुधारणा झाल्यानंतर पुढील बदल घडला-
१) शेतकर्यांचा छळ केला.
२) जमीनदारांनी आर्थिक मदत दिली.
३) जमीन महसुलाची मागणी वाढली
४) जमीन कसणार्याकडून घेण्यात येणार्या जमीन महसुलाची मागणी कमी केली.
१३) पुढील अचूक जोडी ओळखा.
a) वॉरन हेस्टिंग - लिलाव पद्धतीने महसूल गोळा
b) लॉर्ड कॉर्नवालीस - कायमधारा पद्धत (बंगाल)
c) थॉमस माल्थस - रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते
d) रॉबर्ट कीथ प्रिंगेल - डेव्हिड रिकार्डोचा शिष्य
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (a) बरोबर
२) फक्त (b) बरोबर
३) (a), (b) आणि (d) बरोबर
४) सर्व पर्याय बरोबर
१४) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवली नाही गेली आहे ?
१) परमनंट सेटलमेन्ट : लॉर्ड कॉर्नवॉलिस
२) रयतवारी सिस्टम, मद्रास प्रेसिडेन्सी मध्ये : थॉमस मुनरो
३) रयतवारी सिस्टम बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये : एलफिन्स्टन
४) महालवारी सेटलमेन्ट : गोल्डस्ड्समिड
१५) खोती पद्धत कोठे होती ?
१) मराठवाडा
२) खानदेश
३) विदर्भ
४) कोकण
१६) एलफिन्स्टनला जमीन महसुलाच्या संदर्भात महाराष्ट्रात कोणती पद्धत लागू करावयाची होती ?
१) कायमधारा पद्धत
२) रयतवारी पद्धत
३) महालवारी पद्धत
४) मौजेवारी पद्धत
१७) एल्फिन्स्टनने कॉर्नवॉलीस व मन्रो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?
१) प्रतवारी
२) रयतवारी
३) कायमधारा
४) मौजेवारी
१८) कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकर्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे?
१) कायमधारा
२) रयतवारी
३) महालवारी
४) वायदा
१९) ब्रिटिश दक्षिण भागात .......... महसूल पद्धत वापरू लागले.
१) जमीनदारी
२) रयतवारी
३) महालवारी
४) तालुकदारी
२०) शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा ....... या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे.
१) रयतवारी
२) महालवारी
३) कायमधारा
४) तालुकादारी
२१) कोणत्या जमीन महसूल व्यवस्थेत शेतकरी जमिनीचा मालक बनला?
१) कायमधारा पद्धती
२) जमीनदारी
३) रयतवारी
४) मिरासदारी
२२) रयतवारी पद्धतीबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
१) शेतकर्यांनी सरकारला या अंतर्गत प्रत्यक्ष शेतसारा दिला.
२) सरकारने शेतकर्यांना पट्टे दिले.
३) शेतसारा वसूल करण्यासाठी सरकारने जमिनीचे सर्वेक्षण व मोजणी करून शेतसारा आकारला.
योग्य पर्याय निवडा :
(a) फक्त १
(b) १ आणि २
(c) १, २ आणि ३
(d) यापैकी नाही
२३) इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
१) नीळ
२) भात फक्त
३) गहू फक्त
४) भात व गहू
२४) ब्रिटिशांनी भारतात ताग उद्योग सुरू केला, कारण ः
a) त्यांना ताग उद्योगाबद्दल आकर्षण होते.
b) भारतीय उद्योगधंद्यांचा विकास करणे.
c) भारतीयांना रोजगार मिळवून देणे.
d) वाढती मागणी होती व अधिक नफा मिळवणे.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a), (b) आणि (c) फक्त
४) (a) आणि (d) फक्त
२५) खालील दुष्काळ आयोगाची त्यांच्या नियुक्ती वर्षानुसार कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा.
a) मॅक्डोनेल आयोग
b) लायल आयोग
c) कॅम्पबेल आयोग
d) स्ट्रॅची आयोग
पर्यायी उत्तरे :
१) (c),(d),(a),(b)
२) (c),(d),(b),(a)
३) (d),(c),(a),(b)
४) (d),(c),(b),(a)
२६) दुष्काळाचे वर्ष आणि त्यांच्या चौकशीसाठी नेमलेला आयोग यांच्या योग्य जोड्या लावा :
a) इ. स. १८६० चा दुष्काळ i) ल्यॉल आयोग
b) इ. स. १८६६ - ६७ चा दुष्काळ ii) स्ट्रॅची आयोग
c) इ. स. १८७६ - ७८ चा दुष्काळ iii) कॅम्पबेल आयोग
d) इ. स. १८९६ - ९७ चा दुष्काळ iv) कर्नल स्मिथ आयोग
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (iv) (iii) (i) (ii)
३) (i) (iii) (iv) (ii)
४) (i) (ii) (iv) (iii)
२७) लॉर्ड कर्झनने कोणत्या साली शेतकर्यांना कमी व्याजाने कर्ज मिळविण्यासाठी “सहकारी पतपेढी कायदा” केला?
१) १९०४
२) १९०५
३) १९०६
४) १९०७
२८) या आर्थिक इतिहासतज्ञांनी कर्झनला अनावृत्त पत्रे लिहून दुष्काळ व भारतातील जमीन धारा पद्धती विषयी विचार मांडले.
१) तीर्थकर रॉय
२) आर. सी. मजुमदार
३) आर. सी. दत्त
४) एच. सी. रायचौधरी
२९) बंगालची फाळणी करणारा लॉर्ड कर्झन एका अनावृत्त पत्रात ब्रिटिश राजवटीत शेतकर्यांना आर्थिक हलाखी येण्याची कारणमिमांसा करतांना काय लिहितो ?
अ) भारतातील वाढती लोकसंख्या आणि प्रतिकुल हवामान
ब) सरकारने ठरविलेला अवास्तव महसूल
क) शेतकर्याचा आळशीपणा व स्थिति प्रियता
ड) जमिनदाराचे अधिकार व कालव्यांकडे दुर्लक्ष
पर्यायी उत्तरे :
१) (अ) आणि (क) बरोबर
२) (ब) आणि (ड) बरोबर
३) (क) आणि (ब) बरोबर
४) (ड) आणि (अ) बरोबर
३०) पुढील वाक्ये ............. शी संबंधित आहेत.
त्यांनी शेतकर्यांसाठी सहकारी पतपेढ्या स्थापन केल्या.
१९०१ मध्ये त्यांनी कृषि महानिरीक्षकाची नेमणूक केली.
त्यांनी पुसा येथे शेतकी संशोधन संस्था स्थापन केली.
त्यांनी दुष्काळ समिती नेमली.
१) लॉर्ड मॅकॉले
२) लॉर्ड वेलस्ली
३) लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड कॉर्नवॉलीस
३१) खालीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
a) १९०४ चा सहकार कायदा स्व-मदत आणि सहकार्याची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने संमत करण्यात आला होता.
b) १९०४ चा मध्यवर्ती कायदा अजूनही भारतीय सहकार विषयक कायद्याचा आधार मानला जातो.
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (a)
२) फक्त (b)
३) दोन्ही
४) कोणतेही नाही
३२) कोणत्या संस्थेने खंडासंबंधीचे विधेयक (Rent Bill) लागू करण्यासाठी बंगालमधील शेतकर्यांच्या लढ्यास पाठिंबा दिला होता?
१) बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी
२) इंडियन असोसिएशन
३) जमीनदार असोसिएशन
४) ब्रिटिश इंडियन असोसिएशन
३३) कायमधारा पद्धत खालील प्रांतात ......... प्रथम राबवण्यात आली.
१) मद्रास व पंजाब
२) मद्रासचा काही भाग व मुंबई इलाखा
३) पंजाब व बिहार
४) बंगाल व बिहार
शेतकरी संघटना आणि चळवळी
१) आर्थिक व कृषीविषयक समस्यांच्या अध्ययनाच्या माध्यमातून १८६७ मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेने जनजागृतीचे कार्य केले?
१) बॉम्बे प्रेसिडन्सी असोसिएशन
२) इंडियन असोसिएशन
३) पुणे सार्वजनिक सभा
४) मद्रास नेटिव्ह असोसिएशन
२) १८७४ मध्ये सावकारी विरुद्ध पहिली चळवळ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या सांभोरी गावच्या कोणत्या क्रांतिकारक आदिवासीच्या नेतृत्वात झाली होती?
१) सयाजीराव गायकवाड
२) भाई माधवराव बागल
३) होनाजी भागूजी केंगले
४) गंगाधर गोपाळ जाधव
३) महाराष्ट्रात ....... साली शेतकर्यांनी जमीनदार आणि सावकार यांच्याविरुद्ध उठाव केला.
१) १८६०
२) १८७३
३) १८७५
४) १९०५
४) प्रमुख शेतीविषयक उठावांपैकी १८७५ चा दख्खनचा उठाव हा ...... येथे घडला.
१) पुणे आणि सांगली
२) मुंबई आणि पुणे
३) पुणे आणि अहमदनगर
४) अहमदनगर व मुंबई
५) १९ व्या शतकात पुणे व अहमदनगर जिल्ह्यात शेतकर्यांनी जे बंड केले त्यास दख्खनचे दंगे म्हणतात. याबाबत काय सत्य सांगता येईल ?
a) या काळात एकही शेतकरी संघटना व नेता अस्तित्वात नव्हता.
b) शेतकर्यांनी सावकारांची घरे लुटली व कागदपत्रे जाळली.
c) ही दंगल पूर्णपणे ब्रिटिशांच्या विरोधात होती.
d) दंगलीची चौकशी करण्यासाठी सरकारने डेक्कन रॉयटस कमिशन नेमले.
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a),(b) आणि (c)
४) (a),(b) आणि (d)
६) इ. स. १८७५ च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
१) १२ मे, १८७५ रोजी सुपे येथे शेतकर्यांनी पहिला उठाव केला.
२) १५ जून, १८७५ रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुधाळी गावात झाला.
३) प्रो. रणजीत गुहांनी 'Myth of the Deccan Riots' या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली आहे.
४) वरील एकही नाही.
७) १८७५ च्या शेतकर्याच्या उठावाला दख्खनचे दंगे म्हणतात ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरले होते ?
a) पुणे
b) नाशिक
c) अहमदनगर
d) कोल्हापूर
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (d)
२) (b) आणि (c)
३) (d) आणि (b)
४) (c) आणि (a)
८) दक्षिणेतील बंड १८७५ याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) हे बंड गुजराती व मारवाडी सावकरांना पाठिंबा देण्यासाठी होते.
ब) शिरुर तालुक्यातील करदे गावापासून संघर्षाला सुरुवात झाली.
क) सरकारने दक्षिण बंड आयोग स्थापन केले.
ड) बंड, जून १८७५ पर्यंत संपूर्ण पुणे जिल्ह्यात पसरले.
पर्यायी उत्तरे :
१) (अ), (ब) फक्त
२) (अ), (ब), (क) फक्त
३) (ब), (क), (ड) फक्त
४) (क), (ड) फक्त
९) डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?
१) लोकमान्य टिळक
२) न्यायमूर्ती रानडे
३) गो. ग. आगरकर
४) गो. कृ. गोखले
१०) दि. अॅग्रिकल्चरसिस्टस् रिलीफ अॅक्ट (१८७९) मधील महत्त्वाच्या तरतुदी या होत्या :
a) शेतकर्यांची जमीन परक्याची होण्यास निर्बंध
b) सिव्हिल प्रोसिजर कोड वर काही प्रमाणात निर्बंध
c) कर्ज (ऋण) फेडण्यास असमर्थ रयतेला पकडून तुरुंगात टाकता येणार नाही.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?
१) (a) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a), (b) आणि (c)
४) (a) आणि (c) फक्त
११) १८७९ च्या डेक्कन अॅग्रिकल्चरिस्ट्स रिलीफ अॅक्टमध्ये पुढीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या?
a) न्यायालयाने शेतकर्याच्या कर्जावर योग्य व्याज ठरवू शकणार होती.
b) कर्जदाराची जमीन विकली जाण्याची वेळ येणार नव्हती.
c) कर्ज फेडले नाही म्हणून कर्जदाराला तुरुंगात टाकता येणार नव्हते.
d) जमिनीवरील कराचा दर कमी केला जातो.
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b) आणि (c)
२) (b), (c) आणि (d)
३) (a), (c) आणि (d)
४) (a), (b) आणि (d)
१२) शेतकर्यांच्या विकासासाठी महाराणी लक्ष्मीबाई तलाव कोणी बांधला ?
१) महाराष्ट्र शासन
२) निजाम सरकार
३) राजर्षी शाहू महाराज
४) कर्मवीर भाऊराव पाटील
१३) मुळशीच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
१) शंकरराव मोरे
२) केशवराव जेधे
३) सेनापती बापट
४) नारायण मेघाजी लोखंडे
१४) पांडुरंग बापट यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी झाले होते?
१) कृष्णराव भालेकर
२) दिनकरराव जवळकर
३) तात्यासाहेब करंदीकर
४) श्रीपतराव शिंदे
१५) जोड्या जुळवा :
अ) दीनबंधू मित्र I) बार्डोली सत्याग्रह
ब) बाबा रामचंद्र II) मुळशी सत्याग्रह
क) सरदार वल्लभभाई पटेल III) अयोध्येच्या शेतकर्यांचा लढा
ड) सेनापती बापट IV) नीलदर्पण नाटक
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) III IV II I
२) II I IV III
३) IV III I II
४) III I IV II
१६) .......... ही जगातली पहिली धरण विरोधी चळवळ होती.
१) भीमथडी सत्याग्रह
२) नर्मदा सत्याग्रह
३) मुळशी सत्याग्रह
४) चिरनेर सत्याग्रह
१७) मुळशी सत्याग्रहामध्ये पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला होता ?
a) सेनापती बापट, विनायकराव भुस्कुटे, शंकरराव देव
b) विनायकराव भुस्कुटे, शंकरराव देव, लो. टिळक
c) शंकरराव देव, लो. टिळक, सेनापती बापट
d) लो. टिळक, सेनापती बापट, विनायकराव भुस्कुटे
पर्यायी उत्तरे :
१) (a) व (b)
२) (c) व (d)
३) (a) फक्त
४) (d) फक्त
१८) कोणत्या पक्षाने शेतकरी चळवळीचे नेतृत्व केले?
१) कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेसमधील डाव्या गटाने
२) ट्रेड युनियन
३) राष्ट्रीय ट्रेड युनियन
४) कामगार पक्ष
१९) १९२५ मध्ये हिरडा विकण्याच्या मक्तेदारी विरुद्ध ......... च्या शेतकर्यांनी सत्याग्रह केला.
१) सातारा
२) भोर
३) कोल्हापूर
४) चिरनेर
२०) १९२७ मध्ये मुंबईत झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेत पुढीलपैकी कोणत्या नेत्याचा सहभाग नव्हता ?
१) एस. एस. मिरजकर
२) के. एन. जोगळेकर
३) एस. व्ही. घाटे
४) एम. आर. जयकर
२१) बुलढाणा जिल्ह्यात मेहकर व चिखली तालुक्यात १९३० साली कर्जबाजारी शेतकर्यांनी ...... च्या नेतृत्त्वाखाली सत्यशोधक चळवळीच्या धर्तीवर प्रतिकार सुरू केला.
१) पंढरीनाथ पाटील
२) केशवराव जेधे
३) केशवराव बागडे
४) आनंदस्वामी
२२) भारतीय कृषक संस्थेची स्थापना ........... या वर्षी झाली.
१) १९३३
२) १९३४
३) १९३५
४) १९३६
२३) मुंबई कायदेमंडळात, १९३७ मध्ये .......... यांनी खोती रद्द करण्याचे विधेयक मांडले.
१) डॉ. पंजाबराव देशमुख
२) विनोबा भावे
३) वि. दा. सावरकर
४) डॉ. बी. आर. आंबेडकर
२४) किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे व कधी भरले होते?
१) मुंबई, १९४२
२) ठाणे, १९४५
३) टिटवाळा, १९४५
४) पुणे, १९४२
२५) मुंबई शहराला दुधाचा पुरवठा करणार्या कारीया जिल्ह्यातील शेतकर्यांना, दुधाचे व्यापारी आपल्याला फसवत आहेत असे वाटले म्हणून ते ....... या राष्ट्रीय नेत्याकडे, जे याच जिल्ह्यातील होते, मदत मागण्यासाठी गेले.
१) महात्मा गांधी
२) मोरारजी देसाई
३) सरदार पटेल
४) डॉ. व्हर्गीस कुरीयन
२६) १९ व्या शतकातील शेतकर्यांची आंदोलने ब्रिटिश सरकारला फारशी धोकादायक का वाटली नाहीत ?
१) शेतकर्यांनी ब्रिटिश सरकारला लक्ष्य केले नाही.
२) सावकार व जमीनदार हेच शेतकर्यांचे शत्रू होते.
३) शेतकर्यांजवळ पुरेशी शास्त्र नव्हती.
४) आंदोलनात सातत्य व भविष्यकालीन योजना नव्हती.
२७) पुढील विधाने काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडा.
अ) अमेरिकन यादवी युद्ध संपल्यावर महाराष्ट्रात कापसाचे भाव कोसळले.
ब) महाराष्ट्रातील दुष्काळातही इंग्रज सरकारने सारावसुलीची सक्ती केली.
क) महाराष्ट्रातील शेतकर्यांना सावकारांकडून कर्जे काढावी लागत व ते कर्जबाजारी होत.
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क ही एकमेकांशी संबंध नसलेली विधाने आहेत.
२) अ हे असंबद्ध आहे. ब हे क चे कारण आहे.
३) अ आणि ब यांचा परिणाम क आहे.
४) अ चा परिणाम ब तर ब चा परिणाम क आहे.
२८) १८७३ मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतकर्यांनी संघटना स्थापन केली होती ?
१) राजमहल
२) मुर्शिदाबाद
३) भागलपूर
४) पवना
२९) पुढील दोन विधानांपैकी कोणते/कोणती योग्य आहे/आहेत ?
a) एका जोरदार चळवळीनंतर प्रतापगढच्या शेतकर्यांनी स्वत:च कुळांचे गैर हुसकावणे थांबवले परंतु श्रेय दिले गेले महात्मा गांधींना.
b) इतर वेळी महात्मा गांधींचे नाव घेऊन आदिवासींनी व शेतकर्यांनी चळवळी केल्या ज्या गांधीजींच्या तत्त्वाप्रमाणे नव्हत्या.
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a)
२) केवळ (b)
३) न (a) व न (b)
४) (a) व (b) दोन्ही
३०) चंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
१) महात्मा फुले
२) महात्मा गांधी
३) लोकमान्य टिळक
४) वि.दा. सावरकर
३१) बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता?
१) भात
२) ज्यूट
३) नीळ
४) ऊस
३२) चंपारण्यमधील शेतकर्यांचा लढा ...... शी संबंधित होता.
१) ऊस
२) कापूस
३) भात
४) नीळ
३३) बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता?
१) भात
२) ज्यूट
३) नीळ
४) ऊस
३४) महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी १९१८ मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?
१) गोरखपूर
२) सोलापूर
३) खेडा
४) पुणे
३५) खेडा येथील शेतकर्यांच्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रह आंदोलन करण्याचे कारण सांगा.
I) दुष्काळ असतानाही प्रशासनाने शेतसारा संकलित करण्यास कमी केले नाही.
II) प्रशासनाने गुजरातमध्ये कायमधारा पद्धत लागू करण्याची शिफारस केली.
१) फक्त I
२) फक्त II
३) I फक्त II दोन्ही
४) I किंवा II दोन्हीही नाहीत.
३६) बार्डोलीचा सत्याग्रह .......... यांच्या नेतृत्वाखाली झाला.
१) सरदार पटेल
२) महात्मा गांधी
३) विनोबा भावे
४) महादेव देसाई
३७) गुजरातमधील शेतकर्यांनी ..... यांच्या नेतृत्वाखाली कर विरोधी मोहीम संघटित केली.
१) महात्मा गांधी
२) सरदार वल्लभभाई पटेल
३) मोतीलाल नेहरू
४) एस. ए. डांगे
३८) खालील शेतकर्यांच्या संघर्षाची कारणे व त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या जुळवा :
a) कालव्याच्या पाण्याचे दर i) बरद्वान, बंगाल
b) जमीनदारीला विरोध ii) कालीपटनम् आंध्र प्रदेश
c) पाणी कराला विरोध iii) सुकूर, सिंध
d) सारावाढीला विरोध iv) अमृतसर, पंजाब
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iii) (i) (ii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (i) (ii) (iii) (iv)
३९) ऑल इंडिया किसान सभेचे पहिले अधिवेशन ..... येथे सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते.
१) लखनौ
२) कानपूर
३) कोल्हापूर
४) पुणे
४०) अखिल भारतीय किसान सभेच्या दुसर्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी ...... होते.
१) एन्. जी. रंगा
२) शंकर देव
३) नरेंद्र देर
४) श्री. अ. डांगे
४१) अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरविण्यात आले ?
१) मनमाड
२) फैजपूर
३) मुंबई
४) पुणे
४२) यादी - I आणि यादी -II जुळवा आणि खालील कोडच्या माध्यमाने अचूक उत्तर मिळवा.
यादी - I (नेता) यादी -II (कृषी आंदोलन)
A) बाबा रामचंद्र १) बिजोलिया आंदोलन
B) माणिक लाल वर्मा २) कुका आंदोलन
C) बाबा राम सिंग ३) अवध कृषी आंदोलन
D) स्वामी विद्यानंद ४) बिहार मधील कृषी आंदोलन
पर्यायी उत्तरे :
१) A-4, B-2, C-3, D - 1
२) A-3, B-1, C- 2, D-4
३) A-3, B-2, C-4, D-1
४) A-1, B-2, C-3, D-4
४३) तेभाग संघर्ष काय होता?
१) तेभाग या प्रदेशाच्या स्वातंत्र्याचा संघर्ष
२) खंडाने शेत कसणार्याला पिकाचे दोन-तृतीयांश वाटा मिळावा म्हणून केलेला संघर्ष
३) भारत आणि पूर्व पाकिस्तानामधील छोट्या प्रदेशावरून झालेला संघर्ष
४) पिकाचा कमीत कमी अर्धा हिस्सा मिळावा म्हणून केलेला संघर्ष
४४) पुढील शेतकरी संघटना आणि त्या ज्या राज्यांतील होत्या ती राज्ये यांच्या जोड्या जुळवा :
a) राज्य रयत संघ i) कर्नाटक
b) भारतीय किसान युनियन ii) पंजाब
c) खेडूत आणि किसान संघ iii) गुजरात
d) विवासेंगल संगम iv) तामिळनाडू
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (iii) (iv) (i) (ii)
३) (i) (ii) (iii) (iv)
४) (ii) (i) (iv) (iii)
४५) आधुनिक भारताच्या इतिहासातील शेतकर्यांचे सर्वात मोठे गनिमी युद्ध कोणते होते?
१) किसान सभा आंदोलन
२) मोपला उठाव
३) दख्खन दंगे
४) तेलंगणा आंदोलन
४६) १९३८ मध्ये केरळात कुळ कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी या संघटनेने आंदोलन करून मागण्या मांडल्याः
१) अखिल भारतीय किसान सभा
२) अखिल मलबार कर्षक संघम्
३) शेतकरी सभा
४) पट्टेदार सभा
भारतीय उद्योगाचा विकास
१) पुढे दिलेल्या ब्रिटिश व्यापारी केंद्रांची त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा.
पर्यायी उत्तरातून योग्य पर्याय निवडा.
i) कलकत्ता
ii) सुरत
iii) मद्रास
iv) बॉम्बे
पर्यायी उत्तरे :
१) (i),(ii),(iii),(iv)
२) (iv),(i),(iii),(ii)
३) (ii),(iii),(iv),(i)
४) (ii),(iii),(i),(iv)
२) अनुद्योगीकरण म्हणजे काय?
१) वैज्ञानिक शोधाच्याद्वारे उद्योगांना चालना
२) मोठ्या उद्योगांची निर्मिती
३) उत्पादनाचे नफा हेच उद्दिष्ट
४) औद्योगिक उत्पादन कमी होणे
३) ब्रिटिशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले ?
१) ब्रिटिशांनी फक्त स्वतःचा फायदा साध्य करावयाचा होता.
२) भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय ते माहीत नव्हते.
३) भारतीय मोठ्या प्रमाणावर शिकलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करू शकणार नाहीत असे ब्रिटिशांना वाटत होते.
४) भारतीय औद्योगिक विकासाबाबत उत्सुक नव्हते.
४) ईस्ट इंडिया कंपनीच्या अमलाखाली भारतीय पारंपरिक उद्योगधंद्याचा र्हास झाला कारण
अ) भारतीय कामगाराकडे आवश्यक ते तांत्रिक प्रावीण्य नव्हते.
ब) भारतीयांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले होते.
क) भारतीय माल ब्रिटिश मालाशी स्पर्धा करू शकत नाही.
ड) वरीलपैकी कोणतेही नाही.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
१) अ, ब आणि क
२) ब आणि क
३) अ आणि ब
४) फक्त क
५) ऐतिहासिकदृष्ट्या १७६१-१९९९ या काळात भारताच्या औद्योगिक विकासाचे ढोबळपणे ...... प्रमुख कालखंड दाखवता येतील.
१) सात
२) सहा
३) चार
४) पाच
६) जोड्या लावा.
a) पहिली कापड गिरणी i) १९११
b) पहिली ताग गिरणी ii) १८५३
c) पहिला लोखंड कारखाना iii) १८५५
d) पहिला रेल्वे मार्ग iv) १८५४
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (i) (iv)
२) (iv) (iii) (i) (ii)
३) (i) (iv) (iii) (ii)
४) (iii) (ii) (iv) (i)
७) ................. ही महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी होती.
१) थ्रोस्टल मिल
२) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
३) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
४) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी
८) १८५१ मध्ये मुंबईत बॉम्बे स्पिनिंग अँड वीव्हिंग कंपनी ही पहिली कापडगिरणी कोणी सुरू केली?
१) जमशेदजी टाटा
२) प्रेमचंद रायचंद
३) दिनशा पेटीट
४) कावसजी दावर
९) पहिल्या आधुनिक सूतगिरणीची स्थापना मुंबई येथे १८५४ मध्ये .......... यांनी केली.
१) सेठ सी. एन. लाड
२) डी. जी. पोतदार
३) सी. एन. दावर
४) टाटा अँड सन्स
१०) इ.स. १८५४ मध्ये ...... यांनी मुंबई येथे पहिली कापडाची गिरणी सुरू केली.
१) कावसजी दावर
२) सर मंगलदास नथुभाऊ
३) मोरारजी गोकुळदास
४) दिनशा पेटीट
११) इ.स. १८५४ मध्ये भारतात सर्वप्रथम ...... येथे सूतगिरणी अस्तित्वात आली.
१) अहमदाबाद
२) नागपूर
३) मुंबई
४) सुरत
१२) १८८७ मध्ये जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मील ...... येथे स्थापन केली.
१) मुंबई
२) नागपूर
३) कलकत्ता
४) सोलापूर
१३) टाटा हायड्रोलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली ?
१) दोराबजी टाटा
२) जमशेटजी टाटा
३) रतन टाटा
४) वीरजित टाटा
१४) भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला?
१) १९१५
२) १९१६
३) १९१७
४) १९१८
१५) १९२० मध्ये भारतात कापड गिरणी क्षेत्रात स्त्री कामगारांची टक्केवारी किती होती?
१) १२%
२) १५%
३) २०%
४) ५.५%
१६) हिंदुस्तानचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जात होते?
१) बनारस
२) पैठण
३) ढाका
४) वारंगळ
१७) जोड्या जुळवा :
अ) सरकी तेल कारखाना i) १९४०
ब) भारतातील सुती कापडाची पहिली गिरणी ii) १९१६
क) भारतासंबंधी औद्योगिक आयोगाची स्थापना iii) कानपूर
ड) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाची स्थापना iv) मुंबई
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) i ii iii iv
२) iii iv ii i
३) iv iii ii i
४) iv i iii ii
१८) खालीलपैकी कोणता उद्योगधंदा हा महाराष्ट्राचा प्रमुख उद्योगधंदा मानला जातो, ज्यामुळे इंग्रजांच्या काळात राज्याच्या आर्थिक सुबत्तेस हातभार लागला?
१) जहाज बांधणी उद्योग
२) कापूस/कापड उद्योग
३) लोह आणि पोलाद उद्योग
४) साखर उद्योग
१९) १९३४ मध्ये नागपूर योजना कशासाठी प्रसिद्ध होती?
१) नागपूरचा आर्थिक विकास
२) रस्ते बांधकाम
३) रेल्वे विकास
४) जलवाहतूक नियंत्रण
२०) भारतातील आघाडीच्या उद्योगपतींच्या एका गटाने १९४४ मध्ये भारताच्या आर्थिक विकासाची योजना प्रसिद्ध केली, ती सर्वसामान्यपणे ...... म्हणून प्रसिद्ध होती.
१) बॉम्बे प्लान
२) दिल्ली प्लान
३) कलकत्ता प्लान
४) मद्रास प्लान
कामगार संघटना आणि आंदोलने
१) मुंबईतील गिरणी मालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणत्या साली बॉम्बे मिल ओनर्स असोसिएशन ही संघटना स्थापन केली?
१) १८७६
२) १८८०
३) १८८१
४) १८८५
२) खालील दोन विधाने पहा
a) फॅक्टरी अॅक्ट १८८१ हा तसा कडक होता.
b ) फॅक्टरी अॅक्टस् १८८१, १८९२ व १९४८ हे त्या घटकांना लागू केले गेले ज्यात कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेली.
१) दोन्ही विधाने बरोबर आहेत.
२) एकही विधान बरोबर नाही.
३) विधान (a) बरोबर आहे (b) नाही.
४) विधान (b) बरोबर आहे (a) नाही.
३) १८८१ च्या फॅक्टरी अॅक्टचा कोणता हेतू होता ?
१) मालक वर्गाच्या प्रश्नांची चर्चा करणे.
२) मालक व कामगार यांचे हित व कल्याण साधणे.
३) विविध आयोगांची भूमिका तपासणे
४) फॅक्टरीचा विकास करणे.
४) ब्रिटिश काळात बाल कामगाराबाबत कोणता कायदा केला होता?
१) फॅक्टरी अॅक्ट
२) लेबर अॅक्ट
३) चाईल्ड लेबर अॅक्ट
४) वरीलपैकी कोणताही नाही
५) सुरुवातीच्या कामगार हितवर्धक सभेचे संस्थापक कोण होते ?
१) नारायण मेघाजी लोखंडे
२) एस. एन. भालेराव
३) श्रीपाद अमृत डांगे
४) भिवाजी नरे
६) नारायण लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केलेली कामगार संघटना कोणती?
१) बॉम्बे लेबर युनियन
२) बॉम्बे वर्कर्स असोसिएशन
३) बॉम्बे हॉकर्स युनियन
४) बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन
७) मुंबई येथे १८९० मध्ये गिरणी कामगार संघटना कोणी स्थापन केली?
१) भाऊ दाजी लाड
२) महात्मा फुले
३) नारायण मेघाजी लोखंडे
४) एस. एम. जोशी
८) इ.स. १८९० मध्ये स्थापन झालेल्या ”बॉम्बे मिल हॅन्डस असोसिएशन”चे संस्थापक कोण होते?
१) नारायण मल्हार जोशी
२) बी. पी. वाडिया
३) नारायण मेघाजी लोखंडे
४) एस. ए. डांगे
९) मुंबई कामगार संघा ची स्थापना कोणी केली ?
१) नारायण लोखंडे
२) श्रीपाद डांगे
३) नारायण जोशी
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१०) श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्याबाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे?
१) त्यांनी प्रथम मजूर संघटना - बॉम्बे मिल हँडस् असोसिएशन स्थापन केली.
२) त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
३) त्यांना “जस्टीस ऑफ पीस” हा पुरस्कार देण्यात आला.
४) वरील एकही नाही.
११) ......... ह्यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली.
१) रामकृष्ण शिंदे
२) नारायण मेघाजी लोखंडे
३) रघुजी भिकाजी
४) नारायण सुरकोजी
१२) भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत कार्यकर्ते ......... हे होते.
१) दिनकरराव जवळकर
२) कृष्णराव भालेकर
३) नारायण मेघाजी लोखंडे
४) राजर्षी शाहू
१३) कोणत्या समाजसुधारक व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे नारायण लोखंडे याने मुंबईच्या गिरणी कामगारांची मिल हँड असोसिएशन सोसायटी नावाची संघटना स्थापन केली.
१) वि. दा. सावरकर
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) महात्मा जोतिबा फुले
४) महात्मा गांधी
१४) नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी खालीलपैकी काय खोटे आहे ?
१) भारतातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक
२) गुराखी नावाचे दैनिक
३) मुंबईत पहिली कामगार परिषद भरविली
४) कार्ल मार्क्सशी भेट
१५) कामगार चळवळीचे आद्यजनक नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर पदवी .......... यावर्षी देण्यात आली.
१) १८९५
२) १८९६
३) १८९८
४) १८९९
१६) ........ हे कामगार संघटना चळवळीचे जनक होय.
१) ना. म. लोखंडे
२) महात्मा गांधी
३) नाना शंकर शेठ
४) दादाभाई नौरोजी
१७) खालीलपैकी कोणास भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात?
१) ना. म. जोशी
२) श्रीपाद डांगे
३) भाऊ फाटक
४) नारायण लोखंडे
१८) कामगारांची दयनीय परिस्थिती सुधारावी व त्यांना कायद्याचे संरक्षण मिळावे याकरिता सर्वप्रथम कोणी प्रयत्न केला?
१) नारायण मेघाजी लोखंडे
२) सोरावजी शापूरजी बंगाली
३) रसिकलाल घोष
४) फामजी मानेकजी
१९) मुंबई मजूर संघाचे संस्थापक कोण होते?
१) बी. पी. वाडिया
२) श्रीपाद अमृत डांगे
३) महात्मा ज्योतिबा फुले
४) नारायण मेघाजी लोखंडे
२०) जोड्या जुळवा :
a) १८८७ i) अमलगमेटेड सोसायटी ऑफ रेल्वे सर्व्हंट्स ऑफ इंडिया
b) १८९७ ii) कुर्ल्याच्या स्वदेशी मिलमध्ये संप
c) १९१० iii) कामगार हितवर्धक सभा
d) १९१० iv) सोशल सर्व्हिस लीग
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (iii) (iv) (ii)
२) (iii) (i) (iv) (ii)
३) (ii) (i) (iii) (iv)
४) (i) (ii) (iv) (iii)
२१) १९१५ मध्ये ........ यांनी चार्ल्स मार्टिन या नावाने भारत सोडला व १९३० मध्ये डॉ. मेहमूद ह्या नावाने भारतात परत आले.
१) सुभाष चंद्र बोस
२) मानवेंद्रनाथ रॉय
३) रासबिहारी बोस
४) वि. दा. सावरकर
२२) ..... हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते.
१) एम. एन. रॉय
२) एन. एम. जोशी
३) एफ. एम. अन्सारी
४) आर. पी. दत्त
२३) १९१८ मध्ये गांधीजींनी कोणत्या लेबर असोसिएशनची स्थापना केली ?
१) अहमदाबाद टेक्सटाईल
२) ऑल इंडिया ट्रेड युनियन
३) बॉम्बे ट्रेड युनियन
४) कोलकाता ट्रेड युनियन
२४) अहमदाबाद मिल संप घटना ..... यांच्याशी संबंधित होती.
१) सरदार पटेल
२) मणीभाऊ देसाई
३) मो. क. गांधी
४) मोरारजी देसाई
२५) १९२१ मधील मद्रास शहर चळवळीला महत्त्वाचा भाग म्हणजे ...... येथे चार महिने चाललेला संप होय.
१) मद्रास बार काउन्सिल
२) बकिंगहॅम अँड कर्नाटक टेक्स्टाइल मिल्स्
३) राजामुंद्री कापड बाजार
४) गुंटूर नगरपालिका
२६) स्वतंत्र मजूर पक्षाची (१९३६) स्थापना कोणी केली ?
१) कॉम्रेड डांगे
२) सेनापती बापट
३) एस. एम. जोशी
४) डॉ. बी. आर. आंबेडकर
२७) कामगार हितवर्धक या संस्थेचे संस्थापक कोण होते?
१) ना. म. जोशी
२) बी. पी. वाडिया
३) लाला लजपतराय
४) सी. के. बोले
२८) सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते ?
१) जमीनदार
२) राष्ट्रीय नेते
३) गिरणी कामगार
४) व्यापारी
२९) जे. बी. कृपलानी यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?
१) किसान मजदूर प्रजा पार्टी
२) मार्क्सवादी पार्टी
३) किसान पार्टी
४) समाजवादी पार्टी
ट्रेड युनियन चळवळ (१९२०-)
१) अखिल भारतीय कामगार संघ (All India Trade Union Federation) कोणाच्या योग्य नेतृत्वाखाली स्थापन झाला?
१) एस. ए. डांगे
२) व्ही. व्ही. गिरी
३) एन. एम. जोशी
४) सी. आर. दास
२) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (आयटक) पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
१) मुंबई
२) नागपूर
३) पुणे
४) नाशिक
३) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे पहिले अध्यक्ष कोण होते?
१) दादाभाई नौरोजी
२) लोकमान्य टिळक
३) लाला लजपतराय
४) दिवाण चमनलाल
४) भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेला मान्यता दिली?
१) भारतीय राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस
२) अखिल भारतीय लाल ट्रेड युनियन काँग्रेस
३) अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस
४) अखिल भारतीय किसान सभा
५) ”ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे” (AITUC) पहिले अध्यक्ष कोण होते?
१) एस. ए. डांगे
२) एस. एम. जोशी
३) एम. एन. रॉय
४) लाला लजपत राय
६) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक १९२०) चे पहिले अध्यक्ष कोण होते?
१) जे. एम. सेनगुप्ता
२) दिवाण चमनलाल
३) लाला लजपतराय
४) चित्तरंजन दास
७) अखिल भारतीय मजूर संघ काँग्रेस (AITUC) चे प्रथम अध्यक्ष कोण होते?
१) व्ही. व्ही. गिरी
२) एस. ए. डांगे
३) जवाहरलाल नेहरू
४) लाला लजपत राय
८) आयटक या कामगार संघटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित नाही?
१) ना. म. जोशी
२) लोकमान्य टिळक
३) लाला लजपतराय
४) महात्मा गांधी
९) जोड्या लावा :
a) मद्रास लेबर युनियन i) १९२०
b) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ii) १९१८
c) गिरणी कामगार संघ iii) १९२९
d) नॅशनल ट्रेड युनियन फेडरेशन iv) १९२७
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (i) (iii) (iv)
२) (iii) (i) (ii) (iv)
३) (ii) (i) (iv) (iii)
४) (i) (ii) (iii) (iv)
१०) श्री. ना. म. जोशी .......... या संघटनेचे अध्यक्ष होते.
१) बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन
२)गिरणी कामगार युनियन
३) हिंद मजदूर सभा
४) भारतीय मजदूर संघ
११) जोड्या लावून उत्तराचा योग्य पर्याय निवडा.
अ) अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस I) १९३६
ब) अखिल भारतीय किसान काँग्रेस II) १९२०
क) गिरणी कामगार संघ III) १९१८
ड) अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन IV) १९२८
पर्यायी उत्तरे :
अ ब क ड
१) II I IV III
२) III IV I II
३) II I III IV
४) I II IV III
१२) कोणत्या कायद्यानुसार भारतातील कामगार संघटनाना कायदेशीर मान्यता मिळू लागली?
१) इंडियन ट्रेड युनियन अॅक्ट, १९२६
२) इंडियन माईन्स अॅक्ट, १९२३
३) इंडियन फॅक्टरी अॅक्ट, १९२२
४) इंडियन फॅक्टरी अॅक्ट, १९११
१३) “ज्या युद्धामुळे स्वातंत्र्य वा लोकशाही मिळणार नाही कामगारवर्गाला ज्यापासून काहीच फायदा होणार नाही त्या युद्धात भारताने सहभागी होऊ नये“ - हा ठराव १९४० साली कोणी केला ?
१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२) मुस्लीम लीग
३) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)
४) हिंदू महासभा
१४) विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तींपैकी कोण होते?
१) मदनलाल बागडी, विनायक स. दांडेकर आणि श्यामनारायण काश्मिरी
२) सुखदेव आणि श्यामनारायण काश्मिरी
३) राजगुरु, सुखदेव, श्यामनारायण काश्मिरी
४) राजगुरु आणि विनायक स. दांडेकर
१५) नागपूरच्या मजूर-आंदोलनाचे जनक कोणाला म्हणतात?
१) अॅड. बी. आर. मंडलेकर
२) स्वामी शंकरानंद
३) डॉ. मुंजे
४) धुंडिराजपंत ठेंगडी
१६) मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशिन आल्याने २२८ मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करतात....... नवी मशीन ही कामगार चळवळी पुढील मोठी समस्या आहे असे सोशॅलिस्ट मध्ये कोणी लिहीले?
१) ना. म. जोशी
२) जॉर्ज फर्नांडीस
३) कॉमरेड रणदिवे
४) कॉमरेड डांगे
१७) राष्ट्रीय मिल मजदूर संघाची मुंबईमध्ये स्थापना कोणी केली?
१) जी. डी. आंबेकर
२) एस. एम. जोशी
३) एन. एम. जोशी
४) दत्ता सामंत
१८) सन १९८५ मध्ये असंघटित क्षेत्रातील स्त्री कामगारांवर एक महत्त्वपूर्ण अभ्यास कोणी प्रसिद्ध केला?
१) सुलभा ब्रम्हे
२) निर्मला बॅनर्जी
३) लीला दुबे
४) बीना आगरवाल
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१५९)
महाराष्ट्रातील आर्थिक राष्ट्रवादाचा पाया
१-३
२-१
३-४
४-१
५-४
६-३
७-१
८-१
९-४
१०-१
११-४
१२-२
१३-२
१४-३
१५-३
आर्थिक शोषणाचा सिद्धांत
१-२
२-३
३-२
४-१
५-१
६-१
७-२
८-३
९-२
१०-४
११-४
भारतीय भांडवल व संपत्तीचे शोषण
१-४
२-४
३-१
४-३
५-३
६-१
७-२
८-४
कृषी क्षेत्राचे व्यापारीकरण
१-१
२-३
३-४
४-३
५-१
६-१
७-३
८-३
९-३
१०-४
११-१
१२-४
१३-४
१४-४
१५-४
१६-४
१७-४
१८-२
१९-२
२०-१
२१-३
२२-३
२३-४
२४-४
२५-२
२६-१
२७-१
२८-३
२९-२
३०-३
३१-३
३२-२
३३-४
शेतकरी संघटना आणि चळवळी
१-३
२-३
३-३
४-३
५-४
६-४
७-४
८-३
९-२
१०-३
११-१
१२-३
१३-३
१४-३
१५-३
१६-३
१७-३
१८-१
१९-२
२०-४
२१-४
२२-१
२३-४
२४-३
२५-३
२६-४
२७-३
२८-४
२९-४
३०-२
३१-३
३२-४
३३-३
३४-३
३५-१
३६-१
३७-२
३८-४
३९-१
४०-१
४१-२
४२-२
४३-२
४४-३
४५-४
४६-२
भारतीय उद्योगाचा विकास
१-३
२-४
३-१
४-४
५-४
६-२
७-४
८-२
९-३
१०-१
११-३
१२-२
१३-१
१४-२
१५-३
१६-३
१७-२
१८-२
१९-२
२०-१
कामगार संघटना आणि आंदोलने
१-१
२-४
३-२
४-१
५-४
६-४
७-३
८-३
९-१
१०-४
११-२
१२-३
१३-३
१४-४
१५-१
१६-१
१७-४
१८-२
१९-३
२०-३
२१-२
२२-१
२३-१
२४-३
२५-२
२६-४
२७-४
२८-३
२९-१
ट्रेड युनियन चळवळ (१९२०)
१-३
२-१
३-३
४-१
५-४
६-३
७-४
८-४
९-३
१०-१
११-१
१२-१
१३-३
१४-१
१५-४
१६-४
१७-१
१८-२