आधुनिक शिक्षण / प्रश्नमंजुषा (१५६)
- 20 May 2021
- Posted By : study circle
- 3977 Views
- 6 Shares
आधुनिक शिक्षण
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ”शिक्षण व साक्षरता” या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. शिक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, व्यक्ती, त्यांचे विचार आणि कार्य, समित्या, कायदे, धोरण, योजना, प्रश्न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :
१.२ आधुनिक भारताचा इतिहास - आधुनिक शिक्षणाची ओळख
१.३.१ सामाजिक-सांस्कृतिक बदल - इंग्रजी शिक्षणाची भूमिका
१.५ भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास - स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीसाठी शिक्षणाची भूमिका
१.११ स्वातंत्र्योत्तर भारत - भारताची शिक्षण क्षेत्रातील प्रगती
(एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
महाराष्ट्रातील आधुनिक शिक्षण
१) ब्रिटिश सरकारच्या शैक्षणिक संस्था
२) शैक्षणिक कायदे
३) शिक्षणविषयक समित्या व आयोग
४) शालेय शिक्षण
५) महविद्यालये व विद्यापीठे
६) स्थानिक शैक्षणिक संस्था
७) शैक्षणिक उपक्रम व योजना
८) शिक्षणाचे स्वरुप व सामाजिक जागृती
ब्रिटिश सरकारच्या शैक्षणिक संस्था
१) वॉरेन हेस्टिंग्ज या गव्हर्नर जनरलने अरेबिक आणि पर्शियन भाषांच्या शिक्षणासाठी कोणत्या साली कलकत्ता येथे “मदरसा“ स्थापन केला ?
१) १७७८
२) १७७९
३) १७८०
४) १७८१
२) मॅडम मॉन्टेसरी यांनी मुलांसाठी पूर्वप्राथमिक शाळा इटलीत कधी स्थापन केली ?
१) १८०७
२) १९०७
३) १६०७
४) १८०६
३) फोर्ट विलियम कॉलेज स्थापना कलकत्ता १८०० संबंधी निम्न वक्तव्य वाचा.
१) लॉर्ड वेलस्ली द्वारे कॉलेजची स्थापना करण्यात आली ज्यात ब्रिटिश नागरिक सेवक, भारतात नियुक्ती सांभाळण्यापूर्वी स्थानिक भाषा आणि संस्कृती विषयी शिकतील.
२) फोर्ट विलियम कॉलेजच्या स्थापने संबंधी एक कारण हे सुद्धा होते की फ्रेंच क्रांती पासून सुरु झालेल्या स्वतंत्रता संबंधी विचारापासून वाचवणे.
३) डॉ. जॉन गिलख्रिस्ट, कॉलेज मधील एक प्रोफेसर, ज्याने क्रमाने हिंदी भाषा शिकणे आणि हिंदी पुस्तकाचे प्रकाशन, यात महत्त्वाचा वाटा दिला.
या वक्तव्यापैकी कोणते अचूक आहे ?
पर्याय :
१) १,२ आणि ३
२) १ आणि २
३) २ आणि ३
४) १ फक्त
४) जोड्या जुळवा.
a) राजकुमार कॉलेज i) लाहोर
b) मेयो कॉलेज ii) इंदोर
c) डेली कॉलेज iii) अजमेर
d) अॅटचीसन कॉलेज iv) राजकोट
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iii) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (ii) (i) (iv) (iii)
५) इ.स. १८०० मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना केली ?
१) लॉर्ड मेकॉले
२) लॉर्ड बेंटिंक
३) लॉर्ड वेलस्ली
४) लॉर्ड डलहौसी
६) जोड्या जुळवा.
a) वॉरन हेस्टिंग्ज i) कलकत्ता मदरसा
b) जोनाथन डंकन ii) संस्कृत महाविद्यालय, बनारस
c) सर विल्यम जोन्स iii) बंगाल एशियाई सोसायटी
d) सर विल्यम विल्बरफोर्स iv ) इव्हँजेलीकल सांप्रदाय
(a) (b) (c) (d)
१) (i) (ii) (iv) (iii)
३) (i) (ii) (iii) (iv)
२) (iii) (iv) (i) (ii)
४) (iv) (iii) (ii) (i)
७) बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी कोणा परदेशी प्रशिक्षित ग्रंथपालाची त्यांच्या राज्यातील ग्रंथालय विकास व ग्रंथालय शास्त्र प्रशिक्षणाच्या कार्यासाठी नेमणूक केली होती ?
१) एडवर्ड-एडवर्डस
२) व्युलम एडवर्ड
३) डब्ल्यू. ए. बोर्डन
४) मेलविल ड्युई
८) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कुठे पाठविले होते?
१) मुंबई
२) कोलकाता
३) राजकोट
४) बडोदा
९) ...... शहरातील द अलबर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख वैद्य म्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती.
१) मुंबई
२) पुणे
३) कोल्हापूर
४) सुरत
१०) लेडी डफरीन फंड महिलांच्या ........ शिक्षणाकरिता मदत करी.
१) डॉक्टर
२) परिचारिका
३) परिचारिका व सुईण
४) डॉक्टर, परिचारिका व सुईण
शैक्षणिक कायदे
१) भारतामध्ये ...... या वर्षी इंग्रजी हे शिकवण्याचे माध्यम म्हणून चालू करण्यात आले.
१) १८३४
२) १८३५
३) १८५०
४) १८५७
२) व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने मंजूर केलेल्या भारतीय विद्यापीठ कायदा, १९०४ चा मुख्य उद्देश कोणता होता ?
१) विद्यापीठांवरील सरकारी नियंत्रण कठोर करणे
२) शिक्षणात भारतीय हिताची सुधारणा घडवून आणणे
३) भारतीयांना इंग्रजनिष्ठ शिक्षण देणे
४) विद्यापीठ प्रशासनात विविध सुधारणा घडवून आणणे
३) भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी १९ मार्च १९१० रोजी केंद्रीय कायदे मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला ?
१) महात्मा फुले
२) महादेव गोविंद रानडे
३) लॉर्ड मेकॉले
४) गोपाळ कृष्ण गोखले
४) मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा एक कायदा समंत केला, परंतु ते केव्हापासून सक्तीचे करणार आणि सक्ती करण्याची जबाबदारी कोणाची हे नक्की असल्यामुळे त्यावर ... यांनी कडक टीका केली.
१) र. पु. परांजपे
२) सीताराम केशव बोले
३) चिमणलाल सेटलवाड
४) भी. रा. आंबेडकर
५) ”प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही,” असे कोण म्हणाले?
१) महात्मा जोतिबा फुले
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) छ. शाहू महाराज
४) राजा राममोहन रॉय
६) राज्यात प्रत्येक गावात एकतरी शाळा असली पाहिजे, ही आज्ञा कुणी काढली?
१) डॉ. बी. आर. आंबेडकर
२) महात्मा फुले
३) छत्रपती शाहू महाराज
४) महर्षी विठ्ठल शिंदे
७) मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते?
१) राजर्षी शाहू महाराज
२) सयाजीराव गायकवाड
३) प्रताप सिंह महाराज
४) पंत प्रतिनिधी
शिक्षणविषयक समित्या व आयोग
१) “विद्यापीठ अनुदान आयोगाची” स्थापना कोणत्या वर्षी झाली?
१) १९५७
२) १९५८
३) १९५६
४) १९५९
२) वर्ष १८८२ मधील हंटर कमिशनचे प्रमुख योगदान काय होते ?
१) भारतीय जन सेवा स्थापना
२) भारतीय शिक्षेचा आधार देणे
३) भारतीय रेल्वे संबंधी आधार देणे
४) राजस्व नीतीचा आधार देणे
३) पुढील शिक्षण आयोगांची कालक्रमानुसार मांडणी करा:
अ) रॅले आयोग
ब) हंटर आयोग
क) सॅडलर आयोग
ड) वुडचा खलिता
१) अ, ब, क, ड
२) ड, क, ब, अ
३) ड, अ, ब, क
४) ड, ब, अ, क
४) म. ज्योतिबा फुल्यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली?
१) सायमन आयोग
२) हंटर आयोग
३) नेहरू आयोग
४) मोर्ले-मिंटो आयोग
५) हंटर आयोगाचे प्रमुख डॉ. विल्यम हंटर यांच्या मते ...... च्या तोडीची एकही शाळा हिंदुस्थानात नव्हती.
१) शारदा सदन
२) हुजूर पागा
३) नूतन मराठी विद्यालय
४) न्यू इंग्लिश स्कूल
६) मुंबई विद्यापीठाची स्थापना ...... समितीच्या अहवालातील शिफारसीमुळे झाली.
१) चार्लस वूड
२) बेनेट कोलमन
३) मेकॉले
४) सॅडलर
७) .......... ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हटले जाते.
१) हंटर कमिशनचा अहवाल १८८२
२) वुड्स चा खलिता १८५४
३) १९०४ चा विद्यापीठ कायदा
४) लॉर्ड मेकॉलेचा प्रस्ताव १८३५
८) खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चुकीचे/चुकीची आहे/आहेत ?
a) वुडच्या खलित्याची १८५४ अंमलबजावणी खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोचवण्यात अपयशी ठरली.
b) १८८२ च्या शिक्षण आयोगासमोर महात्मा फुले व पंडिता रमाबाई यांच्या साक्षीचाही समावेश होता.
c) १९ व्या शतकाच्या अंतापर्यंत शिक्षण मध्यमवर्गापुरते सीमित होते.
d) १९११ मध्ये गो. कृ. गोखले यांनी उच्च शिक्षणाचे विधेयक मांडले.
पर्यायी उत्तरे :
१) (b)
२) (d)
३) (b) आणि (d)
४) कोणतेही नाही
९) लॉर्ड कर्झनकालीन रॅले आयोग चा संबंध ........ होता.
१) प्राथमिक शिक्षणाशी
२) माध्यमिक शिक्षणाशी
३) उच्च शिक्षणाशी
४) दुष्काळाशी
१०) विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशींवर आधारीत आहे?
१) हंटर कमिशन
२) सॅडलर कमिशन
३) रॅली कमिशन
४) वूडस् कमिशन
११) १९३९ मध्ये मुंबई राज्य सरकारने नेमलेल्या फैजी समितीचे सदस्य सचिव खालीलपैकी कोण होते?
१) डॉ. पी. एम. जोशी
२) एस. एल. कापडी
३) आर. पी. कर्वे
४) पब्लिक रिलेशन्स ऑफिसर मुंबई सरकार
१२) मुंबई प्रांतिक सरकारने १९३९ साली प्राचार्य ए. ए. ए. फैजी यांच्या अध्यक्षतेखाली (ग्रंथालये) नेमलेल्या समितीमध्ये अध्यक्षांसह एकूण किती सदस्य होते ?
१) दोन
२) तीन
३) चार
४) पाच
१३) स्वातंत्र्योत्तर माध्यमिक शिक्षणाचा सर्वकष विचार करण्यासाठी आयोग नेमले गेले.
a) हंटर आयोग
b) सप्रू समिती
c) मुदलियार आयोग
d) कोठारी आयोग
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b)
२) (c) आणि (d)
३) (b),(c) आणि (d)
४) वरील सर्व
१४) विद्यापीठ शिक्षण आयोगाला (१९४८) ............. या नावाने ओळखले जात होते.
१) कोठारी आयोग
२) मुदलियार आयोग
३) राधाकृष्णन आयोग
४) कोलकाता विद्यापीठ आयोग
१५) प्रशासकीय सेवांसाठी विद्यापीठाची पदवी ही आवश्यक बाब असू नये असे कोणत्या आयोगाने म्हटले आहे?
१) डॉ. राधाकृष्ण आयोग
२) कोठारी आयोग
३) हंटर आयोग
४) वरीलपैकी एकही नाही
१६) उच्च शिक्षणासंदर्भात राधाकृष्णन आयोगाने शिफारशी केल्यानंतरही काही प्रश्न अजुनही थंड बस्त्यात असलेले दिसतात ते खालीलप्रमाणे :
a) महाविद्यालयांना स्वायत्त दर्जाची शिफारस
b) परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उपाययोजना नसणे
c) विना अनुदान तत्व
d) उच्च शिक्षणातील संशोधनाचा ढासळलेला दर्जा
पर्यायी उत्तरे :
१) केवळ (a) विधान बरोबर आहे
२) केवळ (b) विधान बरोबर आहे
३) (b),(c) व (a) विधाने बरोबर आहेत
४) वरीलपैकी सर्व विधाने बरोबर आहेत
शालेय शिक्षण
१) गो. ग. आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
१) इ. स. १८८०
२) इ. स. १८८१
३) इ. स. १८८२
४) इ. स. १८८३
२) स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य हा मान कोणत्या संस्थानाने मिळविला?
१) बडोदा
२) औंध
३) कोल्हापूर
४) जुनागड
३) भारतात स्वातंत्र्यापूर्वी कोणी किंडरगार्डन (बालोद्यान) शाळांची स्थापना केली?
१) पंडित जवाहरलाल नेहरूंनी
२) ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी
३) डॉ. अॅनी बेझंट यांनी
४) डॉ. जे. पी. नाईक यांनी
पर्यायी उत्तरे -
१) (c)
२) (d)
३) (b)
४) (a)
४) न्यू इंग्लिश स्कूल, पुणे चे संस्थापक सदस्य कोण होते?
a) लोकमान्य टिळक
b) गोपाळ गणेश आगरकर
c) विष्णुशास्त्री चिपळूणकर
d) दादोबा पांडुरंग तर्खडकर
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a), (b) आणि (c) फक्त
४) वरील सर्व
५) खालील वाक्ये काळजीपूर्वक वाचा -
अ) व्ही. चिपळूणकर, बी. जी. टिळक, गो. ग. आगरकर या तिघांनी इ. स. १८८० मध्ये पुण्यात ”न्यू इंग्लिश स्कूल”ची स्थापना केली.
ब) व्ही. चिपळूणकर, बी. जी. टिळक, गो. ग. आगरकर या तिघांनी इ. स. १८८१ मध्ये पुण्यात ”न्यू इंग्लिश स्कूल”ची स्थापना केली.
१) अ बरोबर आहे. परंतु ब चुकीचे आहे.
२) ब बरोबर आहे. परंतु अ चुकीचे आहे.
३) अ आणि ब दोन्ही चूक आहे.
४) अ आणि ब दोन्ही बरोबर आहे.
६) १२ फेब्रुवारी १८५३ रोजी पुण्यातील एतद्देशिय स्त्रियांच्या शाळांची दुसरी वार्षिक परीक्षा देण्यात यावी. त्यावेळी पुढीलपैकी कोणती व्यक्ती उपस्थित नव्हती ?
१) ब्रिगेडीयर ट्रायडेल
२) श्री. कॉकबर्न
३) सरदार आप्पासाहेब ढमढेरे
४) सरदार आबासाहेब मुझूमदार
७) खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही?
१) पुणे येथे मुलींची शाळा - इ. एम. फोर्स्टर
२) पुणे येथे अनाथ बालकाश्रम - धों. के. कर्वेे
३) आर्य महिला समाज - पंडिता रमाबाई
४) अखिल भारतीय कृषक समाज - पंजाबराव देशमुख
८) इ.स. १९०७ मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ...... या संस्थेची स्थापना केली.
१) अनाथ बालिकाश्रम
२) महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
३) महिला विद्यालय
४) समता मंच
महविद्यालये व विद्यापीठे
१) इ. स. १८२५ मध्ये वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली ?
१) ईश्वरचंद्र विद्यासागर
२) स्वामी विवेकानंद
३) राजा राममोहन रॉय
४) स्वामी दयानंद सरस्वती
२) मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापने मागे कोण होते ?
१) भाऊ दाजी लाड
२) जगन्नाथ शंकरशेठ
३) दादाभाई नौरोजी
४) महात्मा फुले
३) सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली?
१) स्वामी दयानंद
२) स्वामी विवेकानंद
३) अॅनी बेझंट
४) केशव चंद्र सेन
४) सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज ची स्थापना कोणी केली होती?
१) कर्मवीर भाऊराव पाटील
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) राजर्षी शाहू महाराज
४) महर्षी धोंडो केशव कर्वे
५) खालील व्यक्तींपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते?
a) बी. जी. टिळक
b) जी. के. गोखले
c) धों. के. कर्वे
पर्यायी उत्तरे :
१) (a), (b) फक्त
२) (b), (c) फक्त
३) (a), (c) फक्त
४) (a), (b), (c)
६) फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले?
१) लोकमान्य टिळक
२) गोपाळ गणेश आगरकर
३) गोपाळ कृष्ण गोखले
४) विष्णुशास्त्री चिपळूणकर
७) महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या महाविद्यालयात गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली?
१) एलफिन्स्टन
२) एस.एन.डी.टी
३) फर्ग्युसन
४) विलींग्टन
८) गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते?
१) डेक्कन कॉलेज
२) फर्ग्युसन कॉलेज
३) वाडिया कॉलेज
४) विल्सन कॉलेज
९) महर्षी कर्वे पुणे येथील ....... महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते.
१) फर्ग्युसन
२) डेक्कन
३) सर परशुरामभाऊ
४) वाडिया
१०) महर्षी कर्व्यांनी १५ नोव्हेंबर १८९१ ला पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली?
१) तत्त्वज्ञान
२) गणित
३) भौतिकशास्त्र
४) नीतिशास्त्र
११) इ. स. १८६२ मध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रथम पदवीधर होण्याचा मान कोणी मिळविला ?
अ) एम. जी. रानडे
ब) आर. सी. भांडारकर
क) बी. एम. वागळे
ड) व्ही. ए. मोडक
१) फक्त अ
२) फक्त अ आणि ब
३) फक्त अ,ब आणि क
४) अ,ब,क आणि ड
१२) मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या भारतीय कुलगुरूचे नाव सांगा.
१) के. टी. तेलंग
२) एम. जी. रानडे
३) बी. जी. टिळक
४) दादाभाई नौरोजी
१३) मुंबई विद्यापीठ अस्तित्वात येण्यापूर्वी, पुढीलपैकी कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली होती ?
१) सेंट झेव्हीयर्स कॉलेज
२) एलफिन्स्टन कॉलेज
३) विल्सन कॉलेज
४) सेंट जॉन कॉलेज
१४) मुंबई विद्यापीठातून एम.ए. झालेल्या पहिल्या महिला कोण?
१) काशीबाई देवधर
२) वेणूबाई नामजोशी
३) कृष्णाबाई ठाकूर
४) पंडिता रमाबाई
१५) पहिले महिला विद्यापीठ १९१६ मध्ये ......... ह्यांनी स्थापित केले.
१) नाथीबाई ठाकरसी
२) विठ्ठलदास ठाकरसी
३) डॉ. धोंडो केशव कर्वे
४) गोदुताई कर्वे
१६) महिलांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महर्षी कर्वे यांनी इ. स. १९३० मध्ये सुरू केलेले मुंबईतील विश्वविद्यालय (विद्यापीठ) पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते?
१) बॉम्बे युनिव्हर्सिटी
२) महिला शिक्षण संस्था
३) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी
४) महिला हायस्कूल
१७) महर्षी कर्व्यांना ३ जून, १९१६ रोजी स्थापन केलेल्या माहिती विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ?
१) अमेरिका वुमेन्स युनिव्हर्सिटी
२) मॉस्को वुमेन्स युनिव्हर्सिटी
३) जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी
४) फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिटी
१८) पहिले महिला विद्यापीठ १९१६ मध्ये ......... ह्यांनी स्थापित केले.
१) नाथीबाई ठाकरसी
२) विठ्ठलदास ठाकरसी
३) डॉ. धोंडो केशव कर्वे
४) गोदुताई कर्वे
१९) महर्षी कर्वेना महिला विद्यापीठासाठी देणगी कोणी दिली ?
१) टाटा
२) ठाकरसी
३) अंंबानी
४) बिर्ला
२०) महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नातून पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली. याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
a) विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आगरकर होते.
b) विद्यापीठास एस.एन.डी.टी. हे नाव देण्यात आले.
c) विद्यापीठास श्री. विठ्ठलदास ठाकरसी यांनी देणगी दिली.
d) विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर श्रीमती नाथीबाई ठाकरसी होत्या.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (b) फक्त
२) (b) आणि (c) फक्त
३) (a),(b) व (c) फक्त
४) (b),(c) आणि (d) फक्त
२१) इ.स. १९१७ मध्ये प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे महाविद्यालय कोणी सुरू केले?
१) महर्षी धो. के. कर्वे
२) राजर्षी छत्रपती शाहू महाराज
३) कर्मवीर भाऊराव पाटील
४) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
२२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईत पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले?
१) मिलिंद महाविद्यालय
२) एल्फिन्स्टन महाविद्यालय
३) सिद्धार्थ महाविद्यालय
४) महात्मा फुले महाविद्यालय
२३) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १९२३ साली लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली ?
१) द प्रॉब्लेम्स ऑफ रूपी
२) द प्रॉब्लेम्स ऑफ मनी
३) अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स अॅट द ईस्ट इंडिया कंपनी
४) द इव्होल्यूशन अॅट प्रिन्सिपल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
२४) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली?
१) लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
२) बोस्टन विद्यापीठ
३) कोलंबिया विद्यापीठ
४) केंब्रिज विद्यापीठ
२५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी.एच.डी. प्रदान केली?
१) लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
२) बोस्टन विद्यापीठ
३) कोलंबिया विद्यापीठ
४) केंब्रिज विद्यापीठ
२६) ...... यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात डी.फील. साठी प्रबंध लिहिला होता, त्यात भारताने खुल्या व्यापाराकडे जावे असे म्हटले होते.
१) मनमोहन सिंग
२) चिंतामणराव देशमुख
३) धनंजय गाडगीळ
४) अमर्त्य सेन
स्थानिक शैक्षणिक संस्था
१) पुणे येथे इ.स. ......... मध्ये महात्मा फुले यांनी मुलीची पहिली शाळा काढली.
१) १८४८
२) १८५१
३) १८७९
४) १८८३
२) महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ (पुणे) येथे इ. स. ...... मध्ये शाळा सुरू केली.
१) १८८५
२) १८५२
३) १८८६
४) १८६३
३) जोड्या जुळवा.
a) महर्षी धोंडो केशव कर्वे i) श्री. शिवाजी शिक्षण संस्था
b) कर्मवीर भाऊराव पाटील ii) निष्काम कर्ममठ
c) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे iii) सिल्व्हर ज्युबिली रुरल टे्रनिंग कॉलेज
d) डॉ. पंजाबराव देशमुख iv) अध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटी
पर्यायी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
१) (ii) (iii) (i) (iv)
२) (iv) (iii) (ii) (i)
३) (iii) (i) (ii) (iv)
४) (ii) (iii) (iv) (i)
४) पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली?
१) नाना जगन्नाथ शंकर शेठ
२) महर्षी धोंडो केशव कर्वे
३) पंडिता रमाबाई
४) महात्मा फुले
५) जोड्या जुळवा
a) गुरुवर्य बाबूराव जगताप i) जाती निर्मूलन संस्था
b) के. वि. गोडबोले ii) मासिक शिक्षक
c) गंगारामभाऊ म्हसके iii) मुंबई प्रांतिक सुधारणा मंडळाचे अध्यक्ष
d) ना. म. जोशी iv) डेक्कन असोसिएशन
(a) (b) (c) (d)
१) (iv) (iii) (ii) (i)
२) (ii) (i) (iv) (iii)
३) (iii) (iv) (i) (ii)
४) (i) (iii) (iv) (ii)
६) नेटिव्ह जनरल लायब्ररी, फिमेल हायस्कूल, वेस्टर्न इंडिया इंडस्ट्रियल असोसिएशनची सुरुवात ..... नी केली.
१) रा. गो. भांडारकर
२) गो. कृ. गोखले
३) गो. ग. आगरकर
४) म. गो. रानडे
७) राजर्षी शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले ?
१) बडोदा
२) राजकोट
३) जयपूर
४) ग्वाल्हेर
८) योग्य जोड्या जुळवा :
अ) श्री शिवाजी वैदिक विद्यालय i) परशुराम घोसरवाडकर
ब) दुधगाव विद्यार्थी आश्रम ii) शाहू महाराज
क) श्रद्धानंद वसतिगृह iii) भाऊराव पाटील
ड) सत्यशोधक समाज, कोल्हापूर शाखा iv) पंजाबराव देशमुख
पर्यायी उत्तरे :
(अ) (ब) (क) (ड)
१) (i) (iv) (ii) (iii)
२) (ii) (iii) (iv) (i)
३) (ii) (i) (iii) (iv)
४) (iv) (iii) (ii) (i)
९) बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता ?
अ) गरीब हिंदू मुलांना शिक्षण देणे.
ब) गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे.
क) गरीब आदिवासी मुलांना शिक्षण देणे.
योग्य पर्याय निवडा :
१) अ फक्त
२) अ आणि ब
३) अ, ब आणि क
४) फक्त ब
१०) विधाने वाचून पर्याय निवडा.
विधान (a) : मुंबई प्रांतातील संस्थात्मक व्यवहारात लोकशाही प्रथा मूळ धरु लागल्या.
विधान (b) : १८५२ साली मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री. मोहम्मद मकबा निवृत्त झाले, तेव्हा त्याजागी डॉ. भाऊ दाजी हे निवडून आले.
पर्यायी उत्तरे :
१) (A) आणि (B) यांचा परस्पर संबंध
२) (A) हा निष्कर्ष आहे, (B) हे निरीक्षण आहे.
३) (A) बरोबर आहे, (B) चूक आहे.
४) (A) हे निरीक्षण आहे, (B) हा निष्कर्ष आहे.
११) पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली?
१) नंदाताई गवळी
२) जाईबाई चौधरी
३) वेणूताई भटकर
४) तुळसाबाई बनसोडे
१२) वासुदेव फडके, वामन भावे लक्ष्मण इंदापुरकर यांनी इ.स. १८७४ साली ...... ही शाळा सुरू केली.
१) ऐक्यवर्धिनी संस्था
२) ब्राम्हो पोस्टल मिशन
३) पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूट
४) डिप्रेस्ड क्लासेस मिशन
१३) नेटीव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली होती?
१) जोतिबा फुले
२) विठ्ठल शिंदे
३) भाऊराव पाटील
४) यशवंतराव चव्हाण
१४) पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा इतिहास लिहिला आहे?
१) मधू लिमये
२) पी. एम. लिमये
३) एन. जी. लिमये
४) जी. जी. लिमये
१५) विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले?
१) पंडिता रमाबाई
२) महर्षी धोंडो केशव कर्वे
३) पेरियार रामस्वामी
४) सावित्रीबाई फुले
१६) ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) राजर्षी शाहू महाराज
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
३) महात्मा फुले
४) महर्षी कर्वे
१७) महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी इ.स. १९३६ मध्ये संस्था उघडली........
१) महिला विद्यालय
२) अनाथ बालिकाश्रम
३) ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
४) समता मंच
१८) “भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ“ ची स्थापना ........ ह्यांनी केले.
१) विठ्ठल रामजी शिंदे
२) ज्योतिबा फुले
३) डॉ. बी.आर.आंबेडकर
४) रमाबाई रानडे
१९) पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) डॉ. भि. रा. आंबेडकर
२) वि. रा. शिंदे
३) ग. बा. जोशी
४) नामदार गोखले
२०) रयत शिक्षण संस्थेचे ...... हे उद्दिष्ट नव्हते.
१) मागासलेल्या जातीत शिक्षणाची अभिरुची निर्माण करणे.
२) मुलांना स्वावलंबी, उद्योगी व शीलवान बनविणे.
३) मागासलेल्या जातीतील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे.
४) समाजाच्या उद्धारासाठी निःस्वार्थी स्त्री-पुरुषांचे संघ निर्माण करणे.
२१) स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य ......... या संस्थेचे आहे.
१) खानदेश एज्युकेशन सोसायटी
२) रयत एज्युकेशन सोसायटी
३) पीपल एज्युकेशन सोसायटी
४) डेक्कन एज्युकेशन सोसायटी
२२) कोणत्या संस्थांसोबत के एम मुन्शी संबंध आहेत ?
१) गांधी स्मारक ट्रस्ट
२) भारतीय विद्या भवन
३) ज्ञान विज्ञान समिती
४) लोक नायक भवन
शैक्षणिक उपक्रम व योजना
१) राष्ट्रीय समाज कार्यकर्त्यांची संघटना (NASW) किती साली प्रस्थापित झाली?
१) १९५४
२) १९५५
३) १९५६
४) १९५७
२) व्यावसायिक समाज कार्यकर्त्याची ”नीतिमूल्ये” टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (TISS मुंबई) कोणत्या साली तयार केली?
१) १९९५
२) १९९६
३) १९९७
४) १९९८
३) यु.जी.सी.ने समाज कार्य शिक्षणांसाठी तिसरी आढावा समिती (Third Review Committee) कोणत्या साली स्थापन केली?
१) २०००
२) २००१
३) २००२
४) २००३
४) ख्रिश्चन मिशनर्यांनी गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्यास्तव प्राथमिक शाळा काढल्या. त्या संस्थांना काय म्हटले जाई?
१) बेसिक शाळा
२) अँग्लोइंडियन शाळा
३) इंग्रजी शाळा
४) चॅरिटी (परोपकारी) शाळा
५) महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ ...... यांनी सुरू केली.
१) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
२) महात्मा ज्योतिराव फुले
३) महर्षी धोंडो केशव कर्वे
४) गोपाळ हरी देशमुख
६) आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात?
१) सावित्रीबाई फुले
२) वि. रा. शिंदे
३) लोकमान्य टिळक
४) महात्मा जोतिबा फुल
७) वर्धा शिक्षण योजना म्हणजेच :
१) खाजगी शिक्षण योजना
२) मूलभूत शिक्षण योजना
३) उच्च शिक्षण योजना
४) ग्रामीण शिक्षण योजना
८) गांधीजीच्या वर्धा शिक्षण योजनेत पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगाचा समावेश नव्हता?
अ) शेती
ब) चांभारकाम
क) कुंभारकाम
ड) लाकूडकाम
पर्यायी उत्तरे :
१) अ, ब आणि क
२) ब, क आणि ड
३) अ, क आणि ड
४) फक्त अ आणि ब
९) कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणार्या शाळा कोणी सुरू केल्या ?
१) कर्मवीर भाऊराव पाटील
२) शाहू महाराज
३) गो. कृ. गोखले
४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१०) राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते ?
१) व्हिक्टोरिया वसतिगृह
२) मिस क्लार्क वसतिगृह
३) एस.. एम्. फ्रेझर वसतिगृह
४) श्री फिटझिराल वसतिगृहे
११) भारतातील विद्यार्थी वसतिगृहाचे आद्यजनक मानले जाणारे समाज सुधारक कोण होते?
(a) महात्मा फुले
(b) छत्रपती शाहू महाराज
(c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(d) कर्मवीर भाऊराव पाटील
पर्यायी उत्तरे :
१) फक्त (b) व (d)
२) फक्त (c) व (d)
३) फक्त (d)
४) फक्त (b)
१२) ............. या महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत.
१) ताराबाई शिंदे
२) रमाबाई रानडे
३) सावित्रीबाई फुले
४) पंडिता रमाबाई
१३) स्त्री-शिक्षणाच्या कार्यात मोठी कामगिरी करणारी व्यक्ती खालीलपैकी कोण होती ?
१) महर्षी धोंडो केशव कर्वे
२) मनोहर जोशी
३) मा. स. कन्नमवार
४) ताराबाई वर्तक
शिक्षणाचे स्वरुप व सामाजिक जागृती
१) खालीलपैकी कोणता राष्ट्रीय शिक्षणाच्या चळवळीचा भारतीय राजकारणावर झालेला परिणाम नव्हता ?
a) यामुळे राष्ट्राभिमान व भूतकाळातील यशाचा साक्षात्कार वाढीस लागला.
b) यामुळे देशी भाषा वृद्धिंगत व्हायला मदत झाली.
c) यामुळे वैज्ञानिक व औद्योगिक शिक्षणाला गती मिळाली.
d) यामुळे स्त्री-शिक्षणाला चालना मिळाली.
पर्यायी उत्तरे :
१) (a) आणि (c)
२) (c) आणि (b)
३) (d)
४) (b)
२) “शिक्षणाचे कार्य म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी जे मूळ ज्ञान आहे, त्याचा आविष्कार करणे होय.” असे मत कोणी मांडले?
a) स्वामी विवेकानंद
b) महात्मा ज्योतिबा फुले
c) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d) छत्रपती शाहू महाराज
पर्यायी उत्तरे :
१) (a) फक्त
२) (a) आणि (b) फक्त
३) (a), (b), व (c)
४) (a), (b), (c) व (d)
३) शैक्षणिक प्रक्रिया म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकास हे मत .......... यांचे आहे.
१) अरविंद घोष
२) रविंद्रनाथ टागोर
३) महात्मा गांधी
४) स्वामी विवेकानंद
४) कोणते नेते पाश्चात्य ज्ञानाला वाघिणीचे दूध असे म्हणत?
१) सर फिरोजशहा मेहता
२) विष्णुबुवा ब्रम्हचारी
३) महादेव गोविंद रानडे
४) विष्णुशास्त्री चिपळूणकर
५) महात्मा फुले हे शिक्षणतज्ज्ञ ठरतात कारण .......
१) समाजातील सर्वांनी शिक्षण घ्यावे यासाठी ते सक्रिय होते
२) स्त्रियांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी पत्नीला तयार करून खास शाळा सुरू केली
३) लेखन करून लोकजागृती केली
४) वरील सर्व
उत्तरे : प्रश्नमंजुषा (१५६)
ब्रिटिश सरकारच्या शैक्षणिक संस्था
१-४
२-२
३-१
४-२
५-३
६-३
७-३
८-३
९-३
१०-४
शैक्षणिक कायदे
१-२
२-१
३-४
४-४
५-३
६-३
७-१
शिक्षणविषयक समित्या व आयोग
१-३
२-२
३-४
४-२
५-४
६-१
७-२
८-२
९-३
१०-३
११-३
१२-३
१३-२
१४-३
१५-१
१६-४
शालेय शिक्षण
१-१
२-१
३-३
४-३
५-१
६-२
७-१
८-३
महविद्यालये व विद्यापीठे
१-३
२-२
३-३
४-१
५-४
६-२
७-३
८-२
९-१
१०-२
११-४
१२-१
१३-३
१४-३
१५-३
१६-३
१७-३
१८-३
१९-२
२०-२
२१-१
२२-३
२३-१
२४-३
२५-३
२६-१
स्थानिक शैक्षणिक संस्था
१-१
२-२
३-४
४-४
५-२
६-४
७-२
८-२
९-४
१०-२
११-२
१२-३
१३-१
१४-२
१५-२
१६-४
१७-३
१८-३
१९-१
२०-४
२१-२
२२-२
शैक्षणिक उपक्रम व योजना
१-२
२-३
३-२
४-४
५-४
६-४
७-२
८-४
९-२
१०-२
११-४
१२-३
१३-१
शिक्षणाचे स्वरुप व सामाजिक जागृती
१-३
२-१
३-३
४-४
५-४